वाटेवर चालत जाता...

वाटेवर चालत जाता.... पावलास पंख फुटावे...
उचलून पाऊल अलगद... आकाश कवेत भरावे....

नभ श्यामनिळे सोनेरी... मजसाठीच ते झुकणारे....
मी पंख जरा पसरवता....संगे पल्याड नेणारे....

क्षितीजावर पाऊल पडता... नवसृष्टीचा आवेग...
मागे उरल्या शब्दांचा... घनश्याम सावळा मेघ...

क्षितिपार विहरून येता... मन घरट्याशी उतरावे....
नभ अवखळ अंगण होऊन.. उंबऱ्यात उतरून यावे..
-कल्याणी

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle