ड्यूक नोज आठवणीतील ट्रेकिंग अनुभव !

ड्यूक नोज आठवणीतील ट्रेकिंग अनुभव !

आम्ही मैत्रिणींनी ठरवले चला ट्रेकिंगला जाऊ, फिरण्याची आवड असल्यामुळे मी सुद्धा उत्साहाने तयार झाली. जसा ट्रेकिंगचा दिवस जवळ येत होता मज्जा वाटत होती, नेहमीच्या सवयीप्रमाणे खरेदी जोमात चालू होती, माझ्यासोबत माझी आत्येबहीण मधु पण येणार होती, मग काय स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, ट्रॅकपँट, बॅग सर्वकाही सज्ज..
अखेर तो दिवस उगवला, सकाळी लवकरच ठाणे स्टेशनला पोचलो, सकाळी लवकरचीच ट्रेन होती, मी पहिल्यांदाच ट्रेनने लोणावळयाला जाणार होती. आम्ही सगळ्या जणी ठाण्याला भेटलो, मग काय तिथूनच मज्जा सुरु, सुमारे ८ वाजता खंडाळ्याला पोचलो, आमचा ग्रुप तयार होता, बाकी सगळे पुण्यावरून आले होते, आम्ही त्यांना जॉईन झालो, मग पहिली सुरवात ट्रेक वरूनच, मारा उडया बऱ्याच वर्षांनी प्रयन्त करत होती, लग्नानंतरचा काळ असाच निघून गेला होता, मग काय टीम मोटिवेशन स्टार्ट झाले, ड्यूक नोज च्या पायथ्याशी पोहचलो, तिथेच धापा टाकायला सुरुवात झाली, पण एक्ससाइटमेन्ट होती शिखर गाठायची, मग काय पाय आपोआप चालू लागले, एक वेगळेच बळ जुटले पायात, पावसाचे दिवस असल्यामुळे वाटा निसरड्या झाल्या होत्या, दोन्ही बाजूने जंगल, हळू हळू चढण खूप भीतीदायक वाटायला लागली, पहिला टप्पा आम्ही जोशमध्ये चढलो, मग एक धबधबा वाटेत लागला, तिथे एक हौल्ट होता, पण आमची पाऊले काही थांबायला तयार नव्हती, हळू हळू आमचा ग्रुप मागे पुढे झाला, मी आणि माझी बहीण मधु सोबतच होतो, जस जसं एक एक टप्पा पुढे चाललो होतो ट्रेकिंग खूप भयानक जाणवत होते, एका बाजूला जंगल दुसरीकडे खोले दरी आणि पावसामुळे वाट निसटत होती, स्पोर्ट्स शूज असूनही पाय ठेवणे कठीण झाले होते, मग वाटेतच काही नवीन सोबती मिळाले, मग कसबस एकमेकांना हात देत आणि काही ठिकाणी धीर देत प्रवास चालू ठेवला, कारण तोपर्यंत एक कळून चुकले होते कि आता शहाणपणा पुढे जाण्यातच आहे, मागे जाण्याचा काही पर्याय नाही, त्यातही एकमेकांना धीर देत, हसत खेळात आम्ही पुढे जात होतो, मध्येच एका ठिकाणी सगळे थांबले होते, पुढे काय आहे कळायला मार्ग नाही, मग आम्ही पण थांबलो, हळू हळू पुढे गेलो, तर एक नवीन चॅलेंज समोर होते, , एका भल्या मोठ्या दगडावर रोपच्या साहाय्याने चढायचे होते, आणि तो जवळ जवळ १५ फूट उंचीचा होता, दोन टप्प्यामध्ये तो चढण्याची ट्रिक होती, पण असा कधी अनुभव नव्हता, आता काय करू हा प्रश्न उभा राहिला, त्यात प्रयत्न करू पण जर तो असफल झाला तर डायरेक्ट खाली.. मग हिम्मत करून आणि देवाचे नाव घेऊन उचलला पाऊल आणि मला ते जमले हुश्श !!! मधु देखील माझ्याअगोदर पुढे होती पण मी आल्याशिवाय ती काही पुढे जायला तयार नाही, ती वारंवार बोलत होती माझ्या बहिणीला येऊ द्या पहिले, तिच्या बोलण्यातील आपुलकेपणा मला जाणवला, त्या दिवशी आम्ही एकमेकांना जास्त ओळखले, आणि आमच्यात मैत्रिणीचे नाते निर्माण झाले, मग पुढचा प्रवास सुरु, आणि पुन्हा दोन वेळा ती अवघड स्टेजेस आल्या, मग कोणी सांगितले कि आता पोहचू टोकावर, उत्साह टिकून होता, आता थोड्याच अंतरावर शिखर होते, ते जणू माझीच वाट पाहत होते, मग शेवटचा पडाव होता, अगदी दोन फूट वाटेतून एका रोपच्या सहाय्यानं ते अंतर गाठायचं होतो, एकमेकांना धीर देत चालत होतो, खाली खोल दरी आम्ही समोर बघतच चालत होतो, अजून थोडं असा करत शेवटी पोचलो, आणि एकच शब्द निघाला तोंडातून Awesome!! शिखरावरून सर्व काही सुंदर दिसत होते, निसर्ग आपले विविध रंग दाखवत होता, एक सुंदर देखावा दिसत होता आणि मधेच तो धुक्यांनी लपवत होता... त्या टोकावर सगळे शांत बसून निसर्गाचा आनंद घेत होते, पण तरीसुद्धा थकवा जाणवत नव्हता. आम्ही वेली क्रॉसिंग पण करणार होतो, मग काय चला करूया म्हणत आमचा ग्रुप सज्ज झाला, पण मला त्यादिवसापुरता ऍडव्हेन्चर पुरे झाले होते, कारण मी एक आई देखील आहे, घरी सोडून आलेल्या पिल्लांची ओढ लागली होती..
मी स्वतःशीच म्हटले "पुन्हा एकदा येण्यासाठी काहीतरी बाकी ठेऊ" आणि माझ्यासोबत आलेल्या माझ्या मैत्रिणींनी ते पार केले. मग आम्ही खाली परतण्याच्या मार्गावर लागलो, सगळ्यांबरोबर खूप सारे नवीन अनुभव होते, आणि आम्ही सगळे सुखरूप खाली पोचलो, मग पोटातील कावळे काव काव करत होते, मग काय गरमागरम चहा आमची वाट पाहत होता, तो पिऊन परतीचा प्रवास सुरु. एका गावातून निघालो.. आता अजून एक नवीन अनुभव, स्टेशन पर्यंत जायला काही साधन नव्हते. समोरून एक टेम्पो येताना दिसला, मग चढा टेम्पोमध्ये, पहिल्यांदा टेम्पो प्रवास, पण खरं सांगू मनातल्या मनात हसायला येत होते, हे काही मुंबईत अनुभवायला मिळाले नसते, मग काय खंडाळा स्टेशनवरून सिहंगड एक्सप्रेस पकडून घरी परतलो, आणि मग घरी आल्यावर पायांनी साथ सोडली, दोन दिवस पूर्ण रेस्ट. पण एकंदर सर्व प्रवास छान झाला, आणि जीवनात काहीतरी खूप छान केल्यासारखे वाटले, मला तर जगल्यासारखे वाटले. एकदातरी असा अनुभव घ्यायला हवा मैत्रिणींनो!!!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle