बदतमीज़ दिल (लेखमालिका - २)

Keywords: 

बदतमीज़ दिल - ३२

माझ्या अंगातला प्रत्येक स्नायू थकलाय, हाड न हाड विव्हळतंय. मी आत्ताच्या आत्ता आडवा होऊन पूर्ण आठवडाभर झोपून राहू शकतो. आजपर्यंत मी खूप मोठ्या, किचकट सर्जरीज अनुभवल्यात पण सोनलशी स्पर्धा कोणीच नाही करू शकत. मला सेलिब्रेशन म्हणून एक ओरिओ मिल्कशेक आणि झोप हवीय. स्क्रब करता करता अनिश त्याचं डोकं हळूहळू ताळ्यावर आणत होता, हायपर मोडवरच्या शरीराला शांत व्हायला सांगत होता. 

त्याने थांबून एक खोल श्वास घेतला. लढाई संपली. सोनलला थोड्या वेळापूर्वीच ICU मध्ये शिफ्ट केलंय. आता त्याला फक्त तिच्या आईवडिलांना भेटून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची बातमी द्यायची होती. ऑफ कोर्स, तो जरा घाबरल्याचा भाग वगळून. फायनल ECG आणि कार्डीऍक MRI चे रिपोर्ट बघेपर्यंत त्याचा मेंदू थाऱ्यावर नव्हता. सोनलचं हृदय आता जसं असायला हवं तसं काम करतंय. लवकरच तिला उठून बसता येईल. ह्यूमन बॉडी इज अ फसी बिच! वी कॅन ओन्ली होप फॉर बेटर.

त्याने हातावरचा फेस धुवून शेजारचा नॅपकिन उचलला. सायरा अजूनही आत आहे, शेवटच्या साफसफाईमध्ये मदत करतेय. ती माझ्याइतकीच थकलेली असणार. माझ्यासारखीच तीही दोन दिवस इथे आहे. सोनलच्या आईवडिलांना भेटण्यापासून, प्री ऑप तयारी ते सर्जरी सगळं ती न थांबता करतेय. आताही तिला निघायला सांगितलं तरी ती स्वतःहून नॅन्सीला मदत करते आहे. पुन्हा घरी जाऊन ती बाकीची कामं करेल, ग्रोसरी आणण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सगळंच. रोज रोज इतकं सगळं कोण करतं?

सकाळी तिला सर्जरी होणार नाही म्हणून संगीतल्यावरही तिने आधी त्याला कॉफी आणून दिली, डोकं शांत करायला मदत केली. ती ह्या केससाठी उत्सुक होती. लीगल टीमने हो म्हणण्याची ती त्याच्याइतक्याच असोशीने वाट बघत होती. त्यांनी हो म्हटल्यावर तिने चमकत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्या क्षणी त्याला जाणवलं की तिचं जगावर, माणसांवर आणि माणुसकीवर त्याच्याइतकंच प्रेम आहे.

ह्या केससाठी ती खूप महत्त्वाची होती. फक्त ती शेजारी असल्यामुळेच त्याचं मनोबल टिकून राहिलं होतं. तिच्या जवळ असण्यानेच त्याच्या हातून एवढं कठीण काम पूर्णत्त्वाला गेलं.

ती दारातून नर्सेसना बाय करून आत येताना तो बघत होता. त्याला अजूनही तिथेच बघून तिच्या भुवया उंचावल्या. इतर वेळी एव्हाना तो निघून गेला असता पण आज तो विचार करत वेळ काढत होता.

"कसं वाटतंय?" नॅपकिन लॉंड्री बास्केटमध्ये टाकत त्याने विचारले.

ती एक मोठा श्वास सोडून हसली. तेवढ्यानेच सगळं कळलं. "माझ्या पूर्ण आयुष्यातला हा क्रेझीएस्ट डे आहे! मी आत्ता इथेच झोपेन आणि पुन्हा कधीच उठणार नाही." तिने हात धुताधुता मान मागे वळवून त्याच्याकडे बघितलं. ती अजूनही हसत होती पण तिच्या ओठांचा एक कोपराच त्याला दिसत होता. "आय कान्ट बिलीव्ह, यू डिड इट!"

"नॉट मी, 'वी' डिड इट!" तिच्या जवळ जाण्याची इच्छा आवरत तो फक्त हसला.

ती मान हलवून हसली आणि खाली हातांकडे पाहिलं.

सध्या खाणं आणि झोप सोडून त्याच्या डोक्यात काही यायला नकोय पण ती तिथे आहेच. कायमच.

"अनिश, यू आर अमेझिंग, रिअली. तुम्ही लोकांसाठी जे करता, ते.. " तिने मान हलवत खाली बघितले. "आय मीन, नुसतं तुमच्याबरोबर ओआरमध्ये असण्यानेसुद्धा मला आनंद होतो. मी हा जॉब घेतल्याबद्दल आज मला खूप बरं वाटतंय."

अभिमानाने त्याची छाती फुलली आणि अचानक त्याला त्या ग्रँटबद्दल आणि ग्रँट मिळाली तर पुढे काय काय काम करता येईल ते तिला सांगावसं वाटलं, पण वेळ खूप कमी होता. त्याला सोनलच्या आईवडिलांना अजून ताटकळत ठेवायचं नव्हतं, त्यांना भेटणं जास्त महत्त्वाचं होतं.

"चल माझ्याबरोबर.." तो दाराकडे वळून म्हणाला.

"सिरीयसली? ओके, हे मी आधी कधीच केलं नाहीये." ती हसत त्याच्या मागे जात म्हणाली.

---

पहाटे जाग आली तरी तो तसाच बेडवर पडून राहिला. फोन हातात घेऊन वेळ बघितली तर काल पाच्छीचे चार मिस्ड कॉल होते. हम्म ती बरेच दिवस दिवाळीला घरी राहायला बोलावतेय. तो दिवाळी आणि सुट्ट्यांबद्दल विसरूनच गेला होता. हॉस्पिटलमध्ये सगळीकडे दिवाळी डेकोरेशन दिसतंय. रिसेप्शनवर एक डेकोरेटीव कंदीलपण टांगलाय. डॉक्टर्स लाऊंजमध्ये सगळीकडून ड्राय फ्रूट्स आणि मिठाईचे गिफ्ट बॉक्सेस येत आहेत.

मी दिवाळीच्या दिवशी तरी यायला हवं म्हणून पाच्छी मागे लागलीय. त्याने अजून ठरवलं नाही. पाच्छीच्या हातचं जेवण कितीही टेम्प्टिंग असलं तरी तिचे लग्नाबद्दल प्रश्न खूप इरिटेटिंग असतील. त्याला कुणी आवडलीय का हा शोध घेणं आणि तन्वीची प्रेग्नन्सी कुठवर आली, लग्न केल्यामुळे तिचं कसं छान चाललंय वगैरे आडून आडून बातम्या देणं ह्या सगळ्या गोष्टी सहन करणं त्याच्या जीवावर येत होतं. त्यापेक्षा ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन पेपरवर्क संपवणे हा बेटर ऑप्शन आहे.

त्याला वाटत होतं आज बहुतेक अख्खा दिवस तो झोपून राहणार, पण रोजच्यासारखी जाग आलीच. तो डोक्याखाली हात घेऊन छताकडे बघत पडून राहिला. सायरा सुट्टीत काय करेल? दिवाळी साजरी करत असेलच, कदाचित तिला चुलत वगैरे भावंडं, नातेवाईक असतील. पण त्याने जेवढं ऐकलं त्यावरून ही शक्यता कमी आहे. बहुतेक त्या दोघीच घरी असतील.

त्याच्या मनात शेवटच्या अश्या भावना कुणासाठी आल्या होत्या ते आठवावंच लागेल. त्याला पुन्हा हायस्कूलमध्ये असल्यासारखं वाटत होतं. सायरा म्हणजे शेजारची एक कधी न मिळू शकणारी मुलगी आणि तो तिच्या मागे मागे करणारा नर्ड!

त्याचे विचार तिच्यापर्यंत पोचले बहुतेक! नाईट स्टँडवर ठेवलेल्या मोबाईलची स्क्रीन उजळली. सायरा कॉलिंग! दुसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आवाजात पोचलं होतं. "सायरा."

"हॅलो! " तिचा आवाज जरा गोंधळलेला होता. "सॉरी इतक्या लवकर कॉल केला. सोनलचा काही अपडेट आहे का? मला जरा काळजी वाटत होती."

"काल मी निघालो तेव्हा व्यवस्थित रिकव्हरी होती. आता थोड्या वेळात मी पोचलो की तुला अपडेट देतो."

"हुश्श! गुड." संभाषण थांबून दोन्हीकडे शांतता पसरली. तिने कॉल करण्यासाठी दिलेलं कारण संपून दोघांच्या मनात रेंगाळणाऱ्या कारणावर यायला वेळ लागत होता.

"तुम्हाला माहिती आहे, ही सुट्टी आधीची शेवटची सर्जरी होती. पुढच्या आता सात दिवसांनी शेड्यूल्ड आहेत." ती सहज म्हणाली.

त्याला इतक्यात फोन ठेवायचा नव्हता. बोलत रहा माझ्याशी..

"हम्म, मी हॉस्पिटलमध्येच असेन."

ती हसली "काहीही! तुम्हाला ब्रेकची सगळ्यात जास्त गरज आहे. मला तर वाटलं तुम्ही बीच व्हेकेशन वगैरे प्लॅन केली असेल."

तो किंचित हसला."आय एम नॉट द बीच व्हेकेशन काइंड ऑफ गाय. मला वाळू अजिबात आवडत नाही आणि ते चिकट खारं पाणी!"

तिला जामच हसू आलं."हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. मला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या व्हेकेशनवर जाण्याचीच कल्पना करवत नाहीये - कधीच."

"कमॉन!" त्याने विरोध केला."मी गेलोय, फक्त गेल्या आठ दहा वर्षात नाही."

"वेल, मग तुम्ही ऍटलीस्ट शुक्रवारच्या दिवाळी पार्टीला येऊ शकाल ना?"

"अजून काही ठरवलं नाही."

"मग ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे." तिचा आवाज जरा खोडकर झाल्यासारखा वाटला.

"ते तू उद्याही देऊ शकतेस." त्याला ती पार्टी, तिथे जाऊन खोटं स्मॉल टॉक, लोकांची आरडाओरड करणारी बायका मुलं या सगळ्याचा मनस्वी कंटाळा होता.

"मेबी तुम्ही पार्टीला येण्यासाठी तो ब्राईब असेल." तिने जीभ चावली.

अचानक त्याला हे एकमेकांभोवती पिंगा घालत रहाणे असह्य झाले. तिचा हा कभी हां, कभी ना चा खेळ आता बास झाला.

"मी तिथे येण्याने असा काय फरक पडणार आहे?" त्याने सरळ विचारलं.

"इट वोन्ट बी सेम विदाऊट यू." तिने खरं सांगितलं.

त्याने केसातून हात फिरवून श्वास सोडला. ती चिडवतेय असं वाटू शकतं, त्याला आपल्याकडे खेचून पुन्हा लांब ठेवणं वगैरे. पण ती तशी नाहीये. ती जेन्यूइनली त्याला बोलावतेय, कारण तो तिथे आलेला तिला आवडेल. सिम्पल!

"विचार करेन." त्याने सांगितलं. "तुझ्याबरोबर कोणी असेल का?"

"नो!" ती घाईत म्हणाली. "नेहा येईल कदाचित. वेट! तुम्ही कोणाला आणणार आहात का?"

तो हसला आणि अचानक त्याच्या डोक्यात आलं, स्टॉप प्रिटेंडिंग. त्याने खरं सांगायचं ठरवलं. "माझी कोणी डेट नाहीये. जिला विचारायचं आहे, तिने तिच्यापासून लांब राहण्यासाठी माझ्याकडून वर्ड डॉक्यूमेंट साइन करून घेतलंय."

मला माहिती आहे, मला ती नकोय, तिच्यापासून हातभर लांब राहिलेलं बरं वगैरे प्रिटेंड करायला हवं पण आता मी नाही करू शकत. रोज काम करताना ती माझ्या समोर असते आणि रोज मला थोडी खणत अजून अजून माझ्या आत शिरत असते. इतकी खोल की मी विचार केला तरी तिला बाहेर काढून टाकू शकत नाही.

"तुम्हाला आपलं लीगली बाईंडिंग ऍग्रीमेंट म्हणायचंय का?" तिने चिडवलं.

त्याला अजिबात हसू आलं नाही. "आय एम डन सायरा. मी त्या भंकस ऍग्रीमेंटनुसार वागणार नाहीये. ऐकते आहेस ना? मी आत्ता ते ऍग्रीमेंट फाडतोय समज."

पलीकडे शांतता होती. ती नक्कीच त्याच्या शब्दांचा विचार करतेय.

तो ओठ मुडपून हसला. "मी पार्टीला येतोय. आता तर मी पार्टीची वाट बघतोय! माझं गिफ्ट तयार ठेव."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३३

त्याचं बहुतेकसं काम संपलं आणि फोन पिंग झाला. 'आय एम ऍट बरिस्टा अक्रॉस द रोड.' हम्म, ब्रेक घ्यायला हरकत नाही. तसाही लंच टाइम होऊन गेला होता. आळस देऊन तो उठला आणि चालत बाहेर निघाला. रस्त्यावर कडक ऊन होतं. रस्ता क्रॉस करताना त्याच्या डोक्यात सायराचे विचार होते. आज सकाळपासून ती दिसली नव्हती.

तो बरिस्टाच्या गेटमधून आत शिरला. आउटडोर एरियात कोपऱ्यातल्या टेबलापाशी समोर छोटासा लॅपटॉप उघडून सुनयना बसली होती. शेजारच्या कंपाउंड वॉलवरून केशरी बोगनविलियाचे घोस लोंबत होते. त्याला बघून तिने हात वर केला. डॉ. सुनयना दास. MBBS ला त्याची वर्गमैत्रीण होती आणि आता एक चांगली वास्क्यूलर सर्जन. MBBS झाल्यावर ती दिल्लीला परत गेली आणि सध्या एम्समध्ये वास्क्यूलर सर्जरीवर रिसर्च करत होती. प्रत्यक्ष भेटला नसला तरी रिसर्चमुळे तो अजूनही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होता.

त्याने सोनलसाठी बोलावल्यावर ती काहीही आढेवेढे न घेता लगेच निघाली होती. ती आलेली बघून मौके पर चौका मारत सर्जरीच्या डिपार्टमेंट हेडनी लगेच आज तिचं एक लेक्चर ठेवलं होतं. इंटरेस्टिंग असेलच. सुनयनाने त्याला लेक्चरमधले काही डिटेल्स मेल केले होते, त्यावरून रेसिडेंटस् आणि स्टुडंट्सना नक्कीच फायदा होईल. बरिस्टामध्ये बसूनही ती थरो प्रोफेशनल दिसतेय. खांद्यापर्यंत लेयर्समध्ये मोकळे केस, व्हाईट फॉर्मल टॉप, डार्क ग्रे पेन्सिल स्कर्ट, पायात हील्स. तो जवळ येताच ती उठून उभी राहिली.

"हेय सू!" तो हसला.

"अनिश!" पुढे होऊन तिने त्याच्या गालावर ओठ टेकले. "इट्स गुड टू सी यू!" त्याच्या भुवया उंचावल्या आणि त्याने हळूच गालावरचा मरून डाग पुसून टाकला. त्याला सुनयना आवडायची. परफेक्ट सर्जन. हां, थोडी न्यूरॉटिक आणि टाईप ए पर्सनॅलिटी होती पण रिसर्चसाठी ते चांगलंच.

"यू लुक लाईक यू आर डूइंग वेल, हँडसम! कल इतना बिझी डे था, बात करने का चान्सही नही मिला." सुनयना त्याला न्याहाळत म्हणाली.

त्याने आज नेहमीचाच क्रिस्प पांढरा शर्ट आणि ब्लॅक ट्रावझर्स घातल्या होत्या, रोड क्रॉस करताना वाऱ्याने केस जरा विस्कटलेले होते.

"थँक्स! सो डू यू. यस्टर्डे वॉज क्रेझी." तिच्या शेजारची मोठी गोल वेताची खुर्ची ओढून बसत त्याने वेटरला हात केला. तिच्यासमोर आधीच एक मोका होती, त्याने एक डबल शॉट अमेरिकानो सांगितली. सुनयनाची एम्समधली प्रॅक्टिस, तिच्या रिसर्चचा प्रोग्रेस, तिचे हल्लीच पब्लिश झालेले पेपर्स वगैरे एकतर्फी बोलणं सुरू होतं, कारण त्याचं डोकं भलतीकडेच होतं. पक्षी: सायरा! ती हॉस्पिटलमध्ये का दिसत नव्हती.. त्याने शेड्यूल बघितलं होतं, तिचा ऑफ तर नव्हता.

सुनायनाने पुढे होत त्याच्या गुढघ्यावर हात ठेवला. "अनिश! आर यू इव्हन लिसनिंग टू मी?" तिने किंचित हसत विचारलं.

तो ऐकत नव्हताच कारण आता त्याला ओळखीची व्यक्ती दिसली होती. सायरा चंदाबरोबर कुठल्याश्या जोकवर खळखळून हसत आत येत होती. त्याच्याकडे अजून तिचं लक्ष गेलं नव्हतं. आज तिने हलक्या पिस्ता रंगाचा लखनवी कुर्ता आणि पांढऱ्या लेगिंग्ज घातल्या होत्या. खांद्याला सॅकऐवजी एक ज्यूटची पर्स होती. केसही नेहमीच्या घट्ट पोनीटेलऐवजी एक छोटा क्लचर लावून मोकळे सोडलेले होते.

त्या दोघी त्याच्या मागच्या टेबलवर बसणार इतक्यात चंदाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ती हसली. "हॅलो, डॉ. पै!" त्याने हसून हात हलवला. सायरा चमकून ताठ झाली. तिने हळूच मागे वळून त्याच्याकडे आणि शेजारी सुनयनाकडे पाहिलं आणि लगेच तिची नजर त्याच्या मांडीवर ठेवलेल्या सुनयनाच्या हाताकडे गेली.

तिने विचार करावा असं त्यांच्यात काही नव्हतं. कॉलेजमध्ये सुनयना थोडी त्याच्या मागे होती पण नंतर तिने नाद सोडला. पण ऑफ कोर्स सायराला ते माहीत नव्हतं त्यामुळे त्या हाताचा तिच्यासाठी अर्थ वेगळा होता. सुनयनाने हात उचलून टेबलवर ठेवल्यावरही सायराच्या कपाळावरची शीर दिसतच होती.

"सायरा!" तो तिच्याकडे बघून हसला. "आणि चंदा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय?"

"लंच ब्रेक घेतला. काहीतरी खाऊन जातोय म्हणजे लेक्चरमध्ये पोटातून आवाज यायला नकोत." चंदा त्यांच्या टेबलापाशी जाऊन त्याच्याशी पहिल्यांदाच बोलायला मिळाल्याच्या उत्साहात म्हणाली. आपोआप सायराही आली. "हॅव यू मेट डॉ. दास? आज त्यांचंच लेक्चर आहे." तो सुनयनाकडे हात करत म्हणाला.

दोघीनीही हॅलो म्हटल्यावर सुनयनाने मान हलवली. "अँड यू बोथ वर्क ऍट द हॉस्पिटल?" त्यांच्या वतीने त्यानेच उत्तर दिले. "सायरा मेरी सर्जिकल असिस्टंट है और चंदा डॉ. पंडित के साथ काम करती है."

"ओह सायरा! वी मेट इन द सर्जरी यस्टर्डे!"

"हम्म, यू वर रिअली गुड!" सायरा किंचित हसून म्हणाली.

सुनयनाने ओह प्लीज! म्हणत हात झटकला. तिला असिस्टंट लोकांशी बोलण्यात फार इंटरेस्ट नव्हता.

सायराने त्याच्यावरची नजर न हटवता चंदाचा हात ओढला. "इट वॉज प्लेझर मीटिंग यू. वी वोन्ट कीप यू फ्रॉम युअर कॉफी डेट!" म्हणत ती वळून चालू पडली. कसंबसं हसून चंदा तिच्यामागे गेली.

त्यांच्याकडे बघत सुनयना हसली. "सर्जिकल असिस्टंट हां?!"

"व्हॉट?"

"कुछ नही. मुझे लागता है उसे तुमपर मेजर क्रश है. बी केअरफुल विथ दॅट वन!"

दीड तासानंतर तो हॉस्पिटलच्या ऑडिटोरियममध्ये शिरला तेव्हा सगळ्या सीट्स ऑलमोस्ट भरल्या होत्या. तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात त्याला चंदा आणि सायरा दिसल्या. सायराशेजारी एक रेसिडन्ट हातवारे करून काहीतरी सांगत होता आणि ती लक्ष देऊन ऐकत होती. त्याच्या कपाळावर आठी आली.

स्टेजवर सुनयना IT वाल्या मुलाशी बोलत कॉलरला लावलेला माईक चेक करत होती. तिच्या प्रेझेंटेशनचं टायटल पेज पडद्यावर दिसत होतं. आता इथे थांबून उपयोग नाही. तो पायऱ्या उतरत सायराच्या रांगेपर्यंत गेला. शेजारी बसलेला रेसिडेंट आता तिला मिंट ऑफर करत होता. सो चार्मिंग! तो त्या रेसिडेंटसमोर जाऊन उभा राहिला. "गेट अप, आय नीड धिस सीट."

"हम्म, पण..." रेसिडेंट न उठता बावरून बघू लागला.

"मूव्ह!" तो करारी आवाजात म्हणाला.

आपली सॅक छातीशी धरून रेसिडेंट उठून मागे गेला.

सायरा त्याच्याकडे रागाने बघत होती, तिने मान वळवून किती जणांनी हे पाहिलंय ते चेक केलं. ती खुर्चीत मान खाली घालुन बसली.

तो लगेच रिकाम्या खुर्चीत बसला आणि त्याला तिच्या केसांचा सुगंध, तिच्या अंगातून निघणारी उष्णता आणि तिच्या श्वासांची बिघडलेली लय जाणवली. एवढं नशा आणणारं कॉम्बो त्याचं पूर्ण लक्ष वेधून घ्यायला पुरेसं होतं.

"हे वागणं अतिशय रूड आहे. तो इथे आधीपासून बसला होता." ती चिडून त्याच्या कानाजवळ म्हणाली.

"युअर फॉल्ट! तू माझ्यासाठी सीट ठेवायला हवी होती." तो सहज म्हणाला.

तिने त्याच्याकडे अजून एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ओठ घट्ट मिटून जरा दूर व्हायचा प्रयत्न केला. पण ते होऊ शकत नव्हतं कारण त्या मुंगीच्या आकाराच्या खुर्चीत हा भलामोठा माणूस बसला होता. ती चंदाकडे थोडी सरकून बसायला बघत होती पण त्याने काहीच फरक पडत नव्हता.

"तुला कसला तरी राग आलेला दिसतोय." तो कुजबुजला.

"मला?" ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली. "छे! मी मस्त आहे."

तो अविश्वासाने तिरकस हसला. तेवढ्याने तिला बरोबर पिन बसली.

"यू नो, ऍक्चुली तुम्ही तुमच्या डेट्स हॉस्पिटलपासून लांबच्या ठिकाणी केल्या तर बरं होईल." ती समोर बघत म्हणाली.

तो पुन्हा तसंच हसला आणि तिने वैतागत कोपराने ढोसून त्याचा हात हटवला आणि आर्मरेस्टवर स्वतःचा हात ठेवला. त्यांची नजरानजर झाल्यावर त्याने नजर रोखून ठेवली. "मला तिच्यात इंटरेस्ट आहे असं तुला वाटत असेल तर तू लक्ष देऊन बघत नाहीयेस." तो सरळ म्हणाला.

अचानक तिचे डोळे विस्फारले कारण स्पीकरमधून धाडकन सुनयनाचा सगळ्यांना वेलकम करणारा आवाज आला. तिचा माईक जरा जास्तच जवळ होता आणि त्यातून वैतागवाणा किर्रर्रर्र आवाज सुरू झाला. तिने हसून साउंड ऍडजस्ट केला. "इज इट बेटर नाऊ?" तिने माईक लांब करत विचारले.

चहू बाजूनी होणाऱ्या येस च्या गजरात ते दोघे गर्दीपासून अलिप्त एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. दोघांचाही श्वास रोखला गेला होता.

तिने पहिल्यांदा नजर हटवली. मान उचलून तिने समोर लक्ष केंद्रित केले. सुनयनाचं लेक्चर सुरू झालं. आता त्याला बोलायला चान्स नव्हता पण बोलणं गरजेचं होतं. त्याने नजर स्टेजकडे ठेवत तोंडावर हात घेतला आणि तिच्याकडे झुकून पुटपुटला " तू जास्त विचार करते आहेस. एक चांगली गोष्ट सुरू होतानाच बिघडवू नको."

ती वैतागून त्याच्याकडे झुकली."तिने हात ठेवला होता तेव्हा तर तुम्ही मजेत होता. आता श्श्श.. नाहीतर मला ओरडा बसेल."

"फर्गेट अबाउट हर. आय वॉन्ट यू!" तो घाईत तिच्या कानात कुजबुजला. तिच्या गालांपासून गळ्यापर्यंत सगळीकडे उष्णता पसरली. तेवढ्यानेच त्याला तिचा हात धरून तिला बाहेर ओढत न्यावंसं वाटलं.

लेक्चरभर ती लक्ष द्यायचा प्रयत्न करत कशीबशी थांबली आणि शेवटच्या टाळ्या सुरू होताच गर्दीत घुसून बाहेर पडली. आज तिची आफ्टरनून शिफ्ट होती. चंदाला एकटं सोडून आल्याबद्दल तिने सॉरीचा टेक्स्ट पाठवला. चंदाने लगेच उलटा कॉल केला. "ओके.. तुम दोनोंके बीच कुछ चल रहा है क्या?"

तिची धडधड वाढली. "नही तो!"

"एह! फिर चलना चाहीए! माय गॉड, क्या केमिस्ट्री थी. आग थी आग! वैसे तुम इतनी खुसफूस क्या बात कर रहे थे?"

"तुमने कुछ सुना क्या?" तिने घाबरत विचारले.

"ट्राय तो बहोत किया, लेकीन सुनाई नही दिया. कुछ तो बता यार, बी अ गुड फ्रेंड!"

"अभी मेरी शिफ्ट फिनिश होने दे, कुछ होगा तो तुझे सबसे पहले बताऊंगी!" तिने कॉल संपवायला सांगितलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३४

या वर्षी दिवाळी पार्टी हॉस्पिटलमध्येच नवीन बिल्डिंगच्या हॉलमध्ये होती. ती इमेल आली तेव्हा सगळेच हॉस्पिटलच्या कॉस्ट कटिंगवर वैतागले होते. संध्याकाळी सात वाजता सायरा नेहाबरोबर टॅक्सीतून उतरली तर पूर्ण बिल्डिंगला सोनेरी लायटिंग केलं होतं. दुसऱ्या मजल्यावर बँक्वेट हॉल आणि त्याच्यावरचे काही मजले हॉस्पिटलचं अजून उदघाटन न झालेलं गेस्ट हाऊस होतं.

"दीद, तू ते भेळेचे बिंज बार्स ठेवले ना बॅगमध्ये?" लिफ्टमध्ये अचानक नेहाला आठवलं.

"नेहा, आपण दुपारपासून फक्त आणि फक्त पॅकिंग केलंय, त्यातही तू मला फक्त कपड्यांच्या घड्या घालून ठेवायला मदत केलीस. आता आठव तूच." ती नेहाकडे रागाने बघत म्हणाली.

"आय एम सो एक्सायटेड! मी किती दिवसांनी ग्रुपबरोबर ट्रेकला चाललेय!" नेहा मान वाकडी करून हसत म्हणाली.

"हे तू दिवसभरात सतराशे साठवेळा म्हणाली आहेस!" सायरा हसली. नेहाचे सगळे फ्रेंड्स आठ दिवस युथ हॉस्टेलच्या निलगिरी हिल्स ट्रेकला चालले होते. नेहा स्वतःहून ट्रेकला जाते म्हणाली याचा तिला जास्त आनंद होता. कॉलेजची हवा लागल्यापासून नेहा फक्त सोशल मीडिया, वेबसिरीज आणि वाचन एवढ्यातच पडीक होती. तिने बैठी लाइफस्टाइल सोडावी म्हणून सायराचे सारखे प्रयत्न सुरू होते, पण नेहा काही दाद देत नव्हती. नेहाची उद्या दुपारची ट्रेन पनवेलहून होती. पनवेल ते कोइंबतूर. तिथून एका बसने उटी. त्यासाठी सगळे एका मिनीबसमधून बारा वाजता निघणार होते.

"आठ मधले पाच दिवस तरी मला किती सुकून मिळेल माहितीये! मी काहीही काम करणार नाही, फक्त रिमोट घेऊन लोळणार आणि स्वीगी ऑर्डर करून जेवणार!" सायरा तिला चिडवत म्हणाली.

नेहाने तोंड वाकडं केलं आणि मग खळखळून हसली. "यू रिअली नीड सम रेस्ट."

लिफ्टचं दार उघडताच समोर सगळीकडे पणत्यांच्या आकाराच्या फेरी लाईट्सची सजावट होती. मुख्य दरवाज्याला लहान लहान कंदिलांचं तोरण होतं आणि बाजूला मध्यभागी शुभ दीपावली लिहिलेली विविध रंगी जरबेरांची एक भलीमोठी रांगोळी होती. आतली लगबग, गडबड, आवाज बाहेर जाणवत होते. आत शिरताच माणसांची गर्दी, वर टांगलेल्या भल्यामोठ्या काचेच्या झुंबरांचा तीव्र प्रकाश, एकमेकांत मिसळलेली परफ्यूमस आणि सनई, सतार वगैरे भारतीय वाद्यांचे सूर कानावर आले. त्या दोघी आत जाऊन गर्दीत मिसळल्या. चंदा आणि पूर्वा त्यांच्या कुटुंबियांबरोबर होत्या. त्यांना भेटून गप्पा मारताना एकीकडे ती गर्दीत बघत होती. अजून तरी अनिश आलेला दिसत नव्हता.

बरेचसे लोक ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये होते. सायराने आज मुद्दाम जरा साधा वाटेल असा कोपरापर्यंत बाह्या आणि ओढणीवर बारीक चंदेरी गोटा पट्टीची कलाकुसर असणारा सुती ऑलिव्ह ग्रीन अनारकली घातला होता. नेमकी ऑनलाईन ऑर्डर करताना मागे मोठा गळा आणि त्याला बांधलेले लटकन तिने बघितले नव्हते. आता एक्स्चेंजलाही वेळ नाही म्हणून शेवटी तिला तोच ड्रेस घालावा लागला. कानात बारीक मोत्याच्या चांदबाली आणि फ्लॅट जूती. शॅम्पू केलेले सुळसुळीत केस उडू नयेत म्हणून एका पिटकू क्लचरमध्ये अडकवले होते. नेहा बेबी पिंक शरारा आणि त्यावर ती नको म्हणत असतानाही लेन्सऐवजी काळ्या फ्रेमचा चष्मा घालून आली होती. नेहाच्या टोट बॅगमध्येच तिने मोबाईल आणि हातातला चंदेरी सिल्कचा क्लच टाकून दिला होता.

सोना तिच्या बॉयफ्रेंडला सोडून सायराशेजारी येऊन उभी राहिली. "नो डेट टुनाईट? वो बाऊन्स वाले का क्या हुआ?"

ओह बॉय! ह्या सगळ्या किती मागे आहेत! "अरे, वो रिलेशनशिप के लिए रेडी नही था. तो बात आगे नही बढी.. एनीवे, नेहा है मेरे साथ. तुम जाओ, एन्जॉय करो." तिने सोनाला कसंतरी कटवलं.

तिने पुन्हा एकदा दरवाजाकडे नजर टाकली. तिथे हालचाल दिसल्यावर तिच्या हृदयात कालवाकालव झाली. पण तिथून डॉ. गांधी त्यांच्या बायको मुलीबरोबर मॅचिंग कलरफुल कपडे घालून आत येत होते.

"सायरा, फिर डॉ. पै के साथ काम कैसा चल रहा है?" पूर्वाने तिला निरागसपणे विचारलं. ऐकताच शेजारून चंदाने तिला डोळा मारला.

अर्र! यापेक्षा शर्विलचा विषय बरा होता. निदान मी यांच्या डोळ्यात बघून धडधडीत खोटी कारणं देऊ शकले असते. आताही काही विशेष नाही, हाहा. मला फक्त थोडं टफ व्हावं लागलं, आता काम नीट सुरू आहे वगैरे सांगून जमेल. सायरा विचार करत होती.

पण त्या खडूस सर्जनने माझं हृदय चोरलंय आणि आता तो कुठल्याही क्षणी इथे आत येईल आणि त्यासाठी मी अजिबात तयार नाहीये. त्या फोन कॉलपासून माझा रोम न रोम जळतोय. तो म्हणाला होता, मी ते अग्रीमेंट फाडतोय.

हाहा, टू बॅड! बिकॉझ आय मेड कॉपीज!

तिला त्याच्या आवाजातला निग्रह आठवत होता आणि काल त्याने कानात कुजबुजलेलं शेवटचं वाक्य! उफ!! मला लवकरात लवकर इथून पळालं पाहिजे.

ती विचार करत असतानाच तो दरवाजात येऊन उभा राहिला. एक मिनिटापूर्वी दारात कोणी नव्हतं आणि क्षणात तिथून अनिश एखाद्या महाराजासारखा रूबाबात आत येत होता. त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळताना तिचं अख्खं शरीर ताठ झालं. तो टेलर्ड ब्लॅक सुटमध्ये होता. क्रिस्प व्हाईट शर्टचं वरचं बटन उघडं आणि नो टाय! आता किंचित वळायला लागलेले काळेभोर दाट केस जेल लावून थोडे सेट केले होते. त्याला येताना बघताच लोक बोलणं थांबवून त्याच्याकडे माना वळवून बघत होते. जसं काही कुठल्या फिल्म स्टारने पार्टीत डेब्यू केलाय.

सोनलच्या सर्जरीआधीही तो पॉप्युलर होता पण सर्जरीनंतर! इट्स लार्जर दॅन लाईफ! बरेच लोक एकदम पुढे होऊन त्याच्याशी हात मिळवून बोलू पाहतायत. काहीजण त्याच्या खांद्यावर थाप मारून आपण किती जवळचे आहोत दाखवायच्या प्रयत्नात आहेत. तो ओठांवर हसू ठेवत सगळ्यांशी बोलतोय पण त्याचे डोळे गर्दी स्कॅन करतायत. तो मला शोधतोय.

तो मला शोधतोय!!

ती पॅनिक होत तिच्या ग्रुपकडे वळली. आता तिला शंभर टक्के इथून पळायचं होतं. आज इथे यायलाच नको होतं. मूर्ख! तूच स्वतः त्याला बोलावलंस, दुसरं मन ओरडत होतं. तिच्या सगळ्या अंगावर काटा फुलला. तिने वेटरला थांबवून एक थंडगार पाण्याचा ग्लास घटाघट संपवला. सोना तिच्याकडे डोळे बारीक करून बघत होती.

"मला बरं नाही वाटत." ती टिश्यूने चेहरा टिपत म्हणाली.

"क्या हुआ, कही दर्द हो रहा है?" सोनाने काळजीने विचारलं.

"सरदर्द!" एवढ्याने सोना कंविन्स झाली नाही. "अम्म और मेरा .. मेरा" तिला एक सिंगल बॉडी पार्ट आठवत नव्हता. "और मेरा हाथ! हां, हाथमे बहोत दर्द हो रहा है! हम निकलते है, हॅपी दिवाली एव्हरीवन!" तिने निघून जायला जागा शोधली पण एकच दरवाजा होता आणि तो सध्या डॉ. पै अँड फॅन्सनी व्यापला होता. नेहाला पकडून गर्दीच्या कडेने निसटता येऊ शकेल. तिने नेहाकडे बघितलं, ती कोपऱ्यातल्या खुर्चीत मोबाईलवर काहीतरी बघत आरामात मांडीवरच्या प्लेटमधून काट्याने मंचूरियन खात होती.

"नेहा!! आपल्याला निघायचंय. स्टॉप इट." तिने घाईघाईत नेहाचा मोबाईल काढून घेत डेटा ऑफ केला.

"आर यू किडींग मी?! आपण आत्ताच तर आलोय. मी अजून काही खाल्लंपण नाहीये." नेहा तोंड वाकडं करत म्हणाली.

"जाताना काहीतरी पार्सल घेऊ, चल ऊठ..

बोलणं संपायच्या आत तिच्या दंडाभोवती बोटांचा विळखा पडला आणि ती दचकली.

"सायरा. आय होप तू पळत नाहीयेस!" तो वाकून तिच्या कानात शांतपणे म्हणाला. नेहा तिच्या हातातून फोन घेऊन पुन्हा खुर्चीत बसली. त्याने तिला तसंच धरून हळूच आपल्याकडे फिरवलं. तिने वर न बघता नजर काळजीपूर्वक त्याच्या छातीवर ठेवली होती. तिचे गाल गरम झाले होते. त्याच्या मिश्किल आवाजावरून कळत होतं की त्याला त्या खोट्या अग्रीमेंटबद्दल माहिती होतं.

तिने आवंढा गिळत मान डोलावली. "हो, कारण माझा हात खूप दुखतोय."

ते तिच्या स्वतःच्या कानांनाही हास्यास्पद वाटलं. तो मोठ्याने हसला.

"नेहा, इफ यू विल एक्स्क्यूज अस, मला तुझ्या बहिणीशी थोडं बोलायचंय." तो वाकून नेहाला म्हणाला.

"नो, शी विल नॉट एक्स्क्यू.."

"येस, यू आर एक्स्क्यूज्ड." नेहा मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाली.

रक्ताच्या बहिणीपेक्षा तुला गेम ऑफ थ्रोन्स प्रिय आहे! हाऊ डेअर यू नेहा!!

त्याने तिचा दंड न सोडता तिला कोपऱ्यात तांब्याच्या पसरट उरली पॉटमध्ये तरंगत्या दिव्यांच्या डिस्प्लेजवळ नेलं. तिथे थोडी रिकामी जागा होती. तिने काहीतरी बोलायचं म्हणून त्याला डेकोरेशन कसं वाटलं म्हणून विचारलं. तो तिच्या डोळ्यात रोखून पहात राहिला.

ओह ओके. आता एकटे आहोत तर खोटंखोटं  बोलायची गरज नाही.

"तू मला आज इथे बोलावलं होतंस की नाही?" त्याने शांतपणे विचारलं.

तिने आवंढा गिळून शेजारी भिंतीकडे पाहिलं. "हो. मी बोलावलं होतं."

"मग निघून का जात होतीस?"

तिला खरं मान्य करवत नव्हतं पेक्षा मान्य करायला ती लाजत होती.

तिला गप्पच राहिलेली बघून त्याने घट्ट धरलेला तिचा हात सोडून दिला. एकदम तिच्या डोक्यावर निराशेचा ढग पसरला.

"मी आता थकलोय सायरा. मी तुझ्यामागे पळणार नाही. मी काल तुला सांगितलंय, ते अग्रीमेंट मी फाडतोय. त्यामुळे तुला भीती वाटत असेल तर मी तुझं ऐकेन अँड आय रिस्पेक्ट युअर डिसीजन. ओके? आय वोन्ट फोर्स माय वे इनटू युअर हार्ट."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३५

"फोर्स युअर वे इनटू माय हार्ट?" आता तिने सरळ त्याच्या नजरेला नजर मिळवली. "तुम्हाला अजूनही वाटतंय की फोर्स करावं लागेल? यू आर ऑलरेडी देअर. प्रत्येक कानाकोपऱ्यात आहात. म्हणूनच मी पळतेय, म्हणूनच मी ते फालतू अग्रीमेंट बनवलं."

त्याने तिचे दोन्ही खांदे धरले. त्याने इतकं घट्ट पकडल्यावर तिला जाणवलं की ती थरथरत होती.

"काय म्हणालीस?"

"आता याहून क्लिअर मला सांगता येणार नाही."

तो हसला. पहिल्यांदाच त्याच्या आनंदाचा कण न कण चेहऱ्यावर दिसत होता. इतका जीवघेणा हँडसम तो आधी कधी दिसलाच नव्हता. "तुला क्लिअर बोलावं लागेल कारण मला आपल्यात कुठलेही गैरसमज नकोत."

तिच्या भुवया जवळ आल्या. "बाकी सगळ्या जागा सोडून तुम्हाला मी इथे माझ्या सगळ्या फीलिंग्ज सांगायला हव्यात का? इथे सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहेत. तुम्ही मला इथे ओढत आणताना सगळ्यांनी पाहिलंय आणि ते काहीतरी होण्याची वाट बघतायत. एक किस किंवा मोस्टली एक थप्पड!"

"दोन्हीतलं मी काय प्रिफर करेन तुला माहिती आहे!" तो शांतपणे म्हणाला. लोक आपल्याला बघत आहेत याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. त्याला लोकांच्या नजरेत राहायची सवय होती, पण तिची ही पहिलीच वेळ होती.

त्याने पुढे होऊन तिची बोटं आपल्या बोटात गुंफली. तिला तिच्या हृदयाची धडधड कानात ऐकू येत होती. त्याने तिच्या ओठांकडे बघितल्यावर तिच्या पोटात काहीतरी थरथरलं. ओह नो.. तो सगळ्यांसमोर किस करेल, नक्कीच. तेवढ्यात तिला त्यांच्या मागे असलेला पॅसेज दिसला आणि ती पटापट तिकडे चालत सुटली. त्याला तिच्या मागे जावंच लागलं. त्याला ओढत पहिल्या दिसलेल्या दारात ती घुसली आणि दार बंद केलं. ओह वॉशरूम! एक भलामोठा आरसा असलेली भिंत आणि खाली ग्रॅनाईटवर तीन बेसिन्स. पलीकडे तीन बंद टॉयलेट्स. हे वॉशरूम फार कुणाला माहिती नसावं कारण ते अजून कोरं करकरीत दिसतंय. तिने दाराला कडी लावली आणि वळून त्याच्या छातीत बोट रुतवलं. ओके, त्या दगडाला काही होणार नव्हतं, तिचंच बोट दुखायला लागलं पण तिला ती किती सिरीयस आहे हे त्याला समजायला हवं होतं.

"तुम्ही मला तिथे बाहेर किस करणार होतात." ती डोळे मोठे करून म्हणाली. "सगळ्यांसमोर!!"

त्याने फक्त तिच्या कंबरेत हाताचा विळखा घालून तिला स्वतःकडे ओढलं. ती धडपडली आणि अख्खी त्याच्यावर जाऊन धडकली. त्याने कंबरेवरचा हात न काढता तिला सावरलं. तिचे दोन्ही तळवे त्याच्या छातीवर होते. त्याच्या जोरजोरात धडधडणाऱ्या हृदयाचा प्रत्येक ठोका तिच्या हातांना जाणवत होता. दुसऱ्या हाताने त्याने तिचा क्लचर काढून टाकला. मोकळ्या केसांच्या लाटा खांद्यावर पसरल्या.

तिने धीर करून वर त्या उंच, खंबीर तिची सगळी दुनिया ढवळून टाकायला सज्ज माणसाकडे पाहिलं. त्याच्या गडद भुवया जवळ आल्या होत्या आणि मधाळ डोळ्यात भावनांचं वादळ सुरू होतं. तो तिच्या डोळ्यात कुठल्यातरी अव्यक्त प्रश्नाचं उत्तर शोधत होता.

त्याने तिला कड्याच्या एका टोकावर नेऊन उभी केल्यासारखी ती कापत होती. एक जरासा धक्का आणि ती घरंगळत जाईल. पण त्याच्या तळाशी तिच्यासाठी काय वाढून ठेवलं असेल तिला कळत नव्हतं. प्रेम, टोकाचा आनंद, आणि मग हृदय तुटणे, दुःख ह्या सायकलमध्ये ती स्वतःला लोटून देऊ शकत नव्हती.

ती किंचित दूर होणार दिसताच त्याने वाकून तिचे ओठ एका अखंड पॅशनेट किसमध्ये धरून ठेवले. तिच्या पाठीवर त्याच्या हातांची पकड मजबूत होती, ती त्याला चिकटून राहिली. त्याच्या पुन्हा पुन्हा किसेसच्या नशेत ती बुडून गेली. त्याच्या छातीवरून तिचे हात जराही हलले नव्हते आणि श्वास घेण्यासारखी साधी गोष्टही तिला आठवत नव्हती.

त्याने थांबून तिची हनुवटी उचलून तिच्या डोळ्यात बघितलं. त्याला काय हवं आहे ते चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्याने तिच्या कपाळावर, गालावर, कानाच्या पाळीमागे घट्ट टेकलेले ओठ तिचा चुराडा करायला पुरेसे होते. मणक्यातून वाहणाऱ्या झिणझिण्या अनुभवत तिने डोळे घट्ट मिटून घेतले.

"किस मी!" तिला तशीच उचलून वर ग्रॅनाईटवर बसवत तो तिच्या ओठांजवळ कुजबुजला. आता त्यांच्यामध्ये हवा जाण्याइतकीही जागा उरली नव्हती." सायरा.. किस मी."

कठपुतळीच्या दोऱ्या खेचल्यासारखी ती हलली. त्याच्या शब्दातील आर्जवाने तिच्या हृदयाभोवती असलेली शेवटची भिंत फोडून टाकली. त्याचे विलग ओठ तिच्या ओठांजवळ आले आणि त्याच्या मानेवरून दाट केसांत बोटं घुसवत तिने स्वतःला त्याच्यात झोकून दिले. 

ओठ सुजून झोंबू लागल्यावर बाजूला होत तिने कसाबसा श्वास घेतला. तिचं डोकं ढगांमध्ये कुठेतरी होतं. आत्ता तिच्या जवळपास पाण्याची बाटली असती तर तिने ती सरळ डोक्यावर ओतून घेतली असती. त्याचा प्रत्येक स्पर्श तिच्या अंगावर निखारा फिरवल्यासारखा होता. चटका बसणारा, आग लावणारा. ती आयुष्यात पहिल्यांदाच इतकी टर्न ऑन झाली होती. त्याने वाकून दोन्ही तळवे तिच्या दोन्ही बाजूच्या ग्रॅनाईटवर ठेवत हनुवटी तिच्या खांद्यावर टेकली. त्याचा उष्ण श्वास तिच्या कानात जाणवला. तो पुढे काही बोलणार इतक्यात कोणीतरी दार वाजवलं.

शिट! तिचे डोळे मोठे झाले. आता? तिने डोळ्यांनीच त्याला विचारलं. त्याने ओठांवर बोट ठेवलं. अजूनही तिचा ऊर धपापत होता. तिने आरशात बघत गुंतलेले केस आणि कपडे होतील तितके नीट केले. त्याने पुढे जाऊन दार किलकिलं केलं. "डॉ. गांधी!" तो बोलताना जरासा कण्हला. "आय नीड हेल्प. आय एम थ्रोइंग अप नॉन स्टॉप. प्लीज ब्रिन्ग मी सम वॉटर.."

"ओह, आर यू ओके? आय थिंक इट्स द सीफूड!"

"हम्म, मेबी फूड पॉयझनिंग. प्लीज ब्रिन्ग मी सम वॉटर फर्स्ट." चेहरा कळ आल्यासारखा वेडावाकडा करत तो म्हणाला.

एक मिनिट! म्हणून डॉ. गांधी घाईघाईने हॉलकडे गेले.

त्याने केसांतून हात फिरवला, सूट नीट केला आणि बाहेर पडला, काही सेकंद थांबून सायरा त्याच्या मागे गेली. "तुमचं प्रोफेशन चुकलं डॉ. पै, व्हॉट अ परफॉर्मन्स!" ती त्याला डोळा मारत म्हणाली. "विच वन?" त्याने तिच्यावरची नजर न हटवता विचारले. तिने ओठ चावत मान खाली घातली.

आत जाताच डॉ. गांधींनी त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. "आय थिंक, आय ऑल्सो गॉट द बग!" त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सायराला येणारं हसू फुटायच्या आत तिने जोरदार खोकला आल्याचं नाटक केलं. त्याने काहीतरी सांगून त्यांना कटवलं. ते दोघेही पुन्हा नेहाच्या खुर्चीमागे जाऊन भिंतीलगत उभे राहिले. एव्हाना स्टेजवर कॅरीओके सुरू होऊन लोक कशाही आवाजात गात आपापला गळा साफ करत होते. "लोक आपल्याकडे बघतायत.."  ती म्हणाली.

"फक्त कॉन्फिडन्ट रहा, ते आपोआप बघायचं विसरतील." त्याने पुन्हा तिचा हात हातात घेत म्हटलं.

"जस्ट टू बी क्लिअर, इथे हात धरणं म्हणजे आपण कपल असल्याचं लाऊडस्पीकरवर सांगण्यासारखं आहे."

त्याने हाताची पकड अजून घट्ट केली."मी सोडणार नाहीये."

तिने ओठ चावला.

"आर यू चेंजिंग युअर माईंड?"

"वॉशरूममधल्या घटनेबद्दल बोलताय?" तिने भुवई वर केली.

"नाही, आपण एकमेकांना एक ट्राय देण्याबद्दल बोलतोय." तो शांतपणे म्हणला.

"फाईन! ओके. पण हे वर्कआऊट झालं नाही तर तुम्ही सगळ्यांना मी खूप स्मार्ट होते आणि मी तुमच्याशी ब्रेकअप केलं असं सांगावं लागेल!" ती चिडवत म्हणाली. तिने चिडवायला म्हटलं असलं तरी त्याला ते थोडं टोचलंच.

तेव्हाच त्याचा रेसिडन्ट डॉ. निलेश स्टेजवर जाऊन खाली स्वतःच्या गर्लफ्रेंडकडे बघत चांद बालियां गाऊ लागला. आश्चर्य म्हणजे तो चक्क सुरात गात होता.

ये तेरी चांद बालियां
है होठो पे ये गालियां
सोचने का मौका ना दिया
मैं तो तेरे पीछे हो लिया..

त्याने गंभीरपणे स्टेजकडे बघत एक हात तिच्या केसांखाली सरकवून उघड्या पाठीवर गुदगुल्या केल्या. तिने त्याच्या हातावर फटका दिला.

लडे नैनों के पेचे
तू दूर से मुझको खेंचे
डोर तू पतंग मैं तेरा
मैं तो तेरी छत पे जा गिरा..

त्याने कंबरेत हात वेढून तिला अजून स्वतःकडे ओढून घेतले.

रात्र जसजशी पुढे गेली तसा त्याच्याभोवती पुन्हा माणसांचा गराडा पडला. त्यांना एकत्र बघून लोक सायराबद्दल काय विचार करतील याची त्याला जरा चिंता वाटत होती. त्याने कदाचित तिला ह्या रिलेशनशीपबद्दल लोकांना कसं सांगायचं हे ठरवायचा वेळ द्यायला हवा होता, बट वेल, थिंग्ज हॅपन! त्यांचा तिथून नेहाला घेऊन लगेच निघायचा प्लॅन होता पण लोक त्याला सोनलच्या रिकव्हरीबद्दल खूपच प्रश्न विचारत होते. तो सायराला सांगायलाच विसरला होता की सोनल उठून बसली आणि आता तिची मोटर फंक्शन्स हळूहळू पूर्ववत होत होती. त्याने तिथे बाकी सर्जन्सच्या घोळक्यासमोर हे सांगताच तिच्याकडे पाहिले. आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने आपल्या भावना दिसू न देण्यासाठी आवंढा गिळला. त्याला तिच्या खांद्याभोवती हात टाकून जवळ घेऊन सांगायचं होतं की सोनलच्या रिकव्हरीमध्ये माझ्यातकीच तूही महत्त्वाची आहेस. पण त्याच्यावर आणखी प्रश्नांचा भडिमार होत होता.

त्यांच्यामागे लोक नॉन स्टॉप कुजबुज करत आहेत असं सायरा त्याला सांगत होती. तिला हसू आलं कारण लोक त्याला घाबरून डायरेक्ट काहीच विचारू शकत नाहीत. त्याच्यासमोर काही बोलायची कुणाची हिम्मतच नव्हती. फक्त एक व्यक्ती सोडून.

समोरून हातात मँगो कलाकंद ठेवलेली डिश घेऊन शुभदा आली. त्यांच्यासमोरून जाता जाता ती काही सेकंद थांबली, डोकं जरा खाली केलं आणि चष्म्याच्या रिमवरून त्यांनी धरलेल्या हातांकडे सूचक कटाक्ष टाकला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत ती तिच्या रस्त्याने चालू पडली.

"आय स्वेअर, ती थोडीशी हसली!" मान वळवून शुभदाकडे बघत सायरा उद्गारली.

"शुभदा? मला नाही वाटत, तिला हसता येतं!" तोही मागे वळून बघत म्हणाला.

क्रमशः

अरे सायराचा ड्रेस दाखवायचा राहिलाच.
achwsmaso473_1_15e39d3c.jpg

achwsmaso473_7_7b6e9b3d.jpg

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३६

सात वाजता अलार्म खणाणल्यावर तिला जाग आली. क्षणभरात कालची सगळी रात्र डोळ्यासमोर तरळली, स्पेशली ती वॉशरूम! ती डोळे मिटून हसली. जरा वेळाने नेहाला उठवून आंघोळीला पिटाळल्यावर तिला अनिशला प्रॉमिस केलेलं गिफ्ट आठवलं. फ्रिज उघडून तिने डब्यात ठेवलेल्या सांदणाचा वास घेतला. काल चिडल्यामुळे तिने मुद्दाम डबा बरोबर नेला नव्हता. डबा पुन्हा आत ठेऊन ती परत नेहाच्या मागे लागली. सगळं सामान, तिकिटं वगैरे चेक करून झाल्यावर त्या पिकअप पॉइंटवर जाऊन थांबल्या. बसमधून आरडाओरड करत मंडळी आल्यावर नेहा त्यांच्यात सामिल झाली आणि ती खिडकीतून हात हलवत असताना बस निघालीसुद्धा.

