नभ उतरू आलं

nabh_utaru_aal.jpg

नभ उतरू आलं - १

पलोमा

रविवारी सकाळी दादर स्टेशनला कोयनेत बसल्यापासनं छातीत धडधडायलंय. हा जॉब स्वीकारून मी बरोबर करतेय ना? कसे असतील पुढचे तीन महिने? इथपासून ते का जातेय मी परत? कसं काम होईल माझ्या हातून? आणि तो? तो काय विचार करत असेल? असे सतराशे साठ प्रश्न मनात ठाण मांडून डोकं बाद होण्यापूर्वी मी कानात इअरफोन्स खुपसले. विचार बंद!! Deep breath.. deep breath...

स्पॉटीफायवर 'जेमेल हिल इज अनबॉदर्ड' पॉडकास्ट सुरू केलं. आता दिवसभराची निश्चिंती!

सिडनी कार्टर नावाची एक बास्केटबॉल कोच बोलत असताना पुणं आलं. ट्रेन थांबताच घीवाला मधून ऑर्डर केलेली व्हेज बिर्याणी, रायता डिलिव्हरी आली. पहिल्याच घासाला इतकी सपक की काय सांगू! बॅगेतून चटणीची पुडी काढून थोडी चटणी शिप्पडल्यावर कुठे जिभेला थोडी चव आली. खाऊन झाल्यावर शेजारच्या एका गप्पिष्ट काकीने हातावर मस्त भाजलेली तीळ बडीशोप ठेवली. तेवढ्यासाठी तिची बडबड माफ! मग तिचा दुसरीतला लहाना त्याचं नवीन मॅग्नेटवालं बुद्धिबळ दाखवून खेळायलाच बसला. असल्या गोड बिटक्यांना 'नाही' नाही म्हणता येत बाबा . बराच उशीर करून शेवटी मला चेक मेट केल्यावर, पोरटा नाचत माझ्याकडे बघून ओरडला "आव्हान सप्पुष्टात!!" तेव्हा आख्खा डबा हसायला लागला! मिरजेला ते लोक उतरल्यानंतर जाऊन एक भलामोठा गरमागरम वडापाव आणि इडली चटणी हाणल्यावर कुठे नॉस्टॅल्जिया जरा विझला.

खाल्ल्यावर शांततेत जी झोप लागली ती पार कोल्हापूरची निळी फीत लावलेला पांढरा शंकरपाळा दिसल्यावरच जाग आली. गाडी सरकत सरकत स्टेशनच्या लाल उतरत्या छपरापुढचे पांढरे त्रिकोण दाखवत थांबली तेव्हा 'आपल्या ' गावात पोचल्याचं जाणवून घसा दाटूनच आला एकदम! नाही म्हणायला शेवटचं घरी येऊन वर्ष होत आलं होतं.

दोन मोठ्या बॅगा ओढत मी बाहेर आले तोच समोरच्या काचेवर आयपीएलचा लोगो चिकटवलेली होंडा सिटी येऊन थांबली. भारी काम आहे यार! ड्रायव्हरने बॅगा डिकीत ठेवीपर्यंत मी पुढचं दार उघडून बसले.

लगेच घरी जुईच्या मोबाईलवर फोन लावला.

"हॅलो, आलीस का तायडे?"

"जुई?"

"च्यक, जाई! जुई नेहमीसारखी पुस्तकातले दात बघत बसलीय." चिडवत बोलणारी जाई आणि चष्म्यातून रागाने बघणारी जुई लगेच माझ्या डोळ्यासमोर आल्या.

"मग? बघू दे, डेंटिस्ट होईल ती पुढच्या वर्षी! मी नीट पोचले. हांव, कारमध्ये आहे. मला जे घर दिलंय ना, सरनोबत वाडीत, तिथला पत्ता मेसेज केलाय. थोडं सामान वगैरे लावून झोपेन. सकाळी लवकर सेशन आहे, तेवढं झालं की घरी येतो." मी दमून हळूच जांभई दिली.

"ठिकाय. आल्यावर तुझ्यासाठी एक मज्जा सरप्राइज आहे. ये लवकर. सगळी राजारामपुरी तुझी वाट बघायलीय!" जाई जाम उत्साहात ओरडली.

"अरे वा, येतेच की. पप्पांना ट्रेनमधूनच कॉल केला होता. ते शुक्रवारी सुट्टी घेऊन येतील. शनवार - रव्वार सुट्टीच आहे बँकेला."

"आजीला देऊ काय फोन?"

"गुच्ची देईन एक! किऱ्यानिष्ट पोरगी!" मी फोन तोंडाशी धरून पुटपुटल्यावर तिकडे जाई फिदीफिदी हसत सुटली. "चल बाय, पोचले मी."

मोठ्या पांढऱ्या कंपाऊंड वॉलसमोर गाडी थांबली. मी आ वासून गेटपलीकडे दिसणाऱ्या लाल विटांच्या, काचेची बाल्कनी असलेल्या बंगल्याकडे बघतच राहिले. हायला, सरनोबतवाडी येवडी कधी सुधारली?! मेन गेटवरचा एक माणूस किल्ली घेऊन थांबला होता. थॅन्क्स म्हणून तो कटल्यावर मी गेट उघडलं. आत काळ्या फरशीचे अंगण आणि आजूबाजूला दोन, तीन पावसाने धुवून हिरवीगार झालेली पांढऱ्या चाफ्याची झाडे होती. पाणेरल्या काळ्या फरशीवर चार दोन चुकार फुले गळून पडली होती. सेफ्टी डोअरचे कुलूप उघडून मी आत शिरले. सगळं घर आधीच स्वच्छ करून ठेवलेलं होतं  हॉलमध्ये लाकडी फर्निचर, भिंतीवर मोठा टिव्ही, दोन बेडरूम्स, सुसज्ज किचन... घर रहायला सज्ज होतं. वॉव!  बॅगा बेडरूममध्ये ठेऊन मी आंघोळ करून आले. पजामा चढवून पडी टाकली. उशीला डोकं टेकताच अशी मस्त, बिनस्वप्नाची झोप लागली की बास्!

'इकडे कचरा, तिकडे कचरा
विसरून जाऊ बात होss'

डोळे चोळत मी उठून बसले.

'ओला कचरा, सुका कचरा
नवी करू सुरुवात होss '

माझे ओठ आता हसायला लागले. मी कोल्ल्हापूरात आहे!! पटकन बाल्कनीत जाऊन गाडीवाल्याला 'आज नाई ओss' सांगितल्यावर गाडी पुढे गेली.

शिट! सात वाजले!! मी पटापट आवरून तयार झाले. आयपॅड, पेन, नोटपॅड सगळं टेबलावर नीट मांडून ठेवलं. बाल्कनीत हाताशी आलेला एक चाफ्याचा घोस तोडून एका ग्लासात पाणी घालून ठेवला. सोफ्याची कव्हर्स हाताने नीट केली. खिडकीचे पडदे उघडले आणि सगळ्या हॉलवर एक नजर फिरवली.  आफ्टर ऑल, आय एम अ प्रोफेशनल.

हे भाड्याचं सुंदर घर मला मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलंय, कारण पुढचे तीन महिने मी त्यांच्या सुपरस्टार, अष्टपैलू क्रिकेटरबरोबर रादर त्याच्या डोक्यावर, त्याच्या विचारांवर काम करणार आहे. मी, डॉ. पलोमा फुलसुंदर, दिल्ली युनिवर्सिटीची सायकॉलॉजी टॉपर आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी मध्ये पीएचडी. कोल्हापूर, कारण हे त्याचं शहर आहे, जिथे तो जास्त रिलॅक्स असेल आणि माझंही. इथेच आम्ही दोघे लहानाचे मोठे झालो, बेस्टीज झालो, प्रेमात पडलो, फर्स्ट लव्ह, फर्स्ट किस, बरेच काय काय फर्स्टस आणि फर्स्ट ब्रेकअपसुद्धा. त्याला आता खूप वर्ष झाली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आमची पंचगंगा तरी आता पहिल्यासारखी कुठं राहिलीय! मला खरं तर हा जॉब नको होता. मी माझ्या बास्केटबॉल टीमबरोबर खूष होते पण ऑफर अशी आली की मी नाकारू शकले नाही. आफ्टर ऑल इट्स ह्यूज मनी. भरपूर पैसे, रेंट फ्री घर आणि माझ्या गावात, माझ्या कुटुंबाजवळ रहाणे! नाही म्हणायला चान्सच नव्हता. टेम्पररी आहे, तरीही मी हा जॉब स्वीकारला.

टीमचे कोच म्हणजे डी के घोरपडे मला काँटॅक्ट करताना म्हणाले होते की टीमबरोबर माझं पर्मनंट कॉन्ट्रॅक्ट होण्याचेसुद्धा चान्सेस आहेत. 'जर ' मी आत्ताच्या कामात यशस्वी झाले 'तर'! स्पोर्ट्स सायकॉलॉजी माझी पॅशन आहे कारण मला कायमच खेळात इंटरेस्ट आहे, शाळेत मी डिस्ट्रिक्ट लेव्हल ऍथलीट होते. गेम पूर्वी किंवा गेम सुरू असताना प्लेयर्स जो मेंटल गेम खेळतात त्याच्याबद्दल मला खूप जास्त कुतूहल होतं आणि आहे.

आता ह्या केसमध्ये बारावी नंतर लगेचच त्याला रणजी टीममध्ये घेतलं होतं आणि दोन वर्षात नॅशनल टीम. नंतर जेव्हा आयपीएल असेल तेव्हा त्यात असं अविरत, दमवून टाकणारं शेड्युल सुरू होतं. थोड्या इंज्यरीज आणि घोरपडे म्हणतात तसं टेंपररी बर्नआऊटमुळे तो सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. चिडचिडा झालाय आणि मॅच दरम्यान स्लेजिंगमुळे त्याची कॅप्टनशिप काढून दुसऱ्याला दिलीय. घोरपडे म्हणाल्याप्रमाणे मला त्याचं डोकं ताळ्यावर आणून गेमकडे वळवायचे आहे. त्यासाठी आधी मला माझे डोके ताळ्यावर ठेवावे लागेल. त्याच्याबरोर असताना प्रोफेशनल वागणे जामच कठीण आहे पण मी ते करू शकते.

टिंग!

बरोबर साडे आठावर काटा आला आणि बेल वाजली. मी केसांवरून एक हात फिरवला आणि जाताजाता आरशात डोकावले.

खोल श्वास. हम्म्म. आम्ही एकमेकांना समोरासमोर बघून य वर्ष झाली. ऑफकोर्स त्याचा फोटो खंडीभर मॅगझिन कव्हर्सवर नेहमीच झळकत असतो. त्याच्या सगळ्या मुलाखती मी पहात असते. इंस्टावर आम्ही एकमेकांना फॉलो करतो पण दोघेही लाईक किंवा कमेंट कधीच करत नाही. सेलिब्रिटी असल्यामुळे इतके वर्ष कायमच त्याच्या कुठल्या ना कुठल्या मॉडेल नाहीतर ॲक्ट्रेसबरोबर अफेअर्सच्या बातम्या, नाहीतर माध्यमांनी लिंक करणे तरी नेहमीच सुरू असते. मी त्याची प्रोफाईल म्यूट ठेवलीय कारण त्याला ह्या सगळ्या बायकांबरोबर बघून नाही म्हटलं तरी काळजात कुठेतरी टोचतंच.

आज त्याच्याबरोबर त्याचा ट्रेनर वेंडेल येईल. त्याच्याबरोबर बसून दोघांची सेशन्स शेड्युल करायची आहेत. घोरपड्यांनी मला काही एक्झॅक्ट आऊटलाईन दिली नाहीये पण त्याच्याबरोबर त्याच्या डेली रूटीनमध्ये सोबत राहून हळूहळू काम करायचे आहे. त्यासाठी त्यालाही माझ्या जवळच कुठेतरी घर दिलंय. बाकी कुणाचा डिस्टर्बन्स नको म्हणून शहरापासून जरा लांब.

दार उघडताना काचेतून बाहेर नजर गेली आणि माझा श्वास घशातच अडकला! बाहेर झगझगीत उजेडात तो उभा होता.

समर धैर्यशील सावंत.

त्याच्या वेव्ही केसांवर उन्हाचा कवडसा आला होता. त्याचे चमकते घारे डोळे माझ्याकडे पाहताच माझ्यात अडकून पडले. मी श्वास जरा हळू घेण्याच्या प्रयत्नात दरवाजा उघडला.

"पलोमा!" त्याचे ओठ ओळखीचं हसले.
त्याच्या नुसत्या एका करंगळीतसुद्धा एका अख्ख्या माणसाइतका चार्म आहे. अगदी लहानपणीसुद्धा तो कुणालाही आपल्या प्रेमात पाडू शकत असे. म्हणजे मोस्टली मलाच!

"हे! इट्स गुड टू सी यू!" अचानक कापणारा आवाज सावरत मी खोकले.

"आय गेस, तुला त्यांनी मला फिक्स करायला पाठवलंय. आर यू रेडी?" तो अचानक माझ्या कानाजवळ झुकून म्हणाला. माझ्या गालावर जरासं हुळहुळलं.

आईच्या गावात! इतक्या प्लेयर्सबरोबर काम करून मला कधीच असं फील झालं नव्हतं. आता तो माझ्याबरोबरचा मुलगा नव्हता. ही'ज अ मॅन नाऊ!

कॉन्फिडन्ट, सेक्सी, मस्क्युलर मॅन ज्याचा फ्रेश मिंटी, वूडी सुगंध थेट माझ्या नाकात घुसला. इतक्या सगळ्या प्रो ऍथलीटस् बरोबर काम करताना मी कायम कंट्रोलमध्ये होते. इतकं अनसेटल मला कोणीच केलं नव्हतं. पण आता म्हणजे माझा रिॲलिटीचा सेन्स पार बाद होत चाललाय. हेलो! बी प्रोफेशनल!! पटकन त्याच्यावरची नजर हटवून मी त्याच्यामागे पाहिले. मागचा मीठमिरी केसांचा क्रू कट केलेला, सावळासा टणक माणूस पुढे येऊन उभा राहीला. "हाय पलोमा, आयाम वेंडेल. हिज ट्रेनर. आय गेस वी विल बी वर्किंग टुगेदर." हसून त्याने हात पुढे केला.

"नाइस मीटिंग यू." मीही हसून हात मिळवला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २

"ओके! सो.. मला तुम्हा दोघांना आधी भेटवायचं होतं म्हणजे तुम्ही एकत्र बसून आपापलं शेड्यूल मॅच कराल. तुमचं झालं की वेंडी हॉटेलवर परत जाईल, आमचा सकाळचा वर्कआऊट झालाय. आता दिवसभर त्याला काही काम नाही." समरने माझ्यावरची नजर न हटवता सांगितले.

"हम्म, तशीही मी कायम तुझ्या डोक्याजवळच आहे. 24 बाय 7 ऑन कॉल. कोचचा आदेश! सो, मी तुमच्या चालू शेड्यूलशी जुळवून घेईन." मी खांदे उडवले. आय मीन, मला एवढी मोठी रक्कम फक्त तीन महिन्यांसाठी मिळते आहे तर माझा फोकस पूर्णपणे तूच असणार आहेस. तुला जेव्हाही गरज पडेल, मी अ‍ॅव्हेलेबल आहेच.

शक्स, नॉट लाईक दॅट!! मी स्वत:ला मनातच एक टपली मारली.

मी त्यांना डायनिंग टेबलवर बसवून समोर पाण्याचे ग्लास ठेवले. वेंडेलबरोबर बसून असं शेड्यूल बनवलं की ज्यात तो समरला रोज सकाळी आणि अल्टरनेट डेज सकाळ - संध्याकाळ ट्रेन करेल आणि मी ती वर्कआऊट सेशन्स फक्त निरीक्षण करण्यासाठी अटेंड करेन. रोज माझी वेगळी वन-ऑन-वन सेशन्स होतील. ते दोघे आठवड्याचे सातही दिवस वर्कआउट करतात कारण जेव्हा तुमच्या फिटनेससाठी लाखोंनी पैसे लागलेले असतात, तेव्हा रिझल्ट द्यावाच लागतो.

बस का राव! एका सीझनसाठी मला कोणी तीन कोटी दिले तर मीसुद्धा रोज एवढा वर्कआऊट करेन!

समर काही बोलला नसला तरी घोरपडेनी मला सांगितलं होतं. तो पुढचं अजून एक वर्ष खेळावा म्हणून त्यात 50% हाईक द्यायलाही ओनर्स तयार होते म्हणे. त्यांना नक्कीच माझ्यावर प्रेशर टाकायचं होतं. हे ऑक्शन वगैरे पब्लिकली होतात पण मला त्यात अजिबातच रस नसल्यामुळे मी पूर्वी कधी वाचलं किंवा बघितलं नव्हतं. पण आता तिकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आता खेळाडूंचे पे चेक्स जितके मोठे तितकी माझ्या अपॉइंटमेंटची शक्यता जास्त असेल.

वेंडेल खुर्ची सरकवून उभा राहिला. आमच्याहून थोडासाच मोठा वाटतो. मेबी लेट थर्टीज. समरपेक्षा बुटका आहे पण एकदम टणक! "ऑल राईट. तो अब्बी मैं निकलता.. दिनभर थोडा रेस्ट करता हूं, फिर इवनिंग मे कॉल करता हालचाल के लिये."

समरने मान हलवली. "थॅन्क्स मॅन, सी यू टुमॉरो."

मी दार लावायला वेंडेलमागे गेले. "सी यू."

"पलोमा, हमको बहोत काम करना है. मेनली तुमको!" समर माझ्यामागे येत नाही ना चेक करून तो हळूच म्हणाला. "ही इज लाईक अ बुल! लेकीन अभी उसका अ‍ग्रेशन, अंदर का फायर थोडा बुझ गया है. गेम से ज्यादा गेम मे जो पॉलिटिक्स है उस्से वो थोडा हिल गया है. दिमागमें, यू नो! अँड एव्हरीवन इज होपिंग यू विल ब्रिंग द फायर बॅक..."

मी मान हलवली. ऑफ कोर्स मी तेच करायला इथे आलीय. त्याचा गेमवरचा फोकस आणि आत्मविश्वास अढळ रहायला हवा. त्याचं खेळावरचं प्रेम कमी झालं असेल किंवा त्यातल्या लोकांशी पटत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण खेळताना त्याने १००% दिलेच पाहिजेत. "आज मैं उससे बात करुंगी. लेट्स गेट द बॉल रोलिंग."

वेंडेल किंचित हसला. "सी यू अ‍ॅट द प्रॅक्टिस टुमॉरो!"

तो वळल्यावर मी दरवाजा बंद करून परत किचनमध्ये गेले. समर फोनवर काहीतरी टाईप करत होता. मेबी कोणी गर्लफ्रेंड असेल.

मी घसा खाकरला. "हे!" तो माझ्याकडे बघून हसला. माझ्या हृदयाचे ठोके जरा वाढले.

मी त्याच्या समोरची खुर्ची ओढून बसले. "हाय!"

"तुला भेटून बरं वाटतंय पलो. तुझ्या डोळ्यातून मी केलेले कुठलेच किडे सुटायचे नाहीत आणि तुझं मिरचीसारखी जीभ चालवून मला सुनावणं! आय मिस्ड इट ऑल." नुकताच शॉवर घेऊन आल्यामुळे त्याचे ओलसर काळेभोर केस विस्कटलेले होते. घाऱ्या डोळ्यांना लांब काळ्या पापण्या आधीसारख्याच झाकून टाकत होत्या. ह्या एका बाबतीत मी कायमच त्याच्यावर जेलस होते. त्याच्या कातीव जॉ लाईनवर अगदी सेक्सी दिसेल एवढीच स्टबल होती. तो समोर असल्यामुळे माझ्या श्वासांवर परिणाम झालाच होता.

एक तप उलटून गेलं तरीही.

"आय गेस आता तुला तसं कोणी सुनवत नसेल.." मी शांतपणे म्हणाले.

"शक्यय का!" तो नाक आक्रसून किंचित हसला. हम्म्म... ह्या लूकवरच तर लाखो मुली फिदा आहेत.

मी आयपॅड घ्यायला हात पुढे करतेय तोच त्याने माझा हात धरून थांबवला. "नाही पलो. तू मला सायकोअ‍ॅनालाईज करावं म्हणून मी तुझ्याबरोबर काम करायला हो नाही म्हणालो. आत्ता लगेच आपण नोट्स वगैरे नको घेऊया. आपण एकमेकांना बघून कितीतरी वर्ष झालीत. मला मायक्रोस्कोपखाली न जाता तुझ्याशी नॉर्मल गप्पा मारायच्या आहेत. म्हणून मी कोल्हापुरात यायला तयार होतो. तुझ्यासोबत काम करायला."

मी मान हलवली. नाही म्हटलं तरी त्याच्या आवाजात जाणवलेल्या थोड्याशा कंपाने मी हलले होते. त्याने वरवर कितीही कॉन्फिडन्स आणि वांड अ‍ॅटिट्यूड दाखवला तरी आता त्यामागे जराशी भीती, थोडा राग, थोडा नर्व्हसनेस जाणवत होता.

"ओके. मग मला सांग तू माझ्याबरोबर काम करायला तयार का झालास?" मी आयपॅड बाजूला सरकवलं.

"कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. जरी तू माझं हार्ट ब्रेक केलं तरीही." तो स्वतःशीच हसला. पण त्या हसण्याआड काहीतरी होतं. राग, हर्ट, कदाचित थोडी निराशा. "मी तुला ओळखतो."

मी पटकन श्वास घेतला आणि नकारार्थी मान हलवली. "मी काही तुझ्या हृदयाचे तुकडे वगैरे केलेले नाही. आणि समज केले असले तरी तू त्यातून पटकन उठून उभारला होताच की!"

मला म्हाईताय हे अनप्रोफेशनल आहे पण मला त्याच्या डोक्यात शिरायचं आहे. सुरुवात करायला आम्हाला एका समान जागी असायला हवं. आमचा एक इतिहास आहे, नाहीये असं म्हणूच शकत नाही. सो, हे बोलणं गरजेचं आहे.

त्याने डोळे चोळले आणि नजर उचलून माझ्याकडे बघितलं. "नव्हतो. बट आय सर्वाईव्हड. नेहमीप्रमाणे. पण मी म्हटलं तसं मी तुला ओळखतो. मला हे समजलं, की मला कोणी बरं करू शकत असेल, तर ती तू असशील."

"ते का?" मी भरून येणारे डोळे रोखत विचारलं. त्याला फक्त बघून मी इतकी इमोशनल होईन असं वाटलं नव्हतं. पण त्याच्या समोर बसून, त्या सगळ्या जुन्या फीलिंग्ज परत आल्या.

समर सावंत माझं पहिलं प्रेम होता आणि शेवटचंही. एनीवे, लव्ह इज ओव्हररेटेड!

माझं आयुष्य मस्त सुरू आहे. चांगलं करिअर, अर्थात त्यासाठी मी तेवढीच मेहनत घेतली आहे. माझ्यावर प्रेम करणारी माझी फॅमिली, पप्पा, तीन बहिणी आणि प्रेम न करणारी आजी.

मी आतापर्यंत दिल्लीत आणि मुंबईत बऱ्याच हँडसम बंद्यांना डेट केलं पण सिरियस व्हायच्या आत सोडूनही दिलं. इट वर्क्स फॉर मी.

"कारण तू मला ह्या सगळ्याच्या आधीपासून ओळखतेस. चौथीत असताना आपण बारक्या निळ्या चड्ड्या घालून, शाहू स्टेडियमवर पाटील सरांच्या क्लासमध्ये फुटबॉल खेळायचो, तेव्हापासून!"

"न्यू मॉडेल विरुध्द पद्माराजे." मी बोटाने डोळ्यातलं पाणी निपटत म्हणाले.

"हम्म. बिफोर आय बिकेम धिस मॅन विथ शिटलोड ऑफ रिस्पॉन्सीबीलीटी. मला वाटलं तू एकदा माझे तुकडे केले आहेस तर तूच ते गोळा करू शकतेस." तो हाताची घडी घालून खुर्चीत मागे टेकला आणि माझ्या गालावर पाण्याचा एक थेंब ओघळलाच.

हे ऐकायला लागू नये म्हणूनच मी त्याला इतकी वर्ष टाळत होते. कारण खरं सांगायचं तर मी आमच्या दोघांचेही तुकडे केले होते. आणि आम्ही दोघेही त्यातून सावरलो. आता मला फक्त पुन्हा त्याच्या जवळ असण्यातून स्वतःला सावरायचं होतं.

"नॉट फेअर!" मी उगीच पोनिटेल घट्ट करत जरा ताळ्यावर येत म्हणाले.

"लाईफ इज नॉट फेअर!"

"काहीही. तू टीमचा कॅप्टन होतास, वर्षाला तुला इतक्या कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आहे. इतके सगळे ब्रँड्स एंडॉर्स करतोस, एवढ्या फेमस आणि सुंदर बायका तुझ्यापुढे गोंडा घोळत असतात. मस्त चाललंय की तुझं."

एक भुवई वर करून तो पुढे झुकला. "चांगला डोळा ठेवलाईस की माझ्यावर!"

"कायपण! लई शायनिंग करू नको. तुझ्यापासून लपणं अवघड आहे. एकतर तुझा चेहरा सगळीकडे असतो, छापील नाहीतर डिजिटल आणि प्रायव्हेट लाईफ काय तुमचं पब्लिकच असतं." मी चेहरा गंभीर ठेवायचा प्रयत्न करत म्हणाले.

"मी क्रिकेट प्लेयर आहे, शारुख नाही. माझं प्रायव्हेट लाईफ हवं असेल तर शोधावं लागतं." त्याच्या ओठांचा कोपरा वर उचलला गेला आणि मी नजर वळवली. "तू मला इतकी वर्ष अव्हॉइड करत होतीस, म्हणून मी समजलो की तुला माझ्या पर्सनल लाईफशी काही देणंघेणं नसेल."

"मी तुला अजिबात अव्हॉइड करत नव्हते." मी ठोकून दिलं.

"तर तर! काय वडिंग्यासनं आलेला वाटलो काय! तुला खरंच मला मदत करायची आहे ना?" त्याने दोन्ही हात टेबलवर ठेवले.

"ऑफ कोर्स."

"मग खरं सांग. तू मला सोडून गेलीस आणि नंतर इतकी वर्ष तू मला टाळत होतीस. हे तरी कबूल?"

मी मान हलवली. "बरं. मी तुला टाळत होते. मान्य. पण मी अजून काही सांगण्यापूर्वी तू मला तुझ्या डोक्यात सध्या काय सुरू आहे, तू कश्यामुळे त्रासला आहेस ते सगळं सांगणार आहेस. डील?" मी त्याच्या डोळ्यात बघत विचारलं.

"डील!" त्याने हात पुढे केला. मी हात मिळवल्यावर तो उठून उभा राहिला. "दुखलं?" माझ्या तोंडाकडे बघून त्याने विचारलं.

"अम्म, हो, जरासं." लहानपणी तो असाच करायचा.

तो मोठ्याने हसला. "आजच्यासाठी एवढं बास. सी यू टुमॉरो. तुझा नंबर शाळेच्या ग्रुपमध्ये आहे तोच आहे ना?"

"आमच्या शाळेचा ग्रुप तुला काय माहीत?" मी वर त्याच्याकडे बघितलं. त्याने खांदे उडवले.

"तोच आहे." मी ओठ सरळ ठेवत म्हणाले. त्याला नंबर माहीत होता पण त्याने इतक्या वर्षात कधी काँटॅक्ट केला नव्हता.

"उद्या किती वाजता भेटायचं ते मी टेक्स्ट करतो. तुला पिक करेन." आणि तो सरळ दाराबाहेर गेला.

हे सोपं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.

पण मला वाटलं होतं की निदान माझं हृदय मी अखंड ठेवू शकेन.

पण ह्या क्षणी मला त्याबद्दल शंकाच आहे.

कारण समरने अजूनही माझ्या हृदयाचे बरेचसे तुकडे धरून ठेवले आहेत.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ३

समर

पलोमाला घेऊन मी पहाटे शार्प साडेपाच वाजता सरनोबतवाडी ग्राऊंडवर पोचलो. रोज सकाळी नऊ वाजेपर्यंत हे ग्राउंड मला प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी दिले आहे. इथल्या सिक्युरिटीमुळे कोणालाही माझ्याबद्दल पत्ता लागू दिला नाहीय, नाहीतर पोरं जाम गर्दी करतील. कुठेही मोकळेपणाने हिंडता, खेळता येत नाही हा सेलिब्रिटी होण्याचा तोटाय राव! तिला दिलेलं घर माझ्या मागच्याच गल्लीत आहे त्यामुळे पटकन पिक करून निघता आलं.

बऱ्याच वर्षांनी असं रिलॅक्स रहायला कोल्हापुरात येऊन एकदम झकास वाटतंय. इथली ताजी करकरीत हवा, पावसाळा संपत आल्यावरचा ओलसर मातीचा वास, आजूबाजूला पसरलेली हिरवाई. उगवतीला तांबडं फुटून डोंगरावर पसरणारे लाल केशरी रंग. ह्या टेंपररी घराच्या खिडक्यातून दूरवर राजाराम तलावाचे पाणीसुद्धा चमकताना दिसते. सध्या आई-पप्पा ताराबाई पार्कातल्या घरी आहेत. नाहीतर ते इथे आणि मी मुंबईत असेन तेव्हा माझ्या घरी येऊन जाऊन असतात.

ऑफ सीझनमध्ये मी इथे एकटा राहून स्वत:वर मेंटल, फिजिकल काम करण्याची आयडिया घोरपडेनी जेव्हा काढली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मी मदत घेऊ शकतो अशी एकच व्यक्ती होती. जी मला इतर कोणाहीपेक्षा जास्त आतून बाहेरून ओळखते. हा खरं डोक्यावर पडल्यासारखा विचार होता! आम्ही कितीतरी वर्षात भेटलो नाही, बोललो नाही तरी मला नीट समजू शकेल अशी पलोमाच वाटते. तसं मला बाकी कोणाच्याच बरोबर वाटलं नाही. जेव्हा ती मला सोडून पळून गेली होती तेव्हा सुरवातीला अगदी मी मरतो का काय अशी माझ्या मनाची अवस्था होती. पण तेव्हाच मला रणजी टीममध्ये घेतलं होतं आणि त्याची हाडंतोड, जबरी प्रॅक्टिस सुरू झाली. रागात मी गेमवर फोकस केला आणि खरंच चांगला खेळलो. मग पहिल्या वर्षाचे काँट्रॅक्ट साईन झाले आणि मी मोकळ्या वेळात स्वत:ला क्लबिंग, पार्ट्या, दारू, मुली यात बुडवून बधीर ठेवले. ऑफ कोर्स, हे काही महान काम नाहीय पण मी त्या वेळच्या मानसिक गुंत्यातून ह्या गोष्टींमुळे तरून गेलो.

शेवटी या सगळ्यातून बाहेर येऊन जरा शरीरावर मेहनत घेतली आणि फायनल मध्ये शेवटचा बिग शॉट सिक्सर मारुन क्राउड फेवरीट झालो. तेव्हा जे फास्ट लाईफचं चक्र सुरू झालं ते आता दहा वर्षांनी थोडं मंदावलंय. वर्कआऊट, प्रॅक्टिस, मॅच, विन, सेलिब्रेट हे सुरूच होतं. एकही सेकंद रिकामा नव्हता. झोपायला पाठ टेकल्यावरसुद्धा डोक्यात मॅच रेकॉर्डसची गणितं सुरू असायची. नुसतं पळत रहा.

इतक्या वर्षात मी बऱ्यापैकी डेटिंग केलं. पण मी प्लेअर नाही, बऱ्यापैकी रिलेशनशिपवाला माणूस आहे. दोन चार सिरीयस गर्लफ्रेंडस झाल्या पण त्या वर्ष दोन वर्षाहून टिकल्या नाहीत. माझं बिझी शेड्यूल आणि सारखे प्रवास हे रिलेशनशिपसाठी कठीण असतातच पण मी अगदी खरं कारण मान्य करतो. बहुतेकश्या रिलेशनशिप संपल्या कारण मी प्रत्येकीची तुलना पलोमाशी करत होतो आणि कोणीच तिच्या हाईपला पुरून उरली नाही. मेबी माझ्या डोक्यानेच तिची अशी मोठी प्रतिमा बनवून ठेवली असेल, आम्ही एकत्र असतानाचा काळ कसला भारी होता असं उगीच वाढवून डोक्यात राहिलं असेल.

असो, योग्य वेळी कोणीतरी येईल आणि माझा टांगा पलटी होईल तेव्हा मला कळेलच! पण सध्या मला हे समजायला हवंय की हल्ली पीचवर जाऊन नेहमीप्रमाणे मजा येण्याऐवजी कुणीतरी लादून दिलेलं काम केल्यासारखे का वाटत आहे. प्रत्येक मॅचमध्ये मी मॅच संपायची वाट का बघतो आणि त्या शिटी कोचला बघावासा पण का वाटत नाही. मागचे काही महिने माझं लाईफ म्हणजे नरक झालाय.

सगळ्यांच्या न संपणाऱ्या अपेक्षा.

आता ह्या सगळ्याच अपेक्षांचं मला ओझं झालंय.

म्हणूनच जेव्हा पलो जॉब शोधत असल्याचं माझ्या कानावर आलं तेव्हा लगेच मी कोचबरोबर डिस्कस केलं. त्या माणसाला मी फक्त बैलासारखा झापड बांधून खेळत रहायला हवंय, स्पेशली मी एकदोन वेळा अर्ली रिटायरमेंटबद्दल बोललो तेव्हापासून. त्यासाठी तो काहीही करू शकतो, फक्त रिझल्ट मिळायला हवा. सो फायनली, मी मुंबईतून निघून हे सगळं जिथे सुरू झालं त्या ठिकाणी परत आलो.
कोल्हापूर!
माझं गाव, पलोमाचंही गाव.

अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही ग्राऊंडवर पोचलो त्यामुळे गाडीत विशेष बोलणं झालं नाही. आम्हाला पार्किंगमध्येच वेंडी भेटला. वेंडीने ग्राउंडशेजारी एका मोठ्या हॉल मध्येच सगळं जिम इक्विपमेंट सेट करून घेतलं होतं. आधी ग्राऊंडवर जाऊन मोकळ्या हवेत रोजच्या ड्रिलला सुरुवात झाली. वॉर्म अप झाल्यावर काफ रेजेस, हॅमस्ट्रिंग किक्स, लंजेस, स्क्वॉट्स  आणि वेगवेगळे स्ट्रेचेस असं ओळीने वीस वीसचे सेट करून झाल्यावर आम्ही जिमकडे मोर्चा वळवला.

कार्डिओचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. मी ओपनिंग बॅटसमन असल्यामुळे मला प्रचंड वर्कआऊट गरजेचा होता, त्याशिवाय तुम्ही इतके तास फिल्डवर टिकूच शकत नाही. त्यामुळे रोजचा कार्डिओ माझ्या हातचा मळ होता. वेण्डी माझ्याकडून रूटीन करून घेताना पलोमा निरीक्षण करत होती. तिचे लांब रेशमी केस आज उंच पोनीटेलमध्ये बांधले होते. ग्रे जिम लेगिंग्ज आणि निटेड पांढरा टॉप घातला होता. पायात लाल निळे गोंडे लावलेल्या कोल्हापुरी चपला होत्या. ती कोपऱ्यातल्या प्लास्टिक चेअरवर बसून मध्येच आयपॅडवर काहीतरी लिहीत होती. लूकींग सेक्सी ॲज हेल! मी जबरदस्तीने तिच्यावरून नजर हटवली. पुशअप साठी खाली बघताच तिच्या नितळ पावलांची बेबी पिंक नेलपेंट लावलेली नखं समोर आली. माझ्या कपाळावरून घाम ओघळत होता. पुढच्या बर्पीच्या वेळी पुन्हा वर पाहिलं तर ती माझ्याकडे लक्ष देऊन पहात होती. जणूकाही तिला माझ्या फोकस आणि वर्क एथिकबद्दल आश्चर्य वाटतंय.

मी या सगळ्या रूटीनमुळे उबलोय, डिप्रेस झालोय आणि कंटाळून स्वत:च्या शरीरावर मेहनत घेणे सोडून देईन असं काहीसं तिला वाटत असावं. हम्म.. आम्हाला अजून बरंच काही खणून काढायचं आहे. तेवढ्यात तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि तिचे घट्ट काकवीच्या रंगाचे डोळे माझ्यात अडकून राहिले. एव्हाना उगवतीची किरणं गोळा होऊन खिडकीतून सरळ तिच्या तोंडावर आली होती आणि तिचे डोळे त्या सोनेरी रंगात वितळत होते. च्यायला, हे डोळे म्हणजे गुऱ्हाळ आहेत गुऱ्हाळ. हॉट आणि तेवढेच गोड! यिऊन फिरून गंगावेश!! परत एकदा जुने दिवस आठवून काळजात कळ आली.

तिने पुन्हा काहीतरी टाईप केलं. मला काही फरक पडत नाही कारण हे माझं पब्लिक लाईफ आहे. मी टॉप ऑफ द गेम रहायला काय मेहनत करतो ते जगाला सांगायचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता.

बर्पीज संपल्यावर वेंडिने पुढे येत मला फिस्ट पंच दिला. "गुड जॉब ब्रो! आय स्वेअर, तुम्हारे जितना स्ट्रिक्ट वर्कआऊट हमारी आधी टीमने भी किया ना, तो नो वन कॅन बीट अस इन कमिंग ऑस्ट्रेलियन सिरीज."

हेच. कायम कुठेतरी पोहचायचे आहे. हा गोल, तो गोल. बीन देर, डन दॅट. स्टिल, इट वॉजंट इनफ.

नेव्हर वॉज.

वेंडीने पुढे केलेली बॉटल घेतली आणि दोन घोट पाणी पिऊन, खिडकीबाहेर डोकं काढून उरलेलं पाणी डोक्यावर ओतलं.

"बॅक टू स्क्वेअर वन येऊन मजा येतेय!" मी पलोकडे बघून डोळा मारत म्हणालो. 

"हम्म.. अपने हायफाय एसी जिमसे अलग.." वेंडी जरा तोंड पाडून नंतर हसला. वेंडी माझ्याबरोबर पाच वर्ष तरी होता. एकदम लॉयल माणूस. नशिबाने घोरपडेनी त्याला इथे पाठवायला परमिशन दिली. वेंडीला घोरपडे आणि त्याचं एकूण वागणं अजिबात आवडत नाही. ही गोष्ट आमच्यात अगदी कॉमन आहे. त्यामुळेच मी टीममध्ये असेपर्यंत तो आम्हाला सोडून जाणार नाही याची खात्री आहे.

"आपण एखाद्या चांगल्या जिमचा स्लॉट तुझ्यासाठी घेऊ शकतो. ते लोक तर वेडे होऊन देतील तुला." पलोमा म्हणाली. वेंडी हो म्हणणारच होता की मी लगेच त्याला थांबवत ओरडलोच. "प्लीज.. मला स्वतःचा तमाशा करून घ्यायचा नाही. ते नको म्हणूनच मी इथे आलो, लोकांच्या नजरेत न येता स्वतःवर काम करायला. प्रेसवाल्यांना जराशी खबर मिळाली तरी ते येऊन गोंधळ घालतील. हल्ली ते पॅप्सतर जागोजागी घुसतात, कोणीही उठून फोन वर करून सsssर सssर करत शूट करतो. मला माझ्या मुळांपर्यंत जायचंय, भले त्यासाठी उन्हात घाम गाळावा लागला तरी चालेल."

वेंडीने थोडं शरमून मान हलवली. मी त्याला हे सगळं आधीही सांगितलं होतं. पण पलोमा माझ्याकडे बघता बघता माझ्या मनाचा एकेक थर सोलून काढायच्या तयारीत दिसत होती.

गुड लक विथ दॅट!

माझ्यावर आता गेल्या दहा बारा वर्षांचे थर चढलेत. काय काय स्वच्छ करणार...

"राईट! आखीर वर्कआऊट तूमको करना है. लेट्स स्टिक टू द प्लॅन." वेंडीने माझ्या पाठीवर थाप मारली. मी टेबलावरच्या किल्ल्या उचलल्या. "निघूया?" मी तिच्याकडे पाहिलं. ती मान हलवून माझ्यामागे पार्किंगमध्ये आली.

रस्त्यात दोघेही शांत होतो. दहा मिनिटात घर आलंच. "आज सेशन इथे करणार आहोत?" गेट उघडून गाडी आत घेत असताना तिने विचारलं.

"आय नीड अ शॉवर! तुझ्या घरापेक्षा इथे आंघोळ केलेली बरी ना?" मी दार उघडुन उतरताना म्हणालो. तिचे डोळे मोठे झाले. "रिलॅक्स! दहा मिनिट लागतील. मग आपण सेशन सुरू करू." मी तिला घराचा दरवाजा उघडून दिला. ती आत शिरली, तिच्या मागोमाग आत जाताना तिची परफेक्टली मेंटेन्ड बांधेसूद फिगर आपोआप दिसलीच. मनोमन स्वतःला झापून मी आत गेलो. पलोमाला विसरणे टेस्ट मॅच खेळण्यापेक्षाही कठीण होते. जे मी कष्टाने मिळवले होते. आता मी धडा शिकलोय. पुन्हा हार्टब्रेकचा राऊंड टू व्हायला नकोय.

"वॉव! नाइस प्लेस! इंटिरिअर किती छान आहे.." ती आजूबाजूला बघत म्हणाली.

"हम्म, मी दोन महिन्यासाठी घेतलंय हे घर."

"काय? मला तीन महिन्यांसाठी दिलंय.." ती डोळे बारीक करून बघत होती.

मी फक्त मान डोलावली. मी घोरपडेना तिचं तीन महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट सांगितलं होतं कारण जर आमचं हे काम वर्कआऊट नाही झालं (जे बहुतेक होणार नाहीच) तर तिला नवीन जॉब मिळेपर्यंत सिक्युरिटी राहील. टीमला फुल टाईम सायकॉलॉजीस्ट नको आहे. मला माहिती आहे पण त्यांनी तिला हे नक्कीच सांगितलं नसेल. त्यांना मला फिक्स करणारं कोणीतरी हवं होतं, बस. तेवढं झालं की फिनिश.

घोरपडे फक्त त्याच्या कामापुरते बघतो. त्याला हवं ते मिळालं, त्याचा फायदा संपला की त्या व्यक्तीला तोडून टाकणार. असाच मला टीममधून काढायची मजा त्याला मिळू न देता आधीच मला बाहेर पडायचं आहे. "त्यांनी बहुतेक तुझा होकार मिळवायला एवढे पर्क्स ऑफर केले असतील. काही करून त्यांना हे डील करायचं होतं. पण मला ऑक्टोबर एंडला ट्रेनिंगसाठी जावं लागेल. बरोबर दोन महिने आहेत."

तिने मान हलवली. कदाचित तिने फुल टाईम जॉब मिळेल असं गणित केलं असणार. अगदी मिळाला तरीही तिला कोल्हापूर सोडावंच लागेल.

"मला आश्चर्यच वाटलं होतं रहायला बंगला आणि बाकी सगळे पर्क्स बघून. एनी वे, जाईला आवडलं घर आणि जुई पण मध्येच येते म्हणाली अभ्यासाला. जुई डेंटिस्ट होईल आता आणि जाईचं थिएटरमध्ये काहीतरी लुडबुड काम सुरू आहे. तुला भेटतील त्या अधेमधे."

मी मोकळेपणाने हसलो. ह्या फुलसुंदर मुली एकेकाळी माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्ती होत्या. मोठी कार्तिकी मग पलोमा आणि ह्या बारक्या जाई - जुई. अर्थात दोन नंबरची बहीण ह्या लिस्टमध्ये टॉप ला होती. पण ती कश्ती डूबून जमाना झाला. अर्थात मला अजूनही तिची आणि तिच्या फॅमिलीची काळजी आहेच. "आजीच्या शिस्तीतसुद्धा थिएटर? भारी मॅनेज करते जाई! दिदीची बेकरी काय म्हणतेय?

"आता कोणी कोणावर डोळा ठेवलाय?" तिची एक भुवई वर झाली आणि ती हातात आयपॅड घट्ट धरून खाली भल्यामोठ्या सोफ्यावर बसली.

"मी नाही ठेवला कधी म्हणालो? मी इथे येऊन कुणाला टाळत नव्हतो. मी काही कुणाला माझ्यापासून तोडलं नाही. ते तू करतेस, पलो.." वळून आंघोळीला जाण्यापूर्वी मी म्हणालो. तिचा रंग उडालेला चेहरा बघून छातीत कालवाकालव झालीच. तिने मला का दूर केलं ते मी ओळखून होतो. तेव्हाही आणि आत्ताही. पण तरी मी तिला चार गोष्टी ऐकवणारच होतो. ती माझी फक्त गर्लफ्रेंड नव्हती तर इतक्या वर्षांची बेस्ट फ्रेंड होती.

ती माझ्यापासुन लांब जाणं हे शरीराचा एखादा अवयव कापून टाकण्यासारखं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ४

शॉवर सुरू करून मी नेहमीचा ब्लॅक रिझर्व्ह बॉडी वॉश उचलला. त्यातला वेलचीचा सटल सुगंध मला नेहमी आईच्या किचनमध्ये उकळणाऱ्या चहापासून खपली गव्हाच्या गोड हुग्गीपर्यंत घेऊन जायचा. पण आज अंगावर त्याचा फेस होऊन पाण्यात विरून जाताना, तो वास जाणवलाही नाही. पलोमाची जखम खोलवर झाली होती आणि इतक्या वर्षांनी तिला जवळ बघून त्या भरलेल्या जखमेची खूण पुन्हा हळवी होत होती. मी थंडगार पाणी जोरात डोक्यावर आदळू दिलं आणि त्या टोचणाऱ्या थेंबांच्या माऱ्यात खालमानेने उभा राहिलो. डोळ्यासमोरून पलोमा बरोबर घालवलेले सगळे क्षण फेर धरून जात होते. ऑफकोर्स, मी वीक झालोय. सगळं काय चाललंय कळत नाही. माझं करियर कुठे जातंय समजत नाहीय. सगळं भविष्य टांगणीला लागलंय आणि भूतकाळ भुतासारखा डोक्यावर येऊन बसलाय. ज्याचा कधी त्रास होईल असं वाटलं नव्हतं, मला वाटत होतं मी ते सगळं मागे टाकून आलोय ते सगळं डाचतंय.

पलोमासुध्दा खूप कठीण काळातून गेली होती. आम्ही बारावीत असताना खूप वर्षांच्या आजारपणानंतर तिची आई वारली. त्यानंतर ती हळूहळू माझ्यापासून लांब जाऊ लागली. मी अभ्यास आणि क्रिकेटमध्ये बिझी होतो. फर्स्ट यर सुरू होतानाच माझं टीम सिलेक्शन झालं. त्याच काळात तिला दिल्ली युनिव्हर्सिटीत सायकॉलॉजीसाठी एडमिशन मिळाली. कुठलीतरी स्कॉलरशिप पण मिळाली होती ज्यातून शिक्षणाचा सगळा खर्च मिळत होता. ती दिल्लीला गेली आणि मला लाँग डिस्टन्स रिलेशनशिप शक्य नाही सांगून बाजूला केलं. आमच्यात जो काही प्रेमाचा बंध होता त्याने कितीही डिस्टन्स सहन केलं असतं. अंतराचा प्रश्नच नव्हता पण दुःख? ती वेगळी गोष्ट होती. आई गेल्यापासून तिचं गप्प होत जाणं, सगळ्यांपासून लांब जाणं मी अनुभवत होतो. ती त्या दुःखाला आउटलेट देत नव्हती आणि नंतर तर निघूनच गेली. मी बरेच महिने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला पण ती मूव्ह ऑन झाली होती. शेवटी मी नाद सोडून दिला.

मी टॉवेलने डोकं पुसत बेडरूममध्ये आलो. शॉर्ट्स आणि एक टीशर्ट चढवला. फार काही केलं नाही कारण काही तासात पुन्हा वर्कआऊट करायचा होता. संध्याकाळी मी मोस्टली सोलो करतो. पळायला जातो नाहीतर आता आठवड्यातले काही दिवस तलावावर पोहायला जाता येईल. लहानपणापासून आम्ही दोघे कायमच जायचो, पुन्हा ते करून मजा येईल. दार उघडून बाहेर आलो आणि एकदम पोह्यांचा खमंग वास नाकात शिरला. पलोमा ओपन किचनमधल्या गॅसजवळ उभी राहून ढवळत होती. परत जुन्या आठवणी वर आल्या. आई आजारी असल्यामुळे ती आणि दीदी कायमच काही ना काही स्वयंपाक करत असायच्या. रोजच्या प्रॅक्टीसने दोघीही चांगल्याच सुगरण झाल्या होत्या.

"काय चाललंय?" मी तिच्याकडे जात म्हणालो.

"कांदेपोहे. मला बाकी काही सापडलं नाही." ती माझ्याकडे मान वळवून हसली. "पोटात कावळे कोकलायलेत ना? इतका वर्कआऊट इज नो जोक! तोपण दिवसातून दोन वेळा!"

मी भल्यामोठ्या डायनिंग टेबलाची खुर्ची ओढून बसलो. "माझ्या डाएट फूडचे डबे रोज बाहेरून येतात. त्यामुळे घरात फार काही सामान नाही."

"ओह! मग पोहे चालतील ना तुला?"

"पळतील! तसंही मध्येच चीट करून चालतंय की. आण इकडं." तिच्या हातातली प्लेट घेऊन मी टेबलावर ठेवली. त्या वासानेच भूक खवळली होती. तिच्या प्लेटमध्ये माझ्या अर्ध्याहून कमी पोहे होते. "एवढेच? घे अजून.." मी डाव कढईत घालणार तोच तिने हात धरून थांबवलं. "मी एवढाच पोर्शन खाते. माझा पण डाएट आहे!" आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो.

"संध्याकाळी वर्कआऊट म्हणजे मी फक्त रनिंग करतो. तेही घरात, ट्रेडमिलवर. पण इथं आता इतकी मस्त हवा आहे तर बाहेर पळायचा विचार आहे. पाच सहा किमी तरी बाहेर पळायला पाहिजे. हे, तू अजून पळतेस का? एकत्र पळायला जाऊ. म्हणजे मला धापा टाकताना बघून तुला जास्त इझीली सायको - ॲनालाईज करायला येईल!" मी पोहे भरलेला चमचा तोंडात खुपसत म्हणालो.

ती ओठ दाबून हसली. "तुला कोणी सायको - ॲनालाईज करत नाहीये, समर. पण, हो. मी अजूनही रनिंग करते आणि तुला कंपनी द्यायला आवडेल. माझ्या स्पीडशी मॅच करू शकलास तss र!"

मी मान हलवली. आमच्यात कायम कॉम्पिटिशन असायची. ती माझ्याहून हाईटने थोडी कमी असली तरी एकदम बॅडॲस रनर होती. कायमच. "कूल! आता मला सांग, मला फिक्स करायचा तुझा काय प्लॅन आहे. माझ्या मते तू तुझ्या कामात परफेक्ट असणार कारण तू कुठलीही गोष्ट जीव ओतून करतेस."

"टेकस् वन टू नो वन!" तिने अजून एक घास घेतला. "ऐक, तुला 'फिक्स' करायची गरज नाहीय. मी त्यासाठी इथे आले नाहीये. तू तुझ्या पूर्ण पोटेन्शियलपर्यंत पोचावं म्हणून तुला मदत करायला आले आहे. जे तू याआधी खूपदा पोचला होतास. घोरपडे म्हणतात तू सध्या जरा स्लंपमध्ये गेला आहेस. आणि आम्ही प्रयत्न करून तुला पुन्हा बरोबर मार्ग दाखवणार आहोत."

"स्लंप? असं नाव ठरवलं का याला?" मी जरा रागात म्हणालो.

"असं घोरपडे म्हणतात. मी अजून म्हटलं नाहीये." तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

"तुला काय वाटतं? काय होतंय मला?" तोंडात बकाणा भरलेले खूप दिवसातले चविष्ट पोहे संपवत मी विचारलं.

"ओके. लेट्स रिव्ह्यू! तू मागच्या सीझनमध्ये चार सेंच्युरीज केल्या. टीम सेमी फायनलपर्यंत गेली. पण बऱ्याच मॅचेसमध्ये तू पन्नासच्या आत आउट झालास. न्युझीलंड दौऱ्यात तुम्ही दोन मॅच जिंकलात पण सीरीज हरलात. तेव्हाही तुझी कामगिरी फार चमकदार नव्हती. आपण जुने स्टॅट्स बघितले तर दर सीझनमध्ये तुझा गेम इम्प्रूव्ह होत गेलेला दिसतो. मागचा सिझन सोडता. कोचच्या मते तुझा गेम थोडा ऑफ झालाय पण सुधारू शकतो. पण मला हा काही स्लंप वगैरे वाटत नाही." तिने काळजीपूर्वक उत्तर दिले.

मला थोडं हसू आलं. ऑफ कोर्स, तिने होमवर्क केलाय. "मग तुझा डायग्नॉसीस काय आहे?"

"ते जे म्हणतायत की तुझा गेम थोडा ऑफ आहे त्यावर सगळं डिपेंड आहे."

"हम्म... मी मागच्या सीझनमध्ये पारच माती खाल्ली. घोरपडेना हे बघायची सवय नाही. पण मला त्याची शिट्टी उडालेली बघून लय बरं वाटलं! तो माणूस पक्का वायझेड आहे. त्याच्यासाठी खेळायचे असेल तर मी न खेळणं पसंत करेन."

"सो, कोचला शिक्षा म्हणून तू मुद्दाम वाईट खेळलास?"

"नाही, नाही. असं काही मी करणारच नाही. फक्त त्याची होपलेस रिॲक्शन बघून मला मजा आली."

"तू इंज्युअर्ड होतास?" तिने चमचा प्लेटमध्ये ठेवला.

"हा तर! इंज्युअर्ड मी कायमच असतो. माझ्या हातात रॉड आहे, पाठीची एक सर्जरी झालीय, बाकी बारीकसारीक जखमा होतच असतात. दरवेळी वेगळ्या कुठेतरी. पण ह्यातलं काहीच मला फिजिकली थांबवू शकलं नाही. सो, तुम्हाला काय वाटतं डॉ. फुलसुंदर?" मी भुवई उंचावून किंचित हसलो.

"मला तरी थोडा डोक्याचा प्रॉब्लेम वाटतोय!"

मी डोळे फिरवले. पण तिचं बरोबर आहे. प्रॉब्लेम माझ्या डोक्यातच आहे, पण तो फिक्स होण्यातला वाटत नाही.

पलोमा

समरच्या मते मागच्या काही मॅचेसमधला त्याचा परफॉर्मन्स इतका विचार करण्यासारखा नाही. पण त्याची टीम आयपीएल जिंकेल असा होरा असताना ते हरले आणि पराभवाची सगळी जबाबदारी कॅप्टन म्हणून त्याच्यावरच आली. असं का झालं तेच शोधायला मी आले आहे. त्या सगळ्या मॅचेस मी खूपदा रिवाइंड करून करून बघितल्या. त्याच्या गेममध्ये खरंच नेहमीचा स्पार्क नव्हता. ते त्याच्या दुखावलेल्या डोळ्यात दिसत होतं. फील्डवरच्या त्याच्या चालण्यात दिसत होतं.

"मला सांग, त्या मॅचेस खेळताना तुझ्या डोक्यात काय विचार होते?"

त्याने पोहे संपवून चमचा प्लेटमध्ये ठेवला आणि हाताची घडी घालून खुर्चीत मागे टेकला. हिला कितपत सांगू शकतो असा विचार करत तो माझं निरीक्षण करत होता.

"आम्ही खूप मॅचेस खेळतो, पलो. प्रत्येकवेळी फॉर्म नाही टिकू शकत."

"हेंनतेन करू नको. इतक्या वर्षात तू जेवढ्या मॅच खेळलास त्यात तुझा फॉर्म एकदम चांगला ठेवला होतास की."

"खरं? की लोकांच्या अपेक्षा बदलल्या?" तो हाताची घडी तशीच ठेऊन म्हणाला.

"म्हणजे?" मी पुन्हा पाणी प्यायले.

"म्हणजे मी आधीपण वाईट खेळलोय, आधीही कधीतरी माझा फॉर्म खराब झालाय पण तेव्हाच काय अगदी आता-आता पर्यंत या गोष्टी माफ केल्या जायच्या. मी करिअरमध्ये जितका पुढे जातो तेवढ्या अपेक्षा अजून वाढतात. खरं सांगतो, मला ते मान्य आहे. माझ्यावर प्रचंड पैसा लावला जातो मी त्या खेळावर प्रेम करावं, खेळत रहावं म्हणून."

"आता खेळावर प्रेम उरलं नाही का?" मी विचारलं. मी लहानपणापासून त्याला खेळताना बघत होते. कॉलेजमध्ये गेल्यावर तो नुसत्या बेस्ट फ्रेंडवरून माझा बॉयफ्रेंड कधी झाला ते कळलंही नाही. तेव्हा मी त्याच्या प्रत्येक मॅचला हजर असायचे. त्याला सोडून दिल्लीला गेले आणि त्याचं सिलेक्शन झालं. त्यानंतर त्याला फिल्डवर खेळताना, चमकताना बघून मी थोडी जेलससुद्धा व्हायचे. त्याचं खेळावर किती प्रेम आहे हे कोणीच मिस करू शकायचं नाही. ही वॉज टोटली डिवोटेड टू द गेम.

"आय डोन्ट नो, पलो." त्याने श्वास सोडून चेहऱ्यावरून हात फिरवला. "माझी सुरुवात झाली तेव्हाच मला मॅन ऑफ द सीरिज मिळाला होता. तीन सेंच्युरी मारल्या होत्या मी. लोक हुकले होते एकदम. या वर्षी मी चार मारल्या, पण त्या पुरेश्या नाहीत. टीममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त नवे लोक आहेत कारण जसा कुणाचा फॉर्म कमी होईल कोच त्याला टीममधून काढून टाकतो, जरी ते त्याच्यासाठी वर्षानुवर्ष चांगले खेळत आलेत. आत्ताच्या टीममध्ये मी सगळ्यात सिनियर आहे, वय एकतीस वर्ष! पण तरीही हे इनफ नाहीये. तुम्ही रन काढताना समोरचा पुरेसा पळाला नाही, तर तुम्ही आउट. सिक्स जाण्यासारखा बॉल टोलवला आणि कोणीतरी कॅच घेतला, आउट. हे आधीही व्हायचं पण आता तेवढी ग्रेस मिळत नाही. मीनिंग आयाम इन अ स्लंप." त्याने दोन्ही हात टेबलावर आपटले.

त्याच्या शब्दांनी माझ्या छातीत कुठेतरी दुखलं. रोजच्या रोज तो किती दडपणाखाली असतो या विचाराने. प्रोफेशनल ॲथलिट म्हटल्यावर हे होणारच. हायेस्ट पेड क्रिकेटर म्हणजे तर अजूनच जास्त प्रेशर. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा तुम्हाला कधी त्रास होणार नाही.

"तू स्लंपमध्ये आहेस असं तुला नाही वाटत?" मी टेबलावर ठेवलेल्या त्याच्या हाताजवळ हात नेऊन करंगळीने हलकेच स्पर्श केला.

"म्हाइत नाई. मी जाम थकलोय, पलो. कोचची अपेक्षा होती मी टीम फायनलला तरी सहज घेऊन जाईन. पण आमच्याकडे अनुभवी प्लेअर्स नव्हते. सगळे महत्त्वाचे लोक काढून नवे भरून ठेवले. त्यांच्यात तितकं को-ऑर्डीनेशनच झालं नव्हतं. मी जे काय करू शकतो ते सगळं केलं. मेबी माझं वय वाढतय, आता पूर्वीचा मी राहिलो नाही. आय फ** डोन्ट नो!" त्याने त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि तेवढ्यात जोरात वाजलेल्या डोअर बेलने दोघेही दचकलो.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ५

समर उठून दरवाजा उघडायला गेला आणि लगेच ओळखीचे चित्कार माझ्या कानावर आले. उठून पुढे जाऊन पाहिलं तर माझी लहान बहीण समरला मिठी मारुन समरभैयाss म्हणून ओरडत होती. मला माहित होतं, ही काय घरी थांबून वाट बघण्यातली नाही. आमची जाई म्हणजे अगदी बडबडी, वांड कॅटेगरी आणि तिच्या उलट जुई! गोड, शांत, जेवढ्यास तेवढी बोलणार आणि बाकी वेळ पुस्तकात डोकं खुपसून बसणार.

"मी तुला सांगितलं होतं ना, रविवारी तुम्हाला भेटायला त्याला घरी घेऊन येते म्हणून.." ती त्याला सोडून माझ्याजवळ आल्यावर मी रागाने खुसफुसत म्हणाले. समर कायम माझ्या फॅमिलीशी क्लोज होता. आम्ही कायम एकमेकांच्या घरी पडीक असायचो. आम्ही एकत्र असताना जाईजुई जेमतेम पाचवीत वगैरे होत्या, त्यांना खेळायला जाम हवा असायचा समरभैया! तोही त्यांचे वाटेल ते लाड, म्हणजे उन्हाळ्यात रोज बाहेर घंटी वाजली की उन्हातून पळत जाऊन फेमिलावाल्याकडून कुल्फी आणणे, त्यांना भवानी मंडपात, रंकाळ्यावर फिरायला नेणे, मधेच राजाभाऊची भेळ आणून देणे वगैरे करायचा. आई शेवटच्या महिन्यांत कॅन्सरशी लढत असताना तो सतत माझ्याबरोबर होता. माझा एकमेव सपोर्ट होता. लहानपणापासून सगळ्या बहिणीत मी आईला जास्त चिकटलेली असायचे. बाकी सगळ्यांची नावं पप्पांनी ठेवली, फक्त माझं एकटीचं नाव आईने ठेवलं होतं. तिने कुठेतरी वाचलं होतं पलोमा म्हणजे कबुतर- शांतीचं प्रतीक. मी दुसरी मुलगी झाले म्हणून आजीनी इतकी कचकच केली, त्रास दिला त्याला उत्तर म्हणून. आईचं बाकी बहिणींपेक्षा माझ्याशी वेगळंच, जास्त क्लोज नातं होतं. कदाचित मलाही तिच्यासारखी खेळांची आवड असल्यामुळे असेल. पण आईची कॅन्सरशी लढाई अचानक संपली आणि मी कोसळून गेले. मला वाटतं, माझा एक हिस्सा तिच्याबरोबर मरूनच गेला. नंतर मी कधीच पहिल्यासारखी नव्हते आणि समर त्यात काही करू शकत नव्हता.

"आणि मी तुला म्हणले होते की मी वाट बघणार नाही. तायडे, ज्यास्त नाटकं नको. आता पटपट त्याच्याशी कॉम्प्रो करून टाक." जाई बिनधास्त मोठ्याने म्हणाली. "आम्ही लै मिस केलं तुला, बॅटमॅन!"

समर डोकं मागे टाकून जोराने हसला. जाईजुईने दिलेलं हे निकनेम त्याला तेव्हाही आवडायचं. "सध्या बॅटमॅनचं डोकं सरकलंय आणि एक मोठ्या स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट ते ठीक करायला आल्यात." तो म्हणाला.

जाई जाऊन माझ्या खुर्चीत बसली आणि चमचाभर पोहे तोंडात टाकले. "ज ह ब ह री! तायडे आता रोज जेवायला तुझ्याकडेच येत जाते."

"का? तिथे घरी किचन आहे ते वापरा आणि बनवायला शिका काहीतरी. नुसतं खायचं माहितीये. आज तुमची काय रिहर्सल नाही का?" मी मान हलवली आणि तिच्या शेजारची खुर्ची ओढून बसले.

"च्यक, आज सुट्टी आहे. मी दोन चार कामं करायला बाहेर पडले आणि म्हटलं तुझ्याकडे फेरी मारावी. तिथे गेले तर कुलूप, मग म्हटलं तू इथेच असणार. म्हणून इकडे आले आणि बाहेरच्या पांढऱ्या स्कॉर्पिओवरून लगेच ओळखलं. भैया, माझा विश्वासच बसत नाहीये, तू येवढे पैसे कमावतो तरी अजून ही काकांची जुनी गाडी वापरतोय?" तिने हसत समोरच्या छोट्या बाटलीतून थोडं मीठ पोह्यांवर शिंपडलं आणि परत बकाणा भरला. अनबिलीव्हेबल!!

"माझं प्रेम आहे त्या गाडीवर आणि गाडीतल्या बऱ्याच लाडक्या, लक्षात राहिलेल्या आठवणी आहेत!" त्याने माझ्याकडे बघून किंचीत डोळा मारला आणि माझे गाल गरम झाले.

"थोडी अंधश्रद्धा म्हण, पण माझ्यासाठी ती गाडी लकी आहे. मी त्याच गाडीतून मीटिंगला गेलो, माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. मुंबईत माझ्याकडे दोन चार महागड्या स्पोर्ट्स कार पार्क करून ठेवलेल्या आहेत. पण ही स्कॉर्पिओ कायम माझी नंबर वन आहे."

मी हर्ट करूनही समर माझ्याशी ज्या हळुवारपणे वागत होता त्याने मला खरंच आश्चर्य वाटलं. त्याने मला जराही त्रास होऊ दिला नव्हता. पैसा किंवा प्रसिद्धीने तो थोडासासुद्धा बदलला नव्हता. आत्ता कोणी म्हणलं की तो क्रिकेट खेळत नसून कोपऱ्यावर वडे विकतो तरी मी विश्वास ठेवला असता. तो जसाच्या तसा, खूप ग्राऊंडेड माणूस आहे, लहानपणीसारखाच. ह्या माणसाला फॅन्स जरी GOAT म्हणत असले तरीही तो जुनाच डाऊन टू अर्थ मुलगा असणं ही फार मोठी गोष्ट आहे.

"अच्छा, ही गोष्ट मला आवडली, पण तरी मला त्या फरारीत बसून एका बुंगाट ड्राइव्हवर जायला जास्त आवडेल!" जाई खाताखाता म्हणाली. "बाकी मी तुला पहिली भेटले कळल्यावर आता घरी सगळे येडे होणार!" तिने समरकडे मोर्चा वळवला.

"असं काय! कसे आहेत सगळे? गेल्यावर्षी दीदी आणि अजयच्या लग्नाला मला येता आलं नाही. मी फिल्डवर माती खाण्यात बिझी होतो! " त्याने श्वास सोडला.

"हम्म. त्यांची गाडी तर पुढच्या स्टेशनात पण पोचली!" जाई तोंडावर हात घेऊन हसत हसत उद्गारली.

समरने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. 

"दीदी प्रेग्नंट आहे. पाच महिने झाले." मी हसून सांगितलं.

"एक नंबर!!" तो ओरडला. "तू मला शंभर रुपये देणं लागतेस, बेट आठवली? मी दहा वर्षांपूर्वीच सांगितलं होतं हे सगळं!"

"आणि मी पण!" जाई त्याला हाय फाईव्ह देत म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू होतं.

"ओके ss" जाई आळस देत उभी राहिली. "तर मी निघते मुलांनो. मला कामं आहेत आणि आज संध्याकाळसाठी ड्रेस शोधायचा आहे. मी एका मुलाबरोबर डिनरला चाललेय." ती दात दाखवत म्हणाली.

"कोण तो तुझ्या वर्गातला शेमडा अवी काय?" मी तिची नेहमीची नाटकं ओळखून होते.

"तोच! आता शेमडा नाही ऱ्हायला तो. पण तरी त्याने बोर केलं तर तुम्ही बार्बेक्यू नेशनमधून मला घ्यायला या. कावळा नाक्यात, माहिताय ना? बाss य"

आम्ही दोघेही हसायला लागलो. "तिथल्या मालकाशी माझी चांगली ओळख आहे, डोन्ट वरी!" म्हणत समरने हात हलवला.

मी तिच्या मागोमाग दाराकडे गेले. "ड्रेस कुठे, केतीच्या बुटिकमधनं घेणारेस काय?"

"काहीपण काय? मी सध्या बॅकस्टेजला फुकट काम करणारी नाट्यकर्मी आहे! मी तुझं कपाट उघडायला चाल्लेय, शिरीमंत मुली!!"

तिची ॲक्टिंग बघून मी फुटलेच. एक लांब सुस्कारा सोडून मी किल्ली तिच्या हातात ठेवली. "जाताना वॉचमनकडे दे. आणि कुठला ड्रेस घेतला ते मला मेसेज करss"

जाईने पाठ फिरवून चालताचालता स्टायलीत हात वर केला आणि गेटबाहेर पडली.

दार लावून मी पुन्हा टेबलपाशी येऊन बसले. "डॅम! तुझ्या फॅमिलीला मी किती मिस करत होतो ते कळलंच नाही!" तो माझ्याकडे बघून म्हणाला. माझा एकदम घसा दाटून आला. तो कितीतरी वर्ष आमच्या फॅमिलीचा हिस्सा असल्यासारखा होता. लहानपणी कायमच आमच्यात असायचा. तो एकटा असल्यामुळे बहुतेक आमच्या घरचा आवाज, मस्ती, गडबडगुंडा त्याला आवडायचा.

"हो, त्यांना सगळ्यांना खूप उत्सुकता आहे तुला भेटायची. काका-काकी कसे आहेत? ते आता इकडे फार कमी असतात ना?"

"निवांss त! सध्या इथेच आहेत. मी मुंबईत असेन तेव्हा ते तिकडे येतील. आई माहितीये ना, तिच्या बाळाला सोडून ती राहू नाही शकत." तो मिश्कीलपणे म्हणाला तरी ते खरं होतं. सगळ्या सावंत फॅमिलीचं त्याच्यावर फारच प्रेम होतं. त्यांचं मस्त छोटंसं कुटुंब होतं. लहानपणी तर त्याचे पप्पा आर्मीत असल्यामुळे बदली होत होत वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. तेव्हा आई आणि तो दोघेच. त्याला जसं आमच्या घरी आवडायचं तसच मला त्याचं घर आवडायचं. व्यवस्थित आवरून ठेवलेला मोठा फ्लॅट. तिथली सजावट, तिथली शांतता. हे आमच्या घराच्या सतत कचकच आणि पसाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जास्तच उठून दिसायचं. त्याची आई माझ्या आवडीचे पदार्थ करून, जेवायला बोलावून माझे खूप लाड करायची. त्यांना मुलीची आवड होती पण झाला मुलगा म्हणून किंवा माझी आई आजारी होती म्हणून...

त्यांच्याकडे जेवताना कश्या मस्त गप्पा व्हायच्या, नाहीतर आमच्याकडे सगळ्यांची एकदम बडबड, आजीची आरडाओरड, टोमणे, जाम वैताग! आम्ही एकमेकांकडे इतका वेळ घालवला होता! इतक्या वर्षात मी काका काकीनासुद्धा भेटले नाही ह्या विचाराने अचानक मला वाईट वाटलं. गेल्या काही वर्षात इथे आल्यावरसुद्धा मी त्यांना टाळत होते, समरच्या उल्लेखाने मला त्रास होईल म्हणून. मी खूप मतलबी वागले याचं जास्त वाईट वाटलं.

"मी कॉलेजमधल्या तुझ्या सगळ्या मॅचेस काका काकींबरोबर बसून बघितल्या आहेत. तू नॅशनल टीममध्ये खेळताना बघून त्यांना कसलं भारी वाटलं असेल ना? किती कमी जणांना प्रोफेशनली खेळायची संधी मिळते, तुला मिळाली आणि त्या संधीचं तू चीज करून दाखवलस."

त्याने एक सुस्कारा सोडला. "माझी खूप इच्छा होती की तू मला प्रो मॅच खेळताना बघावं. कदाचित एखादी मॅच टीव्हीवर बघितली असशील."

"ॲक्च्युली, दोन सीझनपूर्वी फिरोजशाला तुमच्या दोन मॅचेस झाल्या होत्या. तेव्हा मी तिकीट काढून बघायला आले होते." मी त्याच्याकडे न बघता कबूल केलं.

त्याने अंगठा आणि तर्जनीने माझी हनुवटी धरून माझा चेहरा उचलला आणि समोर बघायला लावलं.

"खरंच?"

त्याला इतक्या जवळ बघून माझा श्वास घश्यात अडकला. मी मान हलवली. "त्यात एवढं शॉकिंग काय आहे? मला तुला खेळताना बघायचं होतं."

"कोणाबरोबर आली होतीस? बॉयफ्रेंड?" तो मिश्कीलपणे म्हणाला. पण त्याचे टेन्स झालेले खांदे माझ्या नजरेतून सुटले नाहीत.

"नाही. मी दोन मॅच बघितल्या आणि दोन्हीवेळा एकटी आले होते." मी खांदे उडवत म्हणाले. ते खरंच होतं. मी पिचला डेड स्ट्रेट असणाऱ्या बॉलरची पाठ दिसेल अश्या स्टँडचे, पुढच्या रांगेतले महागडे तिकीट काढले होते. मी ज्याच्याबरोबर मोठी झाले त्या मुलाला सगळ्यात मोठ्या मॅचमध्ये, नॅशनल टीममध्ये चमकताना मला पहायचं होतं. मी एखाद्या मित्र मैत्रिणीला सोबतीला नेऊ शकले असते पण तिथे मी कशी अफेक्ट होईन ते मला कोणाला दिसू द्यायचे नव्हते. स्पेशली द वे समर अफेक्टेड मी...

त्याने हात काढून घेतला आणि हसला. "मला सांगायचं ना, मी तुला VIP बॉक्समधली चांगली सीट दिली असती."

"तो इश्यूच नव्हता. मला फक्त तुला चमकताना पहायचं होतं." माझे डोळे भरून आले आणि मी दुसरीकडे बघितलं. अचानक घसा दुखायला लागला.

"मला खेळताना तू स्टँडस् मध्ये दिसलीस की खूप मस्त वाटायचं." तो हसऱ्या आवाजात म्हणाला.

"एक आयडिया आहे." मी प्लेट्स उचलून सिंककडे निघाले. तो माझ्याशेजारी येऊन थांबला. "एक मिनिट, तू पोहे केलेस आता मी प्लेट्स घासून टाकतो. इथे घासायला भांडीच नसतात त्यामुळे मेड वगैरे कोणी नाहीये."

"ओके." मी बाजूला सरकून त्याला जागा दिली.

"हम्म, कसली आयडिया?"

"हे सगळं जिथून सुरू झालं, फुटबॉल खेळता खेळता तू क्रिकेटकडे वळलास ते शाहू स्टेडियम आणि मग शिवाजी स्टेडियम! आपण जायचं का तिथे?" तिथेच वेगवेगळे कोच सिलेक्शनसाठी येत. आम्ही उन्हातान्हात मॅच बघत बसायचो. त्याला खेळताना बघून इतका आनंद व्हायचा की त्या उन्हाची काहीच फिकीर वाटायची नाही.

"पलो, आर यू शुअर अबाऊट अ ट्रीप डाऊन मेमरी लेन?" प्लेटला साबण लावता लावता वाकून तो माझ्या कानात कुजबुजला. मी थरथरले.

"ओके, हे झालं की आपण निघूया. मला वाटतं हा तुझा प्लॅन आहे. मला पुन्हा क्रिकेटकडे वळवायचा." तो प्लेट नळाखाली धरून विसळत म्हणाला.

मी हसले.
पण प्लॅन फक्त तेवढाच नव्हता.
मी आयुष्यभर ज्याच्यावर प्रेम केलं त्या मुलाबरोबर घालवलेले काही खास क्षण मला पुन्हा जगायचे होते.

जर त्यामुळे त्याची खेळासाठी पॅशन पुन्हा जागृत झाली तर दुधात साखर! पण आत्ता तो मुख्य प्लॅन नव्हता.

असं वाटतंय की आम्हा दोघांनाही डोकं परत खेळाकडे वळवायची गरज आहे.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ६

समर

पावसाळा अजून संपला नसल्याने नऊ वाजताच्या सुमारास तसं कवळंच ऊन होते. गाडी पार्क करून आम्ही शाहू स्टेडियममध्ये गेलो. मैदानात पातळ चिखलाचा थर आणि कडेकडेने खेळल्या न जाणाऱ्या भागात हिरव्यागार गवताचे पुंजके उगवले होते. इथनंच तर सगळं सुरू झालं होतं. लिटरली!

मी तिसरीत असताना माझ्या मस्ती आणि वांडपणाला कट्टाळून पप्पा इथे पाटील सरांचा क्लास बघायला मला घेऊन आले होते. "पलो, तुला माहिती आहे, तुझ्यामुळं मी पाटील सरांकडे खेळायला लागलो."

"खरं? कस काय?" तिने शेजारी चालताना आश्चर्याने माझ्याकडे बघितले.

आम्ही वर चढून एका पायरीवर बसलो. मी हात मागे टेकून ती स्वच्छ हवा नाकात भरून घेतली.
आताही समोर काही लहान मुलं फुटबॉल खेळत होती. "पप्पा क्लासची चौकशी करायला मला घिऊन आले होते. बाकी सगळ्या पोरांच्यात दोन चारच पोरी होत्या आणि त्यातही तूच एकदम फास्ट बॉल पास करत होतीस आणि तोंडाने त्यांना ओरडत पण होतीस. एवढी क्यूट बारकीशी मुलगी एवढ्या जोरात खेळताना बघून आम्ही बघतच राहिलो."

"अरे!! आठवलं मला, तेव्हा मलाही मस्ती करते, अंगातली रग जरा जिरावी म्हणूनच क्लासला पाठवत होते." ती समोर पहात हसली.

आणि मी पप्पांना म्हणालो, "ती पोरगी काय भारी आहे ना? भावलीच एकदम आणि कसली भारी खेळते!"

"काका काय म्हणाले असतील ते इमॅजिन करू शकते मी!" ती खळखळून हसली.

"तर काय! मला म्हणाले गप खेळायचं, नाहीतर कानाखाली जाळ काढीन! नशीब फक्त म्हणाले! पण तेव्हापासून ते स्वतःच तुझे फॅन झाले. त्यांच्यालेखी तू कधीच काही चुकीचं करणार नाही. गुणी पोरगी वगैरे." मी हसत तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरत होते. अरे यार, आम्ही काहीही बोलायला लागलो तर ह्या सगळ्या आठवणीच बाहेर पडतात. मी कित्येक वर्ष बोचक्यात बांधून मागे टाकून दिलेल्या... मला कोल्हापुरात येऊन चार दिवसही झाले नाहीत आणि इथे आम्ही भूतकाळ खोल खणायला लागलोय.

"मी तुला सोडून गेल्यावर नक्कीच त्यांचं मत बदललं असेल." तिच्या तोंडून आवाज जेमतेम फुटत होता.

मी तिच्याकडे सरकून खांद्यावर हात ठेवला. "त्यासाठी तुला कोणी ब्लेम नाही केलं. मीसुद्धा नाही. तू ज्या प्रकारे काही न सांगता निघून गेलीस, ते मला काही कळलं नाही. पण मी तुला ओळखतो. आई गेल्यावर तुझी झालेली हालत मी बघितली आहे. आय नो, दुःख ही सगळ्यात वाय झेड इमोशन आहे. जितका विचार कराल तितकी तुम्हाला अजून खोल गाळात ओढत नेते. तेव्हा मलाच इतकं वाईट वाटत होतं, तर तुझी अवस्था काय असेल ते जाणवत होतं. तुला शक्य तेवढं तू चांगलंच हॅण्डल केलं, तरीही तू मला मदत करू द्यायला हवी होती. पण आता बघ स्वतः कडे!" मी तिचा खांदा घट्ट धरला आणि ती पटकन उठून उभी राहिली.

"आपण काय बोलतोय हे? हे सगळं माझ्यासाठी नाहीये. आपण ट्रॅक सोडून खूप भरकटतोय." ती अजूनही ते दुःख कवटाळून बसलीय हे तर क्लिअर आहे. त्याबद्दल बोलताच तिच्या वागण्याला धार आली होती.

"आपण माझ्या सुरुवातीबद्दल बोलत होतो, ज्यात तुझा उल्लेख येणारच आहे!"

"हम्म, राईट... सॉरी. मग पुढे?" ती थोडं अंतर ठेवून खाली बसली.

"मग काय, क्लासला घाला म्हणलं पप्पांना. मग आपण दोन तीन वर्ष एकत्र खेळत होतो. पाचवीचा माझा रिझल्ट असला भारी की मला प्रमोट केलेलं होतं ! पप्पा तडक सुट्टी घेऊन आले आणि मला समोर बसवून भरपूर प्रश्न विचारले. मला पुढे खूप शिकण्यात किंवा नोकरी बिकरी करण्यात इंटरेस्ट नाही हे त्यांना जाणवलं.  मग माझी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट केली, त्यात मला स्पोर्ट्स आवडतात असंच आलं. मग पप्पांनी मला फुटबॉलमध्ये कसं फ्यूचर नाही, क्रिकेटमध्ये चांगलं करिअर करता येईल वगैरे सांगून माझं मन वळवलं आणि मी क्रिकेट अकॅडमी जॉईन केली. तरी मी तुझ्या मागे होतोच! मग शेवटी नववीत मॅथ्सच्या ट्यूशनमध्ये तुझ्या वहीत एक चिठ्ठी पाठवली. आठवतंय?"

तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू पसरलं. "मला तर वेगळं आठवतंय!"

"तुला काय आठवतंय? सांग."

"एक दोन वर्षात आपण अगदी घट्ट फ्रेंड्स झालो होतो. घरी जाणं येणं, ट्यूशनमध्ये वगैरे भेटायचो शाळा वेगळ्या असल्या तरी. तू नाही म्हटल्यावर मी पण फुटबॉल सोडून दिला. मला तर त्यात काहीच स्कोप नव्हता. ती चिठ्ठी पण तुझ्या त्या बंट्याने वहीतून आणून दिली होती आणि वर म्हणे, काय रिस्पॉन्स देणार काय?" ती खो खो हसत सुटली.

"कसला येडच्याप होतो मी!" मी हसता हसता म्हणालो.

"आताच्या एकदम विरुद्ध. आता काय बाबा, तू तर त्या 'कसम से ' वाल्या कश्मीरा बर्वेला डेट करतोस! हो ना?"

"झालं? जरा चांगल्या काही आठवणी निघाल्या की तू स्टॉपर लावतेस. तू मला काहीही विचारू शकतेस पलो. नो सिक्रेटस्! आमच्या शर्माने माझी तिच्याशी ओळख करून दिली. त्याला वाटलं मराठी मराठी म्हणून आमचं चांगलं जमेल. आम्ही चार पाच वेळा भेटलो पण प्रेमबिम काही नाही. म्युच्यूअलीच आम्ही वेगळे झालो. काही इव्हेंटसना एकत्र गेलो. पण प्रेसवाल्यांनी भरपूर हाईप केला. लोकांनी आमचे फॅनक्लब काय काढले, काहीपण सुरू होतं. तिला ते भारी आवडतं इंस्टा वगैरे, तेवढाच तिचा फॅन बेस वाढतो. आमच्यात काहीही नाही, पण ती चांगली मैत्रीण झाली.  रिसेंटली, रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये ती येसूबाईचा रोल करत होती. तेव्हा आईने तिला प्रॉपर नौवार नेसायला शिकवली, म्हणून दोन चारदा घरी आली होती. ह्या प्रश्नाचं कारण काय? तिच्यामुळे माझा गेम खराब होतो आहे असं का?" मी भुवया उंचावत विचारले.

तिचे गाल लाल झाले. "हो, म्हणजे तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते सगळं मला डॉक्युमेंट करायचं आहे."

"कश्मीरामुळे मला काहीच फरक पडत नाही. ना आयुष्यात, ना गेममध्ये. ती फक्त मैत्रीण आहे."

"गुड टू नो!" तिच्या ओठांचे कोपरे वर उचलले गेले. मी काहीच रिॲक्ट न होण्याचा प्रयत्न केला. सध्या मी पलोमाबरोबर आधी होतो त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतो, पण ती माझ्या आयुष्यात थोडी जरी सामिल झाली तर ते मला हवं होतं.

तिच्याबरोबर लाईफ खरंच मस्त होतं.

"आणि तुझं काय? कोणी सिरीयस बॉयफ्रेंड?" मी चिल् असल्यासारखं दाखवत विचारलं.

"सध्या तरी कोणी नाही. ऊन वाढतंय, निघूया का इथून?"

मी खुशीत मान हलवली.

थोड्या वेळात आम्ही शिवाजी स्टेडियमवर गेलो. तिथल्या मॅचेस, किस्से, तिथे मारलेली पहिली सेंच्युरी आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आवडायला लागलेलं क्रिकेट. सगळं आठवून झालं.

उन्हात तळपत आम्ही गाडीत जाऊन बसलो. "सोळंकी?" दोघं एकदम म्हणलो. स्टेडियमवरून परत घरी जाताना आईस्क्रीम खायची आमची प्रथा होती. "पार्कात जाऊ." तिने मान हलवली. वीकडेची दुपार असल्यामुळे तुरळक लोक होते. तरीही आम्ही आत गेल्यावर सेल्फी साठी लाईन लागली. पलोमा हसत होती. काऊंटरवरचे काका येऊन विचारपूस करून गेले. भराभर कॉकटेल नि गडबड संपवून गर्दी जमायच्या आत आम्ही बाहेर पडलो.

पलोमा

"पले, कुठे फिरायला लागलीयास? सोळंकीमध्ये आहात ना? ये बेकरीत गपचीप!" गाडीत बसताच दिदीचा फोन आला, मग वळलो तिकडे.

दिदीने खूप मेहनतीने ही बेकरी शून्यातून उभी केली होती. दीदी माझ्याहून एकच वर्षाने मोठी आहे पण आमच्या फॅमिलीची जान आहे. आई गेल्यावर तिने कॉलेज बरोबर केक मेकिंगचे आणि काय काय कूकींगचे कोर्सेस केले. पप्पा, आजी, बहिणी सगळ्यांची काळजी घेतली. मला दिल्लीला जाण्यासाठी खूप सपोर्ट केला. माझ्यासाठी घरी थांबणं हा ऑप्शनच नव्हता. मी तर सुट्टीतही परत येणं टाळत होते, बहिणींनाच तिकडे बोलवून घ्यायचे.

आम्ही सगळ्यांनी आपापल्या दुःखाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हॅण्डल केलं. परिस्थितीशी झगडा नाहीतर पळ काढा.

ही जगण्याची बेसिक स्किल्स आहेत. दिदीला कळत नसलं तरी ती फायटर आहे.

आणि मी सगळ्यातून पळ काढते. नेहमी पळत असते. घरापासून, समरपासून, सगळ्या आवडत्या वस्तू आणि व्यक्तींपासून लांब पळून गेले. कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये आणि मला ह्या गोष्टीची लाजसुद्धा वाटते पण प्रत्येकाच्या मेंदूचं वायरिंग वेगळं असतं. ही माझी माझ्या दुःखाशी डील करायची पद्धत होती. होती काय, ग्रीव्हींग प्रोसेस अजूनही चालूच आहे.

माझ्या कामातून, ॲथलीट लोकांना बरोबर मार्ग दाखवताना मला स्वतःच्या परिस्थितीचे चांगले इनसाईटस मिळाले. मी स्वतःला जास्त चांगली ओळखू शकले.

"समर!" त्याने 'Karmella's' चे दार उघडताच काऊंटरमागून दीदी पळत आली. "हे, लिट्ल ममा! मला बातमी कळली." त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती त्याचा हात धरून बोलत असताना मी मागे उभी होते. समर सगळ्यांचा लाडका होता. पण मी ब्रेकअप केलं तेव्हा माझ्या बहिणी खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. मी त्याबद्दल बोलायचं टाळलं तेव्हाही त्यांनी कधी मला पुश केलं नाही. माझ्यासाठी सगळं किती वेदनादायक होतं ते कळल्यासारख्या सगळ्या गप्प राहिल्या.

काउंटरवर दीदीची नणंद आणि आधीपासून मैत्रीण कम बेकरीमधली पार्टनर असणारी प्रमिला होती आणि अजून दोन मदतनीस मुली होत्या. समर तिकडे वळून त्यांच्याशी थोडं बोलला. विचारायला लाजणार्‍या पोरींना बोलवून सेल्फी काढू दिले.

मी म्हटलं तसा तो चार्मिंग होताच.

"पले, आपल्या तिघांचा सेल्फी काढू ये.." दिदीने मला धरून पुढे ओढलं. "त्यापेक्षा हे फोटो कसे आहेत, फ्रेम करायला?" त्याने दिदीला त्याचा फोन स्क्रोल करत फोटो दाखवले. मी वाकून पाहिले आणि जराशी लाजले. शाहू ग्राऊंडवर आम्ही थोडा वेळ मुलांच्यात फुटबॉल खेळलो तेव्हा त्याने माझे फोटो काढले होते!

"तुम्ही खेळलात?" दीदी थोडी इमोशनल झाली. आमची आईपण शाळेत कबड्डी प्लेयर होती. मला फुटबॉलसाठी तीच घेऊन जायची. तिची एक तरी मुलगी खेळते याचा तिला फार अभिमान होता.

मी दीला मिठी मारली. "ह्या छोट्याला ट्रेन करेन ना मी!" मी हसत तिच्या थोड्या दिसायला लागलेल्या पोटावरून हात फिरवला. "एवढ्या लवकरच किक माराय लागलाय ते पात्र!" दीदी हसली.

"हट, तो क्रिकेटर पण होऊ शकतो. मुली पण भारी खेळतात आता, आपली टीम बघितली ना?" तो काचेतून वेगवेगळ्या पेस्ट्री बघत म्हणाला.

"समर, आपल्या KSA लीगच्या मॅचेस बघितल्या की नाही? शिवाजी विरुध्द पिटीएम् काय धमाल मॅच झाली! निस्ता हान की बडीव!"

"काय राव दीदी, जखमेवर मीठ चोळू नको. मी शिवाजीकडून खेळायचो माहिताय ना? अजुनपण फुटबॉल काही डोक्यातून गेलेला नाही."

"अजय तुला अख्खी मॅच रंगवून सांगेल बघ. घरी जेवायला ये ना, रस्सामंडळ करू आपण!" ती उत्साहात म्हणाली. मग तिने हळूच माझ्याकडे बघितलं. मी समरबरोबर सावधपणे जास्त वेळ घालवणार नाही हे तिला माहीत होतं. पण आमच्या हातात दोनच महिने होते आणि मला त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून त्याला असेस करायचं होतं. मी होकारार्थी मान हलवली.

"बेश्ट काम! येणारच. रविवारी? तुमचे पप्पा, जाईजुई, दोनचार मित्र सगळेच येऊ देत, तेवढीच भेट होईल सगळ्यांची. पलोमाला गरज आहे थोड्या नळ्या फोडायची! उद्यापासून आम्ही राजाराम तलावाकडे रनिंग करणार आहोत, कदाचित स्विमिंग पण.. शाळेतल्यासारखं" तो माझ्याकडे बघत म्हणाला.

मी डोळे फिरवले. "फुटबॉल, रनिंग, स्विमिंग! एका जॉबसाठी कायकाय करावं लागतंय, देवाss"

"मग नाही जमणार काय? परत पळून जाणार?" तो माझ्या कानात कुजबुजला. माझ्या अंगावर शहारा आला. दीदी आमच्यासाठी तिच्या फेमस फजी चॉकलेट वॉलनट कुकीज पॅक करण्यात बिझी होती. मी त्याच्या घाऱ्या डोळ्यांत बघत राहिले. त्याने सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि मी जबरदस्तीने माझी नजर दुसरीकडे वळवली.

"नेव्हर! गेम ऑन सावंत!"

त्याने शिट्टी वाजवली. "मोठ्यामोठ्या बाता करतेय, किती पळते बघूच!" सगळ्याजणी हसल्या. दीदीने माझ्या डोळ्यात बघितलं. 'उगा अती विचार करू नको..' बहिणी ना बेस्ट असतात. आम्ही चौघीही न बोलता एकमेकींच्या मनातलं ओळखायचो. मी मान हलवली. निघता निघता दिदीने माझ्या हातात एक ब्राऊनी कोंबली.

आम्ही सगळ्यांना बाय करून बाहेर पडलो. त्याने माझ्या हातातल्या ब्राऊनीचा घास घेतला. "आह, तुझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे! अनबिलीव्हेबल!!"

"आता तू कोल्हापूर सोडताना रडशील!!" मी हसत म्हणाले.

"खरंच! मला मजा येतेय. इथे मी किती आनंदात असतो ते विसरलोच होतो. हल्ली आईपप्पा पण जास्त मुंबईत असतात, त्यामुळे येणं होत नाही. बट धिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय नीडेड." गाडी सुरू करण्यापूर्वीच त्याने त्याचा बॉक्स उघडून दोन कुकीज खाल्ल्या.
अव्वा! खाण्याची काय कपॅसिटी आहे ह्या माणसाची!

"हम्म.. मी पण तीन वर्षात एकदाच इथे आले, तेही दिदीच्या लग्नाला."

त्याने थांबून माझं निरीक्षण केलं. "तुझी तर सगळी प्रेमाची माणसं इथे आहेत. तरी घरी का येत नाहीस?"

"माहीत नाही." मी खांदे उडवले.

"असं दिसतंय की आपण दोघेही स्लंपमध्ये आहोत..." त्याने गाडी सुरू केली.

क्रमश:

कोल्हापूरला फुटबॉलची long standing history आहे आणि कोल्हापुरात गल्लोगल्ली फुटबॉल कल्चर आहे. हे फारसं माहीत नसतं म्हणून हे एक न्युज आर्टिकल देते आहे. आता त्यांची लीग आहे आणि सिटी मधल्या विविध भागांच्या टीम त्यात भाग घेतात. गोल्ड कप ही फुटबॉल स्पर्धा आहे, आता नाव छत्रपती शाहू गोल्ड कप असं आहे.

वर शिवाजी विरुद्ध पीटीएम मॅचचा उल्लेख आहे ती इथे आहे.

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ७

पलोमा

दुसऱ्या दिवशी सकाळचा वर्कआऊट, माझं सेशन, जेवण वगैरे आवरल्यावर घरी येऊन थोडा वेळ डुलकी काढली तोच पाच वाजल्याचा अलार्म खणाणला. मी पटकन ब्लॅक टाईट्स आणि पर्पल रेसरबॅक क्रॉपटॉप कम स्पोर्ट्स ब्रा घालून वर एक पातळ पांढरा लूज टीशर्ट अडकवला. केसांची उंच पोनीटेल आणि रनिंग शूज घालून तयार व्हायला मला वट्ट दहा मिनिटे लागली. तरी तेवढ्यात त्याने येऊन एक हॉर्न वाजवलाच. मी घर लॉक करून नॅपकीन आणि थंड पाण्याची बाटली घेऊन बाहेर आले नि गाडीत बसले.

तो नेहमीच्या ब्लॅक शॉर्ट्स, स्काय ब्लू स्लीवलेस टँक टी आणि ग्रे नायकीज मध्ये होता. कपाळावरून कॅप थोडी वर करून तो हसला. "रस्त्यावर पळताना थोडं तोंड लपवायला कामी येईल!" स्टिअरिंगवरच्या त्याच्या हातांच्या तटतटलेल्या शिरा आणि मजबूत बायसेप्स न्याहाळून मी खिडकीबाहेर नजर वळवली. मी मध्येच पुढे होऊन म्युझिक ऑन केलं. फरहान अख्तर 'तुम हो तो, गाता है दिल ' म्हणत होता. मी पटकन बटन बंद केलं. नंतर बराच वेळ तो शांत होता.

"काय झालं?" शेवटी मी विचारलंच.

"मी विचार करतोय की तू सगळ्यांना इतकी वर्ष माझा जराही उल्लेख करू नका अशी तंबी का दिली होतीस?"

"वेल, इथे आपण मला सायको ॲनालाईज करत नाहीये तर तुला करतोय. आठवलं?"

त्याने मान हलवली पण काही क्षण माझ्याकडे बघत राहिला. "लेट्स सी. माझी गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुला तुझ्याही काही गोष्टी मला सांगाव्या लागतील." तो समोर रस्त्याकडे बघत म्हणाला.

"असं कुठे लिहिलंय? काहीही!" मी डोळे फिरवले.

"बघू. रनिंगसाठी तयार?"

"बॉर्न रेडी, समर सावंत!"

त्याने हसुन मान हलवली. "मी आता प्रो ॲथलिट आहे. लक्षात आहे ना? आता तुझ्यासाठी इतकं सोपं नाहीये."

"बेट लावणार?"

"का नाही? माझ्या स्किल्सवर बेट लावायला मी घाबरत नाही." तो गुरगुरला.

डॅम! कोणी विनासायास इतका सेक्सी कसा असू शकतो?

"किती पळायचं?" मी पोनीटेल घट्ट करत विचारलं.

"सुरुवात नेहमीसारखी पाच किमी ने करू." एव्हाना आम्ही राजाराम तलावाजवळ पोचलो होतो.

"परफेक्ट! तेवढं तर मी रोजच पळते. आपण त्या मोठ्या झाडापासून सुरू करू. युनिव्हर्सिटी गेटपर्यंत अडीच तीन किमी होतील बहुतेक, तिथून या झाडापाशी परत येऊ." आकाशात थोडेफार ढग होते पण पाऊस पडेलसा वाटत नव्हता. निदान ऊन तरी अजिबात नव्हतं.

"डन! माझा माझ्या एबिलीटीजवर पूर्ण विश्वास आहे." तो खडूसपणे हसला.

हम्म, नो डाऊट!

"रडायला तयार हो, समर!"
"रडणार तू आहेस, पलोमा! आधीसारखीच." त्याने डोळा मारला.

नो वे! माझे डोळे विस्फारले आणि लाल झालेले गाल न दिसण्याची काळजी घेत मी पटकन गाडीतून उतरले. कारण त्याचा रेफरन्स मला लगेच कळला होता. एका संध्याकाळी इथेच, याच गाडीत, गळ्यावरचा त्याचा लालभडक लव्ह बाईट लपवता येत नाही म्हणून मी वैतागून रडत होते.

"शब्द सुचत नाहीत?" त्याच्या ओठांचा किंचित स्पर्श कानाच्या पाळीला झाला. "तू हरलीस तर मला उत्तरं द्यावी लागतील."

मी एक शब्दही बोलले नाही. मला माझे श्वास काबूत आणायचे होते. ह्या सगळ्या सिच्युएशनवरचा माझा कंट्रोल जातोय, तो परत आणायला हवा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याला हरवणे आणि बोलायला लावणे.

समर

मी शेवटच्या वळणावर पोचलो आणि दोन सेकंद ढोपरावर हात टेकून थांबलो. पुन्हा पळालो तरी ती माझ्या बरोबरीने धावत होती. मी धापा टाकत होतो, तीही खूप दमली होती. मला वाटलं होतं दोन किमीतच ती दमून जाईल पण तिचा स्टॅमीना सॉलिड होता. काही करून मला जिंकायचंच आहे. मी समोर झाडाकडे हात करून पुढे गेलो आणि एकाच वेळी आम्ही झाडाला टच केलं. मी मनगटावरच्या ॲपमध्ये बघितलं तर हे माझे फास्टेस्ट फाईव्ह किमी होते.
"व्हॉट द फ*! काय होतं हे पलो!"

पलोमा हळू श्वास घ्यायचा प्रयत्न करत झाडाला टेकून धपकन खाली बसली आणि हसायला लागली. "काय? मी मॅराथॉनची तयारी करतेय! सांगायला विसरले बहुतेक."

मी कपाळावरचे घामाने ओले केस मागे करत तिच्या शेजारी बसलो.

"तुला तर कोणी टीम ट्रेनर म्हणून पण हायर करेल." मी गालातल्या गालात हसलो.

"मग? आता काय हिरो? टाय झाली!" तिने समोर दगड फेकत विचारले.

"आपण दोघेही जिंकलो, म्हणजे आपण एकमेकांना एकेक प्रश्न विचारू शकतो."

तिने श्वास सोडला आणि तशीच पाठीवर आडवी झाली. वर चमकणाऱ्या उन्हापासून बचाव करायला तिने हात डोळ्यावर घेतला. मी झाडाला टेकून पाय लांब केले आणि शेजारी पडलेली एक डहाळी उचलून तिची साल सोलू लागलो. हा कायमच माझा आवडता तलाव होता, रंकाळ्यापेक्षाही. आज तलावाचं पाणी गर्द निळं दिसत होतं. वाऱ्यावर थोड्याशा लाटा खळखळत होत्या. तलावाचा तळ लागत नव्हता, कदाचित जास्त पाऊस झाल्यामुळे.

"मी आधी विचारते. जर तू पूर्ण खरं उत्तर दिलं तरच तू मला प्रश्न विचारायचा. ओके?"
ती उठून केसांत अडकलेली बारीक पानं झाडत म्हणाली.

"मी नेहमीच खरं बोलतो. लपवायला काही नाहीच माझ्याकडे."

तिने एक श्वास सोडला. "ओके मग सुरू करूया."

"येऊद्या." मी पुन्हा झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून समोर पाण्याकडे पहिलं.

"तू आनंदी आहेस का? म्हणजे क्रिकेट खेळताना तू आनंदी असतोस का? तू जे आयुष्य जगतो आहेस त्यात तुला आनंद वाटतो का?"

"हे अगदी पलोमावालं काम केलंस. बोट दिलं की हात ओढणार! हा एक नाही, तीन प्रश्न आहेत." मी वैतागलो.

"एकच प्रश्न आहे, मी फक्त थोडा एक्सप्लेन केला" ती किंचीत हसली.

"आनंदी आहे, टू ॲन एक्स्टेंट..." मी पुन्हा ती डहाळी उचलली.

"असं नाही चालणार, नीट सांग."

"मला रोज मायक्रोस्कोप खाली जगायला आवडतं का? मी केलेल्या रन्स, घेतलेल्या विकेट्स यावर माझी वर्थ ठरेल का? दर वेळी मी मॅच हरल्यावर अख्खं शहर माझा तिरस्कार करेल का? मोस्टली नाही. कारण मी जेव्हा पॅड्स बांधतो, हेल्मेट घालतो तेव्हा मी हॅपी असतो. मी जे काम करतो त्यात खूष आहे. माझी टीम माझ्या फॅमिलीसारखी आहे. आम्ही भरपूर हार्ड वर्क करतो आणि पार्टी करतो. घोरपडे नालायक माणूस आहे, मी त्याच्यापासून शक्य तेवढं लांब राहायचा प्रयत्न करतो. तो मला कधीही काढून टाकू शकण्याची भीती असतेच. मी त्याचं पॉलिटिक्स गेले दहा वर्ष सहन करतोय, का? तर माझं कॉन्ट्रॅक्ट तुटू नये, म्हणून. मला नाही माहीत. पण हे सगळं सोडूनपण वेगळं चांगलं आयुष्य असू शकतं. रन्स आणि पैसा सोडून काऊंट करण्यासारखं आयुष्यात खूप काही आहे." मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. ती माझं निरीक्षण करत होती.

"काहीतरी मिसिंग वाटतंय का? काय असावं?" तिने गंभीर होत विचारले.

"हा महत्वाचा प्रश्न आहे. काहीतरी मीसिंग तरी आहे किंवा जे आहे ते पुरेसं नाहीय."

"फेअर इनफ. तू खरं बोललास. आय अप्रिशिएट इट."

"ओके. मग माझा प्रश्न. तू तुझ्या घरी, फ्रेंड्समध्ये गेले दहा बारा वर्ष कोणालाही माझा उल्लेख करायची मनाई का का करून ठेवली होती? माझे आईवडील इथून परत मुंबईत येतात तेव्हा मी कायम चौकशी करतो. पलो आली होती का, दिसली होती का... तू का माझ्याबद्दल बोलत नाहीस?" मी तिच्या डोळ्यात खोलवर बघत विचारलं.

तिने ओठ घट्ट मिटून घेतले आणि दुसरीकडे बघितलं. गहन विचारात गेल्यावर ती नेहमीच करायची. तिने घसा साफ केला. "आपण माझ्याबद्दल का बोलतोय? इथे मला तुला बोलतं करण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे."

"झाली टाळाटाळ सुरू! आन्सर द क्वेश्चन पलो. तू बेट कायम पाळली आहेस अजूनतरी."

तिने लांब श्वास सोडला. " कारण तुझ्याबद्दल बोलून मला खूप हर्ट होतं, समर. झालं? खूष आता?"

ती चटकन उभी राहिली आणि पाण्याजवळ गेली. मी मागोमाग गेलो. धिस इज नॉट डन!
तिने वाकून एक दगड उचलून पाण्यावर भिरकावला. तो परफेक्ट बाऊन्स होत लांब जाऊन नाहीसा झाला. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी उभा राहिलो.

"प्रत्येक वेळी बोलणं अनकंफर्टेबल झालं की पळून जाऊ नको. अश्याने आपण कुठेच पोचणार नाही."

"मी पळत नाहीये. मला कळत नाही आपण भूतकाळाबद्दल का बोलतोय. मी इथे तुला सुधारायला आले आहे. आठवलं?" तिने खांदे उडवले. तिची नजर अजून पाण्यावरच होती पण तिचा चेहरा माझ्या हाताकडे झुकला होता. त्यातली ऊब हवी असल्यासारखा.

मी हात काढून घेतला. मी काय वायझेडपणा करतोय. ती बरोबर म्हणते आहे. भूतकाळ खणत बसायची गरज नाही. ती मला का सोडून गेली याचं उत्तर मला कशाला हवं आहे? मी मूव्ह ऑन झालो, आम्ही दोघेही झालोय.

"आता तोंड बंद करायला पाण्यात उडी मारायची का?" मी तिला खांद्याने धक्का दिला. ती पालथ्या हाताने गाल पुसून हसली.

"एवढं पळून झाल्यावर लगेच पोहणार? मी तुला थांबून धापा टाकताना बघितलाय!" तिने भुवई उचलून माझ्याकडे बघितलं.

"व्हॉटेवर! मी दिवसभर उन्हातान्हात रना काढत असतो. हे तर काहीच नाही." मी खोटं बोललो. आजच्या इतका फास्ट मी कधीच पळालो नव्हतो. "आय थिंक तुलाच स्विमिंग झेपणार नाही."

"असं काही नाही. माझ्याकडे कपडे नाहीत तसे."

"एक काम करू, आपले कपडे आणि शूज गाडीत ठेऊ. पोहत पलीकडे जाऊ, तू दमशील तर तिथेच थांब मी परत येऊन गाडी घेऊन पलीकडे येतो."

"हुं!! ह्यो बगा शाहू महाराज! उगा शायनिंग नको करू!" तिने हात वर करून टीशर्ट काढला. आत पर्पल क्रॉप टॉप होता. उफ्फ! दोज कर्व्हज! तिच्या सपाट पोटाची नाजूक त्वचा संधीप्रकाशात तांबूस चमकत होती. तिने शूज काढून बाजूला ठेवले. "रेडी!" ती माझ्याकडे वळली.

आईच्या गावात!

मी गेल्या दहा वर्षात बऱ्याच सुंदर मुलींना भेटतोय, काहीना डेट केलंय. पण कोणीही पलोमाची बरोबरी करू शकत नाही. तिला आत्ता अशी समोर बघून... ॲब्सल्यूट परफेक्शन!

टोन्ड, टॅन्ड अँड ब्यूटीफुल!

"हेलो!" तिने माझ्या डोळ्यासमोर टिचकी वाजवली. "तू काही मला पहिल्यांदा बघत नाहीयेस. आता तर तुझ्या अवतीभवती हिरोईनी आणि मॉडेल्स असतात. एवढे मोठे डोळे करून बघायची काय गरज नाहीये." ती हसत म्हणाली.

"मी असं काही बघत नाहीये. स्वत: ला लै भारी समजू नको." मी माझा टी शर्ट डोक्यावरून काढला. माझ्या शरीरावरून, सगळ्या कट्स आणि ॲब्जवरून नजर फिरवताना तिचे डोळे विस्फारून दुप्पट झाले.

"खूप दिवस झाले इथे स्विमिंग करून." मी शूज काढून पटापट पाण्याच्या दिशेने गेलो. मला तिच्याकडे पुन्हा बघायचं नव्हतं नाहीतर मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नसतो.

"अरे, थांब थांब.." म्हणत ती माझ्यामागे पळत आली.

मी काठावरून पाण्यात उडी मारली. गार पाण्याने माझी सिच्युएशन जरा बरी होत होती. ती हळूच थंडगार पाण्यात पाय बुडवून आत पूर्ण पाण्यात येताना थरथरून जरा किंचाळली. मी वळलो. "मोठ्या मोठ्या गप्पा करत होतीस, आता काय झालं?"

तिने खाली बघून स्वतःला लपवत हातांची घडी घातली. "पाणी खूपच थंड आहे."

"ते तर असतंच!" मी हसलो. "सो, मी जिंकलो तर आपण घरी जाऊन कपडे बदलायचे, काहीतरी पार्सल घ्यायचं आणि ताराबाई पार्क गाठायचा."

"आणि मी जिंकले तर?" तिने बारीक आवाजात विचारलं.

"आपण पार्सल घ्यायचं आणि माझ्या घरी जायचं. कमॉन यार पलो, आईपप्पाना भेटायचंय तुला!"

तिने मान हलवली आणि भरकन चालत खोल पाण्यातच गेली. तिचं लवचिक शरीर मासोळीसारखं पाण्यावर वरखाली होताना दिसत होतं. मी पटापट हात पसरून पाण्यात मुसंडी मारली आणि तिच्या शेजारी पोचलो. मी कायमच तिच्यापेक्षा स्ट्राँग स्विमर होतो त्यामुळे तिला गाठणं सोपं होतं. आम्ही स्ट्रोक टू स्ट्रोक बरोबरीने पोहत पलीकडच्या काठाजवळ पोचलो.

अजूनही सूर्य अस्ताला गेला नव्हता. आकाशात थोडे रंग शिल्लक होते. कितीतरी वर्षांमध्ये पहिल्यांदाच मला पूर्णपणे इतकं शांत, ॲट पीस वाटलं... नो कॅमेरा, नो कोचेस, नो फॅन्स, नो एकस्पेक्टेशन्स...

फक्त मी, पलोमा आणि आजूबाजूला पसरलेले राजाराम तलावाचे थंडगार पाणी. मी सिमेंटने बांधलेल्या कठड्याला धरून स्वत:ला वर खेचले. पलोमा काठापाशी थोडी धडपडली, मी तिचे दंड धरून तिला वर खेचून सरळ बसायला मदत केली.

"टाय?" तिने चेहऱ्यावरचे ओले केस बाजूला सरकवत विचारले.

ही कुठल्याही बाजूने टाय नव्हती पण तिला न्याहाळत मी मान हलवली. ओलेत्या मुली एवढ्या सेक्सी का दिसतात राव?

"मग मी थांबते इथेच, तू प्लीज गाडी घेऊन येतोस?" माझ्या पेरेंट्स ना भेटायच्या विचाराने ती नर्व्हस दिसत होती.

"सांगितलं होतं आधीच! येतो चटदिशी." म्हणून मी डोकं हलवून केसांतलं पाणी उडवलं. तिने माझ्याकडे हळूच नजर टाकली. तरी तिचे लालसर गाल आणि गडद झालेल्या डोळ्यांमधून तिला काय वाटतंय ते समजत होतं.

"मी पोहोचेपर्यंत तू थोडी वाळलेली असशील. घरी जाऊन गरम पाण्याचा शॉवर घे म्हणजे जरा सेटल होशील!" मी जीभ दाखवली. तिने पाण्यात जोरात हात आपटून माझ्या अंगावर सपकारा मारला आणि हसत बसली.

मी पाण्यात उतरून चालताचालता दोन्ही हातानी ओले केस डोक्यावर मागे घेतले आणि मागे वळून डोळा मारला. मला माहिती होतं, ती बघत असणार. हेल! आम्ही अजूनही एकमेकांवरून नजर हटवू शकत नाही. काही गोष्टी कधीच बदलत नाहीत हेच खरं.

क्रमशः

राजाराम तलाव
images_1_1.jpeg

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ८

पलोमा

मी घरी येऊन खरंच गरम पाण्याचा शॉवर घेतला आणि फॅनखाली केस वाळवत बसले. इतक्या वर्षानंतर फुटबॉल, रनिंग, स्विमिंग सगळं एकामागोमाग एक करून माझी तर हवाच गेली. पायांची जेली झालीय. समरला सांगायला पाहिजे, मी त्याची ट्रेनर नाहीय. रोज नाही करू शकत बाबा इतकं. लहानपणी ठीक होतं. आता तो ॲथलीट आहे, मी नाही.

मी चेहऱ्यावर वारा घेत डोळे मिटले. पाण्यात तो कसा दिसत होता ते आपोआप डोळ्यासमोर आलं. माझ्यात अडकलेले त्याचे डोळे आणि वरून आमच्यावर चमकणाऱ्या किरणांमधून उडणारे बारीक लाल सोनेरी कण. लहानश्या ठिणग्यांसरखे! समर... मी बघितलेला सगळ्यात गुड लुकिंग मुलगा होताच  पण आता तो जास्तच अट्रॅक्टिव झालाय. सहजपणे, कुठल्या ट्रीटमेंट्समुळे नाही. त्याच्या दाट केसांतून रुंद खांद्यावर टपकणारं पाणी... त्याला स्पर्श करण्याचा मोह मी कसाबसा आवरला होता.

मी दोन्ही हातांनी तोंड झाकून एक लांब श्वास सोडला. पलोमा, आवर स्वत:ला. डोकं ताळ्यावर आण.

मी उठून कपाट उघडलं आणि ड्रेसेस बघत बघत शेवटी पिवळा लखनवी कुर्ता आणि पांढरी सिगारेट पँट फायनल केली. केस विंचरून छोटा क्लचर लावला. सी सी क्रीम, कॉम्पॅक्ट आणि लायनर लावला. लिपस्टिक लावता लावता फोन वाजला.

हरीश चौहान नाव फ्लॅश होत होतं. मी दिल्लीत असताना स्पोर्ट्स सर्किटमधल्या काही मित्रांकडून त्याची ओळख झाली होती आणि आम्ही दोन चारवेळा एकत्र मुव्हीज, जेवायला वगैरे गेलो होतो. जस्ट कॅज्युअल डेटिंग. त्याचा बिझनेस होता आणि एका फुटबॉल टीमच्या चार ओनर्सपैकी तो एक होता. मला मुंबईत जॉब मिळाला आणि आम्ही जे काय सुरू होतं ते थांबवलं. पण तो अधेमध्ये फोन करून काँटॅक्टमध्ये राहिला होता. आश्चर्यच होतं कारण आमच्यात तेवढी घट्ट मैत्रीसुद्धा नव्हती. काही म्युच्युअल फ्रेंड्स होते. त्यामुळे त्याच्याबरोबर बाहेर फिरायला मजा आली होती एवढंच.

"हे हॅरी!" मी लिपस्टिक हातात फिरवत बेडवर बसले. केस अजूनही थोडे ओलसर होते. आज मी राजाराम तलावात पोहायला उतरेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण समर! त्याच्याबरोबर असताना काहीही होऊ शकतं!

"हाय पलोमा! हम कुछ दोस्त एक फ्रेंडकी बॅचलर पार्टी के लिये कोलापूर आ रहे है!"

"रियली? कोल्हापूर तो इतना पॉप्युलर पार्टी डेस्टिनेशन नही है!!" मला हसायलाच आलं.

"हां लेकीन दोस्त ने सब अरेंज करके रखा है और बोर हुआ तो हमने गोआका ऑप्शन भी ओपन रखा है."

"साउंडस् ग्रेट! तो प्लॅन क्या है?"

"कुछ नहीं, बस उसके फार्महाऊस पर दो दिन रहेंगे और पार्टीशार्टी करेंगे. कहीं ड्रिंक्स के लिये मिले?"

"अम्म, वैसे यहा कुछ नाईट लाईफ तो है नही, बट लेट्स ट्राय. कब आ रहे हो आप लोग?" मी जरा कंटाळून विचारलं.

"अभी टू वीक्स हैं, आनेसे पहले डिटेल्स भेजता हुं. फिर तुम बोलो कहां मिलना है. आय मिस यू,पलोमा!"

आं! हे कुठून आलं!! मी हसायला लागले. "सच में!?"

तोही हसला. "इतना सरप्राइज मत हों, लोग मिस करते है तुम्हे! तुम्हे शायद पता नहीं, क्यूंकी तुम्हारा एक पैर हमेशा दरवाजे के बाहर रहता है. तुम किसीको मिस करने जितना पास ही नहीं आने देती..."

"मुझे पता था, मुझे दिल्ली में नहीं रहना. जब बाहर ही जाना है, तो किसीसे क्लोज होने का कोई मतलब नही बनता. बट आयाम शुअर, यू आर डूईंग फाईन रोमिओ!" मी हसतच म्हणाले. मला पहिल्यापासून तो किती फ्लर्ट माणूस आहे ते माहिती होतं. पण मजेशीर होता, त्याचा काही त्रास नव्हता. मी सिरीयस नव्हतेच त्यामुळे त्याच्या वागण्याचा मला काहीच तोटा नव्हता.
"ओके देन, टेक्स्ट मी."

"लूकिंग फॉरवर्ड टू इट! मिलते है!" म्हणून त्याने कॉल कट केला. मी पटकन लिपस्टिक लावली. केसातून हात फिरवला. कानात छोटेसे चांदीचे झुमके अडकवले तोच डोरबेल वाजली. घाईत बाहेर जाऊन दार उघडलं तर समर!

त्याने चक्क लाईट ब्लू जीन्स आणि ब्लॅक शर्ट घातला होता. बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या. "गोड दिसतेयस! आपण पिझ्झा घेऊन जाऊ, पप्पांना आवडतो. तिथे बोलताना मध्येच डिलिव्हरीचा डिस्टर्बंस नको. मी त्यांना तू येतेय म्हणून सांगितलं नाही. मस्त सरप्राइज देऊ!"

माझ्या पोटात गोळा आला. त्याचे आईवडील मला आवडायचे पण माझ्यावर किती नाराज असतील या विचाराने मला कसंतरी झालं. मला माहिती आहे, मी अचानक समरला सोडून गेल्यामुळे त्यांना विचित्र वाटलं असेल, कारण माझ्याही घरी वाटलं होतं.

पण मी बरोबर गोष्ट केली होती. समरसाठी आणि माझ्यासाठीही.

"मस्तच!" मी जरा हसले आणि चपला घालून बाहेर पडले. जाताजाता रस्त्यात हेवनसमोर थांबून (हेवनवाला प्रचंड चीज घालतो, पण पप्पांना तेच आवडतं. काय करणार!) मी दोन लार्ज पिझा, चीज गार्लिक ब्रेड, पेरीपेरी फ्राईज वगैरे भलंमोठं पार्सल घेऊन स्कॉर्पिओमध्ये बसले. तो काळा गॉगल आणि कॅप घालून तोंड वळवून बसला होता. सेलिब्रिटी लाईफ!

आम्ही त्याच्या घराच्या गल्लीत वळलो आणि अचानक माझ्यावर आठवणींची लाट येऊन आदळली. कायम सायकलवर टांग मारुन इथे येणं. त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून काहीतरी खात त्याच्या आईशी मारलेल्या गप्पा. बऱ्याचदा तर काकी माझे केस विंचरून सागरवेणी घालून द्यायच्या. नागपंचमीला त्यांच्यासारखी रेखीव मेंदी आमच्या गल्लीतल्या एकाही मुलीला जमायची नाही. मग मी माझी गडद लाल रंगलेली मेंदी दाखवत मिरवायचे. काका सुट्टीवर आलेले असतील तेव्हा खूप गप्पा मारायचे. जास्त करून फुटबॉल आणि क्रिकेट. आणि गाणी! त्यांचे माझे आवडीचे विषय. मॅराडोना आणि गावस्कर म्हणजे त्यांचे देवच! कोल्हापूरला येताना हमखास माझ्यासाठी पण काहीतरी गिफ्ट असायचं. नॉर्थला असतील तेव्हा कायम गोडगोड अंगूरी पेठा!

"पलो.. नर्व्हस होण्यासारखं काहीच नाहीये." तो वळून गाडी पार्क करताना म्हणाला.

मी मान हलवली. "आय नो. मी बहुतेक त्यांना खूप मिस केलं."

"मग हे सांगणं एवढं कठीण का आहे?"

"माहीत नाही." डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून मी पटापट पापण्यांची उघडझाप केली. मी रडूबाई नव्हते. आपल्या भावना कंट्रोल करायला मी कधीच शिकले होते. पण इथे येऊन, समरच्या आजूबाजूला राहून ते खूप चॅलेंजिंग होतं.

"मुंगी एका भल्यामोठ्या हत्तीला कसं खाते?" त्याने विचारल्यावर मी हसले. हत्तीमुंगी जोक! शाळेत असताना खेळून झाल्यावर घरी होमवर्क करायला, लिहायला त्याच्या जिवावर यायचं. तो जाम चिडचिड करायचा, त्याला बाहेर खेळायचं असायचं. बऱ्याचदा आम्ही एकत्र अभ्यास करायचो. मग त्या वह्यांच्या पसाऱ्याकडे बघून मी त्याला विचारत असे, हा हत्ती कसा संपवायचा?

"एका वेळी एक घास, सावंत!" हसून मी सीटबेल्ट काढला आणि खाली उतरले.

त्याने खांद्यावर हात ठेऊन मला जवळ घेतलं आणि आम्ही लिफ्टमध्ये शिरलो. "मी शेजारच्या पाटलांचा फ्लॅटपण विकत घेतला. आता पूर्ण फ्लोर आपलाच आहे." पाचव्या मजल्याचं बटन दाबताना त्याने सांगितलं. "भारी!"

दाराबाहेर काकींची नेहमीची रांगोळी आणि संध्याकाळी धूप कोन जाळल्याचा चंदनी सुगंध हलकासा दरवळत होता. दाराला खणाच्या पताकांचे तोरण होते. त्याने खिशातून किल्ली काढून लॅच उघडलं आणि माझ्या पाठीवर हात ठेऊन आत घेऊन गेला. तो राळ आणि धुपाचा वास मला लहानपणात घेऊन गेला. काकीना मैसूर सँडलचा धूप फार आवडायचा.

हॉलमधले उन्हाचे कवडसे, मोठ्या काचेच्या बोलमधले गोल्डफिश, हसण्याचे आवाज, मजा...

"हॅलो!! मी आलोय!" समर मोठ्याने म्हणाला.

तोंडासमोरचा पेपर खाली ठेवून, चष्मा डोक्यावर सरकावत काका हॉलला जोडलेल्या टेरेसमधून डोकावले. "पिझ्झाचा वास येतोय का गं ?" म्हणत ते पुढे आले. त्याचवेळी काकी हसत किचनकडून आल्या. समरशेजारी उभ्या मला बघून दोघेही एकदम चमकले. काकीनी आ वासला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला न कळणारे भाव चमकून गेले. त्या थोड्या पॅनिक झाल्यागत वाटल्या पण लगेच हसत पुढे आल्या. "आली ग बाई आली. आम्ही तुझी किती आठवण काढली पले.. किती वर्ष!!" येऊन त्यांनी एकदम मला मिठीच मारली आणि मी थांबवण्यापूर्वीच माझ्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं. मी त्यांच्या पाठीवर थोपटलं आणि सुकसुक करत अजून रडायचे कढ आवरले. काकींचं वजन कमी झालं होतं आणि गाल अगदी ओघळले होते. आईबाप आपलं करता करता किती लवकर म्हातारे होतात... आपल्या विश्वात आपल्याला कळत देखील नाही.

"अग बाई त्या पोरीला श्वास तरी घिऊंदेत!" ऐकून त्या बाजूला झाल्यावर "ये ये पलोमा. वेलकम!" म्हणत काकांनी माझ्या पाठीवर थोपटलं. त्यांचं आता पूर्ण तुळतुळीत टक्कल झालं होतं आणि चष्मापण लागलेला दिसत होता. समरचे दाट केस आईकडून आलेले असावे. मी त्यांच्याशी बोलायला लागले आणि काकी समरजवळ सोफ्यावर बसून बोलू लागल्या. काहीतरी ऑकवर्ड वाटतं वगैरे शब्द माझ्या कानापर्यंत पोचले. त्यांनी आत्ताच मला ज्या प्रेमाने मिठी मारली, त्यावरून माझ्या येण्याने त्यांना ऑकवर्ड वाटलं असेल असं काही वाटत नव्हतं.

"हेय हँडसम!" मधात घोळवल्यासारखा गोड आवाज आला आणि मी काकांशी बोलताना वळून मागे पाहिलं. किचनच्या दारात स्किनी ब्लॅक जीन्स आणि एक सिल्की आकाशी टॉप घालून द कश्मिरा बर्वे उभी होती.

समरने पिझ्झाचे बॉक्स सेंटर टेबलवर ठेवत तिच्याकडे, आमच्याकडे, परत तिच्याकडे बघितलं आणि उठून तिच्याजवळ गेला. ती ऑल्मोस्ट त्याच्याएवढीच उंच आणि यमीपेक्षा दहापट गोरी होती, ब्लॉन्ड हायलाईटस् केलेले केस फॅशनेबल लेयर्समध्ये तिच्या कंबरेपर्यंत रुळत होते आणि ओठांवरची ब्राईट रुबी रेड लिपस्टिक लक्ष वेधून घेत होती.

"कॅश!" म्हणत समर जवळ येताच तिने त्याला मिठी मारली आणि स्टाईलमध्ये गालाला गाल लावून हवेत किसेस दिले. मी त्यांच्यावरून नजर हटवूच शकत नव्हते. ते एकमेकांशेजारी अगदी बॉलिवूड पॉवर कपल दिसत होते. कश्यामुळे माहीत नाही, माझं हृदय खूप काळापासून बंद पडलं होतं. पण आईशप्पत, या क्षणी त्याचा पूर्ण चक्काचूर झाला. एकदम विषय कट!! तेही ह्या किचनमध्ये जिथं मी अख्खं लहानपण घालवलं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ९

पलोमा

काकांना बहुतेक माझी अवस्था समजली. त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं. काकींनी माझ्याकडे बघून काळजी करू नको अश्या अर्थाने मान हलवली. मी आत आल्यावर त्या का ऑकवर्ड होत्या त्याचं कारण आता कळलं.

"तू इथे कशी काय?" समरने गळ्यातून तिचे हात सोडवत विचारले. तो माझ्यासमोर नाटक करतोय का? त्यांच्यात काहीतरी चालू आहे आणि मला कळू द्यायचं नाही, असं आहे का? पण कशाला, मी त्याची कोणीच नाहीये. आमच्यात काहीच नाहीये त्याचं कारण मीच आहे. माझीच चूक आहे.

मग त्याला तिच्याबरोबर बघून मला इतका त्रास का होतोय? मी त्यांना कितीतरी वेळा एकत्र फोटो, व्हिडीओमध्ये पाहिलंय. इन्स्टावर फॅन्सनी एडिट केलेले रिल्स पाहिलेत. पण आत्ता समोर ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो तिचाच असल्यासारखं बघतेय. कितीतरी वर्षात काळजात अशी कळ उठली नव्हती. कारण अशी वेळ न येऊ देण्याची काळजी मी घेत होते. समरबरोबर काम करायला हो म्हणणं ही माझी मोठी चूक होती.

मला नाही अडकायचं कुठल्या माणसात. हे सगळं मला अती होतंय. इथून पळ काढायची तीव्र इच्छा होते आहे. इतक्या वर्षात सगळ्यात तीव्र, पुन्हा त्यात काही अर्थच नाही.

"आय नो, तू इथे एकटा राहून स्वतःवर काम करायला आला आहेस." कश्मीराने पुन्हा त्याचा हात हातात घेतला. तिची लांब नखं ओठांना मॅचिंग होती. पुन्हा ती त्याच्यावर आपला हक्क दाखवत होती. "आपलं इतक्या दिवसात काही बोलणं झालं नाही, सो मी तुला थोडं मिस करत होते. आज इथे एका ज्यूलरी शोरूमच्या ओपनिंगसाठी आले होते तर म्हटलं काकूंना भेटून जाऊया. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, एक रेड कार्पेट इव्हेंट आहे त्यात तू सोबत येशील का म्हणून."

ओके. म्हणजे तो खोटं बोलत नव्हता. टेक्निकली ते एकत्र नाहीत पण तिचं वागणं असं दिसतंय की ते तिला असायला हवे आहेत. त्याने तिचा हात अजुनही सोडला नव्हता. माझ्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या. काका माझ्याकडे बघून भुवया उंचावून हसले.

"कश्मीरापण अचानक मला सरप्राइज द्यायला आली. मी समरला फोनच करणार होते तेवढ्यात तुम्हीच आलात!" काकी माझ्याकडे कटाक्ष टाकून म्हणाल्या म्हणजे मला कळेल की ती ठरवून आली नव्हती. बरोबर आहे, तिलाही मी येतेय ते माहीत नव्हतं. आयदर वे, इट डझंट मॅटर. त्यांनी डेटिंग केलं होतं आणि तिच्याकडून ते अजूनही संपवायची ईच्छा दिसत नव्हती.

"कॅश, ही डॉ. पलोमा फुलसुंदर, माझ्याबरोबर काम करते आहे."

"हाय पलोमा, मी कश्मीरा! इट्स नाइस टू मीट यू!" कश्मीराने हात पुढे केला.

"नाइस टू मीट यू, टू!" मी खोटं हसत हात मिळवला. मी तरी काय कडू बेनं असल्यासारखं वागतेय! टोटल हीपोक्रिट!! ह्या बाईचा मला खूप राग येतोय आणि मी तिला ओळखतसुद्धा नाही. त्या रागालासुद्धा काही कारण नाही.

"मग? काय झालंय आमच्या समरला?" तिने लाडीकपणे विचारत वर समरकडे पाहिले आणि ओठांवरुन जीभ फिरवली.

आमच्या???

तिला तो हवाय. तिला हवा असलेला कोणीही माणूस मिळू शकतो. कदाचित त्याचं लग्न होईल, सुंदर मुलं होतील आणि ते प्रत्येक मॅगझिन कव्हरवर असतील. बॉलिवूड पॉवर कपल!

"अजून त्याच्यावर काम सुरू आहे." मी किंचित खाकरत म्हणाले. शिट, माझा घसा बंद होतोय. इथे सगळ्यांना पुरेसा श्वास घ्यायला येतोय का?

"पिझ्झा कोण कोण खाणार?" कश्मीराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने आत जाऊन प्लेट्स आणल्या.

"अं, एस्क्युज मी.. मला वॉशरूमला जायचय." म्हणत मी काकांशेजारून निघाले. समरची नजर माझ्यावर खिळून होती.

इथे दुसरा दरवाजा असता तर मी नक्की पळून गेले असते. घरी जाऊन, बॅग भरून कोल्हापुरातून काढता पाय घेतला असता. इथे सगळंच हर्ट होतंय. म्हणूनच मी इथून लांब रहात होते.

पण परत आले आणि ते सगळं आता अंगावर येतंय. अवघड आहे एकूण.

समर

कश्मीराचा फोन वाजला आणि ती कॉल रिसिव्ह करायला काचेचं दार सरकवून टेरेसमध्ये गेली. आईने माझ्याकडे पाहिलं. मी पटकन प्लेट्स तिच्या हातात देऊन पलोमाला हुडकत निघालो.

तिच्या डोळ्यात तोच पूर्वीचा लूक होता, जो मला सांगत होता की ही आता पळणार.

तशीच पॅनिक, तशीच भीती, सगळं तिथेच होतं. हे सगळं कधी नाहीसं झालंच नव्हतं. दहा वर्षांपूर्वी तिने असंच सगळं संपवलं होतं. हेडलाईटसमोर आलेल्या सश्यासारखं, ज्याला बाकी काही ऐकू येत नाही फक्त पळायचं कळतं.

माझ्या बेडरूममध्ये जाऊन मी बाथरुमच्या दारावर अलगद नॉक केलं. "पलोमा."

"ओह, आलेच. एक मिनिट."

"दार उघड." मी शांतपणे बाहेर ऐकू न जाण्याची काळजी घेत म्हणालो.

तिने दार किलकीलं केलं. मी लगेच तिला ढकलत आत घुसलो आणि माझ्यामागे दार बंद केलं.

"काय करतोयस तू?" ती रागाने भिंतीच्या थंडगार टाईल्सना टेकून लांब श्वास घेत म्हणाली. तिची भीती लपवायला ती चिडून दाखवत होती. मी तिला चांगलाच ओळखतो.

"तुला पळून जायची गरज नाही. इथे तसं काहीही चाललेलं नाही." मी तिच्या जवळ पाऊल टाकत म्हणालो.

"मी कुठेही पळून जात नाहीय." ती बोलत असताना मी अजून तिच्यासमोर गेलो. "तू समजतोस काय स्वत:ला? तुला काय वाटतं, तू माझ्या मनातलं सगळं ओळखतोस?" तीही रागाने पुढे झाली आणि आम्ही एकमेकांवर धडकलो. तिने हनुवटी वर करून रागात माझ्याकडे पाहिलं. ओह, मी हिच्याहून सुंदर मुलगी कधी पाहिली होती का? नितळ त्वचा, नॅचरली टपोरे ओठ, सरळ नाक, हृदयाचा ठाव घेणारे मधाळ डोळे.

"हो. तू किती खुळ्या टाळक्याची आहेस ते मी चांगलं ओळखतो! आता बुक्का पाडून टाक. ती माझी फक्त मैत्रीण आहे, अजून काही नाही." मी ठामपणे म्हणालो. एव्हाना माझे दोन्ही हात तिच्या चेहऱ्याचा दोन्ही बाजूला भिंतीवर टेकले होते. आता ती पळून जाऊच शकत नाही.

"ती तुझी कोण लागते त्याची मी कशाला काळजी करू?" ती पुन्हा मागे सरकत भिंतीला टेकली. मी नकळत अजून पुढे झालो.

"मला माहित नाही पलो, तूच सांग." मी तिरकस हसलो.

काहीही उत्तर न देता अचानक तिने चवडे उंचावले आणि तिचे ओठ माझ्या ओठांवर आदळले. मऊ, ओलसर ओठ! तिच्या ओठांमध्ये मला माझीच भूक जाणवत होती. स्वतःला थांबवण्यापूर्वीच मी तिला उत्तर द्यायला लागलो. कानातले सगळे आवाज बंद पडले. तिला भिंतीशी दाबून ठेवून मला तिच्यावर पूर्णपणे माझा हक्क गाजवायचा होता.

पण मी तसं वागू शकत नाही. जोपर्यंत ती मोकळेपणाने मला सगळं सांगत नाही, तोपर्यंत नाहीच. न सांगता सवरता ती आधीच एकदा माझ्यापासून लांब गेली होती. आता नाही. ते तिलाही जाणवलं असावं कारण माझ्या छातीवर हात ठेवून ती मागे सरकली.

"हे चुकून झालं." ती खालमानेने म्हणाली.

मी डोळे फिरवले. "तुझ्या भंकसचा तुला कंटाळा  येत नाही का ग?" मी बेसिनकडे जाऊन तोंडावर पाणी मारलं. मला ह्या छोट्याश्या जागेत काहीतरी डिस्ट्रॅक्शन हवं होतं. हवा जरा जास्तच गरम झाली होती आणि माझा स्वतःवरचा कंट्रोल निघून जात होता.

"कसली भंकस?" तिने आरशात माझ्याकडे बघत विचारलं.

"तू बाथरूममध्ये पळून आलीस. बहुतेक इथून सटकायचा प्लॅन करायला. मग मला किस केलं आणि वरून ते चुकून केलं म्हणतेस! मला काय झ्यांग समजलईस काय!"

ती पुन्हा भिंतीला टेकली. " तूss तू मला किस केलंइस, बाद माणसा!"

"मला नाही वाटत तसं!" मी तिरकस हसत म्हणालो. नळ बंद करून, टॉवेलने हात तोंड पुसून मी टॉवेल जागेवर ठेवला. "आता तुझी टिवटिव बंद करून बाहेर ये. पिझ्झा खा, त्या हिरोइनीशी चार शब्द बोल, आईपप्पाना भेट. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर." म्हणत मी दाराकडे गेलो.

"हे खूप होतंय समर. आत्तासा आपण भेटून एक आठवडाही झाला नाही. जुन्या खूप आठवणी वर येतायत." तिने मान हलवली. ॲटलीस्ट आता ती खरं बोलत होती.

"निवांत रहा. कसलाही अती विचार करू नको. तुला मला किस करायची इच्छा झाली, तू केलास. टाळ्या!" मी हसत तिच्यासाठी दार उघडायला हात पुढे केला.

"मी नाही, तू केलास किस. एवढा ॲरोगंट कधी झालास रे!" तिने माझ्या हाताला जोरात चिमटा काढला. मी ओरडलो आणि दाराबाहेर डोकं काढून कोणी जवळपास नाही ना ते चेक केलं.

मी मागे वळून तिच्या चेहऱ्यावर वाकून तिच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे विस्फारले पण मी ओठांनी तिच्या ओठांना कळेनासा स्पर्श करत कुजबुजलो. "ॲरोगंट नाही, ऑनेस्ट." आणि तिच्या कानाच्या पाळीचा किंचित चावा घेऊन बाजूला झालो. ती बारीक आवाजात किंचाळली.

"समर ss सगळं ठीक आहे ना?" हॉलमधून आईने विचारलं. तेव्हाच कॉल संपवून कश्मीरा आईजवळ काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला. "जा." मी तिला बाथरूमच्या दाराबाहेर काढलं.

"मी का आधी जाऊ? तू जा." ती फिस्कारून मला खांद्याने धक्का देत म्हणाली.

"कारण तू इथे पळून आलीस. इतका वेळ काय तू चिपळून - कोल्हापूर करतेय असं सांगू का बाहेर!" मी गालात हसत म्हणालो. शरमेने तिचे गाल तांबूस होताना बघून मला मजा वाटत होती.

"वांडर कुठलं!! जाते मी आधी." ती पटकन वळत माझ्या तोंडावर केसांचा सपकारा मारुन बेडरूमच्या दाराकडे गेली.

मी बाथरूममध्ये जाऊन पुन्हा तोंडावर पाणी मारलं. आमच्या रियूनियनमुळे एकटी पलोमाच अफेक्ट झाली नव्हती.

आमच्यातला बंध अजूनही तसाच होता, मध्ये इतकी वर्ष जाऊनसुद्धा. मी एकीकडे विचार करत होतो की ही फक्त मी तयार केलेली तिची इमेज असू दे. ती आता बदलली असेल. पण नाही. ती तीच माझी जुनी पलो आहे, जिच्या मी एवढी वर्ष प्रेमात होतो. मी असा माणूस नाहीय जो फक्त आम्ही एकत्र नाही म्हणून त्या व्यक्तीवर प्रेम करणे बंद करेल.

पण त्याचवेळी मी आता जुना, खुळा समर राहिलो नाही. फक्त मला हवी, म्हणून सगळं विश्व मला हवी असलेली गोष्ट पुढ्यात आणून ठेवेल असा आंधळा विश्वास मी ठेवत नाही. हृदयाचे दोन तुकडे होणं म्हणजे काय ते मी एकदा अनुभवलं होतं आणि ते मला आत्ता बाथरूममध्ये किस केलेल्या मुलीनेच केले होते. ते लक्षात ठेवण्याइतका शहाणा मी नक्कीच आहे.

मी बाहेर गेलो तर सगळे सोफ्यावर बसून गप्पा आणि खाण्यात गुंग होते. थ्री सिटर सोफ्याच्या एका बाजूला कश्मीरा आईला तिच्या कुठल्या तरी नव्या मुव्हीबद्दल सांगत होती. दुसरीकडे पप्पा त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं गजल आणि कोक स्टुडिओचं कलेक्शन सिंगल सोफ्यावर बसलेल्या पलोमाला दाखवत होते. मी येताच पलोमाचे डोळे माझ्यात गुंतले पण तिने लगेच नजर हटवून पप्पांशी बोलायला सुरुवात केली.

मी कश्मीराशेजारच्या सिंगल सोफ्यावर बसलो कारण तेवढीच जागा शिल्लक होती.

"अरे चॅम्प, आपण तू शेवटची इथे आल्यानंतर खेळलोच नाही. खेळणार का?" पप्पा जोरात म्हणाले.

"अहो! आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतं, जरा हळू बोला." आईने फ्राईज खाता खाता त्यांच्याकडे बघत मान हलवली.

"ती कसली चॅम्प होती?" कश्मीराने मला विचारत तिच्या पिझ्झावरचं टॉपिंग काढून सगळा क्रस्ट माझ्या प्लेटमध्ये ठेवला. ह्या सगळ्या हालचालींवर पलोमाची नजर होतीच. खरं तर त्यात काही खोल अर्थ वगैरे नव्हता. कश्मीरा कार्बफ्री डाएट वर आहे आणि मी कार्बस किंग आहे. आम्ही डेटवर असताना असं करत होतो. आता ती इथे आज अचानक टपकली पण मी माझ्या सगळ्याच मित्रांना कधीही गरज लागली तर मदत करतो. तशी तिला करतोय. मी असाच आहे आणि शंभरातले नव्याण्णव कोल्हापुरी लोक असेच असतात.

"झब्बू! गड्डेरी झब्बू चॅम्प आहे मी!" पलोमा जरा शरमून हसत म्हणाली.

"ओह, मी हे कधीच खेळले नाही." कश्मीरा गार्लिक ब्रेडचा अगदी छोटा तुकडा उचलत म्हणाली.

"देवाss जग कुठे चाललय! एकजण दहा वर्षात खेळली नाही न दुसरी कधीच खेळली नाही!" पप्पा पत्ते पिसत म्हणाले.

"त्या बिझी आहेत. तुम्हाला काय, आता आयुष्यभर झब्बूच खेळायचाय." आई पलोमाला टाळी देत खळखळून हसल्यावर सगळेच हसले.

कश्मीरा त्यांच्याकडे बघून माझ्याकडे वळली. काही सेकंद बघत राहिली आणि पुन्हा तिने चीजचे चित्रविचित्र आकाराचे तुकडे शिल्लक असलेली तिची प्लेट हातात घेतली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १०

कश्मीरा तिला काही कॉल करायचे आहेत सांगून टेरेसमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसली. आम्ही झब्बू सुरू केला. पलोमा नेहमीप्रमाणे पटकन सुटत होती. मध्येच पप्पांनी जमुना उघडायची टूम काढली. "गेली तीन चार वर्ष त्यांना हे नवीन खूळ चढलंय." आई पलोमाला सांगत होती. "घरगुती वाईन! द्राक्ष म्हणू नको, अननस म्हणू नको, आंबा म्हणू नको एक फळ म्हणून शिल्लक ठेवलं नाही त्यांनी."

"हातभट्टी म्हण! एवढं अल्कोहोल असतं त्यांच्या वाइनमध्ये." मी पत्ते जमवत म्हणालो.

"ही जांभळाची आहे. म्हणून जमुना! टेस्ट तर करून बघा.." पप्पांनी सगळ्यांसमोर अर्धे भरलेले मोठे वाईन ग्लासेस ठेवले. कश्मीराने कार्बस नको म्हणून आधीच वाईन नको सांगितलं होतं.

"एवढीच बास!" मी आणि आई एकदम म्हणालो.
"काका मी देते कंपनी तुम्हाला. जमुना बेश्टे एकदम!" पिता पिता अंगठा दाखवत पलोमा म्हणाली.

"जरा मूड बनवतो, थांबा" म्हणत त्यांनी रिमोट उचलून म्युझिक प्लेअर ऑन केला. मी आणि आईने पलोमाकडे काही खरं नाही! असा लूक दिला.

अली सेठी गात होता.

चाँदनी रात
बड़ी देर, के बाद आई है
लब पे इक बात
बड़ी देर, के बाद आई है...

आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितलं.

ना खुले आँख
अगर ख्वाब है, तो ख्वाब सही
ये मुलाकात
बड़ी देर, के बाद आई है
चाँदनी रात
बड़ी देर, के बाद आई है...

मी हळूच माझा अर्धा ग्लास पपांच्या ग्लासात ओतला. आमचे एकावर एक डाव सुरूच होते.

शेवटी खेळता खेळता आम्ही दोघेच उरलो आणि शेवटच्या क्षणी तिने सगळे पत्ते टाकून माझ्यावर भलामोठा झब्बू चढवला. "यास्स!" ती हवेत पंच मारुन उभी राहिली.

पप्पा त्यांचा ग्लास उंचावून चीअर्स म्हणाले. "पदाचा मान राखला पोरीने!"

"मग काय, ह्यात चॅम्प आहेच मी!" तिने हसत खाली बसून वाईन भरलेला तिसरा ग्लासपण संपवून टाकला. मी तिला डोळे दाखवल्यावर पप्पा हसले. "काय लेका, ही एकटी माझ्या कलेला दाद देते बघ!" मी काही बोलण्यात अर्थ नाही अशी मान हलवली.

तेवढ्यात कॉल संपवून कश्मीरा आत येऊन बसली. "समर, आयाम सो टायर्ड.. आपण निघायचं का?"

ऐकताच पलोच्या भुवया डोक्यात गेल्या आणि ठसका लागून तोंडातून वाइनचा फवारा उडाला. तिला बहुतेक कश्मीरा माझ्या घरी राहणार असं वाटलं. फवाऱ्यातले निम्मे लाल-जांभळे थेंब कश्मीराच्या आकाशी रंगाच्या टॉपवर उडाले. ' ओ नो नो नो.." करत ती वैतागून टॉप झटकत उभी राहिली. पप्पा हसायला लागले. आईने घाईघाईत पलोला पाणी प्यायला दिलं आणि मी कश्मीराला टिश्यू पास केले.

"आय एम सो सो सॉरी, ठसका लागला बहुतेक. तू टीशर्ट घालशील का? मी हा टॉप माझ्या घरी नेऊन, धुवून परत देते तुला." पलोने विचारलं.

"नको, नको. हे प्योर सिल्क आहे, ड्राय क्लीन करावं लागेल." तिने पलोला जबरदस्तीचं स्माईल दिलं आणि माझ्याकडे पाहिलं. ती कंटाळली होती आणि चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. पलोमा हात वर करत पुन्हा एकदा सॉरी!! म्हणाली आणि तिने आईकडचा नॅपकीन घेऊन टेबलावर सांडलेली वाईन पुसायला सुरुवात केली.

"ओके! आम्ही निघतो. पलो, तुला ड्रॉप करतो आधी." तो शॉर्टफॉर्म ऐकून कश्मीराने चमकून माझ्याकडे पाहिलं. आता हिला काय प्रॉब्लेम आहे! आमचं ब्रेकअप होऊन जवळपास सहा सात महिने झाले होते. आम्ही क्वचित टेक्स्ट, कधीतरी कॉल असं बोलत होतो. एखादा इव्हेंट अटेंड करत होतो. बस. ब्रेकअप आम्ही ठरवून केलं होतं, सगळं इतकं कॅज्युअल होतं की त्यात ब्रेक करायला काही नव्हतंच म्हणा.

"काही गरज नाही. मी रिक्षा करेन." पलोमा उठून टेबलाजवळ जराशी अडखळली.

मी किल्ली उचलून दरवाज्याकडे गेलो."तू रात्रीची एकटी घरी जाणार नाहीयेस. पाऊसपण येतोय. गाडीत जाऊन बस."

"काकी, हा कायम एवढा बॉसी होता?" तिने लिफ्टची वाट बघताना आईला विचारले.

"जन्मापासून! फक्त तू त्याला बरोबर उत्तर द्यायचीस." आई हसत म्हणाली आणि तिने पलोमाचा खांदा थोपटला. "समरशी भांडलीस तरी आम्हाला भेटायला येत जा." 

कश्मीरा लिफ्टमध्ये शिरून आमचा फेअरवेल कार्यक्रम बघत होती. ती फार प्रेमळ वगैरे नव्हती. फ्रेंडली होती, सुंदर, स्मार्ट, इंडिपेंडंट मुलगी. पण मिठ्या मारणं आणि गप्पा मारणं हा तिचं एरिया नव्हता. ती सेलिब्रिटी असणं मनापासून एन्जॉय करत होती. रेड कार्पेट गर्ल!

शेवटी एकदाचे आम्ही पार्किंगमध्ये पोचलो. पलोमा सवयीने पुढे बसायला गेली आणि तिला उचकी लागली. हसत तिने खिडकीतून आमच्याकडे बघितले आणि पुन्हा खाली उतरली. "ऊप्स, सॉरी तुला 'तुझ्या ' समर शेजारी बसायचं असेल! मी मागे जाते." म्हणून आमच्या ऑकवर्ड चेहऱ्यांकडे न बघता ती ड्रायव्हर सीट मागे जाऊन बसली. कश्मीरा नाखूषीनेच स्कॉर्पिओमध्ये चढली. आम्ही जेव्हाही एकत्र बाहेर गेलो, तिने कायम हाय एंड गाडीच प्रिफर केली होती.

पलोमाने ड्रायव्हर सीट आणि शेजारच्या सीटमध्ये असलेल्या फटीतून माझ्या सीटच्या पाठीला डोकं टेकलं आणि लांब श्वास सोडला. "खूप बरं वाटतय. मी काका काकींना इतकं मिस करत होते हे मलाच कळलं नव्हतं."

"मी बोललो होतो, तुला बघून ते खूप खूष होतील म्हणून.." मी गाडी मेन रोडवर घेत म्हणलो.

थोडावेळ पलोमाची बडबड ऐकत आम्ही तिच्या रेंटेड घरापाशी पोचलो. गेटबाहेर गाडी थांबवून मी कश्मीराकडे नजर टाकली. आता तर ती खूपच वैतागलेली दिसत होती. पलोमाने पुन्हा एक उचकी दिली. "आय एम सॉरी! आईशप्पत, ती वाईन म्हणजे खरंच हातभट्टी होती. वाऱ्यावर मला जास्त चढली बहुतेक." तेवढ्यात ती दार उघडुन खाली उतरली. "ओके, बाय बाय. यू टू एन्जॉय.." म्हणत ती पुढे जाऊन ओल्या रस्त्यावर थोडी घसरली. "आय एम ओके, आय एम ओके.." ती दोन्ही हात वर करून, हळूहळू न घसरता चालायचा प्रयत्न करत म्हणत होती.

"थांब तिथेच, मी येतच होतो ना?" म्हणून मी खाली उडी मारली. कश्मीरा आता वैताग विसरून किंचित हसायला लागली.

मी पळत जाऊन तिचा हात पकडला. पण तिच्या गुळगुळीत सोल असलेल्या चपलांमुळे ती घसरत होती. मग मी सरळ तिला उचलली आणि दरवाजात नेऊन खाली ठेवली. तिने पर्समध्ये शोधून किल्ली बाहेर काढली आणि दार उघडलं. "शांत झोप आता पलो, गुड नाईट. उद्या भेटू." मी तिच्या डोक्यावर थोपटलं.

ती थोडी गंभीर होऊन उभी राहिली आणि स्कॉर्पिओकडे एक नजर टाकली. "हम्म, नक्की. गुड नाईट. लिफ्टसाठी थँक्स." ती आत जाऊन दरवाजा बंद करेतो मी थांबून राहिलो.

"ही 'तीच ' आहे ना?" गाडीत बसताच कश्मीराने माझ्याकडे वळून विचारलं. मी हसून मान हलवली.

आम्ही बऱ्याचदा आपापल्या एक्सेसबद्दल, प्रेमाबद्दल, डिस्टन्सबद्दल, सेलिब्रिटी म्हणून येणाऱ्या एकटेपणाबद्दल बोललो होतो.

मी तिच्या हॉटेल गेटपाशी गाडी थांबवली. "शी'ज अडोरेबल! पण मला तिचा राग येतोय कारण इतके कार्ब्ज खाऊन, वाईन पिऊन कोणी इतकं शेपमध्ये कसं राहू शकतं, है ना? लाईफ इज नॉट फेअर यार!" ती माझ्याकडे बघत म्हणाली.

"कॅश, हे सगळं कशासाठी आहे? आय थिंक वी वर गुड!"

"वी आर! मी तुला मिस करत होते. इथे आले आणि अचानक एका क्षणी वाटलं की तुला भेटावं आणि बघावं की तूही तेवढाच मिस करतोस का.."

मी तिचा हात हातात घेऊन थोपटला. "तुला बघून मला आनंद झाला की, अँड यू आर ऑल्वेज वेलकम!"

"आऊच! तू माझ्यासाठी झुरत वगैरे का नाहीयेस!! दॅट्स द वर्ड, राईट?" ती लाडात येत म्हणाली. "नेव्हर माईंड! मला कारण कळलंय. मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं." ती तिरकस हसली.

"आमच्यात तसं काही सुरू नाहीय. फक्त भरपूर हिस्ट्री आहे." मी खांदे उडवले. अर्थात त्यामुळे कश्मीरा आणि माझ्यात काही बदलणार नव्हतं. कश्मीरा उगीचच आमच्या संपलेल्या नात्याला गुलाबी चष्म्यातून बघत होती. मी कधीच कश्मीराच्या प्रेमात वगैरे नव्हतो आणि तिला ते माहीत होतं.

"समर सावंत! वेडा आहेस का तू? इथे हिस्ट्रीपेक्षा खूप जास्त काहीतरी सुरू आहे. सी या!"  सीट बेल्ट काढून ती खाली ऊतरली.

कदाचित ती बरोबर असेल.

आमच्यात असेल काही कनेक्शन पण आम्ही ते प्रत्यक्षात आणू असं नाही ना...

पलोमा

तोंडावर आलेल्या उन्हाने मला जाग आली. डोकं हातोड्याने ठाण ठाण ठोकल्यासारखं दुखत होतं. मी बाथरूममध्ये जायला दार उघडलं तर समोर जाई!

"हाय तायडे, मी तुझ्यातल्या कुकीज उसन्या घेतल्यात." हातात एक मोठी चोको वॉलनट कुकी नाचवत ती म्हणाली.

"उसन्या म्हणजे तू त्या परत आणून ठेवणार आहेस. जे कधीही होत नाही." तिला बाजूला करून मी बाथरूममध्ये शिरले.

मी बाहेर आले तो ती किचनमध्ये ताटं शोधत होती. "त्या बाजूच्या कपाटात आहेत." मी खुर्ची ओढून बसत म्हणाले.

"बापरे तुला काय झालं? मरगळलेली दिसतेयस!" ती माझ्या तोंडाकडे बघत म्हणाली.

"आधी माझ्या कुकीज लंपास कर आणि वर मलाच नावं ठेव. चांगलं आहे! तुला दुसरी किल्ली देऊन चूकच केली मी." मी रागात म्हणाले.

तेवढ्यात उघड्या दारातून समर जुईबरोबर आत आला आणि हातातल्या पिशव्या दोघांनी टेबलवर ठेवल्या. मी घाईघाईत माझा चुरगळलेला लहानसा कॅमी आणि शॉर्ट्स नीट केल्या.

"रिलॅक्स, आय नो द डिटेल्स!" तो डोळा मारत हसला आणि पुढे जाऊन त्याने फ्लास्कमधली गरम फिल्टर कॉफी दोन मगमध्ये ओतली. एक मग माझ्या हातात देऊन स्वतःच्या कॉफीचा घोट घेतला.

"आह समर! मला लै गरज होती!" मी पटकन मगला तोंड लावत म्हणाले.

"हाय ताई!" जुई माझ्या गळ्यात हात टाकत शेजारी बसली. ही आमच्या घरातली सगळ्यात शांत, हळुवार पोरगी. आताच्या हँगओव्हरमुळे मला सगळं हळुवारच हवं होतं.

"आम्ही दोघी युनिव्हर्सिटीत जात होतो, तर बॅटमॅन इथे येताना दिसला. मग काय जुपीटर वळवली आम्हीपण!" जुई म्हणाली.

"मी वेंडीबरोबर जाऊन अर्ध्या शिवाजीजवळचा लोणी डोसा पार्सल आणलाय. उतरतो तो दारात ह्या दोघी भेटल्या! सॉरी मुलींनो, माहीत असतं तर तुमच्यासाठी आणला असता. आता माझ्यातला शेअर करा. पलोला ब्रेकफास्टची गरज आहे." तो टेबलावर कोपरं आणि दोन्ही हातात चेहरा ठेऊन माझ्याकडे बघत म्हणाला.

मी आ करून बघत राहिले. दावणगिरे! लहानपणीचा माझा सगळ्यात आवडता डोसा! मी त्याला हाताने हार्ट साईन करून दाखवलं.

"मग काय ते कालचं सरप्राइज वेगेरे काय ते लवकर सांगा!" जाईची गाडी तराट सुटली होती.

"काही नाही, आम्ही पार्कात गेलो काकाकाकीना भेटायला आणि तिथे अचानक ह्याच्या हिरोईनने येऊन आम्हालाच सरप्राइज दिलं!" मी थोडी वैतागून म्हणाले आणि समर मोठ्याने हसला. जुईने मला सपोर्ट म्हणून माझ्या दंडावर डोकं टेकलं. ती माणसं वाचण्यात हुशार होती आणि मी आत्ता इमोशनली वाईट जागी आहे हे तिला जाणवलं होतं.

"कोण? कश्मीरा बर्वे? हायला! तू अजून तिला डेट करतोस? मी वाचलं तुमचं ब्रेकअप झालं.. ती हॉट आहे पण ते लीप फिलर्स जरा जास्तीच झाले. खरं सांगते, थोडीशी डोनाल्ड डक दिसते ती!" जाई डोश्याचा तुकडा खाऊन बोटाला लागलेलं लोणी चाटत म्हणाली.

समर हसतच होता. "आता नाही करत. आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत."

"ती ' आमचा ' समर म्हणते. मला नक्की माहितीये की हे जस्ट फ्रेंड्स वगैरे तिला मान्य नाहीय." मी तडतडले. मला हवं होतं त्यापेक्षा जास्तच तिखट बोललं गेलं. कश्मीरा इतकीही वाईट नव्हती वागली. मला फक्त तिच्या झिंज्या उपटाव्या वाटत होत्या. हे नॉर्मल आहे, राईट!

जुई माझं निरीक्षण करत हसली. "जाई, ऊश्शेर!" तिने जाईकडे बघून डोळे दाखवले. हां! जुई म्हणूनच माझी आवडती होती. अनकंफर्टेबल विषय बदलणं तिला सहज जमायचं.

जाई भराभर हात धुवून आली आणि त्या आमचा निरोप घेऊन बाहेर पडल्या.

समर माझ्या किचनमध्ये त्याचंच घर असल्यासारखा वावरत होता. त्याने RO खाली जग भरला आणि टेबलवर आणून ठेवला.

हा इतका छान का दिसतोय...

"काल मी एकटीनेच एवढी वाईन पिली का?"

"नाही, पप्पा होते की तुझ्या जोडीला, आईपण शेजारीच होती." तो चिल होता.

मी माझी कॉफी पीत कालच्या गोष्टी आठवत होते.

द किस!

कश्मीराने त्याच्यावर हक्क दाखवणं.

तिच्या क्यूट टॉपवर उडालेली वाईन आणि माझी एम्ब्रासिंग एक्झिट!

मी श्वास सोडला. "मी काल स्वतःचं खूपच हसं करून घेतलं."

"काही झालं नाही. तू ठीक आहेस." तो डोसा खाताखाता म्हणाला.

"मला वाटत होतं तुमचं ब्रेकअप झालंय?" मी उत्तराची वाट पहात थांबले. मी का विचारतेय., त्याच्याशी आता माझं काहीच नातं नाही. आम्ही एवढी वर्ष लांब होतो. मग मी इतका इश्यू का करतेय...

"तसंच आहे." त्याने वाकून लोण्यात माखलेला दुसरा जाडजूड डोसा माझ्या ताटात वाढला. "खा."

"थॅन्क्स." मी एक घास खाल्ला आणि आम्ही दोघेही गप्प बसलो.

क्रमशः

चाँदनी रात - अली सेठी इथे पाहता येईल.

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ११

"मग ती इथे का आली होती?" मी न राहवून विचारलंच. डेस्पो वाटेल पण मला उत्तर हवंच होतं. माझा एक्स फेमस क्रिकेटर असणं मी दहा वर्ष चालवून नेलं होतं. मासिकांमध्ये, सोशल मीडियावर त्याला कायम वेगवेगळ्या बायकांबरोबर बघून हर्ट व्हायचं पण प्रत्यक्ष समोर बघण्याइतकं कधीच झालं नव्हतं.

हे म्हणजे हृदयात सुरा खुपसल्यासारखं होतं आणि ही जखम जबरदस्त दुखत होती.

पंधराव्या वर्षी मला माझा सोलमेट का मिळाला होता? नॉट फेअर यार! त्यामुळे मला पुढचं सगळं बिघडवायला एवढा वेळ मिळाला. मला माहिती होतं समरसारखा कोणी मला पुन्हा कधीच मिळू शकत नाही आणि मिळालाही नाही. तसाही मला नकोच होता कारण मला पुन्हा इतकं जास्त, इतकं खोल प्रेम करायचं नव्हतं.

समोर बसलेला माणूस मला काय टाळायचं आहे त्याचा रिमायंडर आहे.

"तिला माझी आठवण आली आणि नेमकी ती कोल्हापुरात होती, बस."

मी पुढचा तुकडा मोडत मान हलवली. "मग तू त्या इव्हेंटला जाणारैस का?"

"तिला गरज असेल तर येऊ म्हणलं." त्याने सरळ उत्तर दिलं पण तो मला पूर्णपणे काही सांगत नव्हता. मीच जास्तीत जास्त खोदून विचारावं असा त्याचा प्रयत्न वाटतोय. हम्म..

"कधीपर्यंत आहे ती कोल्हापुरात?"

त्याने डोळे फिरवले. "ती पहाटेच गेली. अजून काही चौकशी?"

मी जोरात मान हलवली आणि श्वास सोडला. खरं सांगायचं तर माझ्याकडे अजून भरपूर प्रश्न आहेत. मला खरं विचारायचं होतं की ती त्याच्या घरी राहिली का, पण मी ऑलरेडी जास्तच विचारलंय, आता बास. हे इतकं कठीण का आहे? मी एवढ्या गोष्टी केल्यात.. दोन मॅराथॉन पळले, दिल्लीत असताना हिमालयात कठीण कठीण ट्रेक केले, मुंबईत आल्यावर एकदा कळसूबाईसुद्धा केला.

पण समरबरोबरचा प्रत्येक क्षण.. टॉर्चर आहे. चांगल्या वाईट दोन्ही अर्थानी.

"मग उचकी क्वीन! कपडे घाल, आपल्याला वेंडीला भेटायचं आहे."

मी पळतच बेडरूमकडे गेले आणि दारातून तोंड बाहेर काढून ओरडले. "ती फक्त एक उचकी होती!"

मी पटकन केस विंचरून डोक्यावर मेसी बन घातला. ट्रेगिंग्ज आणि पातळसा टीशर्ट घातला. आज मि. हॉटशॉट काय करायला लावतील, देव जाणे! मी बाहेर येऊन माझा मग सिंकमध्ये ठेवायला गेले. वळले आणि मागून येणाऱ्या समरवर अख्खी धडकले. "सॉरी!" मी हळूच म्हणाले. "ते ठिकाय, मला वाटलं परत किस करतेय की काय!" त्याचा हसण्याचा आवाज किचनच्या भिंतींमध्ये घुमला.

"मी नाही, तू केलं होतं किस." मी हाताची घडी घालून म्हणाले.

"तुला स्वत:ला काय सांगायचं असेल ते सांग, स्वीट हार्ट!" त्याने भुवया उंचावल्या आणि मला स्कॉर्पिओकडे घेऊन गेला.

आजचा दिवस संपता संपणार नव्हता.

---

पुढचा आठवडा अगदी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या स्पीडने निघून गेला. समर आणि मला आता आमची एक लय सापडली आहे. आमचा बराचसा दिवस एकत्र जातो. सकाळी मी त्याची प्रॅक्टिस बघते, संध्याकाळी रनिंग आणि स्विमिंग आणि बऱ्याच वेळा एकत्र जेवण. तो त्याचं डाएट फूड खातो आणि मी माझं घरी केलेलं काहीतरी. नशिबाने हल्ली त्याने त्या किसचा उल्लेख केला नाहीय. माझ्यासाठी तो एक मोमेंट ऑफ वीकनेस होता, इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे आलेला.

ऑफ कोर्स मला तो रिपीट करावासा वाटत होता, मी माणूसच आहे आणि समोरचा माणूस लैच सेक्सी आहे!

पण.. पण मी खूप वर्षांपूर्वीच हे शिकलेय की समरवर प्रेम करणं माझ्यासाठी ' अती' आहे. अती इंटेन्स, ताटातूट झाली तर पुन्हा सहन होणार नाही असं काहीतरी. स्वत:हून आगीत चालत गेल्यासारखं.

दिवसातून दोनदा आमचे सेशन्स सुरू होते आणि बऱ्यापैकी प्रगती दिसत होती. तो हळूहळू ओपन अप होत होता. घोरपडे मला रोज रात्री कॉल करून अपडेट घेत होते. मला त्यांची फारशी फिकीर नव्हती. दहा वर्षांपूर्वी समरला सिलेक्ट करायला आले होते, तेव्हाही ते मला आवडले नव्हते आणि आताही नाही. समरला काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी त्यांना काहीच कंसर्न नव्हता, त्यांना फक्त येत्या सिझनमध्ये समरने कॉन्ट्रॅक्ट एक्स्टेंड करून परफेक्ट खेळावं एवढंच हवं होतं.

"समर झाला का जाग्यावर आता?"

"वेल, असं इतक्या पटकन होत नसतं. आय थिंक आम्ही सगळ्या गोष्टींच्या मुळाशी पोचतो आहोत. त्याच्यावर खूप प्रेशर.."

माझं वाक्य संपायच्या आत त्यांनी तोडले. "त्याला त्या प्रेशरच्या बदल्यात खूप पैसा मिळतोय. तू त्याला टफ बनव नाहीतर काहीतरी आउटलेट दे. दॅटस् व्हॉट आय हायर्ड यू फॉर. माझा इंटरेस्ट एवढाच आहे की तू त्याला फिल्डवर परत आणू शकतेस की नाही." ते त्या घाणेरड्या घोगरट आवाजात म्हणाले. खूप पिऊन होतो तश्या.

"आय'ल कीप यू पोस्टेड." म्हणून मी कॉल बंद केला. त्यांच्या प्लेयरच्या मनात काय चालले आहे ते त्यांना नकोय. त्यांना फक्त एक विनिंग सीझन हवाय आणि तो समरने मिळवून आणायला हवाय.

माझी पर्सनल असेसमेंट? समर ठीक आहे. खूप दमलाय, थोडा बर्नआउट म्हणता येईल. फिजीकली तो आत्ता त्याच्या बेस्ट शेप मध्ये आहे, मेंटली मजबूत आहे पण थोडा कन्फ्युज आहे. येत्या सिझनमध्ये त्याला मेंटली, फिजीकली मैदानात उतरता येईल का हा प्रश्न नाहीये, तर त्याला उतरायचं आहे का हा खरा प्रश्न आहे. त्याच्यावरच सध्या आम्ही काम करतो आहोत. त्याला खेळण्यात इंटरेस्ट का वाटत नाही याबद्दल आम्ही जे तासन तास बोललो त्या सगळ्याचे लॉग्ज मी नीट फाईल केले आहेत. आम्ही स्टेडियममध्येही खूप वेळा गेलो. लोकांना कळून गर्दी जमायला लागली की आम्हाला तिथून निघावंच लागतं. आजही बाहेर पडता पडता विक्रम समोर आला, इथल्या जुन्या ग्राऊंड्समनचा मुलगा. "निघालात होय समरदा!  तुम्ही रोज येत जावा, तुमच्यामुळं बरीच न्हान पोरं कोचिंग विचारायला यायला लागली बघा."

"येऊ, येऊ." म्हणत समरने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि आम्ही निघालो. अजयने दुपारी जेवायला बोलावलं होतं. आज केटरिंगसाठी मुर्ग मुसल्लम आणि चिकन पुलाव्याची ऑर्डर होती. दोन्ही भारी झालं म्हणून तो जेवायला बोलवत होता. आम्ही दाराबाहेर गाडी लावून उतरलो तर आत सगळी मंडळी जमून हसण्या खिदळण्याचे आवाज आधीच येत होते.

आम्ही आत जाताच सगळ्यांनी समरचा ताबा घेतला. प्रत्येकाचे प्रश्न, किस्से, गप्पा, सेल्फी सगळं आरामात सुरू झालं. मी थोडी दिदीबरोबर बोलत बसले. पंगत बसून सगळ्यांची जोरदार जेवणं झाल्यावर पुन्हा आम्ही जरा सैलावून इकडे तिकडे बसलो.

"मग इंडियन्स आपल्या पलोमाला कायमची अपॉइंट करणार का नुसतंच लटकून ठेवलंय?" बोलता बोलता अजयने समरला विचारलं. दिदीने अजयला बडीशेप देताना अचानक पोट दुखल्यासारखा पोटावर हात ठेवला. अजयने लगेच तिच्याकडे काळजीनं बघितलं. ती हसलेली बघून त्याने प्रेमाने अलगद तिच्या पोटावरून हात फिरवला. माझी नजर त्यांच्यावर खिळली आणि मी समरकडे पाहिलं तर तो माझ्याकडेच पहात होता. त्याने डोळे बारीक करून माझं निरिक्षण केलं आणि पुन्हा अजयकडे वळला.

"काय सांगू नाही शकत. आधीच ते स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्टची काही गरज नाही म्हणत होते, पण मी पलोमाला ऑन बोर्ड आणण्यासाठी बरंच पुश केलं." समरने हे म्हणताच माझं तोंड उघडंच राहिलं.

"हे मला माहीत नव्हतं."

"मी तुला सांगितलं होतं, मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. कारण तू माझ्यासाठी बेस्ट आहेस." तो किंचित खांदे उडवत म्हणाला.

"पण मला वाटलं ते बऱ्याच जणांचा इंटरव्ह्यू घेऊन मग सिलेक्ट करणार होते. तरी तू मला घेण्यासाठी पुश केलं?" मी बडीशेप तोंडात टाकत विचारलं.

"तुला काहीही वाटत असतं, पलो!" त्याने म्हटल्यावर सगळे हसले.

"अरे, येत्या रविवारी पार्टी करू. काय म्हणता? तंदूर प्लस रस्सामंडळ!" अजयने पटकन विषय बदलत विचारले.

"पळतंय की!" समर म्हणाल्यावर सगळे होच म्हणाले.

आणि जस्ट लाईक दॅट, हा माणूस पुन्हा माझ्या आयुष्यात सगळीकडून घुसखोरी करायलाय.

आणि मला ते हवंहवंसं वाटतंय.

समर

"तू अजूनच फास्ट होत चाललीस..." धापा टाकत तळ्याच्या काठावर बसताना मी म्हणालो. पोहून दोघांची हवा गेली होती. सकाळी वेंडीने पण लै घामटं काढून जोरदार वर्कआऊट करून घेतला होता. आता ते जरा जाणवत होतं.

"आता तू मला सारखं इथे आणून रेस लावत राहिलास तर हे होणारच आहे!" पलोमाने ओले केस पिळून, चेहरा मागे टाकून डोळे मिटले. परतीच्या उन्हाचे कवडसे तिच्या तोंडावर पसरले होते. तिचे मिटलेले डोळे बघून मी पटकन तिच्यावर नजर फिरवली. आता ती स्विमिंगसाठी प्रिपेअर होऊन येत होती.  स्विमिंग शॉर्ट्स, वेगळा टँक टॉप वगैरे.

आम्ही खूप वेळ एकत्र घालवत होतो आणि मला ते आवडत होतं. रोज उठल्यावर तिला बघण्यासाठी मी उत्सुक असतो, पण हे खूप डेंजरस कॉम्बो आहे! "अजयने मेसेज केलाय, आज रात्रीच्या पार्टीसाठी." डोक्यातले विषय टाळत मी म्हणालो.

"हो, आपण एकत्र जायचं?

"चालतंय. जाईचा प्रयोग आहे ना उद्या?"

"हम्म.. ती त्या थिएटर ग्रुपबरोबर आहे पण तिला नक्की काय करायचं आहे त्याची खात्री नाहीय. बघू, काहीतरी मार्ग शोधून काढेलच ती."

"तू काढला तसा प्रत्येकाला इझीली मार्ग काढता येत नाही." मी हातानी केसातील पाणी झटकत म्हणालो.

"टेक्स वन टू नो वन!" ती हसली.

"हम्म, आपण लकी आहोत. आपल्याला काय करायचं आहे ते मोठे होतानाच माहिती होतं, कधी शंकाच नव्हती. पण कधीकधी लकी ठरण्याआधी तुम्ही काही गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. थोड्या चुकापण झाल्या पाहिजेत." ह्या शब्दांमध्ये जास्त अर्थ होता हे मला बोलून झाल्यावर जाणवलं.

पलोमा मला लहानपणी भेटली आणि तेव्हापासून माझ्यासाठी तीच आहे. काही काळ मी ही तिच्यासाठी तसच होतो. पण आयुष्याने अशी गुगली टाकली की आम्ही वेगवेगळ्या वाटा पकडल्या. मला वाटतं तेव्हापासून आम्ही दोघेही एकमेकांना शोधत आहोत.

"ती म्हणाली, दिदीकडे ती तुझ्याशी ह्या विषयावर बोलली. काय म्हणत होती?"

"तिने फक्त विचारलं की क्रिकेट खेळायचं असं मला पहिल्यापासून माहीत होतं का? मला वाटतं तिचं ग्रॅज्यूएशन झालं आणि अजून पुढचं काहीच ठरलं नाही म्हणून ती थोडी बावचळलीय."

"तू काय सांगितलं तिला?" तिने डोळ्यावर हात घेत  विचारलं.

"मी तिला म्हटलं, तुला आधीपासून सगळं माहीत असायची गरज नाही. प्रत्येक वेळी प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी होतीलच असं नाही. वेळ योग्य असेल तेव्हा तुझं तुलाच आपोआप कळेल."

"तू कायम तुझ्या गट फीलिंगवर विश्वास ठेवलास, हो ना?"

"इट नेव्हर फेल्ड मी!" मी खांदे उडवले. "तुझं काय? तुला तुझं काम आवडतंच. लाईफ मध्ये अजून काही मिसींग वाटतं?" प्रत्येकाला आयुष्यात सगळंच हवं असतं का? मला तरी हवंय, सगळंच! क्रिकेट, जिंकणे, आनंद, प्रेम.. सगळंच!

"मला माझं काम आवडतं आणि त्यात खूप फोकस्ड असते. पण मला तुझं म्हणणं पटतय.. चालता चालता रस्ता शोधणेसुद्धा बरोबर आहे. मीपण काय सगळंच फिगर आउट केलं नव्हतं."

"नाही? मला धक्का बसला!"

तिने पाण्यावर लांबवर नजर टाकली आणि माझ्याकडे वळली. "माझा कायम प्लॅन तयार होता, माहितीये? आणि मग कॅन्सर आमच्या आयुष्यात आला. आई आजारी पडली, सगळं इतकं भराभर झालं आणि ती आमच्या आयुष्यातून निघून गेली. सो मला तेव्हा जी काही माझी, जगाची समज होती ती पूर्ण बदलली.. एका क्षणात सगळ्याच गोष्टी बदलल्या."

"पण तुला DU मध्ये हवी असलेली ॲडमिशन मिळाली. स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट होण्याचं तुझं स्वप्न तू पूर्ण केलं.. तेही चांगल्या ग्रेड्स मिळवून."

"हो, पण मी पर्सनल लेव्हलवर बोलतेय. आपण कधी वेगळे होऊ असं मला वाटलं नव्हतं आणि मी घरी यायचं कधी टाळेन असंही वाटलं नव्हतं.  मी कायम सगळ्यांना मला भेटायला बोलवत होते, इथे येणं टाळून."

मला तिच्या डोळ्यात भरून येणारं दुःख दिसत होतं. मी खाली अंथरलेल्या टॉवेलवर तीच्याशेजारी माझा हात ठेवला आणि अलगद तिच्या बोटात बोटं गुंतवली. "तू दुःखात होतीस."

"माझ्या बहिणीपण दुःखात होत्या. पण त्यांच्याकडे बघ, त्या पळून नाही गेल्या."

"तू लांब गेली असशील, पण तुला त्यांची काळजी होती. मला माहिती आहे. तू कायम त्यांच्या काँटॅक्टमध्ये होतीस. मदत करत होतीस. तू मनाने इथेच होतीस, तुला फक्त सावरायला वेळ हवा होता."

"मला वाटत होतं, मी निघून गेल्यामुळे तुमचं भलं होईल. त्यांचं आणि स्पेशली तुझं."

"कसं काय?" मी आवाज नॉर्मल ठेवला, तिला पुन्हा गप्प होऊ द्यायचं नव्हतं.

"आपण बुडत असताना आसपासच्या लोकांच्या गळ्याला मिठी घालून त्यांना आपल्याबरोबर बुडवण्यात काय अर्थ आहे, है ना? सो, मी तरंगायला टायर शोधला आणि श्वासापुरती वर आले."

"मला कळतंय पलो, खरंच. त्यावेळी तुला जे बरोबर वाटलं ते तू केलंस."

"हे, इथे सायकॉलॉजीस्ट मी आहे!!" ती गालावरचा एकच अश्रू पुसत हसली.

"हे, क्रिकेटर्स डीप फिल्डींग करू शकतात." मी तिला खांद्याने धक्का दिला आणि हात काढून घेतला.

ती माझ्याजवळ मोकळेपणाने बोलली याने मी खुश आहे. हर्ट होणाऱ्या सगळ्या गोष्टी उघडून दाखवणे. इन अ वे, हे माझ्यासाठी पण क्लोझर आहे. इतक्या वर्षांपूर्वी ती माझ्याशी असं का वागली हे मला कळतंय. ती माझ्यापासून पळत नव्हती, तिच्यामते ती मला प्रोटेक्ट करत होती. मला हे पटलं नाही तरी समजत होतं.

"आजच्यासाठी एवढं बस. घोरपडे मला एवढे भरपूर पैसे स्वत:बद्दल बोलण्यासाठी देत नाहीयेत." म्हणत ती उठली. "आणि आपल्याला जेवायला जायचंय. एवढं पोहून पोटात कावळे बोंबलाय लागलेत!"

मी उडी मारुन उठलो आणि ओरडत खाली टॉवेलवर बसलेला बारका बेडूक झटकला.

ती मान मागे टाकून खळखळून हसत सुटली.

माझा जगात सगळ्यात आवडता आवाज. कायमच होता. आम्ही लहानपणापासून ह्या तलावावर एवढा वेळ घालवला होता... तिच्याबरोबर इथे असताना, ते सगळे क्षण उडी मारुन पुन्हा बाहेर येत होते.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १२

पलोमा

तासाभरापूर्वी मी राजारामपुरीत आमच्या घरी आले. आजीला तिच्या खोलीत जेवण द्यायला गेले तर ती मुटकुळं करून झोपली होती. कुठे आमच्या लहानपणी सत्ता गाजवणारी, ठणकावून बोलणारी, आम्हाला दम देणारी लक्षूमबाई आणि कुठे ही अशक्त दिसणारी, सुरकुतलेली आजी. आईला तिने मुलगा हवा म्हणून दिलेला सगळा त्रास आमच्या डोक्यातून कधीच विसरला जाणार नाही. दोन मुलींवर पुन्हा वंशाच्या दिव्यासाठी तिने आईला ऑपरेशन करू दिलं नाही. तर जाई - जुई झाल्या! एकावर एक फ्री! तेव्हापासून आजी ने चार मुली म्हणून आमचा आणि आईचा जो दु:स्वास केला त्याला तोडच नाही.

आई गेल्यावर पप्पांना आजीला आमच्याबरोबर ठेवावेच लागले, काही पर्यायच नव्हता. तिने जरी आम्हाला कसली ददात पडू दिली नसली तरी बोलून बोलून आमची डोकी नक्की खराब केली होती. आई गेल्यानंतर मला तर तिच्याशी बोलायचीच इच्छा नव्हती. आजीला उठवून टीपॉय समोर ओढला आणि ताट ठेवलं. दिदीने जरा मऊ शिजवलेला भात आणि अळणी रस्सा कालवून दिला होता. आजीने जेवायच्या आधी मला शेजारी बसवून घेतलं आणि तोंडावर बोटं मोडली. "माई, आम्हाला म्हईताय तुम्ही आमचा रागराग करताय. पन बसा जरा इथं. आमची वागण्यात चूक झाली. रजनीला पण आम्ही लै त्रास दिलो. आम्ही कबूल करतो."

मी गप्प बसून राहिले.

"बगा, आमच्या दोन मोठ्या बहिणी सासरच्यानी मारल्या. एक बाळतपणात, एक हुंड्यापायी. पोरीना हुंडा देऊ देऊ आमचं माहेरचं घर रिकामं झालं. सासरी आमचे मालक लौकर वारले पण तुझा पप्पा होता आमच्याजवळ म्हणून आम्ही जिवंत राहिलो, आमचं घरदार राखू शकलो. मुलगी म्हणजे डोक्यावर भार अशीच आमची आपली जुनी समज म्हणून आम्ही तशे वागलो. पोरीनो, तुम्ही चांगलं शिकला, घर संबाळू लागला त्यात मला आनंदच आहे. आता वाटतं नातू असता तरी त्यानं मला तुमच्यासारखा प्रेमाने सांभाळला असता की नाही. आता शेवटच्या दिसात आमचा राग करू नका, आम्ही माफी मागतो.." आजीचे पाणावलेले डोळे बघून मी जरा विरघळले. शेवटी अंगात रक्त तिच्याकडून आलेलंच होतं. "आजे..जीवाला त्रास नका करून घेऊ." म्हणून मी तिचा हात घट्ट धरून ठेवला आणि "निवांत जेवा आता" म्हणून बाहेर पडले.

किचनमध्ये गेले तोच जाईजुई उगवल्या. मला बघून त्यांनाही हसू आलं कारण आम्ही तिघीनीही गुलाबी कपडे घातले होते. मी व्हाईट लेगींग्ज आणि गुलाबी पिनटक स्लीवलेस कुर्ता, जाईने फाटकी ब्लॅक जीन्स आणि राणीवर पांढरे पोलका डॉट्स असलेला शर्ट आणि जुईने पांढऱ्यावर गुलाबी बारीक फ्लोरल डिझाईनचा मॅक्सी ड्रेस घातला होता. रंग एकच असला तरी आमचे आपापले लूक्स होते!

जाईने सॅक खुर्चीत टाकली आणि ओट्यावर मी करून ठेवलेल्या नारळाच्या पचडीकडे पाहिलं.
"ओह, मीपण काही बनवायचं होतं काय?" तिने जीभ काढत विचारलं.

जुईने हॉट चिप्समधून आणलेल्या केळ्याच्या किलोभर तिखट चिप्स पिशवीतून काढून दाखवल्या. "लकी आहेस! आम्ही दोघींनी काय काय आणलंय तेवढ्यावर तुझं चालून जाईल."

"मग काय तर, मी दुसऱ्या पातेल्यात दहीकांदा पण करून ठेवलाय. आता फक्त ही भांडी घेऊन शेजारी जायचय. त्यात मदत कर!" मी म्हणाले.

"पप्पा आधीच तिकडे जाऊन बसलेत." जुईने इनपुट दिलं.

आम्ही डबे, पातेल्या घेऊन शेजारी जायला निघालो.

"जुई, दोन चिप्स भरव ग मला." हातात पातेलं धरून जाई म्हणाली. आम्ही तिच्याकडे बघितल्यावर "मग? आपण रस्त्यात आहोत म्हणजे पार्टी सुरूच झाली की!"

"तू आणि तुझं लॉजिक महान आहात!" मी डोकं हलवंत म्हणाले. जूईने हसत तिच्या तोंडात चिप्स टाकल्या. "जाऊदे, तिने खायला काही आणलं नाही तर नाही, एन्टरटे्नमेंट तरी नक्कीच आणली आहे!"

"थँक्यू! एन्टरटे्नमेंटवरून आठवलं, आपला बॅटमॅन कुठाय?" जाई खातखात म्हणाली.

"त्याचा टीमच्या ओनर्सबरोबर कॉल सुरू आहे. तो डायरेक्ट दिदीकडे येईल." मी खांदे उडवले. इतका वेळ एकत्र घालवल्यावर आता तो बरोबर नाहीय तर जरा सुनंसुनं वाटत होतं आणि ह्या गोष्टीने मी खरंच घाबरले होते.

इतकी वर्ष वेगळं राहून आता थोडासा वेळ एकत्र घालवल्यानंतर तुम्ही कोणाला एवढं मिस कसं करू शकता?

नथिंग मेड सेन्स व्हेन इट केम टू समर...

"मग, काय चाललंय तिकडे?" जुईने विचारलं.

"विशेष काही नाही. एकत्र काम करतोय. जुनी ओळख आहे त्यामुळे इतक्या वर्षांनी त्याच्या बरोबर छान वाटतंय."

"त्याला मिस करत होतीस म्हणायला काय तोंड शिवलंय व्हय?!" जाईने तोंड उघडलं. "सांग की मग बिंधास. तुम्ही असा अचानक ब्रेकअप केला होता, कठीण झालं असेल तुला."

मी श्वास सोडला. "हम्म, आम्ही बोलतो त्याबद्दल. मला बरं वाटतंय की तो माझा राग तरी करत नाही."

"ऑफ कोर्स!" जुईने मान हलवली.

"ए पोरी, तो मुलगा तुझा राग तर अजिबातच करत नाही. तुमच्यात इतक्या वेड्यासारखा ठिणग्या उडत असतात! काय केमेस्ट्री, काय केमेस्ट्रीss कोणपण सांगेल."  पायाने दार ढकलत जाई म्हणाली.

हॉलमध्ये अजयच्या घरचे लोक, मित्रमंडळी, पप्पा आणि आम्ही असा सगळा कोटा फुल झालेला दिसतोय. मागच्या अंगणात अजयने बार्बेक्यू सुरू केला होता. शीग कबाब, मक्याची कणसे, तंदुरी पनीर वगैरे स्टार्टर्स बहुतेकसे तयार होत आले होते. दीदीच्या सासूबाईंनी एकहाती ज्वारीच्या पन्नासेक भाकऱ्या बडवल्या होत्या. गॅसवर भल्यामोठ्या पातेल्यात मटन रसरसून उकळत होतं. तांबडा, पांढरा खास आमच्या पप्पांनी स्वत:च्या एक्स्पर्ट हातानी बनवला होता. एकीकडे आमच्या शेतातल्या घनसाळ भाताचा गोडसर सुवास येत होता. मी जाऊन दीदीला सॅलड चिरायला मदत करू लागले.

"पलो, इकडे बघ काय मजा आहे!" पप्पानी एका कढईवरचे झाकण उघडुन दाखवले. सुक्क मटन दिसत होतं, मी एक फोड उचलून तोंडात टाकली तर विरघळण्याएवढी कोवळी आणि मसाला आतपर्यंत मुरलेली! "वॉव!"

"आजऱ्याला आपल्या शेतात रानडुकरांचा त्रास लै वाढला होता. कितीबी छर्रे झाडा, मागंच हटत नव्हती. म्हणून शेवटी पोरांनी परवानगी घेऊन शिकार केली. त्यांनी आधनावर शिजवून चरबी बाजूला काढली मग त्यातलंच किलोभर हिकडं घेऊन आलो. नुसता तेल, हळद, खोबरं, मीठ चटणी लावून रातभर चुलीच्या निखाऱ्यावर शिजत टाकलं. कसंय?" पप्पा नेहमी रंगवून किस्से सांगतात तसं सांगत होते.

"तरीच! एक नंबर स्मोकी फ्लेवर आलाय!" मी बोट चाटत म्हणाले.

पप्पा समाधानाने हसले आणि एकदम जरा शांत झाले. "मग, समरची ट्रीटमेंट कशी चाललीय? तुम्ही दोघे एकमेकांशी बरे वागताय ना?" त्यांनी पाठीवर थोपटत विचारले.

"हो पप्पा. सगळं नीट सुरू आहे. पुढचा सीझन खेळायचा की नाही हा शेवटी त्याचा डीसीजन आहे, पण तोपर्यंत तो फिट तरी नक्की असेल."

तेवढ्यात दार उघडलं आणि समर दोन्ही हातात सोलकढीचा भलामोठा कॅन धरून आत आला.

"काय अंतर्ज्ञानी आहेस का काय? परफेक्ट आयटम घेऊन आलास!" म्हणत अजयने त्याला टाळी दिली. सगळ्यांच्या मिठ्या आणि हँडशेक स्वीकारत, बोलत तो आत आला. जाईजुई लगेच त्याला चिकटल्या आणि दीदीच्या घरात केलेले नवे बदल फिरून त्याला दाखवायला लागल्या. माझं पप्पांकडे लक्ष गेलं तर ते माझ्याकडेच बघत होते. "काय?" मी भुवया उंचावून विचारलं. जणू मी त्या गावचीच नाही असं दाखवत!

"काही नाही. हल्ली जरा हलकी, निवांत झालेली वाटते आहेस."

"म्हणजे चांगलं की वाईट?"

"म्हणजे आनंदी दिसते आहेस, पलोराणी. ते तर कायम चांगलंच. परत येऊन कोल्हापूर मानवलंय तुला!" ते मिश्किल हसले.

मी गालात हसत असतानाच जाईजुई समरला घेऊन आमच्याकडे आल्या. मी दिदीला सगळे पदार्थ टेबलवर मांडायला मदत करू लागले. पण मी जेव्हाही वर बघितलं, माझे डोळे समरला शोधत होते. तो पप्पांशेजारी बसून वेगवेगळ्या बोलिंग टेक्निक्सबद्दल सांगत होता. आमची बऱ्याच वेळा नजरानजर झाली पण प्रत्येक वेळी त्याला कोणीतरी काहीतरी विचारायचं आणि तो जाऊन त्यांच्याशी बोलायचा. सगळ्याभर फिरून शेवटी तो येऊन माझ्याशेजारी डायनिंग टेबलाला टेकून उभा राहिला आणि माझ्या दंडावर कोपर मारलं.

"हे!" मी त्याच्याकडे बघितलं आणि माझ्या गालांवर हळूहळू उष्णता पसरली. व्हॉट द हेल इज राँग विथ मी?! आम्ही रोज एकत्र असतो. अचानक मी नर्व्हस का होतेय...

"काय चाललंय? डिड यू मिस मी?" त्याने डोळा मारत चिडवले.

पण मी खरंच त्याला मिस करत होते. अर्थात हे कबूल करून मी स्वतःचा बावळटपणा सिद्ध करणार नव्हते. पण ह्या माणसाबरोबर असताना मला खरंच बाऊंड्रीज सेट करायला हव्यात.

"ऑल ओके. तुझी मीटिंग कशी झाली?"

"दे आर कूल. ओनर्सना टीम आणि प्लेअर्सची खरंच काळजी आहे. त्यांनी फक्त मला परत खेळायला येण्यासाठी थोडं पटवायचा प्रयत्न केला, बस." त्याने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि थोडा माझ्या अजून जवळ सरकला. "इट्स ऑल्वेज नाइस टू बी वॉन्टेड!" तो माझ्या कानात कुजबुजला आणि सरळ बाहेर हॉलमधल्या घोळक्यात निघून गेला!

अचानक इथली उष्णता वाढलीय!
तो डबल मिनींग बोलला की काय?
इट इज नाइस टू बी वॉन्टेड, शुअर!

"बघ, मी हेच म्हणत होते तायडे!" जाई माझ्याकडे झुकून म्हणाली. "तुमच्यातलं हे छोटंसं एक्सचेंज!"

"कसलं छोटंसं एक्सचेंज? काहीही झालं नाही. मी फक्त त्याच्या मीटिंगबद्दल विचारत होते."

"त्याने तुला आँखो ही आँखों मे इशारा केला, तोही पप्पा इथून पाच फुटावर असताना आणि तू लाजून लाल झालीस. कोल्हापुरात तरी ह्याला काहीही नाही बरंच काही समजतात!"

मी डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. पण तिच्या बोलण्यात तथ्य आहे. ह्या गोष्टी इथे आल्यापासून मला 24*7 फील होतायत.

मी इतके गुड लूकींग, हॉट बंदे रोज बघते, पण मला कधीच असं फील होत नाही. मी कायम पूर्ण कंट्रोलमध्ये असते. पण समर भेटल्यापासून अगदी विरुद्ध सुरू आहे.

"आपल्याकडे काय हॉटेल सारखं फॅन्सी काय नाय. सगळ्यांनी आपापली ताटं वाढून घ्या आणि आवडत्या लोकांशेजारी जागा पकडा!" अजयने हसत घोषणा केली. सगळे आपल्या प्लेट भरून मिळेल त्या जागी बसले. समर नेमका त्याच्या शाळेतल्या मित्रांच्या घोळक्यात खाली सतरंजीवर बसला होता. मी सोफ्यावर जाईशेजारी बसले. तेवढ्यात शेजारच्या केतीचा तीन वर्षाचा मुलगा समरकाकाबरोबर सेल्फी हवा म्हणून त्याच्या मांडीत बसून सेल्फी काढायला लागला. मोबाईलमध्ये स्माईल देताना समरचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्याचे डोळे माझ्यात मिसळले. मी माझी नजर हटवूच शकले नाही.

"आता तुझ्या कानातून धूर यायचा बाकी राहिलाय ताया! इथे लहान मुलं आहेत, आणि पप्पापण.." जाई माझ्या कानात बोलतानाच समोरच्या खुर्चीत पप्पा येऊन बसले आणि तिने तोंड बंद केलं.

"पलो? बेटा बरं वाटतंय ना तुला?" ते माझ्याकडे काळजीने बघत म्हणाले.

जाईने तिचा थंड हात माझ्या गालाला लावला. "होय! पोरगी चरचरीत तापलीय जणू!" ती मोठ्याने हसत म्हणाली.

"आय हेट यू!" मी हसता हसता तिच्या दंडाला चिमटा काढत पुटपुटले.

"काहीतरी घे लवकर.." पप्पा काळजीने म्हणाले.

"हो, घ्यायलाच पायजे!" जाई खोकत खोकत हसली.

"मग, समरबरोबर एवढं रनींग, स्विमिंग वगैरे करतेस ते झेपतंय काय तुला? पाण्यात जाऊन ताप आला असेल." ते पुढे म्हणाले.

"बरोबर बरोबर!" जाई अजून हसून वेडीच झाली.

मी माझी आणि तिची प्लेट टेबलवर ठेवली आणि तिला सोफ्यावर पाडून कुशन मारायला लागले.

"काय चालू आहे तुमचं?" जुईने मध्ये घुसून कुशनचा एक फटका जाईला दिला. "जस्ट मजा करतोय!" जाई ओरडली.

"मी काहीतरी मिस केलं का? काय चाललंय इथे?" समरचा आवाज येताच मी उठून बसले आणि विस्कटलेले केस नीट केले.

"काही नाही, जाई तिचा जाईपणा करतेय!"

"जाईपणा माय फूट! इथे कोणाला तरी ताप आलाय!" तिने उठून तिचं ताट हातात घेतलं.

मी वर बघितलं तेव्हा समर माझ्याकडेच पहात होता. "आर यू ओके?" त्याने फक्त ओठ हलवून विचारलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी बघून माझा श्वास अडकला.

"जिथं तिथं बघते तुला, विसरून माझी मला
जगण्याची झाली मारामारीss "
जाई माझ्या दुसऱ्या बाजूने गायला लागली.

मी त्याला हो म्हणून मान हलवली.
पण मी अजिबात ठीक नव्हते.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १३

समर

अज्या: भावा, आज संध्याकाळी सयाजीला येणार काय? पलोमा तिच्या त्या मित्राला भेटायला जातेय आणि त्याच्यासोबत त्याचे पंटर आहेत. जाईजुई तिला सोबत म्हणून जातायत तर कार्तिकी म्हणे आपण पण जाऊ. तू चल, अजून आपली एक दोन पोरं पण बोलवू.

मी: यायलाच लागतंय भावा! :D

मी टेक्स्टला उत्तर दिलं.
हा चान्स मी काही झालं तरी सोडणार नव्हतो.
तिने मला बनवलं की काय? ती अजून रिलेशनशिपमध्ये असेल तर.. मी नक्कीच शोधून काढणार आहे.

मोबाईल खाली ठेऊन मी समोरच्या सोफ्यावर मांडी घालून बसलेल्या पलोमाकडे पाहिलं. काळ्या थ्री फोर्थ टाईट्सवर बारीक निळ्या रेषांचा पांढरा लूज बटन डाऊन शर्ट आणि डोक्यावर नारदमुनी सारखे गुंडाळलेले केस. त्यातून निसटून तिच्या टोकदार हनुवटीपर्यंत येऊन थांबलेली एक रेशमी बट! डोळ्यावर तो सेक्सी ब्लॅक कॅटआय रिमचा चष्मा लावून ती हातातल्या आयपॅडवर पटापट टाईप करत होती. "सो, अजून तरी तुला क्रिकेट आवडतं आहे. ह्यात काही बदल नाही, राईट?" वर बघून तिने विचारले.

"हो. पण आपलं ह्या विषयावर आधीच बोलून झालंय." मी पुढे वाकून गुढघ्यावर कोपरं टेकवून बसलो. ही मुलगी रोज माझा वर्कआऊट ट्रॅक करते, रोज अखंड दोन तास प्रश्न विचारते आणि ते स ग ळं लिहून ठेवते. अजून आता डिस्कस करायला उरलंय काय?

"इतका अडगा होऊ नको हां समर! मी तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करतेय. घोरपडेना काही तरी एक काँक्रिट मुद्दा हवाय." मान हलवून ती उठलीच. तिने दोघांचे ग्लासेस उचलले आणि किचनमध्ये गेली. ती इतक्या परफेक्ट शेपमध्ये आहे की मी मान वळवून तिच्याकडे बघणे टाळूच शकलो नाही. ती थंड पाण्याचे ग्लास घेऊन परत आली आणि समोरच्या टेबलवर ठेवले.

"ऑफ कोर्स! घोरपडे तेच मागणार. त्याला ही फॅक्ट मान्यच करायची नाही की कुठलाही खेळाडू प्रत्येक मॅचच्या प्रत्येक क्षणी ऑन नाही राहू शकत. माझं ट्रॅक रेकॉर्ड बरंच चांगलं आहे. पण शेवटी मीपण माणूस आहे. तू माझी सगळी भंकस ॲनालाईज करू शकतेस. तुला असा एकही प्रसंग मिळणार नाही ज्यामुळे माझ्या खेळावर परिणाम झाला. मी तुला सांगितलं आहे... हा सगळ्याचा एकत्र परिणाम आहे." मी घडाघड बोलून बुक्का पाडून टाकला.

"मला ते समजलं आहे. खरंच. तुझ्यावर खूप जास्त प्रेशर आहे आणि तरीही तू ते चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो आहेस."

"ह्या सगळ्या गोष्टीला तुमच्या मेडिकल टर्म्समध्ये काहीतरी फॅन्सी नाव असेल ना, बस ते त्याच्या तोंडावर मार नि त्याला गप कर." मी हसलो.

ती हसून पाणी प्यायली. "माझ्या मते त्यांना फक्त तू परत खेळणार की नाही यातच इंटरेस्ट आहे. तेही पूर्ण ताकद लावून. तुला अजून बऱ्याच टीमच्या ऑफर्स येतायत का?"

मी डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. "तू अंडरकव्हर काम करत नाहीस ना? घोरपडेची छुपी हस्तक वगैरे?"

तिचं तोंड उघडंच राहिलं. " मी कधीच असं काही करणार नाही."

"पण त्याने तुला हे विचारलं, राईट?"

"त्यांनी चौकशी केली, पण मी म्हटलं आमचं याबाबतीत काही बोलणं झालं नाही. आपण बोललो जरी असतो, तरी मी त्यांना सांगितलं नसतंच. कारण मी तुझ्यासाठी काम करतेय, पैसे ते देत असले तरी."

मी मान हलवली. पलोमा इतक्या खालच्या थराला कधीच जाणार नाही. मला माहिती आहे.

"काही ऑफर्स आहेत. पण मी जर खेळलो तर इंडियन्सकडूनच खेळेन, नाहीतर नाही. ती टीम म्हणजे माझे भाऊ, माझी फॅमिली आहे. माझा असिस्टंट कम मीडीया मॅनेजर जय, तो हे सगळं हॅण्डल करतो पण माझं मन कशात आहे ते त्याला माहिती आहे, त्यामुळे कायम माझ्या निर्णयांना तो बॅकअप देतो."

"तू मेंटली, फिजीकली खेळण्यासाठी एकदम फिट आहेस. प्रश्न हा आहे की तुला खेळायचे आहे का?"

"माझं मत हो म्हणण्याकडे झुकतय. तुझं काय? मला ठीक केल्यावर तुझ्याकडे काही काम आहे?" मी विचारून टाकलं. मला हे ऐकायचंच होतं. तिचे प्लॅन्स ऐकल्यानंतरच मी माझा निर्णय घेणार होतो.

तिने खांदे उडवले. "अजून तश्या काही फॉर्मल ऑफर्स आल्या नाहीत."

"पण येतील. आत्ता कुठे ह्या खुर्च्या अडवून बसलेल्या लोकांना कळतंय की ॲथलीट्स साठी मेंटल गेम किती महत्त्वाचा आहे."

"हम्म.. माझी फेलोशिपच्या वेळची बास्केटबॉल टीम मस्त होती. पण तिथला माझा सिनीयर अजून तिथे काम करतोय त्यामुळे मला काही स्कोप नाही. प्लस मुलगी असल्यामुळे पण मला अपॉइंट करायला लोकांना लिमिटेशन्स येतात."

"पलो, तू मला भेटलेली सगळ्यात टफ मुलगी आहेस. कीप पुशिंग! तू मला जर फिल्डवर पाठवू शकलीस तर घोरपडे तुला नक्की हायर करणार!" मी हसत म्हटलं. खरं सांगायचं तर मी खेळायला तयार झालो तर मी तिला टीमचा फूल टाईम जॉब मिळवून देऊ शकतो, ह्या गोष्टीनेच मी पुन्हा खेळायला प्रवृत्त होतोय. शी डिझर्व्ड द जॉब. पण कोच म्हणजे स्वार्थी माणूस आहे, तो कुणाचा होऊ शकत नाही. बाकी कोणाहीपेक्षा अधिक काळ मी त्याला ओळखतो. खूप वर्ष मी त्याचा गोल्डन बॉय होतो आणि तेव्हा तो माझ्या फुल सपोर्टमध्ये होता. पण आता जेव्हा दोन चार मॅच डड गेल्या, तेव्हा तो किती कटथ्रोट आहे त्याची झलक मला मिळाली. त्याला फक्त मॅच जिंकून हवी, बाकी काही नाही. शेवटी हा बिझनेस आहे, आय नो! त्याबाबतीत मी इतका नाईव नाहीये. माझी किंमत तोपर्यंतच आहे, जोपर्यंत मी परफॉर्म करेन.

"मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय." ती पुढे वाकून माझ्या डोळ्यात बघत म्हणाली. "माझ्यासाठी, माझ्या फायद्यासाठी, कधीही कुठली गोष्ट मान्य करू नको समर. मला माहितीये तू कसा आहेस."

"कसा आहे?" मी पापणी न लववता विचारले.

"मदत करणारा, प्रामाणिक आणि सच्चा." तिने पापण्या मिटल्या. "आणि मला जॉबची अगदी गरज नाहीये. म्हणजे मिळाला तर हवाच आहे, पण माझा विश्वास आहे की गोष्टी घडायच्या असतील तेव्हा घडतात. आपण प्रयत्न कमी पडू द्यायचे नाही. कोणी ना कोणी मला हायर करेलच. न करण्याइतकं माझं काम वाईट नाहीये, हो ना?" ती हसली.

मी हसत मान हलवली.

"म्हणून प्रॉमिस कर की मला मदत करण्यासाठी म्हणून तू कुठलीही गोष्ट मान्य करणार नाहीस. तसं केलंस तर ते माझं फेल्युअर असेल. इथे मी 'तुला' मदत करायला आले आहे."

"आय प्रॉमिस!" मी लहानपणी सारखी करंगळी पुढे केली. ती कायम असं प्रॉमिस करायला लावायची.

तिने जवळ येऊन माझ्याभोवती तिची करंगळी लपेटली. तिचा उबदार श्वास माझ्या गालावर जाणवला आणि तिने हलकेच तिचा टपोरा ओठ चावला.

"एवढ्या मॅचेस खेळणं कंटाळवाणं होत असेल ना? केवढं लांबलचक शेड्यूल आहे!" ती पटकन लांब होऊन सोफ्याला टेकून बसत म्हणाली.

"खूपच! पण जेव्हा तुम्ही आत खेळत असता तेव्हा अमेझिंग फीलिंग असतं. क्रिकेटर म्हणून लाईफच कितीसं असतं, मी पुढच्या एकदोन वर्षात ३३ - ३४ मध्ये रिटायर झालो तरी कुणाला काही वाटणार नाही. लीग वगैरे धरून अजून जास्तीत जास्त दहा वर्ष, तेही अगदी ओढून ताणून. नेहमी इतकं ट्रॅव्हल करावं लागल्यावर नॉर्मल लाईफ जगणं कठीण असतं."

"हम्म, म्हणूनच कश्मीरा आणि तुझं इतकं चांगलं चाललं होतं. तुम्ही दोघेही कायम फिरत असता म्हणून.."

"माझ्या - तिच्या रिलेशनशिपबद्दल तुला लैच काळजी दिसतेय!" मी एक भुवई वर केली आणि तिचे गाल तांबूस झाले.

"आय एम जस्ट क्यूरीअस! आज तुला तिच्याबरोबर इव्हेंटला जायचं होतं ना?"

"ती मैत्रीण आहे, पण मी त्या इव्हेंटला जात नाहीये. आमचं बोलणं झालं आणि मी न गेलेलं बरं असं मी ठरवलं.

"का?"

माझ्या पर्सनल लाईफ बद्दल किती ते कुतूहल!! मी प्रयत्न करून चेहर्‍यावर काही रिअ‍ॅक्शन दाखवणं टाळलं.

"कारण ती माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्टेड आहे. मी तिला स्ट्रेटवे सांगितलं होतं की आपण कायम मित्र म्हणूनच ठीक आहोत. मला गोष्टी अजून कॉम्प्लिकेट करायच्या नाहीत."

"तू ह्या सगळ्यात असून इतका वेगळा कसा राहू शकतोस? तू एका टॉपच्या ॲक्ट्रेसला डेट करत होतास, तुम्ही इतक्या सगळ्या मॅगझिन कव्हर वर होतात! तरीही तू इतका 'तू' कसा काय राहू शकतोस!" ती आश्चर्याने डोळे विस्फारत म्हणाली.

मला हसायला आलं. "तू मला दिलेलं हे बेस्ट काँप्लिमेंट असेल! पैसा आणि इगो माणसाला काय बनवतं ते मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मी आधीच जाणीवपूर्वक ठरवलं होतं की ही नशा डोक्यात जाऊ द्यायची नाही. हे सगळं टेंपररी आहे. आज मी चांगला खेळतोय ते एन्जॉय करायचं. जेव्हा वाईट खेळेन तेव्हा गाशा गुंडाळायचा. मी जवळपास तिथे पोचलो आहे. अजून एखादा सीझन किंवा बाहेर पडणे."

तिने मान हलवली आणि ग्लास उचलून पाणी प्यायली. "मी एवढी वर्ष एवढ्या ॲथलीट्स बरोबर काम केलंय. पण तुझी स्वतःची एक वेगळीच लीग आहे!"

"माझं एवढं पण कौतुक नको करू! मला माहिती आहे फिल्डवर मी एकदम दबंग क्रिकेटर असतो. पण फक्त तेवढी एकच गोष्ट मला डिफाईन करत नाही."

"गुड ॲटिट्यूड!"

"रिअलिस्टिक ॲटिट्यूड!!" मी सोफ्याला मागे टेकून आळस देत म्हणालो. "सो.. मला अजयने मेसेज केला होता. तू म्हणे कुठल्या माणसाला सयाजीमध्ये भेटायला जाते आहेस आणि बाकी सगळे तुझ्याबरोबर जाणार आहेत.. तो मला बरोबर ये म्हणून आग्रह करतोय."

"कोल्हापुरात काहीही सीक्रेट राहू शकत नाही! हो, तो माणूस म्हणजे हरीश- माझा एक्स बॉयफ्रेंड. आम्ही काही महिने डेट करत होतो. तो इथे एका बॅचलर पार्टीसाठी आलाय."

"मग तो एक्स कशामुळे झाला?" मी विचारण्यापासून स्वत:ला थांबवू शकलो नाही. मला कारण ऐकायचंच होतं.

"त्यात काही सिरीयस नव्हतं. फक्त कॅज्युअल रिलेशनशिप होती. इव्हेंट, पार्टीज वगैरे अटेंड करायला बरोबर कोणी असेल तर जरा बरं वाटतं. मी माझ्या कामात खूप सिरीयस होते त्यामुळे बाकी कोणाच्यात गुंतून पडायचं नव्हतं. तसंही लवकर दिल्ली सोडून निघायचं हे माझं ठरलेलंच होतं."

ही मुलगी अजूनही आपलं हृदय सेफ ठेवायची काळजी घेत होती.

"हां, तुला एक विचारायचं होतं."

"विचार की!" तिने हातातला ग्लास खाली ठेवला.

"मला पुढच्या महिन्यात एका इव्हेंटसाठी मुंबईला जायचंय. मला तिथे कोणी डेट किंवा आर्मकँडी नकोय. उगीच इश्यू करतात लोक. आपण इतका वेळ एकत्र आहोत, एकत्र काम करतो आहोत तर मेबी तुला यायला आवडेल. येशील का तू?"

तिचे डोळे विस्फारले पण तिने पटकन मान हलवली. "येईन की! मला आवडेल यायला."

मी तिला एवढं का पुश करतोय! आम्ही आधीच एवढा वेळ एकत्र घालवतोय, आमचं एक रूटीन सेट झालंय, बऱ्याच वर्षांनी मला इतकं शांत शांत, सूदिंग वाटतंय. मला खात्रीने सांगता येत नाही, हा कोल्हापूरला आल्याचा इफेक्ट आहे की पलोमा सोबतीला असल्याचा!

"थॅन्क्स! मी आंघोळीला जातो. सयाजीला आपण एकत्र जायचं की तुझा मित्र तुला पिक करणार आहे?" मी एकदम चिल आहे असं दाखवत विचारलं पण नुसतं तिला त्याच्याबरोबर बघायच्या विचारानेही माझे खांदे टेन्स झाले.

"नाही, तो मला तिकडेच भेटेल."

"ओके, येतो मग थोड्या वेळात." उठताना माझा हात टेबलवर आपटला. सरसरत एक बारीकशी कळ उठली. पलोमाच्या अवतीभवती राहून माझ्या आत खोल काहीतरी हललंय, जे इतकी वर्ष जाणवलं नव्हतं. पण मी तिला स्वतःपेक्षा जास्त ओळखतो. सध्या माझं आणि तिचंही फ्यूचर टांगणीला लागलं आहे, अश्यावेळी पुढे पाऊल टाकण्यात अर्थ नाही. कदाचित हा फक्त नॉस्टॅल्जिया असेल.. माहीत नाही, पण आमच्यात काहीतरी घडतंय.

आमची रिलेशनशिप संपण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे एकमेकांपासून खूप लांब रहायला जाणं. हा ताण, ही खेच आमच्यात कायमच होती. पण ते तिलाही जाणवतं आहे का कोण जाणे.. आणि तिला जाणवलं तरी ती परत एक चान्स घ्यायला तयार आहे का? ती अजूनही स्वतःला कोणाच्यात न गुंतता सेफ ठेवतेय. मी तिच्याबाबतीत आता एकही चूक करणार नाही. पुन्हा ती मला सोडून गेली तर ते मी सर्वाइवच करू शकणार नाही.

"समर!" मी लिव्हिंग रूमच्या दाराबाहेर जाताजाता तिची हाक आली. मी थांबून वळून पाहिलं.

"थॅन्क्स फॉर इन्व्हायटींग मी. मी वाट बघतेय त्या इव्हेंटची." ती हसत म्हणाली.

"यू नो, तू कायमच माझी फेवरीट आहेस. लाँग डिस्टन्सने काही फरक पडत नाही!" मी डोळे मिचकावले आणि शॉवर घ्यायला बाहेर पडलो.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १४

मी घरी जाऊन आंघोळ करेपर्यंत अज्याचे दोन कॉल येऊन गेले. शेवटी मी कपडे घालून केस जेमतेम पुसले आणि तसाच पलोमाच्या घराकडे निघालो. तिने दार उघडताच मी शिट्टी वाजवली! तिने कत्थई रंगाचा स्लीवलेस काऊल नेक टॉप आणि ब्लॅक ट्रावझर्स घातल्या होत्या. नेहमीचे सरळसोट केस आता सॉफ्ट कर्ल केले होते. कानात कसल्यातरी स्टोनचे ड्रॉप इयरींग. मी तिच्या मागोमाग किचनमध्ये गेलो. जाईजुई तिथे हसत उभ्याच होत्या.

"लूकींग गुड, बॅटमॅन! पलोने नोटीस केलंच असेल!" जाई पलोमाकडे बघून भुवया उडवत म्हणाली.

"एक दिवस तरी तुझा जाईपणा बंद कर!" पलोमा हळू पण डेडली आवाजात तिला ओरडली.

आम्ही घराबाहेर पडलो आणि हॉटेलवर पोचेपर्यंत गाडीत पूर्ण वेळ जाई-जुईचा आवाज होता. "मग, बॅटमॅन? गंजक्याला भेटायला तय्यार काय?" जाईने माझ्या मागून विचारले.

पलोमाने लगेच मान वळवून तिला एक जहाल लूक दिला. "एवढा काय गंजका नाहीय तो! तू फक्त एकदा व्हिडिओ कॉलवर बघितलं आहेस त्याला. उगा जज करू नको."

"तर तर, तेवढ्यातल्या तेवढ्यात मला तो टीमचा ओनर आहे, त्याचा कार्पेटचा केवढा मोठा बिझनेस आहे वगैरे सांगून झालं. कायम एवढा शायनिंग मारत असतो! सॉरी भैणी, माझ्या बुक्समध्ये तो गंजकाच आहे!" जाईचे तोंड कोणी बंद करू शकत नाही.

"तसा बराय तो. तेव्हा कॉलवर नर्व्हस असेल." मध्येच जुई म्हणाली.

"तो नुसता शो ऑफ आहे आणि तुमच्यात एकही कॉमन गोष्ट नव्हती." जाई पलोमाकडे बघत म्हणाली.

"आम्ही दोघंही दिल्लीत होतो, दोघांनाही खाण्याची आवड होती आणि आपापल्या कामात बिझी होतो एवढं पुरेसं होतं. तू जरा स्वत:कडे लक्ष दे आता." उतरून हॉटेलच्या दाराबाहेर आल्यावर पलोमा म्हणाली.

"हुं, आय होप त्याचे फ्रेंड्स तरी हॉट असतील! तो दिसायला छान आहे हे मी मान्य करते.." जाई पटपट चालत पलोमाच्या बाजूला पोचली.

ह्या फुलसुंदर मुली एकमेकींना भारी टोलवतात. बोलण्यात कोण कोणाला ऐकणार नाही. मला ऐकायला मजाच येते. इतकी वर्ष मी त्यांचे भरपूर वादविवाद बघितलेत पण एंड ऑफ द डे त्या कायम एकमेकींच्या पाठीशी असतात. 

आम्ही आत जाताच बारशेजारी अज्या आणि दोन मित्र उभे होते. क्राफ्ट बिअरची ऑर्डर दिलेली होती. दिदी आणि अजय पिणार नव्हते. आम्ही जाताच दिदीने येऊन सगळ्यांना मिठ्या मारल्या आणि आम्ही कोपऱ्यात दोन टेबल जॉईन करून बसलो. सगळ्यांनी आपापले मग्ज भिडवले. "आपला भाऊ परत कोल्हापुरात आलाय म्हणून चीअर्स!" अजय आपला पाण्याचा ग्लास पुढे करून म्हणाला.

"चीअर्स टू हॉट बॉयज, नाईस बीयर अँड बेस्ट फ्रेन्डस!!" जाई बीअरचा एक मोठा घोट घेऊन फेक ॲक्सेंटमध्ये म्हणाली. सगळे खिदळले. तेवढ्यात दोन चार मुलामुलींनी येऊन ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी गर्दी केली. मी मग खाली ठेवला आणि त्यांच्याबरोबर फोटो काढले. परत खाली बसलो तेव्हा शेजारी पलो माझ्याकडे गालात हसत बघत होती. "ह्याचा कधी कंटाळा नाही येत?" ती कुजबुजली.

"नाह, सेलिब्रिटी असल्याचा फायदा, तोटा दोन्ही आहे. आय डोन्ट माईंड!"

अचानक दरवाजातून आत येणाऱ्या घोळक्याचा गोंधळ, जोरजोरात हसायचे आवाज ऐकू आले. सगळा ग्रुप सूटबीट घालून होता आणि सगळी पोरं आधीच बऱ्यापैकी हाय दिसत होती. सयाजीमधल्या लोकल क्राऊडमधे हे लोक लगेच वेगळे दिसत होते. घट्ट ब्लू सूट आणि एव्हीएटर्सवाला एक माणूस आमच्या टेबलकडे आला. केस जेल लावून मागे वळवलेले. खरंच गंजका! जाई वॉज राईट!! माझ्यापेक्षा उंचीला थोडा कमी आहे.

"रात्रीचं गॉगल घालतंय हे अडगं!" जाई खुसफुसली. पलो आणि जुईने दोन्हीकडून तिला कोपरं मारली.

"पलोमा फुलसुंदर! लाँग टाईम..." त्याला बघून पलो उभी राहताच त्याने खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढून घेतली. बघतानाच माझ्या दोन्ही हातांच्या घट्ट मुठी वळल्या गेल्या. अज्याने माझ्या खांद्यावर थोपटत मान हलवली. "शांत गदाधारी भीम, शांत!"

माझा तिच्यावर काही हक्क नव्हता, पण फ्रेंड्स म्हणून तरी मी तिला प्रोटेक्ट करू शकतो ना!

"हॅरी, तुम मेरी सिस्टर्ससे मिल चुके हो. और ये है समर, अजय और निखिल." बोलता बोलता तिने त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली. ती ज्या प्रकारे त्याच्याशी अंतर ठेऊन बाजूला झाली ते माझ्या नजरेतून सुटलं नाही. तरीही आमच्याशी हॅण्ड शेक करायला त्याने हात पुढे केला आणि दुसरा हात तिच्या कंबरेवर ठेवला.

"ओ वेट! तुम तो क्रिकेटर हो राईट? मैं क्रिकेट ज्यादा फॉलो नही करता, आय एम मोर इंटू फुटबॉल!" तो मिजाशीत म्हणाला.

"आय एम द क्रिकेटर! राईट!!" माझ्या आवाजातून वैताग लपत नव्हता.

"ही वॉज द कॅप्टन! अँड द बेस्ट वन वी हॅड" अजय हात मिळवताना म्हणाला.

हा माणूस त्याच्या ग्रुपमध्ये जरा तरी सोबर वाटत होता पण त्याच्याबरोबरची पोरं ड्रिंक्सच्या ऑर्डर ओरडत होती, बरळत वेटरशी वाद घालत होती. जाम खिरीत खराटा!!

जाईने नाटकीपणे लांब श्वास सोडला. "श्या!! मी हॉट बॉयज म्हणत होते!" तिच्याकडे बघून न हसण्याचा प्रयत्न करत पलोने तोंडावर हात ठेवला आणि हरिशकडे वळली. "हम्म. समर इज अ पास्ट कॅप्टन अँड नाउ ही प्लेज फॉर द इंडियन्स. मैं उसीके साथ काम कर रही हूं, पता है ना?"

त्याने मान हलवली. "हां, हां. एक आदमी को खुद बहुत सिक्युअर रहना पडता है जब लडकी इतने सारे जॉक्स के साथ डेली बेसिस पर काम करती है!"

पलोमाने काही क्षण डोळे मिटून घेतले. "हे, कुछ खाने के लिये ऑर्डर करते है. यू गाईज इट अँड सोबर अप अ लिट्ल." त्याने मान हलवली. "साऊंडस् गुड, बेबी!" तिचं हसू मावळलं. ती त्याच्या दंडाला धरून दुसऱ्या टेबलकडे घेऊन गेली. तिला त्याला आमच्यापासून दूर ठेवायचंय, साहजिक आहे.

"ई ss गंजक्याचे मित्र डबल गंजके आहेत!" जाई तोंड वाकडं करत म्हणाली. मी हसलो पण माझी नजर पलोवर होती. हा फालतू माणूस सारखा तिला टच करायला बघत होता. तिने तो त्रास देत असल्याची एक जरी हिंट दिली तरी मी त्याचे दात पाडायला कमी करणार नाही.

"खरंच गंजके!!" जुईपण हसत म्हणाली. "कारण समर हा एकच डिसेंट मुलगा होता तिच्या आयुष्यात."

दिदीने पाण्याचा ग्लास खाली ठेवला. "हम्म, गंजक्या लोकांच्यात जीव अडकून पडत नाही." दीदी माझ्याकडे बघून बोलत होती."आय थिंक दॅट्स द गोल!"

आणि खळ खटॅक, त्याच क्षणी माझ्या काळजात कळ उठली. मी तिला दुसऱ्या कोणा माणसाबरोबर बघूच शकत नव्हतो.

कदाचित ती मला कश्मीराबरोबर बघून अशीच खुळ्यागत वागत होती.

कदाचित ह्या वेळी मी तिला बाथरूममध्ये ओढून राऊंड टू केला पाहिजे! मी पाण्याचा ग्लास रिकामा केला आणि पलोमाकडे नजर टाकली. तिचे डोळे माझ्यावरच खिळले होते.

पलोमा

"तो मुझे अपने घर नाही बुलाओगी?" हरीषने कोणाला तरी टेक्स्ट करून फोन खाली ठेवला आणि विचारलं. माझं त्याच्या फोनकडे लक्ष गेलं आणि तोंड उघडच राहिलं. स्नॅपचॅटवर एका अतिशय डीप नेक लेहेंगा चोली घातलेल्या बाईचा फोटो होता. "इग्नोर हर! ये कुछ लडकीया दिल्लीसे हमारे साथ आयी है, मॉडेल्स है. शादी में डान्स, एंटरटेनमेंट करेगी. ये रमोना, मेरे पीछे पडी है." त्याने फोन पुढे सरकवून तिचा फोटो दाखवला. मी कसंबसं हसणं कंट्रोल केलं.

जाई बरोबर होती. हा अगदीच गंजका आहे. आम्ही दिल्लीत एकत्र असायचो तेव्हा तो बऱ्यापैकी डिसेंट वागायचा. पण पुरुषांचा ग्रुप आणि अल्कोहोल एकत्र असेल तेव्हा बरोबर त्याच्या आतला एमसीपी बाहेर यायचा.

आणि ह्या मुलीशी चॅट करता करता हा मला घरी येऊ का विचारतोय!!

"हॅरी, आय थिंक यू विल हॅव बेटर टाईम विथ रमोना!" मी पटकन म्हणाले.

"लिसन पलोमा, शी डझंट मॅटर टू मी. यू मॅटर! ऑल्सो यू हॅव बेटर कर्व्हस!!" त्याने पुढे होऊन माझ्या हातावर हात ठेवला. व्हॉट!! हे मी विचार केल्यापेक्षाही वाईट आहे. नक्कीच तो खूप जास्त प्यायलाय. आधी हाय असतानाही तो इतका वाईट वागत नव्हता.

"धिस इज इनफ. आय थिंक यू आर ॲट द राँग प्लेस. अपने फ्रेंड्स को लेकर घर जाओ और एन्जॉय करो." मी उठून उभी राहिले. तो काही माझा फार खास मित्र वगैरे नव्हता त्यामुळे त्याने कॉन्टॅक्ट तोडला तरी चालेल. त्याआधी मीच ब्लॉक करेन त्याला. आत्ता इथून निघणं हेच बेस्ट राहील.

त्याच्याबरोबर आलेले पोट्टे आजूबाजूच्या लोकांना डिस्टर्ब करत होते. जोरजोरात बोलणं, खिदळणं, शिव्या सगळं सुरू होतं. आत्तापर्यंत त्यांनी दोन ग्लास फोडून, एक खुर्ची पाडून झाली होती. हे काय इथे चालणार नव्हतंच. वेटर आल्यावर हरीषने कार्ड टेबलावर आपटलं. पेमेंट झाल्यावर वेटरने बाकी पोरांना अदबीने निघायला सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन कार पिकअपसाठी येऊन थांबल्या होत्या.

"चल जा बे, बेंचो!" एकाने वेटरला मागे ढकलला. तडक समर, अजय आणि बाकी मुलं उठून उभी राहिली. दिल्लीवाले त्यांच्याकडे बघून समजून गेले की ते संख्येने जास्त असले तरी आत्ता त्यांना आमची टीम भारी पडेल. सो हात वर करून त्यांनी दाराकडे माघार घेतली.

"वैसे भी ये घाटी जगह इतनी बोरींग है!" एकजण जाता जाता तोंडातला पानमसाला सांभाळत म्हणाला.

"गुड चॉईस!!" जाईने त्याला मधलं बोट दाखवलं.

"बेबी, आय वाना गो होम विथ यू.." हरीष माझ्या खांद्यावर हात टाकत बरळला. त्याच्या तोंडाला स्कॉच आणि सिगारेटचा एकत्रित भयाण वास येत होता. मी त्याचा हात झटकून लांब झाले. आम्ही एकत्र असताना तो कधीच मला बेबी वगैरे म्हणाला नव्हता. आजच हे कुठून काढलं देव जाणे.

आणि ते मला अजिबात आवडलं नव्हतं.

"हरीष, तुम्हे जाना चाहिए. धिस इज नॉट हॅपनिंग." मी सरळ सांगितलं. मला त्याचा अपमान करायचा नव्हता पण आजच्या गोष्टी त्याला उद्या आठवणारसुद्धा नाहीत.

"तुम लोग निकलो, मैं पलोमा के साथ जाऊंगाss" त्याने दाराबाहेर पडणाऱ्या त्याच्या ग्रुपला ओरडुन सांगितलं. मी समोर बघितलं तर समर माझ्यावर लक्ष ठेऊन उभा होता, आता अजय आणि बाकी लोक पण बघायला लागले.

"हे! लिसन टू मी! तुम मेरे साथ नही जा रहे. अपने फ्रेंड्स के साथ कॅब मे बैठो और घर जाओ." कोपऱ्यातले टेबल आणि म्यूटेड लायटिंगचा फायदा घेत हरीषने माझ्या मानेमागे हात ठेऊन पुढे ओढलं. एक क्षण मी सुन्न झाले, काही सुधरेनाच. मग त्याचे ओठ जवळ दिसल्यावर अचानक तो काय करतोय ते लक्षात आलं आणि मी त्याच्या छातीवर हात ठेऊन, जोर लावून ढकलला. काय होतंय ते कळायच्या आत तो मागच्यामागे माझ्यापासून दूर खेचला गेला होता.

समर!!

त्याने हरीषला बुजगावण्यासारखं उचलून मागच्या टेबलवर आपटलं. "हाथ हटाव.. डोन्ट यू डेअर टच हर." तो खर्जातल्या आवाजात ओरडला, त्याच्या डोळ्यांमध्ये एक रानटी झाक होती आणि तो रागाने अक्षरशः थरथरत होता. मी इकडेतिकडे बघितलं. नशिबाने एव्हाना तिथे आम्हीच सगळे शिल्लक होतो.

मी घाबरून त्याचे खांदे धरले. "समर, सोड त्याला. मी ठीक आहे. हरीष, यू नीड टू गो. राईट नाउ!!"

हरीष एव्हाना कसाबसा उठून उभा राहिला होता.
"ईझी डूड, ईझी! ये दो लाख का सूट है.." त्याने कॉलर नीट करून कपडे झटकले आणि माझ्याकडे रागाने पाहिलं. "मैं रमोना को कॉल करता हूं." मी अविश्वासाने मान हलवत मागे झाले. "टेक केअर हरीष." मी शांतपणे म्हणाले.

त्याने मला एक सल्युट ठोकला आणि समरला बाजूला सारून बाहेर गेला.

"काय ऐतिहासिक भेट होती ही!!" दिदी अजयला चिकटून म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १५

"मी त्याला व्यवस्थित हॅण्डल करत होते!" मी समरकडे रागाने बघत म्हणाले.

"अजिबात नाही, पलो. उलट मी त्याला द्यायला हवी त्यापेक्षा खूप जास्त सूट दिली." हा आरामात बसून पाणी पितोय. आत्ताच ह्याने एका माणसाला टेबलवर फेकला होता!!

"तू आत्ता एका माणसाला धरून आपटलास आणि तुला काहीच वाटत नाही?!" मी तो बसलेल्या टेबलकडे बघितलं आणि बसलेले सगळेजण माझ्याकडे बघून हसले.

"जरा जास्त झालं का? तो तुला सारखा हात लावत होता आणि जबरदस्ती गळ्यात पडत होता म्हणून मी ते थांबवलं, बस! त्याचं नशीब समज, नाहीतर चांगला त्याच्या कानाखाली जाळ काढला असता. काय अजय?" तो शांतपणे म्हणाला. "मक्काय तर! कुनाला तंबी करतंय, कानाखाली ऑर्केश्ट्राच वाजवला असता!" अजयने त्याची री ओढत मान डोलावली.

"तुला मध्ये पडायची काही गरज नव्हती. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे." माझा आवाज वाढला.

"असं का? तुला सगळ्यातलं सगळं कळतं हे नाटक आधी बंद कर. कबूल कर की कधीकधी तुलापण मदत लागतेच!" तो केसांमधून हात फिरवत, माझं निरीक्षण करत म्हणाला.

मी गरीब बिचारी कोणी आहे आणि हा  माझा नाईट इन शायनिंग आर्मर काय! मी घुश्श्यातच माझी पर्स उचलली आणि भराभर तिथून बाहेर पडले. माझं रक्षण करायला, मला समरची गरज नव्हती. रादर कोणाचीच गरज नव्हती, अँड आय लाईक इट दॅट वे.

मी भराभर चालत निघाले. रात्री इतक्या उशिरा रस्त्यात तुरळक माणसं दिसत होती. नुकताच पाऊस पडून गेल्याने रिक्षा वगैरेचा पत्ताच नव्हता. रस्त्यात जागोजागी पाण्याने डबरी भरली आहेत. आज अमावास्या असेल बहुतेक, चंद्र कुठेच दिसत नाहीये. सगळीकडे दाट अंधार दिसतोय. रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात, कडेला पसरलेल्या गुलमोहोरांच्या सावल्या हलत आहेत. अचानक कोणीतरी माझा दंड पकडला. मी मागे वळताच धाडकन त्याच्या टणक शरीरावर आपटले आणि चिडून वर बघितलं. "हाऊ डेअर यू!!" 

"अडगेपणा बास कर, पलो." समर गंभीर चेहऱ्याने म्हणाला.

मी चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि हात झटकून सोडवला. "मी अडगी नाहीये, ते टायटल तर तुझं आहे." मी डावीकडच्या गल्लीत आत वळले. तो मला अडवायला समोर आला आणि मी मागे झाले. मागच्या उंच कंपाऊंड वॉलला माझी पाठ टेकली. वरचा दिवा पण फुटला होता आणि आम्ही बऱ्यापैकी काळोखात होतो. मी वर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे माझ्यात मिसळले आणि ओठांचे कोपरे वर उचलले गेले.

"सो, तू मला अडगा समजतेस, हां?" एका हाताच्या ओंजळीत माझा चेहरा उचलत त्याने गंभीरपणे विचारले.

"मग तुझं काय चाललं होतं तिथे? तुला काय वाटलं, मी स्वत:ची काळजी नाही घेऊ शकत?"

"त्याची गरजच नाही पडली पाहिजे. ते गंजकं त्याच लायकीचं आहे. जाई बरोबर सांगत होती. मला माहिती आहे, तू स्वत:ची व्यवस्थित काळजी घेऊ शकतेस. फक्त तेवढ्यासाठी मी त्याला मागे खेचला नाही."

एव्हाना मी आपोआप त्याच्या छातीवर हात ठेवले होते. तेवढ्याने हातांवर काटा आला आणि त्याला अजून स्पर्श करण्याचा मोह होत होता. माझ्या श्वासांचा वेग वाढला, तो इतक्या जवळ असण्याने खोलवर काहीतरी होत होतं. मी पापण्या बंद केल्या आणि गालावरच्या त्याच्या हाताकडे चेहरा झुकवला. "मग कशासाठी?" मी पुटपुटले.

"कारण त्याने तुला सगळीकडे स्पर्श करताना मला बघवत नव्हते. नुसता तुझ्या खांद्यावर हात टाकलेला बघूनसुद्धा चक्कीत जाळ झाला. तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघायला मला अजिबात आवडत नाही, पलो."

लगेच माझे डोळे उघडले. "का?" मी हळूच विचारलं आणि कोरड्या झालेल्या ओठांवरून जीभ फिरवली.

"माहीत नाही. कदाचित तुला मला कश्मीराबरोबर बघायला आवडत नाही, तसंच."

हम्म, बरोबर. आय हेट इट. आय हेट हर, आय हेट द वे शी टचेस हिम! एवढंच काय, ती जशी त्याच्याकडे बघते तेही आवडत नाही.
"कदाचित ह्या जुन्या फीलींग्ज बाहेर येत असतील.." मी बारीक आवाजात स्वतःशीच म्हणाले.

"कदाचित ह्या नव्या फीलिंग्ज बाहेर येत असतील!" त्याचा चेहरा माझ्या अजून जवळ आला.

"तसं काही होऊ शकत नाही. तू माझा क्लायंट आहेस." मी घाबरले होते पण त्याला किस करायची इच्छा अजूनच तीव्र होत होती.

"तुला काय वाटतं, मी घोरपडेला जाऊन सांगेन की तुमची स्पोर्टस सायकॉलॉजीस्ट समोर आल्यापासून माझा टोटल मेल्टडाऊन झालाय!" बोलून होताना त्याचे ओठ माझ्या ओठांना किंचित स्पर्शून गेले आणि माझ्या अंगातून वीज सळसळली.

"समर.." मी नकारार्थी मान हलवत म्हणाले. "आपण हे नको करायला."

"नकोच करायला. पण तुझं आधीच एकदा मला किस करून झालंय." तो ओठांपाशी कुजबुजला.
माझ्या श्वासांनी आता मॅराथॉन स्पीड पकडला आणि विचार धूसर व्हायला लागले.
"तुला काय हवंय ते तू सांग." तो पुढे म्हणाला.

"मला फक्त तुला किस करायचंय.." माझ्या आवाजातली गरज माझ्याच ओळखीची नव्हती.

"आय वॉन्ट टू किस यू टू, बेबी!"
हे म्हणताना त्याचा आवाज मला इतका आवडतोय आणि हेच हरीश म्हणाला तेव्हा ते किती घाण वाटलं होतं!

"त्यातून अजून काही अर्थ काढू नको, आपण पुढे कुठेही जाणार नाही." मी पुन्हा म्हणाले. त्याला हे स्पष्ट कळलं पाहिजे की ही फक्त वन टाईम गोष्ट आहे. वेल, मागचं धरलं तर टू टाइम्स!

"क्लिअर आहे!" त्याने मान हलवली. क्षणार्धात त्याचे ओठ माझ्या ओठांवर होते आणि माझी बोटं त्याच्या केसांत गुरफटली. त्याच क्षणी मी माझ्या मेंदूचं ऐकायचं बंद केलं. मी त्याला हळूच मागे ढकललं आणि तो खाली माझ्याकडे बघून सेक्सीएस्ट खोडकर हसला. मी त्याचा हात धरून त्याला अजून थोड्या अंधाऱ्या कोपऱ्यात ओढत नेला. तेवढीच जरा जास्त प्रायव्हसी!

"मग, कुठे होतो आपण?" मी पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकून किस करत विचारलं. त्याने पटकन खाली वाकून दोन्ही हातांनी मला वर उचललं पण आमच्या ओठांचा कॉन्टॅक्ट कायम होता. आता माझ्या डोक्यातले सगळे विचार एकेक करून हलके होत उडून जात होते. खोलवर जाणाऱ्या ओठांबरोबर माझ्या बोटांमधल्या त्याच्या दाट रेशमी केसांचा स्पर्श मला पुन्हा त्याच्या प्रेमात पाडत होता. किती वेळ गेला कोण जाणे, लांबून एक हॉर्न कानावर आल्यावर त्याने अलगद माझे पाय जमिनीला टेकवले. मी मागच्या खडबडीत भिंतीला डोकं टेकून एक खोल श्वास घेतला.

"गॉश!" मी पापण्या उघडल्या तेव्हा तो माझ्याकडेच पहात होता. "दॅट वॉज.. उम्म... वॉव!!" मी ओठ चावत म्हणाले.

"तुझ्याकडून हा वॉव मला कुठल्याही दिवशी ऐकायला आवडेल!" तो माझ्या खालच्या ओठावरून अंगठा फिरवत म्हणाला.

"तू हे सोपं करतोस."

"मी काय सोपं करतो?"

"तुझ्याबरोबर असणं! इट्स सो.." मी शब्द शोधत होते.

"हॉट?" त्याने चिडवलं पण त्याच्या डोळ्यात अजूनही लहरणारी तहान मला दिसलीच.

"फमिलीअर!" मी किंचित हसले. "आणि हॉट आहेच."

"सगळं एवढं अवघड का करत असतेस मग?" त्याने माझ्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत विचारलं.

"कोण बोलतंय बघा!" मी पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाले.

"पलो, जपून. मी थांबू शकणार नाही आता.." त्याने मिठीत घट्ट ओढून माझ्या गळ्यावर ओठ टेकले. मी डोकं मागे टाकून उसासा सोडला.

"तुला काय वाटलं, सगळी पॉवर तुझ्याकडेच आहे?" मी गालात हसत म्हणले. पण त्याचवेळी मी तोंडून बाहेर पडू पाहणारे सगळे उष्ण श्वास आणि उसासे दाबून ठेवायचा प्रयत्न करत होते. ह्या मनुष्यामुळे खूप खूप काळाने माझं शरीर असं रिॲक्ट करत होतं. त्याच्या पातळ टीशर्टमधून जाणवणाऱ्या ॲब्जवरून मी बोटं ट्रेस केली.

"आता माझं नाव घेऊन कोण ओरडलं? त्याने हळूच माझा ओठ चावला. "डॅम!! आय कान्ट कंट्रोल, पलो!"

त्याच्या ओठांवर आधीसारखंच माझं नाव ऐकून माझे डोळे जरा भरून आले.

"धिस इज सो अनप्रोफेशनल. उद्या आपण समोरासमोर बसून काम कसं करणार आहोत?" माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. हे मला हवंय, तो मला हवाय. पण हे मी ठरवल्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. मी किती प्रयत्नांनी त्याच्यापासून लांब गेले. किती दिव्य करून मी मूव्ह ऑन झालेय.

"ही काही पहिली वेळ नाहीये, पलो. तुझ्याबरोबर असताना काय फील होतं, ते मी विसरलो असेन असं खरंच वाटतं तुला? आयुष्यभर मी ते विसरू शकत नाही. आणि अजूनपर्यंत तरी मी तुझ्याशी पूर्ण प्रोफेशनल वागलो आहे. हो ना?" आह, तो मुद्दाम सेक्सी आवाजात मला चिडवत होता.

"असं हा माणूस म्हणतोय ज्याने सयाजीजवळच्या अंधाऱ्या गल्लीत मला भिंतीत दाबून ठेवलंय!"

"हेच आपण आहोत. तू आणि मी. तुला हवं तर तू डिफेन्ड करणं सुरू ठेव. पण मी तुझी वाट बघत असेन, की आपल्या दोघांनाही माहिती असलेली गोष्ट तू कधी मान्य करतेस." त्याचे ओठ गळ्यावरून हळू हळू खाली जात होते.

"काय गोष्ट?" मी  बंद पापण्यांआडून विचारलं.

"आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांना हवे असतो. तू कितीही देशाच्या दुसऱ्या टोकाला पळून जा पण ही फॅक्ट आहे. नाहीतर मान्य कर." त्याच्या उष्ण श्वासांचा आता चटका बसत होता.

"मला तू हवा आहेस, समर. पण फक्त आजच. फॉर ओल्ड टाइम्स सेक. उद्यापासून सगळं बॅक टू नॉर्मल."

त्याने मान वर करून माझ्या डोळ्यात बघितलं आणि हळूहळू एक खोडकर हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. "सकाळपर्यंत तू माझी आहेस!" त्याने पटकन माझ्या ओठांवर ओठ टेकवले आणि हात धरून बाहेर मेन रोडवर घेऊन जाऊ लागला. "काय करतोय आपण?"

"आपण सगळ्यांना बाय म्हणतोय आणि निघतोय."

"एक मिनिट, एक मिनिट!" मी त्याला चालता चालता थांबवलं. पर्समधून टिश्यू काढला आणि त्याच्या ओठांवरून फिरवला. त्याच्या भुवया वर गेल्या. "लिपस्टिक!" मी ओठ दाबून हसले.

आम्ही पळतच हॉटेलवर पोचलो. मी कसेबसे रिकाम्या हाताने विस्कटलेले केस नीट केले. आत सगळे अजूनही गप्पा ठोकत बसले होते. मी बहिणींना मिठ्या मारुन बाय म्हटलं. जाई अजूनही गंजक्या लोकांना नावं ठेवत होती.

"ओके, उद्या मला प्रॅक्टिससाठी लवकर उठायचं आहे. आम्ही निघतो." समर सगळ्यांचा निरोप घेत म्हणाला.

"कोणीतरी घाईत दिसतंय!" दिदी भुवया वर करून म्हणाली.

"उद्या लवकर उठायचंय." मी लाल होणारे गाल दिसू न देण्याचा प्रयत्न करत म्हणाले.

आम्ही दारातून बाहेर पडताना सगळे हसत बाय बाय ओरडत होते. लिफ्टमधून रिकाम्या पार्किंगमध्ये पाय ठेवताच समरने मला सरळ उचलून खांद्यावर टाकलं, जशी काही मी हलकी बाहुली होते. "काय करतोयस समर!?" मी ओरडले.

"माझ्याकडे फक्त सकाळपर्यंत वेळ आहे. तो तुझ्या हळूहळू चालण्यावर वाया नाही घालवणार!!" तो हसता हसता गाडीकडे भराभर जात म्हणाला आणि मी चेहराभर पसरणारे हसू रोखू शकले नाही.

मला माहितीये, ह्या कृतीसाठी उद्या मी स्वतःला शिव्या घालणार आहे. पण आज मला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे.

कारण खूप वर्षांपासून मला हे कशाहीपेक्षा जास्त हवं होतं.. टू बी प्रिसाईज, अकरा वर्षे!

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १६

समर

"मला चालता येतं, माहिती आहे ना?" तिने माझ्या पाठीत धपाटा घातला. ऑss मी ओरडलो.

"माहिताय की! सकाळीच मला धापा टाकेपर्यंत पळवलंस तू." मी तिला खांद्यावर घेऊन दारातून आत आलो आणि पायाने दरवाजा लोटला. समोरच ओपन किचनच्या भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर तिला बसवलं आणि तिच्या गळ्यात हात टाकून मी उभा राहिलो. तिचा दमून लालसर झालेला चेहरा चकाकत होता, विस्कटलेल्या सेक्सी केसांच्या लाटा खांद्यावर पसरल्या होत्या. वितळत्या चॉकलेटसारख्या डोळ्यांमधले भाव स्पष्ट दिसत होते आणि ओठ विलग झाले होते. "तू मला खांद्यावर उचलून पळत आलास!!" ती किंचित हसत म्हणाली.

"तुझ्या बरोबर असण्याचा अजून एक चान्स मिळणार असेल तर तुला उचलून मी मैलोनमैल पळू शकतो." मी तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणालो. हे खरंच होतं. तिच्या आठवणींची सवय होऊन मी त्यातून पुढे आलो होतो. पण आता इथे कोल्हापुरात आल्यावर, मी तिच्याशिवाय इतकी वर्ष जिवंत कसा राहिलो ते समजत नव्हतं. हा बाऊंड्रीपलीकडचा भाग धोकादायक आहे. आम्ही जे करतोय ते टेम्पररी आहे. मला माहित नाही, माझं भविष्य काय असेल, मी कुठे जाईन... मी तिला ओळखतो, तिला पंख पसरून मोठी झेप घ्यायची आहे. तेही इंडिपेंडंट राहून. हा तिचा नमुना एक्स बघून मला कळलंय की ती अजूनही पळतेय. स्वतःपासून, कमिटमेंटपासून... पण आज काहीतरी चांगलं अनुभवताना थोडं दुखलं तरी बेहत्तर!

तिने माझ्या डोळ्यांत बघितल्यावर, मी तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा कानामागे सारल्या आणि तिचा चेहरा माझ्या ओंजळीत घेतला.

"आपण काय करतोय समर!" तिने श्वास सोडला. "हे टोटली अनप्रोफेशनल आहे. अजून माझ्या हातात ऑफिशीयल जॉबपण नाहीये आणि मी पहिल्याच मोठ्या क्लायंटबरोबर असं वागतेय." तिने मान हलवली.

"बट वी हॅव हिस्टरी! अगदी काही नाही तर आपण जुने फ्रेंड्स तरी आहोतच. कुठल्यातरी अनोळखी माणसाच्या ब्रॅकेटमध्ये मला टाकू नको."

तिने हवेत हात उडवले. "मागे कश्मीरा इथे राहिली होती?"

ही आताही पळून जायला कारण शोधतेय की काय?

"नाही. ती हॉटेलवर राहिली होती. मी फक्त तिला सोडायला गेलो होतो. तुला कारणं शोधायची गरज नाही, पलो. तुला हे नको असेल तर सरळ नको म्हण!" हे म्हणताना माझा चेहरा तिच्या इतका जवळ होता की पटकन तिला किस न करण्यासाठी मला जगभरचा पेशन्स गोळा करावा लागला. पण तिला नको असलेल्या कुठल्याही गोष्टीत मी तिला पुश करणार नाही. मला माहिती आहे, तिलाही हे हवंय. पण ती स्वतःला थांबवते आहे.

"आय वॉन्ट यू सो बॅड! पण उद्या एकमेकांसमोर विचित्र नको वाटायला." ती हळूच म्हणाली.

"मला अजिबात विचित्र वाटणार नाही. पण मी उद्याचा, परवाचा, सगळ्यांना काय वाटेल ह्याचा, कसलाच विचार करत नाहीये. मी फक्त तुझा आणि माझा विचार करतोय. आत्ता काय होईल त्याचा. आपल्या दोघांनाही माहीत आहे, हे आज झालं, चार दिवसांनी किंवा पुढच्या वर्षी, तरीही आपल्यात जिवंत असणारी ही गोष्ट आपण इग्नोर करू शकत नाही."

"वन टाईम? आपल्या सिस्टममधून हे बाहेर काढून टाकूया." बोलता बोलता तिने माझ्या छातीवरून अलगद हात खाली नेले आणि माझ्या टी शर्टाची कडा वर उचलली. तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या तापलेल्या त्वचेला होताच मी पटकन एक खोल श्वास घेतला. तिचे हात अलगद माझ्या पोटावरून छातीकडे आले आणि मी तिच्या अजून जवळ जात, एका हाताने टीशर्ट डोक्यावरून ओढून फेकून दिला.

"व्हॉटेवर यू वॉन्ट.." म्हणून माझ्या ओठांनी तिच्या गळ्याचा ताबा घेतला आणि काकवीसारख्या तिच्या गोडव्याने माझे सगळे सेन्सेस काबीज केले.

तिने एक निःश्वास सोडत माझा चेहरा पकडून वर ओढला आणि खोलवर किस करत राहिली. तिच्या पोटावरून माझी बोटं तिच्या टॉपची कडा शोधत होती. ती ओठ सोडवून घेऊन हसली. "तो बॉडीसूट आहे."

"बॉडीसूट? ते काय असतंय?" मी वैतागून मान हलवली.

"त्याला खाली स्नॅप बटन असतात, स्विमसूट सारखा." सांगताना लाजेने तिचे गाल लालीलाल व्हायला लागले. आय फ** लव्ह इट! इतक्या सगळ्या वर्षांनंतरही ती अजूनही मला लाजतेय... तिला काही फरक पडत नाही असं ती दाखवते पण मला माहिती आहे, माझ्याइतकीच तीही अफेक्ट झालीय.

"मागं हो." मी घोगऱ्या आवाजात म्हणालो. तिने लगेच मागे होऊन माझ्याकडे बघत कोपरं टेबलवर टेकली. मी वाकून आधी तिचे सँडल्स काढून बाजूला टाकले आणि ट्रावझर्सच्या बटनाकडे वळण्यापूर्वी तिच्याकडे पाहिलं. तिने ओठ चावून, हो म्हटल्यासारखी किंचित मान हलवली. तिचा ऊर धापापत होता आणि मी ऑलरेडी आउट ऑफ कंट्रोल होतो. हेल!! मी ह्या क्षणाची अकरा वर्ष वाट बघितली होती.
ट्रावझर्स काढून खाली टाकल्यावर तिने एक खोल श्वास घेतला.

"पलो, मी तुला रात्रभर बघत राहू शकतो. इथेच. लुकींग लाईक एव्हरी फँटसी आय हॅव एव्हर हॅड." मी हळूच तिच्या मांडीवर हात ठेवला आणि तिची त्वचा काट्यांनी फुलून गेली. "कॅन आय?" माझ्या आवाजात माझी गरज स्पष्ट ऐकू येत होती. पण मी बेफिकीर आहे. मी काहीच लपवत नाहीये. मला ती हवी होती. असा माझ्या आयुष्यात कुठलाही क्षण नव्हता जेव्हा ती मला नको असेल. नॉट अ सिंगल वन!

मी तिला पहिलं किंवा शेवटचं किस केलं तेव्हाही नाही आणि ती मला सोडून गेली तेव्हाही नाही.

तिने पाय बाजूला केले आणि मला ती तीन बटणं दिसली. मी एकेक बटन उघडायला लागलो. तिचे श्वास बिघडले होते आणि प्रत्येक बटन स्नॅप झाल्यावर तिचे पाय थरथरत होते. "समर!" ती फ्रस्टेट होऊन म्हणाली.

मी शेवटचं बटन काढून टॉप तिच्या पोटावर सरकवला आणि तिला बसायला मदत केली. "अकरा वर्ष, पलो! आता मी घाई करतोय असं वाटत असेल तर तू मला तेवढी ओळखत नाहीस!"

"मी ओळखते तुला." ती माझ्या गालावर हात ठेवत म्हणाली.

मी ते सिल्की फॅब्रिक तिच्या डोक्यावरून ओढून काढून टाकलं. किचनच्या मोठ्या खिडकीतून स्ट्रीट लाईटच्या उजेडाची तिरीप तिच्यावर येत होती. तिला बघून कोरड्या पडलेल्या ओठांवरून मी जीभ फिरवली.

"यू आर सो ब्यूटीफूल.." म्हणत मी तिला मिठीत घेतली आणि उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो.

"आय मिस्ड यू, समर... " ती माझ्या मानेत पुटपुटली. "सो मच."

--------

मध्यरात्री कधीतरी मला जाग आली तेव्हा माझ्या कुशीत घुसून ती मुसमुसत होती. मी तिचा चेहरा उचलून बघितला तर डोळ्यातून घळघळ पाणी वहात होतं. "काय झालं पलो?" मी तिला उठून बसवत म्हणालो आणि गालावर चिकटलेले केस बाजूला केले.

तिने गाल पुसत एक हुंदका दिला. "आय जस्ट मिस्ड यू.." ऐकताच माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. कारण मी ते समजू शकत होतो. मीही तिला एक्सप्लेन न करता येण्याइतके मिस करत होतो. मागची इतकी वर्ष हरवलेली गोष्ट शोधत होतो. कारण आधी ती मला मिळाली होती आणि नंतर तिच्याशी कसलीच तुलना होत नव्हती. इतकी वर्ष शोधत असलेल्या पझलचा हरवलेला तुकडा शेवटी मला सापडला होता.

"श्श.. मला कळतंय, पलो. रडू नको." मी तिला मांडीवर ओढून घट्ट मिठीत घेतली. तिने माझ्या मानेत चेहरा लपवला तरीही अश्रूंनी माझी पाठ ओली होत होती. मी तिला घट्ट धरून ठेवलं. इतकं समाधानी मला कधीच वाटलं नव्हतं. तिच्याबरोबर इथे असण्याइतकं सुख कशातच नव्हतं. मी तिला खाली झोपवलं आणि आमच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेतलं. आम्ही कुशीवर झोपून एकमेकांकडे बघत होतो. मी अंगठ्याने तिच्या गालावरून पाणी निपटून टाकलं आणि ती शांत होईपर्यंत तिच्या डोक्यावर थोपटत राहिलो.

"आय एम सॉरी. माझाच विश्वासच बसत नाहीये की मी रडत होते." ती मान हलवत म्हणाली.

"तू एवढ्या सगळ्या फिलिंग्ज मनात कोंडून ठेवल्या होत्या. मोकळी होऊन त्यांना वाट करून देशील तेव्हा त्यांचा असाच पूर येणार."

"खूप वर्ष मला आपल्यातलं हे कनेक्शन फील होत नव्हतं." तिचा आवाज थोडा चिरकला. "ओव्हरव्हेल्मिंग आहे हे सगळं."

"हम्म." मी मान हलवली.

"आपण अजूनही राऊंड टू करू शकतो." ती ओल्या डोळ्यांनी हसत म्हणाली. "अर्थात तुला अशी शेमडी, रडकी मुलगी आवडणार असेल तर.."

मी हसत तिला जवळ ओढून तिच्या डोक्यावर हनुवटी टेकली. "त्याने मला काही फरक पडत नाही. पण नो राऊंड टू. मला वाटतं, तुला हे सगळं नीट फील करायचंय." मी तिच्या उघड्या पाठीवर बोट फिरवत म्हणालो. तिने खोल श्वास घेतला. "पण हे वन टाईमच आहे." तिने मला आठवण करून दिली. कारण ती अजूनही घाबरत होती आणि तिला अजूनही माझ्यात गुंतून पडायचं नव्हतं.

"शुअर इट इज!" मी मिटल्या डोळ्यांनी म्हणालो.
माझं शरीर हे ऐकायला तयार नव्हतं पण त्याला वाट पहावीच लागेल. कारण ह्यात वन टाईमवालं काहीच नव्हतं. अकरा वर्षांपूर्वी हे संपलं नव्हतं आणि आत्ताही संपलं नव्हतं. "उद्या तुला वाटलं तर आपण पुन्हा पाहिल्यासारखं नॉर्मल, प्रोफेशनल वागू. काहीच झालं नसल्यासारखं. ठीक आहे? झोप आता, पलो." मी तिच्या कानाजवळ पुटपुटलो आणि तिच्या केसातून हात फिरवत राहिलो. 

तिचा हळुवार श्वास एका लयीत माझ्या गळ्यापाशी जाणवत होता. माझ्या कंबरेला घट्ट धरलेला तिचा हात झोपेच्या अधीन झाल्यावर सैल झाला. लगोलग मलाही झोप लागली.

-------

मला सवयीने पाचच्या ठोक्याला जाग आली तेव्हा ती गाढ झोपेत होती. मी तिच्या कपाळावरचे केस बाजूला करून तिथे ओठ टेकले. तिचं पांघरूण नीट केलं आणि बाथरूममध्ये गेलो.

मी टॉवेल गुंडाळून बाहेर आलो तेव्हा ती माझा एक टीशर्ट घालून बेडवर मांडी घालून बसली होती.

"हे! सॉरी कालची रात्र आपल्या प्लॅनप्रमाणे नाही झाली."

"काल जे काही झालं त्याहून बेटर व्हर्जन मी तरी इमॅजिन नाही करू शकत!" मी गालात हसत म्हणालो.

"थॅन्क्स, मला समजून घेतल्याबद्दल.. कालची रात्र.. लेट्स कॉल इट, वन फॉर द बुक्स!"

"हे असलं काही मला कळत नाही, पण चालतंय."

"परत तुझ्याबरोबर मला खूप छान वाटतंय.."

"मलापण. आपण इतकी वर्ष एकमेकांशी न बोलता घालवली, ते अजिबात बरोबर नव्हतं. तू माझ्या आयुष्याचा इतका मोठा भाग आहेस की आपण एकमेकांची काळजी नसल्याचं प्रिटेंड नाही करू शकत." मी ट्रेनिंग शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून वॉर्डरोबमधून बाहेर आलो.

तिने मान हलवली आणि पुन्हा भरून आलेले डोळे पुसले. "माझी आई वारली त्यानंतर माझ्यातला काहीतरी हिस्सा जणू मरुन गेला. आय डोन्ट नो.. तेव्हापासून मी कधीच पहिल्यासारखी झाले नाही."

"मला नाही वाटत." मी शेजारी बसून तिला जवळ घेतली. तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकलं.
"मला वाटतं तू खूप दुःखात होतीस आणि अजूनही आहेस. सगळं दुःख तू आत कोंडून ठेवलं आहेस. जेव्हा तू स्वतःशी हे मान्य करशील आणि त्या सगळ्या गोष्टी फील करशील तेव्हा, कायम स्वतःला स्ट्राँग दाखवण्याऐवजी रडशील, दुःखी होशील तेव्हा हळूहळू तू बरी होशील."

तिने पुन्हा गाल पुसले. "मी किती रडतेय, माझा विश्वास बसत नाहीये. तुला माहितीये मला रडायला अजिबात आवडत नाही."

"लेट इट गो पलो, इट्स ओके टू बी सॅड. मी त्या दिवशी तिथे होतो. तुझ्या बहिणी ओक्साबोक्शी रडात होत्या आणि तू प्रत्येकीला मिठी मारुन समजावत होतीस, शांत करत होतीस. स्वतःचे दुःख आतल्या आत बांधून ठेवून. कुणालाही तुझी काळजी घेऊ देत नव्हतीस."

तिने हातानी चेहरा झाकून एक हुंदका दिला. "तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. मला कायम खूप वाईट वाटतं की आई गेली तेव्हा फक्त दिदी तिच्याजवळ होती. ती एकटी होती, समर. तिने आईला औषध द्यायचा, जागं करायचा खूप प्रयत्न केला. मी तिथे असायला हवं होतं..."

मी तिला घट्ट मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवत राहिलो. अकरा वर्षांपूर्वी तिने असं मोकळं होऊन बोलावं, रडावं म्हणून मी किती प्रयत्न केले होते. एकदाच नाही तर वर्षभर. पण ती बंद बंदच होत गेली होती.

"ती एकटी नव्हती. अजयपण आला होता मदतीला. आणि दिदी स्वतः हून आईजवळ थांबली होती. अशी वेळ येणार हे सगळ्यांना माहिती होतं. दिदी हट्टाने कॉलेज बुडवून घरी थांबली होती. मला नाही वाटत त्यामुळे काही फरक पडला असेल." मी म्हणालो.

"आणि मी सगळं नॉर्मल असल्यासारखी कॉलेजला जात होते. ती आजारी नसल्यासारखं प्रिटेंड करत. शेवटच्या स्टेजचा कॅन्सर, फेल झालेल्या केमो आणि पुढच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं टाळत होते." बोलताना तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. गाल लालसर झाले होते. रडून सुजलेल्या डोळ्यात खूप वल्नरेबल काहीतरी होतं.

"तू खूप लहान होतीस, पलो. वी ऑल डील विथ ग्रीफ डिफ्रंटली. तू स्वत:भोवती एक उंच भिंत उभारलीस आणि सगळं दुःख त्यात कोंबून ठेवलंस. मला जेवढं कळतंय त्यानुसार ते तू अजूनही बाहेर काढलं नाहीस."

"आत्तापर्यंत!" ती नाक पुसून हसली. "मला माहित होतं तूच ती भिंत फोडशील. तेव्हाही माहीत होतं आणि आत्ताही."

"म्हणून तू पळून गेलीस? मला आयुष्यातून तोडून टाकलंस?"

"खूप गोष्टी त्याला कारणीभूत होत्या." ती माझ्या गालावर हात ठेऊन म्हणाली. "आय डोन्ट नो, हाऊ टू लेट इट गो. मला भीती होती की मी प्रेम करते ती सगळी माणसं कधीतरी माझ्यापासून तोडून घेतली जाणार आहेत. तशी वाईट स्वप्नं पडून मी जागी व्हायचे बरेचदा. आई गेल्यावर मला तुझ्याबद्दलही तशी स्वप्नं पडायला लागली. खूपदा मी घामाने निथळत जागी व्हायचे, तू नाहीस असं समजून."

"म्हणून तू मला अजून दूर लोटलंस?" मी म्हणालो. मला थोडी कल्पना होती, पण तिच्या तोंडून ऐकून मला ह्या गोष्टीचं क्लोझर हवं होतं. "मग का? तेही आपण कोल्हापूर सोडायच्या जस्ट आधी?"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १७

"मला आपल्यात वाढणाऱ्या अंतराची भीती होती. आपण वेगवेगळ्या वाटेवर निघालो होतो आणि तेव्हाच घोरपडे तुझ्या सिलेक्शनसाठी आले होते. आठवतंय? त्यांनी सिलेक्शन झाल्यावर तुला आणि आईबाबांना जेवायला बाहेर नेलं होतं, बहुतेक वूड हाऊसला, हो ना? आणि तू हट्टाने मलाही घेऊन गेला होतास. ते तुझ्या खेळाच्या, बोलिंग स्टाइलच्या जाम प्रेमात होते. खूप कौतुक करत होते." ती हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली आणि खांद्यावरून डोकं उचलून जरा लांब झाली. जवळीक अती होत असल्यासारखी.

"आठवतंय, तो खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी. आणि दुसराच दिवस त्याच्या विरुद्ध होता कारण तू कसलीही कल्पना न देता, अचानक मला सोडून गेलीस."

"जेवण झाल्यावर पप्पा गाडी काढत होते आणि तू आईबरोबर तिथे भेटलेल्या पाहुण्यासोबत बोलत होतास. मी आणि घोरपडे रस्त्याकडेला थांबलो होतो. ते मला म्हणाले, आपण दोघं किती लहान आहोत आणि तू किती एक्सायटिंग वाटेवर निघाला आहेस.. गर्लफ्रेंड असणं तुझ्या करियरसाठी धोकादायक आहे. तू कायम मला भेटायचा विचार करशील, खेळावरून लक्ष उडेल वगैरे. त्यांनी सांगितलं की खरं प्रेम म्हणजे समोरच्या माणसाला मोकळं सोडून त्याच्या नशिबात लिहिलेलं यश मिळवू देणं. स्वार्थी विचार करून मी तुझं आणि देशाचं नुकसान करेन, कारण असं टॅलंट प्रत्येकाकडे नसतं. मला तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. खरंच."

"व्हॉट द फ*!!" मी ओरडलोच. मी जोरजोरात मान हलवली. "घोरपडेनी तुला असं सांगितलं?!"

"समर, तू तेव्हा लाखोंचं कॉन्ट्रॅक्ट साईन करत होतास. आता ते खूप छोटं वाटेल, पण तेव्हा ती ह्यूज गोष्ट होती." तिने हसून तणाव जरा हलका करायचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग नव्हता. "ऐक जरा. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. मी तेव्हा इमोशनली पूर्ण तुटलेली होते. अजूनही असेन कारण रात्रीपासून मी रडतेच आहे... मला तुला सोडून देणं गरजेचं होतं, नाहीतर मी तुला घेऊन बुडाले असते. तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतास तर सतत माझ्याकडे ओढला गेला असतास. कितीही त्रास झाला तरी दूर होणं आपल्या दोघांच्या भल्याचं होतं."

माझ्या नसानसातून संताप वाहत होता. "चूक. यात काहीही दोघांच्या भल्याचं वगैरे नव्हतं.  त्याने असं सांगितलं कारण त्याला मी फक्त टीमला कमिटेड रहायला हवं होतं. मी माझ्या गर्लफ्रेंडला मिस करून, सुट्टी मिळाली की लगेच भेटायला पळेन असं वाटत होतं. तू इतक्या दुःखात वल्नरेबल असताना त्याने तुला हे सांगावं? दॅट बा*र्ड!! तो फक्त एक स्वार्थी माणूस आहे. शून्य लॉयल्टी आणि माणसं वापरून झाली की फेकून देतो. माझा विश्वास बसत नाहीये की त्याने तेव्हा तुला असं सांगितलं!"

"कम ऑन समर, त्याला ब्लेम करू नको. आपल्या दोघांसाठीही ते वर्कआउट झालंच की. आपण ठीक आहोत. मी माझ्या स्वप्नांमागे पळत होते आणि तू तुझ्या."

"ती स्वप्न आपण एकत्र पळूनही मिळवू शकलो असतो."

"पण तुझं करियर जोरात सुरू झालं. तू रडक्या गर्लफ्रेंडकडे लक्ष देत बसला असतास तर ते शक्यच नव्हतं. आता तू IPL चा GOAT आहेस. याहून चांगला काय आऊटकम होणार होता!" ती केसातून हात फिरवत म्हणाली.

चूक. याहून खूप चांगला आऊटकम झाला असता. ज्यात आपण एकमेकांबरोबर असतो.

पलोमा

मी प्रचंड थकलेय. रात्रीपासून रडून, जुन्या आठवणी खोदून काढून, आईच्या सगळ्या आठवणी... घोरपडेनी मला दिलेला सल्ला, त्यावर माझा मी घेतलेला निर्णय. तो बरोबर ठरला, जरी समरला पटला नाही तरी. मी तेव्हा खरोखर मेंटली वाईट जागी होते. मला स्वतः ला तिथून बाहेर काढायचं होतं. समरला खाली न खेचता. आई जाताना दिदी एकटी तिची काळजी घेत होती, मी शेवटची तिला भेटूही शकले नाही हा गिल्ट कायमच मनात होता. त्यामुळे समरला तरी माझ्यामुळे अजिबात त्रास होऊ द्यायचा नव्हता. त्याच्यापासून लांब जाणं त्याच्या ग्रोथसाठी गरजेचं होतं.

मी इतकी वर्ष सायकॉलॉजी शिकले, लोकांना ट्रीट केलं, त्यामुळे मला चांगलं माहितीये की आईच्या मृत्यूमधून मी अजूनही पूर्णपणे सावरले नाही. माझ्या जवळ येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला मी दूर लोटलंय. काही बेस नसणाऱ्या, उथळ रिलेशनशिप्स केल्या. प्रेमाच्या माणसांपासून लांब गेले कारण त्यांच्या जवळ राहून खूप हर्ट होत होतं. त्यांना हरवण्याची माझी भीती निष्फळ होती हे माहिती आहे, तरीही.

लोकांना मदत करण्याची सगळी टूल्स आणि प्रोसेस मला माहिती आहे पण ते स्वत:च्या बाबतीत मला करता येत नाहीय. कारण खरं सांगायचं तर मला ते करायचं नाहीये. पुन्हा एकदा ती सगळी दु:ख, त्या वेदना अनुभवायच्या नाहीत. आणि प्रेम करणं ही रिस्क आहे. मी जितक्या कमी रिस्क घेईन, तेवढं आयुष्य सोपं आहे.

स्वतःला अखंड कामात बुडवून घेणे हे परफेक्ट डिस्ट्रॅक्शन आहे. आणि रिलेशनशिप? जितकी इनकम्पॅटीबल तेवढी चांगली. म्हणजे जास्त अडकून घ्यायचा धोका नसतो.

पण कोल्हापुरात येऊन, समरबरोबर राहून मी कंफर्ट झोनच्या पूर्ण बाहेर आलेय. आणि त्यानेच  खूप घाबरलेय.

"तो नालायक, स्वार्थी माणूस! त्याने हे तुला अजिबात सांगायला नको होतं. त्याचा काय संबंध हे सांगायचा. डॅम! पलो, तू मला सगळं सांगायला हवं होतं. माझा तेवढा तरी हक्क होता ना?" तो रागाने फणफणत येरझाऱ्या घालत होता. त्याचा राग मला समजत होता पण तरीही माझा निर्णय योग्यच होता.

"सांगून तू काय करणार होतास? भांडण करून कॉन्ट्रॅक्ट सोडून दिलं असतं. पण मी ऑलरेडी दिल्लीला निघाले होते. आपल्याला हे मॅनेज करता आलं नसतं. तू प्रोफेशनल होत होतास, देशभरात तुझे दौरे असते आणि घोरपडे म्हणल्याप्रमाणे तू एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट साईन करणार होतास. तू गर्लफ्रेंड वगैरेसाठी वेळ काढणं चुकीचं होतं. तुझ्यासाठी इतकी मोठी संधी होती आणि ती एका दुःखी गर्लफ्रेंडपायी वाया घालवणे अजिबात योग्य नव्हते."

त्याने नकारार्थी मान हलवली. "हा तू एकटीने घेण्याचा निर्णय नव्हता."

"पण मी घेतला. आणि आता बघ आपल्याकडे!" मी मोठ्याने म्हणाले. "हे सगळं खूप कॉम्प्लीकेटेड होतंय. लेट्स गो बॅक टू नॉर्मल."

"बरोबर आहे. बघ माझ्याकडे!" त्याने हातातला टॉवेल भिंतीवर फेकून दिला. " मी परत इथे तुझ्याबरोबर आहे. माझ्या YZ फ्यूचरचा विचार करतोय. डिसाईड करतोय की अश्या माणसाबरोबर अजून एक सिझन खेळू की नको, जो फक्त एक कप जिंकण्यासाठी स्वतःचा आत्मासुद्धा विकेल. आयुष्यभर मी प्रेम करत असलेल्या मुलीकडून माझं डोकं तपासून घेतोय, जी आत्ता माझ्या बेडमध्ये आहे पण कुठल्याही क्षणी इथून पळ काढेल. नॉट शुअर दॅट्स द प्लेस टू बी." तो शूज घालून जोरजोरात आवळून लेस बांधू लागला. "पण आत्ता मला त्या YZ ट्रेनिंगसाठी गेलं पाहिजे कारण वेंडी माझी वाट बघत असेल. आणि तू खूपदा सांगितल्याप्रमाणे, माझ्यावर खूप पैसा लावला गेला आहे आणि मला खेळलंच पाहिजे. कारण लाईफमध्ये हेच मॅटर करतं!"

"आय कान्ट बिलीव्ह, तू माझ्यावर चिडतोयस!! मी हे तुझ्यासाठी केलं होतं." माझे डोळे विस्फारले.

"तुला जे समजायचं ते समज, पलो. तू एकटीच तुझ्या भंकसवर विश्वास ठेवतेस. तू माझ्यासाठी वगैरे काही केलं नाही. तुला बाहेर पडायचं होतं. तू घाबरली होतीस, की मी तुझ्याकडे पाठ फिरवेन म्हणून तू मला न सांगता डिसिजन घेऊन टाकलास. त्यावरून कळतं की मी समजत होतो तितकंही तू मला ओळखत नाहीस." तो पाठ फिरवून भराभर दाराबाहेर गेला.

"हेss थांब, थांब. मला तिथे तुझ्याबरोबर असायला हवं. तू चिडला असलास तरी आपल्याला एकत्र काम करायचंय. मला ह्याचीच भीती होती!" मी त्याच्यामागे पळत लिव्हिंग रूममध्ये आले.

तो एकदम वळून माझ्यावर धडकला. "ह्याचीच भीती होती? तुला सगळ्याचीच भीती असते. तुला मी किती स्ट्राँग आहे हे दाखवायचं असतं, तरीही तू सगळ्यांपासून पळत असतेस. आणि ऑफ कोर्स, मी एवढं सगळं सांगूनसुद्धा तुला तुझ्या जॉबची काळजी पडलीय. तू पायाखाली तुडवत जातेस त्या लोकांची नाही. डोन्ट वरी, मी कोचला आपल्याबद्दल काहीही सांगणार नाही. यू वॉन्ट टू बी प्रोफेशनल, यू गॉट इट. अंगावरून माझ्या हातांचे ठसे धुवून टाक आणि प्रॅक्टिसच्या इथे ये." तो दार जोरात ढकलून घराबाहेर पडला.

मी आ वासून तशीच उभी राहिले. व्हॉट द हेल वॉज दॅट?

मी प्रामाणिकपणे त्याला सगळं सांगितलं होतं. आज आपण परत पाहिल्यासारखं प्रोफेशनल बिहेव करू हेही सांगितलं होतं. ऑफ कोर्स हे हर्ट होणार होतं पण दोघांनाही त्याची कल्पना होती.

मी त्या लूज टीशर्टवरच ट्रावझर्स आणि सँडल्स चढवले. टॉप पर्समध्ये कोंबला आणि चालत घरी निघाले.

घरी पोचताच पहिला गिझर सुरू केला आणि ब्रश करून झालं तोच बेल वाजली. दारात जाई! "अग दिदीला अचानक आलूबुखार खावेसे वाटायलेत! आपल्याकड कुठंच नाहीत म्हणून माझी रवानगी मार्केट यार्डात केलीय. म्हटलं जाताजाता तुझा ड्रेस ठेऊन जाते, तर वॉचमन म्हणाला, मॅडम आहेत आत. आज प्रॅक्टिसला गेली नाहीस होय?" माझ्या पडलेल्या तोंडाकडे लक्ष गेल्यावर ती गप्प झाली. मी तिला आत घेऊन दार लावलं आणि दोघी सोफ्यावर बसलो. आता मला राहवलंच नाही, तिच्या गळ्यात हात टाकून पुन्हा धबाधबा रडले. थोड्या वेळाने तिला काही तपशील गाळून आमचं डीटेलवार संभाषण सांगितलं. ती माझा हात धरून बसली होती. बोलून झाल्यावर मी तिच्याकडे पाहिलं तर तिच्याही डोळ्यात पाणी होतं. शिट! आज सगळ्यांना हर्ट करतेय मी. "सॉरी, जाई."

"ई.. सॉरी काय.. मला काहीही झालं नाहीये. मला रडायला आलं कारण तुला दुःखात बघून मला वाईट वाटलं. तुला हर्ट होताना बघून मी, आम्ही सगळेच हर्ट होतोय. आई गेली तेव्हा आम्ही सगळे रडलो, नंतर इतकी वर्ष तिच्या आठवणी काढल्या. पण तू तेव्हा वर्षभर आमची काळजी घेत राहिलीस. नंतर दिल्लीला गेलीस आणि ह्या विषयावर बोलायचं टाळत राहिलीस. समरपासून, आमच्या सगळ्यांपासून दूर गेलीस. तो बरोबर म्हणतोय. तुला खूप स्ट्राँग व्हायचं आहे पण तू जे करते आहेस त्याला स्ट्राँग नाही म्हणत." तिने गाल पुसले. "आणि त्या घोरपडेबद्दल तू आम्हालाही सांगितलं नाहीस. अशी गुच्ची दिली असती त्याला.. तुला किती हर्ट झालं असेल. नुकतीच आई गेली होती, तू कोल्हापूर सोडून निघाली होतीस. सगळीच नाजूक परिस्थिती होती. आणि तू ते सगळं आतल्या आत बॉटल अप करून ठेवलंस. सायकॉलॉजीत पीएचडी तू आहेस, तुला माहितीच असेल की हे तुझ्यासाठी अजिबात हेल्दी नाहीये." बोलता बोलता तिने दिदीला व्हिडिओ कॉल केला. मी तेवढ्यात उठून गिझर बंद करून आले.

"मिळाले काय आलूबुखार? चांगले लाल आणि मऊ झालेले बघून घे."

"होय , मी ताईकडे आलेय. मग जाते तिकडे."

"का ग, बरी आहे ना पलो?"

प्रश्न येताच तिने आणि मी सगळा पाढा पुन्हा म्हणून दाखवला. जाईचे व्हर्जन अगदी समरसारखे होते. मला कंप्लीट ए*होल दाखवणारं, जी मी होतेच. मी किती घाबरट होते, समरशी किती वाईट वागले ते सगळं तिने नीटच सांगितलं. मी आई जाण्याच्या वेळच्या गिल्टबद्दल बोलले आणि सगळ्या मिळून पुन्हा थोड्या रडलो.

"मला तेव्हा खरंच आईबरोबर थांबायचं होतं." दिदी सांगू लागली. "मी तेव्हा तिथे एकटी होते वगैरे गिल्ट खरंच बाळगू नको. मला त्याचा काहीच रिग्रेट नाहीये. आपल्या प्रत्येकीचा वेगळा रोल होता, पले. मी आईजवळ थांबले आणि तू सगळ्यांची काळजी घेत होतीस. जाईजुईना शाळेत सोडणे, त्यांचा अभ्यास, पप्पांना घर सांभाळायला मदत हे सगळं तू करत होतीस."

"कारण मी घाबरत होते." मी बोललेच. मी आईजवळ बसायला घाबरत होते कारण ती कधीही जाऊ शकते हे मान्य करायला माझं मान तयार नव्हतं. हेल, ती गेल्यानंतरही माझं मन ते मान्य करत नव्हतं.

"ठीक आहे गं. आपण सगळयाच घाबरलो होतो आणि आपापल्या परीने स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवत होतो. मी नाही का आईला वेगवेगळे डायलॉग बोलून, नाचून, नाटक करून दाखवायचे." जाई माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाली.

"जाई, तू खरंच नाटकाबद्दल पॅशनेट आहेस आणि तुझ्यात ते टॅलंटपण आहे. मला खरंच वाटतं तू ते सिरीयसली घ्यावं." मी म्हणाले.

"तुला काय माहित?"

"कारण तुझा जीव आहे नाटकात. आई नेहमी काय सांगायची? तुमच्या हृदयावर विश्वास ठेवा. मनापासून जे वाटेल ते फॉलो करा. ती गेल्यापासून मी माझ्या मनावर विश्वास नाही ठेवला. माझ्या कामात एस्केप शोधत राहिले. आता प्रॉब्लेम हा आहे की यातून बाहेर कसं पडायचं ते मला समजत नाही."

"हीच पहिली स्टेप आहे! तू कधीच न केलेला विचार करण्याची" जाईने चॅलेंज दिल्यासारखं माझ्याकडे पाहिलं. "तुझ्यासाठी थेरपिस्टची अपॉइंटमेंट घेतली तर? मला माहितीये, तुला सगळं कळतं, तू खूप हुशार आहेस. पण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीशी बोललीस तर त्याचा तुला फायदा होईल. असं मला वाटतं, व्हॉट डू यू थिंक? बेनी कशी वाटते?"

ग्रॅज्युएशन ते मास्टर्स मी एकाच व्यक्तीशी क्लोज होते ती म्हणजे माझी बेस्टी, बेनी! बेनाफशा ईराणी. योगायोगाने DU च्या होस्टेलमध्ये आम्ही रुमी झालो आणि आमच्यात गाढ मैत्री झाली. ती मुंबईहून आल्यामुळे असेल, दिल्लीत आमची मराठी बोलून मैत्री झाली. ती कायमच शांतपणे माझं सगळं म्हणणं ऐकून घेत असे कारण मी भोवताली उभारलेल्या भिंती तिला चांगल्याच माहिती होत्या. ती फॅमिली थेरपिस्ट म्हणून आता दिल्लीत चांगली सेटल झाली होती.

आयडिया वाईट नव्हती. मला मदतीची गरज होतीच पण मी ते स्वतः करू पहात होते आणि मला जमत नव्हतं. हेच मी क्लायंटसना इतक्या वेळा सांगत असे, देअर इज नो शेम इन आस्किंग फॉर हेल्प!

"मी करू शकते. बेनीला आनंदच होईल आणि आता तर झूम सेशनपण आहे मदतीला." मी जरा उत्साहात म्हणाले.

"प्लीज हे करच, पलो. यू डिझर्व टू बी हॅपी. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला कोणी मदत करू शकत असेल तर ती बेनीच आहे. एक केकची अर्जंट ऑर्डर आहे, मी जाऊ का?" दिदी म्हणाली.

मी मान डोलावली. "बाय दिदी. मी पिटाळते हिला मार्केटयार्डात!" म्हणून मी कॉल कट केला.

"समरभैयाबद्दल काय ठरवलंस?" जाईने भुवया उंचावल्या.

"आता आवरून ग्राऊंडवर जाते. प्रॅक्टिस संपतच आली असेल. त्याच्याशी काही रिपेअर करता येतं का बघते. पण बहुतेक तो मला कंटाळला असेल."

"तो तुला कधीच कंटाळणार नाही, लिहून घे. स्पेशली काल संध्याकाळनंतर नाहीच नाही." तिने डोळा मारला.

"आता त्या गोष्टीबद्दल बोलणं बंद करणारेस का? म्हणून मी तुला कुठे नेत नाही!" मी हसत म्हणाले.

"मग आता काय करणार? नॅचरल रहा आणि तो काय करतो ते बघ." ती पाणी पीत म्हणाली. "जरा राग शांत झाला की त्याला सॉरी म्हण."

"लव्ह यू!" मी तिच्या गालाची पापी घेत म्हणाले. "आता निघ, मला खूप कामं आहेत!"

"हम्म, चाप्टर कुठली! बाय." म्हणत ती बाहेर पडली.

मी आंघोळीला गेले. अंगातून समरचा टीशर्ट काढला आणि नाकापाशी धरून त्याचा खोलवर वास घेतला.

ऑरेंज, सीडर, मिंट

लॉयल, अर्दी, जेन्युईन!

हे सगळं तो आहे. काल रात्री त्याने माझं सगळं जग अपसाईड डाऊन फिरवून टाकलंय आणि माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाहिये. आठवून माझ्या चेहऱ्यात उष्णता झिरपू लागली.

आंघोळ करून मी बाहेर आले. आता समरच्या भाषेत, माझी भंकस बंद करायची वेळ आली होती. मी फोन उचलला आणि बेनीला अपॉइंटमेंटसाठी टेक्स्ट केला. दोनच मिनिटात तिचा रिप्लाय आला.

बेनी: I have been waiting for this day! How about evening? I have 7 to 8 pm free. I think I should get you talking while you are willing Wink

मी अंगठ्याचं नख कुरतडत जरा विचारात पडले. मी खरंच तयार आहे का? उठून जीन्स, टीशर्ट घातला, केस विंचरून पोनीटेल घातली आणि बेडवर पडलेला फोन हातात घेतला.

मी: Let's do this.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १८

समर

"ग्रेट वर्कआऊट, समर! घोरपडे कबसे मेरे पीछे पडा है, समरका कैसा चल रहा करके.. रुकता ही नही है." वेंडी धपकन खुर्चीत बसत म्हणाला. मी बाटली संपेपर्यंत घटाघट थंड पाणी प्यायलो. आज खूप गर्मी होती आणि मी रागाने स्वतःला खूप जास्त पुश केलं होतं.

मी अजूनही पलोमावर चिडलो होतो. कालची रात्र आणि त्यानंतर आम्ही इतकं बोललो तरीही ती माझ्यापासून पळतच होती. हे मला अजिबात मान्य नव्हतं. आणि घोरपडेचा नुसता उल्लेख ऐकून रक्त उसळत होतं.

"ही'ज अ सेल्फिश बा**! हमेशासे ऐसाही था. मेरे साथ वो एकही रीझनसे डीसेंट बिहेव करता है. जब तक मेरा गेम अच्छा है, मेरी व्हॅल्यू है. थोडा नीचे गया तो आऊट! वो एक सेकंदभी नहीं सोचेगा. ग्याराह साल! इतना टाईम हम ऐसेही साथ में है. दॅट्स नॉट इन्स्पायरिंग, यू नो?" मी टॉवेलने घाम पुसत म्हणालो.

वेंडीने मान हलवली. घोरपडे आमच्या सर्कलमध्ये सगळीकडे कूप्रसिद्ध होता. तो कटथ्रोट होता. भरपूर सीझन जिंकून देत होता. जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जात होता, ते तर ओपन सिक्रेट होतं. माझे बाकी टीम्समध्ये बरेच मित्र होते, ज्यांचे कोच प्रत्येक कप जिंकून देत नसतील. पण त्यांचे प्लेअर्सबरोबर घरगुती संबंध होते. खेळणं बंद झाल्यावरसुद्धा कोच त्यांच्या फॅमिलीसारखे असत. इतक्या वर्षांच्या सहवासाने त्यांच्यात एक नातं तयार व्हायचं पण घोरपडे त्यातला माणूस नव्हता. तो माणसांना जसं वागवायचा ते पाहून माझ्या मनात त्याच्यासाठी कणभरही आदर नव्हता. पलोमाशी तो जे वागला ते ऐकून तो अजूनच डोक्यात गेलाय. त्याच्याबरोबर अजून एक सिझन खेळणं आता जवळ जवळ अशक्य वाटू लागलंय. 

"इट्स हू ही इज! वो पलोमाको हायर नहीं करेगा, पता है ना? आय मीन तुमने काँट्राक्ट साईन किया तो निगोशिएट कर सकते हो. लेकीन उसको टेंपररी हायर करके वो तुम्हे शांत रख रहा है. इट पिसेस मी ऑफ! क्यूंकी पलोमा बहोत काम कर रही है. ही डझंट गिव्ह अ शिट. उसको सिर्फ तुम्हारा साईन चाहिये, बस. मैं टीमके पे रोल पर अब तक हुं, क्यूंकी तुम हो. व्हेन यू आर आऊट, आय एम आऊट!"

वेंडी आणि घोरपडे कधीच चांगल्या टर्म्सवर नव्हते. पण वेंडी पहिल्यापासून माझ्याबरोबर असल्यामुळे त्याला काढून टाकणं कठीण होतं.

"तुम मुझे साईन करने के लिये फोर्स कर रहे हो?" मी खुर्चीत बसून टॉवेल टेबलवर ठेवत म्हणालो.

"नाह! मुझे पता है तुम कहां खडे हो. इफ यू स्टे, आय एम बिसाईड यू! इफ यू लीव्ह, आयाम ऑल्सो लीव्हींग. आय वोन्ट वर्क फॉर दॅट ए*होल. मेरे पास ऑफर्स है, बट आय विल वेट फॉर युअर डिसिजन. थिंक ऑफ युअरसेल्फ, समर." तो गंभीरपणे म्हणाला.

"थॅन्क्स मॅन! आय अप्रिशीएट इट. हमारे फिल्डमे पता नहीं चलता अपने लिये कौन खडा है.. आय गेट पेड अ लॉट फॉर माय गेम. बट आय वूड लाईक टू नो, इफ माय कोच हॅज माय बॅक. ही नेव्हर हॅज. हां, वो चाटुगिरी करता है, क्यूंकी उसको मेरी जरुरत है. बट आय डोन्ट ट्रस्ट द गाय!"

"तो अभी तक तूमने टीमको छोड क्यो नहीं दिया?"

"आय लव्ह माय टीम, ब्रो! वो लडके मेरी फॅमिली है. फॅन्स बहोत लॉयल है, मोस्टली आय डोन्ट गेट ट्रोल्ड. इट्स हार्ड टू टर्न युअर बॅक टू देम."

"आय गेट इट! पलोमा भी ठीक है. शी इज व्हेरी गुड ॲट हर जॉब. इतने शॉर्ट टाईम मे मैने तुम्हारे मे बहुत चेंज देखा है."

"जैसे की?" मी दुसरी बॉटल उचलून पाण्याचा मोठा घोट घेतला.

"यू सीम हॅपीयर! मोअर लाईट. तुम दोनोका कॉम्पिटीशन बहोत फनी है! वो अच्छा रेस करती है तुमको. हाफ द टाईम यू आर लाफिंग. इट्स गुड टू सी. शी इज गुड फॉर यू, बॉस!" तो हसून म्हणाला.

ऑफ कोर्स ते मला माहिती आहे, पण ऐकून बरं वाटलं.

"वी हॅव हिस्ट्री, हम साथमे बडे हुए है. तो एक कंफर्ट लेव्हल है." मी कबूल केलं, ती करत नसली तरी.

"स्पीक ऑफ द डेव्हील! वो अभी बहोत थक गया है. बट यू कॅन रन इन द इव्हनिंग.." वेंडी माझ्या मागे बघत हसून म्हणाला. मी मागे वळलो, तर ती आमच्या टेबलकडे येत होती. ब्लॅक जीन्स, रेड टॉप आणि त्यावर एक लाईट स्पोर्ट्स जॅकेट घातलं होतं. नेहमीप्रमाणे केसांची उंच पोनीटेल आणि मेकअपचा गंध नसलेला फ्रेश चेहरा. वरून ऊन तिच्या केसा-चेहऱ्यावर चमकत होतं. तिने उन्हात डोळे बारीक करून आमच्याकडे बघितलं. "ब्रिंग इट ऑन, सावंत!"

वेंडी टेबलवर हात आपटत हसला. "आय लव्ह टू सी धिस टायनी थिंग चॅलेंज यू!! हे, मुझे बहुत भूक लगी है. बावडा जाके मिसल खाते है, क्या बोलते भाईलोग?"

मी तिच्याकडे नजर टाकली. ती माझ्याकडेच बघत होती. "चलेगा!"

"तुम दोनो जाओ. मेरा मॉमसे मिलने का प्लॅन है. सी यू लेटर." ते दोघे आता एकमेकांच्या तेवढ्या ओळखीचे झाले होते आणि मला तिच्यापासून थोडी स्पेस हवी होती. मला आता कुठलेही गेम्स खेळायचे नव्हते. जेव्हा ती तिच्या फिलींग्ज मान्य करेल, तेव्हा बोलू.

"ओके. मैं सॅक लेके आता हूं." वेंडी आत गेला.

"हे!" तिने शुजच्या टोकाने एक दगड उडवला.

"हे!"

"आपण अजूनही संध्याकाळी रनिंग करणार आहोत?" तिचा आवाज बारीक होता आणि नर्व्हस होऊन ती पायाने ग्राऊंडवरची माती चिवडत होती.

"शुअर! तू मला फिक्स करते आहेस, राईट!" मी खुर्ची मागे ढकलून उठलो आणि सरळ निघालो. "सी यू लेटर."

"समर.." मागून तिची हाक आली.

"हम्म?" मी रिमोटचे बटन दाबल्यावर पार्किंगमधून अनलॉकचा बीप बीप आवाज आला. मी थांबलो आणि वळून तिच्याकडे पाहिलं.

"अम्म.. मला विचारायचं होतं की रविवारी घरी जेवायला येशील का? वेंडीला पण बोलवू. पप्पा काहीतरी स्पेशल करणार आहेत." तिने ओठात दात रुतवत विचारलं. माझ्या नजरेसमोर कालची रात्र तरळून गेली.

"येईन की. मी जुन्या गोष्टी मिस करतो हे सांगायला घाबरत नाही." तिला आ वासून बघत ठेऊन, मी पाठ वळवून चालू पडलो.
_____

वाईट मूड झटकून टाकायचा प्रयत्न करत मी डोरबेल वाजवली. "ये, ये" आईने घाईघाईत दार उघडलं, केसांना बेसन लागलेलं दिसत होतं. मी पुढे होऊन ते झटकलं. "अरे! कोरडा झुणका बनवत होते, तुला आवडतो तसा. झालंच आता." मी आत जाऊन हात धुतले. टेबलावर तिने दोन ताट पुसून ठेवली होती. "पप्पा?" मी खुर्ची ओढत विचारले. "अरे, ते विज्याने नवीन गुऱ्हाळ लावलंय, तो दाखवायला घेऊन गेलाय. छान जागाय म्हणे." मी कढई पुढे घेऊन तिचं ताट वाढलं. "तुला फोन केला, म्हटलं आपल्याला जरा स्पेशल टाईम मिळेल. आल्यापासून तुझं आपलं ट्रेनिंग नी ट्रेनिंगच चाललंय. एक दिवस आईच्या हातचं जेव मग जरा शांत वाटेल पोटाला." आई शेजारच्या खुर्चीत बसत म्हणाली.

ताट भरलेलं होतं. भरपूर कांदा घातलेला झुणका, ज्वारीची मऊ, पापुद्रा सुटलेली भाकरी, ठेचा, वाटीत दही आणि गंज भरून ताक. "आपण असा डबा घेऊन पन्हाळ्यावर जायचो ना, आई?"  आईने हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवला. "सुरू कर.."

जेवण झाल्यावर आईने हातावर दिलेला तांबूल खात सोफ्यावर बसलो. "समर? तुला काही त्रास होतोय का? सकाळी फोनवर तुझा आवाज जरा बारीक वाटला?" आई शेजारी बसत म्हणाली.

"कोच माझा जीव खातोय. त्याला उत्तर हवंय. आणि मी जर साईन केलं नाही तर तो पलोला काढून टाकेल."

आईने मान हलवली."पलोचं काय म्हणणं आहे?"

मी सुस्कारा सोडला कारण हे सगळं सांगणं अवघड होतं. "तिला तिच्या फायद्यासाठी मी कुठेही साईन करणं मान्य नाहीय. मी नाही आणि कोणीच नाही. ती किती कॉम्प्लिकेटेड आहे, माहीत आहे ना?"

"मला नाही वाटत इतकी कॉम्प्लिकेटेड!" आई हसत म्हणाली. माझी आई तिच्या आवडत्या लोकांना कायम प्रोटेक्ट करत असते. पलोमा तिची लाडकी होतीच, अजूनही आहे.

"ती स्वत:ला कायम सेफ ठेवते. मी जितक्या तिच्या भिंती फोडायचा प्रयत्न करतो तितकं ती हे सगळं टेंपररी आहे, हा फक्त जॉब आहे म्हणून सांगते." मी खांदे उडवले. "पण तिच्या अजून हे लक्षात येत नाहीये की जर तिचा जॉब पर्मनंट झाला तर तिला रोजच माझ्याबरोबर काम करावं लागेल."

"मग? तिच्याबरोबर काम करून कसं वाटतंय? मी जेव्हाही तुम्हा दोघांना एकत्र बघते, तुम्ही हसत असता. काल आम्ही विद्यापीठात अशोक भावजींकडे गारवा घेऊन गेलो होतो. त्यांच्या निशाचा साखरपुडा झाला ना. तर काय म्हणत होते, परत येताना रस्त्यात तुम्हाला दोघांना पाहिलं. ऑलिंपिकमध्ये गेल्यासारखे तर्राट पळत होतात!" ती हसायला लागली. "ती तुला चॅलेंज करते आणि मागे हटत नाही ते मला आवडतं."

"हम्म आणि जास्त महत्त्वाचं काही बोलायला लागलो की ती पळून जाते. प्रत्येक वेळी. आता मधे इतकी वर्ष गेल्यावरसुद्धा."

आई जरा विचारात पडली. "तुझी पद्धत जरा बदलून बघ."

"म्हणजे?"

"तू महत्त्वाचं बोलल्यावर ती पळून जात असेल तर बोलू नको. तिला तुझ्याकडे यायला वेळ दे. ती बऱ्याच दुःखातून गेलीय. लहान वयात आई जाण्याचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे. दुःखाला कुठलीही एक्सपायरी डेट नसते. हे आपल्याहून चांगलं कुणाला माहीत असेल?" मी आईचा हात घट्ट धरून ठेवला. ती बोलत राहिली. "आपली प्रेमाची माणसं जाणं प्रत्येकावर खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं परिणाम करतं. हा दुःख सहन करायचा तिचा प्रकार असेल."

मी डोळे चोळले. "हम्म, फायनली तिने मला सांगितलं की सिलेक्शनच्या दिवशी आपण जेवायला गेलो तेव्हा घोरपडेनी तिला मला सोडून जायला सांगितलं. बेसिकली त्याने हे सांगितलं की ती मला मागे धरून ठेवतेय. सुक्काळीचं सालं! सॉरी.." आईकडे बघून मी जीभ चावली.

आई गालात हसली. "त्यात नवल काय? म्हणजे त्याने तिला असं सांगणं वाईट आहेच. पण त्या सांगण्यामुळे तिला निर्णय घेता आला, बघ तू तेव्हा नवा नवा चमकायला लागला होतास आणि ती तिच्या दुःखात होती. तिला स्वत:ला पण यातून बाहेर काढायचं होतं. मला तिची काही चूक नाही वाटत. ती जशी आहे तशी वागली आणि तुझा कोच जसा आहे तसाच वागला. मी काय सांगते तुला, माणसं नेहमी आपल्याला त्यांचं खरं रूप दाखवतात - फक्त ते आपल्याला बघता आलं पाहिजे."

"पलोमाला मी ओळखतो. पहिल्यापासून. पण तिने मला बाजूला सारलं, मेबी ते मला अजून पचवता आलं नाही. कारण पुन्हा ती आजूबाजूला असताना... शिट, माझं डोकं हललंय आई! जाऊदे."

"डोकं हललंय म्हणजे तू फाईट करायला तयार आहेस. मागच्या वेळी तू तिच्या मताचा आदर करून तिला जाऊ दिलंस, म्हणून ती गेली. आता तिला जाऊ न देता पकडून ठेवण्याची वेळ आलीय."

"पण कोणी दार उघडुन आत येऊच देत नसेल, तिथे आत कसं घुसणार?" मी पाण्याचा ग्लास उचलला.

"ते मी कसं सांगू? तुझ्या आजूबाजूला टाईट फिल्डिंग लावलेली असते, तेव्हा दोन फिल्डर्सच्या मधून जागा काढून तू बॉल बाऊंड्रीपार टोलवतोस ना?" आईने भुवया वर केल्या.

"फिल्डवर फाईट करणं सोपं असतं कारण त्याचा आऊटकम माहिती असतो. तिला ते नको असेल तर मी एकटा फाईट करून काय उपयोग? तिला काय हवंय ते मला खरंच कळत नाही "

"आत्तासा तुला येऊन महिना होतोय. ती भेटायच्या आधी तू किती विचारात पडला होतास. तुम्ही इतक्या वर्षात बोलला नव्हता. पण ती भेटली आणि तुम्हाला तेच जुनं कनेक्शन सापडलं. आता विश्वास ठेव. पळू नको."

"मी पळत नाही, मी लढायला तयार आहे पण ती फाईट एकतर्फी नको ना!"

"तुला खूप गोष्टी ठरवायच्या आहेत, समर. जे तू कंट्रोल करू शकतोस तिथून सुरुवात कर. पुढच्या सीझनचं काय ठरवलं आहेस? खेळणार की बॅट कोपऱ्यात ठेवायची वेळ झाली?"

"खरं म्हणजे मी परत आल्यावर मला जाणवलं की मी खेळायच्या प्रेमात कसा पडलो. सुरुवात मी पप्पांनी आपल्यासाठी इतकं केलं त्याची परतफेड म्हणून केली होती. पण हळूहळू मला क्रिकेट आवडू लागलं. शाहू स्टेडियम, तिथे लहान मुलांच्यात खेळणं.. मला परत मजा येतेय. आणि मुंबईहून इतक्या जणांचे कॉल्स, मेसेज येतायत, त्यांना निराश नाही करूसं वाटत. शेवटी मी त्यांचा कॅप्टन आहे. पण कोचबद्दल इतका राग भरलाय डोक्यात की त्याला बघावंपण वाटत नाही. दुसऱ्या टीम्सच्या ऑफर आहेत पण मला माझी टीम सोडून जायचं नाहीय.

इमोशनल होऊन आईचे डोळे थोडे पाणावले. "तू कायम असाच इमानी आहेस. कितीही जास्त पैशांच्या ऑफर्स आल्या तरी तुझी निष्ठा ढळणार नाही. मला खरंच अभिमान वाटतो तुझा." आई माझ्या पाठीवर थोपटत म्हणाली.

मी आईचा हात घट्ट धरून खांद्यावर डोकं ठेवलं.
"मी तुला सांगितलं होतं ना, माझं वागणं बदललं तर बिनधास्त माझे कान ऊपट! आता मला पैसा, प्रसिद्धी कसलाही फरक पडत नाही. पैसे तर माझ्या गरजेपेक्षा खूप जास्त कमावलेत. सध्या मी फिजिकली एकदम फिट आहे आणि पलोने रोज सेशन घेत घेत माझं क्रिकेटवरचं प्रेम पण पुन्हा बऱ्यापैकी जागं केलंय. मी विचार करतोय की कोचला गोळी मारुन, जावं परत फील्डवर. पण मी आत्ताच काही सांगणार नाही, नाहीतर तो लगेच परत बोलवेल. मला थोडं अजून कोल्हापुरात रहायचंय. सगळ्या अपेक्षा आणि केऑसपासून लांब राहून मला मजा येतेय."

"कोल्हापूर तुझं घरच आहे! तुला हवा तितका वेळ घे." ती माझे केस विस्कटत म्हणाली. "आणि कश्मिरा? ते प्रकरण संपलं ना?"

"ती फक्त फ्रेंड आहे ग आता. ती जास्त काही समजत होती, पण मी क्लिअर सांगितलं तिला."

"तिला कळलंय, तू किती चांगला माणूस आहेस, हल्ली अशी माणसं मिळणं अवघड आहे." आई हसली. "पण मला खरंच तुमच्यात तसं प्रेम वगैरे दिसलं नाही कधी."

"तेच तर!!" तिलाही हे बोलून कंटाळा आलेला दिसला. मग पुढचा तासभर आम्ही जुन्या गप्पा मारत, हसत, एकमेकांना चिडवत घालवला आणि मी तिला मिठी मारुन निरोप घेतला. आईबरोबर वेळ घालवून माझ्या डोक्यातल्या विचारांना दिशा मिळाली होती. घरी पोचून गाडी पार्क केली तर पोर्चच्या पायरीवर पलोमा बसली होती.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १९

पलोमाने माझ्याकडे बघून हात केला. मी समोरच गाडी पार्क करून उतरलो. "किती वेळ बसली आहेस इथे?"

"जास्त नाही, पाच - दहा मिनटं. जस्ट आपली चुकामूक होऊ नये म्हणून."

"मला एक मिनिट दे." मी रफली म्हणालो. जरा जास्तच रफली आणि तिच्याशेजारून पोर्चच्या पायऱ्या चढून घराकडे गेलो. 

"ओह, ओके." तिचा आवाज जेमतेम आला कारण तोपर्यंत मी दरवाजा उघडून आत शिरलो होतो. चोवीस तासांपूर्वी इथेच ती माझ्या मिठीत होती आणि आता तिला फक्त वर्कआऊटवर फोकस करायचा होता, ह्यानेच माझा तिळपापड झाला होता. ओके. यू वॉन्ट टू ॲक्ट प्रोफेशनल, यू गॉट इट! मी रनींग शॉर्ट्स आणि टी चढवून बाहेर आलो. "रेडी?" माझा आवाज आल्यावर ती उठून उभी राहिली. "नेहमीसारखं 5k?" तिने मान हलवत विचारलं.

"यप!" मी पुन्हा गाडीत बसताना म्हणालो. ती पलीकडे येऊन बसली. मी डोकं आडवं वरखाली हलवून मान क्रॅक केली. बकल अप, पलो. तुला मी सिरीयसली खेळायला हवंय ना, घे! हिअर वी गो..

पलोमा

ओ गॉड, माझे पाय नाहीसे झालेत! मला माहीत नव्हतं तो एवढं पुश करेल. शरीरात आणखी एक गिअर असल्यासारखा पळतोय तो! हुंह आणि मी विचार करत होते की मी आयपीएलच्या स्टार प्लेयरला हरवेन. मी मनगट वर धरून स्ट्रावा चेक केलं. 6 mpk! वेट... दॅट्स नॉट द नॉर्म! नेहमी आम्ही पर किमी तीसेक सेकंद स्लो रन आणि शेवटचा एक किमी स्प्रिंट मारत असू.

आजचा दिवस नक्कीच वेगळा आहे.

त्याला नक्कीच त्याचा पॉइंट प्रूव्ह करायचा आहे. त्याच्या मते, मी त्याला ॲनालाईज करत नसेन तेव्हा मी फक्त वर्कआऊट बडी आहे.

शेवटच्या पाचशे मीटर वळणावर आम्ही वळलो आणि तो सुसाट पुढे गेला. ह्या माणसाने आधीच सकाळी वेंडीबरोबर तुफान वर्कआऊट केलाय. मिसळ खाताना वेंडी म्हणालाच होता, आज तो जरा वेगळ्या मूडमध्ये आहे म्हणून. त्या ऑफ मूडचं कारण मीच आहे हे माहीत असूनही मी खांदे उडवले होते. मी शक्य तितका वेग वाढवला पण तो खूप पुढे होता. कदाचित यात काहीतरी सिंबॉलिझम आहे. त्याला वाटतं, मी कायम त्याला आणि सगळ्यांना झिडकारून एकटी पुढे पळत असते. आज हे सगळं तो एकटा करून बघतोय. मी झाडाच्या तीन-चार मीटरवर पोचेपर्यंत पाय कडक होऊन बंदच पडले. मी हळूहळू चालत कशीतरी झाडापर्यंत पोचले आणि त्या भल्या पसरलेल्या खोडावर हात ठेऊन एकदम ओकलेच! त्याच्यासमोर! त्याने मला धरायचा काहीही प्रयत्न केला नाही फक्त पाण्याची बाटली पुढे केली. "हूं, हे पी."

मी खळखळून चूळ भरून तोंड पुसले आणि एक मोठा घोट घेतला. "थॅन्क्स." मी धापा टाकत म्हणाले.

"नो प्रोब्लेम." तो म्हणाला पण त्याच्या आवाजात नेहमीची ऊब नव्हती.

श्वास शांत होईपर्यंत आम्ही तसेच उभे राहिलो. "धिस वॉज अ ग्रेट रन!" मी थोडी शांत झाल्यावर उद्गारले.

"हम्म. आता तू कोचला, मी खूप मेहनत करतोय, फिटनेस चांगला आहे असं रिपोर्ट करू शकतेस."

"कमॉन समर, मी तेवढ्यासाठी तुझ्याबरोबर पळत नाही. तुला माहीत आहे."

"माहीत आहे. तू इथे माझ्या डोक्यावर काम करायला आली आहेस, तुझं स्वतःचं डोकं ताळ्यावर नसलं तरी!" त्याने भुवया वर केल्या.

"मला नावं ठेवून तुला बरं वाटतंय का? तसंच कर! आय एम अ मेस. हेच ऐकायचं आहे ना?" मी गुरगुरले.

"नॉट एक्झॅक्टली. पण मी जे दिसतंय ते बोललो. तू सकाळी सकाळी माझ्यावर एवढा बॉम्ब टाकलास आणि मी साधी रिऍक्शनसुद्धा द्यायची नाही? मी आता फक्त क्रिकेटबद्दल बोलावं असं आहे का? इट्स बुलशीट. ओह मी विसरलोच, यू आर द क्वीन ऑफ बुलशीट!!" तो सरळ तलावाकडे चालत निघाला.

मी त्याच्या मागेमागे गेले. "हे खूप घाण होतं, समर. मी फक्त तुला आपण इथे काय करायला आलो त्याची आठवण करत होते. आय हॅव अ जॉब टू डू ss" मी ओरडले.

"सो, फ** डू इट!" त्याने मानेतून टीशर्ट ओढून काढला आणि जमिनीवर आपटला. त्याचे टॅन्ड, कातीव ॲब्ज आता फुल डिस्प्लेवर होते आणि मला लक्ष हटवणं अवघड झालं.

"आय हॅव अ जॉब टू डू टू, पलो! मी उद्या रात्री जेवायला येतो घरी. तू दिवसभर सुट्टी घे. मला फक्त क्रिकेटवर बोलून बोलून आता कंटाळा आलाय." त्याने शूज काढून बाजूला टाकले आणि पाण्यात सुर मारला.

मी घड्याळात बघितलं. बेनीला भेटायची वेळ होत आली होती. मी चालतही पंधरा मिनिटात घरी पोचले असते पण पाय खूपच त्रास देत होते. मी त्याच्याकडे पाठ फिरवून रस्त्यावर गेले आणि रिक्षाला हात केला. UPI मुळे हे एक बरंय, रनिंग करताना कॅश बाळगायची गरज नाही. आय गेस, सुपरस्टार आता माझ्यावर रुसून बसणार.

आता आंघोळ करायला वेळच नव्हता. घरात शिरताच मी फ्रिज उघडून थंड पाण्याची बाटली घेऊन खुर्चीत बसले. आवडलं नाही तरी लहानपणीपासून आजीने बिंबवलेलं डोक्यात असतंच, "खेळून झाल्यावर उभ्याने सोसा-सोसाने पाणी पिऊ नका, पोटात नळ भरतात." लॅपटॉप डायनिंग टेबलवर ठेवला. झूम कनेक्ट करताच बेनीचा चेहरा स्क्रीनवर आला.

"देअर शी इज! वॉव, लूक ॲट यू! किसीको इतना व्हिटामिन डी मिल रहा है और हम यहां ऑफिस मे बैठेबैठे पक रहे हैं!" आम्ही कायम आमच्या वेगळेपणावरून एकमेकींची थट्टा करत असू पण आमच्यातली मैत्री तेवढीच घट्ट होती. ती जेमतेम पाच फूट, गोरी गोबरी, कुरळा बॉय कट अशी टिपीकल पारशी लूक्स असणारी मुलगी होती. माझी गव्हाळ त्वचा बारा महिने टॅनच असे. मी तीच्याहून खूप उंच, बारीक आणि सरळ लांब केस. ही मुलगी सुंदर, नाजूक आणि तेवढीच हुषार होती. माझ्या अती डिप्रेसिंग दिवशीसुद्धा ती मला हमखास हसवू शके.

"सॉरी! रनिंग करत होते. तू लकी आहेस, स्क्रीनमधून घामाचा वास येत नाही. आय एम इन डेस्परेट नीड ऑफ अ शॉवर! हाऊ आर यू? हाऊ'ज जमशेद?" जमशेद आमच्याबरोबर DU मध्येच लॉ करत होता आणि सध्या दिल्लीच्याच एका लॉ फर्ममध्ये पार्टनर होता. माझ्याउलट ती पीएचडी संपताच त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली होती. खूप क्यूट कपल होतं ते.

बेनी डोकं मागे टाकून हसली. "ही'ज ग्रेट! पन मी तुझ्या स्मॉल टॉकच्या एफर्टला ऐकणार नाय. यू हॅव फायनली रीच्ड आऊट, सो टॉक टू मी!"

मी पाण्याचा एक मोठा घोट घेऊन बाटली खाली ठेवली आणि एक लांब श्वास सोडला. लेट्स डू धिस.

"मैने तुम्हे बताया था, मैं समरके साथ काम कर रही हुं."

"आय थिंक इट्स अ ग्रेट आयडिया. इतना साल उसको अवॉइड करने के बाद, अभी तुम उसके साथ काम कर रही हो, इट सेज अ लॉट. यू आर रेडी टू गो फॉरवर्ड." ती माझ्या उत्तराची वाट पहात राहिली.

"ऑर, मुझे सिर्फ जॉब चाहिए था." मी खांदे उडवले. हे खरं नव्हतंच तसं. इंडियन्सकडून ऑफर आली तेव्हा मी जाम घाबरले होते. पण खूप वर्षांनी एवढी एक्साईट पण झाले होते. कारण मी त्याला प्रचंड मिस केलं होतं आणि नर्व्हस असले तरी त्याला भेटायचं थ्रील खूप जास्त होतं.

"बुलशिट! तुमने क्लेव्हरली पर्मनंट ढूँढनेके बदले ये टेंपररी जॉब लिया. तो बताव, कैसे चल रहा है? नो सरफेस आन्सर्स, ओके? तुमने ऑलरेडी बताया है की तुम लोग साथ में रनिंग करते हो, स्विमिंग करते हो, जस्ट लाईक बडीज.. ब्ला ब्ला..." ती हसली. "आय नो, ये प्रोफेशनल नही है, बट यू आर माय बेस्टी यार! स्पिल इट आऊट, पलो."

मी मान हलवली कारण ती माझ्या टाईपची आहे, मी तिच्याशी काहीही शेअर करू शकते. कदाचित हे शेअर करणं हा एक प्रोग्रेसच आहे. मला हे मनात दडपून नाही ठेवायचं. तो माझ्यावर चिडलाय ह्या गोष्टीचा मला राग येतोय. मला पळून न जाता, हे फिक्स करायचं आहे. पुन्हा दहा वर्ष त्याच्याशी न बोलता घालवायची नाहीत.

"ओके.. तो वी हॅड अ मोमेंट ऑफ वीकनेस. ॲक्च्युली टू.. मोमेंटस् ऑफ वीकनेस!"

"डिटेल्स, डिटेल्स!" ती गालात हसत भुवई उंचावून म्हणाली.

"लास्ट मंथ, हम उसके पेरेंट्स के घर डिनरके लिये गये थे. वहां कश्मीरा बर्वे आयी थी, समरको सरप्राइज देने!"

"वो ' इश्क सलामत' वाली? वॉव! वो तो मेरी फॅशन आयकॉन है!" बोलताबोलता तिने जीभ चावली."मतलब अगर तुम्हे बहोत सारा मेकअप, डिझायनर क्लोदींग वगैरामे इंटरेस्ट है, तो. मुझे तो अपनी ॲथलेटिक, टॅन, गर्ल नेक्स्ट डोअरही पसंद है!"

मी हसून डोळे फिरवले. "वो रियलमे भी उतनीही गॉर्जस है. एनीवे, शी वॉज गोइंग ऑल चिपकोफाय ओव्हर हिम. वीच आय कुडंन्ट हॅण्डल. आय थिंक मैं सचमें जेलस हो गयी थी. लेकीन उनके बीच कूछ नहीं है, दे आर जस्ट फ्रेंड्स. मैं बाथरूम मे छिपकर, भागने का प्लॅन बना रही थी. समर वहा आ गया अँड समहाऊ माय लिप्स लँडेड ऑन हिज! ॲक्सिडेंटली!!"

बेनी हसता हसता खुर्चीतून पडणार होती. "ॲक्सिडेंटली! शुअर!! फिर आगे क्या हुआ?"

मग मी तिला त्याने घरी सोडण्यापासून, हलकं फ्लर्टींग, हरिषचं येणं, मारामारी, अंधारी गल्ली ते अगदी आत्ता तो चिडेपर्यंत सगळं सांगितलं अर्थात अगदी जास्त इंटीमेट डिटेल्स सोडून.

बेनी कधी न ऐकलेली एखादी भारी गोष्ट ऐकल्यासारखी एकाग्र चित्ताने ऐकत होती.
"से समथिंग! तुम मुझे डरा रही हो. यू आर अ थेरपिस्ट, इससे भी मेस्ड अप स्टोरीज तुमने सूनी होंगी.." मी जरा आवाज वाढवून म्हटलं.

"ओह, आय हॅव हर्ड इट ऑल! ट्रस्ट मी. विअर्ड फोबीयाज, कमिटमेंट फोब्ज, सेक्स फेटीशेस.. एव्हरीथिंग! बट धिस.. इट्स सो स्वीट अँड रोमँटिक. लाईक मूव्ही स्टफ!"

मी आ वासला. "यू हर्ड अबाऊट हिम बीइंग फ्यूरीअस विथ मी, राईट?"

"चलो, सोचते है.." बेनी गंभीर होत म्हणाली. "उसने तुम्हारे हॅपीनेस के लिये सबकुछ किया. देन यू वेक अप अँड टेल की, उसका कोच उसे लागता है, उससे भी बडा ॲ**हो* है. आगे कहती हो, सब भूलकर तुम्हे वापस प्रोफेशनल बीहेव करना है.  सिरीयसली पलोमा? धिस इज व्हिपलॅश!"

मी ओंजळीत चेहरा लपवत सुस्कारा सोडला. "आय एम सच अ कीलजॉय..."

"यू रिअली आर." ती हसायला लागली.

"लिसन अप. यहाँ कुछ है. यू नेव्हर स्टॉप्ड लव्हींग हिम. ये सब दबी हुई फीलिंग्ज वापस आ रही है. इट्स बीन अ लाँग टाईम अँड यू हॅव डेटेड मेनी शॅलो ए**होल्स."

"टेल मी हाऊ यू रिअली फील?" मी नर्व्हस होऊन पोनीटेलचे टोक बोटाला गुंडाळत विचारले.

"मी सरळ बोलते. मैने तुम्हे बहोत बार बोला है की ऐसे शॅलो लोगोंसे तुम अटॅच नही होती. यू चोझ अन्अपीलिंग मेन ऑन पर्पज, राईट!" तिच्या ओठांचे कोपरे वर उचलले गेले. "यू आर रेडी टू मूव्ह फॉरवर्ड. तुम मुंबईमे रेंटेड फ्लॅट रखकर भी जॉब ढूँढ सकती थी. लेकीन तुम वो सब छोडकर वापस गयी कॉझ यू आर टायर्ड ऑफ रनिंग. यू हॅव टू बी! अँड द ओन्ली वे टू फाईंड हॅपीनेस, इज टू फेस इट!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २०

"व्हॉट डझ दॅट मीन? मी इथे आहे, सगळं फेस करतेय!" मी गालावर ओघळलेला एक थेंब पुसला. "आणि मी कंट्रोल न करता सारखी रडतेय! यू'ड बी प्राऊड."

"पलो, यू आर डूईंग ग्रेट! यू आर इन द मिडल ऑफ एव्हरीथींग. यू आर फेसिंग योर ग्रीफ अँड द गाय यू एव्हर ट्रूली लव्ह्ड ॲट द सेम टाईम."

"मैं ओव्हर अचीव्हर हूं, यू नो!" मी भिजल्या डोळ्यांनी जरा हसत म्हणाले.

"डार्लिंग, लिसन टू मी! तुम जो कर रही हो, वो चालू रखो. समर के लिये तुम्हारी फीलिंग्ज अभी भी सेम है. डोन्ट रन फ्रॉम देम."

"वो मुझसे बात तक नहीं कर रहा..."

"कॉझ तुमने उसे हर्ट किया. यू आर सेंडींग मिक्स्ड सिग्नल्स. अगर तुम बताती हो उतनाही वो अमेझींग है, तो ही'ल अंडरस्टँड! ऑल द पीपल हू लव्ह यू, वॉन्ट टू सी यू हॅपी. यू नीड टू अलाव युरसेल्फ टू बी हॅपी, इट्स टाईम!"

डोळ्यातून अजून थोडं पाणी ओघळतच मी श्वास सोडला. "यहाँ आकर मुझे मॉम की बहोत याद आती है. मैने बहोत साल इस बारेमे कीसीसे बात नहीं की.. लेकीन अब यहा आकर सब चीजोंमे मॉम का प्रेझेन्स फील होता है और मुझे अच्छा लग रहा है, सच में!"

"दॅट्स अ गुड थींग."

"और समर के साथ.. इट जस्ट फील्स राईट! लेकीन आगे का क्या? मुझे इंडियन्स तो मोस्टली हायर नहीं करनेवाले. मुझे तो ये भी नहीं पता की मुंबई मे जॉब मिलेगी या नहीं. समर मोस्ट प्रॉबब्ली ये सीझन खेलेगा. अगर मैं दिल्ली या बँगलोर चली गयी तो? बहोत इंवॉल्व होके मुझे फिरसे उसे छोडना नहीं है.."

"स्टॉप ओव्हरथिंकींग! ये सिर्फ तुम्हारा कोपींग मेकॅनिझम बोल रहा है. डोन्ट फिगर एव्हरीथिंग आऊट. जस्ट सी व्हेअर इट गोज.. अगर तुम प्यार मे हो, तो तुम दोनो खुद ही फिगरआऊट कर लोगे. यू विल फाईंड अ वे, टू मेक इट वर्क. पीपल डू इट ऑल द टाईम, पलो. तुम्हे ये सब पता है, लेकीन आय गेस तुम ये वर्कआऊट होनेसे ही डर रही हो. फिरसे इतना इंटेन्स प्यार करने से डर रही हो."

मी मान डोलावली कारण तिचं म्हणणं बरोबर होतं. पण ती भीती दूर कशी करायची ते कळत नव्हतं. माझा घसा दाटून आला.

"आय नो, किसीको इतना प्यार करनेमे रिस्क तो है. बट इट इस सो वर्थ इट! यू डिझर्व टू लव्ह अँड बी लव्ह्ड, बाय अ गुड मॅन. समवन हू मेक्स यू हॅपी. जस्ट एक्स्प्रेस!! टेल हिम हाऊ यू फील. मैं बेट लगाती हूं, वो भी सेम रिप्लाय देगा.

मी कीबोर्डकडे बघत एक खोल श्वास घेतला आणि मान वर करून पुन्हा तिच्याकडे पाहिलं.
"लेकीन वो मेरा क्लायंट है, उसका क्या? इट्स नॉट प्रोफेशनल यार.."

"सी, टेक्निकली तुम उसके कोच के लिये काम कर रही हो." ती खांदे उडवत म्हणाली. "इट डझंट मॅटर इन बिग पिक्चर. अगर तुम दोनो ये चाहते हो, तो टीमसे छुपाकर रखो जबतक तुम जॉब मे सेटल नहीं हो जाती. ऐसा तो नहीं है, की कोच तुम्हारे पास्ट के बारे मे जानता नहीं. तब तुम्हारा इतना फिअर्स कनेक्शन देख कर ही वो डरा होगा, इसलिये तुम्हे रास्ते से हटाया."

"लेट मी थिंक ओव्हर इट. इटस् अ लॉट टू प्रोसेस."

"आय एम सो प्राउड ऑफ यू, पलोमा. धिस इज बिग! जस्ट कीप पूशिंग आऊट ऑफ कन्फर्ट झोन. ओके?"

"यप, थँक्यू बेनी.. किसी और से मैं ये सब नहीं बोल पाती."

"आय अंडरस्टँड, तुम्हारे सारे सिक्रेट्स मेरे पास सेफ है, डोन्ट वरी."

"आय लव्ह यू, बेनी. तुम्हारे उस हजबंड को मेरी तरफ से एक बिग हग देना. तुम दोनोंको बहोत मिस कर रही हूं."

"लव्ह यू अँड मिस यू टू.. बाद मे मुझे कॉल करना और मुझे सब रिपोर्ट चाहिए."

मी तिला एक फ्लाईंग किस देऊन कॉल बंद केला.

आत जाऊन बेडवर आडवी झाले आणि कधीही न केलेली गोष्ट केली. आईबरोबर घालवलेले, समरबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत पडून राहिले. मी काय हरवलं होतं ते सगळं आठवत राहिले. हुंदके दिले, उशी भिजवत रडले, जोरजोरात किंचाळले.. आणि त्याने खूप म्हणजे खूप बरं वाटलं.

जरा वेळाने आंघोळ करून येऊन कानात इअर बड्स खुपसले आणि कानावर ओघळणारे स्वर ऐकत पडून राहिले.

ऐसे क्यूँ.. उसके होठों पे
अच्छा लगता है मेरा नाम..
ऐसे क्यूँ.. कुछ भी बोले वो
मन में घुलता है ज़ाफ़रान..

गिरता है गुलमोहर
ख्वाबों में रात भर
ऐसे ख्वाबों से बाहर निकलना
ज़रूरी है क्या..

-------

समर

"आय एम हॅपी की पलोमाने मुझे इंव्हाईट किया. मैं घर का खाना बहोत मिस कर रहा था." पलोमाच्या दारात आल्यावर वेंडी म्हणाला.

"इनका घर हमेशा सबके लिये खुला रहता है और अंकल खुद बहोत अच्छा खाना बनाते है. उन्हे खिलाने का इतना शौक है की यू विल नीड इनो फॉर शुअर!" मी हसलो खरा पण पलोमाला शेवटचं बघितल्यापासून माझ्या पोटात खड्डा पडला होता. कदाचित मी तिच्याशी बरं नाही वागलो. पण ती जसा विचार करत होती त्याचा मला राग आला होता. अजूनही ती मला पूर्णपणे तिच्या विश्वात आत घेईल का, माहीत नाही. मी पुन्हा अकरा वर्षांपूर्वी जिथे होतो त्याच जागी आहे.

काहीही बदललं नाही. निदान माझ्यापुरतं तरी. तिलाही हे वाटत असलं तरी ती कबूल करणार नाही. अकरा वर्षांपूर्वी तिने आमच्यासाठी काहीच फाईट केली नव्हती आणि आताही करत नाहीय.

"साऊंडस लाईक अ ग्रेट फॅमिली!" वेंडी म्हणाला आणि समोर दार उघडलं. दारातच मी वेंडीची जाईजुईबरोबर ओळख करून दिली. जाई वेंडीला नेऊन हॉलमध्ये सगळ्यांना भेटवू लागली. मी आतल्या खोलीत जाऊन आजीच्या पाया पडून आलो. लहानपणी आजी माझे फारच लाड करायची म्हणून ह्या सगळ्या मुली माझ्यावर रुसायच्या. बाहेर आलो तेव्हा डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ मांडून, झाकून ठेवले होते. आत ओट्याजवळ पलो सॅलडसाठी काकडी चिरत होती. तिने मान वळवून माझ्याकडे बघितलं. मी आत जाऊन तिच्याशेजारी ओट्याला टेकून उभा राहिलो. "हे! सकाळचा वर्कआऊट झाला ना?" तिने विचारलं.

तिने आकाशी रंगाचा फ्लोरल रॅप ड्रेस घातला होता. पोनीटेलभोवती केस गुंडाळून त्याचा मेसी बन केला होता आणि ती खाऊन टाकण्याएवढी कमाल गोड दिसत होती.

"हम्म. आज वेट ट्रेनिंग होतं आणि नंतर नेट प्रॅक्टिस. तू काय केलंस?" मी सगळ्या जगाचा पेशन्स गोळा करून माझे वांड हात जागच्या जागी ठेवले.

"काहीच नाही. तुझ्या कालच्या रनने माझं हाडंन-हाड खिळखिळं झालंय!" तिने खांदे उडवले. "माझ्याबद्दल लैच राग मनात धरून ठेवलेलास ना?"

तिच्या आवाजाने माझ्या छातीत कालवाकालव झाली आणि तिच्यासमोर नेहमी ढिला पडण्याबद्दल मी स्वत:ला चिमटा काढला.

ह्या एकट्या मुलीला मी कधीच नाही म्हणू शकत नाही.

"नाही. मला माझ्या सिस्टममधून काही गोष्टी काढून टाकायच्या होत्या." मी तिचं निरीक्षण करत म्हणालो.

"हो? मग टाकल्या का काढून?" माझ्याकडे पाहताना तिचा आवाज थोडा चिरकला.

"पूर्णपणे नाही. मला नाही जमणार." हे खरंच होतं. पलोमा फुलसुंदरला माझ्या सिस्टममधून काढणं अशक्य होतं. तो ऑप्शनच नव्हता. ती जवळ असताना नाहीच. कदाचित पुढे आम्ही आपापल्या मार्गाने गेलो की प्रयत्न करता येईल. तिने क्लिअर सांगितलं आहे की तिला माझ्याशी पुढे काहीच संबंध ठेवायचा नाही.

पुन्हा एकदा.

"काय मर्दा, आज खूप मैदान मारलं म्हणे?" काका आत येऊन माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाले. "तुझा ट्रेनर सांगत होता. म्हणून हे लगेच तुझ्यासाठी घेऊन आलो." त्यांनी हातातलं कोकम सरबत पुढे केलं. "सगळं तयार आहे, बसायचं काय जेवायला?" त्यांनी पलोमाला विचारलं. "जाई जुईला ताटं वाढायला सांगा, मी सॅलड आणते बाहेर."

"समर, एक प्रॉब्लेम झाला. नेमक्या आज शेजारी त्यांच्या स्वामींच्या पादुका आल्यात रे, म्हणून नॉनव्हेज काही करता नाही आलं. पण आपलं व्हेज पण काय कमी नसतंय." ते जरा ओशाळं हसत म्हणाले.

"चालतंय काका, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. जेवणाचं काय एवढं? मी कितीतरी वेळा तुमच्या हातचं मटन जेवलोय!!" मी हसल्यावर त्याना जरा बरं वाटलं.

सगळे येऊन बसल्यावर त्यांनी आधी मला आणि वेंडीला लहान डिशमध्ये कटवडा वाढला. "दुपारी माझे मित्र आले होते म्हणून पलोमाने केला होता. तुम्हाला चव द्यायला ठेवला थोडा. बघ एकदम 'आहार'च्या तोडीस तोड आहे किनी?"

वेंडीने खाऊन लगेच कौतुक केलं. मी खाताखाता पलोकडे बघून हसलो. माझ्याशेजारी काका वेंडीला कोल्हापुरातल्या तालमींची माहिती सांगत  होते. तेवढ्यात दिदी आणि अजय आले. जुईने ताटं वाढायला घेतली. चपात्या, पोकळ्याची भाजी, सुकी बटाटा भाजी, वरून कच्चं तेल घातलेलं लसणाच तिखट, दही, सॅलड, दूध आमटी आणि भात. भरगच्च ताट होतं.

"आईची दूध आमटी!!" दिदी खुर्चीत बसताच आनंदाने ओरडली. 

"हम्म सगळ्यांची आवडती. तेवढी आज पलोमाने केलीय. बाकी सगळं पप्पा!" जाई म्हणाली.

"मेरी वाइफ बनाती थी. ये उसके गाव, राधानगरीकी स्पेशल रेसिपी है. ." पप्पांनी वेंडीला सांगितलं. सगळे अचानक शांत होऊन पलोमाकडे बघू लागले.

"इट्स ओके. आईची आठवण काढून मला त्रास नाही होणार. खरंच बोला तिच्याबद्दल." ती लांब श्वास सोडून म्हणाली. "आय थिंक, मलाच तुमच्या सगळ्यांची माफी मागितली पाहिजे."

पप्पांनी तिच्याकडे काळजीने बघितलं. "तुला कोणाचीही माफी मागायची काहीएक गरज नाही."

"नाही. गरज आहे. मला आता बोललंच पाहिजे. मी इथून इतक्या घाईत का पळून गेले हे मला खूप वर्ष समजत नव्हतं. मी घरी का येत नव्हते आणि तुम्हा सगळ्यांना दिल्लीत का बोलवत होते तेही." तिने शेजारी बसलेल्या बहिणी आणि पप्पांकडे नजर टाकली.

"पलो, तुला हे सांगायची खरंच गरज नाही. आम्हाला कळतंय." दिदी तिचा हात थोपटत म्हणाली.

"मला बोलू दे. खरं सांगायचं तर मी इतकी वर्ष तुमच्यापासून लांब पळतेय. आई गेल्यानंतर मला मी तिच्याजवळ नसल्याने खूप गिल्टी वाटत होतं. दिदी एकटी तिची काळजी घेत होती. पण शेवटचे काही आठवडे, मला आईचं दिवसेंदिवस खालावत जाणं सहन होत नव्हतं." तिचा घसा दाटून आला. छातीवर हात ठेवून ती पुढे बोलू लागली. "मी खूप घाबरले होते. शेवटी शेवटी दुःखी आणि अगदीच आऊट ऑफ कंट्रोल झाले. कसं ते मला सांगताही येत नाहीये. पण आई गेल्यावर मी ठरवलं, ह्या वेदना मला पुन्हा नकोत. मला पुन्हा असं हर्ट व्हायचं नव्हतं." एव्हाना जाई उठून तिला मिठी मारुन रडत होती. जुई आणि दिदीच्याही डोळ्यात पाणी होतं आणि मी माझ्या मैत्रिणीला स्वतःभोवतीच्या सगळ्या भिंती फोडून टाकताना पहात होतो. ती प्रामाणिकपणे मोकळी होत आपली व्हल्नरेबल बाजू सगळ्यांना दाखवत होती.

"मला समजतंय, बेटा. देवाने आपल्या सगळ्यांवरच अन्याय केला. पण आपण सगळे आपल्याला जमेल तसं उभारलो त्यातून.." पप्पांच्या आवाजात कंप होता.

"पण मी एकटीच होते जिने इथून पळ काढला.  आय एम सॉरी अबाऊट दॅट." तिची नजर माझ्याकडे वळली." एका अर्थी मी अजूनही पळतेय, हो ना? पण आता थांबायचं आहे. मी खूप दमलेय." आता बास. मी तिला एकटीला असं त्रास करून घेताना बघू शकत नाही. मी समोर वाकून तिच्या हातांवर हात ठेवले. "पलो, यू आर ओके." मी कुजबुजलो.

तिने सरळ माझ्याकडे बघत मान हलवली. "नो, आय एम नॉट. आणि त्याचं कारण तू आहेस. माझं तुझ्यावर एवढं प्रेम होतं की त्याची मला भीती वाटायला लागली.  हे खरं आहे. मी घरापासून लांब गेले, तुझ्यापासून लांब गेले. जगात सगळ्यात जास्त प्रेम असलेल्या सगळ्या माणसांपासून दूर गेले.

"आणि घोरपडेनी तुला ते करायला भाग पाडलं." मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो.

"मी तेव्हा तुला सांगायला हवं होतं. मी त्यांना त्यांचा सल्ला त्यांच्यापाशीच ठेवायला सांगायला हवं होतं. पण मी पळायला कारणच शोधत होते. मी असंच करते. पण आता तसं नाही करायचं." तिने ओंजळीत चेहरा लपवला. आता जुई आणि दिदी पण तिच्या शेजारी उभ्या राहून तिला शांत करत होत्या. ती मला काय सांगतेय त्याची मी वाट पहात होतो.

"माझ्या फीलिंग्ज सेम आहेत, समर. सॉरी, मला हे कबूल करायला एवढा वेळ लागला. हे अनप्रोफेशनल आहे, पण जे आहे ते आहे!" तिने किंचित हसत माझ्याकडे बघितलं. मी खुषीत मान हलवली. जे काय सांगायचं ते माझे डोळे बोलून गेले असतील. आता सगळेजण हळूहळू हसायला लागले.

"ओके, आता जेवायचं का? वेंडीला बिचाऱ्याला खूप भूक लागली असेल." पप्पा मोठ्याने म्हणाले आणि सगळ्यांनी जेवणाकडे लक्ष दिलं.

जेवून सगळे बाहेर गप्पा मारत बसलो. मी आणि पलो सोफ्याला टेकून खाली बसलो होतो. पप्पा कॉल घ्यायला उठून बाहेर गेले. तिने अलगद माझ्या दंडावर डोकं टेकलं. "आता मला माफ केलंस?"

"माफी मागण्यासारखं तू काही केलं नाहीस. हां, आता उद्या उठून आपण प्रोफेशनल राहू, म्हणू नको!" मी अजून तिरकस बोलणं सोडलं नव्हतं.

तिने मला चिमटा काढला आणि कोणाला दिसणार नाही असा हात धरून बोटात बोटं गुंफली.

"वेल, मैं तो कोच को नहीं बताऊंगा लेकीन वो तुम दोनोंके बारेमे बहोत पूछता रहता है. आय अश्योअर्ड हिम, दॅट नथिंग इज गोइंग ऑन." वेंडी समोरून आमच्याकडे बघत म्हणाला.

"व्हॉटेव्हर हॅपन्स हीअर, स्टेज हीअर वेंडी" समर हसून त्याच्याकडे बघत म्हणाला.

"बट बी केअरफुल. यू नो हाऊ स्पाईटफुल ही इज.." वेंडीच्या डोळ्यात तरळणारी काळजी माझ्या नजरेतून सुटली नाही. कोचला नक्कीच हे आवडणार नाही. तो त्याच्या आकांक्षांच्यामध्ये येणाऱ्या माणसाला पूर्णपणे डिस्ट्रॉय करायला जराही मागेपुढे बघणार नाही. आम्हा तिघांनाही हे समजत होतं. पण त्याला नंतर बघून घेऊ.

"बट आय एम हॅपी फॉर यू गाईज.. मैं देख रहा था इस मोमेंट के लिये तुम दोनो कितना टाईम लेते हो!" वेंडी हसत म्हणाला.

"प्लस वन! मैं भी कबसे वेट कर रही थी!!" जाई बाहेरून आणलेली मसाला पानं आमच्या हातात ठेवत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २१

पलोमा

एवढ्या सगळ्या भावनांचा महापूर ओसरल्यावर मी मॅराथॉन पळाल्यासारखी दमले होते. पण त्यात काहीतरी चांगलं केल्याचा अभिमानही होता. हे सगळीकडे जाणवत होतं, पोटात आलेल्या गोळ्यात, दाटून आलेल्या गळ्यात, रडून सुजलेल्या डोळ्यातसुद्धा. पण ह्या सगळ्याने काही समर थांबणार नव्हता. त्याने सगळ्यांशी जेमतेम चार-चार वाक्य बोलून मला घरातून बाहेर काढलं. पप्पा आधीच वेंडीला हॉटेलवर सोडायला गेले होते म्हणून बरं!

घरी गाडी पार्क केल्यावर खाली उतरायच्या आधीच त्याने मला पोत्यासारखं पाठूंगळी मारलं आणि चालायला लागला. मी काही दंगा न घालता त्याच्या डोक्यावर हनुवटी टेकली. "कसं वाटतंय तुला?" त्याने विचारलं.

"डोकं जरा बधीर आहे पण मोस्टली ओके. खांद्यावरचं सगळं ओझं नाहीसं झालंय. हलकं हलकं वाटतंय! किती वर्षापासून ते डोक्यावर घेऊन फिरत होते.." मी मान्य केलं. आता एकदा सगळं खरं कबूल केल्यावर, मी बिनधास्त सगळंच बोलून टाकत होते.

"हो?" तो जरा विचार करून म्हणाला. अर्थात त्यात त्याची चूक नव्हती.

"कोल्हापुरात येऊन पहिल्यांदा तुझ्यासाठी दार उघडलं तेव्हाच मला हे वाटलं होतं. पण खरं सांगायचं तर तुला शेवटचं भेटल्यानंतरचा प्रत्येक दिवस खूप जड होता. जेव्हा केव्हा तुझा फोटो कुठल्या मॅगझिनवर किंवा रस्त्यातल्या फ्लेक्सवर दिसायचा तेव्हा खोलवर कुठेतरी दुखत रहायचं. म्हणूनच मी सगळ्यांना तुझा उल्लेख करायला मनाई केली होती. कारण मी तुला अक्षरशः रोज मिस करत होते."

तो पोर्चसमोर थांबला आणि काहीतरी करून त्याने पटकन मला पाठीवरून पुढे घेऊन दोन्ही हातात धरलं. बाळासारखं! त्यामुळे मी वेड्यासारखी मोठ्याने हसले. पायऱ्या चढून वर जाताजाता तोही हसायला लागला. आत गेल्यावर त्याने मला सोफ्यावर टाकलं आणि मला जवळ घेऊन शेजारी बसला. "खरं सांगितल्याबद्दल थँक्स! माझ्याही सेम फीलींग्ज होत्या. मी तुला मिस करणं कधी थांबलंच नव्हतं, ना तुझ्यावरचं प्रेम! तुलाही तसंच वाटत असेल, हे मला मनातून माहिती होतं, पण ते तुझ्या तोंडून स्पष्ट ऐकायचं होतं."

"आता घोरपड्याना कळलं किंवा अख्ख्या जगाला कळलं तरी मला काही फरक पडत नाही. काल सकाळी मी तुझ्याशी जशी वागले त्यासाठी सॉरी. मी घाबरले होते. कदाचित परत घाबरेन... पण यावेळी सगळ्या गोष्टी आधी तुला सांगेन." मी त्याच्या मानेत तोंड खुपसत म्हणाले.

"आणि ते ऐकण्याचा हक्क फक्त माझा आहे. त्यात कोच किंवा इतर कुणीच नाक खुपसायचा काही संबंध नाही. घोरपडे ह्या सगळ्याचा तुझ्या विरोधात वापर करेल. ट्रस्ट मी. हे सगळं कोच किंवा सगळ्या जगाला सांगायची, एक्स्प्लनेशन द्यायची गरज नव्हतीच कधी. ही फक्त तुझ्या-माझ्यातली गोष्ट होती आणि आहे." तो माझ्या गालावरून अलगद बोट फिरवत म्हणाला.

"सो, आय गेस व्हॉट हॅपनस् इन कोल्हापूर, स्टेज इन कोल्हापूर!" मी त्याच्या मानेत हात टाकून नाकाला नाक घासत म्हटलं. आता सगळी कबूली दिल्यावर मला त्याच्यापासून जराही लांब रहावत नव्हतं. नीडींग हिम वॉज टेरीफाईंग, बट लव्हींग हिम वॉज वर्थ इट! माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला हे उमगलंय.

"मला घोरपडेकडून तुला कुठलाही त्रास व्हायला नकोय. त्याने आधीच आपल्यात घुसून आयुष्यभर पुरेल इतका त्रास दिलाय. पण तो जाम वाकडा माणूस आहे, पलो. तू कष्टाने जे काम केलंय ते मी त्याला उधळू देणार नाही. आत्ता आपण हे कुठे सांगायला नको. आपण त्या इव्हेंटला जाऊ तेव्हा मी कोचला सांगेन की तू आणि वेंडी माझे ट्रेनर्स म्हणून माझ्याबरोबर आहात. बहुतेक त्याला मी आणि कश्मीरा अजून एकत्र आहोत असं वाटतंय. त्यामुळे तो आपल्याकडे जास्त लक्ष देणार नाही. मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल त्याला काही सांगत नाही कारण त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही." तो माझ्या डोक्यावर हनुवटी टेकत म्हणाला.

मी पोटात पडणारा खड्डा जरा दूर सारण्याचा प्रयत्न केला. "आपल्याला इथपर्यंत यायला खूप वेळ लागलाय आणि आता ते कोणी बिघडंवायला नकोय."

"मी वेळ पडल्यास माझ्या जीवाची बाजी लावून तुला प्रोटेक्ट करीन. डोन्ट वरी." तो माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.

"सो, वी आर डूईंग धिस?" मी हसत त्याच्याकडे पाहिलं."तू आणि मी?"

" तू म्हणालीस, तुझं माझ्यावर प्रेम आहे. राईट?" त्याने गालात हसत विचारले.

"आय लव्ह यू. प्रेम तर कायमच करत होते आणि करत राहीन."

"मग मला फक्त तेवढंच हवंय!" एवढाच उच्चार करून त्याचे ओठ माझ्यावर येऊन आदळले. हक्क, गरज आणि ईच्छा सगळ्यांची एकाचवेळी जाणीव होत होती. माझे कपडे सोफ्यावरच कुठे कुठे पसरले होते.

"आय मिस्ड एव्हरीथिंग अबाऊट यू.." तो ओठांनी, जिभेने माझ्या शरीराचा इंच न इंच एक्सप्लोर करत असताना मी पुटपुटले. त्याने पुन्हा चमकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि जवळ येत माझं तोंड बंद करून टाकलं.
त्याच्यामुळे मला सगळं नव्याने जाणवतंय.
कोणाच्या इतक्या जवळ असण्याने काय वाटतं ते मी नव्याने अनुभवतेय.
माझ्या शरीराबद्दल कोणावर पूर्णपणे विश्वास टाकणं. आणि हृदयाबद्दलसुद्धा.
हळूहळू माझी नजर धूसर झाली.
डोळ्यांसमोर चांदण्याचा स्फोट झाला.
मी त्याच्या केसांतली माझी बोटं घट्ट केली. ह्यावेळी तो थांबला नव्हता.
त्याने मला कड्यावरून झोकून दिलं आणि मी सुखाच्या लाटांखाली गुदमरत त्याच्या नावाने ओरडले.

धडधडणारं हृदय शांत करत मी एक दीर्घ श्वास घेतला. घशात खोलवर काहीतरी दाटून येत होतं पण यावेळी मी रडणार नाही. तरीही सगळ्या भावना कंट्रोल करत मी थोडी थरथरलेच. तो मागे झाला. माझ्या चेहऱ्यावर चेहरा आणत, त्याने मला निरखून पाहिलं "आर यू ओके?"

त्याच्या आवाजातल्या काळजीने मी अजूनच इमोशनल झाले. त्याच्या प्रेमळ नजरेने हृदय फुलून आलं. मला जेवढं व्हल्नरेबल वाटत होतं ते एकाचवेळी भीतीदायक आणि तेवढंच एक्सायटींग होतं.

"तुझ्यामुळे मला सगळ्या गोष्टी जरा जास्त इंटेन्स फील होतात, समर.."

त्याने ओठ माझ्या गळ्यापाशी आणत हलकेच चावा घेतला. "गेट रेडी टू फील इव्हन मोर.." तो कुजबुजला.

"तू खूपच कपडे घातलेयत!" मी ओठ चावत हसत म्हणाले. त्याने लगेच उठून टीशर्ट डोक्यावरून ओढून काढला. उफ, ती परफेक्ट रुंद छाती आणि कातील ॲब्ज! आणि इतका ग्लोरिअस टॅन! माझी नजर त्याच्यावर खिळून राहिली. तो मला उचलून आत घेऊन गेला. बेडरुमच्या खिडकीतून चांदणं आत आलं होतं. मला बेडवर टाकून, त्याने नाईट लॅम्प बंद केला.

आज आम्हाला आमचा ऱ्हीदम सापडला होता. त्याचे डोळे माझ्यात मिसळले. मी त्याच्याकडे बघता बघता, सगळी भीती विसरून त्या क्षणात स्वतःला झोकून दिलं. एकमेकांच्यात विरघळत. फक्त श्वासांचे आवाज आणि एकमेकांना आणखी शोधणारे ओठ... ओह माय गॉड.. "समर!" पूर्णपणे कोसळताना मी ओरडले आणि काही सेकंदात त्याच्याही ओठांवर माझं नाव आलं. "फ*" तो श्वास सोडत पुटपुटला. "आय लव्ह यू, पलो!" माझ्या शेजारी आडवा होत त्याने मला स्वतःकडे ओढून घेतलं. "आय लव्ह यू, टू" मी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाले. कारण प्रेम करणं मी कधी बंदच केलं नव्हतं, आणि करणारही नव्हते.

पण मी हे स्वतःशी कबूल करताच डोक्यात दबलेला तो बारीक आवाज पुन्हा जागृत झाला.

माझ्या पायाखालून कधीही जमीन खेचली जाण्याची घाणेरडी भीती पुन्हा डोकं वर काढू पहात होती.

समरने माझ्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला केले आणि माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं.

आणि मी ती भिती लांब फेकून दिली.
निदान आत्तातरी.

-------

समर

"आज रॅम्प अप हो रहा है क्या?" वेंडीने गालात हसत विचारलं. मी कपाळावरचा घाम निपटत श्वास घ्यायला वाकून गुढघ्यांवर हात ठेवले. कोल्हापुरात रहायला येणं हा माझ्यासाठी चांगला निर्णय ठरला होता. फक्त पलोमा जवळ येणं एवढंच नव्हे तर माझ्या शरीर आणि मनाला कोल्हापूरची, इथल्या मातीची, हवेची गरज होती. माझं डोकं इतकं शांत झालंय की मी स्वतःला कितीही व्यायाम करायला पुश करू शकतो. डोक्यातले सगळे गोंधळ, आवाज बंद झालेत आणि मला माझ्या मुळापर्यंत गेल्यासारखं वाटतंय.

"हम्म, समथिंग लाईक दॅट." मी उत्तर दिलं आणि कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून माझ्याकडे बघणाऱ्या पलोमाकडे नजर टाकली. ती रनिंग शॉर्ट्स आणि व्हाईट टँक टॉप घालून, सेक्सी नजरेनं माझं डोकं बाद करत बसली होती. मला आफ्टरनून वर्कआऊट जास्तीत जास्त करायला लावून, ती सकाळी फक्त मला मॉरल सपोर्ट म्हणून येत होती. स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या नावाखाली!

तिच्या म्हणण्याप्रमाणे ती माझा वर्कआऊट ॲनालाईज करते. पण माझ्यामते ती फक्त माझ्यावर लाईन मारायला येते!!

"गुड वर्क, मॅन!! घोरपडे बहोत इंप्रेस होनेवाला है! अगर तुमने साइन किया तो!" माझ्या अर्ध्या तासात शंभर बर्पी मारुन झाल्यावर वेंडी टाळ्या वाजवत म्हणाला.

"साइन करने के लिये, जय मेरे पीछे पडा है." मी माझ्या मॅनेजरबद्दल बोललो. त्याला लवकरात लवकर हे डील संपवायचं होतं, पण मी अजून त्या विचारावर ठाम झालो नव्हतो. एवढी वर्ष फक्त जास्तीत जास्त रक्कम बघून मला साइन करावी लागत होती, पण आता तशी गरज नव्हती. ह्या गोष्टीनेच मला लै गार वाटत होतं.

पलोमाचा फोन वाजला. ती एक मिनिट म्हणून बोट दाखवून कॉल घ्यायला जरा लांब गेली.

"अब तुमको ज्यादा सोचना पडेगा. पहले की बात अलग थी!" वेंडी जरा गंभीर होत म्हणाला.

"मीन्स व्हॉट?"

"मैं इतने साल से तुम्हे देख रहा हूं, इट्स रिअली गुड टू सी यू हॅपी. शी मेक्स यू हॅपी!"

मी मान हलवली. खरंय. पलो आणि मी सगळं वन डे ॲट अ टाईम घ्यायचं ठरवलंय पण माझ्या निर्णयात ती एक महत्त्वाचा घटक आहे. मी निगोशिएट केलं तर कोच तिला हायर करू शकतो, पण तिला ते नको आहे. मलाही कोचकडे माझा काही वीकनेस ठेवायचा नाहीय. माझ्या किंवा तिच्यावर त्याचा कसलाही होल्ड नकोय. आमच्यात दुरावा आणण्यामागे त्याचा हात होता, हे समजल्यावर तर मला तो नकोसाच झालाय. अशा अविश्वासू माणसाबरोबर मी खेळूच शकत नाही.

"लाईफ मे क्रिकेट से ज्यादा भी कुच चीजे इंपॉर्टन्ट है! देखो ये मैने बोला, ऐसा किसीसे बोलना मत.. नहीं तो आय'ल किल यू!!" वेंडी जोरजोरात हसत म्हणाला.

"तुम ॲनी और बच्चोंको मिस करते होगे? " मी विचारलं. वेंडी महिन्यातून फक्त एक वीकेंड मुंबईला जात होता.

"व्हिडिओ कॉल है, तो चलता है. हमारे इव्हेंट के बाद उनका छुट्टी चालू होयगा. इधर लाके कोल्हापूर दिखाऊंगा उनको!"

"आय अप्रिशिएट मॅन! तुम इव्हेंटसे चाहिए तो जल्दी निकल जाना."

"नाह, आय एम ओके. मुझे उधर रुकना पडेगा. मैं रहूंगा तो तुम दोनोंपे इतना फोकस नहीं आयेगा." तो म्हणाला.

हुश्शारैस भावा! मी वेंडीला इंव्हाईट केलं होतं कारण आम्ही तिघे दिसल्यावर घोरपडे आमच्यात फार ढवळाढवळ करायला येणार नाही. माझ्याकडून साइन घेण्यासाठी तो माणूस काहीही करू शकतो.

"हम्म. आय टोल्ड हिम, आय'ल गिव्ह माय डिसिजन इन टू - थ्री वीक्स. टिल देन, आय डोन्ट ओ हिम एनीथिंग. त्याने मला भारी टीम बॅकअप लावलाय. सगळे यंगस्टर्स आहेत. बरंच शिकतील. विथ ऑर विदाऊट मी!"

"लेकीन तुम्हारे होने से कप जीतने के चान्सेस ज्यादा है. आय डोन्ट सी देम हॅविंग मच चान्स विदाऊट यू! घोरपडे ओन्ली वॉन्टस टू विन, नथिंग एल्स मॅटर्स.."

तो बोलत असतानाच समोरून पलोमा माझ्याकडे पळत आली. "समरss गेस व्हॉट?!'

"व्हॉट?" मी हसत विचारलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २२

"मोहन बगानचे कोच होते फोनवर! मी मास्टर्स करताना तिथे असिस्टंट म्हणून काम केलंय. तेव्हा सुदीप बॅनर्जी म्हणून माझा सिनियर स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट होता. तो पुढच्या वर्षी रिजाईन करून जर्मनीत शिकायला चाललाय. तर ते मला सध्या त्याच्या असिस्टंटचा जॉब ऑफर करतायत. तो गेल्यावर माझं प्रमोशन होईल!!" ती आनंदाने ओरडतच म्हणाली.

येय!! मी तिला उचलून गोल फिरवून खाली ठेवली. वेंडीने तिच्या खांद्यावर थोपटले. "काँग्रॅटस् ! यू आर द बेस्ट सायकॉलॉजीस्ट, आय हॅव एव्हर वर्क्ड विथ!"

"आय एम द 'ओन्ली' सायकॉलॉजीस्ट, यू हॅव एव्हर वर्क्ड विथ! तरीपण थँक्यू!!" पलो हसत म्हणाली आणि तिने वळून माझ्याकडे बघितलं.

मला काय ही कल्पना जास्त रुचली नव्हती, पण पलोसाठी मला आनंद झाला होता. अकरा वर्ष लांब राहिल्यावर मला पुन्हा आमच्यात एवढे किलोमीटर यायला नको होते. आय एम ऑल इन, पण तीही तेवढीच आहे का हे बघायला हवं. "दॅट्स सो कूल!! तुला काय वाटतं?" आम्ही खुर्चीत बसताना मी विचारलं.

ती भुवया जवळ आणून जरा विचारात पडली. "काही फॅक्टर्स लक्षात घ्यायला हवेत." तिने बोलताबोलता पोनीटेलचं टोक बोटाला गुंडाळलं.
"पहिलं म्हणजे, पे हॉरीबल आहे. कारण त्यांना असिस्टंटची गरज अशी नाहीय. पण आत्ता मला घेतलं नाही, तर पुढच्या वर्षापर्यंत मी दुसरीकडे जॉईन होईन अशीही त्यांना भीती आहे. सो, हे वर्ष मला अगदी गाळात काढावं लागेल आणि सुदीप गेल्यावर मला सिनियर पोझिशन मिळेलच अशी काही गॅरंटी नाही. प्लस, मी तुझ्यापासून खूप लांब असेन. तू साइन केलं किंवा नाही, तरीही."

मी घटाघट पाणी पिऊन रिकामी बाटली टेबलवर ठेवली. मनात बांधून ठेवलेली खूप गाठोडी आम्हाला उघडायला हवीत. ती निदान बोलायला दार तरी उघडतेय याने मला बरं वाटलं.

"हे! मुझे निकलना चाहिए. कुछ ग्रोसरी लेना है और तुम्हारी सिस की बेकरीसे कपकेक्स लेने है. दे आर अमेझिंग!!" वेंडीने आम्हाला स्पेस देत काढता पाय घेतला. आम्ही दोघे उठून पार्किंगकडे निघालो.

"तू खूप गप्पगप्प झालास.." माझ्या घरी पोचून सीट बेल्ट काढताना तिने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघितले.

"मी आपण एकटे असायची वाट बघत होतो." मी गाडी पार्क करताना म्हणालो. ती माझ्याकडे तोंड करून बसली. "ओके. बोल आता."

"फर्स्ट ऑफ ऑल, पैश्यांचा विचार करू नको. तो फॅक्टर नाहीचय."

"ऑफ कोर्स इट इज! ती सॅलरी आहे माझी."

"मी भरपूर पैसे कमावतो. इतके की त्यांचं काय करायचं हे ठरवायलाही मला माणूस ठेवावा लागतो. सो, जर हा तुझा ड्रीम जॉब असेल आणि तुला तो इतका महत्त्वाचा असेल तर पैसा हा अडथळा ठेवू नको. मी तुझे एक्स्पेन्सेस कव्हर करीन." ती वाद घालायला लागण्यापूर्वी मी दोन्ही तळवे समोर धरले. "फक्त पहिलं वर्ष. जोपर्यंत ते तुला चांगला पगार देत नाहीत तोपर्यंत. नाही म्हणू नको." हेल, माझी इच्छा तिला कायम सपोर्ट करायची होती, पण सध्या बेबी स्टेप्स बरे. आधीच तिला कोणाची मदत नको असते.

"ही तुझी मोठी काळजी आहे? माझी बिल्स पे करणं?" तिने चिडवलं.

"ऐक की! मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार."

"माहिती आहे."

"आपल्याला एकमेकांजवळ यायला आधीच इतकी वर्ष लागलीत आणि लगेच मला तुझ्यापासून लांब नाही जायचं. सो, तू कलकत्त्याला जाणार ह्या विचाराने मला कसतरी होतंय. मला माझा निर्णय घेताना ह्या फॅक्टरचा विचार करावा लागेल."

"एक आयपीएल जायंट त्याच्या शाळेतल्या गर्लफ्रेंडच्या, सायकॉलॉजी करियरचा विचार आपला डिसिजन घ्यायला करतोय. हे जरा वेगळं वाटतंय!" ती मान हलवून हसत म्हणाली.

"बरं. मग मी काय करेन, हा तुझ्या निर्णय घेण्यातला फॅक्टर आहे का? मी कुठे खेळेन हा?"

तिने पुढे होत माझे हात हातात घेतले."ऑफ कोर्स. तो मुद्दा आहेच. पण हल्ली घोरपडे फक्त तुझी चौकशी करतात. काही आठवड्यात तू परत जाशील पण मला पर्मनंट करण्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. मी इथे पोचण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. मला तुझ्याएवढे पैसे मिळत नसतील, पण माझा जॉब मला मॅटर करतो. मी काहीतरी अकंप्लिश केलं असं मला वाटलं पाहिजे."

मी तिला जवळ ओढून कपाळावर येणारी बट कानामागे सरकवली. "आय थिंक, यू अकंप्लिश्ड समथींग लास्ट नाईट!" तिच्या गालांवर हळूहळू लाली पसरली. आय लव्ह्ड इट! इतके दिवस एकत्र घालवूनसुद्धा ती अजून मला लाजतेय ह्या गोष्टीनेच मी एकदम बाद झालो.

"तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला. तुझं बरोबरपण आहे. निदान माझं कुठेतरी जॉइनिंग होईपर्यंत लोकांना आपल्याबद्दल नको कळायला. नाहीतर सगळे म्हणतील, मी चुकीच्या मार्गाने जॉब मिळवला." ती माझ्याकडे बघत म्हणाली.

हम्म, मला कोणाला काय वाटेल ह्याचा झा* फरक पडत नाही. पण पलो हर्ट होईल असं मला काही करायचं नाहीय. आमच्या फिल्डमध्ये एका बाईने काम करणं सोपं नाही. तिने इथपर्यंत पोहोचायला जेवढी मेहनत घेतलीय, त्याचं मला कौतुक आहे. ते मी माझ्यामुळे अजिबात बिघडू देणार नाही.

"आय प्रॉमिस, हे आपल्यातच राहील. वीकेंडला वेंडी येतोय आपल्याबरोबर. कोचसमोर आपण कंप्लीट प्रोफेशनल वागू. तो अजून मला कश्मीराबद्दल विचारत असतो, म्हणजे त्याला वाटतंय की अजून आम्ही एकत्र आहोत."

तिने नाक मुरडले. "तू अजून तिच्याशी इतका बोलतोस?"

"जेलस?" मी मोठ्याने हसलो.

"टोटली!!"

मी तिची हनुवटी उचलून तिच्या डोळ्यात बघितलं. "तू सोडून मला कोणीही नकोय. ती फक्त मैत्रीण आहे म्हणून कधीतरी आम्ही टेक्स्ट करतो. मी आमचं ब्रेकअप तिला आणखी थोडे दिवस सिक्रेट ठेवायला सांगितलं आहे, कारण त्यामुळे आपल्याला गोष्टी सोप्या होतील. तिला आपल्याबद्दल माहिती आहे आणि ती आपल्यासाठी खूष आहे."

"आणि जर मी कलकत्त्याला गेले आणि तू मुंबईत तर?" तिने ओठ माझ्या ओठांजवळ आणत विचारले.

"पलो, तू कुठे असशील त्याने काही फरक पडत नाही. जोपर्यंत मी तुला हवा आहे, तोपर्यंत मी तुझाच आहे!" म्हणत मी लगेच तिचे ओठ ताब्यात घेतले. तिची बोटं माझ्या केसांत जाईतो रस्त्यावरून हॉर्न ऐकू आला आणि आम्ही चमकून दूर झालो. पलोने मागे वळून बघितलं आणि चेहऱ्यावर हात घेतले. "शिट, त्या समोरच्या बाल्कनीतून एक बाई बघतेय. तशी लांब आहे बरीच.."

"काय काळजी नाही. ती आत जाऊन नवऱ्याला विचारेल, ओ रिस्पॉन्स हाय काय!!" मी म्हणताच पलो मान मागे टाकून खो खो हसली. "हे आवडलंय!"

"मला माहिती होतं तुला आवडणार." मी गाडीचं दार उघडलं आणि खाली उतरून पोर्च चढताना तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो. "मला तूच अख्खा आवडतोस, समर सावंत." ती माझ्या कानात कुजबुजली.

"तू माझा पार नाद्या बाद करणारीस पोरी! वेन्डीने आधीच माझी हवा काढलीय. पण मी तुला कधी नाही म्हणालो काय!" मी तिला उचलून डायनिंग टेबलवर बसवत म्हणालो. "आय विश, आपण कायम असेच इथे राहू..." तिच्या गळ्यात हात टाकून हलकेच किस केल्यावर ती म्हणाली.

"आपण काय वाटेल ते करू शकतो!" मी भुवया वर केल्या.

"पण आपल्याला आपापली लाईफ जगायची आहेत. तुझ्यावर खूप लोकांची भिस्त आहे आणि मी.. मला स्वत:चं नाव कमवायचंय!"

"आय प्रीफर, माझी पलो!" मी तिची पोनीटेल धरून तिला अजून जवळ ओढलं.

"मला तेपण चालेल!" ती गालात हसली.

"मला शॉवर हवाय. येणार काय?" मी डोळा मारत टीशर्ट काढला.

"मला नको, मी थोडाच वर्कआऊट केलाय!" ती टेबलावरून उतरून हॉलकडे पळाली.

"पलोss कपाटातून बॉडी वॉश दे ना.." मी आतून ओरडलो आणि तिचा बॉटल द्यायला पुढे आलेला हात धरून तिला आत ओढली.

मला माहिती आहे, पुन्हा तिच्यापासून लांब रहाणे मला शक्य होणार नाही.

इट जस्ट वॉजन्ट ॲन ऑप्शन.

------

पलोमा

"डूड!! आय एम सो एक्सायटेड! तुम उसके साथ मुंबई जा रही हो. उसका घर देख सकती हो, उसे अवॉर्ड मिलते वक्त चीअर कर सकती हो..  हां, उसके एहोल कोच के सामने प्रोफेशनल ॲक्ट करना पडेगा, तब भी ये कितना कूल है!" स्क्रीनवर बेनी हातवारे करत बोलत होती. "इट्स वाईज टू किप धिस अ सीक्रेट, ॲट लीस्ट अन्टील यू हॅव अ जॉब. सॅडली, हम लडकियां कुछ भी करती है तो हमे जज किया जाता है, स्पेशली स्पोर्ट्स जैसे मेल डॉमिनेटेड फील्डमे.." बेनीने नाक मुरडलं.

"हम्म. समरने इव्हन एक होटेल रूम बूक करके रखा है ताकी उसके क्रेझी कोचको शक ना हो. दॅट्स हाऊ मच ही डझंट ट्रस्ट द गाय. समर को ये कन्सर्न है, कही कोच उसका बदला मुझसे ना ले ले."

"ये आदमी बहोत टेढा लगता है."

"वो तो है ही! लेकीन मुझे भी एक्साईटमेंट है. मैं समर के साथ रहूंगी, उसके कुछ टीममेट्स से मिलूंगी."

"उसको चॅरिटी के लिये अवॉर्ड मिल रहा है ना! हाऊ कूल! अ मॅन शुड नॉट बी अलाऊड टू लूक दॅट हॉट अँड बी फिलांथ्रोपिक!" बेनी भुवया उडवून हसली.

"या, ही'ज अमेझिंग!" मी गालात हसत म्हणाले.

"ओह माय!! तूम शरमा रही हो!" तिने नाकावरचा चष्मा वर केला."तुम्हे किसीके बारे मे इतना ड्रीमी होते पहली बार देखा है! वैसे भी अब तक तूने सब झंडू लोगोंको डेट किया है!!"

"True that!" आता मी तोंड उघडुन खळखळून हसले.

"बट सिरीयसली, वो कोच को इतना हेट करता है, तो उसके लिये खेलना बहोत हार्ड होगा.." तिने विचारले.

"ॲब्सल्यूटली. अगर कोई दुसरा कोच होता तो वो कबका साईन कर चुका होता. लेकीन कोच पूरी टीम को मनिप्युलेट करता है, तो पता नहीं नेक्स्ट सीझन के लिये समर अग्री करेगा या नहीं. बट ही लव्हज हिज टीम ॲन्ड आय नो, ही वॉन्टस् टू गो बॅक."

"और? मोहन बगान के बारे मे क्या सोचा? यू नो आय एम हॅपी फॉर यू."

"आय नो. उन्होंने मुझे सोचने के लिये मंथ एन्ड तक टाईम दिया हैं. उनको पता है, मैं समर के साथ काम कर रही हू. आय थिंक इसी रीझन से वो मुझे कन्सिडर कर रहे हैं. एव्हरीवन इज वेटींग टू सी, इफ आय फिक्स्ड द गोल्डन बॉय ड्यूरींग द ऑफ सीझन."

"अँड डीड यू?" तिने विचारलं. योग्य वेळी प्रश्न विचारून माहिती काढून घेण्यात आमची बेनी एकच नंबर आहे!

"वेट! इज धिस अ सेशन? आय थिंक हमारा सेशन नेक्स्ट वीक है." मी भुवई उंचावली.

"अरे, एक फ्रेंड उसकी बेस्टी को इतना तो पूछ सकती है ना? थेरपिस्ट होने का अक्युज मत करो यार!" ती हसत म्हणाली.

"फाईन. मैने उसे हर अँगल से क्वेश्चन किया. उसको ओपन अप करने के लिये, बहोत सारे सेशन लगे. बहोत सारा डेटा है. मुझे लगता है, उसे फिक्सिंग की जरुरत नहीं है.  फिजीकली, मेंटली वो फॅब शेप मे है. सिर्फ वो कोच को रिस्पेक्ट नहीं करता और पूरी टीम की रिस्पॉन्सिबीलीटी उसके उपर है. प्रेशर बहोत है. और.."

"और?"

"देअर इज अ ब्लँक स्पेस इन हिम. समथिंग इज मिसिंग बट आय कान्ट पिनपॉइंट इट. ही सेज ही फील्स ओके नाव, कॉझ आय एम बॅक इन हिज लाईफ."

"मेबी, ही फाऊंड दॅट मिसींग पीस इन यू."

"आय डोन्ट नो!! रिअली!! ये सब हम नेक्स्ट सेशन के लिये रखते है.."

"नो मॅम! मी तुजी फ्रेंड पन आहे आणि थेरपिस्ट पन. आता सांग, आय डोन्ट नो मतलब?"

"यू नो, सो मच इज अप इन द एअर.. आय मीन हम यहाँ है और ऑल्मोस्ट घर-घर खेल रहे हैं. मैं सोच भी नहीं सकती इतना इझीली हम पहले जैसे कनेक्ट हो गये. वी हॅव सच अ कन्फर्ट विथ वन अनादर अँड आय लव्ह इट. लेकीन जब वो जानेका डिसाईड करेगा तब क्या? और मैं कलकत्ता जाउंगी तो?"

"मुझे लगा, ही सेड इट डझन्ट मॅटर!" बेनी माझ्याकडे लक्ष देऊन बघत होती.

"अभी सब कुछ ग्रेट चल रहा है और मुझे हार्ड क्वेश्चन पूछ कर ये खराब नहीं करना." मी नखाने टेबल खरडवत म्हणाले.

"हार्ड क्वेश्चन क्या है?"

"अगर तुम देश के दो कोनों मे रहते हो, तो हाऊ डू यू मेक इट वर्क? हम अपनी अपनी टीम्स के साथ हमेशा ट्रॅव्हल करते रहेंगे. ऐसी चीजोंसे बीस पच्चीस साल पुरानी शादीयां तक टूट जाती है, हाऊ डू यू मेक इट वर्क?" मी मान करून तिच्याकडे बघत विचारलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २३

"ही इज अ वेल्दी पर्सन, पलोमा. जब भी वो फ्री रहेगा, फ्लाईट लेके मिलने आ सकता है. या फिर वाईस वर्सा! यू कॅन मेक इट वर्क. तू काहीतरी सांगत नाहीस मला.." बेनी रोखून बघत म्हणाली.

"असं काही नाही. फक्त हे किती रियलिस्टिक आहे माहीत नाही. यू नो, वो वापस स्पॉटलाईट मे जा रहा है. लडकीयां उसके ऊपर मंडराती रहेंगी. यहां कोल्हापूर मे, मैं उसके लिये मोस्ट एक्सायटिंग थिंग हो सकती हूं. बट आऊट इन द रिअल वर्ल्ड? आय एम नॉट शुअर.."

"ही इज ऑनेस्ट टू द कोअर, ऐसा किसने कहां था?" बेनीने भुवया उंचावून विचारले.

"ही इज. लेकीन फिर भी.. इट्स अ लॉट ऑफ टेम्प्टेशन! पता नहीं... वो मुझे छोड कर जाएगा, इस थॉट से ही मैं बीमार होने लगती हूं." मी हाताची बोटं मोडत म्हणाले. हल्ली सारखा हा विचार मला सतावतोय. आमच्यात अजून खूप गोष्टी अधांतरी आहेत.

"वोss वोss वोss स्लो डाऊन गर्ल! तुम अभी के अभी लाँग डिस्टन्स से चीटिंग और ब्रेकअप तक पहूंच गयी! उसने कहा है ना, देअर इज नो वन लाईक यू! ही हॅड इलेव्हन यर्स टू गेट हीच्ड अँड ही नेव्हर डीड. हां उसकी गर्लफ्रेंडस् होंगी, लेकीन किसी के साथ तुम्हारे जैसा बाँड नहीं था. और मुझे पता है, तुम्हे भी किसी और के साथ ऐसा फील नहीं हुआ! इट्स अ फॅक्ट. व्हाय कान्ट यू हॅव फेथ इन दॅट?" तिने चष्मा वर करत विचारलं.

का नाही? मला पुन्हा पळून जायचंय का.. फाईट ऑर फ्लाईट...

बेनी पुढे बोलत होती, "मला माहित हाय, तुझ्या आत बॅटल चालली आहे. तुझी फाईट ऑर फ्लाईट फिलॉसॉफी, राईट?"

चोरी पकडली गेली म्हणून मला हसायला आलं. मी जरा मागे होत खुर्चीत टेकून बसले आणि विचारलं, "इट्स अ नॅचरल रिॲक्शन राईट? व्हेन वी फील थिंग्ज आर टू गुड टू बी ट्रू?"

"फर्स्ट थिंग, कुछ भी हुआ नहीं है. उसने अभी तक डिसाईड भी नहीं किया." तिने मला बोलू न देता हात समोर धरले, कारण आम्हा दोघींनाही माहिती होतं की तो परत टीम जॉईन करणार आणि पुढे बोलत राहिली. "आणि जर तुला इंडियन्स कडून ऑफर आली तर हा इश्यूच राहणार नाही!"

"ह्यात खूप जर - तर आहेत." मी नख कुरतडत म्हणाले. " आय जस्ट होप, उससे इतना क्लोज होने मे मैने जल्दबाजी ना की हो.. आय हॅव पुट माय गार्ड डाऊन. जस्ट कुछ ही तो हफ्ते हुए है. जैसेजैसे हमारी डेडलाईन नजदीक आ रही है, मैं पॅनिक हो रही हू. इफ ही लेफ्ट मी, बेनी.." मी मान हलवून पटापट श्वास घेतला."आय एम सो स्केअर्ड, दॅट धिस इज गॉना एंड."

"तूने कोई जल्दबाजी नहीं की है और गार्ड कभी तो डाऊन करना ही था! पुरा टाईम खुद को प्रोटेक्ट करते रहना, बहोत थका देता है." बेनी थोडी इमोशनल झाली. "सुन, पलो. तुम हर्ट थी और इतनी जल्दी तुम्हारी ममा चल बसी, ये सब हार्ड था. अनफेअर भी. लेकीन सच ये है, की हर कोई तुम्हे हर्ट नहीं करेगा. तुम हमेशा ये हर्ट एक्सपेक्ट करती हो और पहले ही खुद को प्रिपेअर करती हो. यू रन बिफोर यू कॅन लेट युअरसेल्फ बी हॅपी! इस बार कुछ अलग करके देखो ना.."

"मतलब?"

" मतलब भागो मत. अपनी फीलींग्ज को गले लगाव. भरोसा रखो की सब ठीक होगा. अब रुकने का वक्त है, पलो."

मी गालावर ओघळलेला थेंब पुसला. "मी इथे आल्यापासून नुसती रडतेय. आणि आता तू आणखी रडव.. आय हेट क्रायींग.."

"मेबी इट्स पार्ट ऑफ हीलिंग."

"व्हॉट इफ आय एम ब्रोकन?" शेवटी मी हळूच मनातलं बाहेर काढलं. ह्या गोष्टीची मला सगळ्यात जास्त भीती होती. मी माणसं हरवण्याच्या भीतीने कधीच स्वतःला आनंदी व्हायची संधी दिली नाही तर?

"यू आर नॉट ब्रोकन, जस्ट अ बिट वूंडेड."

हम्म.. पण ती आम्हा दोघींनाही माहीत असणारी एक गोष्ट बोलत नव्हती. प्रत्येक जखम पूर्णपणे भरतेच असं नाही. काही ठुसठुसण्याऱ्यासुद्धा असतात.

पण मी आता सगळं मेस अप करणार नाही. कॉझ इट फेल्ट गुड, टू बी हॅपी अँड दॅट वॉज वर्थ फायटिंग फॉर.

"पलोss" बाहेरून समरचा आवाज आला.

"ओके, समर आ गया. टॉक टू यू लेटर.." मी म्हणेपर्यंत तो आत आलाही. बेनी नेहमीप्रमाणे हार्ट आईज करून कौतुकाने त्याच्याशी बोलत बसली. तसे ते बऱ्याचदा झूम वर भेटले होते आणि त्याला दिल्लीत जाणं झालं तर तिला प्रत्यक्ष भेटायची उत्सुकता होती. शेवटचं बाय म्हणून झाल्यावर त्याने लॅपटॉप बंद केला आणि मला उचलून बेडवर बसवलं.

"सेशन होतं?" माझ्या मांडीत डोकं ठेवत त्याने विचारलं.

"नाही, सहज गप्पा मारत होतो." मी त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाले.

"नक्की का?" त्याने माझ्या डोळ्यात बघत जरा निरीक्षण केलं. "काय झालंय?"

"काहीच नाही. हा टीशर्ट लै क्यूटाय रे.." मी विषय बदलून गालात हसत म्हटलं.

त्याने एकदा अंगातल्या ब्लॅक ड्राय फिट टीकडे पाहिलं आणि गोंधळून माझ्याकडे भुवया उंचावल्या.

"काढून दे ना मला!" मी ओठ चावत हसले.

"अस्काय, बघतोच तुला!" म्हणत तो उठला, टीशर्ट काढून माझ्या शेजारी टाकला आणि हात धरून त्याने मला जवळ ओढलं.

अब रुकने का वक्त है, पलो. सब ठीक होनेवाला है. बेनीचे शब्द माझ्या मनात तरळून गेले.

----------

हा हा म्हणता वीकेंड आला आणि शनिवारी सकाळी इव्हेंटवाल्यांची रेंज रोव्हर आम्हाला घेऊन निघाली. कपड्यांची मापं वगैरे आधीच देऊन त्याच्या स्टायलिस्टने मुंबईत कपडे तयार ठेवले होते. गाला डिनरसाठी शोभेल पण कोणाच्या नजरेत येणार नाही ह्या दोन कठीण गोष्टी लक्षात ठेऊन मी त्याने दाखवलेल्यातली एक साडी सिलेक्ट केली होती. पीच नेट साडीवर आयव्हरी टिकल्यांचे नाजूक डिझाईन होते आणि तसाच थोडा शिमरी पीच स्लीवलेस ब्लाऊज. खूप रंग उठून दिसणार नाही अशी साडी. पण तरीही सब्यासाची! माय गॉड!!

समर

मुंबईत पोचताच आम्ही आधी माझ्या स्टायलिस्टच्या फॅशन हाऊसमध्ये गेलो. जरा फ्रेश झाल्यावर त्याच्या असिस्टंटसनी आमचा ताबा घेतला. वेंडी त्याच्या घरी जाऊन येणार होता. दोन वेगळ्या खोल्यांमध्ये आमचं ड्रेस फिटिंग, पलोचा मेकअप वगैरे सुरू होतं. आतून त्यांची काहीतरी केस मोकळे ठेवायचे की बांधायचे वगैरे चर्चा ऐकू येत होती. मी तयार होऊन खुर्चीत बसलो आणि जयने पाठवलेल्या अर्जंट मेल्स वाचायला सुरुवात केली.

"समर?? आर यू रेडी?" आतून तिचा आवाज आला आणि दार उघडलं.

"तू हे घालणार आहेस?" तिने माझ्या वरचं बटन उघडं असलेल्या करकरीत व्हाईट शर्ट, ब्लॅक ट्रावझर्स आणि नेव्ही ब्लू स्पोर्ट्स कोटकडे बघत विचारलं.

"हम्म! मी टीमच्या युनिफॉर्ममध्ये नसतो तेव्हा स्पोर्ट्स कोट घालतो." मी हसत म्हणालो.

"यू लूक ग्रेट!" म्हणत तिने पुढे होऊन गोल फिरून तिची साडी दाखवली. ती बाहेर आली तेव्हाच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. पीच रंगाची चमचमती साडी तिच्या सगळ्या कर्व्हजना लपेटून बसली होती. केसांचा काहीतरी बन करून वर बांधला होता. मिनिमल मेकअप, डस्टी रोज लिपस्टिक, गळ्यात एक चोकर, लहानसे कानातले आणि मोठ्या गळ्यामुळे उघडी पाठ. ती एखाद्या चालत्या बोलत्या प्रिन्सेस सारखी दिसत होती. खिडकीतून येणाऱ्या उन्हात तिचे डोळे जास्तच मधाळ दिसत होते. तिने हसत कशी दिसतेय म्हणून भुवया उंचावल्या. एव्हाना बाकी सगळे लोक बाहेर निघून गेले होते.

मी पुढे होऊन तिला मिठीत घेतली. "यू आर सो ब्युटीफूल!"

"थँक्यू! मला वाटलं हा खूप फॉर्मल इव्हेंट आहे." तिने वर माझ्या डोळ्यात बघत विचारलं.

"आहे, पण मी इतके हेवी फॉर्मल सूट घालत नाही. धिस इज मेरावाला फॉर्मल!"

"आय लाईक इट. इट्स सो... यू!" ती हसत म्हणाली.

आम्ही होटेलच्या बँक्वेट हॉलकडे जायला बाहेर पडलो. गाडीतून वेंडीचा "हे गाइज ss" म्हणून आवाज आला. तो प्रॉपर सूट वगैरे घालून आधीच येऊन बसला होता. "आय सी, समर हॅज हिज टिपीकल सूट ऑन!"

"इट सूट्स हिम, है ना?" आत बसता बसता मला डोळा मारत पलो म्हणाली. आत बसून आम्ही पुढचा प्लॅन ठरवला. आधी वेंडी आणि पलो उतरून पुढे जातील. मग कार एक राऊंड मारुन येईल आणि मी उतरून आत जाईन. आम्ही आतच भेटू. मी तिचा हात दाबून मान हलवली. ती उतरून वेंडी बरोबर आत गेली. थोड्या वेळाने मी उतरून रेड कार्पेटवरून आत निघालो. "समर सरss समर सरss इधर लेफ्ट, राईट, सामने देखो सर ss असे नेहमीचे आवाज आणि फ्लॅशेस सुरू झाल्यावर मी त्यांच्याकडे बघून हात हलवला आणि पोझ देत थांबलो. "सर ss सर ss कश्मीरा मॅम कुठे आहेत?" गर्दीतून एकजण ओरडला. "हां, किधर है, कश्मीरा मॅम किधर है?" बाकीच्यांनी त्याची री ओढली.

मी फक्त हसून हात हलवला आणि भराभर चालत हॉटेलमध्ये निघालो. सिक्युरिटीच्या साखळीतून बँक्वेट हॉलमध्ये शिरलो तर समोरच्याच कोपऱ्यात घोरपडे पलो आणि वेंडीबरोबर बोलत होता. मला त्यांच्यामध्ये भिंत बनून उभं रहायची तीव्र इच्छा झाली. डोकं सटकलंच एकदम! पण राग कंट्रोल करत मी पुढे गेलो.

"अरे, आज कश्मीरा नाही?" मी दिसताच कोचने त्याचा आधीच सरळ असलेला टाय अजून सरळ करत अतीगोडपणे विचारलं.

"ती शूटमध्ये आहे. मी बोललो होतो तुम्हाला."

"अरे हो, तू बोलला होतास नाही का! अँड पलोमा शुअर लूक्स स्टनिंग टुडे!!" बोलताना त्याची  तिच्यावर वरपासून खालपर्यंत फिरणारी नजर मला अजिबात आवडली नाही. माझ्या हातांच्या मुठी वळल्या पण मी रिॲक्ट करणं टाळलं.

"हम्म राईट. आपण सीट्सकडे जाऊया का?" मी घसा साफ करत म्हणालो. कोच पुढे होऊन आम्हाला सीटस्कडे न्यायला लागल्यावर मी पलोचा हात थोपटला. मी मुद्दाम तिच्या आणि माझ्यामध्ये वेंडीला बसवलं आणि कोच माझ्या दुसऱ्या बाजूला. पलोबरोबर नजरानजर होताच ती समजून हसली. तिला कळलं, मी तिला प्रोटेक्ट करत होते.

मी आम्हाला प्रोटेक्ट करत होतो.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २४

"सो, पलोमा आणि वेंडेल, दोघांनीही मला सांगितलं की तू एकदम ट्रॅक वर आहेस, भारी काम करतोय म्हणून... आता वाटतंय, मी तुला आधीच तिकडे पाठवायला हवं होतं."

हाह! ह्याने मला पाठवलं?! हे कोल्हापूरला जायचं वगैरे मी ठरवलं होतं. पण कोचचं हे नेहमीचंच आहे. जे काही चांगलं होईल त्याचं लगेच क्रेडिट घ्यायचं आणि जे बिघडेल ते दुसऱ्याच्या डोक्यावर थोपायचं.

"येस. थिंग्ज आर गोइंग वेल."

"कश्मीरा तुला भेटायला कोल्हापूरला आली होती म्हणे. म्हणजे असं कानावर आलं!" ते खोटी सलगी दाखवत म्हणाले.

मी पलोकडे नजर टाकली, ती हसली. तिनेच हे बीज रोवलेलं दिसतंय, मीही हसलो.

"हो. कोल्हापूर तिच्यासाठी खूप स्लो आहे पण तरीही ती मला भेटायला आली म्हणून बरं वाटलं."

"मग आज कमबॅकची अनाउन्समेंट करणार काय? इट वूड बी ग्रेट प्रेस फॉर अस!"

"नोप! आजचा दिवस फक्त 'अंकूर' साठी आहे. मी लोकांच्या प्रेमाची परतफेड करतोय. हा कुठला पब्लिसिटी स्टंट नाहीय. आपण आधी डिस्कस केलं होतं, त्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर पंधरा दिवसांनी मीटिंग शेड्यूल केली आहे. जयसुद्धा मीटिंगमध्ये असेल. प्रॅक्टिस सुरू व्हायच्या काही दिवस आधी मी माझा डिसिजन सांगेन. आपलं हे बोलणं आधीही झालंय." मी राग ताब्यात ठेवत हळू आवाजात म्हणालो.

कोचने हात वर करून मान हलवली. "आय एम नॉट पूशींग यू. फक्त मला प्रेसमध्ये खळबळ करायची संधी दिसत होती, एवढंच."

हा माणूस इथे कशाला आलाय! हा चॅरिटी इव्हेंट आहे, कुठलं स्पोर्ट्स अवॉर्ड नव्हे. पण त्याला सगळ्या टीम्सना हा मेसेज द्यायचाय की आम्ही दोघे किती क्लोज आहोत. जरी आम्ही नसलो तरी! हा माणूस स्वत:च्या फायद्यासाठी पोटच्या पोरालाही विकेल.

"अरे, इधर है ss" पाठीमागून जस्सीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि लगेच माझ्या खांद्यावर त्याची थाप पडली. जसनूरसिंग बेदी, आमचा विकेटकीपर आणि खूप वर्षांपासून माझ्या लहान भावासारखा. "कैसे हो भाई?" त्याने पुढे येऊन मिठी मारत विचारले. "सब ठीक. आने के लिये थँक्स ब्रो!" मी हसत म्हणालो. मी त्याची पलोमाशी ओळख करून दिली. त्याने पुन्हा वळून माझ्याकडे बघितले. "ओ थँक्यू वाहे गुरुजी, मैं अकेला सेमी फॉर्मल मे नहीं हूं! और मुझे तो अवॉर्ड भी नहीं मिल रहा, बच गया!" तो खळखळून हसत म्हणाला.

"बस क्या भाई, पॉसिबल होता तो हम यहाँ भी शॉर्ट्स मे आ जाते!" मी हसतच म्हणालो.

"ओहोss तो ये रहे हमारे स्पोर्ट्स फिलांथ्रोपिस्ट ऑफ द यर.." म्हणत पलीकडून जाडू आला. नमन जडेजा, जाडू म्हटलं तरी तो सगळ्यात फिट ओपनिंग बॅटसमन आहे. त्याच्याबरोबर परफेक्ट फिरकी आणि गुगली टाकणारा इम्रान पटेल आणि दुसरा फास्ट बोलर अंशुमन पांडे. इम्बा आणि पांडेजी. तिघांनी येऊन एक ग्रुप झप्पीशप्पी कार्यक्रम झाला. आम्ही फिल्डवर कितीही टफ आणि निर्दयी वाटलो तरी हे सगळे माझ्या भावासारखे होते आणि आम्ही ते लपवतही नव्हतो. वेंडीने त्यांची पलोमाशी ओळख करून दिली. ती माझी आहे हे त्यांना न सांगणं मला जरा कठीणच गेलं. त्यात इम्बा आणि पांडेजी म्हणजे एक नंबर फ्लर्ट, जरा चान्स सोडणार नाहीत. होपफुली, पुढच्या एक दोन महिन्यातच आम्हाला काही लपवायची गरज पडणार नाही.

पांडे तिच्याशी जाम फ्लर्ट करत होता आणि तिने माझ्याकडे डोळे मोठे करून बघितल्यावर प्रत्येक वेळी मी हसत होतो.

"पलोमा इथेच, ओबेरॉयमध्ये रहाणार आहे?" कोच ने विचारले. मी खुर्चीत मागे टेकून त्याच्याकडे पाहिले.

"हो आणि उद्या आम्ही परत जाणार आहोत. मला घरी जाऊन सगळं ठीक आहे ना, ते चेक करायचं आहे. वेंडी त्याच्या फॅमिली बरोबर दोन दिवस थांबणार आहे." मला घर वगैरे चेक करायची काही गरज नव्हती. माझी मेड येऊन सगळी साफसफाई आणि मेंटेनन्स व्यवस्थित करत होती. पण मला पलोमाबरोबर थांबायचं होतं. तिला माझं घर, माझं आयुष्य दाखवून पटवायचं होतं की तिला इथे रहायला आवडेल.

"ऑफ कोर्स! जस्ट चेकींग. तुम्ही तिघं एकमेकांबरोबर चांगले जेल झालेले दिसताय."

"हो." मी मुद्दाम संभाषण तोडत म्हणालो. हा नक्कीच काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न होता कारण हा माणूस किती वाकडा विचार करू शकतो, ते मी जाणून आहे.

सुदैवाने, तेवढ्यात सूत्रसंचालक स्टेजवर आले. त्यांनी सुरुवातीला 'DoNation Award' मिळवणाऱ्या, अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचा परिचय आणि त्यांनी ज्या कामासाठी डोनेशन्स दिली आहेत त्या कामाविषयी थोडक्यात सांगून प्रत्येकाचे आभार मानले. एकामागून एक खूप पुरस्कार दिले गेले. पलोमा प्रत्येकासाठी टाळ्या वाजवताना मी बघत होतो. माझे टीममेट्स तिच्या आजूबाजूला बसून गप्पा, जोक मारत, फ्लर्ट करत असताना बघत होतो.

पण जेव्हाही आमची नजरानजर झाली, मला ती फक्त माझी आहे हे समजत होतं.
ती कायमच होती!

अर्धे पुरस्कार देऊन झाल्यावर अर्धा तास टी ब्रेक झाला. सगळीकडे सनईचे सूर पसरले. चहा, कॉफी सर्व्ह होत होती. कोच माझ्याबरोबर दोन चार फोटो काढून कुणाची तरी चाटूगिरी करायला गेला, तेवढ्यात जय धावतपळत आला. मी उठून उभा राहिलो. "सॉरी बॉस, मुझे आने मे लेट हुआ! ससूरजी को हार्ट पेन हुआ तो ॲडमिट करने गये थे."

"ओह, फिर आने की जरूरत नहीं थी. हाऊ 'ज ही नाव?"

"नो वरीज, अभी स्टेबल है. मैं पीछे बैठा था, सब टीम यही थी." तो किंचित हसत म्हणाला.

"अभी भी जाना होगा तो जाव.." मी त्याच्या पाठीवर थोपटत म्हणालो.

"रुकता हूं, अभी और एक - दो घंटे तो है." म्हणून हात मिळवून तो पुन्हा मागे जाऊन बसला.

मी पुन्हा खुर्चीत बसल्यावर शेजारून जस्सी माझ्याकडे वाकला. "यू लूक गुड, ब्रो! और मैं सोच रहा हूं, पलोमाका इसमे कुछ तो लेना-देना है! है की नहीं?" त्याने भुवया उडवत विचारले. "तुम उसकी तरफ जैसे देख रहे हो, मुझे साफ नजर आ रहा है भाई! वो अपने दोनो हंक बोलर्ससे जरा भी मूव्ह नहीं हो रही, धिस इज रिअली समथिंग!"

मी मान वळवून कोच जवळ कुठे नाही ना हे बघून घेतलं. "ये सिर्फ हमारे बीच रखो, ओके?" मी त्याच्या जवळ जात हळूच म्हणालो.

"अरे, बेफिकर रहो भाय! वैसे इन दोनोंको फेल होते देख, बडा मजा आ रहा है! भाब्बी है अपणी, उसे ठीक से प्रोटेक्ट कर, ओके?"

"ॲब्सल्युटली!" जस्सीवर माझा जिवापेक्षा जास्त विश्वास होता. त्याला मी टीममध्ये परत येण्याचा विचार करतो आहे हे माहीत होतं. आम्ही खूपदा फोनवर बोलतही होतो आणि जस्सी टीममध्ये असणं हासुद्धा मी परत येण्याचा फॅक्टर होता.

ब्रेक संपून स्टेजवरची मंडळी परत आली. कोच परत माझ्या शेजारी येऊन बसला. परत काही पुरस्कार दिले गेले आणि सगळ्यात शेवटी मुख्य पुरस्कार माझ्यासाठी होता. माझं नाव पुकारताना त्यांनी गरजेपेक्षा खूप जास्तच कौतुक केलं. मी माझा वेळ आणि पैसे देऊन मुलांसाठी हे काम कौतुक ऐकण्यासाठी करत नव्हतो. मी करत आहे कारण मी करू शकतो! माझ्या नशिबाने मला चांगलं घर मिळालं, कधी काही कमी पडलं नाही. माझ्या चांगल्या सुरू असलेल्या करिअरमुळे, मला कमनशिबी मुलांसाठी ही परतफेड करायची संधी मिळाली.

टाळ्यांच्या गजरात मी उठून उभा राहिलो. पलोकडे बघून हसलो आणि स्टेजकडे निघालो. मी मुद्दाम काही भाषण वगैरे लिहून आणलं नव्हतं कारण ह्या कामाबद्दल मी मनापासून खूप काही बोलू शकतो.

DoNation इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मुंबईचे चॅरिटी कमिशनर यांनी मिळून मला 'स्पोर्ट्स फिलांथ्रोपिस्ट ऑफ द यर' पुरस्कार प्रदान केला.

पोडियमवर उभा राहिल्यावर माझं फक्त एका व्यक्तीकडे लक्ष होतं. पण प्रयत्न करून मी ते हटवलं आणि जमलेल्या सगळ्या लोकांवरून नजर फिरवली.

"Good evening, ladies and gentlemen. I accept this DoNation India Award with a deep sense of gratitude, humility and responsibility."

मी बोलायला सुरुवात केली. मंचावरच्या सगळ्यांचे आभार मानून झाल्यावर मी माझ्या प्रोजेक्टची माहिती देऊ लागलो.

"During lockdown, this idea came to me. Cause I read somewhere, that it was the dark period for everybody but especially for the children stuck into abusive homes and families. I can't imagine how their young bodies and minds survived in those closed spaces. That was the starting point of 'Ankur Academy.'

It's a charitable trust formed by me along with some friends and family. At present we are starting two academies at Mumbai and Kolhapur for the children who have suffered from any mental or physical trauma and abuse. They can stay, have meals and after school, learn to play any outdoor sport like football or cricket.

Childhood trauma has a lasting negative effect on health, social and personal behavior. Through this academy, we hope to give an outlet to that ball of energy, self expression and it can keep them on the right path.

The Mumbai centre is up and running since last year and preparations are going on at Kolhapur.

I have been fortunate in my life and I don't take any of this for granted. There is nothing as rewarding as knowing that you are impacting lives, right? Especially kids! So, I want to thank all the friends and well wishers for supporting me on this journey."

मी बोलणं थांबवताच समोरून एक माणूस ओरडला. "अँड आर यू कमिंग बॅक टू प्ले फॉर मुंबई?"

मी किंचित हसलो. "I haven't made any decision yet, but I promise to let you know soon!"

तो खाली बसल्यावर मी पुन्हा बोलू लागलो. " Back to the reason we are all here. Give back to the society, where you can. Give your time, give your money, give your energy. It matters! Kindness cannot be quarantined! Thanks again!" मी हातातली ट्रॉफी उंचावून हसलो. लोक उभे राहून टाळ्या वाजवू लागले.

सेलिब्रिटी असण्याचा हा भाग मला आवडतो. चांगल्या लोकांच्यात मिसळणे आणि चांगली कामे करता येणे.

परत माझ्या सीटकडे जाताना कोचकडे एक कटाक्ष टाकला. अपेक्षेप्रमाणे तो इरीटेट झालाच होता. त्याचं नाव न घेतल्यामुळे तो जबरदस्त वैतागला असणार.

तो किंग ऑफ सेल्फ प्रमोशन आहे. प्रत्येक प्लेअरने बोलताना त्याचं कौतुक केलंच पाहिजे असा अलिखित नियम आहे. पण माझ्या ह्या जर्नीमध्ये त्याचा काहीएक संबंध नव्हता. त्याचा संबंध असलेल्या जागी जाण्याबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीत आहे. इतक्या आठवड्यानी मला कळतंय की माझं क्रिकेटवरचं प्रेम कमी झालं नाहीय, तर हा माणूस मला किंवा कोणालाच खेळायला इंस्पायर करत नाहीय. त्याच्यासाठी खेळून मी थकलो होतो. त्याच्याकडे ॲथलीट्सना खेळात आणण्याचं गिफ्ट होतं पण त्याने इतक्या वर्षात त्या गिफ्टचा पार चुथडा केला होता.

"Congrats!" म्हणत त्याने खोटं हसत माझ्या पाठीवर थाप मारली. "डिनरसाठी थांबत नाही, बाहेर एक अपॉइंटमेंट आहे. आय विल बी इन टच. लूकिंग फॉरवर्ड टू सी यू इन मुंबई सून."

हम्म्, परत यायचं रिमायंडर! तेवढ्यात त्याने पलोमाकडे वळून हात पुढे केला. "आय वूड लाईक टू टॉक टू यू सून, अबाऊट अ पॉसिबल फ्यूचर विथ द इंडियन्स!" हँडशेक करता करता तो म्हणाला.

पलोमाचा अख्खा चेहरा आनंदाने फुलून आला. "दॅट वूड बी अमेझिंग. थँक्यू!"

कोच गेला आणि माझ्या खांद्यावरचं ओझं उतरलं. वेंडीने आश्चर्याने माझ्याकडे बघितले. मी काय माहित! अशी मान हलवली. गाला डिनर, ओळखीपाळखी, स्मॉल टॉक्स वगैरे संपल्यावर वेंडी निरोप घ्यायला आला. "थॅन्क्स फॉर बीइंग देअर.." मी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटलं. "एनी टाईम!" म्हणून तो घरी निघाला. जय आणि त्याची टीम येऊन भेटून गेली. मला मिळालेली भलीमोठी ट्रॉफी ड्रायव्हरने आधीच गाडीत नेऊन ठेवली होती.

इव्हेंट संपल्यावर होटेलच्या बारमध्ये मी, पलोमा आणि बाकी टीममेटस गप्पा मारत बसलो. त्यांना पलो आणि माझ्यातलं कनेक्शन लक्षात आलं असेल, पण ते माझी फॅमिली आहेत. मी सांगितल्याशिवाय कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून बाहेर जाणार नाही याची मला खात्री आहे.

बऱ्याच वेळाने ते एकेक करत निघून गेले आणि शेवटी आम्ही दोघंच उरलो. मी इतका वेळ हातात घोळवत ठेवलेला डर्टी मार्टिनीचा ग्लास संपवला. "आय वॉन्ट यू आऊट ऑफ दॅट साडी, पलो.." मी तिच्या कानात कुजबुजलो.

"Yeah?" तिने एका श्वासात विचारलं.

"Yeah!"

"यू वर गुड टूनाइट! आय एम रिअली प्राऊड ऑफ यू."

तिच्या कौतुकाने माझी छाती फुगली. "थॅन्क्स, दॅट मीन्स अ लॉट."

"तू मला ट्रस्टबद्दल एवढं सगळं डिटेल सांगितलं नाहीस."

"सांगायला योग्य वेळ शोधत होतो.."

"हम्म. कोणाचं लक्ष वेधून न घेता इथून कसे सटकणार आहोत आपण?"

"तुझ्या रूमची किल्ली माझ्याकडे आहे." मी ड्रायव्हरला पार्किंगमधून कार गेटपाशी आणण्याचा मेसेज टाईप करता करता म्हणालो. "तशी काही भीती नाही पण प्रिकॉशन म्हणून तू आधी जा. ड्रायव्हर गेटपाशी गाडी आणतोय. तू पटकन कारमध्ये बस मग पाच मिनिटांनी मी येतो. त्याला वळवून कॉर्नरपाशी थांबायला सांग."

"तू असा कट वगैरे रचताना जाम सेक्सी दिसतोस!" ती हसत ओठ चावत म्हणाली.

"तुझ्यासाठी मी दिवसभर कट रचू शकतो!" मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. त्यातला अर्थ समजून ती लाजली.

"हॅव अ गुड नाईट, मिस्टर सावंत!" ती पर्स उचलून निघाली.

"तोच प्लॅन आहे, मिस फुलसुंदर!" मी डोळा मारला.

ती दाराबाहेर पडली. किती माणसांच्या नजरा तिच्याकडे वळल्या, ते माझ्या नजरेने टिपलं. ती किती सुंदर दिसत होती याची तिला जाणीवही नव्हती. पण मला फक्त ती माझी आहे एवढंच मॅटर करतं. कायमच.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २५

पलोमा

घरी पोहोचेपर्यंत बोलता बोलता मी समरच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि एकदम झोपच लागली. जुहूच्या त्याच्या बे व्ह्यू अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरल्यावर त्याने मला हलकेच जागं केलं. आम्ही लॉबीच्या दरवाजासमोर उतरलो आणि ड्रायव्हर कार पार्किंगमध्ये घेऊन गेला. तेवीस मजल्यांच्या त्या बिल्डिंगची लॉबीसुद्धा मार्बलने मढवलेली आणि सगळीकडे दिव्यांचे झोत सोडल्यामुळे चकाकत होती.

समरने एका छोट्या पॅनलसमोर चेहरा दाखवून लिफ्टचा दरवाजा उघडला. लिफ्टला तीनच बटन्स होती. 23, -3-पार्किंग आणि लॉबी. "ओह, प्रायव्हेट लिफ्ट?" मी आपसूक विचारलं. तो जरा हसला. "हम्म, इथे जास्त प्रायव्हसीची गरज पडते. सेलिब्रिटी लाईफचे तोटे! म्हणूनच कोल्हापूरला आल्यावर एकदम रिलॅक्स वाटतं. बिंधास कुठेही फिरता येतं." टॉप फ्लोरवर त्याचं 4 BHK पेंटहाऊस होतं. लिफ्ट उघडताच आम्ही त्याच्या भल्यामोठ्या लिव्हिंग रूममध्ये पाय ठेवला.

डावीकडची अख्खी भिंत फ्लोअर टू सीलिंग काचेची होती. पडदे उघडून बाजूला केलेले होते आणि समोर चंद्रप्रकाशात चमकणारा समुद्र दूरवर पसरलेला दिसत होता. काळ्या पाण्यावरच्या होड्यांचे बारीक बारीक दिवे काजव्यांसारखे टिमटिमत होते. "सकाळी जाग येताच हे बघायला किती भारी वाटत असेल.. अर्थात आपल्या कोल्हापूरचा व्ह्यू काय कमी नाही!" मी हसत त्याच्याकडे वळून म्हणाले. "माझा विश्वासच बसत नाहीये की हे तुझं घर आहे! इट्स ब्युटीफूल!!"

त्याने माझा हात हातात घेतला. "मी कुठे राहतो ते फायनली तू बघायला आलीस, म्हणून मला बरं वाटतंय."

"दिवसा हे अजून सुंदर दिसत असेल."

"हम्म. चल, तुला बाकी घर दाखवतो." म्हणून तो हात धरून मला आत घेऊन निघाला. खूप मोठी जागा होती. मी ते मॉडर्न, स्लीक किचन बघून जरा थांबले. व्हाईट मार्बलचे काऊंटर्स, ग्रे कॅबिनेटस, साताठ जण बसतील एवढं भलंमोठं आयलंड, त्यावर टांगलेले स्टायलिश लाइट्स... तिथून निघाल्यावर त्याने मला त्याचं स्टेट ऑफ द आर्ट होम जिम दाखवलं. दोन गेस्ट बेडरूम आणि एक त्याची बेडरूम. भिंतींवरची मोठमोठी ॲबस्ट्रॅक्ट पेंटींग्ज, एक दोन हिरवी झाडं सोडता सगळीकडे ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट. सगळं खूप मॉडर्न, खूप ग्लॉसी!

"हे घर तू नक्की डेकोरेट केलेलं नाहीय, है ना? इथे 'तू' अजिबात दिसत नाहीस." मी बेडवर बसून म्हणाले.

"हा बिल्डरचा शो फ्लॅट होता आणि फर्निचरसकट होता तसा मी विकत घेतला. वेळच नव्हता काही विचार करायला." तो शेजारी बसत म्हणाला.

"आपल्या दोघांची वेगळी दोन आयुष्य आहेत, एकमेकांना माहीत नसलेली. हे किती वीअर्ड वाटतंय ना?" मी त्याचा हात हातात घेत म्हणाले.

"पलो ऐक, तू माझा पास्ट आहेस आणि फ्यूचरपण! प्रेझेंटशी कॅचअप करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीय. मला तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, आत्ताच्या तुला जास्तीत जास्त समजून घ्यायचंय." तो माझ्या हातावर थोपटत म्हणाला.

"मग तू लकी आहेस, कारण तुला खूप प्रयत्न नाही करावा लागणार. कोल्हापूरला येताना मी मुंबईतला रेंटल फ्लॅट सोडला होता. बाय द वे, गेली दोन वर्ष, मी बोरिवलीला रहात होते. सो, सध्या कोल्हापूरचं घर, माझं एकमेव घर आहे." मी हसले." पण तुला दिल्लीला घेऊन जायला, माझी युनिव्हर्सिटी, माझी आवडती ठिकाणं दाखवायला मला खूप आवडेल."

त्याने हसून मान हलवली. "आपल्याला आधी रिलॅक्स व्हायची गरज आहे." म्हणत त्याने कपडे काढून एक टीशर्ट आणि शॉर्ट्स घातल्या. मीही साडीमधून मुक्त होऊन त्याचा एक टीशर्ट अडकवून बाथरूममध्ये शिरले. केसांतल्या पिना काढून केस मोकळे सोडले आणि सगळा मेकअप बेबी ऑइलने पुसून काढला. मी बाहेर आले तेव्हाच तो हातात कॉफी मग्ज ठेवलेला ट्रे घेऊन दारातून आत येत होता. "माईंड रीडिंग कुठे शिकलास रे!" मी खूष होत म्हणाले. त्याने टीशर्टला नसलेली कॉलर ताठ केली. आम्ही मांडी घालून समोरासमोर बसलो. "समर, तू ट्रस्टचा विचार कसा काय केलास? तू खूप मनापासून बोलत होतास.. आय मीन, तुझ्या ओळखीत असं कोणी मूल आहे का? इट सीम्ड अ बिट पर्सनल, म्हणजे मला तरी असं वाटलं." मी कॉफीचा घोट घेत सहज विचारलं.

माझ्याकडे बघता बघता त्याचे डोळे गढुळले. कपाळावर आठ्या आल्या. हातातला मग ट्रेमध्ये ठेवताना थोडा हिंदकळून सांडलाच. "माझा बाप!" नकळत त्याच्या मुठी वळल्या होत्या. मला धक्काच बसला.

मी आ वासून त्याच्याकडे बघताना तो पुढे बोलू लागला. "पप्पा नाही. माझा खरा बाप! तू म्हणालीस ना आपली वेगळी आयुष्य आहेत, हे माझं अजून एक आयुष्य आहे जे बाहेर कुणालाच माहीत नाही." तो माझ्यामागच्या काचेतून दूरवर उसळणाऱ्या लाटांकडे बघत बोलत होता. " माझे वडील सुरेंद्र काळे, सिंधुदूर्गातल्या एका गावात तलाठी होते. माझी आई तिथेच झेडपीच्या शाळेत शिक्षिका म्हणून जॉईन झाली. आई गगनबावड्याची. लहान गाव, वस्ती कमी. रोज एकमेकांना बघता बघता ते प्रेमात पडले आणि लग्न केलं. ते ब्राम्हण, आई मराठा, त्या काळाप्रमाणे घरच्यांचा विरोध वगैरे. लगेच एक दोन वर्षात माझा जन्म झाला.

सुरुवातीला सगळं चांगलं सुरू होतं मग हळूहळू त्यांना गावातली वाईट संगत लागली, जुगार, दारू त्यासाठी लागणारे पैसे, ते मिळवण्यासाठी आणखी आणखी भ्रष्टाचार हे नेहमीचं झालं. हळूहळू सगळ्याची भडास आईवर आणि माझ्यावर निघायला लागली. रोज संध्याकाळ झाली की आम्ही घाबरून थरथरत असायचो. दिवसा माझ्याशी प्रेमळ असणारा बाप, रात्री दारू पिऊन आला की आईवर नाही नाही ते संशय घेऊन शिव्या देत, तिला बडव बडव बडवायचा. मी मध्ये आलो तर मलाही हाणायचा.
आई आणि मी कायम शाळेत आमच्या जखमा लपवत असायचो. मी तर तेव्हा फक्त दुसरीत होतो आणि समजायला लागल्यापासून हेच पहात होतो. सकाळी गालावर उमटलेली बोटं, सुजलेली पाठ बघून बाप कॅडबरी द्यायचा आणि इतकं होऊनसुद्धा मी कॅडबरी खात त्याला पापी द्यायचो." तो विषादाने हसला.

माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मी फक्त डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होते.

"तो संपूर्ण काळ माझ्या आत फक्त राग भरलेला होता आणि त्या रागाचं काय करायचं ते समजत नव्हतं. जून महिना होता, शाळा नुकतीच सुरू झाली होती. व्यसनापायी घरात पैसे नसणं आणि भांडणं, शिव्या, मारहाण सुरूच होती. त्यातच आई पुन्हा प्रेग्नंट होती. मी संध्याकाळी शाळेतून आलो तेव्हा सगळीकडे आभाळ भरून आलं होतं. मला आईने पटापट वरणभात खायला सांगितला आणि बाहेर खेळायला जा, अजिबात लवकर घरी येऊ नको म्हणून सांगितलं. तिला काहीतरी कुणकुण लागली होती. मी जायला तयार नसतानाही तिने ढकलूनच मला बाहेर पाठवलं.

मी समुद्राच्या दिशेने चालत राहिलो. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. मी समुद्रावर पोचलो आणि पावसाची जोरदार सर आली. मी पाऊस झेलत, ओल्याचिप्प वाळूत काटकीने रेघा ओढत फिरत राहिलो. काळोखात उधाणाचं लाल पाणी समोर उसळत होतं. किती वेळ गेला काय माहीत.. समोरून एक होडीवाला लडखडत माझ्याकडे येताना दिसला, तेव्हा घाबरून मी घराच्या दिशेला पळालो. घराबाहेर पोचलो तेव्हा गर्दी जमली होती. लोक कुजबुज करत होते. गावातला पोलीस पाटील वहीत काहीतरी लिहीत होता. शेजारच्या एका काकीने मला बघताच धरून ठेवलं पण मी तिला झिडकारून घरात पळालो. पंख्याला साडीचा फास घेऊन लटकलेल्या माझ्या बापाचं प्रेत दोन जण खाली उतरवत होते. शेजारी माझी आई रक्ताच्या थारोळ्यात भिंतीला टेकून बसली होती. एक नर्स तिच्या हाताला बँडेज करत होती. बापाने तिच्या दोन्ही हातांच्या नसा कापल्या होत्या. मी थिजून उभा होतो, काय करावं हेच माझ्या छोट्याश्या मेंदूला सुचत नव्हतं. त्या रात्री काय झालं मला काहीच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी पोलिसाने मला आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या पोटातलं बाळ आधीच गेलं होतं पण नशिबाने ती जिवंत होती. नंतर मोठा झाल्यावर कधीतरी आईने मला सांगितलं. त्या दिवशी बाबांना नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि घरी येऊन ते आमच्यावर सगळा राग काढतील याची तिला कल्पना होती. त्याप्रमाणे तिला मारुन त्यांनी दारूच्या तारेतच स्वतःला फास लावून घेतला. त्यानंतर आईलाच दोषी मानून कोर्टात केस सुरू झाली पण पुरावे नसल्यामुळे ती वाचली. पण गावात बदनामी इतकी झाली होती की तिथे राहणं शक्यच नव्हतं. मग तिने कोल्हापूरला बदली करून घेतली, तिचं माहेर लग्नामुळे आधीच तुटलं होतं.

तिथं येऊन ती झेडपीची नोकरी आणि थोडंफार पार्लरचं काम करायला लागली. म्हणजे असंच बारीकसारीक आयब्रो, मेकअप, मेहंदी, साडी नेसवणे वगैरे. तिसरीत मी कोल्हापूरच्या शाळेत आलो. पार्लरमुळे तिची पद्माआत्याशी ओळख झाली.  पप्पांची पहिली बायको दोन वर्षांपूर्वी मुलासह बाळंतपणात वारली होती. आत्याला दोघांची माहिती होती, तिने आईला विचारलं आणि लग्न झालं.

पप्पा पहिल्या दिवसापासून माझे एकदम घट्ट मित्र झाले. त्यांनी बाळंतपणाची इतकी धास्ती घेतली होती की दुसरं मुल त्यांना नकोच होतं. मीच त्यांचा खरा मुलगा असल्यासारखं मला वाढवलं. माझ्या मनावर झालेले आघात, भरून राहिलेला राग त्यांना कळत होता. मिरजच्या एका डॉक्टरांना आम्ही दोन तीनदा भेटून आलो. त्या काळी काय असे थेरपिस्ट वगैरे नव्हते कोल्हापुरात, तर त्यांना समजलं ते त्यांनी आर्मी स्टाईल करून टाकलं. मला फुटबॉलच्या क्लासला घातलं! अंगातली रग जिरली की डोकं शांत होईल म्हणून." त्याचे ओठ थरथरत होते आणि डोळे काठोकाठ भरून आता ओघळायला लागले होते. मी स्वत:चे डोळे पुसत पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि डोकं थोपटत राहिले.

आता मला एकेका गोष्टीची लिंक लागत होती. चौथीच्या आधीची त्याची कुठलीच गोष्ट माहीत नसणं, त्याच्या दिसण्यातला आईपप्पांहून वेगळेपणा, त्याचे अँगर इश्यूज, मॅचेसमध्ये फोकस कमी होणं, रिलेशनशिप्स न टिकवता येणं, सेक्समध्ये गुंतून मनातले विचार विसरायचा प्रयत्न, नशिबाने त्याने व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे नाहीतर कठीण होतं.

तो थोडा शांत झाल्यावर मिठी सोडवून मी त्याचे हात धरून बसले. "कोरोनाच्या पहिल्या लाटेत आई पप्पा दोघेही ॲडमिट होते. ते बरे झाले पण आईचं हार्ट एन्लार्ज झालंय. आम्ही डाएट, औषध सगळी काळजी घेतो पण काहीही होऊ शकतं. मला तेव्हापासून खूप इन्सिक्युरिटी, अँग्झायटी वाटते. वाईट स्वप्न पडतात, कधी फिल्डवर पॅनिक अटॅक येतात... भीती वाटते की माझ्या डीएनएमध्ये बाबांचा जास्त वाटा असेल तर काय... मी हा भूतकाळ इतकी वर्ष कधीच ओठावर आणला नाही, ना घरात आम्ही काही बोलत."

मी घशात दाटलेला आवंढा गिळला. "मला इतके दिवस, एवढं बोलूनसुद्धा तुझ्यात काहीतरी कमी जाणवत होतं पण बोट ठेवता येत नव्हतं. तुला चाईल्डहूड ट्रॉमा होताच, तो खूप वेळ गेल्यामुळे हळूहळू कमी झाला पण तो सप्रेस करून ठेवल्यामुळे जी PTSD तयार झाली, ती आता तू थोडा व्हल्नरेबल झाल्यावर डोकं वर काढतेय. धिस इज माय ॲनालिसिस." मी एक खोल श्वास घेतला. " बघ, काहीही त्रास झाला तर आपलं मन आणि शरीर त्यातून बरं होण्याचा प्रयत्न करत असतं. मनाचे तीन रिस्पॉन्स असतात, फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. लहानपणीचे त्रास मन शक्यतो फ्रीज करून ठेवते. डीसोसिएटिव ॲम्नेशिया, म्हणजे त्या ठराविक त्रासदायक आठवणी विसरून जाणं, दाबून ठेवणं हे होतं. कधी कधी लोक त्यांच्या आयुष्यातील वर्षच्या वर्ष विसरतात. हा बॉडीचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण त्या आठवणी विसरल्या तरी त्याचा शरीरावर, मनावर परिणाम होतोच. तरुणपणी भरपूर प्रकारच्या सोशल, सायकॉलॉजीकल आणि फिजीकल हेल्थ कंडिशन्स होऊ शकतात.

"ह्याच्यावर काही उपाय आहे, की?" त्याने दुःखी डोळ्यांनी माझ्याकडे बघत विचारलं.

"ऑफकोर्स उपाय आहे. मी आहे ना! बऱ्याच थेरपी आहेत ज्या वापरून आपण तुझ्या सप्रेस्ड मेमरीजवर काम करू. काही माईंड एक्सरसायझेस आहेत, ते करावे लागतील. ह्या सगळ्याला खूप वेळ लागेल, कदाचित काही वर्ष लागतील पण तुला बरं नक्की वाटेल. तसाही तू आत्ता खेळायला फिट आहेसच.." मी त्याच्या कपाळाला कपाळ टेकत श्वास सोडला.

त्यानंतर आम्ही एकमेकांना गोष्टी सांगतच राहिलो. लहानपण, त्याचे अनुभव, माझे अनुभव... पुन्हा आम्ही चौथीतले समर पलोमा झालो. रात्रभर बाकी काही न करता फक्त रडत, हसत, पुन्हा रडत मी त्याला कुशीत घेऊन सूर्य उगवताना कधीतरी झोपले.

------

तरीही तासाभरात जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने माझा खांदा भिजला होता आणि तो कोपर टेकून, तळहातावर डोकं ठेवून माझ्याकडे बघत होता. "पलो, एकदा सगळं नीट ठरलं आणि आपल्याला कोचपासून लपायची गरज नसेल तेव्हा आपण मुंबईत खूप फिरू, मी तुला सगळीकडे घेऊन जाईन पण आज इथे फिरणं आणि ते लपवणं शक्य नाही. सो, चल दिल्लीला जाऊया!"

"काय?" मी उठून डोळे चोळत त्याच्याकडे बघितलं.

"बघ, दिल्लीत मास्क आणि कॅप घालून फिरलो तर मला फार कोणी ओळखणार नाही. तू मला DU आणि तुझ्या सगळया आवडत्या जागा दाखवू शकतेस. तू कुठे होतीस, तुझं स्वप्न पूर्ण करायला कुठे गेलीस ते सगळं बघायचंय मला." तो हसत म्हणाला.

"सिरीयसली म्हणतोयस?" माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.

"कालच्या भल्यामोठ्या सेशननंतर, वी डिझर्व अ ब्रेक. उठ, उठ आवरायला घे, दोन तासात फ्लाईट आहे."

"पण मी कपडे, बॅग काहीच नाही आणलं.." मी चक्रावून म्हणाले.

"दिल्लीत दुकानं असतात.. आय थिंक!" तो हसता हसता म्हणाला.

"मॅss डेस तू!" मी गळ्यात हात टाकून त्याला किस करत म्हणाले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २६

दिल्ली माझ्या आवडत्या शहरांपैकी एक आहे. कितीही मुलींसाठी अनसेफ वगैरे म्हटलं तरीही. इथे रहायच्या आधीपासून मला दिल्ली आवडत होती. मी सातवीत असताना आईच्या भिशी ग्रुपबरोबर दिल्ली, आग्रा फिरायला आले होते. एकत्र अशी आमची एकुलती एक व्हेकेशन. जाईजुई लहान आणि दिदीचा कसलातरी क्लास होता, म्हणून मी एकटीच आईबरोबर होते. नंतरच्या वर्षांमध्ये हळूहळू आईची तब्येत खराबच होत गेली. पण काय मजा आली होती त्या ट्रिपमध्ये! रेल्वेचा प्रवास, सगळ्या बायकांची बडबड आणि त्यांच्या मुलांचा गोंधळ, ताजमहालाच्या घुमटाचे टोक चिमटीत धरून काढलेले फोटो, भसाभस पेठे खाऊन, सरसोंच्या तेलातल्या भाज्या खाऊन दुखलेली पोटं, पोरांची भांडणं, सरोजिनी नगरमधली स्वस्तात मस्त शॉपिंग... धमाल एकदम! तेव्हाच मी ठरवलं होतं, इथे कधीतरी रहायला यायचं आणि नंतर जेव्हा खरंच राहिले तेव्हा तो काळ अगदी मनावर कोरला गेलाय.

आज समरबरोबर इथे असणं जास्त स्पेशल होतं कारण इथे असतानाच मी त्याला सगळ्यात जास्त मिस केलं होतं. माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर आवडत्या जागा फिरण्यात वेगळंच थ्रिल आहे. टूरिस्टी जागा नाही आणि इथलं माझं रोजचं आयुष्य त्याला दाखवायचं एवढंच ठरलं होतं. दिल्ली एअरपोर्टवर उतरताच मी समरचा हात धरून भराभर चालायला लागले. "हे, ऊबर करूया ना?" तो गडबडून म्हणाला.

"च्यक, तुला मी इथे कशी होते ते बघायचं आहे ना? लेट्स डू इट माय वे! आपण ऑरेंज लाईनने चाललोय आणि मग ती बदलून यलो लाईनवर जाऊ!" मी घाईघाईत चालताना म्हणाले. त्याचा कोड्यात पडलेला चेहरा बघून हसले. "दिल्ली मेट्रो, यडू!!" सबवेतून चालताना समोर हात करून मी तिकीट काऊंटर दाखवला.

ऑब्वीअसली, अजूनपर्यंत तो भारतातल्या कुठल्याच मेट्रोत बसला नव्हता. वीकडेची दुपार असल्यामुळे गर्दी कमी होती. आम्ही दोघेही जीन्स टीशर्टमध्ये आणि त्याने मास्क, कॅप घातल्यामुळे तसं कोणी ओळखत नव्हतं, त्यामुळे मजेत मोकळं फिरता येत होतं. आम्हाला बसायला जागा मिळाली आणि मी त्याला मेट्रोची माहिती, प्रवासातले माझे अनुभव सांगत बडबडत राहिले. विश्वविद्यालय मेट्रो स्टेशनवर उतरून आम्ही सरळ DLF प्रॉमिनेडमध्ये गेलो. दोघांना दोन सॅक घेऊन दोन जोडी कपडे आणि इनर्स उचलले आणि बाहेर आलो.

एव्हाना भुका लागल्या होत्या पण मला त्याला कुठल्या महागड्या रेस्टॉरंटऐवजी माझ्या नेहमीच्या ठिकाणी न्यायचं होतं. हडसन लेन! DU नॉर्थ कॅम्पसवर राहणाऱ्या सगळ्या स्टूडंटसची चिल करायला गो टू प्लेस. त्या पूर्ण रस्त्यावर तसे खूप कूल कॅफे आणि रेस्त्राँटस आहेत पण मी आणि बेनी पडीक असायचो ते बिग मिस्टेकमध्ये! समरचा हात धरून मी आत शिरले. दुपार असूनही बऱ्यापैकी गर्दी होतीच. पण तिथला क्वर्की वाईब आणि निळ्या जांभळ्या म्यूटेड लायटिंगमुळे चेहरे ओळखता येत नव्हते. आम्ही कोपऱ्यातला एक सोफा मिळवून रिलॅक्स झालो. मुर्ग मखनी मसाला आणि गार्लिक नान सांगून ते येईतो मिस्टेक मोहितो पीत बसलो. अर्थातच आज चीट डे होता, सगळ्याच अँगलनी!! कॅफेत टिपीकल नवी पंजाबी गाणी वाजत होती. त्याला इथले बेनी आणि माझे वेगवेगळे किस्से आणि जोक्स ऐकवत जेवण झालं. जेवताना मध्येच 'तेरा बझ मुझे जीने ना दे, जीने ना दे' सुरू झाल्यावर मी त्याला डोळा मारला. त्याने पटकन मला एक चोरटा किस दिल्यावर बाजूच्या टोळक्याने शिट्ट्या मारल्या आणि आम्ही दोघेही जीभ दाखवत हसलो. जेवल्यावर शतपावली म्हणून मी त्याला नॉर्थ कॅम्पसमधली आर्ट्स फॅकल्टी, आमचं सायकॉलॉजी डिपार्टमेंट आणि माझं जुनाट दिसणारं हॉस्टेल (अर्थात बाहेरूनच!) दाखवलं. ऑक्टोबर एन्डची दुपार असल्यामुळे ऊन्हातसुद्धा गार, बोचरे वारे जाणवत होते.

फिरता फिरता दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशेजारी पोचल्यावर 'सुदामा की चाय' वाला दिसला. इथे असताना सकाळी उठल्या उठल्या पाच रुपयांचा पारले-जी घेऊन आम्ही हा पाच रुपयांचा चहा प्यायला यायचो. आहा! दिल्लीकी बेस्ट चाय! म्हणत मी दोन बोटं वर करून 'अदरकवाली चाय' सांगितली. "अरे आप बहोत साल बाद दिखी, बेटा!" काऊंटरवरचे अंकल म्हणाले. "आपने पहचाना!.. हां, बहोत साल बाद दिल्ली आयी हूं!" मी हसून म्हणाले आणि दोन वाफाळते कुल्हड उचलून बाहेर आले. चहा पीत आम्ही थोडावेळ लॉनवर पाय पसरून बसलो.

मग स्टँडवरून दोन इ-बाइक्स घेऊन कमला नेहरू रिजच्या रस्त्याला लागलो. हा कॉलेज लाईफमधला माझा सगळ्यात आवडता स्पॉट. दोन्ही बाजूला हिरवीगार गर्द झाडी, सगळीकडे रस्तावर झुकलेले गुलाबी बोगनविलीयाचे झुबके, शांत गुळगुळीत रस्ता आणि वर निळंभोर आकाश! समरच्या आठवणीत मी कितीतरी वेळा इथे एकटी येऊन बसत असे. इव्हनिंग वॉकतर रोजचाच होता. दिल्लीसारख्या महानगरात असूनही हे ठिकाण अजूनही त्याचा सरीन, फ्रेश वाइब टिकवून आहे. रस्त्याच्या शेवटी बाइक्स पार्क करून फ्लॅगस्टाफ टॉवर बघितला, भरपूर सेल्फी काढले. खूनी खान झीलजवळ जाऊन तिथे पोहणाऱ्या बदकांना, फल्लीवाल्याकडून घेतलेले शेंगदाणे चारले. ब्रिटिश काळात वॉच टॉवर वरचे सैनिक इथे घुसणाऱ्या दरोडेखोराना  गोळ्या घालून डेड बॉडीज ह्या खाण कम दरीत लपवायचे म्हणून हे नाव असा इतिहासही समरला सांगितला. बाइक्स परत करून ऑटोने मजनू का टीलाला पोचलो. तिबेटन मार्केट फिरलो, एव्हाना चांगलीच थंडी वाजायला लागली होती म्हणून तिथेच दोन पफर जॅकेट्स विकत घेऊन अंगात चढवली. तिखट शेजवान चटणीबरोबर मनसोक्त गरमागरम मोमोज खाल्ले. मास्क खरंच खूप उपयोगी पडला, चालत फिरल्यामुळे समरकडे कुणाचं लक्ष गेलं नाही, थँक गॉड! आम्ही साध्या जीन्स टीशर्टमध्ये DU मधलेच वाटत होतो.

हौज़ खासमध्ये एक शेवटची फेरी मारेपर्यंत पायाचे तुकडे पडायची वेळ आली तरी समर अजून उत्साहातच होता. म्हणून आधी पायऱ्या उतरून डीअर पार्कमध्ये चरणारी हरणं बघताना आणि बल्क डिस्काउंट म्हणून काही मोरसुद्धा दिसले. तिथून आम्ही फोर्टवर गेलो अर्थात हे दिल्लीचे किल्ले आपल्या सह्याद्रीसारखे राकट, अनवट नाहीत म्हणून दमल्यावरही तिथे जाऊ शकतो. समोर हिरवाईने वेढलेला तलाव, चोहीकडे पसरलेला भगवा संधिप्रकाश, घरट्याकडे परतणारे पक्षी आणि अस्ताला जाणारा सूर्य.. ही वेळ अशी हृदयाला टोचणी लावणारी होती की आम्ही समोरचं दृश्य बघत एका झाडाला टेकून, वाळलेल्या खुरट्या गवतात बसून राहिलो. शब्दांची गरज नव्हतीच. थोड्या अंतरावर बसून एक मुलगा गिटारवर 'अभी न जाओ छोड़ कर, के दिल अभी भरा नहीं' वाजवत होता. मी समरच्या खांद्यावर डोकं टेकून डोळे मिटले. सात वाजल्याची शिट्टी ऐकू आली तेव्हा कुठे आम्ही उठलो. सायलेंट फोनवर बेनीचे दोन मिस्ड कॉल होते. तिला टेक्स्ट केला आणि खाली येताच फायनली कॅब बोलावली. रस्त्यात थांबून बेनीकडे न्यायला वाइन आणि फुलं घेतली.

समर

आम्ही मधूविहारमधल्या पाच मजली रेड ब्रिक बिल्डिंग समोर उतरलो. लिफ्टचं दार उघडताच पलो पॅसेजमधून पळतच सुटली आणि डोअरबेल वाजवून उभी राहिली. तिला बेनीला भेटायची घाई झाली होती आणि मलाही तिच्या ह्या बेस्टीला भेटायची उत्सुकता होती. बेनीने दार उघडताच त्यांच्या मिठ्या, किंकाळ्या आणि हसण्याने घर दणाणून गेलं. माझ्यासमोर हसत, मान हलवत एक माणूस उभा होता. जरा जाडजूड, बेनीसारखेच कुरळे केस आणि हॅपी गो लकी वाटणारा.

"हे, आय एम जमशेद!" त्याने हात पुढे केला. "समर. नाइस टू मीट यू." मी हॅण्डशेक करून त्याच्याकडे वाइन आणि फुलं देत म्हणालो. "डोन्ट प्ले इट कूल, डार्लिंग हबी!!" शेजारून बेनी ओरडली. "हाय! आयाम बेनी अँड धिस गाय हिअर, इज युअर सूपरफॅन!! हम दोनो मुंबईसे हैं और अभी भी इंडियन्ससेही लॉयल है!" तिने हसत पुढे येऊन मला मिठी मारली. मग जरा गंभीरपणे मागे होऊन माझ्याकडे निरखून पाहीलं आणि हसली. "इतने सालोंसे तुम्हारे बारे मे सून रही हूं, समर सावंत! इट्स नाइस टू फायनली मीट द ओन्ली बॉय हू हॅड पलोमा'ज हार्ट."

"ओके गुड डॉक्टर! ज्यादा डीप जानेसे पहले, उनको अंदर बुलाते है." जमशेद बोलल्यावर त्या दोघी हसल्या. पलोमाने हात धरून मला आत नेले. "ह्यांचं घर किती क्यूट आहे ना!"

"हम्म, ब्यूटीफूल." आम्ही आत जाऊन सोफ्यावर बसलो. इट्स सो कोल्ड आऊटसाईड... म्हणत जमशेदने सगळ्यांसाठी बेलीजचे ग्लासेस भरले. बेनी आणि जमशेद आमच्या समोर दोन सिंगल सोफ्यावर बसले. त्यांचं घर मॉडर्न आणि थोडे ट्रॅडिशनल पारसी ॲक्सेंटस् असलेलं होतं. लाकडी नक्षीदार सोफे आणि सेंटर टेबल, भिंतीवर राधाकृष्णाची मिनीएचर्स, एक भलामोठा नक्षीदार अल्मिरा भरून पुस्तकं. सिरॅमिक शो पीसेस, कानाकोपऱ्यात हिरवीगार लहान लहान झाडं. त्या सगळ्या घराला एक हिप, कूल वाईब होता.

बोलता बोलता बेलीज संपल्यावर बेनीने आम्हाला डायनिंग टेबलपाशी नेलं. "मुझे ज्यादा कूकिंग तो आती नहीं, लेकीन मैं मटन कटलेट मस्त बनाती हूं!" म्हणत तिने कटलेट वाढले. आणि ते खरंच भारी लागत होते. मेन कोर्समध्ये सली बोटी, रोटी आणि मटन धनसाक होता. "मुझे पात्रानी मच्छी चाहिए था लेकीन इधर बॉम्बे जैसा फ्रेश मच्छी नहीं मिलता." जमशेद हळहळत म्हणाला. मग हळूच त्याने विषय काढला. "समर.. आय एम डाइंग टू नो इफ यू आर गोइंग बॅक टू इंडियन्स! लेकीन ये डिकरीने मेरेसे ये नई पूछने का प्रॉमिस लिया है!" तो पाण्याच्या ग्लासमध्ये बघत म्हणाला. समोरून बेनी त्याच्याकडे डोळे वटारून बघत होती. "वे टू प्ले इट कूल!!" पुटपुटत तिने मान हलवली.

"अरे यार, सूनो! पलो तुम दोनोंको अपनी फॅमिली कन्सिडर करती है, तो मैं भी करता हूं. तो, मैं एक और साल खेलनेका सोच रहा हूं! अभी तक अनाउन्स नहीं किया, नहीं तो कोच मेरे पीछे पड जाएगा. और मैं पलो को मेरे साथ आनेके लिये भी कन्विन्स कर रहा हूं." मी पलोकडे बघून तिच्या हातावर हात ठेवत म्हणालो. "येय!" जमशेदने उठून हवेत एक पंच मारला.  "आय गिव्ह यू माय वर्ड, डूड! तुम्हारा सीक्रेट मेरे पास सेफ है!"

"वेल, आय गेस अब कोच के ऊपर पलोमाको हायर करनेका प्रेशर रहेगा. अपॅरंटली, तुम दोनो ट्विटरपे व्हायरल हो गए हो. लोग डिस्कस कर रहे हैं की तुम इतना स्टेबल, शांत लग रहे हो इसका रीझन पलोमाकी ट्रीटमेंट है और तुम अच्छा कमबॅक करोगे एट सेटरा." बेनी म्हणाली.

आम्हा दोघांना हा शॉकच होता. कालपासून इंटरनेट बघितलेच नव्हते. "रिअली??" पलो आ वासून तिच्या मैत्रिणीकडे बघत म्हणाली. जयने मला ते भाषण एकदम हिट झाल्याचा मेसेज केला होता पण ते इतकं पुढे गेलं असेल असं वाटलं नाही. "गेट रेडी फॉर द ऑफर्स!" बेनी हसत म्हणाली. पलोने डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिलं. ह्या गोष्टीचा ती अती स्ट्रेस घेते आहे. ती कुठेही गेली तरी काय फरक पडतो? मला तर वाटतं तिला देशातल्या प्रत्येक टीमकडून ऑफर्स याव्या. शी डिझर्व दॅट. आय नो, आम्ही दूर राहण्याची तिला काळजी वाटते पण मला नाही वाटत. कारण मला आता हे समजलंय की अकरा वर्ष आणि काही शे किलोमीटर्स सुद्धा आमच्यात काहीच बदलू शकले नव्हते. आम्ही अजूनही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो.

ती माझ्याजवळ असायला हवी आहे का? - नक्कीच.
आणि नसली तर फरक पडतो का - अजिबात नाही.

"वेल, मेरा फर्स्ट चॉईस तो समरके पास रहना है. हमने बहोत टाईम अलग अलग गुजारा है, नाव वी डोन्ट वॉन्ट टू डू दॅट." पलोमा चमचा उचलत म्हणाली. मला तसंच व्हायला हवं होतं. तिच्यासाठी डिस्टन्स हा इश्यू आहे, हे मला माहिती आहे. माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी हे सहज निगोशिएट करू शकतो आणि टीमलाही तिचा खूप फायदा होईल.

"आय गेस, समर हॅज द पॉवर टू मेक इट हॅपन.." बेनी खाता खाता म्हणाली.

"दॅट्स नॉट द वे टू गेट अ जॉब यार! आय नो ही इज अ लेजंड अँड ऑल.." पलोने माझ्याकडे बघून डोळा मारला "बट आय एम प्रिटी गुड ॲट माय जॉब. मुझे ऐसा ऑफर चाहिए जो मेरा काम देखकर मिले."

"बट यू नो, यू कॅन!" जमशेद म्हणाला. "दरवाजा कहा से खुलता है, इससे क्या लेना देना. एक चान्स चाहिए बस! लूक ॲट मी, मुझे तो फिर चुल्लूभर पानी मे डूब मरना चाहिए. मेरे अंकल की लॉ फर्म मे मुझे ऐसेही एन्ट्री मिली और अब देखो, आय एम मूव्हिंग द रँक्स कॉझ आय एम गुड ॲट हेल्पींग पीपल पार्ट वेज ॲमिकेबली!" तो काट्याने मटन तोंडात कोंबत हसला.

"सेज द हॅपीली मॅरीड डिवोर्स अटर्नी!" बेनी म्हणाली.

"अ थेरपिस्ट अँड अ डिवोर्स अटर्नी! साऊंड्स लाईक अ परफेक्ट मॅच!" मी हसत म्हणालो आणि सगळेच हसले.

नंतर जेवण होईपर्यंत आम्ही बेनी आणि पलोमाच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलत बसलो. मी ज्याचा भाग नव्हतो अश्या तिच्या आयुष्याबद्दल ऐकायला मला मजा येत होती. तेवढ्यात पलोमा कॉल रिसीव्ह करायला बाहेर गेली आणि जमशेद उठून किचनमध्ये आईसक्रीम आणायला गेला.

"आय हॅव वेटेड अ लाँग टाईम टू मीट यू समर.." बेनी पुढे झुकून जरा हसत म्हणाली. "उसकी लाईफ मे तुम हमेशा से थे, इव्हन व्हेन यू वर नॉट! और मैं हमेशा प्रे कर रही थी, की तूम दोनो वापस एक दुसरे को ढूंढ लो."

मी घसा साफ केला. "मैं भी! जबसे वो गयी, कुछ भी ठीक नहीं था." आणि हे अगदी खरं होतं.

"बी पेशंट, शी इज कमिंग अलाँग. वो अभी भी थोडा डर रही है. यू नो, शी इज ऑल्वेज रेडी टू गेट अवे बिफोर शी गेटस् हर्ट. इट्स हर कोपिंग मेकॅनिझम." 

"आय एम वर्किंग ऑन इट. आय थिंक इंडियन्स उसे हायर करेंगे. एक साल हम साथ रहेंगे फिर देखते है. जिधर वो जाना चाहे, मैं जा सकता हूं."

"साऊंडस् लाईक इट्स ऑल गॉना वर्क आऊट परफेक्टली! " बेनी हसत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २७

"इफ इट इज एनी काँसोलेशन, शी नेव्हर डीड गेट ओव्हर यू. पहले दो साल, मैं बता नहीं सकती कितनी बार वो रोते रोते सो जाती थी. जब भी कभी मैंने उससे बुलावाया, तो तुम्हारा ही नाम आता था. इट वॉज ऑल्वेज अबाऊट यू."

ती एवढी हर्ट होत होती या विचाराने माझा एकदम घसा दाटून आला. ती निघून गेली तेव्हा मीही टोटली लॉस्ट होतो. कुणीतरी छातीतून हृदय कापून नेल्यासारखं वाटत होतं.

"अब मैं हूं और हमे कुछ भी फेस करना पडा तो भी मैं उसे जाने नही दूंगा." मी म्हणालो.

"यू नो, यू आर द फर्स्ट गाय आय हॅव ॲक्च्युली गिवन थंब्ज अप टू!" बेनी हसत म्हणाली.

" ट्रस्ट मी, आय हॅव मेट हरिष!! इतने साल उसने ऐसे बंदोंको डेट किया है तो आय एम नॉट सरप्राइज्ड!" मी म्हटल्यावर आम्ही दोघेही हसलो.

"कसलं सरप्राइज?" म्हणत पलो आत आली.

"ऐसेही तुम्हारा ए-होल पास डिसऑर्डर बता रही थी!" बेनी हसता हसता म्हणाली.

"ओह!" म्हणून पलोमा आमच्या हसण्यात सामिल झाली. तेवढ्यात जमशेद आईस्क्रीमचे बोल्स घेऊन आत आला.

"कोणाचा कॉल होता?" मी पलोला विचारलं.

"सुंदरम श्रीराम. RCB चे कोच! त्यांनी मला पंधरा दिवसांनी इंटरव्ह्यूला बोलावलंय. ही सेड ही इज गोइंग टू मेक ॲन ऑफर!" तिने खांदे उडवले आणि माझ्याकडे बघून चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला. " अपॅरंटली, एव्हरीवन थिंक्स आय हॅव हील्ड द लेजंड ऑफ द फील्ड. असं तेच म्हणाले!"

तिला वाटतंय त्यापेक्षा खूप प्रकारे तिने मला बरं केलंय. "आता इंडियन्सना घाई करायलाच पायजे!" म्हणून मी तिच्या खांद्यावर हात टाकून कपाळाच्या कडेला ओठ टेकले.

"मी जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करेन. तिकडे जाऊन त्यांना भेटते. होपफुली, तोपर्यंत तुला इंडियन्समध्ये काय चाललंय ते समजेल."

"इट्स ऑल गोइंग टू वर्क आऊट, आय प्रॉमिस!" न पाळता येणारी प्रॉमिस मी कधीच देत नाही.

"आय नो इट विल!" कुजबुजत तिने लीची आईसक्रीमचा बोल माझ्याकडे सरकवला.

"कूल, सो ऑल ऑफ अस विल बी चीअरींग ऑन इंडियन्स धिस यर, विथ बोथ ऑफ यू ऑन द सेम टीम!" जमशेद खूष होत म्हणाला.

"अँड आय विल बी इटिंग आइस्क्रीम टू दॅट ऑल डे लाँग! भाड मे गयी डाएट!" बेनी ओरडली.

पलो आणि मी आइस्क्रीमचे बोल एकमेकांना टेकवले आणि ती माझ्याकडे बघत हसली.

पलोमा

कोल्हापुरात येऊन आम्ही घरात पाय टाकतो तोच तो कॉल आला, जुईचा घाबरलेला आवाज ऐकून माझ्या हातून फोन गळून पडतापडता राहिला.

समरने माझ्या हातातून फोन घेऊन कानाला लावला आणि तिने मला सांगितलेलं सगळं रिपीट केलं. दिदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अर्ध्या तासापूर्वी अजय जेवायला घरी गेला तेव्हा ती बेडरूममध्ये फरशीवर पडून ओरडत होती. नेमके घरात कोणी नव्हते. हो, मोरया हॉस्पिटल, राजारामपुरीतलंच.

"आम्ही निघालो." समरने टेबलावरची माझी पर्स उचलली आणि मला हाताला धरून बाहेर पडला. मी बधीर अवस्थेतच गाडीत बसले. त्याने माझाही सीटबेल्ट लावला. माझी नसननस टेन्स झाली होती. गप्प बसून मी जुईच्या शब्दांचा अर्थ लावत होते. "दिदीला काही होणार नाही." समर माझ्या हातावर थोपटत म्हणाला. आम्ही हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये शिरलो आणि पळतच वर गेलो. जाई, जुई आणि पप्पा तिघेही तिथे होते. मी जाऊन पप्पांशेजारी बसले आणि त्यांचा हात घट्ट धरला. "काय झालं दिदीला?"

"अजून समजलं नाही. अजय आत आहे डॉक्टरांबरोबर, तो आला की कळेल. नशीब मी आज आजऱ्याला निघालो नव्हतो." ते म्हणाले.

"अजयने खूप आरडाओरड केली आणि माझ्या बायकोजवळ थांबणारच म्हणून दार ढकलून आत गेला म्हणून त्याला तिकडे थांबू दिलंय." जाई पॅसेजमध्ये फेऱ्या मारता मारता म्हणाली. मीनाकाकी म्हणजे दिदीच्या सासूबाई, समोरच्या खुर्चीत कसलीतरी पोथी वाचत बसल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघून मान हलवली.

"तुम्ही भेटलात काय तिला? का आधीच ते आत गेले होते?" समर माझ्याशेजरी बसत म्हणाला.

"आम्ही आलो तेव्हा अजय बाहेर होता. काकीना आम्हीच घेऊन आलो. मग वाट बघून तो कंटाळला आणि आत घुसला." जुई म्हणाली.

"सो कोणाला काहीच माहीत नाही?" मी विचारलं.

"नाही. आता मलाच दारावर धक्का देऊसं वाटायलंय.." जाई वैतागून मूठ वळत म्हणाली.

"जाई, स्लो डाऊन. उगा सीन करू नको. अजय आहे तिच्याजवळ, तो सांगेल आपल्याला." जुई शांत आवाजात म्हणाली.

"इट्स टू अर्ली टू हॅव द बेबी.." मी समरकडे झुकून कुजबुजले.

थोडा वेळ शांततेत गेल्यावर धाडकन दरवाजा उघडला आणि कपाळावरचे केस मागे करत अजय बाहेर आला, मागोमाग डॉक्टर पाटील.

"घाबरु नका, ती बरी आहे. बाळ जरा जास्त रागीट दिसतंय, त्याने नाळ धरून ओढली की कायतरी. शॉकींग आहे! तसंही आमचं पोरगं अत्रंगीच असनारंय." तो मानेवर हात फिरवत म्हणाला.

"असं काही झालेलं नाहीय." डॉक्टर किंचित हसत म्हणाले. "कार्तिकीला जरासं प्लासेंटल सेपरेशन झालंय. म्हणजे गर्भाशयाला चिकटलेली वार थोडीशी तुटून निघाली पण खूप घाबरण्यासारखं आत्ता तरी काही नाही. त्याच्यामुळेच तिला ब्लीडींग झालं आणि क्रँप्स आले. सोनोग्राफीमध्ये ते दिसलं, आता तिला पूर्ण बेड रेस्ट हवी. पुढचे दोन दिवस इथेच तिला अंडर ऑब्झरवेशन ठेवू, नंतर सगळं ओके असेल तर घरी नेऊ शकता. पण घरीसुद्धा तिने दगदग न करता पूर्ण आराम करणं गरजेचं आहे."

"तेच तर कठीण आहे. ती इतकी तुडतुडी आहे, लगेच उठून बेकरीत चालू पडेल." तिच्या सासूबाई मान हलवत म्हणाल्या.

"तिला काही ऑप्शनच नाहीय. आपल्याला ती प्लासेंटा पूर्ण निघायला नकोय. मी बोललोय तिच्याशी, किती थोडक्यावर निभावलं, ते तिला समजलंय. त्यामुळे चुपचाप ऐकेल. बायका आपलं मूल सेफ राहण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन काळजी घेतात. काळजी करू नका , ऐकणार ती!" त्यांनी अजयच्या पाठीवर थाप मारली. "काय मर्दा, एवढ्यानं घाबरतोस! आत्ता फक्त पाच मिनिट बघा तिला आणि  सगळे नंतर परत या, आता पेशंटला आराम करू द्या."

"मी इथेच थांबणार आहे, हे सगळे जातील." अजय ठामपणे म्हणाला. "वाटलंच मला! ठीक आहे, पण तिला आराम करू दे." म्हणून डॉक्टर गेले.

"म्हणजे काय, तेच बघायला थांबलोय." म्हणून त्याने दार उघडून आम्हाला आत नेलं. दिदीच्या हाताला ड्रिप लावली होती. ती पडल्या पडल्या आमच्याकडे बघून किंचित हसली. "सॉरी, तुम्हाला खूप घाबरवलं... आजीला फोन केला का? ती काळजी करत असेल."

"मी करते" म्हणून मोबाईल कानाला लावून जाई बाजूला गेली.

"कसं झालं हे सगळं?" मी तिच्या शेजारी खुर्ची ओढून बसत विचारलं.

"मला खूप वाईट क्रँप्स येत होते. पाठीतून बारीक कळा सुरू झाल्या. मला वाटलं प्रेग्नंसीत असं बारीकसारीक होत असतं, पण मी खाली बघितलं तर फरशीवर रक्तच रक्त. अचानक जोरात कळ आली आणि मी खालीच बसले."

"तुला अश्या अवस्थेत बघून मला काय वाटलं ते सांगूपण शकत नाही." अजय तिच्या शेजारी बसत तिचा रिकामा हात धरून म्हणाला. "माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं."

"आय एम सॉरी अजू, मला उभंच राहता येत नव्हतं. सॉरी, तुला घाबरवलं." दिदी पुटपुटली.

"खुळीएस काय! मला काय सॉरी म्हणते? माझं कामच आहे तुझी काळजी घेणं." अजय तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला.

मला त्या क्षणी एकदम जाणवलं, आयुष्य किती मौल्यवान आहे. आम्ही सगळ्या त्याचं जितं-जागतं उदाहरण आहोत. लहान वयात आईला गमावल्यावर आम्हा सगळ्यांना आयुष्याची दोरी किती नाजूक असते ते उमगलं. नियती किती क्रूर आणि अनफेअर असू शकते ते कळलं. आज दिदी तिच्या बाळाला जगात यायच्या आधीच गमावणार होती ह्या विचारानेच मला कसंतरी होत होतं.

माझ्यावर भीतीने कब्जा केला आणि मला पुन्हा अंधाराकडे खेचू लागली.

"जरा स्लो डाऊन कर आता. झोपून रहा आणि बेकरी, ऑर्डर्स वगैरे अजिबात विचार करू नको." अजय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.

"तू काय काळजी करू नको ग, मी रिकामीच आहे, मी बघते बेकरीचं सगळं!" जाई फेऱ्या मारताना थांबून म्हणाली. ती टेन्शनमध्ये एका जागी बसूच शकत नसे. "मला पण अजून सुट्टी आहे, मी पण मदत करेन जाईला." जुई मान हलवत म्हणाली. "यू जस्ट टेक इट इझी."

माझ्यासाठी गोष्टी खूप फास्ट होत होत्या. लवकरच मी खूप बिझी होणार होते. पुन्हा मला दिदीसाठी थांबता येणार नव्हतं. विचारानेच माझ्या छातीत बारीकशी कळ आली. पुन्हा माझ्या फॅमिली पासून इतक्या दूर मला जायचं नाहीय. मला त्यांच्या जवळ असायचं आहे, माझ्या भाचराला मोठं होताना बघायचंय. अश्या वाईट गोष्टी घडल्या तर त्यांना मदत करायची आहे. समरने माझ्या खांद्यावर हात टाकून जवळ घेतलं. "तू बरी आहेस ना?" घसा दाटून येतानाच मी मान हलवली. "हम्म, मी इथे आहे यानेच बरं वाटतंय."

"हे, मी ठीक आहे पलो. प्रेग्नंसीत अशा गोष्टी होत असतात. मी लवकर बरी होईन.." दिदी माझा हात दाबत म्हणाली. पप्पा इतका वेळ शांतपणे कोपऱ्यात उभे होते, ते आता पुढे झाले. "दिदे, सगळं जरा शांतपणे घे. डॉक्टरांनी सांगितलाय की काही दिवस तरी तुला पूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि कसलाही विचार करू नको, आम्ही सगळे आहोत तुझ्याजवळ. टेन्शन चांगलं नाही अजिबात." पप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. "मी आहे ना, गादीवरून उठूच देणार नाही तिला! काळजी नका करू!" पलीकडून मीना काकी म्हणाल्या.

पप्पा वरवर बोलत असले तरी आतून ते खूप घाबरलेले होते. खूप दमलेले दिसत होते. ते बोलत नसले तरी ही भीती त्यांच्याही डोक्यात घट्ट बसलेली होती. आम्ही घाबरलो हे सांगायला का एवढे बिचकत होतो? अजयने तर किती सहज सांगून टाकलं.

"मी खरंच खूप घाबरले होते. तुझ्यासाठी आणि बाळासाठीपण.." माझ्या घशातून हुंदका फुटला. जुईपण माझ्या गळ्यात हात टाकून टिपं गाळायला लागली. दीदीच्यापण डोळ्यातून पाणी आलं. "नशीब! मीपण तुमच्यासमोर ब्रेव्ह असल्याचं नाटक करून दमले होते." ती रूमालाने नाक पुसत म्हणाली.

"अय पोरीनो, तिला आता रडवून त्रास दिऊ नका." समर कोल्हापुरी ठसक्यात ओरडला. "दिदी तू आराम कर. काळजी घे अज्या, आम्हाला इथून हाकलायच्या आत निघायला हवं. सकाळी परत घेऊन येतो सगळ्यांना." तो आमच्याकडे बघत म्हणाला. त्याने गाडीतून सगळ्या मंडळींना राजारामपुरीत घरी सोडलं. तिथून सरनोबतवाडीकडे निघाल्यावर रस्ताभर त्याने माझा हात घट्ट धरून ठेवला. आज एवढं सगळं झाल्यानंतर मला एक गोष्ट चांगलीच समजलीय.

मी ठीक आहे. मी पळून गेले नाही.
आय वॉज एक्झॅक्टली व्हेअर आय वॉन्टेड टू बी.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २८

समर

पुढचे दहा बारा दिवस आमच्या टाईट शेड्यूलमुळे कसे निघून गेले समजलंच नाही. शेवटी पलोमा बंगलोरला निघाली.

"सगळं व्यवस्थित होणार आहे. काळजी करू नको, सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तू जस्ट जा, त्यांची ऑफर ऐक. आपलं बोलणं होईपर्यंत काही साईन करू नको, बस्स!" मी तिची आणि जुईची बॅग गाडीतून खाली ठेवत म्हणालो.

दिदीची बेडरेस्ट संपेपर्यंत जाई बेकरी सांभाळत होती. तिच्या मदतीला अजयची बहीण होतीच. मला कोचला भेटायला मुंबईला जायचं होतं पण पलोमालाही एकटं सोडायचं नव्हतं. जुई तिच्याबरोबर जायला तयार झाली. जयने काहीतरी झोल करून ऐनवेळेस  कोल्हापूर-बंगलोर डायरेक्ट फ्लाईट बूक केली. स्कॉर्पिओतून बाहेर येताच दुपारचं ऊन डोक्यावर तळपत होतं. दोन वीसची फ्लाईट होती.

"काळजी नाहीच करणार. माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, जास्त करून तुझ्यावरच!" आत शिरताना ती हसत म्हणाली.

"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पलो.  लेट देम मेक ॲन ऑफर, अँड आय'ल गेट द इंडियन्स टू टॉप दॅट. पण लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही." मी तिला जवळ घेऊन कपाळावर ओठ टेकले.

हम्म... आमच्याकडे बघत जुईने सुस्कारा सोडला. "एअरपोर्ट गुडबाय किती रोमँटिक असतात ना! एकतर आपल्या एअरपोर्टच्या आत मी पहिल्यांदाच जातेय. काश... माझा कोणी बॉयफ्रेंड असता... पण माझे सगळे क्लासमेट एकसे एक चमे आहेत यार!"

"मिळेल मिळेल एखादा चांगला.." म्हणत पलोने तिला टपली मारली. "गो, साईन दॅट कॉन्ट्रॅक्ट सुपरस्टार! हे विन विन आहे. आपण एकत्र असू आणि घरापासून जवळसुद्धा. आय लव्ह यू." पलो माझा हात हातात घेऊन म्हणाली.

"लव्ह यू मोअर!" म्हणून मी त्यांना आत जाताना बघितलं आणि निघालो. घरी ड्रायव्हर कार घेऊन थांबला होता, रात्रीपर्यंत आम्हाला मुंबईत पोचायचं होतं.

मला एकदाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करून त्याचा  बुक्का पाडायचा होता आणि त्यातच पलोचंही काम करून घ्यायचं होतं. ते काय अवघड नाही.. तिची मला केवढी मदत झाली, माझा परफॉर्मन्स किती सुधारला वगैरे गुणगान कोचसमोर केलं की तो सहज ऐकेल. मला माहिती आहे की मी सरळ वागलो तर त्याला माझ्याशी सरळ वागावंच लागेल. "संजू, आवाज वाढव रे.." म्हणून मी डोकं मागे टेकून डोळे मिटले.

ये... हथेली की लकीरों में लिखी सारी है
या... ज़िन्दगी हमारे इरादों की मारी है

है, तेरी मेरी समझदारी समझ पाने में
या, इसको ना समझना ही समझदारी है

ज़िंदगी है जैसे बारिशों का पानी
आधी भर ले तू, आधी बह जाने दे..
जाने दे..

किती तास गेले काय माहीत, अचानक खिशात फोन वाजला. पलिकडे जय होता आणि त्याच्या आवाजातला बदल मला लगेच जाणवला.

"बॉस! आर यू ऑन द रोड?" तो मला इंडियन्सच्या ऑफिसमध्ये भेटणार होता.

"हो पण ड्रायव्हर आहे सोबत. व्हॉट्स रॉग?"

"आज एक स्टोरी व्हायरल हुई है. दिल्लीवालोंका कोच है ना, नितीन आमरे, उसने एक इंटरव्ह्यू मे बोला है की तुम उनके लिये खेलनेवाले हो, बस बोली लगनी बाकी है. यू हॅव ऑल्मोस्ट साइंड अ कॉन्ट्रॅक्ट करके. आय गेस घोरपडे अभी गॅस पर होगा!"

"व्हॉट! मेरी आमरे से बात तक नहीं हुई. बट आय रीस्पेक्ट द डूड! वो क्यूं ऐसी बात करेगा?"

"पॉलिटिक्स ब्रो! लास्ट यर, आमरे की सिस्टरसे घोरपडेका चक्कर था. फिर घोरपडे ने उसको छोड दिया. इस रिझन से दोनोमे बॅड ब्लड है. सबको पता है तुम घोरपडे के गोल्डन बॉय हो, तो तुम्हे लेके आमरे घोरपडेको प्रव्होक कर रहा है."

"शिट! होपफुली, इससे मेरा फायदा ही होगा !" मी विचार करून किंचित हसत म्हणालो. रस्त्यात मुंबईचे ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली, मी आताच कोल्हापूरची हिरवाई मिस करत होतो. जसजसा उंचच उंच बिल्डिंग्जचा सिटीस्केप समोर यायला लागला तसतशी वाहने आणि हॉर्नसचे आवाज वाढत गेले. रस्ताभर दिव्यांचा लखलखाट सुरू झाला.

वेलकम टू सिटी लाईफ!

"घोरपडे ये बात पक्का बीलीव्ह कर रहा है, कॉझ दोनोंका ट्विटर वॉर चालू है. घोरपडे क्लेम करतोय की समर उद्या सकाळीच कॉन्ट्रॅक्ट साईन करेल. त्याने आमरेच्या बहिणीवरपण काही वाईट कमेंट केल्या म्हणून ट्विटरवर पब्लिक झोडपतेय त्याला."

"मी फक्त सहा सात तास कारमध्ये आहे आणि एवढ्यात ह्याने इतक्या पलट्या मारल्या!"

"माहित नाय ब्रो! आय थिंक उसका कुछ तो चल रहा है. एनिवे, सुबह मिलकर बात करते है." म्हणून त्याने फोन ठेवला. घरी आल्यावर पलो आणि आईला सुखरूप पोचल्याचा कॉल झाला तरी हे विचार डोक्यात घेऊनच झोपलो. सकाळी नऊ वाजता आमची मीटिंग ठरली होती.

मी सकाळी कारमध्ये बसल्यावर जयला कॉल केला. "बॉस, मैं ऑफिस के सामनेवाले पार्किंग मे बैठा हू. मैने कल बोला नहीं लेकीन कोच थोडा अनस्टेबल लग रहा है. आप आ जाव, पहले उसकी बात सुन लेते है. फिर अपना निगोशिएट करेंगे." तो घाईघाईत बोलत होता.

"मुझे निगोशिएट सिर्फ पलोमाको हायर करने के लिये करना हैं. पैसे का कोई इश्यू नही, आय कॅन बेंड देअर. लेकीन ये सब ध्यानसे करना पडेगा. घोरपडेको भनक भी नहीं लगनी चाहिए. आय कान्ट ट्रस्ट दॅट ॲ*होल!"

"ऐसा मत बोलो बॉस, मनी इज अ बिग डील! आपकी अमाऊंटपे मेरा कमिशन डिपेंड है!" जय हसला. "लेकीन मैं सून रहा हूं, आपको जैसा चाहिए वैसाही मिलेगा."

"ओके. सी यू देअर!" म्हणून मी फोन ठेवतो तोच पुन्हा वाजला. "हे बेब! काय चाललंय? काल जास्त बोलता नाही आलं." मी म्हणालो.

"फ्लाईट मस्त होती, आमचा अजून विश्वास बसत नाहीये की आम्ही बिझनेस क्लासमध्ये होतो! आता दर वेळी इकॉनॉमीमध्ये बसल्यावर पानी कम वाटणार!" पलोचा आवाज हसरा होता.

"यू डिझर्व द बेस्ट!" मी चिडवले.

शिट! ऑफिस बिल्डिंगच्या गेटबाहेर पॅप्सची गर्दी कॅमेरे रोखून उभी होती. ऑफकोर्स, घोरपडेला प्रत्येक गोष्टीचा शो ऑफ करायचा असतो, प्रत्येक गोष्ट पब्लिकमध्ये गेली पाहीजे. मी अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये जाऊन कार थांबवली. "ओके, मी पोचलो. तुझ्या मिटिंगचं काय?"

"माझं आवरलं. अकरा वाजता मीटिंग आहे. जुई अजून होटेलने दिलेली चॉकलेटस् खात लोळतेय. बघ ही पोरगी डेंटिस्ट होणार आणि!" ती हसली. "चलो, ऑल द बेस्ट. मीटिंग संपल्यावर कॉल करू?"

"येेप."

"आज आपल्याला आपलं भविष्य थोडं तरी क्लिअर होईल..है ना?" तिच्या आवाजात काळजीची छटा होती.

"ॲब्सोल्यूटली. काळजी करू नको, सगळं आपल्याला हवं तसंच होईल. आपल्यात काहीही बदलणार नाही. ह्यावेळी कोणी आपल्यात फूट पाडूच शकणार नाही. मी पाडू देणार नाही! नॉट धिस टाईम." माझ्या आतला संताप डोकं वर काढत होता. घोरपडेला तेव्हाही आमची फिकीर नव्हती आणि आत्ताही नाहीय.

हे मी पक्कं लक्षात ठेवलंय.

"ओके. बाय, मी आवरते आता. लव्ह यू."

"लव्ह यू टू! बाय." म्हणून मी लिफ्टमध्ये शिरलो.
वर ऑफिसच्या दारातून आत शिरताच जय उठून समोर आला. तो वाटच बघत बसला होता.

"हॅलो समर सर!" रिसेप्शनवरून अलिशा हसून पापण्या पिटपिट करत म्हणाली. ही गेल्या वर्षीपासून घोरपडेची पीए होती. तसा तो दर एक दोन वर्षांनी पीए अर्थात पोरी बदलायचा. त्याच्या कॅरॅक्टरबद्दल रूमर्स तर अख्ख्या स्पोर्टस सर्किटला माहीत होत्या. "ही'ज रेडी फॉर यू." तिने पुढे होऊन केबिनचं दार उघडलं. आश्चर्य म्हणजे आत टीम ओनर्स नव्हते. ते माझ्या फेवरमध्ये आहेत हे माहिती असल्यामुळे घोरपडेने त्यांना बोलावलं नसणार.

"मिस्टर डी कुठायत?" मी त्याच्या समोरच्या खुर्चीत बसत विचारलं.

"क्लोज द डोअर, शा." घोरपडे फुत्कारला. "समर इथे आपण दोघेच असलो तर बरं होईल. तुला काय हवं ते मिळेल, जय किंवा मिस्टर डी ला आणायची गरज नाही."

"जय माझा मॅनेजर आहे. तो थांबेल."

"अच्छा? तुझ्याबरोबर आमरेला पण भेटायला गेला असेल मग?" त्याने टेबलावर ठेवलेल्या हाताची मूठ वळली आणि मी चेहऱ्यावर हसू दिसू न देता दाबून टाकलं. न घडलेल्या गोष्टीवर हा माणूस इतका संतापत होता.

"मी आमरेंना कधीही भेटलो नाही. माझं पहिल्यापासून क्लिअर आहे, यावर्षी रिटायरमेंट किंवा इंडियन्ससोबत अजून एक वर्ष. बाकी टीम्सकडून मला ऑफर्स आल्या, नाही असं नाही. पण मी कोणालाही भेटलो नाही." मी शांतपणे म्हणालो.

"ऐक. मला चू** समजू नको समर. इथे तू शांतपणे, कसलीही फिकीर नसल्यासारखा येऊन बसतोस, जसं काही झालंच नाही. पण इथे सगळं माझ्या हातात आहे. समजलं?" घोरपडे दरडावत ओरडला आणि त्याने हातातले पेपर्स माझ्यासमोर आपटले. "यू आर गोइंग टू साईन धिस शिट नाव. नाहीतर मी बघतोच काय करतोस ते."

हे जरा जास्त होतंय, समोर कोच असला तरीही. मी इथे सरळ साईन करायला आलो होतो, धमकी द्यायची काही गरज नव्हती.

"डोन्ट यू फ** थ्रेटन मी!" माझा आवाज वाढला.

"डू यू थिंक आय एम फ** स्टूपीड? डू यू??" तो वाकून माझ्यासमोर तोंड आणत ओरडला. पिसाळलेल्या कुत्र्यासारखी त्याच्या तोंडातून थुंकी उडाली.

"सर, यू नीड टू सीट डाऊन. आपने ऑलरेडी निगोशिएशन खराब कर ही दिया हैं. समर यहाँ साईन करने आया है और आप को ये पता हैं. फिर भी आपने फालतू बाते दिमाग में लेके रखी है." जय शांतपणे घोरपडेना म्हणाला आणि काळजीने बघत राहिला.

"तुझं त्या स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट बरोबर काय गुटर्गू चाललंय, ते मला चांगलं माहिती आहे. द वन आय फ** हायर्ड अँड पेईंग फॉर! तुला काय वाटलं, माझी माणसं तुझ्या मागावर नसतील? दिल्लीत उनाडत होतात ते मला माहित नाही?" त्याने खिशातून फोन काढला आणि माझ्या तोंडासमोर धरून, त्यातले माझे आणि पलोचे दिल्लीतले बरेच फोटो स्क्रोल करून दाखवले.

"व्हॉट द फ* इज धिस?" मी ताडकन उठलो आणि फोन खेचून घेऊन रागाच्या भरात टेबलावर आपटला. "तुम्ही माझ्यामागे माणसं लावली! सो व्हॉट इफ आय एम डेटिंग हर? आय डोन्ट गिव अ शिट हू नोज. आणि पहिल्या वेळी सगळं बिघडायला तुम्हीच जबाबदार  होतात. तुम्हाला तेच परत करण्याचा चान्स मला द्यायचा नव्हता."

"आय विल रूईन हर. आत्ता इथे साईन कर, मी हे सगळं विसरून जाईन. तुला हवं असेल तर, तुझ्या आयटमलापण ऑन बोर्ड घेईन. पण जर आज कॉन्ट्रॅक्ट साईन नाही झालं तर मी प्रत्येक टीम मॅनेजर, कोच सगळ्यांना पर्सनली सांगून तिचं करियर बरबाद करेन. लेट देम नो, दॅट शी स्लीप्स विथ अ क्लायंट फॉर बेटर अपॉर्चूनिटीज."

बास! संतापाने माझ्या डोळ्यासमोर सगळं गोल फिरायला लागलं. डोक्यात रक्त तापलं होतं. मी एका क्षणात टेबलापलीकडे जाऊन घोरपडेची कॉलर करकचून आवळली. सगळे आवाज बंद झाले होते. जय येऊन माझ्या कानाशी काहीतरी ओरडत होता. मग त्याने कसेबसे माझे हात सोडवून मला बाजूला ओढत नेले.

भिंतीला टेकून मी डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. डोळे उघडले तेव्हा समोर घोरपडे दोन्ही हातांनी गळा चोळत खाऊ की गिळू चेहऱ्याने बघत होता. "जगात शेवटचा माणूस असलास तरी मी तुझ्यासाठी खेळणार नाही." मी ओरडलो. तो काही म्हणायच्या आत मी टेबलावरचे कागद उचलून टरकन फाडले आणि त्याच्या तोंडावर फेकले. "फ* यू! वी आर डन!!"

तो टेबलवर थोडा पुढे वाकला. मी खांदे सरळ करून पुन्हा एक द्यायला तयार झालो. पण त्याने माझा सेलफोन उचलून भिंतीवर जोरात  फेकला. स्क्रीनचा चुरा होऊन फोन फरशीवर पडला.

"बरं वाटलं? नवा कॅप्टन शोधायला गुड लक!!" मी त्याला मधलं बोट दाखवून वळलो आणि सरळ बाहेर पडलो. जय माझ्यामागे आला.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २९

अलिशा आ वासून आमच्याकडे बघत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं, अर्थातच तिने आतलं आमचं भांडण ऐकलं असणार. मीही तेवढाच शॉकमध्ये होतो. घोरपडे इतक्या खाली जाऊन, ओपनली मला ब्लॅकमेल करेल असं वाटलं नव्हतं. एका अर्थी, झालं ते बरंच झालं. आय एम हॅपी. त्याच्यासारख्या माणसाबरोबर खेळत राहणं हा डोक्याला त्रासच होता. आता त्याने त्याचे खरे रंग दाखवल्यावर मी त्याच्यासोबत राहणं शक्यच नाही. स्पेशली तो पलोमाबद्दल जे काही बोलला, त्यानंतर. आय एम डन!

"होली शिट!" आम्ही दाराबाहेर पडून लिफ्टमध्ये शिरताच जय उद्गारला.

"हुकलंय म्हातारं!" मी केसांतून हात फिरवत म्हणालो.

"टोटली! यू नो, हमे ये केस ऊपर ले जाना चाहिए. ये आदमी तो पूरा आऊट ऑफ कंट्रोल है." लिफ्टमधून आम्ही लॉबीत आलो.

"मला जरा थंड होऊ दे. ग्रँडमामाजमध्ये जाऊ, कॉफी घेऊ, थोड्या कॅलरीज पोटात जाऊदेत, मग बोलू. ओके?" त्याने मान हलवल्यावर आम्ही शेजारच्या कॅफेत जाण्यासाठी मुख्य दरवाज्यातून बाहेर पडलो. तसा कॅफे अकराला उघडतो पण आम्हाला स्टार पॉवरमुळे लवकर एन्ट्री मिळते.

आम्ही बाहेर आलो आणि कॅमेरे रोखून पॅप्सचं एक मोहोळ आमच्यावर क्लिकक्लिकाट करत चालून आलं. शिट! हे विसरलोच होतो. इतके दिवस ह्या मॅडनेसपासून दूर निवांत असल्यामुळे ही बाजू लक्षातच येत नव्हती. आता यांना तोंड द्यायचा माझ्यात पेशन्स नव्हता. मी उन्हापासून वाचायला डोळ्यावर हात घेतला आणि पटापट चालू लागलो. "समरss" गर्दीतून आवाज आला आणि मी चमकून आवाजाच्या दिशेने पाहिले. रस्त्याच्या कडेला कार थांबली होती आणि कश्मीरा माझ्याकडे  ऑल्मोस्ट पळत येत होती.

आता ही काय करतेय इथे? सगळीकडून फ्लॅश चमकू लागले आणि लोक पुढे पुढे येत शूट करू लागले. कश्मीरा खूप टेन्शनमध्ये दिसत होती. ती माझ्या शेजारी येऊन पोचली. "हे, तू काय करतेय इथे?"

"आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचय. मी कॉल करत होते पण तू उचलला नाहीस. हे खूप अर्जंट आहे, समर!" तिने माझा हात घट्ट पकडला आणि कानात कुजबुजली. 

मी जयकडे नजर टाकली. तो अवाक होऊन आमच्याकडे बघत होता. त्याची कश्मीराशी थोडीफार ओळख होती. ती त्याच्याकडे बघून हसली आणि तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. "आम्ही कॅफेत चाललोय, चल." म्हणून तिला घेऊन वळेपर्यंत आम्हाला पॅप्सनी घेरले. मी तिला कॅमेरापासून दूर केली पण तेवढ्यात आमच्यासमोर दोन चारजण फ्लॅश मारत उगवले. "हटो, दूर रहो. डोन्ट टच मीss" ती समोर हात हलवत ओरडली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि गर्दीतून वाट काढत तिला सुरक्षित पुढे घेऊन गेलो. तरीही ते येडपट लोक मागून फोटो काढत पळतच होते.

मॅनेजरने आम्हाला आत घेऊन पुन्हा शटर ओढले. सगळी गर्दी आता दाराबाहेर थांबली होती. आम्हाला ऑर्डर विचारून जय मॅनेजरशी बोलायला गेला. अजून आतली साफसफाई सुरू होती. आम्ही कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसलो, शेजारी आकाशी फ्रेमच्या काचांची मोठी खिडकी होती. एक येड** तिथेही झूम करून काचेतून फोटो काढायचा प्रयत्न करत होता. आम्ही चेहरे हातांनी शक्य तितके लपवले.

"हम्म, बोल. इथे कशी काय?"

"मी मिस्टर डी ना भेटायला आलेय, घोरपडेंबद्दल सांगायला." ती अंगठ्याचे नख चावत म्हणाली. कॅश कायमच खूप कॉन्फिडन्ट असायची पण आज तीही जरा हललेली दिसत होती.

"घोरपडेबद्दल?" मी कोड्यात पडलो.

"समर, त्यांनी काल रात्री मला कॉल केला आणि आज पहाटे माझ्या बिल्डिंगखाली आले होते." ती खुसफुसत म्हणाली.

"काय? वेड लागलंय काय ह्या माणसाला? तुला कश्याला कॉल?"

"हो ना, मी रात्री तुला सांगायला कॉल केला होता. तू घेतला नाहीस." ती किंचित वैतागत म्हणाली.

हम्म, एक मिस्ड कॉल मी बघितला होता पण ती जनरल गप्पा मारायला करत असेल समजून मी लगेच कॉल बॅक केला नव्हता. "पण तू टेक्स्ट पण केला नाहीस.."

"ही टेक्स्ट करण्यासारखी गोष्ट नाहीये. प्लस मला हे किती सिरीयस आहे ते सकाळी तो माणूस बिल्डिंगखाली दिसेपर्यंत जाणवलं नव्हतं."

"नक्की काय झालंय?" मी पूर्णच भंजाळून टेबलवर पुढे होत विचारलं. घोरपडे अजून स्वत:ला किती नीच शाबित करणार आहे कोण जाणे.

"समर, त्याने मला तुझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी पैसे ऑफर केले! तू मुंबईत आल्यावर तुला घरी आणून बेडमध्ये कॉम्प्रमायझिंग फोटो हवे होते त्याला. तू तयार नसशील तर तो मला ड्रग्ज देणार होता, फोटो स्टेज करायला. आय डोन्ट नो व्हॉट द हेल इज राँग विथ हिम! आय टोल्ड हिम टू फ* ऑफ!! तरीही त्याने रात्री पुन्हा मला टेक्स्ट केला आणि पहाटे बिल्डिंगखाली भेटायला आला. अजून जास्त अमाऊंटची ऑफर घेऊन..."

"आर यू फ** किडींग मी?!" मी उसळून म्हणालो तेव्हा जय आमच्यासमोर येऊन बसला. पुढचा अर्धा तास आम्ही त्याला सगळ्या घटना सांगितल्या आणि पुढचा गेम प्लॅन ठरवला. कॅशने पहाटेचा त्यांचा संवाद फोनमध्ये रेकॉर्ड केला होता कारण त्याला बिल्डिंगखाली बघून ती घाबरली होती. हरॅसमेंटचा गुन्हा दाखल करायचा तर प्रूफ म्हणून काहीतरी असणं गरजेचं होतं. तिच्या फोनमध्ये रात्रीचे त्याचे कॉल डिटेल्स होते आणि बिल्डिंगच्या CCTV मध्येही तो दिसत होता.

मी केसांतून हात फिरवला. मला पलोशी बोलायचं होतं पण नेमका फोन नाही आणि तिचा नंबर पाठ नाहीये. सगळेच नंबर्स फोनमध्ये आहेत. काही झालं तरी मी ठीक आहे. वेळ पडली तर मी आत्ताही रिटायर होऊ शकतो.
पण पलोची ही सुरुवात आहे आणि मी तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.

"हमे पहले मिस्टर डी से मिलना पडेगा. अब पानी सरसे ऊपर चला गया. घोरपडे पुरा अनस्टेबल है. तुम टीममे नहीं रहोगे तो भी ये सब इंडियन्स के लिये अच्छा नही है." जय म्हणाला.

"माझ्या एजंटने आत्ताच फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेतलीय." ती उठत म्हणाली.

"चला, निघू मग.." 

आता घोरपडेचा हा सगळा राडा निपटून टाकायची वेळ आली होती.

---

पलोमा

कोच श्रीराम मला चिन्नास्वामी स्टेडियम आणि मागची त्यांची वर्कआऊट फॅसिलिटी दाखवायला घेऊन गेले.  मला ऑन बोर्ड घ्यायला ते आणि टीम ओनर्स उत्सुक आहेत हे त्यांनी आधीच इंटरव्ह्यू घेताना क्लिअर सांगितलं होतं. माणूस कडक शिस्तीचा पण छान आहे. फिरता फिरता आम्ही आपापल्या गेम फिलॉसॉफीजबद्दल चर्चा केली. त्यांनी समरबद्दल बरंच काही विचारलं, अर्थात ते एक्स्पेक्टेड होतंच.

सगळं बघून आम्ही परत त्यांच्या ऑफिसकडे निघालो. मी फोनवर नजर टाकली. समरकडून अजूनही काही कॉल किंवा टेक्स्ट नव्हता. स्ट्रेंज! एव्हाना त्याची मीटिंग संपायला हवी होती. इंडियन्सना तो हवा होता आणि त्यालाही परत जायचं होतं. त्याच्या मते फक्त पाच मिनिटाचे काम होते.

मी फोन पर्समध्ये टाकला आणि कोचच्या मागून त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. त्यांनी बसायला सांगितल्यावर मी पर्स बाजूला ठेवून समोरच्या खुर्चीत बसले.

"सोss आयम गोइंग टू गेट्टू द पॉइंटा. वी हॅव गॉट सम गायज हू नीड युअर एक्स्पर्टीज. सी, आयम ऍन ओल्ड स्कूल गाय, आ? आय नेव्हर थॉट अ स्पोर्ट्समन विल नीड अ सायकॉलॉजीस्ट!" ते हसले, पण ते खरंच सांगत होते. "आय आल्वेज थॉट आस्किंग फॉर हेल्प इज वीक. आय एम अ बिलीव्हर ऑफ 'सक इट अप अँड परफॉर्म' मेंटॅलीटी. दॅट्स व्हॉट वी वर टॉट बाय एल्डर्स. बट नाऊ माय वाइफ सेज, सोल्पा ॲडजश्ट माडी! इट्स टाईम फॉर मी टू गेट ऑन बोर्ड. नो व्हॉट माय टीम रिअली नीड्स. वी हॅव सम हेड्स फॉर यू टू वर्क ऑन." ते थोडं ओशाळत म्हणाले.

"आय गेट इट. वी आर स्टील इवॉल्विंग अबाउट ऑल थिंग्ज कंसर्निंग मेंटल हेल्थ. अँड इट टूक अस फार टू लाँग टू गेट हिअर, स्पेशली इन इंडिया." मी मान हलवून म्हणाले.

"थॅन्क्स फॉर नॉट पासिंग जजमेंट! ट्रूथ इज वी हॅव ट्रेनर्स, फिजीओज, मसाज थेरपिस्टस.. वी इव्हन हॅव अ लेडी हू लीड्स वीकली मेडीटेशन." ते खांदे उडवत हसले. "आय थिंक, यू विल बी अ व्हॅल्यूएबल असेट टू धिस टीम. आय डीड नॉट बिलीव्ह मच इन थिस सायकॉलॉजी थिंग. बट आय हॅव हर्ड, यू वर्क्ड वंडर्स ऑन सावंत अँड ही वॉज सर्टनली नॉट इझी टू हॅण्डल. आय एम इम्प्रेस्ड!"

मी हसून मान हलवली. "थँक्यू सर. इट ट्रूली मीन्स अ लॉट दॅट यू वूड कन्सिडर मी. कॅन आय थिंक अबाऊट इट?"

"श्योर, श्योर. टेक युअर टाईम, नो प्रॉब्लेम. हिअर्स युअर ऑफर लेटर." त्यांनी एक कागद पुढे सरकवला.

वाचताना सॅलरीच्या आकड्यावर माझे डोळे थबकले. मोहन बागानच्या ऑल्मोस्ट पाचपट ऑफर होती. मी चेहऱ्यावर काहीही भाव न दाखवण्याचा प्रयत्न केला. "आय एम ऑनर्ड, दॅट यू थिंक आय वूड बी अ गुड फिट. आय हॅव सम अदर ऑफर्स दॅट आय एम कन्सिडरिंग, सो प्लीज गिव्ह मी अ डे टू थिंक इट ओव्हर. इट वूड बी मच अप्रिशिएटेड." माझं ह्रदय धडधडत होतं पण मी चेहरा शांत ठेवला.

"फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी, वन्स यू मेक द डिसिजन."

मी चेहऱ्यावर येणारं मोठं हसू कसंतरी थांबवलं. कोणाला मी त्यांच्या टीमचा हिस्सा होण्याची एवढी गरज वाटतेय, ह्याने मला प्रचंड आनंद होत होता. आणि एवढी मोठी ऑफर! खूपच विचारात पाडलं बाबा ह्या माणसाने...

"ओके. आय'ल गेट बॅक टू यू बिफोर आय हेड होम टूमाँरो."

"साऊंडस गुड! आय होप वी विल बी वेलकमिंग यू ऑन द टीम."

मी उठून उभी राहिले. "थँक्यू सर. इट्स ट्रूली बीन ॲन ऑनर." म्हणत मी हँडशेक केला.

ते मला ऑफिसबाहेर सोडायला आले. मी लिफ्टमधून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागले तरीही एक्साईटमेंटमुळे माझे हात थरथरत होते. समोरच कब्बन पार्कचा एट्रन्स होता. त्या शांत, गर्द सावलीच्या रस्त्यावरून मी आत गेले आणि समोरच्या दगडी मासोळीजवळ जाऊन हवेत बुक्का मारत जोरात किंचाळले!! आजूबाजूला खातपीत पहूडलेले दोन चार लोक दचकून माझ्याकडे बघून खिदळले पण मला आतून खूप मस्त वाटलं. मी एकदम बेफिकीर होते.

मी पहिलाच एवढा मोठा इंटरव्ह्यू क्रॅक केला होता. त्यांना माझी इतकी गरज वाटत होती, अर्थात इंडियन्सनाही वाटत असेल. हेल, मी त्यांचा स्टार प्लेअर पुन्हा फॉर्ममध्ये आणला होता. वर निळ्याभोर आकाशात सरकणारे पांढरे ढग पहात मी एका बेंचवर जरावेळ शांत बसले. पुन्हा फोन चेक केला पण अजूनही समरचा काही टेक्स्ट नव्हता. त्याला कॉल केला पण तोही बंद येत होता. शेवटी व्हॉईस मेसेज रेकॉर्ड केला. " हाय.. कशी झाली मीटिंग? मी आत्ताच बाहेर पडतेय. माझी मीटिंग खूप भारी झाली. तुला लवकर सगळं सांगायचंय. उद्यापर्यंत मला त्यांना उत्तर द्यायचं आहे. शक्य तितक्या लवकर मला कॉल कर. आय लव्ह यू!" आणि सेंड चे बटन दाबले.

कदाचित त्याची मीटिंग एक्स्टेंड झाली असेल किंवा बाकी सगळे डिटेल्स वर्कआऊट होत असतील... शेवटी मी कॅब बोलावली आणि हॉटेलसमोर उतरले. आत जाताजाता मी सहज त्याचं नाव गूगल केलं, कदाचित काही प्रेस अनाउन्समेंट आली असेल. पहिला फोटो पॉप अप झाला तोच, समर आणि कश्मिरा! जुना असेल!

झूम करून बघितलं तर आजचीच तारीख! असं कसं होईल? कश्मीरा तिथे कशी? मी रूममध्ये आले तर जुई टिव्हीवर काहीतरी बघत होती. तिला नंतर बोलते म्हणून मी बाथरूममध्ये घुसले. टॉयलेट सीटवर बसून फोन नीट बघितला. त्यांचे आज घेतलेले असंख्य फोटो होते. एकात तो तिला साईड हग करत होता. दुसऱ्यात ती त्याच्या कानात बोलत होती. अजून एकात तो तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला जवळ घेऊन जात होता. मग एका रेस्टॉरंटमध्ये काचेपलिकडे एकमेकांकडे वाकून ते चेहरा लपवत होते. व्हॉट द हेल? हे किस करतायत की काय??

माझ्या छातीत धडधडायला लागलं. एकेक हेडलाईन्स आणि आर्टिकल्स बघताना माझ्या हातांना घाम फुटला.

'Samar Sawant and Kashmira Barve , stonger than ever!!
The Indians superstar all rounder meets with his coach and his loyal supporter, movie star Kashmira Barve was right by his side.'

काये हे!!

क्रमशः

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ३०

मी थरथरत्या हातांनी पुन्हा त्याला कॉल केला. पुन्हा तेच टूक टूक टूक... मी डोळ्यात जमणारे पाणी बोटाने पुसून टाकले.

तो माझ्याशी खेळतोय का?
असं कसं वागेल तो!

याला काहीच अर्थ नाहीय. मी बाथरूमचे दार उघडून बाहेर आले. जुई माझ्याकडे बघून हसली पण माझा चेहरा बघताच तिचं हसू मावळलं. "ओह नो, काय झालं ग?" तिने काळजीने विचारलं.

"मीटिंग मस्त झाली." मी पुढे जाऊन धपकन बेडवर बसले आणि तोंडावर हात घेत आता ओघळणारे अश्रू पुसले.

"मग चांगलंय ना!" ती माझ्याजवळ येऊन बसली.

मी गाल पुसत जोरजोरात मान हलवली. "मी उद्यापर्यंत उत्तर दिलं तर खूप चांगलं पॅकेज मिळणार आहे."

"एक मिनिट. मी समजत होते की समरचं काँट्रॅक्ट होईपर्यंत तुला फक्त वेळ काढायचाय. तू इथे जॉईन करणार नव्हतीस.. काय चाललंय नक्की, मी कन्फ्युज झालेय!"

मी फोन तिच्या तोंडासमोर धरला. "समरने मला काँटॅक्टच केला नाही पण त्याचे आणि कश्मीराचे फोटो सगळीकडे झळकतायत. ती त्याच्याबरोबरच आहे. मी कॉल केला तर फोन बंद लागतोय."

"काय? दॅट डझन्ट मेक एनी सेन्स!!" आता तीही बावचळली.

"ओ गॉड जुई, हा काय गंडीवफशीव करत नाहीय ना? काय चाललंय, मला काही सुधरतच नाहीये.." मी घामेजले हात आणि तोंड टिश्यूने पुसले.

"समरदा? शक्यच नाही. तुझ्याबद्दल केवढा क्रेझी आहे तो! त्याच्याकडे काहीतरी उत्तर नक्कीच असेल." तिने तिच्या फोनवरून कॉल केला आणि अविश्वासाने नकारार्थी मान हलवली.

"तो व्हॉईस मेसेज पाठवेल, होतं असं खूपदा."
तिने कॉल कट केल्यावर, मी उशीवर डोकं ठेवत आडवी झाले.

"काहीतरी लोच्या आहे.." ती विचार करत म्हणाली.

"मेबी, माझं लकच खराब आहे. ज्यांच्यावर प्रेम करेन ते सगळे असेच मला सोडून जातात. ही माझी कायमची डिसऑर्डर आहे!" मी रडत - हसत म्हणाले कारण ही सगळी गोष्ट हास्यास्पद होती. अंगात अड्रेनलिन आणि इमोशन्स एकाच वेळी फेर धरत होत्या आणि मला काहीच समजत नव्हतं. 

"येस! ती पळपुटी डिसऑर्डर बेनीने कधीच ओळखली होती. पण समरमुळे तू आता त्यातून बाहेर आलीस असं वाटत होतं."

"मलापण तसंच वाटत होतं. पण तो कॉल का घेत नाही, तो तिच्याबरोबर का आहे? हे नाही कळत ना!" सगळं ॲड अप होत नसलं, तरी तो माझ्याशी खोटं बोलणार नाही याची खात्री आहे. तो म्हणाला होता, त्यांच्यात फक्त मैत्री आहे. पण तिला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्याचं काय! शांत.. लांब श्वास...

पलिकडे पडलेला सेलफोन वाजला आणि मी उसळून उठत फोन घेतला. जाईचा व्हिडीओ कॉल! माझा चेहरा पडला. कॉल रिसिव्ह करून मी फक्त "हाय..." म्हटलं. मला बघेपर्यंत ती जाम उत्साहात होती.

"व्वा! तुला कॉल वगैरे करून लै भारी वाटलं!" ती बेकरीच्या काऊंटरमागे बसल्या बसल्या, तोंड वाकडं करून फिस्कारत म्हणाली. "इथे कोण गिऱ्हाक नाही म्हणून म्हटलं, बघू तुमचं काय चाललंय. कसा झाला इंटरव्ह्यू, बॅटमॅनचं काय कळलं काय?"

मी श्वास सोडला. पुढची दहा मिनिटं तिला सगळा वृत्तांत सांगितला आणि मला उत्तर माहीत नसणारे सतराशे साठ रॅपिड फायर प्रश्न ऐकून घेतले.

"काय राव! ह्यात काही अर्थच नाही." जाई वर बघून खोलात विचार करत असल्यासारखी म्हणाली. "आजिबातच नै!"

"उम.. आम्हाला तेवढं माहिती आहे जाई! कामाचं काहीतरी सांग!" जुई स्क्रीनमध्ये तोंड घालत म्हणाली. मी फोन उंच धरून आमचे दोघींचे चेहरे दाखवले.

"मी तिथे असते ना, तर आत्ता तुमच्या दोघींचे गळे दाबले असते जोपर्यंत तुम्ही जाग्या होऊन फाईट करत नाही. आपण फुलसुंदर आहोत, रडतराऊत नाही." ती बोटाने कपाळ चोळत म्हणाली.

मी कल्पना करून हसले आणि पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. "बरं मग आपला मर्द मावळणीचा सल्ला काय आहे? तो फोन उचलत नसेल तर? काय करावं?"

"मर्द मावळण!! कायपण शब्द! तर मग डॉ. फुलसुंदर, आपण सायकॉलॉजीस्ट आहात, जरा गणित मांडा की!" जाई आता नेहमीप्रमाणे माझं डोकं आऊट करायला लागली.

"काय गणित मांडणार? कशात काही अर्थच नाहीये." मी ओरडून म्हणाले आणि जुईने मान डोलावली.

"तिचं गणित कच्चं आहे, माहिताय ना!" जुईने खांदे उडवले.

जाईने नाटकीपणे हात उडवले. "देवा.. ह्या घरात मीच एकटीने सगळ्यांचं सगळं करायचं आहे का! मी इथे हे वायझेड रेड वेल्वेट कप केक बनवतेय, पप्पांना ऑनलाईन शॉपिंग शिकवतेय, आजीला ताट वाढून देतेय, अजयला नर्सिंगचे धडे देतेय. आणि आता तुझी सायकॉलॉजीस्ट होऊ? त्यापेक्षा तुझा गळा दाबते, ये!" तिने डोळे मिटून दोन-तीनदा नाटकीपणे खोल श्वास घेतला.

"पण मी चांगली मुलगी आहे. हो की नई? तायडे, स्ट्राँग हो आणि जुई, तिला रडत ठेऊ नको. जर काही अर्थ लागत नसेल, तर आपण का रिॲक्ट करतोय? तू त्याला ओळखतेस. तो असं काही करणार नाही. सगळे तुला सोडून जातात वगैरे विचार करू नको, कोणी तुला सोडूनबिडून जात नाहीये."

तिची बडबड संपायची वाट बघत मी शांत बसले. ती जे सांगत होती त्यात खरंच तथ्य होतं. "ओके."

"ओके? म्हंजे काय? जरा विचार कर की पुरी!"

"विचार करतेय. म्हणूनच ओके म्हणले ना? ओरडू नकोस माझ्यावर.."

"लहानपणी आपल्यापैकी कोणी निराश होऊन, काही सोडून देत असेल तर आपण काय करायचो?" जाईने भुवया उंचावल्या.

"ए, मी काही तिला धरून गदागदा हलवणार नाही. ती आधीच खूप त्रासात आहे " जुई मान हलवत म्हणाली.

"ओके. मग मलाच अश्या वेळेसाठी पाठ केलेला डायलॉग मारावा लागेल! ऊंहू ऊंहू.." तिने घसा साफ केला आणि काउंटरवर चढून पोझमध्ये उभी राहिली. बेकरीच्या चकाचक स्वच्छ काऊंटरवर जाईचे पाय बघून, आमची दीदम मोनिका गॅलर कसं तोंड करेल ते अगदीच डोळ्यासमोर आलं! इतक्या वैतागवाण्या क्षणीही माझ्या बहिणी मला कितीही हसवू शकतात.

"एक बात हमेशा याद रखना बेटा,
हर जगह तन्ने बचाने तेरा पापा ना आवेगा.
मैं तन्ने सिर्फ लडना सिखा सकू हूं,
पर लडना तन्ने खुद है!"
ती महावीरसिंग फोगाटसारखी मांडीवर थाप मारत म्हणाली आणि आम्ही दोघी हसत सुटलो.

तेवढ्यात आतून पमी एक कुकीजने भरलेला ट्रे घेऊन आली. ती दिसताच जाईने खाली उडी मारली आणि धडपडली! पमीने तिला धरत माझ्याकडे बघून हात हलवला. "काय म्हणतोय इंटरव्ह्यू?" तिने विचारलं. "मस्त, तुमचं कसं चाललंय?" मी हसतच म्हणाले.

"हे बघतेस ना!" तिने जाई आणि तिच्यासमोर स्टँड मिक्सरवर फिरताना थांबलेलं बॅटर दाखवत म्हटलं. "चला पैलवान, कपकेक करा!" मी जाईला चिडवलं. "तू उद्या कॉन्ट्रॅक्ट साईन करणारयस काय? अडगे, घाईत काहीपण निर्णय घेऊ नको काय?"

"थॅन्क्स जायड्या, आय लव्ह यू! बाय." म्हणून मी फोन ठेवला. "कसली वेडी आहे ही!" मी जुईकडे बघून हसत म्हणाले.

"कळलं ना क्रेझी ट्विन कोण आहे ते!"

"ते ती आहेच, पण ती म्हणतेय त्यात तथ्य आहे."

"काय?"

"की मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी फाईट करायला हवी."

"नशीब! मी काही तुला गदागदा हलवून ओरडणार नव्हते." जुईने हसत माझ्या हातावर थोपटले.

"नोप! आता ओरडणं, पळणं सगळं बंद. चल बाहेर जाऊ."

"पण नक्की कुठे जातोय आपण?" जुईने कपडे बदलताना विचारलं.

"कोचना भेटायला. माझा निर्णय झालाय." मी पर्स उचलत म्हणाले.

फाईट ऑर फ्लाईट..
ह्यावेळी मी फाईट करणार आहे.

--

समर

"सो, वी हॅव गॉट अ डील?" मि. डी उभे रहात म्हणाले. मी साईन करून पेन बाजूला ठेऊन उठलो आणि त्यांनी पुढे केलेला हात हातात घेतला. "ॲब्सोल्यूटली! थॅन्क्स फॉर मेकिंग धिस हॅपन!"

"वी आर ग्रेटफुल फॉर ऑल यू हॅव डन फॉर द टीम, समर. आफ्टरऑल धिस इज युअर होम पिच.  आय एम ग्लॅड, यू अग्रीड टू एव्हरीथिंग!"

मी मान हलवल्यावर शेजारी उभ्या जयने माझ्याकडे बघून भुवया उंचावल्या. मी पुढे कोच प्रधानांकडे गेलो.

"इट विल बी ॲन ऑनर टू कंटीन्यू वर्किंग विथ यू, समर!" ते माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाले. गेली सहा वर्ष सत्यजित प्रधान इंडियन्सचे असिस्टंट कोच होते आणि ह्या माणसाचा मला कायमच आदर वाटत आला आहे.

सगळ्यांचा निरोप घेऊन मी जयबरोबर बाहेर पडलो. लिफ्टमध्ये शिरल्यावर मी मोकळा होऊन हसलो आणि जयने लांब श्वास सोडला. आम्ही अख्खी दुपार ह्या केबिनमध्ये घालवली होती. जवळजवळ चार तास मीटिंग सुरू होती. ह्या पूर्ण ऑफ सिझनमधल्या सगळ्या घटना डिस्कस झाल्या. अपॅरंटली, घोरपडे पूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेला होता. त्याबद्दल अनेक तक्रारी आधीच आल्या होत्या आणि आजच सकाळी अलिशाने इन्टर्नल कमिटीकडे त्याच्याविरुद्ध पॉश ॲक्टखाली कंप्लेंट केली होती. कश्मीराने तिचा सगळा किस्सा सांगून पुरावे दाखवले. हे सगळं कशासाठी तर मला काही चुकीचं करताना पकडून, ब्लॅकमेल करून अजून एक वर्ष खेळवण्यासाठी!

हा मूर्ख माणूस स्वत:च्या महत्त्वाकांक्षेपायी एवढा आंधळा झाला होता की मी साईन करण्याचाच विचार करत होतो हेही त्याला समजले नाही. मिस्टर डी म्हणाले की प्रधानांना आधीच हे प्रमोशन ऑफर केले होते आणि माझी घोरपडेबरोबर मीटिंग झाल्यावर ते त्याला फायर करणार होते. त्यांना वाटत होतं घोरपडे माझ्या खूप क्लोज आहे आणि त्याला काढलं तर कदाचित मी खेळायला तयार होणार नाही!!

"मला काहीच क्लू नव्हता, पण जे झालं ते बेश्ट झालं!"

"अँड यू गॉट पलोमा'ज कॉन्ट्रॅक्ट टू?" जयने विचारलं.

"बेस्ट पार्ट म्हणजे मी सांगायच्या आधीच त्यांनी तिला हायर करायचं ठरवलं होतं." मी खुषीत हसत म्हणालो.

"कूल! प्रधान कोच झाले हे अजून बीलीव्ह होत नाहीय! घोरपडेपेक्षा लाखपट बेटर आहेत ते."

"हो!" मी मान खाजवत म्हणालो. "त्या वाय झेडने माझ्या फोनचा चुरा केला ना पण... पलोपर्यंत लवकर पोचायला हवं पण माझे सगळे कॉन्टॅक्ट त्या फोनमध्ये आहेत. तुझा फोन दे, मी तिच्या हॉटेलवर फोन करतो."

जयने त्याचा फोन खिशातून काढला. "होली शीट!! मला खंडीने टेक्स्ट येत आहेत. दिवसभर तुझे आणि कश्मीराचे फोटो वायरल झालेत. सगळ्यांना वाटतंय की तू तुझ्या फेमस  गर्लफ्रेंडबरोबर जाऊन कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय."

"फ*! पलो अश्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही ठेवणार." हातातल्या फोनवर मी माझे कश्मीराबरोबरचे फोटो स्क्रोल करत म्हणालो. तिच्या खांद्यावर हात ठेवून जाताना आणि कॅफेमध्ये तिच्याकडे झुकून बोलतानाचा फोटो समोर आला. आऊट ऑफ कंटेक्स्ट, गोष्टी किती वेगळ्या वाटायला लागतात! मला माहितीये काही झालं नाही आणि पलो मला ओळखते. ती नक्कीच विश्वास ठेवणार नाही.

जर ती पळायला कारण शोधत नसेल तर!

ही पहिली वेळ नाहीय आणि ह्यावेळी मी तिला पळूच देणार नाहीय.

तिने फक्त घाईत कुठला निर्णय घेऊन दुसरी टीम जॉईन केली नाही म्हणजे मिळवलं. आम्हाला हवं ते सगळं आत्ता माझ्या मुठीत आहे. मी हॉटेलच्या नंबरवर कॉल केला, त्यांनी तीन वेळा तिच्या स्वीटमध्ये कॉल ट्रान्स्फर केला पण तो नुसताच वाजत राहिला. "फ*" फोन बंद करून दाराबाहेर पडताना, समोर बघून मी ओरडलो.

समोर अजूनही कॅमेरे रोखलेलेच होते. ह्यांना काहीतरी तुकडा द्यायला हवा, दिवसभर इथे ठाण मांडून बसलेत.

"समरसर ss समरसर ss आपने साईन किया? आप टीम मे हो ना? आर यू कमिंग होम?" सगळीकडून प्रश्न टणाटण येऊन आपटले.

मी त्यांच्यासमोर जाऊन थांबलो आणि मान हलवली. "येस. मैने साईन किया. आय'ल बी प्लेईंग फॉर द इंडियन्स. लेकीन एक चीज क्लिअर करनी है. कश्मीरा अँड आय, आर नो लाँगर टुगेदर अँड वी हॅवंट बीन फॉर अ लाँग टाईम. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स, नथिंग मोर." मी दिलेल्या ज्यूसी बाईटवर खूष होत सगळीकडून फ्लॅश चमकू लागले. "सो, आर यू डेटिंग एनीवन?" कोपऱ्यातून एकजण ओरडला.

"नॉर्मली, मैं अपनी पर्सनल लाईफ डिस्कस नहीं करता. बट टुडे, आय एम पुटींग इट ऑल आऊट. येस, आय एम डेटिंग समवन अँड शी नोज हू शी इज. गो अहेड अँड प्रिंट दॅट!" मी हात हलवला आणि जयकडे निघालो. कारकडे जातानाही जयचं हसणं थांबत नव्हतं. "यार.. माझ्याकडे फोन नाहीये. तू फ्लाईट बघितली?"

"सगळं रेडी आहे बॉस. आपण एअरपोर्टकडेच निघालो आहोत." त्याने कारमध्ये बसल्यावर सांगितलं आणि माझ्या हातात नवा सेलफोन ठेवला. "नवीन सिम टाकलंय, नंबर पोर्ट केला पण तो सुरू व्हायला बारा तास लागतील." तो जरा वाईट चेहऱ्याने म्हणाला. "हां, उद्या वेन्डी कोल्हापूरला जाईल, मी कार रेडी ठेवली आहे."

"फास्ट काम!! म्हणून तू एवढी मोठी सॅलरी डिझर्व करतोस!" मी हसून त्याच्या खांद्यावर थाप मारली. कारमध्ये आमच्या हसण्याचा आवाज भरून राहिला. "ट्रूली, आय एम लकी टू हॅव यू! थॅन्क्स डूड!"

"मेरा काम ही है बॉस! यू गॉट द कॉन्ट्रॅक्ट, नाव गो गेट द गर्ल!"

"यप! शी'ज नॉट गेटींग अवे धिस टाईम!"

अँड आय मीन इट.

क्रमशः

लेख: 

नभ उतरू आलं - ३१

हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात लांबलचक दिवस होता. नशिबाने सहाची फ्लाईट मला दोन तासात बंगलोरला घेऊन आली आणि कॅब ड्रायव्हरने बंगलोरच्या घट्ट जमलेल्या ट्रॅफिकमधूनसुद्धा शॉर्ट कटस् काढत पाऊण तासात मला माझ्या आवडत्या लीला पॅलेस समोर पोहोचवलं. हुश्श, आता मला फक्त पलोला गाठायचे आहे.

रिसेप्शनिस्ट सुरुवातीला कॉन्फिडेंशीअल इन्फो म्हणून मला तिच्या स्वीटचा नंबर सांगत नव्हता, जरी तो स्वीट माझ्याच कार्डवरुन बूक झाला होता. मग अचानक त्याला मी कोण आहे ते लक्षात आलं आणि माहितीच्या बदल्यात त्याने सेल्फी काढायला सुरुवात केली. पाच मिनिटं वेगवेगळ्या अँगलने सेल्फी काढल्यावर एकदाचं त्याचं मन भरलं. 

"डूड, आय रिअली नीड टू गो. थॅन्क्स फॉर युअर हेल्प!" म्हणत मी सुटका करून घेतली.

"काँग्रॅट्स ऑन सायनिंग टुडे! बाय द वे, आय सपोर्ट इंडियन्स!" तो अंगठा दाखवत ओरडला.

मी मान हलवून भराभर लिफ्टमध्ये निघालो. तिसऱ्या मजल्यावर बाहेर आलो तोच फोनची रिंग वाजली. खिशातून सेलफोन काढून पाहिला तर जाईचा व्हिडिओ कॉल येत होता. ओह, फोनने हॉटेलचे वाय फाय नेटवर्क पकडले होते. "हॅलो!!" मी कॉल रिसिव्ह करताच ती ओरडली. "आहेस कुठं तू बॅटमॅन?! काय चाललंय काय?"

"तू का एवढी एक्साईट होऊन कॉल करतेयस?"

"ताई तुला किती फोन करत होती! नंतर आम्ही सगळेच करत होतो आणि अचानक तू त्या फिल्म स्टारच्या गळ्यात गळे घातलेले फोटो आले! आमची फॅमिली इमर्जन्सी झाली माहित्ये, तुझ्यामुळे!" ती मान हलवत म्हणाली.

"मी पलोलाच भेटायला आलोय इथे, बंगलोरला. मोठी स्टोरी आहे, पण गळ्यात गळे वगैरे काही नव्हते! आणि माझा फोन फुटला. मी हॉटेलवर खूप कॉल केले पण ती बाहेर गेली होती." मी सांगताच जाईने स्क्रीनवर आ वासला.

"हो, ती त्या कोचना भेटायला गेली होती. तिला खूप मोठी ऑफर होती आणि आज उत्तर द्यायचं होतं."

आता आ वासायची माझी टर्न होती. "सिरीयसली?" मी विचारलं.

"मला काही माहीत नाही, जुई म्हणाली होती की त्यांना आजच उत्तर द्यायचं आहे. तो आमचा शेवटचा फोन होता, मग त्या कोचला भेटायला गेल्या. तेव्हापासून मी तुला कॉल करायचा प्रयत्न करतेय." ती घडाघडा बोलून मोकळी झाली.

शिट! पलो आमच्यावर इतक्या पटकन गिव्हअप कशी करू शकते! मी डोक्यावरून हात फिरवला. मी तिला शब्द दिला होता. माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तिने दुसऱ्या टीमची ऑफर स्वीकारली, याचं मला जास्त वाईट वाटत होतं. व्हेअर्स हर फेथ इन मी? इन अस?

तिने जस्ट फोटो बघितले आणि हात सोडून दिला. ह्याचा मला राग येतोय. अजूनही तिचा एक पाय दाराबाहेरच होता. "हे, तू चिडू नको आणि फक्त बोल तिच्याशी." दिदी बेडवर बसून म्हणाली. जाईने फोन तिच्या हातात दिला होता. मी हसून मान हलवली.
"दिदी, जरा थांब." म्हणून मी ३०३ ची डोअरबेल वाजवली. जुईने दरवाजा उघडला. मला समोर बघून ती चमकली आणि लगेच मोठ्ठा श्वास सोडला. "बरं झालं, तू आलास समरदा." ती जड जिभेने म्हणाली. तिचे गाल लालसर दिसत होते.

"तुम्ही काय पिलीबिली नाही ना?" मी आत येत विचारलं.

"रेड वाइन. थोडीशी! इथल्या मिनी बारमध्ये होती आणि आमचा मूड बेकार होता म्हणून!" ती जीभ चावून हसत म्हणाली. मी फोन तिच्या हातात दिला आणि ती जाईशी बोलायला लागली. पलोमा लिव्हिंग एरियात दिसत नव्हती, मी बेडरूमच्या दारात गेलो आणि ती बाथरूममधून बाहेर आली. माझ्याकडे लक्ष जाताच तिचे ओठ विलग झाले आणि पाणीदार डोळे विस्फारले.

तेच काकवीचं गुऱ्हाळ!

"हेय... आज कोणीतरी जास्तच बिझी होतं.." ती तरंगतच हळूहळू माझ्याजवळ आली. तिची जीभ जड झाली नव्हती पण गाल आणि नाकाचा शेंडा लालीलाल झाला होता. तिनेही नक्कीच एखाद - दोन ग्लास गटकावले होते.

"इकडे ये आणि माझ्याशी बोल." मी तिचा हात धरून तिला आत ओढली आणि तिने तिच्यामागे दार बंद होऊ दिलं. "मी तुला किती कॉल केले, समर.." आतल्या सोफ्यावर तिला घेऊन बसताना ती माझ्या कानात कुजबुजली.

"घोरपडे पार हुकला होता, पलो!" मी म्हणालो आणि तिला सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. घोरपडेने आम्हाला फॉलो केल्याची कबूली देण्यापासून, त्याने माझा फोन फोडणे, कश्मीराने येऊन सांगितलेली गोष्ट, मिस्टर डी ना भेटणे आणि पुढचं सगळं. ती ऐकत होती. मान हलवत होती आणि सगळं समजून घेत होती.

"म्हणून तू तिच्या खांद्यावर हात टाकून नेत होतास?" तिने हनुवटीवर बोटाने टॅप करत विचारलं.

"नाही. माझा हात तिच्या खांद्यावर फक्त अर्धा मिनिट असेल. पॅप्सच्या गर्दीतून तिला सुखरूप बाहेर नेत होतो आणि अर्थात त्यांनी तेवढ्यात फोटो काढले. मला ती नकोय, तुला माहिती आहे. मला माहिती आहे आणि तिलाही माहिती आहे. यू आर 'इट' फॉर मी, पलोमा फुलसुंदर! कायमच होतीस. आणि जर तू इतक्या सहजपणे आपल्यावर गिव्ह अप करून, दुसरी टीम जॉईन करत असशील, नुसती माझ्यावर चिडल्यामुळे, तर मेबी आय एम नॉट 'इट' फॉर यू."

"गाल फुगवून बसू नको, समर सावंत." ती नाक उडवून माझ्याजवळ सरकली. तिने दोन्ही हातांनी माझा शर्ट धरून ठेवला होता. "यू हॅव ऑल्वेज बीन 'इट' फॉर मी!"

मी खिशातून इंडियन्सच्या ऑफर लेटरची गुंडाळी बाहेर काढली. "मी हे तुला स्वतः डिलिव्हर करायला घेऊन आलो. मला तुझ्यासाठी अजिबात काही सांगावं लागलं नाही. मी टीममध्ये असलो किंवा नसलो तरी ते तुला जॉब ऑफर करणारच होते. अर्थात तेव्हा त्यांना तू दुसरी ऑफर ॲक्सेप्ट केल्याचं माहीत नव्हतं."

"आss ह, तुला दुसऱ्या ऑफरबद्दल कळलं होय?" तिच्या ओठांचे कोपरे वर उचलले गेले. "च्यक, कसली भारी ऑफर होती!"

ही मला चिडवतेय काय?

"इंडियन्सनी त्यांच्या डबल पॅकेज ऑफर केलंय. अर्थात तुला पैशाचा इश्यू नसणार, कारण आपण एकमेकांबरोबर असू. बास. पण तू माझ्यावर विश्वास न ठेवता, पळून गेलीसच ना!" मी तिचे केस कानामागे सारले आणि गालावरून हात फिरवला. मला एकाच वेळी तिचा एवढा राग राग आणि तिला भेटल्याचा आनंद कसा काय वाटू शकतो?!

"असंय का?" तिने डोळे मोठे करून विचारलं.

"असंच आहे." मी तिच्या कपाळाला कपाळ टेकून डोळे मिटले.

"आता कोण कन्क्लूड करायची घाई करतंय? फॉर युअर इन्फो, मी साईन केली नाही! मी त्यांना भेटायला गेले होते कारण मला आजच उत्तर द्यायचं होतं. आणि कोच श्रीराम माझ्याशी इतकं छान वागले होते की त्यांना नुसतं फोनवर नाही सांगणं, मला पटत नव्हतं."

"ओके. मग तू काय सांगितलं त्यांना?"

"मी म्हटलं, तुमची ऑफर खरंच चांगली आहे पण मला ॲक्सेप्ट नाही करता येणार. मी सांगितलं, की मी एका अडियल तट्टूच्या प्रेमात पडलेय, जो माझा साधा कॉलही घेत नाहीये. पण त्याने काही फरक पडत नाही कारण मी त्याच्या शेजारी ठाम उभी असणार आहे, आम्ही एकत्र काम करत असू किंवा नसू. आपण खूप वर्ष एकमेकांशिवाय घालवली, आता मी तुझ्यापासून लांब कुठेही राहणार नाहीये."

माझ्या ओठांनी तिचे ओठ ताब्यात घेतले आणि माझं आयुष्य त्यावर अवलंबून असल्यासारखं किस करत राहिलो. पुढच्या श्वासापेक्षाही मला आत्ता तिची गरज होती, आईशप्पथ!!

मी बाजूला झालो तेव्हा तिचे श्वास जोरजोरात सुरू होते आणि ती माझ्याकडे बघून हसली.

"फाईट ऑर फ्लाईट!" मी हळूच म्हणालो. "ह्या वेळी तू पळून कशी काय गेली नाहीस?"

"हम्म.. जाईने जाम आरडाओरड केली. दंगलचा डायलॉग वगैरे मारला."

मला हसायला आलं. "जाईला थँक्यू कार्ड पाठवू काय!"

"खरं सांगायचं तर, मी सगळा विचार केला, तेव्हा ह्या सगळ्याचं नीट गणित बसत नव्हतं. मी तुला ओळखते आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे."

"मला अजून काहीच विचारायचं नाहीय." म्हणून मी पुन्हा एकदा तिला किस केलं.

तेवढ्यात दारावर नॉक होऊन दार उघडलं गेलं. डोळ्यांवर आडवा हात धरून जुई उभी होती. "उम्.. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मला खूप भूक लागलीय. रूम सर्व्हिस ऑर्डर करतेय, तुम्ही काय घेणार?"

पलोने तिच्या दिशेने एक कुशन फेकलं. जुईच्या हातातल्या फोनवर दिदी खिदळली. "तू एकटं सोड ग त्यांना, मी सांगते काय ऑर्डर ती!"

"लेट्स गेट अस वन मोर रूम!" मी हसत पलोच्या कानात म्हणालो.

"काऊंटींग ऑन इट, सुपरस्टार!" ती हसत माझा हात धरून जेवायला बाहेर घेऊन गेली.

इथेच, ह्याच जागी मला असायचं होतं. फुलसुंदर बहिणींच्या गराड्यात आणि मी प्रेम करत असलेल्या पहिल्या, शेवटच्या आणि एकुलत्या एक मुलीशेजारी.

----

पलोमा

"तुम्हे इतनी जल्दी फील्डपर जानेकी जरुरत नहीं है.. यू नो दॅट, राईट?" मी समोर बसलेल्या इम्बाला विचारलं. तीन आठवड्यापूर्वी नेट प्रॅक्टीस करताना त्याच्या नाकावर बॉल आदळून नाकापासून ओठापर्यंत वीस टाके घालावे लागले  होते.

"आय एम यूज्ड टू इंज्यूरीज, डॉक!" तो नाकाला हात लावून जमेल तेवढं हसत म्हणाला. ते सगळेच मला अशी हाक मारत होते, मी नावाने हाक मारायची रिक्वेस्ट करूनसुद्धा. ऑन बोर्ड आल्यापासून आता ह्या गोष्टी मला रूटीन झाल्या होत्या आणि कामाची चांगली लयही गवसली होती. "मेरी अम्मी थोडी टफ लेडी है, बचपनसे उन्होने हमारी इंजूरीज पे कभी ज्यादा अटेंशन नहीं दिया. सो हॅविंग समवन केअरिंग लाईक यू अराऊंड... आय डोन्ट माईंड इट."

"इम्बा, वापस हॉस्पिटल जाना है क्या? स्टॉप फ्लर्टींग!" समर हसत दरवाज्यातून डोकावत म्हणाला.

"हे, उसने सच मे मुझे बहोत मोटिवेट किया है. आय एम ॲक्च्युअली थिंकिंग अबाऊट सेटलिंग डाऊन. इट्स नाइस टू हॅव समवन केअर, व्हेन युअर फेस स्प्लिट्स इन हाफ!" इम्बा खुर्ची सरकवून उभा रहात म्हणाला. "शुक्रिया डॉक! बट आय एम रेडी टू गो ऑन द फील्ड अँड किक सम ॲस!"

"गुड! तीन दिन बाद अपना फर्स्ट मॅच है और हमे पंजाबको पहलेसेही डाऊन रखना है. आज उनका रँकिंग हमारे ऊपर है, लेकीन तीन दिन बाद ये चेंज होना चाहिए. हम ये कर सकते हैं! है ना?" समरने त्याच्या खांद्यावर थाप मारुन, नाकावरच्या जखमेवर नजर फिरवली.

तो त्याच्या बॉईजबरोबर कितीही रावडी, क्रूर वागला तरी त्या सगळ्यांना खरं काय ते माहीत होतं. हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारणाराही तोच होता, इम्बा सुखरूप असण्याची वाट बघत. टीम त्याची फॅमिली होती आणि त्या सगळ्यांवर त्याचं तेवढंच प्रेम होतं. हे बघून मी त्याच्या अजूनच प्रेमात पडले होते. बाहेर पडत इम्बाने बाय म्हणून हात हलवला आणि समरने त्याच्यामागे दार लावलं.

"तुमच्यासाठी काय करू शकते, मिस्टर सावंत?" मी आरामात खुर्चीत मागे टेकत विचारलं.

"डॅम, पलो. तू हा सेक्सी पेन्सिल स्कर्ट घालून बिल्डींगमध्ये आहेस, या विचाराने मी वेडा होतोय.

"हायली अनप्रोफेशनल, बॅटमॅन!" मी पाय सरळ करून स्कर्ट जरासा खाली ओढत म्हणाले. "डू यू हॅव ॲन इश्यू, आय कॅन हेल्प यू विथ? पाच मिनिटात माझी पुढची अपॉइंटमेंट आहे."

"ओह या! खरंच एक प्रॉब्लेम आहे, जो फक्त तू फिक्स करू शकतेस." त्याने पुढे येऊन माझी चेअर गोल फिरवून समोर घेतली आणि दोन्ही बाजूला हात ठेऊन मला बंदिस्त केले. "मला अजून सकाळचे तुझे ओठ आठवतायत. अशा वेळी वेट्स कशी उचलणार मी?" त्याने पुढे होऊन पटकन मला किस केलं.

मी मान मागे टाकून खिदळले. "त्यासाठी घरी गेल्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे."

"करायलाच पाहिजे! सो, हाऊज युअर डे गोइंग? सगळे चांगले वागतायत ना तुझ्याशी?"

"हम्म, फक्त टीमचा कॅप्टन सारखा त्रास देतो." मी ओठ चावून म्हटलं.

त्याने मला उचलून स्वतः खुर्चीत बसला आणि अलगद मला मांडीवर बसवलं. "हे काय सांगायची गरज आहे का! कॅप्टन सांगेल ते  ऐकावं लागतंय. इट वूड सर्व यू राईट टू फॉलो हिज लीड.."

"व्हेअर आर यू लीडींग मी, समर?"

"इथेच. माझ्या शेजारी. तुला मी हवा असेन तोपर्यंत." तो माझ्या कानात कुजबुजला.

"आय थिंक, फॉरेव्हरसुद्धा पुरेसं नाहीय." मी हसत म्हणाले.

"हम्म.." श्वास सोडत त्याने माझ्या कपाळाला कपाळ टेकवले.

दरवाजावर टकटक झाली तशी पटकन मी खाली उतरले आणि श्श करून त्याला डेस्कपलिकडे हाकललं. तो हसायला लागला. "तू अशी टेन्शनमध्ये क्यूट दिसतेस! सी यू लेटर." म्हणून डोळे मिचकावत तो बाहेर गेला.

क्रमशः

लेख: