रूपेरी वाळूत - २५

"हम्म.. आता मला कळलं. काळोखात नीट दिसत नव्हतं. त्याने मला तुझ्याबरोबर डान्स करताना बघितलं असणार आणि तो पझेसिव्ह होऊन माझ्यामागे आला. त्याने येऊन मला किस करायला ट्राय केलं.." ती नॉन स्टॉप बोलत होती. नकळत पलाशच्या हातांच्या मुठी वळल्या होत्या.

"पण मी त्याला जोरात ढोपर मारला. त्याने तो अजूनच हायपर झाला आणि माझे खांदे धरून जवळ ओढायला लागला तेव्हाच तू तिथे पोचलास." ती बोलून थांबताच त्याने श्वास सोडला.

केतन त्याचा सिनियर होता पण नंतर एकाच कंपनीमध्ये कलीग्ज म्हणून काम करताना जास्त ओळखीचा झाला होता. त्याला डावलून पलाशला मिळालेले प्रमोशन आणि पलाशभोवती कायम भिरभिरणारी फुलपाखरं बघून तो प्रचंड जेलस होता. पलाश रिझाईन करून गावाला आल्यापासून त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. वरूणच्या ओळखीने तो लग्नाला आला आणि अचानक त्याला रिसॉर्ट पलाशच्या मालकीचे आहे हे समजले आणि रात्री नशेत त्याने नोराला पलाशबरोबर डान्स करताना पाहिले. 'नाऊ आय कॅन कनेक्ट द डॉट्स!" विचार करता करता पलाश स्वतःशीच म्हणाला. केतन कधीतरी नोराबरोबर होता हे मात्र त्याला सहन होत नव्हतं.

"हे सगळं कधी झालं? आय मीन, लव्ह स्टोरी, ब्रेकअप वगैरे?" त्याचा काही संबंध नव्हता तरीही त्याच्या तोंडातून शब्द निघालेच.

तिने त्याच्या हातातले हात काढून घेतले. "पलाश! प्लीज! मला तुझी जुनी रेप्यूटेशन चांगली माहिती आहे. तरीही मी तुला कसलेही प्रश्न विचारले नाहीत. तू पण विचारू नको." ती नाक सुक सुक करत म्हणाली. "माझं डोकं दुखतंय, मी झोपते आता." म्हणून ती वर निघाली.

त्याला जुन्या सगळ्या गोष्टी भराभर नजरेसमोरून गेल्या. केतनवरच्या रागाचा भडका उडाला आणि नोराही कशी त्याच्या प्रेमात पडू शकते ह्याचाही राग येत राहिला. तो बराच वेळ हॉलमध्ये येरझाऱ्या घालत राहिला आणि शेवटी बेडरूममध्ये जाऊन रिकाम्या बेडवर आडवा झाला.

नोराची स्थिती फार वेगळी नव्हती. केतनला मनातल्या मनात कितीही शिव्या घातल्या तरी तिचा राग कमी होत नव्हता. त्याने तिला दिलेल्या सगळ्या क्लेशदायक आठवणींमधून तिची सुटका नव्हती. तरीही त्या दिवशी तो जवळ आल्यावर त्याचा चेहरा दिसेपर्यंत त्याला प्रतिकार करता करता ती चक्कर येऊन कोसळली होती. थँक् गॉड फॉर पलाश! पलाशबद्दल जरा नरम पडल्याचं जाणवून तिने स्वतःला एक फटका दिला. प्लीज नोरा, त्याचा विचार करू नको. तोही काही वेगळा नसणार. तिने गारठायला झाल्यावर उठून फॅन बंद केला. टॅन्कमधला मासापण कुठे दिसत नव्हता, रेतीत लपला असणार, म्हणून ती पुन्हा येऊन आडवी झाली. तिला नेहमीच्या फॅन, गाड्या, कुत्र्या मांजराच्या आवाजात झोपायची सवय होती पण इथे किर्रर्र शांतता होती. खिडकीतून चंद्राचा उजेड येत होता तरी झोप येत नव्हती.

ती दाराची कडी काढून बाहेर गेली. पॅसेजमध्ये उभी राहून हो नाही करता करता तिने पलाशच्या दाराला हात लावला. दार नुसते लोटलेले होते. तिने हळूच दार अर्धवट ढकलले. दाराचा करकरले आणि पलाश झोपेत काहीतरी पुटपुटत कुशीवरून सरळ होऊन झोपला. खिडकीतून पूर्ण बेडवर चंद्राचे किरण येत होते. कंबरेपर्यंत एक पातळ दोहड ओढून हात डोक्याखाली घेऊन तो म्हटल्याप्रमाणे उघडा झोपला होता. श्वासागणिक त्याची छाती वर खाली होत होती. ती ओठ चावत किती वेळ दारात उभी होती तिला कळलं नाही पण त्याच्या बारीक घोरण्याचा आवाजाने तिची तंद्री मोडली. त्याचं दार तिने पूर्ण उघडून ठेवलं आणि परत आपल्या खोलीत येऊन दार उघडून ठेवून झोपली. त्याच्या घोरण्याचा आवाज लयीत येत होता. तेवढ्या आवाजानेही तिला झोप लागली.

---

नोरा आळोखेपिळोखे देत उठली. फोटो काढणाऱ्याचा शोध आणि एफ आय आर फाईल झाल्यामुळे आज बरंच हलकं वाटत होतं. मजेत गुणगुणत ब्रश वगैरे करून ती बाहेर आली. पलाशचे दार उघडेच होते पण तो आत नव्हता. हम्म रनिंग! हा काही आता तासभर येत नाही.. म्हणून खाली येऊन तिला हवा तसा चहा करून प्यायल्यावर तिलाही थोडा ऍब वर्कआऊट करायची लहर आली. बरेच दिवस खा खा आणि सुट्टी झाली होती. कपाटातून ग्रे स्ट्रेची योगा पँटस् आणि खूप दिवस न वापरलेली नायकीची  हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स ब्रा शोधून तिने कपडे बदलले आणि मॅटचा रोल घेऊन खाली गेली.

वॉर्म अप म्हणून सूर्यनमस्कार संपवून तिने क्रंचेस सुरू केले. बायसिकल क्रंच करताना तिने मानेखाली हात धरून चेहरा मेन डोअर कडे वळवला आणि त्याच क्षणी धाडकन दार उघडून पलाश आत आला. त्याच्या ब्लॅक शॉर्ट्स आणि सगळे भिजलेले रिप्ड मसल्स दिसणाऱ्या गंजीकडे लक्ष जाताच तिच्या मेंदूत एकदम टिकटॉक वरची ओ नो, ओ नो, ओ नो नो नो नो नो मीम वाजायला लागली. तिने मान वळवून शक्य तितके तोंड बंद ठेवून आपला एक्सरसाईज सुरू ठेवला.

त्याच्यासाठी आत्ता तिला खाली आडवं होऊन घाम गाळत हुंकारताना बघणे हाच सगळ्यात मोठा टर्न ऑन होता. तो सोफ्यावर बसून नॅपकिनने घाम पुसता पुसता तिचे निरीक्षण करत होता. शी'ज जस्ट अ बिट कर्व्ही अँड इटस् परफेक्ट. त्याच्या आयुष्यात आलेल्या टिपिकल डाएट हंग्री, बारीक, फॅशनेबल, सलोन फ्रीक मुलींपेक्षा ही खूप रिअल, खूप सोलफुल वाटत होती. प्रत्येक क्रंचबरोबर स्पोर्ट्स ब्राच्या पर्पल क्रॉस बँडस् मधून पाठीवरच्या टॅटूची निळसर काळी अक्षरे झलक दाखवत होती. ऊह, दॅट्स सेक्सी!

दहा सेट्स झाल्यावर तिने रिव्हर्स क्रंच सुरू केले. तिचे पाय जेमतेमच वर जात होते. कंबर तर मुळीच उचलत नव्हती. तिचे तीन चार प्रयत्न बघून तो तिच्याशेजारी येऊन गुडघे टेकून बसला. "लोअर ऍब्ज चार्ज व्हायला हवे. इथे!" तो त्या जागेवर उबदार तळवा ठेऊन म्हणाला. त्याच्या नुसत्या हातामुळे तिच्या पोटात एक गरम लाट सळसळू लागली. "ना..ऊ, आर्म्स स्ट्रेट.." त्याने तिच्या जमिनीवर पालथ्या हातावर हात ठेवून ते सरळ केले. "लेग्ज अप"  पोटऱ्यांना धरून पाय नव्वद अंशात सरळ वर केले "अँड क्रंच!" गुढघ्याखाली धरून त्याने गुढघे वाकवून  चेहऱ्यापर्यंत नेले आणि दुसऱ्या हाताने तिच्या लोअर बॅकला सपोर्ट दिला. तिच्या अंगातल्या गरम लाटांचा आता समुद्र झाला होता. तिच्या चेहऱ्यापासून दोन इंचावर तो पापण्या झुकवून तिच्या डोळ्यात पाहत होता. कंबर उचलली गेली. "होल्ड! वन. टू. थ्री. रिलीज." पाय परत खाली सोडून तो नकळत तिच्यावर झुकला होता. त्याचा चटका बसणारा श्वास तिच्या गालावर हुळहुळला. तिने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. "ओह नो.. नो, मला आंघोळीला जायचंय" म्हणत ती पटकन त्याला ढकलून उठली आणि पळतच वर गेली. तो योगा मॅटवर बसून गालात हसत राहिला.

---

दवाखान्यात एका जाम चळवळ्या मांजरीच्या पायात रुतलेला काटा काढतानाही तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं नव्हतं. मांजरीला घेऊन तिची छोटी मालकीण गेल्यानंतर नोराने लंच ब्रेक घेतला. आज डबा नाही म्हणून ती समोरच्या दुकानात वडा पाव घ्यायला गेली.

"डॉक्टरबाई लईच चमकायलाय! नव्या नवरीला लगीन मानवला!" शांताबाई वीस पंचवीस वर्षे सिंधुदुर्गात राहूनही त्यांचा माहेरचा ऍक्सेन्ट विसरल्या नव्हत्या.

"काय मावशी.. दोन वडापाव. नेहमीसारखे." नोरा हसत म्हणाली.

त्यांनी भराभर झाऱ्याने गरमागरम वडे काढून कागदावर टाकले. दोन पाव उघडून त्यात वरखाली लसणीची चटणी लावली आणि आत एकेक मोठा वडा कोंबला. त्याच कागदावर चार पाच तळून मीठ शिंपडलेल्या मिरच्या आणि मूठभर वड्याची कुरकुरीत पिल्लं टाकली. पुडी बांधून नोराच्या हातात दिली.

नोराने पैसे पुढे करताच बाईंनी पैसे पुन्हा तिच्या हातात ठेवले. "बाय, पैशे नको. आमचा केलवन समज! सुखी ऱ्हाव. पलाशदादा लय जीव लावील तुला. मी वळखता."  तिच्या चेहऱ्यासमोर बोटं मोडत त्या म्हणाल्या.

नोराने हसून थॅंक्यू म्हटलं आणि परत दवाखान्यात गेली. शेवटच्या वाक्यावर विचार करता करता तिच्या चेहर्‍यावर एक खोडकर हसू उमटलं होतं.

क्रमशः

नोरा इन अ‍ॅक्शन
Screenshot_20210813-120605~2.png

वडा पाव (सौजन्यः सम्राट वडा पाव, विले पार्ले)
Vada.jpg

Keywords: 

लेख: