जबरदस्त " इंदू सरकार "

फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याच्या इराद्याने " तुर्कमान गेट " या वस्तीवर बुलडोझर फिरवला जातो. वस्तीला आग लावली जाते /जाळपोळ केली जाते या सगळ्या गदारोळात आपली नायिका सापडते आणि अचानक तिला दोन लहान मुलं दिसतात. भेदरलेली/घाबरलेली . एकटीच . त्या जाळपोळीत त्यांचं रक्षण करण्यासाठी नायिका धावून जाते आणि त्या छोट्या मुलांच्या चक्रव्ह्यूहात जी काही अडकते आणि खऱ्या खुऱ्या चित्रपटाला सुरवात होते. नायिकेचा नवरा सरकारी ऑफिसर असतो . त्याने मुलांना घरात ठेऊन घेण्यासाठी नायिकेवर बंदी घालणं. त्यानंतर नायिकेचा मुलांच्या पालकांचा शोध घेणं पण पालक न सापडणं या सगळ्या जंजाळात नायिका इतकी पुरती अडकून जाते कि नवर्याच्या " मी किव्वा मुल " या पैकी कोणाची तरी एकाची निवड कर या धमकीला न घाबरता नायिका मनापासून मुलांच्या बाजूने कौल देते आणि मध्यंतर होतो. नायिका स्वतः अनाथाश्रमात वाढलेली असल्याने मुलांचे पालक न सापडणं / त्या दंग्यात हरवणं हा तिच्याकरता जिव्हाळ्याचा विषय ठरतो. त्याच सुमारास विदयमान सरकारने " आणीबाणी " डिक्लेयर केलेली असल्याने त्याच्या विरोधात नायकेचा लढा हाच तर संपूर्ण सिनेमाचा गाभा ठरतो.

कथानकाला आणीबाणीचा फक्त संदर्भ घेतलेला आहे पण प्रत्यक्ष कथानक आणीबाणी च संपूर्ण चित्रण करणार नाहीये हे माझ्या साठी जरा नवीनच होत तरी सुद्धा आणीबाणीच्या संदर्भाला/ त्या वेळी घडलेल्या घटनांना ( नसबंदी ) मुळ कथानकात ज्या बेमालूम पणे मिसळले आहे त्याला तोडच नाही . ते फक्त आणि फक्त मधुर भंडारकरच करू जाणे . मधुर भांडारकर हा एक अतिशय हुशार डिरेकटर आहे . हे या सिनेमातून परत एकदा सिद्ध होत. कलाकारांची अचूक निवड हे त्याच्या सिनेमाचं बलस्थान असत. ते चोख झालेल आहे. नील नितीन मुकेशचा " चीफ" जबरदस्त छाप सोडतो. नायक (तोता रॉय चौधरी) आणि नायिकेची (कीर्ती कुल्हारी) काम पण उत्तम झाली आहेत फक्त नायिकेचं "तोतर" असणं का दाखवलं आहे ते मात्र समजत नाही किव्वा त्याची खरं तर जरुरीचं नव्हती असं वाटत . तीच "तोतर" असंण काही काही प्रसंगाना बाधा मात्र आणत असं असूनही कलाकारांची काम उत्तम झाली आहेतच .

संवाद हा नेहमी सिनेमाचा आत्मा असावा असं माझं मत आणि तो या सिनेमात आहे . "घर बदलनेसे सिर्फ पता बदल जाता है लेकिन नसीब नही बदलता "अशा संवादातून समजत कि घरातून बाहेर पडल्यामुळे नायिकेचा फक्त पत्ता बदललाय पण नशीब नाहीच. अशा या आपल्या नायिकेचं नाव आणि आडनाव आहे " इंदू सरकार "झटका लागला ना ? तिच तर मधुर भांडारकर ची खासियत आहे :)

Keywords: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle