रूपेरी वाळूत - २१

इव्हा तिला घेऊन सरळ जिना चढून वरच्या मास्टर बेडरूममध्ये गेली.

"तुझ्या चार बॅग आम्ही इथे ठेवल्यात. टॉयलेट्री बॅग आरशासमोर आहे. पटकन हा ड्रेस घाल आणि पार्टीला ये" इव्हा म्हणाली आणि खाली पार्टीची तयारी करायला निघून गेली. बेडवर पसरून ठेवलेला टू पीस गाऊन तिने दाखवला. नेव्ही ब्लू हाय वेस्ट, पायघोळ फ्लेअर असलेला सिल्की नेटचा स्कर्ट आणि नेव्ही ब्लू लेसवर सिल्वर जर्दोजी वर्क केलेला हाय नेक स्लीव्हलेस क्रॉप टॉप होता.

नोराला काही समजतच नव्हते, तिच्या काय, कुठे, कसं टाईप प्रश्नांना बगल देत इव्हा ते सगळं तू पलाशलाच विचार म्हणून कटली. नोराने फार विचार न करायचा ठरवून कपडे बदलले. क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये फक्त तीन इंच कंबर दिसत होती. केस विंचरून सकाळी थोडे कर्ल केलेले लेयर्स खांद्यावर मोकळे ठेवले, मेकअप टच अप केला आणि तिचं आवडतं वनिला वूडस थोडं थोडं मनगटावर, गळ्यापाशी आणि कानामागे डॅब केलं. बाहेर जाता जाता तिने वरच्या दोन बेडरूम्स, दोन्हीना कनेक्ट असलेली लहानशी टेरेस, खाली लिव्हिंग रूममध्ये उतरणारा गोल जिना, त्याच्या विरुद्ध बाजूची लहानशी स्टडी आणि मोठं किचन असं सगळं घर बघून घेतलं.

ती अंगणात आली तेव्हा परत एकदा टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या. पलाश नेहमीच्याच ब्लॅक जीन्स आणि व्हाईट टी वर टॅन लेदर जॅकेट घालून उभा होता. तरीही त्याच्या ग्लॉसी कर्ल्स आणि हसऱ्या राखाडी डोळ्यांमुळे तो सेलिब्रिटीच वाटत होता. ती पलाशशेजारी जाऊन उभी राहिली तेव्हा त्याने सहज तिच्या बोटांत आपली बोटं अडकवली. ती त्याच्याकडे बघून "आह 'शो' बिझनेस!" म्हणून हसली. गार्गी मध्येच एल्साss म्हणून पळत येऊन तिच्या स्कर्टला मिठी मारून गेली. एव्हाना अंगणाच्या टोकाला दोन टेबलं जोडून त्यावर पिझा बॉक्सेस, ग्रिल्ड सँडविचेस, चिकन कटलेट्स, चीज चिली टोस्ट, कोल्ड ड्रिंक्स आणि स्पार्कलिंग वाईनच्या बाटल्या मांडल्या होत्या. एका टेबलवर प्लेट्स, पेपर नॅपकिन्स, चमचे, ग्लासेस, पाण्याचे जग वगैरे ठेवले होते. मायाने त्यांच्यासमोर टेबलावर एकावर एक गोलाकार चार लेयरवर वनिला फ्रॉस्टिंग केलेला सेमी नेकेड चॉकलेट केक आणून ठेवला. त्याच्या वर आणि खालच्या लेयर्सवर गुलाबी गुलाबाच्या कळ्या ठेवलेल्या होत्या. ती चमकत्या डोळ्यांनी मायाकडे पाहून आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या प्रेमाने हसली. त्यानेही हसत पुढे येऊन तिला एक फिस्ट बम्प दिला.

तेवढ्यात इव्हाने सगळ्यांना बाजूला करत मध्ये उभी राहून मोठ्याने बोलायला सुरुवात केली."फर्स्ट ऑफ ऑल, आय विश नोरा अँड पलाश अ व्हेरी हॅपी मॅरीड लाईफ! आम्ही कोणी लग्नाला आलो नव्हतो आणि न्यूली वेड्सना मिस करत होतो म्हणून हा आफ्टर पार्टीचा प्लॅन केला. यू कॅन से 'हॅपीली एव्हर आफ्टर' पार्टी! ही जस्ट कॅज्युअल पार्टी आहे. सो एन्जॉय.. टू नोरा अँड पलाश!! त्यांच्या दिशेने वाइन ग्लास उचलून ती म्हणाली. "अँड वी नीड दॅट लॉंग अवेटेड वेडिंग किस टू!" माया पुढे डोळा मारत म्हणाला.

दोघांनीही चीअर्स म्हणून खोटं खोटं हसत गपचूप आपापले वाईन ग्लास रिकामे केले. केक कापून एकमेकांना भरवताना मायाचे शब्द आठवून पलाशच्या जादुई डोळ्यात काही जास्त क्षण अडकलेले तिचे काळेभोर डोळे किंवा नोराच्या ओठाला चिकटून राहीलेला चॉकलेट सॉस पुसताना जरा जास्त थबकलेला त्याचा अंगठा वेगळीच गोष्ट सांगत होते. 

केक खाणाऱ्यांची गर्दी पांगल्यावर मायाने अंगणातला मोठा भगभगीत पांढरा दिवा बंद करून चारी कोपऱ्यातले मंद निळे पिवळे लाईट्स सुरू केले. टेबलवर पोर्टेबल स्पीकर्स कनेक्ट करून ठेवलेल्या मोबाईलवर स्पॉटीफायमध्ये वेडिंग सॉंग्जची प्लेलिस्ट लावली. स्पीकरकडे नजर जाताच तिचे गाल गरम होऊन पोटात खड्डा पडला. पहिलंच मरून 5 चं 'शुगर' सुरू झाल्यावर तिने लाईट हाऊसमध्ये त्याला सांगितलेली फर्स्ट डान्सची फँटसी आठवली. व्हिडिओमध्ये तो बँड कसा वेगवेगळ्या लग्नात गेट क्रॅश करून हे गाणं वाजवतो आणि लोक सरप्राईज होतात वगैरे. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले.

"लाईव्ह बँड तर नाही पण स्पीकर्स वर काम चालव" तो गालात हसत म्हणाला, लेदर जॅकेट काढून त्याने शेजारच्या टेबलवर टाकले आणि हात धरून गर्दीतून तिला पुढे घेऊन गेला. त्यांना मधोमध जागा देऊन सगळे आजूबाजूला सरकले. एकमेकांत बोटं गुंफलेले हात वर धरून त्याने अलगद तिच्या बोटांच्या पेरांवर ओठ टेकले. त्याने तोच हात धरून तिला जवळ ओढलं तेव्हा तिचं हृदय धडधडून बंदच पडेल की काय अश्या स्थितीत आलं. त्याने दुसरा हात तिच्या उघड्या कंबरेभोवती वेढला तेव्हा तिला अक्षरशः चटका बसला. दिस इज फर्बीडन.. फर्बीडन!! तिचा मेंदू ओरडून सांगत होता. पण पलाशची तिच्यात मिसळलेली नजर आणि त्याची जवळीक यांनी बाकी सगळं काही फेड आऊट करून टाकलं.

प्रॅक्टिस न करताही गाण्याच्या ठेक्यावर ते एकमेकांबरोबर ऑलमोस्ट परफेक्ट मूव्ह करत होते. त्याच्यावर पडलेला म्युटेड पिवळा उजेड आणि हलणाऱ्या पानांच्या सावल्यांमुळे तो अजूनच हँडसम दिसत होता. येssस प्लीज... म्हणताना त्याने तिला हळुवार गोल फिरवून परत जवळ ओढले तेव्हा त्याच्या डोळ्यांचा रंग अजून गडद झाला. प्रत्येक मूव्हबरोबर ताणून पुन्हा जागेवर येणाऱ्या त्याच्या पाठीच्या स्नायूंवर बोटं फिरवून बघायची इच्छा तिने कशीबशी दाबून टाकली.

त्याच्या हातांच्या वेढ्यात गाण्याचा आवाज फिकट होत गेला. सगळेच आवाज. त्याची पूर्ण वेळ तिच्या डोळ्यात बघणारी इंटेन्स नजर आणि हळुवार पण मुद्दाम केलेला स्पर्श तिला बाकी काही विचार करायला वेळच देत नव्हते. तो ओठ किंचित विलग करून हसला. त्याच्या हसण्यात नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी होतं. जास्त पर्सनल काहीतरी. ते ओळखण्याची संधी न देता त्याने पुन्हा तिला स्वतः कडे ओढलं आणि तिच्या कानाजवळ तोंड नेलं. उष्ण श्वासाने तिच्या अंगावर काटा फुलला. "आयम गोइंग टू किस यू... " तो कुजबुजला.

"इज इट अ वॉर्निंग?"  दाटून आलेला आवंढा गिळत तिने विचारले.

तोंड मिटून हसताना त्याची हलणारी छाती तिला जाणवली. "लोकांना बिलीव्हेबल तर वाटलं पाहिजे." तो हसता हसता थांबून म्हणाला.

तिने मान हलवली.

तिच्या डोळ्यात बघता येईल इतपत तो मागे झाला. तिने काहीतरी बोलायला तोंड उघडले. काही स्पेसिफिक नाही, पण काहीतरी.. फक्त जरा मन तयार करायला.

टू लेट.

त्याचे ओठ लगेच तिच्या ओठांवर होते. तिला डोळे मिटायलाही वेळ मिळाला नाही.

तिने खोल श्वास घेतला. अचानक झालेल्या कृतीने ती जरा गांगरून गेली होती. हवेत सगळीकडे त्याचा सुगंध, त्याचे फेरंमोन्स पसरले आणि ती त्याच्या पायाशी पाणी पाणी होऊन गेली.

किस करता करता त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि अंगठ्याने तिची जॉ लाईन ट्रेस करू लागला. डान्समध्ये तो लीड करत होता तसंच. ती फक्त त्याला फॉलो करू शकत होती. ती काहीही विचार करू शकत नव्हती. त्याने पहिल्यांदाच तिला गप्प केलं होतं आणि त्याबद्दल पहिल्यांदाच ती त्याच्यावर वैतागली नव्हती.

ते स्तब्ध उभे होते, दोघांमध्ये फक्त कपडे आणि आधी हजारो वेळा सवयीचे असल्यासारखे एकमेकांत विरघळणारे ओठ! क्राऊड आ वासून आरडाओरड करत त्यांना चिअर करत होतं. मध्येच इव्हाने जोरात शिट्टी वाजवली. शिरीष आणि शर्वरी एकमेकांकडे बघत हसत होते. शर्वरीचं लक्ष खाली उभ्या गार्गीकडे गेल्यावर तिने घाईघाईने तिच्या डोळ्यांवर हात ठेवले.

ती त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्यावर रेलली. तो अक्ख्या जांभुळवाडीला ती त्याची असल्याचे ओरडून सांगितल्यासारखे किस करत होता. फायनली, एकदा शेवटचे त्याने ओठ प्रेस केले आणि थांबून तिच्या कपाळाला कपाळ टेकवले. त्याची छाती वरखाली होत होती. त्याचा श्वासही तिच्यासारखाच अर्धामुर्धा सुरू होता.

"ओके?" त्याने विचारले. त्याचं तिरकस स्माईल परत आलं होतं.

"इट वॉज ओके. वॉर्निंगची काही गरज नव्हती." ती ऑलमोस्ट धापा टाकत पण कूलपणाची परमावधी साधत म्हणाली.

हसत हसत तो तिच्यापासून लांब झाला. आताही त्याच्या डोळ्यात ऊब होती पण त्यातला खेळकरपणा परत आला होता.

तिने हुश्श करत टिशूने कपाळावरून घाम टिपला आणि डोक्यातले विचार पुन्हा जागच्या जागी आणले.

क्रमशः

एव्हर आफ्टर केक
Screenshot_20210730-201826~2.png

सौजन्य: लकी बर्ड बेकरी

पार्टी गाऊन (सौजन्य: न्यू यॉर्क ड्रेसेस - शेरी हिल)

sherrihill-51724-navy-2_1000x.jpg

शुगर!

Keywords: 

लेख: