रेशीमगुंता - भाग ३

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

रेशीमगुंता - भाग ३

" स्पिकर मोड वर टाक, मलाही ऐकायचाय तुमचा चना चाट" मिथिलाने मला ऑर्डरच सोडली.
" हेय! हाय स्वरा " त्याचा आवाज ऐकताच तिने मला गप्प रहायची खूण करत त्याला स्वत:च उत्तर देत"हाय सुमी. कुठे आहेस ?"  विचारत एकीकडे मला डोळा मारला 

" हु इज थिस ? स्वरा इज इट यु ? तुझ्या आवाजाला काय झाल ?" या त्याच्या उत्तरावर खुसखुसत हसून वर त्यालाच ऐकवल तिने "तू काय फक्त स्वराचा आवाज लक्षात ठेवलायस का? मिथिला नावाचीही एक मैत्रिण होती हे विसरलास ना? देखली तेरी यारी यारा. तुने मेरा दिल तोड दिया क्यु न तुमपे सेक्शन ४१५ लगवाया जाए? " 

ती अजून फिल्मी डायलॉग मारायच्या आधी मी फोनचा ताबा घेतला आणि त्याला विनीकडे यायच आमंत्रण देऊन टाकल.

तो तेव्हा कोरमला होता हे एक बर झाल. ऑन द वे त्याला पिकअप केल आणि आम्ही एकत्रच विनीकडे निघालो 

’आज कोरमला का म्हणे चक्कर? आणि तुझा नविन नंबर आम्हाला का नाही दिलास? सिसीडीमधे कोणी फ़ॉर्मल्स घालून येतं का?’ तो येऊन बसल्यापासून मिथीलाने त्याचा इंटरव्ह्यु घ्यायलाच सुरवात केली.

’कोरममधे कांदापोहे कार्यक्रम् करायला गेलो होतो’असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा तिचा इंटरव्ह्यु मधला सगळा रसच संपला. आता मात्र मलाच त्यात रस वाटायला लागला, शेवटी स्वयंवर आमच्यातला कॉमन दुवा होता.

"ही तिच डेट का रे?  चार् दिवसांपुर्वी याच् प्रोफ़ाईल बद्दल बोलत होतास का?" माझ्या प्रश्नावर त्याने "हो. तिच ही" म्हणत एका वक्यात उत्तर दिलं

"मग? पुढे काय?" माझ्या प्रश्नावर त्याच उत्तर यायच्या आधीच मिथिला म्हणाली,  “पुढे रेड सिग्नल आणि गाडी थांबली.’  पन अनइन्टेन्डेड म्हणे यात.

’वाईट होता जोक. पण येस रेड सिग्नल, रेड फ़्लॅग जे काही असेल तुझ्या भाषेत ते खरय इथे.’ सुमेधच्या या उत्तराने तिला पुन्हा आमची जोडी जुळवण्याच्या खेळात रस निर्माण झाला.

“म्हणजे तू तिला रिजेक्ट केलस?”

“नाही. तिने मला केलं”

“असा फ़ॉर्मल कपड्यात गेलास तर असच होणार ना तुझं. जॉब इन्टरव्ह्युला जायच्या अवतारात तू मुलगी पटवायला गेलास?”

“मग काय शॉर्ट्स घालून जायला हवं होतं का?”

त्या दोघांच्या जुगलबंदीला थांबवायला मी बॅगेतून एक डबा काढला आणि मिथिलाच्या हातात कोंबला.

तिने डबा हलवून बघत “काय आहे काय यात?”विचारलं पण मी तुच बघ उघडून म्हणत तिलाच कामाला लावलं.

’वॉव ! तुझ्या हातची चॉकलेट्स. लव यु गर्ल’ म्हणत तिने मला मिठीच मारली.

“घे रे तू ही. हिचे केक्स आणि चॉकलेट्स एक नंबर असतात. कॉलेजमधली उनाड मुलगी नाही राहिली ही आता. घे तू बिंधास्त” सुमेधच्या हातात डबा देत तिने आपला अजेन्डा चालूच ठेवला.

“उम्म! सुपर्ब. मला अजून एक हवय. तुझा हा गुण माहिती नव्हता मला” त्याने  असं म्हंटल्यावर मिथिलाला चेवच आला.

“अरे! हिला सांगते कांदेपोहे कार्यक्रमात तू चॉकलेटच दे खायला. हि अशी चॉकलेट खाणारा काय बिशाद नकार देईल हिला. खरय की नाही तुच सांग सुम्या”

“सिरियसली यार. हे तर ब्लिस चॉकलेट लाउंजच्या तोंडात मारेल इतकं जबरा झालय”

मी विषय बदलतेय तर हि बया परत गाडी त्याच ट्रॅकवर नेतेय. कपाळाला हात मारला मी शेवटी.नशीब विनीचं घर आलं आणि मी सुटले.

विनीकरता सुमेध सरप्राईझ पॅकेज होतं. त्याला बघून ती किंचाळलीच आनंदाने. आपल्या आईचा हा अनोळखी अवतार बघून पप्पू गोंधळून बघतच राहिला. एपिक होते त्याचे एक्सप्रेशन्स. इतके की ते बघून मी आणि सुमेध दोघेही हसतच सुटलो. विनी आणि मिथिलाला काही कळलच नाही आधी. तसही कॉलेजमधेही त्यांना लेटच कळायच्या गोष्टी.

“अरे यार! पप्पुसाठी काही घेऊनच नाही आलो मी.”सुमेध कानात खुसपुसत म्हणाला तसं मी पटकन किताबखानाची बॅग त्याच्या हातात सरकवली आणि नजरेनेच ती पप्पुला त्याच्याकडूनच गिफ़्ट म्हणून द्यायला सांगितली. मी आणलेला खाऊ आणि सुमेधकडून मिळालेली पुस्तकं बघून पप्पू एकदम खुष झाला आणि सगळं घेऊन पळत बेडरुम मधे गेला.

“थॅन्क्स.” सुमेध पुटपुटला आणि हे नेमकं मिथिलाने बघितलं. तिने मुद्दाम घसा खाकरुन, भुवई उडवून त्याला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला पण मी तिच्याकडे पुर्ण दुर्लक्षच केलं.

रणजीत येईपर्यंतच्या आमच्या गप्पा म्हणजे अमका काय करतो आता? तमकी कुठे असते पासून ते आम्हीही आता काय करतोय वगैरेचा तपशिल भरुन काढणे टाईप्स होत्या.

रणजीत येईपर्यंत पप्पू काही झोपला नव्हता. त्याचा बाबा दिसला आणि मग त्याने थोपटल्यावर पप्पुबाळ पाच मिनिटात झोपी गेला. आम्ही अधून मधून त्याला झोपवायच्या केलेल्या प्रयत्नाला त्याने अजिबातच दाद दिली नव्हती.

“रनजीत का तो ये रोजका काम है. और सन्डे को उसे हरकाम के लिये पप्पाही लगता है उसका. पॉट्टीभी करेगा तो पानी डालनेके लिए पप्पा चाहिये उसे” विनी कडून हे ऐकताना मगाशी मिथिला सांगत होती ते पटलच एकदम. रणजीत खरच बदललाय.

’ओल्ड मॉन्क फ़ॉर गुड ओल्ड फ़्रेन्ड्स’ पप्पुला झोपवून बाहेर आलेल्या रणजीतने येतानाच रमची बाटली उंचावत म्हंटलं.  “पहिला ग्लास मिथिलासाठी  ’विश यु अ हॅपी मॅरिड लाईफ़’ आणि दुसरा विनी माय लाईफ़ माय वाईफ़ माय वायफ़ाय तुझ्यासाठी”

“असले फ़िल्मी डायलॉग मारण्यात तुझा कोणी हात धरु शकत नाही.हे असले डायलॉग मारुनच तू विनीला पटवलयस” मी माझा ग्लास घेत म्हंटलं तसं सुमेधने मला टोकत म्हंटलं “हि मिथिला पण काही कमी नाही. टफ़ देईल याला. तुझ्या फ़ोनवरुन माझ्याशी बोलताना कसली नौटंकी करत होती हि आज.”
"नुसती नौटंकी नाही दफा ४१५ अंतर्गत केसही करणार होत्या या वकिलीण बाई" मी आठवण करुन दिली. त्यावर सुमेधने स्वत:च्या हाताने फाशी दिल्याचा अभिनय करत " फासावरच लटकवायला तयार झालेली आज ही" म्हणत तिला चिडवून घेतल .
" ४१५ खाली गुन्हा साबित व्हायला इंटेंशनली फसवणूक केलेय हे पुराव्याने साबित व्हाव लागतं.You are safe don't worry" मी त्याची बाजू घेत म्हंटल.

“हाय ये जमानाही खुदगर्जोका है मेरे यार. सुम्याको यहा बुलानेका आयडिया किसका था? मेरा. वो यहा पे छुट्टीपे आया है ये किसने पहले बताया? मैने. और करंट नंबर किसके पास था? स्वराके? ये न्याय नही अन्याय है” मिथिला द नौटंकी क्वीन परत सुरू झाली.

आता या नौटंकीने विनीलाही यात रस निर्माण झाला आणि ती पण “मुझे शुरु से बता ये क्या बात है”म्हणत पुढे येऊन बसली.

मी आणि सुमेधने एकमेकांकडे बघत “होपलेस केस आहे” म्हणत हसून घेतलं. मिथिला एकता कपुरला टफ़ देऊ शकेल याबाबतीत. तिने असा काही अभिनय करत सगळा किस्सा ऐकवला कि तो ऐकून विनी रणजीतच काय पण आम्हालाही वाटायला लागलं की नक्कीच आमच्यात काहीतरी शिजतय.
 

“अब मिथिलाके बाद तेरा नंबर हा स्वरा”

“विनी, जरुरी है क्या हरकोई शादी करे?

“थिस इज द ओन्ली लिगल वे टू सॅटिस्फ़ाय युअर लिबिडो. ऍटलिस्ट इन अवर कंट्री” विनी माझ्या कानात खुसपूसत म्हणाली आणि स्वत:च्याच जोकवर स्वत:च टाळी देत हसत बसली.

तिला नक्कीच चढली असावी म्हणून मी दुर्लक्ष करुन सोडून दिलं नाहीतर ऐकवलं असतं की आपल्या देशात सेक्श्युऍलिटी इतकी सप्रेस करुन ठेवतात की काही बोलायलाच नको. लग्नाआधी म्हणजे बाब्बो,लग्नानंतरही मूल होण्यासाठी सेक्स, मग मुलं मोठी झाली की पुन्हा जपमाळ हातात घेऊन निवृत्त व्हायचं. Its a thing of pleasure & wellbeing हेच मान्य नाही लोकांना. “are you virgin?” या प्रश्नावर 'पहिल्या फ़ोन कॉलमधे याच उत्तर दयायची आवश्यकता वाटत नाही' असं उत्तर दिल्याने मला कितीतरी नकार मिळाले आहेत.

मी दुर्लक्ष केल्यामुळे तिने तिचा मोर्चा मिथिलाकडे वळवला. तिच्या लग्नाचं शॉपिंग, हनिमुनचं शॉपिंग झालं का? नॉयडाला इथलं फ़र्निचर नेणार की सेल करुन जाणार? सगळे तपशील विचारुन तिला भंडावून सोडलं. नॉयडाच्या उल्लेखाने मात्रं माझ्या पोटात खड्डा पडला. ग्रॅज्युएशन नंतर बाकीच्यांचे मार्ग वेगळे झाले तरी आम्ही दोघी लॉ शिकतानाही एकत्र होतो. इतरांपेक्षा जास्तं काळ आम्ही एकत्रं होतो. मी तिला सगळ्यात जास्तं मिस करणार हे नक्कीच होतं.

“मिथिला, तुझ्या लग्नानंतर असे आपण कधी भेटणार यार? तू जाशील राहूलशी लग्न करुन नॉयडाला. तुला इथला मुलगा नाही मिळाला का कोणी, इतक्या लांबच्या मुलाला ’हो’ म्हणालीस ते?”

“इथल्याला ’हो’ म्हणून बघितलं होतं की एकदा. काय झालं  त्यावेळी मनस्तापाशिवाय दुसरं?”

माझ्या प्रश्नाला तिने दिलेल्या या उत्तराने वातावरण एकदम इमोशनल झालं. त्या दोघांनी म्युच्युअलपरस्पर संमतीने घटस्फ़ोट घेतला होता. पण तरी परत लग्नं जमताना तिला खूपच अडथळे आले. राहूलच स्थळ तिला कॉमन ओळखीतून सुचवलं गेलं. त्याच्या आईच्या मेन्टल हेल्थ इश्यु मुळे त्याच लग्नं रखडलं होतं. त्यातून स्वजातीयच हवी हि अट प्रमुख असल्याने अजूनच वेळ जात होता. मग वय वाढलं तसं विनापत्य विधवा, घटस्फ़ोटिताही चालेल, स्वजातीय नसली तरी चालेल किमान महाराष्ट्रीयन हवी इतपत लवचिकता आली होती त्याच्या अपेक्षांच्या यादीत. सहा महिने इमेल, फ़ोन कॉल्स, भेटी घेऊन, बोलून मग मिथिलाने लग्नाला हो म्हंटलं होतं यावेळी. 

आई मला तिचच उदाहरण देत ऐकवते दरवेळी की वय वाढलं की राहुल सारखी तडजोड करावी लागते. सगळेच काही मिथिलासारखे नशिबवान नसतात घटस्फ़ोटितेचा शिक्का बसून पण प्रथम वर मिळायला. आणि मग या लेक्चरचा शेवट नेहमी ’होकार येईल तिथे आपणच जुळवून घ्याव’ यावर होतो. पण पहिल्या लग्नात तिने लगेच होकार देऊन पण तिथे का बिनसलं? यावर सोयिस्कर मौन पाळते आई. माझ्या मनात हे विचार चालू असतानाच सुमेधने सगळ्यांच लक्ष वेधून घेत म्हंटल, “मिथीला नॉयडाला गेली काय किंवा नायझेरियाला गेली काय, आता विडिओ कॉलिंग, मेसेन्जर, वहॉट्स ऍप सगळ्याने राहीलच की कनेक्टेड.”

“या सगळ्यापेक्षा मी तिच्या पत्रांची वाट बघेन. माझ्याकडे तुमची सगळ्यांची पुर्वीची पत्रं अजून आहेत. हावरटासारखी मी वाचते अधूनमधून. परत सुरू करायला हवी आपण पत्रं.” मी मधेच त्याला तोडत म्हंटलं तसं माझ्या वाक्याची रीऽऽ ओढत विनी म्हणाली “येस सिरियसली आय मीस दोज डेज बॅडली”

आणि मग सुमेध आणि मिथीला दोघेही एकदम म्हणाले  “आय टू” परत जरा वातावरण हळवं झालं तसं सुमेधने सुत्रं त्याच्या हातात घेत म्हंटलं, “आज नो रडारडी गाईज. आपण मिथिलाचा आनंद वाटून घ्यायला भेटलोय. तर आज फ़क्तं आणि फ़क्तं हसायचं आणि तिला हसवायचं. चिअर्स टू हर न्यु लाईफ़.” यावर “जी साऽब” म्हणत सगळे परत मस्तीच्या मुड मधे आले आणि हळूहळू वातावरण परत आनंदी झालं. त्याच्या चिअर्स टू हर न्यु लाईफ़ वरुन प्रेरणा घेत मिथीलाने ग्लास उंचावत घोषणा केली, 'येस आय एम पॉझिटिव्ह अबाऊट माय न्यु लाईफ़. आय फ़रगीव यु माय एक्स हजबंड '
 
तिच्या “फ़रगीव यु” वाल्या वाक्याने आम्ही चमकून तिच्याकडे बघीतलं.

“येस माय फ़्रेन्ड्स आय फ़रगीव अजय.” तिने आमच्याकडे बघत परत एकदा त्या वाक्याचा उच्चार केला.

आमचे प्रश्नार्थक चेहरे बघून तिनेच पुढे बोलायला सुरवात केली, ’या काही वर्षात म्हणजे प्रॅक्टिस सुरू केल्यापासून इतक्या वेगवेगळ्या केसेस बघितल्या आहेत ना मी. कधी मुलीच्या चुकीमुळे मुलाची ससेहोलपट तर कधी मुलामुळे मुलीची. दोन्ही बाजूच्या केसेस बघीतल्या आहेत. परिस्थितीमुळे दबून चूक करायला भाग पडलेले अजय सारखेही बघीतले यादरम्यान. आपली सोशल सिस्टीम अशा चुका करायला भाग पाडते कधीकधी, असं वाटायला लागलय मला आता. त्यात परत पालकांच्या अपेक्षा,चौकटी अशा अगणित फ़ॅक्टर्स मधे भरडलेले ती आणि तो. हे सगळं बघितल्यावर मला अजयचा राग राग येणं कमी झालं. तो स्वत:च विक्टीम आहे ग सिस्टीमचा. म्हणून त्याला माफ़ करुन टाकलं मी. मग राहूलच स्थळ आलं ओळखीतून. भरपूर गप्पा मारुन,मैत्रीचं नातं जोडून मग विचारपुर्वक निर्णय घेतला मी परत लग्नं करायचा. सोपं नसणार आहे हे निभावणं आमच्या दोघांसाठीही. त्यात त्याचं प्रथमवर असणं माझं घटस्फ़ोटीता असणं यावर बरीच खुसपूस आधीच झालेय नातेवाईक मंडळींमधे. पण मलाही आनंदी रहायचा पुर्ण अधिकार आहे आणि आयुष्याला मी अजून एक संधी नक्कीच द्यायला हवी असं आम्हा दोघांनाही वाटतय. सो दॅट्स इट. चिअर्स टू माय न्यु लाईफ़”

यावेळी आम्ही सगळ्यांनीच जाऊन तिला मिठी मारली. 

हे असं आम्ही कॉलेजमधे असताना करायचो. एक कॉमन झप्पी हे सांगणारी की we love u, care for u & god bless you ही आमची कॉलेजपासूनची स्टाईल. या झप्पीने आम्हाला परत नॉस्टाल्जीक केलं.

कॉलेजच्या दिवसांची आठवण निघाल्यावर एक एक आठवणी निघत गेल्या आणि जेव्हा विषय सेन्ड ऑफ़ वर आला, तेव्हा सुमेध म्हणाला, “आता मी काही ऐकवतो तुम्हाला”
’म्हंटलं ऐकवा’

“तुमको देखा तो ये खयाल आया”

“आय हाय ! आय हाय! “ नौटंकी क्वीन मिथिला मॅडमने दाद दिली.

“नीट ऐका हा,

तुमको देखा तो ये खयाल आया,

तुमसे भी गोरा है

तुम्हारा साया”

शेर पुर्ण करुन त्याने माझ्याकडे मिश्कील नजरेने पाहिलं. कोणाकोणाला आठवतोय हा फ़िशपॉन्ड?त्याने विचारलं आणि मला खूपच लाजल्यासारखं झालं. मीच लिहीला होता तो त्याच्यासाठी आणि सोबत फ़ेअर ऍन्ड लवलीची ट्युब दिली होती. बिचाऱ्याला फ़ार छळलं आम्ही रंगावरुन. त्याने खिलाडूपणे घेतलं सगळं तेव्हा. पण आता मलाच फ़ार ऍम्बॅरेसिंग वाटलं.

“अरे! हा तर आपल्या स्वराने लिहीला होता याच्यासाठी” रणजीतने माझ्याकडे हात करत उल्लेख केला.

मला फारच ओशाळल्यासारखं झालं.

“ओय्य! डोन्ट फ़ील बॅड. आय एन्जॉईड इट. आणि तुम्ही तर माझे जिगरी आहात यार. तुमच्यावर का चिडेन मी? आणि स्पेशली तुझ्यावर स्वरा मी चिडेनच कसा? शिवानीशी ब्रेक अप झाल्या नंतरच्या रोज डे च्या दिवशी मला चिअर अप करायला तुम्ही सगळ्यांनी मला निनावी कार्ड्स पाठवली होतीत.सगळ्यात जास्तं गुलाब त्यादिवशी मला मिळाले होते.आणि हे सगळं तुम्ही केलं होत. पण यामागचा क्रिएटिव्ह ब्रेन स्वरा तुझा होता हे चांगलं ठावूक आहे मला.” माझा कानकोंडं झालेला चेहरा पाहून त्याने ऐकवलं.

"और दादाजीके जाने के बाद मेरे उदास चेहरे पे मुस्क्सान लाने के लिये तुम सबने जो किया वो भी तुम्हारीही शक्कल थी स्वरा."

"ती आहेच केअरिंग आणि सेन्सिटिव्ह म्हणून तर नाहीच रागवू शकत तिच्यावर" मिथिलाने सुमेधच वाक्य संपताच मला कोपराने ढोसलं. मला तिच्या गाडी सतत ट्रॅकवर ठेवायच्या वृत्तीचं ह्सूच आलं.

पण दुपारी ताईशी झालेल्या आरग्युमेन्ट्स नंतर तिच्यापुढे माझं डावेपण उठून दिसण्याच्या पार्श्वभुमीवर आणि रिजेक्टेड ट्वेन्टी टाईम्स या शिक्क्याच्या पार्श्वभुमीवरही हे आत्ताचं कौतुक मला हवहवसं वाटत होतं. ’आय एम नॉट लुजर” वाटायला लागणारं हे कौतुक म्हणूनच सुखावून जात होतं.

सकाळी तिथून निघालो तेव्हा परत येताना मिथिला वाटेतच उतरुन गेली, शॉपिंगला जायचय सांगून. पुढच्या प्रवासात मग मी आणि सुमेध दोघेच होतो.

 

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com