Zentangles

मी 2004 मध्ये फाईन आर्ट्स चा फाउंडेशन कोर्स केला. वर्षभर असाईनमेंट्स घोटून घोटून हातावर सॉलिड हुकूमत आलेली. अगदी कशाचंही स्केच मी यु काढत असे. 2005 ला इंटिरियर ला ऍडमिशन घेतली आणि स्केचिंग जरा कमी झालं. मग जॉब , मग लग्न , मग मूल यात 12 -13 वर्ष कशी निघून गेली ते कळलं ही नाही . रेहा चा जन्म झाल्यावर मी नोकरी सोडली. असं वाटलं खूप पैसे कमावले आता थोडं थांबुया !
स्वप्न अगदी सोनेरी पाहिलेलं मी. पण 4 महिन्यातच जाणवू लागलं की मी हाऊसवाईफ नाहीय. मला चारिठाव स्वयंपाक रांधणे , घर साफसूफ करणे , आदर्श आई बनून मुलीला मोठं करणे जमेल असं वाटत नाही. मग मन रमवायला ज्वेलरी बनवली ,अजून पण काय काय केलं पण रेहा मोठी झाल्यावर वस्तू हातात घेणे , तोंडात घालणे हे प्रकार सुरू झाले. मग मी तो हो गाशा गुंडाळला.
एकदा सहज म्हणून एक स्केच काढून पाहिलं तर हात वळेचना! खूप प्रयत्न केला पण शून्य....जी गोष्ट जिवापलीकडे आवडत होती, येत होती ती एकदम नाहीशी झालेली 1इतक्या वर्षात. आता रेहा 3 वर्षाची होईल. इतक्या दिवसात मी ही वेळ मिळेल तसा हात मोकळा करून घेतला. माझं पिल्लू एकदम गुणांच आहे. मम्मा ला कधीच त्रास दिला नाही.
मी माझे काही स्केचेस आणि zentangles आज शेअर करते. इकडे चित्रकलेत खूप दिग्गज मैत्रिणी आहेत. प्लिज मला तुमचे सजेशन द्या म्हणजे मी सुधारणा करू शकेन.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle