कलर्ड पेन्सिल ड्रॉइंग वर्कशॉप!

हाय मैत्रिणींनो,

मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.

वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.
साहित्यः हे तुमचे तुम्ही घरुनच आणायचे आहे. हे बिगिनर्स वर्क शॉप असल्याने कुठलेही आर्टिस्ट ग्रेड्चे साहित्य आणू नका असं मी आवर्जून सांगते. खालील साहित्य हे कुठल्याही शालेय वस्तू/जनरल स्टोअर मध्ये मिळू शकते.
A4 size sketchbook (any brand)
HB pencils & white non-dust eraser (any brand)
Sharpener (Faber Castell)
Colored pencil set of at least 24 shades (12 bi-color pencils or preferably 18 bi-color pencils) - Faber Castell
Scale/Ruler 12”

वर्कशॉपची पहिली बॅच फुल झाली आहे. (ड्रॉइंग्/स्केचिंग वर्कशॉप असल्याने मी क्लास साइज लिमिटेड ठेवत आहे.)
पण लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे मी फेब्रुवारीमध्येही हे वर्कशॉप घेणार आहे.
तुम्हा कुणालाही इंटरेस्ट असल्यास अगदी नक्की सांगा. तुमची मुलं/नातेवाइक्/फ्रेंड सर्कलमध्ये कुणालाही इटरेस्ट असल्यास मोस्ट वेलकम! वेळेअभावी इच्छा असूनही मला मैत्रिणवर रोज येता येत नाही. त्यामुळे इथे मेसेज करण्याऐऐवजी मला फोनवर SMS मेसेज्/व्हॉट्स अ‍ॅप्/फेसबुकवरुन मेसेज केलात तरी चालेल.
माझा फोन नं आहे: 9619581592
माझे फेबु पेज आहे: https://www.facebook.com/drawwithcoloredpencils/

Adv workshop.jpg

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle