वीकांत स्पेशल ट्रेक - प्रकाशचित्र रूपी झलक!

मागे माझ्या मैत्रिण ओळख मध्ये मैत्रिणींनी मला माझ्या ट्रेक्स बद्दल लिहायला सांगितलेलं. हल्ली तेवढे ट्रेक्स करणं होत नाही. त्यातून गेले दोन वर्ष शाळा चालू होती. पण आज बर्‍याचे दिवसांनी एका सोलो हाईकला जाऊन आले. त्याची चित्ररूपी झलक दाखवते इथे. आमच्या वायव्य अमेरिकेत ज्याला pacific northwest region म्हणतात, तिथला कुठलाही ट्रेक घेतला तरी हेच फोटो खपतील. सर्व ट्रेक्स सुंदर आणि असेच दिसतात :) त्यामुळे एक के फोटो देखो - सौ ट्रेक्स का आनंद ले लो! :ड

आज केलेला ट्रेक : बेकलर पीक. साधारण दोन तासांवर असलेल्या स्कायकोमिश गावातून याची ट्रेलहेड निघते.

अंतर साधारण ७ मैल (११ किमी.) जाऊन-येऊन(round trip). Elevation gain : २३०० फूट (७०० मी.). पर्वतमाथ्याची ऊंची : ५००० फीट (१५०० मी.)
चढायला लागलेला वेळ : २.३० तास, उतरायला लागलेला वेळ: १. ४५ तास.

फोटोरूपी झलक टाकते:

ट्रेलची सुरुवात:

1

मध्ये मध्ये पाण्याचे असे ओहोळ- ओढे लागत होते.
2

अजून जंगलातल्या पायवाटा तितक्या रानफुलांनी भरलेल्या नाहीयेत. ऑगस्ट मध्ये पार बहरून जातात डोंगर. पण आत्ता सुरुवात होत्ये.

3

4

12

13

मध्ये जरा जंगल विरळ होऊन बाजूचे डोंगर दिसले...वरतून काय नजारा दिसणार आहे, याची झलक मिळाली.

5

साधारण २ मैल वरती गेले तर काही भाग अजूनही बर्फाखाली. त्यातून सुमारे १०-१५ मिनीटे वाट चालावी लागली. 'काळा' बर्फ झालाय. :)

6

एव्हाना पाय जड झालेले. सवय नाही ना बरेच दिवसात ट्रेकची! पण या शेवटच्या पायर्‍या दिसल्या, आणि हुरुप आला:

7

वरती पोहोचले तर या ३६० डिगरीज व्ह्यू नी सगळा शीणवटा पळवून लावला:

8

9

हा एक माझा ट्रेक सखा(?) आहे... ग्रे जे! मागे एकदा एका ट्रेक ला वर समिटवर मी सँडविच खात इथे-तिथे बघत असताना या चोराने माझ्या हातातलं उरलेलं अर्धं सँडविचच पळवून लावलं होतं.

10

11

मनसोक्त वेळ घालवून परतीला लागले.

परत उतरताना नेहेमीप्रमाणे गुडघ्यांची बोंब होतीच. यावेळी तर बर्‍याच दिवसांनी जरा बर्‍यापैकी हाईक करत असल्याने जास्तच!!

परतीचा रस्ता पण तितकाच सुंदर आहे. (सकाळी पण हाच रस्ता होता, पण तेव्हा पोहोचण्याची घाई होती, त्यामुळे थांवून फोटो काढायला वेळ नव्हता.)

14

15

16

झुक झुक गाडी जाते पहा. ही इथून वरती कॅनडात जाते. फार सिनीक राऊट आहे या गाडीचा!

17

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle