काझीरंगा - मेघालय दिवस ४ - शिलाँग साईट सीईंग

दिवस ४ -

आजचा दिवस तसा आरामाचा होता. सकाळी उठून आवरलं आणि घरीच सँडविचेस खाऊन पॅक करून घेतले.

पहिले laitlum canyon ह्या ठिकाणी गेलो जे शिलाँगपासून २० किमीवर आहे. पाचगणी सारखं पठार आणि दरी. इतकं धुकं होतं की आम्हाला दरी अज्जिबात दिसली नाही. छान गार वारा आणि आजूबाजूला हिरवळ, धुकं.

छान हवेत चहा हवाच आणि मॅगी, मोमोज -

khadadi1.jpeg

मेघालयाचं वैशिष्ठ्य म्हणजे सगळ्या ठिकाणी स्वच्छ टॉयलेटस. सगळीकडे ५-१० रूपये भरून स्वच्छतागृहं. त्यामुळे कुठेही पंचाईत झाली नाही. विशेष म्हणजे अगदे रिमोट ठिकाणी सुद्धा नळाला वाहतं पाणी. नाहीतर पुण्यातही कितीतरी चांगल्या हॉटेल्स मधे सुद्धा चकचकीत टॉयलेट पण गलिच्छपणा.
आपल्याकडे उगाच कमोड करून ठेवलेले जिथे तिथे आणि स्त्री-पुरुष एकचं स्वच्छतागृह. ह्या प्रवासात बहुतेक ठिकाणी इंडियन टॉयलेट मिळालं. सगळीकडे स्त्रिया-पुरुष वेगळी सोय. एकदा तर आम्ही हायवेवर शाहाळं प्यायला उतरलो होतो. तिथे जवळपास सोय नव्हती तर दुकानदार बाईने स्वत:च्या घरी नेलं आम्हाला टॉयलेटला.

धुकं असल्याने फारसे फोटो नाही काढता आले -

lc.jpeg

इथून निघालो आणि "जिवा साऊथ" नावाच्या हॉटेलमधे लंच केलं. मधे गाडीला दुसरी गाडी धडकून टायरचं काहीतरी काम वगैरे भानगडी झाल्या त्यात थोडा वेळ गेला. हे हॉटेल ऐन बाजारात - पोलिस बाझार - आहे.

लेडी हैदरी पार्क सोमवारी बंद असल्याने तिथे जाऊ शकलो नाही. लंचनंतर Ward's Lake जे पोलिस बाझारपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे तिकडे गेलो. तिकडे पण बोटिंग केलं. शहराच्या मध्यभागी स्वच्छ सुंदर तळं, बाजूला छान हिरवीगार बाग. शिलॉगकरांचा हेवा वाटला.

तळ्याचा पॅनो

तिथून पुन्हा बाजारात गेलो. थोडा टाईमपास करून थोडी खरेदी करून घरी परतलो. दुपारी उशिरा जेवण झालेलं त्यामुळे बरोबर आणलेलं आणि सामोसा, कचोरी असं काय काय खाऊन झोपलो.

itinerary प्रमाणे पुढचे २ दिवस फुल पॅक आणि खूप चालायला लागणारे होते.

दिवस ५

Keywords: