हॅविंग युनिक नेम

FB_IMG_1462294162906.jpg

FB_IMG_1462294162906.jpg

फेसबुकवर ही इमेज पाहिली आणि मनातलं काही खरडावस वाटून गेलं . तर हे काही पांढऱ्यावर काळं केलेलं!

=========================================
No One Can it beat my Name and its "Stories" .

कधी कधी मला नावात काय आहे अस म्हणणारा शेक्सपियर भेटतोय आणि त्याला माझ्या नावाच्या स्टोरीज ऐकवतेय अस होतं . ह्या स्टोरीजची सुरुवात होते नॉन मराठी लोकांना माझं नाव , त्याचा अर्थ आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्याचा उच्चार समजवण्यात !!
ह्या मेरी गो राउंड मध्ये जई , जाय , जाई, जेई , ( इथे जा वर स्पेशल ठसा ) झाई ( हा उच्चार साक्षात मिलिंद सोमणकडून ऐकायला मिळालेला . मुळात जाई हे नाव असत हेच त्याला माहीत नव्हतं . ) असे वेगवेगळे व्हर्जन्स ऐकायला मिळतात . पहिल्या पहिल्यांदा हे भगवान असच वाटून जायचं. आता उलट गंमत वाटायला लागते . आता कोण नॉन मराठी व्यक्ती माझ नाव पहिल्या फटक्यात व्यवस्थित घेईल यांच्या प्रतिक्षेत आहे. नावाचा अर्थ सांगितल्यावर ओह ! व्हॉट ब्युटिफुल नेम अस आपसूक मागून शेपूट येतं. तेव्हा मग आपल्या नावाची झालेली मोडतोड विसरून yup ! My Name is unique अस फिलिंग येतं.

मग या स्टोरीजचे किस्से होतात. टीवायचा रिझल्ट लागल्यावर युनिव्हर्सिटीत गेलेल्या मला फक्त या युनिक नावाद्वारे लगेच रिझल्ट मिळतो. कारण जाई नावाची दुसरी मुलगी त्या रिझल्टच्या लॉट मध्ये नसते.
जाईताई तुझं नाव मला आवडत कारण त्यात एक रिदम आहे, तू आणि तुझं नाव मला आवडत कारण ह्या दोन्ही गोष्टी खूप गोड आहेत ह्या काँप्लिमेंट्स मिळतात . तर कधी मित्र मैत्रिणीकडून जाईजुई मोगरा शेवन्ती अशी रेल्वेगाडीही भेट मिळते. मध्येच मोडककाकांना भरपूर त्रास दिल्यावर गप्प बस जायडे !! काम आहे मला अशी दटावणीही मिळालेली आठवते . तर कधी मुंबई ते दिल्ली प्रवास करताना विमान कंपनीने नावाची भयानक अनाउन्समेंट केल्याने माझं विमान चुकलेलंही आठवतं. नावावरून मी नक्की कोणत्या जाती धर्माची आहे याचा उलगडा न झाल्याने Are you Christen , Muslim , South Indian असेही प्रश्न फेस करावे लागतात. अश्या वेळी बिइंग इंडियन बनून गालातल्या गालात हसून उत्तर द्यायचं फक्त उरतं ..

पण माझं नाव मला आवडत. सगळ्या आंबट गोड किस्से आणि आठवणी पुरुनही मला ते आवडत कारण ते माझ्या बाबांनी मला दिलेली ती भेट आहे. बाबा जगातून गेल्यानंतरच्या त्यांच्या वारश्यात माझ्याकडच्या यादीत आता त्यांची पुस्तक , अक्षर , वाचनाची आवड आणि माझं नावही समाविष्ट झालेय !!!!

/* */ //