बुकमार्क्स - हस्तकला

आत्ता मैत्रीणीवर आले तेव्हा श्यामलीचा बुकमार्क हा धागा दिसला...
मी म्हटलं अरे चला आणखी कुणी बनवले ते बघुया..पण ती हस्तकला नव्हती हे नंतर कळलं :ड सुंदर लिहिलयसं श्यामली..

तर माझ्या रिकाम्यापणाचे, कंटाळा आले कि करायच्या उद्योगातला हा प्रकार इथे देतेय.. इथ बरीच वाचक मंडळी दिसतेय त्यांना कदाचित भावेल..

तर I am a book dragon (not a book worm..but a dragon). या छंदासोबत स्वतःच्या पुस्तकाविषयीचा पझेसिव्हनेस माझ्याबरोबर इतरांना सुद्धा खाऊन टाकतो.
पुस्तक उघडे करुन उलटे ठेवणे, जेवताना डाग लागेल असे वाचणे, त्याच्या पानाचा कोनटा/कोनाडा/कॉर्नर मुडपणे काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी इथवर माझे विचार जातात.. म्हणुन सहसा कुणाला माझे पुस्तक न देणारी मी, फक्त पुस्तकप्रेमींना पुस्तके देतानासुद्धा ढिगभर सुचना देवून त्यात बुकमार्क घालुन देते..

यावेळी एका गटगमधे भेट म्हणुन मग अशीच काही बुकमार्क्स बनविलीत आणि दिली त्याचे काही प्रचि.
हाती फार कमी वेळ असल्यामुळे प्रचि काही इतके खास आले नाही तरी जमवून घ्या.

यात काही ओरीगामीचा वापर करुन बनवलेले कॉर्नर बुकमार्क्स होते जे बच्चेकंपनीला खुप आवडले तर आपले साधे मोठ्यांना दिले. परत वेळ कमी असल्यामुळे त्याला पंच करुन त्यात एखादा चंदेरी सोनेरी धागा घालायच राहुनच गेलं. बेटर लक नेक्स्ट टाईम..

सद्ध्यापुरते हे काही प्रचि शेअर करतेय.

बॉक्स पेपरवर केलेले हे काही..

Photo:

Photo:

हे काही कॉर्नर बुकमार्क्स :

Photo:

Photo:

Photo:

Photo:

Photo:

हा एक वेगळ्या पद्धतीचा डूडल करुन तयार केलेला..

Photo:

Photo:

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle