सॅन फ्रन्सिस्को च्या वाटेवर " हर्स्ट केसल " ...भाग - ५

Hearts Castle--Off Bldg..jpg
समुद्र काठावरील रमणीय दृश्य पहात आमचा पुढचा मुक्काम हर्स्ट कॅसल चा बोर्ड उजवीकडे दिसला. एक मैलभर अंतरावर हर्स्ट कॅसल चे कार्यालयीन ऑफिस असलेली,सपाट जमिनीवर भक्कम बांधणीची,दिमाखदार इमारत दिसली.
रिसेप्शन हॉल --
 हॉल -हर्स्ट कॅसल.jpg
पैशाची मुबलकता त्याच्या जोडीला काहीतरी वेगळं, असामान्य करण्याची ' सनक ' ह्यातून निर्माण झालेली अजरामर कलाकृती म्हणजे " हर्स्ट कॅसल "म्हणजेच हर्स्ट चा महाल.
ह्या हर्स्ट कॅसल ला भेट देण्यासाठी आम्ही सकाळी ९:३० वाजता कॅसल च्या आवारात पोहोचलो.आठवड्यातला मधला दिवस असूनही गर्दी होतीच .पार्किंग ला बर्याच गाड्या उभ्या होत्या.
ह्या "हर्स्ट कॅसल" विषयी थोडीशी जुजबी माहिती देते.जेणेकरून त्याच्या विस्ताराची कल्पना येईल.

जॉर्ज हर्स्ट, मिसुरी तल्या एका लहान फॉर्म हाउस मध्ये वाढलेला. नशिबाने साथ दिली आणि त्याला वर जाण्याची शिडी गवसली .कालांतराने हा जॉर्ज सेन फ्रान्सिस्कोत रहाणारा,अमेरिकन श्रीमंत व्यावसायिक ,खाणींचा मालक आणि राजकीय वर्तुळातला प्रतिष्ठित व्यक्ती ह्या बिरुदाने नावाजला गेला.जॉर्ज ने सेंन फ्रांसिस्को आणि लास एंजलीस च्या मध्ये आणि पेसिफिक समुद्राकाठी असलेल्या ‘ सेन सिमॉन’ गावाजवळ एक डोंगर आणि ४०,००० हेक्टर ओसाड जमीन ‘हर्स्ट कॅसल ‘बांधण्यासाठी विकत घेतली.अर्थात डोंगरावर डोळ्याचे पारणे फिटेल असा भव्य " हर्स्ट कॅसल" बांधला आहे तर सपाट जमीनीवर आलिशान प्रवेश द्वार आणि ऑफिस आहे.मुख्यत्वे फेमिली गेट-टूगेदर आणि करमणुकी साठी हर्स्ट केसल बांधण्यात आला.जॉर्ज च्या निधनानंतर पुढे त्याचा मुलगा विलियम रुडाल्फ हर्स्ट जो तेव्हा वर्तमानपत्रे आणि मासिके,यलो पेजेस,रेडियो स्टेशन्स इत्यादीचा मिडीया सम्राट होता.त्याला वारसाहक्काने ११ बिलियन ची संपत्ती आणि सेन सायमन सह बऱ्याच इस्टेट मिळाल्या.
विलियम ने ज्युलिया मोर्गन ह्या प्रथम स्त्री-आर्किटेक्ट ची नेमणूक हर्स्ट केसल ला असामान्य रूप देण्यासाठी केली.त्यासाठीचे ले-आऊट आणि खरेदीचे स्वातंत्र्य ही तिला दिले. ज्युलिया अमेरिकन आर्किटेक्ट इन्स्टिट्यूट ची प्रथम महिला गोल्ड मेडलीस्ट होती. ज्युलीयाने सेन सिमॉन च्या हर्स्ट केसल ला असामान्य ,अप्रतिम बेजोड दर्जा चे कलाशिल्प निर्माण केले. इटली फ्रांस स्पेन इत्यादी जागेहून बेसकिमती दगड ,लाकूड ,कारागीर , मूर्ती,टाईल्स,फर्निचर,क्रॉकरी,पेंटींग्ज ,गालिचे आणले.डोंगर आणि माळरान पडीक होते.समोर काही मैलांवर समुद्र होता पण जीवनासाठी आवश्यक पाणी नव्हते. तिथे गोड पाणी आणले.सुपीक माती ,सिझन मध्ये धान्य,भाज्या-फुला-फळांची लागवड, पक्षी,वाघ,सिंह,अस्वल हरीण इ. वन्य प्राणीही हेलीकोपटर मधून आणले. उमदा घोडे,गायी,कोंबड्या पाळल्या .दूध ,दुधाचे पदार्थ,अंडी तिथेच मिळू लागले.सुपीक जमिनीमुळे धान्य पिकवता आले.गायी-शेळ्यां साठी कुरणे विकसित केली.त्यासाठी योग्य व्यक्तींची निवासा सहित सोय केली.हायवे १ ला जोडणारा रस्ता तयार केला. तसेच विमान उतरविण्यासाठी धावपट्टी बनविली. ह्याशिवाय त्या दरम्यान विलियम ने सभोवताल चे आणखी डोंगर व मैदाने जमीन विकत घेतली.इथे काहीही उगवत नव्हते ,लोकवस्ती नव्हती पण समोर अथांग समुद्र होता.त्यामुळे ही सगळी जमीन अतिशय कमी भावात विकत मिळाली .असे गाईड ने सांगितले.ह्या संक्षिप्त माहितीनंतर आता मुख्य केसल चे वर्णन तर अप्रतिम आहे.
समुद्र सपाटीला हर्स्ट केसल चे मुख्य ऑफिस आहे. तिथे येणार्या-जाणार्यांची नोंद ठेवली जाते.ह्या विस्तीर्ण इमारतीसमोर च्या मोकळ्या आवारात पार्किंग ची सोय आहे.इमारतीत शिरल्यावर हर्स्ट खानदानच्या सर्व व्यक्तींची तैल चित्रे पहायला मिळतात. एका होल मध्ये संग्रहित वस्तूंवरून महालाच्या भव्यतेची कल्पना येते. त्यापुढे एक ओपन बाल्कनी आहे तिथे दोन दुर्बिणी ठेवल्या आहेत. त्यातून समोरच्या डोंगरावरील हर्स्ट केसल चे रमणीय दर्शन घेता येते.
Castle on a Hill-3_0.jpg
इथे तिकीट घेतलं कि तुमच्या हाताच्या मनगटाला एक बेंड बांधण्यात येतो. आता इथून केसल च्या लहान बस मधून मुख्य केसल कडे नागमोडी वाटेने जाता येते.ड्रायव्हर बाई केसल ची माहिती देत असते. साधारण केसल जवळ पोहोचल्यावर दोन्हीकडे फुल-फळ झाडांना सुरवात झाली .वर पोहोचल्यावर तर लिंबू-संत्री ह्यांनी पानापेक्षा लगडलेली लहान झाडे दिसली.झाडाखाली तर कितीतरी फळ पडलेली दिसत होती.
 झाड.jpg
बरं कर्मचारी वर्ग तिथेच आपापली कामं करीत होता.केसल जवळ अजून एक गाईड बाईनी आम्हाला माहिती सांगायला सुरुवात केली . तेव्हा ह्या प्रोपरटी चा विस्तृत खुलासा झाला.
हर्स्ट कॅसल च्या पायथ्याशी --
कॅसल प्रवेश

मुख्य कॅसल मध्ये प्रवेश करण्याचे पूर्व दिशेचे द्वार --
 पायरी.jpg
डायनिंग रूम ---
Castle 6 - Dining Hall.jpg
डायनिंग रूम मधील आकर्षक घंगाळ --
Dinig Hall  7-Ghangal.jpg

ह्या महालात कधीतरी अधून मधून विलियम त्याची बायको मिलीसेन्ट आणि त्याची पाच मुले –पैकी दोन जुळी ,असा भरापुरा परिवार विलियम चे राजशाही नियम पाळून तिथे राहायचे.कालांतराने दोघे विभक्त झाले आणि अभिनेत्री मेरीओन डेविसने तिची जागा घेतली .मेरीओन मुळे हॉलीवूड स्टार्स चार्ली चेप्लीन,केरी ग्रांट ,मार्क्स,ग्रेटा गार्बो,ह्याशिवाय राजकीय वर्तुळातले विन्स्टन चर्चिल,जॉर्ज बर्नार्ड शो इत्यादी व्यक्ती हर्स्ट केसल ला राहिले आहेंत.
१९५१ मध्ये विलियम हर्स्ट च्या निधनानंतर कायदेशीर कार्यवाही नंतर १९५८ मध्ये ‘हर्स्ट केसल’ही ‘केलिफोर्निया स्टेट पार्क’ ची प्रोपरटी झाली. तेव्हापासून “ हर्स्ट केसल सेन सायमोन स्टेट हिस्तोरिकल प्रोपरटी मोन्युमेंटस “ म्हटले जाते.त्यानंतर बेजोड कला वस्तू सर्व सामान्य जनतेला पहाण्यासाठी खुले करण्यात आले.हर्स्ट केसल चा एक प्रशस्त वरचा मजला आहे .त्यासाठी वेगळे तिकीट आकारण्यात येते . हर्स्ट केसल ची देखभाल सरकारी खजिना आणि तिकीट विक्रीतून करण्यात येते. एक विशेष म्हणजे हर्स्ट केसल च्या एकूण ६० वारसदारांचा सामुहिक मालकी हक्क आहे .त्यांच्यापैकी कोणी इथे आगाऊ सूचना देऊन सुट्टी घालविण्यासाठी येतात तेव्हा इतर लोकांसाठी हा कॅसल बंद ठेवण्यात येतो.म्हणूनच इथली एकूण एक फळे वारसदारांची संपत्ती आहे व इतर कोणीही एक क्षुल्लक पान देखील घेऊ शकत नाही.मी सहज माझे मत व्यक्त केले कि इतकी फळे नुसती वाया घालवण्या पेक्षा त्याच्यापासून जेम-जेली-मार्म्लेड वगेरे बनवून जवळच्या गावातील नि:सहाय वर्गात वाटत का नाहीत?
पण इथे नियम म्हणजे नियम आणि विशेष म्हणजे नियमांचे कडक पालन. आमच्या गाईड बाई ६८ वर्षांच्या गोर्यापान ,बोलक्या निळ्या डोळ्यांच्या ठेंगण्या .सुबक होत्या.हर्स्ट केसल चा सुंदर टेग लावलेला निळा युनिफोर्म आणि निळी हेट.त्याला एक तुरा लावलेला होता.दररोज १२ मैल गाडी चालवत येतात. दर ८ महिन्यांनी त्याना हर्स्ट केसल आणि साम्राज्याचा अभ्यास करून एक लेखी परीक्षा द्यावी लागते.नंतर कामाचा पुढचा कॉन्टक्ट साईन केला जातो.
पांढऱ्याशुभ्र संगमरवरी पायऱ्या चढून वर आल्यावर एकापेक्षा एक सुंदर शिल्पांनी आणि गुलाब,जास्वंद आणि इतर फुलझाडा नी मन मोहून टाकलं." हर्स्ट कॅसल " मध्ये एकूण बांधकाम सर्व मिळून १३० पेक्षा जास्त खोल्या आहेम्त. एकूण २८ वर्षे बांधकामाला लागली.इथून एका बाजूला महालात काम करणार्या विशेष कर्मचाऱ्याच्या रहाण्याच्या खोल्या दिसत होत्या.इथे एकूण तीन महाल आहेंत. तिथे हर्स्टची फेमिली व पाहुण्यांची रहाण्याची सोय आहे.पण ह्या सर्वांसाठी स्वयंपाकघर आणि जेवणाची एक मोठ्ठी खोली मुख्य महालात च आहे. प्रत्येकाने ब्रेकफास्ट ,जेवणाची वेळ पाळली पाहिजे .रोज शारीरिक व्यायाम ही केला पाहिजे.बिलीयर्ड,टेबल टेनिस ,घोड्यावरून रपेट ह्यासाठी विशेष सोयी होत्या.हर्स्ट स्वत: कला,दैनंदिन व्यायाम आणि वेळेचा भोक्ता होता. महालात रहाणाऱ्या प्रत्येकाला राजघराण्याच्या शिस्तशीर जीवन प्रणालीच्या चौकटीत रहाणे आवश्यक होते. कलाक्षेत्रातील उत्तमोत्तम व्यक्ती आणि विचारवंताना हर्स्ट बोलावत असे. त्याबरोबर शहरातल्या गणमान्य रसिकांना ही आमंत्रण असे.करमणुकीसाठी एका होल मध्ये प्रोजेक्टर वर चालणाऱ्या मूक चित्रपटाची सोय ही केली आहे. कुटुंबीय, पाहूण्यासाठी आरामदायी खुर्च्या तर इतरांसाठी बाकडे ठेवले आहेंत.इथे हर्स्ट ची बायको उन्हाळ्यात आपल्या पाच मुलांनाघेऊन यायची.ती प्रख्यात इंटेरियर डीज़ाइनर होती. ह्या केसल चे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य खोलयांतील खिडक्या तिच्या डिझाईन अनुसार बनविण्यात आल्या आहेत.महालाच्या दर्शनी भागातून कुठूनही समुद्राचे दर्शन होते .इथे हर्स्ट च्या बायकोने डिझाईन केलेले एकूण तीन पैकी एक मोठा ओपन एअर स्विमिंग पूल आहे त्यात इटलीचा निळा दगड वापरला आहे.
ओपन एअर स्विमिंग पूल --
 स्विमिंग पूल.jpg
इनबिल्ट स्विमिंग पूल मधल्या सोन्याने मढविलेल्या टाईल्स -
In Doore Swiming Pool -2.jpg

दुसरा इनबिल्ट स्विमिंग पूल आहे. ह्या पुलाची खासियत अशी कि ज्या होल मध्ये हा पूल आहे त्या पूर्ण हॉल अधे २ १/२ x २ १/२ आकाराच्या इटली हून मागविलेल्या निळ्या मार्बल टाईल्स मध्ये १८ केरेट गोल्ड डिझाईन आहे.त्या टाईल्स वरून चालून मला खूपच धन्य वाटले.हिंवाळ्यात स्विमिंग पूल चे पाणी गरम करण्यासाठी तेलावर चालणाऱ्या बर्नर ची ही व्यवस्था केली आहे.हर्स्ट परिवाराचे ६० वारस अमेरिकाभर विखुरले आहेंत.अक्षरश: सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्मलेल्या ह्या वारसदारांची संपत्ती आता वाढता वाढता वाढे या उक्तीनुसार कित्येक पटींनी ‘बिलियन ‘ च्या ही पुढे वाढली आहें.त्यामुळे वर्षाकाठी कधीतरी त्यांच्यापैकी एखादी फेमिली त्यांच्या प्रायव्हेट विमानाने इथे येतात त्यासाठी स्पेशल धावपट्टी आहे.ही फेमिली इथे २-४ दिवस रहाते तेव्हा हा केसल सर्वसामान्यांसाठी बंद ठेवतात.दृष्टी समोर अथांग पसरलेला समुद्र ,चंदेरी चमचमत्या लाटा आणि थंडगार वारा,निळे आकाश,सुंदर भव्य महाल पण ह्या वास्तूत ना कधी हर्स्ट फार दिवस राहिला ना त्याची फेमिली.
महाला समोरच्या एका गोलाकारात असलेल्या बागेत , सागराला अभिवादन करीत असलेला ,एक सुंदर सोन्याने मढवलेला लहान मुलाचा उभा पुतळा मन मोहून टाकतो.
IMG_9191.jpg

आमच्या गाईड बाईनी हर्स्ट केसल ची माहिती खूपच छान पद्धतीने सांगितली .दोन तास आम्हाला हर्स्ट केसल च्या साम्राज्यात गुंगवून टाकले.बस ची परतीची वाट ही नागमोडी होती.दोन ठिकाणी जंगली हरणे उन्हात बसलेली दिसली.केसल चा भाग सोडला तर बाकी ठिकाणी मोकळे रान व जंगल आहे.तिथे हर्स्ट केसल च्या वंश परंपरेने वाढलेले गायींचे कळप जागोजागी गवत चरताना दिसले . डोंगर पायथ्याशी एक विस्तीर्ण बैठे घर दिसले .त्या विषयी बस ड्रायव्हरने सांगितले कि महालाचा भाग नाही पण येथे हर्स्ट ने ,कोंबड्यांच्या खुराड्याची देखभाल करण्यासाठी नेमलेला कर्मचारी इथे रहायचा .महाल आणि तेथे काम करणार्या कर्मचाऱ्याना अंडी पुरवणे हे त्याचे काम.अतिशय भारावलेल्या थक्क अवस्थेत जवळजवळ तीन तासाने आम्ही पुढच्या वाटेवर निघालो. नयनरम्य समुद्राची साथ होतीच.
समुद्राची साथ
.समुद्राकाठी असलेल्या उघडया जमिनीवरील गवत चरत असलेल्या गायी दिसल्या .नदीकाठी गायी चरताना पाहिल्या आहेत पण समुद्राकाठी.... हे नवीन च होते की. त्यांचा समुद्राच्या पार्श्व भूमीवर फोटो काढायला गाडी कडेला घेतली तर त्यांच्या पैकी एकीने खूप छान वेगवेगळ्या ‘पोझ ‘ बराच वेळ दिल्या.समुद्राकाठी जागोजागी बीच वर रहाण्यासाठी खोल्या,मोटेल्स बांधलेल्या दिसल्या.समुद्राकाठी असलेल्या खडकांवर उसळत्या लाटा पहायला खूप छान वाटत होते. सूर्यप्रकाशाच्या उघड्झापीमुळे आकाशात विखुरलेले रंग केमेर्यातून पकडण्याचा मोह आवरला गेला नाही.मनसोक्त फोटो काढले.आता समुद्राची साथ सुटली होती. पण दोन्हीकडे स्ट्राबेरी,भाज्यांची मोठ्ठी शेतं होती.ताज्या स्ट्राबेरी रसाळ आणि आंबटगोड होत्या.पुढे सांता बार्बरा गावात कॉफी व डोनट घेतले.बरेच अंतर गेल्यावर एक गाव लागले. जे फक्त ' आरटीचोक ' चे उत्पन्न घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.गुगल देवाने त्याबद्दल माहिती दिली होती.वाटेवर असलेल्या एका प्रसिद्ध आरटीचोक च्या दुकानातून आरटीचोक फ्रीटर्स म्हणजे आपली भजी होती! आरटीचोक -- कमळ फुलासारख्या पाकळ्या असलेला नवलकोल कसा दिसेल तसे हिरवे आरटीचोक दिसते = चा कंद सोलून आतला गाभा काढून त्याचे लहान लहान तुकडे करून मैद्याच्या मिश्रणात घोळून तळतात.ही गरम भजी डीप मध्ये बुडवून खाल्ल्याने उदरात्मा तृप्त झाला.फार कमी किमतीत पोटभर भजी खाल्ली.
 आरटीचोक.jpg
मस्त जुनी गाणी ऐकत आमचा प्रवास चालू होता. इतक्यात एक गाव लागलेत्याचे नाव होते 'गार्लिक व्हिलेज'. केलिफोर्नियातील सर्वात जास्त लसूण ह्या गावात पिकतो.अचानक मला "गार्लिक आईस्क्रीम " लिहिलेला एक बोर्ड दिसला.पण ती जागा थोडी आत होती. तिथे माघारी जाऊन परत मार्गाला लागेपर्यंत बराच वेळ गेला असता. त्यामुळे मोह आवरला आणि पुढे निघालो.त्यानंतर साधारण दोन तासांनी सन फ्रान्सिस्कोत प्रवेश केला.तिथल्या कॉस्को मध्ये ठराविक पेट्रोल भरून घेतले . रस्ताभर ट्राफिक बराच होता .एअर पोर्ट जवळच्या कार रेंटल च्या दुकानात रात्री ८ वाजेपर्यंत आमची कार परत करायची होती. कागदी कार्यवाही .गाडीचे चेक-अप वगेरे सोपस्कार करून बरोबर ७:४५ ला आम्ही कार परत केली.तिथून उबर करून हॉलिडे इन ला पोहोचलो.त्यांच्याच रेस्तारेंट ला पास्ता खाल्ला आणि निद्राधीन झालो.दुसरे दिवशी सकाळी ८:३० ला निघायचे होते. इथला मुक्काम एकूण तीन दिवस होता.त्याचे वर्णन ह्या पुढील भागात.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle