September 2020

चिठ्ठी

"काक्कुआज्जी!"
ती चिरपरिचीत हाक हवेत विरते न विरते तोच फाटक सताड उघडे टाकून तो धापा टाकत आत पळत आला. फाटकाची कडी त्याचा हात जेमतेमच पुरत असे. तरी तो प्रयत्न करून फाटक उघडायचाच. ती हाक शोभाताईंनाच उद्देशून आहे हे ताडले तरी मुग्धा बैठकीत आली.
"कोण आहे? "
अंगावर जेमतेम कपडे घालून त्याच्यापेक्षा मोठ्या टाॅवेलला सावरत उभ्या त्या बटूला बघून तिला हसू आलं. तरी तिने वरकरणी सरळ चेहरा ठेवत पुन्हा विचारलं, "कोण बरं?"
"अण्ड्राग"
"काय? Android?!", नव्यानेच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला course आठवला मुग्धाला.
"नै कै. अ..न..रा..ग"

इन्क्टोबर (Inktober 2020)

तर तोच तो आपला पवित्र महिना इंक्टोबर आलेला आहे Blessed

चला मग, उचला पेन, पेपर आणि चित्र काढत्या व्हा.

यावेळी ईतर मैत्रिणींचा तर सहभाग हवाच आहे पण zentangle वर्कशॉपमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या मैत्रिणींची चित्रे हवीच आहेत Nerd :ड

रोज नाही जमलं तर जमेल तितके दिवस काढा पण काढा.... काही प्रॉब्लेम नाही..
डूड्ल, zentangle, folk art अजून काही... काहीही काढू शकता.

होऊन जाउ दे कल्ला Dancing Heehee

ही यावर्षीची प्रॉम्प्ट लिस्ट ( यानुसारच केले पाहिजे असे अज्जिबात नाही )

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle