माझी सगळ्यात चांगली व्हर्जन : मीच

ती एकटीच राहते म्हणे....
आणि तिचे रिलेशनशिप स्टेटस पण
काही कळत नाही बुवा....

कधी गळापडू मैत्री करत नाही
अन कधी विनम्र पणा सोडत नाही...

छ्या.. ह्या स्वप्नाळू बाईला
साच्यात बसवायचं तरी कसं ?!

मी कशी दिसते अन कोणावर प्रेम करते
या वरून मला ठोकुन ठाकून साच्यात बसवायचे
तुमचे प्रयत्न आहेत व्यर्थ.

मी फक्त मी म्हणून जगते आहे
समृद्ध, सुखी, स्वतंत्र, समर्थ.

तुमचे तुच्छ पूर्वग्रह आणि सामाजिक बंधने
तोडून विहरते आहे मी मोकळ्या निळ्या अवकाशात

कसलं ग्लास सीलिन्ग म्हणताय?!

माझं ज्ञान कमी पडत होतं ते शिकून
केलीये मी त्यावर मात.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ओरिजिनल इंग्रजी.
Being my best.
She lives alone they say…
And her relationship status is vague! They wonder…
Not too friendly, never impolite, it is very difficult
To place this dreamer.
And a complete waste of your time … this culture of
Judging a woman by how she looks and whom she loves.
Being herself while the world tries to pigeonhole her.

In the quest of pure joy and total freedom,
She has soared in the wide blue sky
Leaving behind petty prejudices, सोशल कंडिशनिग अ‍ॅन्ड जें डर स्टिरिओ टायपिन्ग.

What glass ceiling she asks!
There was just a knowledge gap that I conquered.

चांगले झाले वाचन माझा पहिलाच अनुभव.

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle