घे पांघरुन चांदण्या.......

*** घे पांघरुन चांदण्या ***

आज शुभ्र चांदण्या रात्री
प्रितीचा मंदसा दरवळ
बसूया छोट्या पुलियावर
ऐकत नदीची खळखळ —(१)

घेऊ पांघरुन चांदण्या
सर्वांची चुकवून नजर
प्रश्न पडेल एकांताला
करु या क्षणांना अमर —(२)

वाहे बघ चैतन्याचे वारे
नटव्या नक्षत्रांचे नखरे
मैफिलीत रंगून जा प्यारे
तन-मन डोले बावरे _ (३)

पाहू शकेना प्रीत सोहळा
लाजला वाटे रजनीपती
मेघा आड कसा हा दडला
की सूज्ञ आहे तारकापती? — (४)

वेगळेच सांगे ही कालगती
नयनी केवळ अश्रु दाटती
घे रे ! घे पांघरुन चांदण्या!
उभी स्मृतीच्या काठावरती — (५)

विजया केळकर_________
नागपूर

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle