चक्राता

दोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून किरण पुरंदरेंबद्दल समजले. लेकाला पुण्याजवळच्या एक दिवसाच्या कॅंपला पाठवले. त्याला कँप प्रचंड आवडला. पक्षी बघणे तर आनंददायी आहेच पण किरण पुरंदरेंबरोबर पक्षी बघणे खूपच रिफ्रेशिंग आहे. त्यांना सर वगैरे म्हणलेलं आवडत नाही आणि एकेरी किरण कसं म्हणणार त्यामुळे ते मुलांचे किरण काका आणि नंतर सगळ्यांचेच किका झाले. सगळे त्यांना किका म्हणूनच ओळखतात.
त्यानंतर लेकाने दिवेघाट, भिगवण, भीमाशंकर, सिंहगड पायथा असे ४-५ कँप केले. त्याच्याबरोबर मलाही आवड निर्माण होऊ लागली. चिमणी, कावळा, कबुतर सोडूनही १० प्रकारचे पक्षी आपल्या आजुबाजुला आवारातच सहज दिसतात, फक्त डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे हे जाणवायला लागलं. मी पण एक पाषाण लेकचा अर्धा दिवसाचा कँप केला.
काही ना काही कारणाने मागचं वर्षभर त्यांच्याबरोबर एकही कँप जमला नाही. २ जानेवारीला यावर्षी उन्हाळ्यात चक्राता कँप लावल्याची मेल लेकाला वाचून दाखवली. आपण जाऊ म्हणून तो मागे लागला होता, पण मी नंतर बघू असं सांगून त्याची बोळवण केली आणि साधारण आठवड्याभरात आपण जाऊच असं मी मनाशी ठरवलं. चक्क नवराही लगेच तयार झाला. २८ एप्रिल ते ३ मे देहरादून ते देहेरादून असं किकांच पॅकेज होतं.
त्यांना अ‍ॅडव्हान्स दिला. पुणे दिल्ली आणि येतानाची फ्लाइट्ची तिकिट्स बूक केली. दिल्ली देहरादून फ्लाइट महाग वाटत होते. आणि लेकाला अजुन एक अनुभव म्हणून दिल्ली-देहरादून आणि येतानाची देहरादून-दिल्ली नंदादेवी एक्सप्रेसची थ्री टायर एसी ट्रेन तिकिट्स बूक केली. आणि ह्यातलं काहीच लेकाला कळू दिलं नव्हतं. त्याला सरप्राइज द्यायचं होतं. (ते फार दिवस सरप्राइज रहिलंच नाही. त्याला लवकरच लक्षात आलं) लेकाची परीक्षा संपली की सुट्टीत बाकिची तयारी करू असं ठरवून रोजच्या कामात परत अडकलो.

चक्राता - तयारी

कमशः

Keywords: 

चक्राता - तयारी

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

एप्रिल मधे परिक्षा संपल्यावर मेल परत चेक केले. आमच्याकडे चांगली दुर्बिण नव्हती. किकांना विचारून दुर्बिणीने चक्राता शॉपिंगचा श्रीगणेशा केला. (इथेच लेकाला नक्की समजलं की आम्ही कँपची तयारी करत आहोत.)
मग कॅमोफ्लाज कपडे, चांगले शूज ही सगळी खरेदी झाली. गरज असलेल्यांबरोबर गरज नसलेल्यांनीही (पक्षी लेकाने) हात, आमचे खिसे साफ करून घेतले. फोटोग्राफी शिकायचं बकेट लिस्ट्मधे केव्हाचं आहे पण ते न झाल्याने अजुन मोठी, चांगली लेन्स विकत किंवा भाड्याने घ्यायचं रद्द केलं.

पक्षी ओळखण्यातही मुलगा २रीत असेल तर मी पहिलीत आणि नवरा के.जी. मधे आहोत/ होतो. खरं तर या कँपला १०वी नाहितर निदान ८वी ९वीच्या विद्यार्थ्यांनी जायला हवं पण आम्ही विचार केला कुठे परिक्षेला बसायचं आहे नुसताच अभ्यास करायचा आहे. :) पण त्यामुळे एक रेफेरंन्स बुक हवं होतं. प्री-कँप मीटिंग मधे किकांनी सजेस्ट केलेलं birds of indian subcontinent खरेदी केलं.
पुण्यात आणि नंतर दिल्लीत तेव्हा प्रचंड उन्हाळा होता. देहेरादून ला थंडी असणार होती आणि पाऊसही असू शकणार होता. त्यामुळे तिन्ही ऋतूंचे कपडे घ्यावे लागले. नोर्मल कपडे ४-५ सेट्स, स्वेटर्स, कानटोप्या, रेनी जॅकेट्स, उन्हाळी टोप्या, कॅमेरा, त्याची आहे ती लेन्स, दुर्बिण, त्यांचे योग्य कपडे, बॅटरीज, चार्जर्स, प्रत्येकाला पाण्याची बाटली (स्टील ची) असं करत बरच सामान झालं.

२७ मे ला संध्याकाळी ६ च्या पुणे - दिल्ली फ्लाइट्ने आमचा प्रवास चालु झाला. दिल्लीत पोहोचल्यावर आमच्याकडे वेळ होता. एअरपोर्ट वरून दिल्ली रेल्वे स्टेशनला मेट्रोने गेलो. दिल्ली मेट्रो हा खूपच आनंददायी अनुभव होता. संध्याकाळ असल्याने उकाडा कमी होता, मग तिथून सायकल रिक्षा करून आम्ही जुनी दिल्ली बघत बघत जामा मशिद जवळ करीम्सला गेलो. करीम्सला जेऊन बाहेर मस्त शाही टुकडा, लस्सी वगैरे दिल्ली स्पेशल खाऊ खाल्ला. पण जुनी दिल्ली बघून फारच वाईट वाटले. सगळ्या रस्त्त्यांवर लोंबकळणार्या उघड्या विजेच्या तारा, अतोनात गर्दी, गाड्यांनी भरून वहाणारे रस्ते, दुसर्याला न जुमानता पुढे जाणारी वहाने, सगळंच भयानक वाटलं. त्या गर्दीतच रस्ता अडवून चाललेली लग्नाची मिरवणूक बघून मला आमच्या दत्तवाडी एरिआची आठवण झाली.

रात्री ११:५० ला नंदादेवी एक्स्प्रेस मधे बसलो. आधीपासून डिक्लेर केल्याप्रमाणे लेक सगळ्यात वरच्या बर्थ्वर झोपला खरा पण तो लोळत लोळत पडेल का काय हेच डोक्यात असल्याने मी मधल्या बर्थ वरून दर तासाने उठून तो अजुनही सरळच झोपला आहे ना चेक करत होते.
Dehradun.jpg
सकाळी ६-६:३० वाजता दूनला पोचलो. रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ एक हॉटेल रूम बूक केली होती. दुपारच्या जेवणाला सगळे भेटणार होते त्यामुळे आमच्याकडे सकाळचा थोडा वेळ शिल्लक होता. फ्रेश होऊन नाष्ता करून पलटण बाजार बघायला गेलो. ही तर आपली पुण्यातली तुळशीबाग होती. खरेदी तर करायची नव्हतीच. मग बळच काहितरी खादाडी करत परत आलो आणि रूम वेकंट करून सगळे भेटणार होते तिथे हॉटेल आंगन ला येऊन पोहोचलो. आमच्या नेहेमीच्या वेळेत पोहोचण्याच्या सवयीप्रमाणे १:३०-२:०० वाजता भेटायचे ठरले होते आणि आम्ही १ वाजताच आंगनच्या अंगणात बागडत होतो.

ह्या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - वाटेवर

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

काही आधी एअरपोर्ट ला भेटून एकत्र आले तर काही यायचे होते. वयाची रेंज २.५ वर्षाच्या लहानग्यापासून, १४-१५ वर्षाच्या मुलांपासून, ७८ वर्षाच्या तरूण आजोबांपर्यंत होती. लवकर जेवण झालेल्यांनी बकिच्यांचे जेवण होइपर्यंत किकांबरोबर बसून आपल्याला कोणकोणते पक्षी दिसणार त्याची चर्चा आणी यादी करायला सुरुवात केली. सगळ्यांचे होइतो ४ वाजून गेल्याने आणि बरेचसे पुणेकर असल्याने तिथेच चहाही झाला आणि ५ वाजता आम्ही चक्राताला निघालो. आम्ही एकूण २७ जण होतो. ४ जीप्स अरेंज केल्या होत्या त्यातून आमचा प्रवास चालु झाला.

वाटेत कल्सी गावाजवळ यमुना नदीवर थांबलो
Yamuna.jpg

इथुनच पक्षी निरिक्षणाला सुरुवात झाली. इथे आम्हाला House Crow, Red-vented Bulbul, Common Pigeon, Rose-ringed Parakeet, Black Kite तसेच पाणथळीत असणारे River Lapwing, Little Cormorant, Indian Pond Heron, Pied Kingfisher दिसले. Pied Kingfisher ने हवेत २ सेकंद थांबून फोटोला पोज दिली होती पण उजेड कमी झाला होता त्यामुळे छान फोटो नाही घेता आले. इथेच Blue-tailed Bee-eater हा पण दिसला. अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे आम्हाला खूप मोठया संख्येने म्हणजे अंदाजे ३०० Streak-throated Swallow दिसल्या. मधेच एकत्र उडत होत्या, मधेच तारेवर बसत होत्या आणि मधेच तर जमिनीवर पण बसत होत्या. पाकोळ्या अशा जमिनीवर बसलेल्या कधीच बघितल्या नव्हत्या.

इथुन पुढे हवा हळुहळु थंड होऊ लागली.
हवेतला गारठा, रस्त्यांचे चढ उतार, झाडं यावरून आपण हिमालयाच्या जवळ येत आहोत हे जाणवायला लागलं.
OnTheWay.jpeg

८-८:१५ ला चक्राताला पोहोचलो. त्यापुढे ५ किमी. वर आमचे रिसॉर्ट 'हिमालयन पॅरेडाइज' आहे तिथपर्यंत जातानाचा रस्ता चांगलेच गारठलो होतो. गाड्यांमधून खाली उतरलो आणि थंडीचा तडाखा आणखीनच जाणवला. स्टाफला बहुदा कलपना असावीच. उतरल्या उतरल्या गरमा गरम चहाने आमचे स्वागत झाले. अमृततुल्य चहा आणि रिसॉर्टची देखणी वास्तु यामुळे जीव सुखावला.
रूम्स बघून तर एकदम अहाहा झाले.

सगळेच दमलेले असल्याने रात्री जेवण, गप्पा उरकून ९:३०- १० लाच सगळे झोपायला गेलो. लवकर उठव असं १०० वेळा लेकाने बजावल्याने ४:३० चाच गजर लावून आम्ही झोपलो. उद्याची सकाळ अफलातून इतकी असणार होती हे आधी माहित असतं तर एक्साइटमेंटने रात्रीच मला झोप लागली नसती.

ह्या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - हिमालयन पॅरेडाइज परिसर

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

दगडी बांधकाम केलेल्या आणि लाकडाचा भरपूर वापर केलेल्या खोल्या मस्त उबदार होत्या. पांघरूण १.५-२ इंच जाडीचं आणि चांगलं जड होतं. ४:३० चा गजर बंद केला पण पांघरूणातून बाहेर येऊ वाटेना. परत झोप लागणार असं वाटत होतं तोवर अंदाजे ५ वाजता पक्षांचे आवाज येऊ लागले होते. प्रोमिनंट येत होते ते आवाज होते Black Francolin आणि Great Barbet यांचे! किका म्हणतात Black Francolin चा कॉल 'चीक पान बिडी सिगरेट' असं म्हणल्यासारखा असतो हे अगदी तंतोतंत पटलं. न रहावून बाहेर आलोच.

रिसॉर्ट असं होतं
Risort1.JPG

२-३ रूम्सना मिळून कॉमन बाल्कनी होती आणि खाली ओपन स्पेस वर बसायला जागा होती. समोर सगळ्या बाजूंनी डोंगर! Love
हे असं
IMG_20190430_054743.jpg IMG_20190430_054755.jpg

अजुन एक व्ह्यू. ह्या समोर दिसणार्‍या खिडक्या आमच्या रूमच्या!
Risort2.JPG

अजुन पुरतं उजाडलं नाहिये म्हणेपर्यंत ५:३० पर्यंत पूर्ण उजाडलं. आम्ही कॅमेरा, दुर्बिणी घेऊन खाली पळालो. समोरच्या डोंगरावर Black Francolin दुर्बिणीतून दिसत होता. Russet Sparrow, Himalayan Bulbul, Black Bulbul रिसॉर्ट्च्या आवारतच नाचत होते. खालच्या बाजूच्या झाडांवर Blue Whistling Thrush गात होते. इथला कावळा काव काव न म्हणता आव आव म्हणतो. :haahaa2:

५:३० पासून ७-७:३० पर्यंत आम्ही समोरच्या डोंगर दर्‍यातच भरपूर पक्षी बघितले. ८:१५ पर्यंत आवरून ब्रेकफास्ट्ला आणि ९ वाजता बाहेर पडायचं ! ४ही दिवस आमचं हेच रुटीन होतं.
हे काही फोटो
Red-billed Blue Magpie - महाराष्ट्रात न दिसणार्‍या या पक्षाने आम्हाला रिसॉर्टच्या आवारात येथेच्छ दर्शन दिले.
RedBilledBlueMagpie.JPG RedBilledBlueMagpie1.JPG

Himalayan Bulbul - हिमालयन बुलबुल चा तुरा आपल्या बुलबुलच्या तुर्‍यापेक्षा जास्त बाकदार पुढे कपाळापर्यंत असतो आणि वेंट लाल नसून पिवळे असते.
Himalayan Bulbul.JPG

Black Bulbul - ह्याला तुरा नसतो.
Black Bulbul 2.JPG

Blue Whistling Thrush - हा लांबून आम्हाला कावळाच वाटला पण सुंदर गातो आणि जवळून बघितला तर दिसतो पण सुंदर.
Blue whisling Thrush.JPG

Grey Bushchat - ही इवलूशी बया नंतर पण आम्हाला असंख्य वेळा भेटली. आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो काढून देत होती.
Gray Bushchat 2.JPG

Russet Sparrow - आपल्या चिमणीपेक्षा थोडी वेगळी असते.
Russet Sparrow.JPG Russette Sparrow 1.JPG

ह्या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - कोटी कनासर, मंगताड

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

जातानाच भरपेट नाष्ता करून ९-९:१५ ला निघालो. मधे लोखंडी नावाचे जरा मोठेसे जंक्शन लागते.तिथून पुढे कोटी कनासर ला गेलो. रस्त्यातून जाताना प्रत्येक वेळी पक्षी दिसले की थांबून फोटो सेशन, चर्चा असं चालू होतं. जातानाच देवदार चे मोठे वृक्ष लक्ष वेधून घेत होते.
Devdar.JPG

इतर ही बरीच झाडं होती. Rhododendron नावाचं झाड दाखवलं. या झाडाची फुलं वापरून सरबत तयार करतात. लोकल भाषेत त्याला बुरांश म्हणतात. साधारण आपल्या कोकम आणि Rooh Afza यांच्या मिश्र चवीचे सरबत तयार होते.
हे ते फूल
Rhododendron.JPG

कोटी कनासर ह्या जागेला देवबन म्हणतात. आपल्याकडे जशी देवराई तीच कॉन्सेप्ट! इथले वृक्ष संवर्धन करून ठेवतात. इथे दोन भले मोठे देवदारचे वृक्ष आहेत जे ४०० वर्षं जुने आहेत. त्यांचा बुंधा ६.५ मीटर आहे.
हे त्यातलं एक झाड.
Devdar1 - Copy.JPG
Devdar1.JPG

येताना बरोबर जेवणही आणलंच होतं. टिंडाची भाजी, फुलके, राजमा, चावल असं भरपेट जेवण करून काही जण तिथे लवंडले आणि तरुणाई इकडे तिकडे भटकू लागली. या वर दाखवलेल्या झाडाचं जवळून निरिक्षण केल्यावर त्यावर आम्हाला Treecreeper दिसला. इतका बेमालूम कॅमोफ्लेज झाला होता. या झाडावर त्याचं अ‍ॅक्टिव्ह घरटं होतं
Bar Tailed Treecreeper
Bar Tailed Treecreeper.JPG

इथे थोडावेळ भटकून आम्ही चालत मंगताड गावाकडे निघालो. हा ट्रेल कम ट्रेक झाला. पण इथल्या स्थानिक लोकांची घरं, शेतं हे बघायला मजा आली. कर्ती माणसं कामावर गेली होती. बर्‍यापैकी सर्व घरांतून लहान लहान मुलं आणि/ किंवा म्हातारी माणसं होती. घरांना कुलुपं वगैरे भनगड नव्हतीच.

ऑथेंटिक पद्धतीची ही घरं लाकडी असतात. दगडांच्या कपच्यांची कौलं असतात. हल्ली पत्रे देखील वापरतात. ह्या घरांना रंग देतात तोही ह्यांच्या इथल्या मातीतून नॅचरली मिळतो. अर्थात काही घरं तयार रंगांनी रंगवलेलीही होतीच.
Mangtad1.JPGMangtad2.JPG
स्थानिक. फोटो त्यांना खुणांनी विचारून काढ्ले. पण अजुन बोलायला गेलो तर त्यांना भाषा समजेना त्यामुळे गप्पा मारता आल्या नाहीत. स्थानिक भाषा जौहारी आहे. हिंदी सारखीच असली तरी पटकन समजत नाही.
Mangtad3.JPGMangtad4.JPG

येताना लोखंडी गावात थांबून गरम चहा आणि बिस्किटं खाल्ली. तिथे या हिमालयन शेळीने मला मस्त पोज दिली. मग तिच्या
मालकिणीचा पण फोटो घेतला.
Local1.jpgLocal.jpg
Local2.jpg
सूर्य मावळतीला गेला तशी थंडी वाढू लागली. ७-७:३० ला रिसॉर्ट्ला परत आलो. थोडं फ्रेश होउन डायनिंग रूम मधे परत जमलो आणि आज कोणकोणते पक्षी कुठे बघितले, त्यांची वैशिष्ठ्ये इत्यादी गप्पा मारल्या. यादी केली. तोवर जेवण तयार असल्याचे सांगितले. थंडी भरपूर होती. जोरात पाऊसही आला त्यामुळे जेवण झाल्यावर मुकाट झोपायला गेलो.

ह्या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - खडांबा, देवबन

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

एकंदर असं लक्षात आलं होतं की सूर्य उगवण्याआधी आणि मावळल्यानंतर तापमान खाली जायचे. रात्री वारा सुटलेला असायचा. त्यात रात्री दिवे गेले. जनरेटरवर गरजेच्या गोष्टी चालु होत्या. रूम्सवर एखादा पॉईंट आणि नाइट लॅम्प इतकच चालु होतं. कॅमेरा कसाबसा चार्ज केला त्यामुळे मोबाइल चार्ज झाला नाही. मोबाइलचा उपयोग पण फोटो काढण्यासाठीच होता. चारही दिवस सोशल मिडियाची आठवण फारच क्वचित आली.

दुसर्या दिवशीही Black Francolin च्या आवाजाने जाग आली. नाष्ता होईपर्यंत अजुन काही नविन काही कालचेच असे पक्षी बघितले. जाताना एक झर्यापाशी गाड्या थांबवल्या. स्वच्छ आणि गोड पाणी भरून घेतलं. या सगळ्या भागात थंडीच्या दिवसात बर्फ असतो तापमान कमी असल्यामुळे एका घळीत वरून घरंगळत आलेला आणि अजुनही साठून राहिलेला थोडा बर्फ आम्हाला मिळाला. हिमालयात येऊन बर्फ बघितला नाही असं आम्हाला आता म्हणायला नको. :winking:

IMG_20190430_122948.jpg

IMG_20190430_125615.jpg

इथे एक शेड होती. तिथे सगळे टेकलो. थोडं अबर चबर खाल्लं. पक्षी बघितले. तिथून परत थोडं अंतर चालत (चढ-उतार च, सरळ चालत जाणं असं फक्त रिसॉर्ट्जवळच्या रस्त्यावरच) आणि तिथल्या एका गेस्ट हाउस च्या आवारात गेलो. तिथे जेवण केलं. तिथे एक मस्त देवबन होतं. उंचावर आल्यामुळे इथे रॅप्टर्स दिसायला लागले होते. Himalayan Vultures दिसली.
Himalayan Vulture3.JPG

येताना एक अफलातून स्पॉट होता. तिथे आपण रॅप्टर्स च्या लेवलला असतो. कावळे पण गिधाडांच्या बरोबरीने उडत असतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांना त्रास पण देत असतात. बरोबरीने उडण्याचे कारण गिधाडं आपलं खाद्य शोधतात तेव्हा त्यांच्याबरोबर कावळ्यांनाही खाउ मिळतोच. इथे पक्षी आणि बरोबर इतर फोटोग्राफी झाली.
liken.jpg
ह्याला लायकेन म्हणतात. हे उत्तम हवामान असल्याचे दर्शवते. साधारण शेवाळ्यासारखे दिसते, पण रंग लाल्, पिवळा, केशरी असे असतात.

IMG_20190430_164403.jpg
आम्ही बसलो होतो तिथे मागे असा कडा होता

IMG_1051.JPG
लेक आणि एक मित्र गाडीवर चढून बसले.

इथे येत असताना रस्त्यवर एका झर्‍यापाशी गाय मरून पसलेली बघितली होती. पण तेंव्हा क्लिक झाले नाही. मेलेला प्राणी म्हणजे गिधाडं नक्की येणार. परत येत असताना घाईघाईत तिथे आलो. थोडं शोधल्यावर जवळच्या एका उंच झाड्याच्या शेंड्यावर गिधाड दिसलंही! पण आमचा २५ -२६ जणांचा घोळका बघून खाली आलं नाही. आम्ही तिथून गेल्यावर नक्की आलं असणार!

नेहमीसारखे ७:३०-८ ला परत आलो. ठराविक लोक दिवसभरात दिसलेल्या पक्षांची लिस्ट करायला जेवणाच्या आधी भेटली. जेवणानंतर गप्पा मारत बसायचा बेत होता. पण परत पाऊस आला अणि वीज गेली. पाऊस असल्याने आवारात पण फिरता येइना. त्यामुळे आज पण सगळे वेळेत झोपायला गेले. पाऊस आणि लाईट नाही या कॉम्बीमुळे ४ ही दिवस सगळे वेळेत आपापल्या रूम्सवर गेले. :)

या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - बुधेर केव्ह्ज

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

२ दिवस हा सुंदर पक्षी दिसत होता पण छान फोटो मिळत नव्हता आज त्याचा मनासारखा फोटो मिळाला
Verditer Flycatcher
Verditer Flycatcher.JPG

हा सुतार पक्षी पण आवारातच दिसला. ही म्हणायला हवं कारण फिमेल आहे.
scally bellied woodpecker female
scally bellied woodpecker female.JPG

ग्रेट बार्बेटचा चांगला फोटो नाही पण आहे तोच देते. रिसोर्ट समोरच्या दरीत त्यांची कम्युनिटी होती. ग्रेट बार्बेट हा तांबट म्हणजे कॉपर स्मिथ बार्बेटचा चुलत भाऊ. आवाज आणि रंग थोडे वेगळे असतात
Great Barbet1.JPG

बुधेर केव्ह्ज ला जाण्यासाठी आधी कनासरजवळ गेलो. एके ठिकाणी आमचं पॅक्ड लंच आम्हाला दिलं आणि आमचा ट्रेल चालु झाला. बरोब्बर २.५ किमी. चाललो आणि जे काय समोर आलं ते अप्रतिम होतं.
BudherCaves.jpgBudherCaves2.jpg
सगळीकडे फक्त आणि फक्त हिरव्यागार टेकड्या. इथे सगळ्यांनी गोलात बसुन आपलं पॅक्ड लंच केलं. एकदम शाळेच्या ट्रिपला गेल्यासारखं वाटलं. :)
गुहेत आत जाण्यासाठी अगदी निमुळता रस्ता आहे. रस्ता नाहीच भोक आहे एक! खाली पण पाणी आणि मोठे मोठे दगड आहेत.
आत उभं रहायला पण जास्त जागा नाही त्यामुळे एका वेळी ४ जण आणि एक गाइड म्हणजे किका असे ५ जणंच आत जाऊ शकत होते.
BudherCaves3.jpg
आत पाणी साठलेलं होतं. काही ठिकाणी बर्फ पण जमला होता. आत मधे छोट्या गंधकाच्या कांड्या पण बघायला मिळतात. गुहा अगडी छोटी आहे पण मिट्ट काळोख असतो. प्रत्येकाच्या हातात टोर्च अत्यवश्यक आहे. अगदी थोडंच आत जाता येतं त्यानंतर तिथे एक अचानक १० फुट खोल खड्डा आहे. टोर्चने बघितलं तर खड्ड्यात पाणी आहे आणि आतून जायला रस्ता आहे. पण तिथून पुढे आजवर कुणी गेले नाही असं स्थानिक म्हणाले.

हे मंदीर खूप जुणं आहे.

Temple.JPG
BudherCavesTemple.jpg
ह्या मंदिराबद्दल मला फार काही माहिती नाहिये.

परत येतानाच्या रस्ता
BudherCavesOnTheWay.jpg

इथे स्थानिकांना झाडं तोडू नका असं सांगतातच पण त्याचबरोबर त्यांना झाडं न तोडल्याबद्द्ल रिवॉर्ड देतात. आयुष्य संपत आलेली
ठराविक झाडं तोडून त्याचा दरवर्षी लिलाव करतात. गावकर्‍यांना हे लाकूड फुकट देऊन टाकतात. अर्थात त्याचे पण नियम आहेत असं ऐकलं. त्यांना हे लाकूड स्वतःच्या वापारासाठी दिलेलं असतं. त्यांना ते विकायची परवानगी नाही. झाडं तोडतात तेवढीच परत लावतात त्या नविन जनरेशनला जागा पण होते आणि लाकूड हवं तेव्हा मिळतंय ह्यामुळे गावकरी काळजी पण घेतात. मला हा प्रकार फार आवडला.

येताना ड्रायव्हरने एका छोटीला थांबवून तिच्याकडून ओला मसूर घेतला. आपण जसा ओला हरभरा खातो तसंच हे लोक हा मसूर खातात
Masur.jpg

येताना खूप धनगर आणि त्यांच्या खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात गाई म्हशी दिसल्या. आपली जनावरं ओळखता यावी म्हणून काहींनी त्यांना मेंदी लावली होती. त्यामुळे त्या लाल, केशरी शेडेड गाई फारच कॉमेडी दिसत होत्या. धनगर लोक मोस्ट्ली मोमेडियन कम्युनिटी होती. हे लोक आता बर्फ पडेपर्यंत इथल्या जंगलांमधेच मुक्काम करतात. Omg इथे बर्फ पडला की खाली अजून जंगलं आहेत तिथे बर्फ नसतो तिकडे जाउन रहातात. थोड्या वेळापूर्वी दिसलेल्या हिरव्या टेकड्या इतकी जनावरं रोज चरायला नेली तर संपून जातील असं मनात आल्याशिवाय राहिलं नाही. :straightface:

आज रिसॉर्ट्वर आल्या आल्या हे Rhododendron सरबत आम्हाला दिले. ज्यांना चहा हवा त्यांना चहा पण ठेवला होता. आम्हाला चहाचा अपमान करायचा नव्हता. :ड आम्ही सरबत पिऊन वर चहा प्यायला. खरं तर मला Rhododendron फार नाही आवडले. :P आणि तिथे सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७-७:३० ला दोन्ही वेळा थंडी इतकी असायची की त्यात चहा न पिणं म्हणजे एका मोठ्या आनंदाला मुकण्यासारखं होतं.

या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

चक्राता - टायगर फॉल्स, ग्वासापूल

या आधीचा भाग इथे वाचा.

कॅम्पचा शेवटचा दिवस होता. टायगर फॉल्सला ५ किमी चालतच जायचं ठरलं होतं पण रात्री खूप मोठा वादळी पाऊस झाल्याने वाटा निसरड्या झाल्या असणार होत्या. शिवाय ग्रुप मधे ट्रेकर्स तर नव्हतेच पण अगदी छोटे आणि ज्येष्ठ नागरिकही होते. त्यामुळे गाड्यांनीच तिथे जायचं ठरलं. आणि गाड्यांनीच जायचंय तर आधी तरी पाय मोकळे करू म्हणून आम्ही ६:३० वाजता रिसॉर्टच्या रस्त्यावरून पुढे ग्वासापूल म्हणजे साधारण १.५ किमी पर्यंत गेलो.

प्रत्येक वेळी फिरताना हातात दुर्बिण किंवा कॅमेरा किंवा दोन्ही असणं मस्ट असतं नाहितर सगळे कोण कोण दिसतंय म्हणून बोटं दाखवत असतात आणि आपली चिडचिड होते. अनुभवाचे बोल! लेकाकडे दुर्बिण आणि नवर्‍याकडे कॅमेरा. मी आपली सारखी दोघांपैकी एकाच्या मागे, मला पण दाखवा काय दिसतंय. पण दुसर्या दिवशी पासून अनघा ताईंनी (किकांची अर्धांगिनी) त्यांची दुर्बिण खूप वेळा माझ्याकडेच दिली होती. त्यामुळे मी बरंच एंजोय करु शकले. (नवर्‍याने माझ्या वाढदिवसाला दुर्बिण घेण्याचं पक्कं केलंय :dd:)

तर नाष्त्याच्या वेळेपर्यंत फिरून येऊन टायगर फॉल्सला गेलो. बरंच आत आत जावं लागतं फॉल बघून डोळ्याचं पारणं फिटतं. जे धबधब्यात उतरणार होते ते तयारीतच होते. पटापट आत गेले. पाण्याचा जोर इतका आहे की पाण्याखाली उभं रहाणं अवघडच आहे. नुसतं जवळ उभं राहिलं तरी चिंब भिजायला होत होतं. नवर्‍याला पाण्यात भिजायला फार आवडत नाही. मी पाण्यात जाऊन उभी राहिले. पूर्ण भिजणार नव्हतेच पण खाली खूप उंचसखल होतं. आपण आधीच लंगडे आहोत हे लक्षात ठेऊन फार पुढे गेले नाही. पाणी इतकं थंड होतं की लेक पण १० मिनिटांत कुडकुडत बाहेर! मग आवरून धबधब्याचं फोटोसेशन करून पाण्याजवळ दिसणारे पक्षी बघितले.
TigerWaterfall.jpg

धबधब्याजवळ आणि तिथून परत येताना Plumbeous Water Redstart, Forktail, Common kingfisher, Black Headed Jay हे आणि अजुन बरेच पक्षी दिसले.
एकूणच ट्रिप मधले पक्षांचे जे बरे असे फोटो आहेत ते इथे देते.

Plumbeous Water Redstart
Plumbeous Water Redstart.JPG

Grey-hooded warbler
Grey-hooded Warbler.JPG

Crimson sunbird
Crimson Sunbird.JPG

Green-backed tit
Green Backed Tit.JPG

Black-headed jay
Black Headed Jay.JPG

Slaty-headed parakeet
SlatyHeaded Parakeet.JPG

Goldfinch
Goldfinch.JPG

Blue-capped Rock Thrush
Blue-capped Rock Thrush.JPG

Rusty-cheeked Scimitar Babbler
Rusty-cheeked Scimitar Babbler1.JPG

Pied Bushchat m
Pied Bushchat m.JPG

Spot Winged Grosbeak
Spot Winged Grosbeak.JPG

Stonechat
Stonechat.JPG

Spotted Dove
Spotted Dove.JPG

हा एक प्राण्यांचा...उगाच हवा करायला :ड
We.jpg

आणि ही काही रानफुलं...तरी सगळ्या फुलांचे फोटो काढायला मला जमले नाहीत. :|
Ranfule1.jpg

Ranfule2.jpg

Keywords: 

चक्राता - सांगता

या आधीचा भाग इथे वाचा.

शेवटच्या दिवशी तरी रात्री गप्पा मारत बसु असा प्लॅन होता. अर्थात रोजचा त्या दिवशी दिसलेल्या पक्षांची यादी करण्याचा नियम कधीच चुकला नाही. आदल्या दिवशी गेलेले लाइट दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही फिरून परत आलो तरी आले नव्हते. जनरेटर वर चालू असलेले डायनिंग मधले दिवे सुद्धा बंद झाले. पण किका आणि मंडळींनी टोर्चच्या उजेडात ही यादी पूर्ण केली. हॅट्स ऑफ टू किका! एकही दिवस त्यांच्या चेहेर्‍यावर दमल्याचा, कंटाळल्याचा भाव नव्हता. कोणीही कोणताही अगदी बेसिक प्रश्नही विचारला तरी ते उत्साहात उत्तरे देत होते. आई, बाबा लोक्स सामान कोंबण्यात बिझी होतो. दुसर्‍या दिवशी नाष्ता करून रिसॉर्ट सोडायचं होतं.

निघायच्या दिवशी परत पहाटे एक ट्रेल झालाच. नाष्ता झाल्यावर आमचे कूक, ड्रायव्हर, रिसॉर्ट्चा स्टाफ सगळ्याना बोलावून त्यांचे आभार मानले आणि परत आम्ही सगळे जिथे पहिल्यांदा एकमेकांना भेटलो तिथे म्हणजे हॉटेल आंगन ला जायला निघालो. काही फोटो दाखवल्याशिवाय रहावत नाहिये. तेवढे दाखवते.
ह्या फळांचं तेल काढतात. ते गुढगेदुखीवर औषधी आहे म्हणे. पूर्वी स्थानिक लोक हेच खाद्य तेल म्हणून वापरत. आता बाजारात येणारी वापरतात. हे पिकलं की काळं होतं
LocalFruit.jpg

ही एक बेरी. पक्षांचा आवडता खाऊ, आम्ही पण चाखून बघितला. अजुन एक काळी बेरी पण होती. तिचा फोटो नाही माझ्याकडे
Yellowberry.jpg

हे एक गाव आहे. ही आणि अशीच अगदी छोटी छोटी गावं जाता येता दिसतात.
Village4.JPG

ह्या फोटोंबद्दल काय लिहु? देहेरादून, हिमालय म्हणलं की हेच डोळ्यापुढे येइल.
Sky.jpg
Donger1.jpg
Donger2.jpg
Trees.jpg

आमचा कॅम्प आता पूर्ण झाला होता. :| आंगनला आल्यानंतर प्रत्येक जण जेवून आपापल्या फ्लाइट ट्रेन च्या वेळेप्रमाणे निघाला. आम्ही दून मधेच हॉटेल बूक केलं होतं. अगदी ४ तासांसाठी होतं पण गरजेचं होतं. थोडी विश्रांती घेऊन, फ्रेश होऊन रात्री नंदादेवी मधे बसलो. या वेळी मी पांघरायला दिलेला जाड रग गुंडाळी करून लेकाला सपोर्ट म्हणून लावला आणि निवांत झोपले.
पहाटे दिल्लीत पोहोचलो. दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइट ५:३५ ला होती. दिल्लीत खूप उन असणार म्हणून फारसं फिरणार नव्हतो. कॅनट प्लेस एरियात हॉटेल बूक केलं होतं. तिथे रूम वर आलेल्या इंग्लिश ब्रेकफास्ट वर ताव मारला. मग रिक्षेतून आणि जमेल तितकंच फिरू म्हणून बाहेर पडलो. इंडिया गेट, वॉर मेमोरिअल, राष्ट्रपती भवन, संसद भवन असं थोडं हिंडलो. शंकर बाजार, पाली बाजार मधे एक चक्कर मारली. नाही म्हणता थोडी खरेदी पण केलीच. बंगाली मार्केटला चाट प्रकार, लस्सी वगैरे अटळ होतं. येताना बघितलेली जुनी दिल्ली आणि आता बघितलेली ही पॉश दिल्ली यामुळे लेक चांगलाच गोंधळला. नविन माणूस शहराच्या कुठल्या भागात हिंडेल त्यावरून तो त्या शहराचं चित्र उभं करेल असं मला नेहेमीच वाटतं. पुण्यात पहिल्यांदा आलेला माणूस धायरीत हिंडला तर आणि कोरेगाव पार्क भागात हिंडला तर २ वेगळीच चित्र उभी रहातील.

४ वाजत आले तशी निघायची तयारी केली. आता घरच्या आमटी भाताची आठवण यायला लागली. फ्लाइट मधले २ तास पटकन गेले पण पुण्यात एअर पोर्ट पासून सिंहगड ऱोड पर्यंतचा १ तासाचा प्रवास पण नकोसा झाला. रात्री घरी आलो तर आमची चिंकी (मनीमाऊ) दारात स्वागताला हजर होती. आम्ही आल्याच्या आनंदात पुढचे २ तास तरी ती इकडे तिकडे नाचत आणि उड्या मारत होती.

Keywords: