फिक्शन ऑडिओबूक्स (ललित श्राव्यपुस्तके :))

शूम्पी देवतेला प्रणाम करुन हा धागा काढत आहे. praying ऑडिओबूक्सच्या माध्यमातून तिने माझ्या आयुष्यात जो सकारात्मक बदल आणलाय त्याबद्दल मी तिची नेहेमीच ऋणी राहीन. smile

सध्या मी नॉन फिक्शन पुस्तके ऐकत आहे आणि फिक्शनच्या धाग्यावर त्याबद्दल लिहून तिकडे भेसळ नको म्हणून नवीन धागा काढतेय. मी ऐकलेली, आवडलेली पुस्तके खाली लिहित जाईन. तुम्हीही ऐकलेली, आवडलेली (किंवा वाचलेली आणि आवडलेली पण ऑडिओ फॉर्मॅट मध्ये उपलब्ध आहेत की नाही याबद्दल कल्पना नसलेली ही) पुस्तके इथे कळवा. मराठी ऑडिओबूक्सही आता उपलब्ध होत आहेत, त्याबद्दलही माहिती असल्यास लिहा.

फिक्शनचा पसारा खूप मोठा आहे. जास्त पुस्तके जमल्यास आपण लेखक किंवा genre नुसार विभागून हेडरमध्ये टाकू. शेवटी चांगल्या ऑडिओबूक्सची यादी बनवण्याचाच हेतू आहे.

सध्या मी ऐकलेल्या पुस्तकांची यादी (आणि मला कशी वाटली ते) खाली देतेय.

Harper Lee -
To Kill a Mockingbird (अप्रतिम)

Agatha Christie -
The Secret Adversary (ठिक)

Jane Austen -
Pride and Prejudice (छान)
Emma (छान)
Sense and Sensibility (छान)
Mansfield Park (छान)
Persuasion (छान)
Northanger Abbey (ठिक)
Lady Susan (ठिक)
Jane Austen's Letters (ठिक-छान)

Sheridan Le Fanu -
Carmilla (सुरुवात छान, वातावरण निर्मिती उत्तम, शेवट पिचकावणी)

Mary Elizabeth Braddon -
Lady Audley's Secret (ठिक)

Charlotte Brontë -
Jane Eyre (अप्रतिम, सुंदर भाषा, मांडणी, सुस्पष्ट कॅरेक्टर्स)

Emily Brontë -
Wuthering Heights

Anne Bronte
Agnes Grey

Markus Zusak
The Book Thief (नरेटरः Allan Corduner)

George R. R. Martin
A Song of Ice and Fire

/* */ //