एव्हाना साडेबारा वाजले होते. तिने घरी जाऊन सांदण फ्रिजमधून काढून मायक्रोवेव्ह केले. कपडे बदलले. हा स्पगेटी बेल्ट आणि कंबरेला स्मॉकिंग असलेला h n m चा प्लेन ब्लॅक ड्रेस तिच्या कपाटात बरेच दिवस पडून होता. चेहरा धुवून सीसी क्रीमवर थोडी कॉम्पॅक्ट आणि न्यूड लिपस्टिक लावली. तिला त्याचं शेड्यूल पाठ होतं. आज तो घरीच असणार. हीच वेळ होती त्याला सरप्राईज करायची. मोठ्या टोट बॅगमध्ये सांदणाचा डबा ठेवला. घराला कुलूप लावताना बऱ्याच दिवसांनी ती गुणगुणत होती.

त्याच्या अपार्टमेंटखाली पोचताच तिने गार्डला अनिशसाठी सरप्राईज म्हणून फोन न करण्याची विनंती केली. गार्डने तिला ओळखून आत सोडले. लिफ्टमध्ये तिने आरशात बघून मोकळ्या केसांतून हात फिरवला. ड्रेस उगीचच जरा नीट केला. तिच्या तोंडावर एक मोठं हसू पसरलं होतं. तिने पर्समधून डबा काढून दोन्ही हातात धरला. त्याचा मजला येताच लिफ्ट थांबली. त्याच्या दरवाजासमोर थांबून तिने बेल वाजवली. दार उघडेपर्यंतची काही सेकंदही तिला धीर नव्हता.

दरवाजा उघडला आणि समोर सुनयना उभी होती. डॉ. सुनयना दास! तिने शिफॉनचा लाल पायघोळ ड्रेस घातला होता. मागे एका दोरीने बांधलेली हॉल्टर नेक आणि जस्ट अ हिंट ऑफ क्लीवेज. स्मोकी आईज, परफेक्ट बोल्ड मेकअप, लाल लिपस्टिक. सायराला बघून तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. "सू? वूड यू लाईक अ मsलो ऑर शीराझ? आय हॅव ओन्ली टू!" अनिश किचनकडून रेड वाईनच्या दोन बाटल्या हातात धरून बाहेर आला. ब्लॅक शॉर्टस आणि व्हाईट टीशर्ट. केस नेहमीप्रमाणे विस्कटलेले. गालावर लाल लिपस्टिकचा पुसट डाग. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. तिला दारात बघून त्याचे डोळे चमकले. पुढे येऊन दोन्ही बाटल्या त्याने तोंड शिवून आश्चर्याने बघणाऱ्या सुनयनाच्या हातात दिल्या. "सायरा?"

तिने त्याच्या चेहऱ्याकडे न बघता त्याच्या रिकाम्या हातात सांदणाचा डबा ठेवला आणि मागे न बघता लिफ्टकडे पळत सुटली. तो तिला हाक मारत लिफ्टपाशी पोहोचेपर्यंत लिफ्ट खाली गेली होती. ती गाडी काढून लगेच रस्त्याला लागली आणि घरी जाऊनच तिने श्वास घेतला. एव्हाना डोळ्यात जमणाऱ्या पाण्याने तिचे डोळे चुरचुरत होते. तिने आत जाऊन तोंडावर पाणी मारून खसाखसा तोंड धुतलं. फोनवर अनिशचे चौदा मिस्ड कॉल होते. तिने फोन स्विच ऑफ करून टेबलवर ठेवला. राग आणि दुःखाने तिला काय करावं सुचत नव्हतं. एकटीने ह्या घरातही राहावंसं वाटत नव्हतं. तो इथे येण्याच्या आत कुठेतरी निघून जावं. डोळे पुसतच फोन हातात घेऊन पुन्हा स्विच ऑन केला आणि चंदाला कॉल केला.

हायहलो झाल्यावर ती मुद्द्याचं बोलली.
"मै बहोत बोर हो चुकी हूं यार, नेहाभी यहां नहीं है. आय नीड अ ब्रेक. तुम्हारा वो येऊरवाला घर खाली है क्या?" चंदाच्या वडिलांचं येऊरच्या जंगलात एका पाड्यावर वीकेंड होम होतं जे ते अधूनमधून रेंट आउट करायचे.

"हां, खाली तो है. लेकीन.."

"मेरे लिए बुक कर दे प्लीज, दो दिन. आय रिअली नीड सम स्पेस. अकेले रहना है."

"ओके, कब जा रही हो?"

"आज, अभी."

चंदाने मान हलवली."कुछ सिरीयस है? आय कॅन मीट यू.."

"नो, जस्ट लेट मी गो देअर."

"ओके, चाबी एक लोकल मेड के पास रहती है, मैं उसको इन्फॉर्म कर देती हूं. लोकेशन व्हाट्सऍप करती हूं."

"थँक्स यार, आय ओ यू अ लॉट! अमाउंट भी लिख, मैं जीपे करती हूं."

"चिल! जो भी दिमाग मे चल रहा है, सॉर्ट आउट करके आना." चंदा काळजीने म्हणाली.

"आय विल!" म्हणून तिने फोन ठेवला. पटापट एका जिम बॅगमध्ये चार कपडे आणि टूथपेस्ट ब्रश, बॉडी वॉश वगैरे भरले आणि उबर बोलावली. जाताजाता थांबून एटीएमवर थोडी कॅश काढली.

शहरातल्या रणरणत्या उन्हातून येउरला पोचताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी आणि सावल्यानी तिचं स्वागत केलं. जीपीएसवरून मार्ग काढत कॅब घरासमोर येऊन थांबली. चहूकडे कंपाउंड वॉल आणि मध्ये मोठ्या अंगणात तांबडे चिऱ्याचे दगड आणि काँक्रीटमध्ये बांधलेलं कौलारू घर होतं. गेटजवळ पाड्यावरची मल्ली नावाची आदिवासी बाई उभी होती. तिने घर उघडून ठेवलं होतं. साफसफाई करून फ्रिजमध्ये खाण्याचं थोडं सामानही भरून ठेवलं होतं. काही लागलं तर फोन करा म्हणून तिने नंबर दिला आणि किल्ली हातात देऊन ती निघून गेली.

आतल्या भिंती पांढऱ्याशूभ्र होत्या, वर गडद सागवानी छत होतं. दारं, खिडक्या निळ्या रंगाने रंगवल्या होत्या. बाहेरच्या खोलीत लाकडी झोपाळा आणि दोन खुर्च्या होत्या. बेडरूममध्ये स्वच्छ पांढरी बेडशीट घातलेला एक मोठा बेड आणि कपाटात उशा, ब्लॅंकेट्स वगैरे होती. ते सगळं बेडवर टाकून तिने कपडे कपाटात ठेवले आणि बेडवर आडवी झाली. तिला पुन्हा पुन्हा सुनयना दिसल्याने प्रसंग आठवत होते. ओटी, बरिस्टा ते अनिशचं घर. ती दिवाळीला स्वतःच्या घरी न जाता थांबली म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅन होता. तिने ज्या पझेसिव्हपणे त्याच्या मांडीवर हात ठेवला होता ते तिच्या डोळ्यासमोर आलं. आणि अनिशच्या एका कॉलवर ती सगळं सोडून लगेच आली होती, बाकीचे सर्जन तयार नसतानाही. पण अनिश? तो का असं वागतोय आणि काल जे झालं ते काय होतं!

तिच्या डोळ्यातून अजून पाणी वहात राहिलं. एव्हाना काळोख पडू लागला होता. ती उठून बाहेर गेली. अंगणात एक राऊट आयर्नचे टेबल आणि दोन नक्षीदार खुर्च्यांचा सेट होता. ती खुर्ची ओढून मान मागे टाकून वर बघत बसली. उंच झाडांची महिरप दिसणाऱ्या काळ्याभोर आकाशात आता एक एक चांदणी उठून दिसायला लागत होती. थोड्याच वेळात आकाश ताऱ्यांनी भरून गेलं. तिला तहान भुकेची जाणीव नव्हती. राग, वैफल्य, दुःख, त्रास अश्या सगळ्या भावना मनात फेर धरून नाचत होत्या. थोडी थंडी वाजू लागल्यावर ती जरावेळ हाताची घडी घालून उभी राहिली आणि शेवटी रागाने खुर्ची ढकलून आत निघून गेली. खुर्ची वाकडी तिकडी होत बाजूला कलंडली.

बेसिनसमोर उभी राहत तिने तोंडावर पाणी मारलं, पुसताना आरशात पाहिलं तर रडके डोळे सुजून लालसर झाले होते. सगळा चेहराच किंचित सुजून लाललाल झाला होता. फ्रिजजवळ जाऊन तिने घटाघट एका बाटलीतले पाणी प्यायले. काचेच्या डायनिंग टेबलवर एका परडीत सफरचंद रचून ठेवली होती. "गुड! कीप द डॉक्टर अवे!" ती तोंड वाकडं करत म्हणाली.

ती जाऊन मोठ्या खिडकीतल्या सेटीवर बसली. काचेतून बाहेर अंधाराचं साम्राज्य होतं. तिने जरा घाबरत तिथून नजर हटवून मोबाईल हातात घेतला. नेहाचा ट्रेन खेडला पोचल्याचा मेसेज होता. ट्रेनमध्ये उनो खेळताना ग्रुपचे दोन तीन फोटो होते. तिने दोन चार थंब्सचे इमोजी टाकून व्हॉट्सऍप बंद केले. मधेच कंटाळा म्हणून तिने खूप दिवसांनी फेसबुक उघडलं.

स्क्रोल करताकरता न राहवून तिने सर्चमध्ये अनिशचं नाव टाकलं. त्याची वॉल बर्थडे विशेसनी भरली होती. आ वासून तिचं तोंड उघडंच राहिलं. आज त्याचा बर्थडे होता! दहा नव्हेंबर.. तिने तारीख लक्षात ठेवली. डॉ. शेंडेनी त्याला टॅग केलेला एक फोटो दिसत होता. What an amazing time with college buddies, Happy birthday Anish! फोटोत तिने बघितलेले सुनयना, अनिश त्यांच्याबरोबर शेंडे आणि अजून आठ दहा लोक अनिशच्या लिव्हिंग रूममध्ये तो केक कापताना टाळ्या वाजवत होते. टेबलावर केकशेजारी बरेच बुके आणि तिने दिलेला डबा होता. तिने कपाळावर हात मारत स्वतःला येत असतील तेवढ्या सगळ्या शिव्या घातल्या आणि तिला स्वतःच्या मुर्खपणावर पुन्हा जोरदार रडू आलं. अनिश किती किती चिडला असेल.. आता तो माझ्याकडे पुन्हा ढुंकूनही बघणार नाही. तिने ओठ चावून रक्त काढलं.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३७

तो काळोखातून GPS दाखवेल तिकडे कार चालवत होता. सुनसान रस्ता, दोन्ही बाजूला किर्र झाडी आणि मधेच रस्ता ओलांडणाऱ्या लहान प्राण्यांचे बल्ब पेटल्यासारखे चमकून जाणारे डोळे.

---

दुपारी कॉलेजचे दिवस आठवून हसत खेळत जेवण झाल्यावर एकेकजण कटला तेव्हा कुठे त्याला हायसं वाटलं होतं. सायरा निघून गेल्यापासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. ना बर्थडेमध्ये, ना रियूनियनमध्ये. सायरा फोन उचलत नव्हती, काही बोलतही नव्हती. पण घरात ते लोक असल्यामुळे त्याला निघता येत नव्हतं. सायराला काय वाटलं असेल त्याचा अंदाज त्याला होता पण तेवढाच तिचा रागही येत होता. कारण या लोकांऐवजी त्याला आज ती तिथे हवी होती आणि ती येऊनही त्याला मिळाली नव्हती. तिचे हात आणि सुई पकडून टाके घालणारी नाजूक बोटं आठवत त्याने एकट्याने डब्यातलं सांदण संपवलं होतं. तिची गिफ्टची आयडिया आठवून त्याला जरा हसू आलं.

दुपारपासून दाबून ठेवलेला सगळा राग, वैताग आता असह्य होऊन उफाळून बाहेर येत होता. त्याने नेहाला कॉन्टॅक्ट केल्यावर तिने दीदी कदाचित चंदाकडे गेली असेल म्हणून तिचा नंबर दिला, त्याने जरासा चार्म वापरल्यावर चंदाने सरळ त्याला हा पत्ताच दिला पण कदाचित फोन लागणार नाही म्हणून बजावून सांगितलं होतं. हां! जसं काही तो कॉल करून गप्प बसणार होता.

तापलेलं डोकं शांत करायचं म्हणून त्याने कालची दिवाळी पार्टी डोक्यात रिवाईज केली. रात्री त्या दोघींना घरी ड्रॉप करायला जाताना सायरापेक्षा जास्त प्रश्न नेहाने विचारले होते.

"सो, यू आर अ कपल नाऊ? लाईक फेसबुक ऑफिशियल?" बॅकसीटवरून पुढे वाकून नेहाने विचारले.

"तुला माहितीये मी फेसबुक जास्त वापरत नाही." सायरा म्हणाली. "माझी कधीतरी बनवलेली प्रोफाइल आहे पण मी कधी फेसबुक बघत नाही. बट येस, वी आर अ कपल नाऊ." अनिश शेजारी सायराकडे बघून हसत म्हणाला.

"बोरिंग पीपल! स्टिल, आय एम हॅपी फॉर यू!" त्यानंतर तिने त्याच्या सगळ्या आयुष्याबद्दल प्रश्नांचा भडिमार केला. त्याच्या कलिग्जमध्ये जी हिम्मत नव्हती त्याच्या दुप्पट प्रश्न नेहाने विचारले.

"मला माझ्या बहिणीच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे ना!" नेहा हसत म्हणाली.

"ऑफ कोर्स!" तो गालात हसत नजर रस्त्यावर ठेऊन म्हणाला. सायराने मागे वळून तिला एक चापट मारली.

घरी पोचताच नेहा पाठ फिरवून चालायला लागल्यावर त्याने पटकन सायराला खेचून तिच्या केसांचा गंध नाकात भरून घेत मानेवर ओठ टेकले होते.

---

समोर जोरात भुंकत चकाकत्या डोळ्यांनी रस्ता क्रॉस करणाऱ्या भेकराकडे बघत ब्रेक लावून त्याने श्वास सोडला. परत गाडी सुरू करून पुढच्या दहा मिनिटात तो त्या घराबाहेर पोचला होता. कंपाउंड वॉलमधल्या लहानश्या गेटला आतून कडी होती. त्याने फोनमधला टॉर्च ऑन केला. आत हात घालून कडी काढणं शक्य नव्हतं. त्याने कॉलेजच्या सवयीने सरळ गेटवर हात रोवून पलीकडे उडी मारली. आत जाताच त्याला अंगणात टेबलावर सांडलेली पाण्याची बाटली आणि थोडी दूर तिरकी पडलेली खुर्ची दिसली. त्याच्या मनात भीतीची लहर चमकून गेली.

भराभर पावलं उचलत तो दरवाज्याकडे गेला. शेजारच्या खिडकीच्या काचेत दिवे सुरू ठेऊन सेटीवरच पाय पोटाशी घेऊन झोपी गेलेली सायरा दिसली. तिने फक्त मांडीपर्यंत येणारा काळा लांब व्ही नेक स्वेटर घातला होता. आवंढा गिळून त्याने डोअरबेल वाजवली. ती आवाजाने दचकून जागी झाली. भराभर दरवाजाकडे येऊन तिने सेफ्टी डोअरमधून निरखून पाहिलं आणि बाहेर तो दिसल्यावर धाडकन दार उघडलं. निघताना त्याने जीन्स आणि हाताशी सापडला तो कॉफी ब्राऊन फुल स्लीव्हजचा पातळ टीशर्ट अडकवला होता. ज्यातून त्याचे बायसेप्स, ट्रायसेप्स आणि बाकी सगळे कट्स स्पष्ट दिसत होते. त्याने आत जाऊन एका हाताने शूज काढले आणि खाली तिच्याकडे बघत राहिला. त्याचा संताप, प्रेम, काळजी सगळ्या भावना एकाचवेळी डोळ्यात चमकून गेल्या. ती त्याला स्पर्श न करायची काळजी घेत वर बघून काही न बोलता डोळ्यांनीच त्याची माफी मागत आर्जव करत होती. तिला त्याच्या चिडण्याची भीती वाटत होती आणि त्याचवेळी तो खाऊन टाकण्याइतका डेलिश दिसत होता.

"सायरा, तू.." तो रागाने काहीतरी बोलणार इतक्यात तिने पुढे होऊन त्याच्या गळ्यात हात टाकत त्याला खोलवर किस केलं. त्याने प्रतिसाद दिला नाही असं होऊच शकत नव्हतं. त्याचे मधाळ डोळे आता गढूळले. तो तसाच तिला किस करता करता मिठीत धरून आत घेऊन जायला लागला. जाताजाता टेबलाला धक्का लागून परडीत रचून ठेवलेली सगळी सफरचंद फरशीवर गडगडत गेली. त्याच्या डोळ्यात गडद काहीतरी चमकलं आणि त्याने तिला वर उचललं. "आय एम गोइंग टू पनिश यू सायरा.." त्याचे डोळे सांगत होते. तिने गुढघे त्याच्या कंबरेभोवती अडकवून किस करणं सुरूच ठेवलं. "अँड आय लव्ह द पनिशमेन्ट!" तिचे नशिले डोळे म्हणाले. तिला त्याला काही बोलूच द्यायचं नव्हतं. इतकं होऊन तो तिच्यासाठी इथे येऊन पोचला यातच तिला सगळं काही मिळालं होतं. सगळीकडे उष्णतेच्या लाटा होत्या. कानातून वाफा निघत होत्या. तिच्या मेंदूत आत कुठेतरी 'आय सी रेssड.. रेssड' वाजत होतं.

आता तिची बोटं मानेवरून त्याच्या दाट केसात अडकून पडली होती. दार ढकलून तो बेडच्या काठावर तिच्यासकट बसल्यावर तिने दोन्ही हातांनी त्याचा टीशर्ट ओढून काढला. कानाच्या पाळीपासून, गळा, छाती असं खाली खाली किस करत ती ऍब्जपर्यंत पोचल्यावर न राहवून त्याने तिचा स्वेटर काढून बाजूला फेकला आणि तिला उचलून बेडवर टाकली. तिच्या उघड्या त्वचेवरून, सगळ्या वळणांवरून फिरणाऱ्या लांबसडक बोटांची जागा त्याच्या ओलसर ओठांनी घेतली आणि तिने श्वास रोखून मान मागे टाकत डोळे मिटले. बाहेरच्या रातकिड्यांची किरकिर आणि जंगलाचे आवाज सगळं गायब होऊन फक्त जोरजोरात धडधडणाऱ्या दोन हृदयांचा एकत्र आवाज येत होता.

तिला जाग आली तेव्हा त्याने दोन्ही हातांची घडी डोक्याखाली उशीसारखी घेऊन डोळे मिटले होते. नेव्ही ब्लू ब्लॅंकेट त्याच्या कंबरेपर्यंत सरकलं होतं. त्याचे दंड, छाती, ऍब्ज नेहमीसारखेच उठून दिसत होते. तिच्या डोळ्यांतून अजून रात्रीची नशा गेली नव्हती. तिने त्याच्या कुशीत घुसून छातीवर हात टाकला आणि हनुवटीवर हलकेच ओठ टेकले. "मॉर्निंग, डॉक!" ती गालात हसत म्हणाली. त्याने डोळे उघडून पुढे होत तिचा ओठ दातात पकडला. पुन्हा एकदा व्यवस्थित एकमेकांच्यात विरघळून झाल्यावर ती ब्लॅंकेट गळ्यापर्यंत ओढून त्याच्या कुशीत शिरली. "अनिश, आय एम सॉरी.. आय एम रिअली, एक्स्ट्रीमली, सो सो सॉरी.." तिच्या अस्फुट शब्दांनी त्याच्या गळ्यापाशी ओठांचा हलका स्पर्श झाला.

"हम्म... तुला काय वाटलं असेल ते मला नंतर विचार केल्यावर कळलं, ऍक्चूली सू वॉज नॉट पर्टीक्युलरली इनोसंट. कॉलेजमध्ये तिचा माझ्यावर क्रश होता पण मी तिला तसं कधी बघितलं नाही. आत्ता इथे आल्यावर तिला माझ्या डिवोर्सबद्दल कळलं, तेव्हापासून ती माझ्याशी जवळीक वाढवायचा प्रयत्न करत होती. आय एम शुअर, तिची फ्लाईट मिस झाल्याचाही बहाणाच असेल. तिने शेंडेला सांगून मला आवडेल म्हणून सॉर्ट ऑफ रियूनियन घडवून आणली. मला ते सरप्राईज होतं. आय मीन, ओके. मला बरं वाटलं त्या सगळ्यांना भेटून. पण तुला दारात बघून तिला हिंट मिळाली. नंतर जेवताना मी तिला सांगून टाकलं." तो तिच्या रेशमी केसांमधून बोटं फिरवत म्हणाला.

"सी, आय न्यू इट! मग आपल्याबद्दल काय सांगितलं 'सू' ला?" सू वर जोर देत डोळे मोठे करत तिने विचारले.

"दॅट यू आर माईन!" तो तिच्याकडे कुशीवर वळून तिला स्वतःकडे ओढून घेत म्हणाला. तिने समाधानाने किंचित हसत त्याचे ओठ ताब्यात घेतले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३८

दिवाळीचे दिवस असूनही खिडकीबाहेरच्या उन्हात पाऊस झिमझिमत होता. पावसामुळे अंगणात बकुळीच्या ओल्या फुलांचा सडा पडला होता. गॅसवर वाफाळणारी कॉफी मगमध्ये ओतली जाण्याची वाट बघत होती. कुकरची चौथी शिट्टी होताच त्याने गॅस बंद केला. तिने ओट्यावरून खाली उतरून मोठा चमचा उचलताच त्याने तो तिच्या हातातून ओढून घेतला.

"अनिशss प्लीज दे ना, मी पटकन करते."

त्याला हसू आलं. ती एवढीशी दिसत होती की तो एका हाताने तिला उचलून बाजूला ठेऊ शकत होता. त्याने चमचा उचलून एका हाताने उंचावर धरला. तिला पाय उंचावूनही तो मिळणं शक्य नव्हतं.

"तू बाहेर जाऊन मस्त कॉफी पी, जा!" तो तिचा हात धरून कॉफीकडे ढकलत म्हणाला. किचनमधल्या डब्यात फक्त डाळ, तांदूळ होते आणि काल मल्लीने थोडे कांदे, बटाटे, टोमॅटो वगैरे बेसिक गोष्टी आणून ठेवल्या होत्या. त्याने डाळ तांदूळ कुकरला लावले आणि भाज्या चिरल्या तरीही तो स्वयंपाक करतो आहे हे सायराच्या पचनी पडत नव्हतं. एकतर तो यूट्यूब बघून हळूहळू एकेक गोष्ट करत होता आणि तिला हसू येत होतं. तिने पंधरा मिनिटात हे करून संपवलं असतं पण त्याला तिची लुडबूड नको होती.

"सायरा, प्लीज!" त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला लिव्हिंग रूममध्ये नेऊन बसवलं. "तुझ्यासाठी शेवटचा स्वयंपाक कुणी केला होता?"

तिने त्याच्याकडे बघून विचार केला, उत्तर द्यायला जरा वेळच लागला. "हम्म नेहाने काहीतरी केलं होतं, पास्ता वगैरे." तो हसला. प्लीज मला हेल्प करू दे, ती डोळ्यांनी आर्जव करत होती पण तो बधला नाही. त्याने पटकन तिची हनुवटी धरून ओठांवर ओठ टेकले आणि उठून उभा राहिला. "नाऊ सिट!"

तरी ती उठून उभी राहिली. "स्टे देअर!" तो उलट पावली मागे जात म्हणाला.

"हे! आय एम नॉट युअर डॉग!" ती ओठांचा चंबू करत ओरडली.

"हम्म, असायला हवी होतीस - म्हणजे माझं ऐकलं तरी असतंस!" तो चेहरा गंभीर करून किचनकडे जात म्हणाला. ती वाकडं तोंड करून सोफ्यावर मांडी घालून बसली आणि कॉफीचा मग उचलून तोंडाला लावला. पंधरा वीस मिनिटात तो दोन प्लेट्समध्ये गरमागरम दाल खिचडी घेऊन आला. शेजारी कैरीचं लोणचं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये काकडी टोमॅटोचं सॅलड होतं. 

तिचं हृदय पूर्णपणे वितळलं. तिने खिचडीवर तोंड नेऊन, डोळे मिटून खोल श्वास घेतला. "धिस इज टू मच! मला एवढं पॅम्पर करायची गरज नव्हती." ती हसत म्हणाली. त्याने शेजारी बसून तिला जवळ घेत तिच्या दंडावरून हात फिरवला. "इट्स नथिंग! हॅपी दिवाली!"

"अरे हो, हॅपी दिवाली" ती त्याच्या गालावर ओठ टेकत म्हणाली.

---

चारच्या सुमारास जरा जवळपास हिंडू म्हणून ते बाहेर पडले. सायरा चंदाबरोबर एकदा इथे आली असताना धबधब्यावर गेली होती ते आठवून तिने अनिशला त्या पाऊलवाटेवर वळवले. दोन्ही बाजूला वाऱ्याच्या झोताने हलणारे उंच गवत आता वाळून सोनेरी झाले होते. थोड्या पावसाने रपरप झालेला चिखल तुडवत ते धबधब्याजवळ पोचले तर तिथे कड्यावरून जेमतेम मनगटाएवढी धार पडत होती. शिट! सायराने घामेजल्या कपाळावर हात मारला. अनिश तो 'धबधबा' बघून हसत सुटला. सायराचं पडलेलं तोंड बघून 'इट्स ओके बेब' म्हणत तो जवळ जातच होता, तेवढ्यात त्याच्यामागून लहान मुलाची किंकाळी आणि पाठोपाठ रडं ऐकू आलं. त्यांनी पटकन तिकडे धाव घेतली.

पाड्यावरचा एक तीन चार वर्षाचा मुलगा कातळावर बसून रडत होता, त्याचा दोन चार वर्षांनी मोठा भाऊ पाय हातात धरून काटा काढायचा प्रयत्न करत होता. थांब! अनिश जोरात ओरडला. तो मुलगा घाबरून त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. लहानग्याच्या रबरी स्लीपरमधून आरपार जाऊन तळपायात मोठा काटा रूतला होता. सायराने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला जरा शांत केले आणि अनिशने हलक्या हाताने काटा मोडू न देता अलगद बाहेर काढला. पण आता तिथून रक्त यायला लागले होते. जखम हाताने दाबून धरत त्याने मुलाला उचलले आणि मोठा भाऊ दाखवेल त्या पायवाटेने त्याला घरी घेऊन गेला.

पाड्यावर पत्रे आणि गवताने शाकारलेली जेमतेम वीस घरं होती, समोर स्वच्छ सारवलेली अंगणं आणि मधून मळलेली पायवाट. पाड्यावरचे बहुतेक सगळे टणके लोक कामावर बाहेर गेले होते. डॉक्टर आले म्हटल्यावर तिथल्या घरात शिल्लक असणाऱ्या म्हाताऱ्या आणि लहानलहान पोरं गोळा झाली. पाड्यावरच्या आशा वर्करने त्याला मेडिकल किट आणून दिलं. जखम धुवून बेसिक ड्रेसिंग करून होईतो त्या मुलाच्या आजीने जरा बऱ्यापैकी 'कोप' शोधून त्यांना गुळाचा कोरा चहा आणून दिला. तेवढ्यात समोर एक साठीची बाई डोक्यावर धुण्याचं गाठोडं घेऊन जाताजाता थांबली. तिने डोळे बारीक करून अनिशकडे बघितले आणि एकदम गाठोडं खाली टाकून त्याच्याकडे आली. "अरे माज्या पोरा!" म्हणत तिने कडाकडा त्याच्या तोंडाभोवती बोटं मोडली. "तू हिकडं कुठं आला डॉक्टर?"

"अरे! सरूबाई तुम्ही इथे राहता होय! आम्ही असंच फिरायला आलो होतो." तो ओळखीचं हसला. "ह्या सरुबाई. नवघरच्या PHC मध्ये आया म्हणून काम करायच्या, मी तिथे रूरल इंटर्न असताना!" तो सायराकडे बघून म्हणाला. ओह, ती सरुबाईकडे बघून हसली.

"हाव, आता रिटायर झाली मी." कपाळाला काळी टिकली आणि गळ्यात पोवळ्याचा सर घातलेली सरुबाई समोरचे पडलेले दात दाखवत हसली. "ही तुजी मिशेश काय?" तिने उत्सुकतेने विचारलं.

सायराने ओठ दाबून हसत त्याच्याकडे बघितलं. त्याने मान हलवली. "कसा जोडा शोभतो माssय." म्हणत तिने पुन्हा एकदा दोघांची दृष्ट काढली. "आता मी जेवल्याबिगर जाऊ देयची नाय." म्हणत तिने त्यांना सोडलंच नाही. घरात तिचा मुलगा, सून आणि लहान नातवाबरोबर बसून तिने त्या लहानश्या गावातल्या सरकारी हेल्थ सेंटरचे, त्याच्या इंटर्नशिपचे किस्से रंगवून रंगवून सांगितले. तिच्या वाक्यावाक्यातून अनिशचं कौतुक ओसंडून वहात होतं. सायरा अभिमानाने त्याच्याकडे बघत बसली होती. अनायासे डॉक्टर आलाय तर दाखवून घेऊ म्हणून लहान मुलांची रीघ लागली, अनिशनेही त्यांना बघून काहींना प्रिस्क्रिप्शन लिहून दिली, काही बायकांना मुलांच्या आहाराबद्दल सल्ले दिले.

संध्याकाळ होताच पाड्यावरचा अंधार उजळून टाकत सगळ्या घरांच्या दाराबाहेर मातीच्या दोन दोन पणत्या लागल्या. कसलेही फटाके फोडून धूर न करता लोक देवीची पूजा झाल्यावर फेर धरून ढोलक वाजवत तारपा नाचले. अनिशला तिथे मनापासून सगळ्यांमध्ये मिसळून एन्जॉय करताना बघून तिला नवल आणि आतून तेवढंच छान वाटत होतं.

आज गावदेवीला सगळ्यांनी चवळीच्या शेंगा, काकडी, गूळ आणि तांदळाच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून झेंडूच्या फुलांनी पूजा बांधली होती. सरूबाईच्या सुनेने एकीकडे चुलीत भाजलेले करांदे, कोनफळाचे मीठ लावून परतलेले काप, चवळीच्या शेंगांची भाजी, नव्या तांदळाची भाकरी आणि बरोबर काकडीच्या रसातले वडे असा स्वयंपाक केला. तिच्या म्हणण्यानुसार चवळी, नवा तांदूळ, काकडी, कोनफळ आणि करांदे ह्या पाच गोष्टी आदिवासी दिवाळीत पुजून मगच खायला सुरुवात करतात. जेवण आणि भरपूर गप्पा मारून झाल्यावर अनिशने सरुबाईच्या नातवाच्या हातात ती नको म्हणत असतानाही थोडे पैसे दिले.

जेवण झाल्यावर सरूबाईचा मुलगा टॉर्च घेऊन त्यांना घरापर्यंत सोडायला आला.

---

"अनिश, इट्स लाईक आय नेव्हर न्यू यू!" हातपाय धुतल्यावर कपडे बदलून ती त्याच्याशेजारी बसत म्हणाली. तो मान हलवून हसला.

"मी खरंच बाकी सगळ्यांप्रमाणे तुला एक कोरडा, खडूस सर्जन समजत होते. आय वॉज टोटली रॉन्ग. तू तिथे त्या साध्या माणसांच्यात जितकं मनापासून प्रेमाने आणि त्यांच्यातलाच एक असल्यासारखं वागत होतास तसा तू असशील, असा मी आधी कधी विचारही केला नव्हता. आय एम रिअली प्राउड ऑफ यू.. आणि तू रूरल इंटर्नशिप पण केली होती? मला वाटलं बाकी श्रीमंत मुलांसारखा पेनल्टी भरून सुटला असशील." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

"अम्मा! ती दर रविवारी गावात जाऊन फ्री कॅम्प घ्यायची. त्यामुळे रूरल इंटर्नशिप चुकवायचा प्रश्नच नव्हता." आता विषय निघालाच होता तर त्याला तिला बरंच काही सांगायचं होतं पण ते दोघेही खूप दमले होते. त्याने तिच्याकडे वाकून बघितलं तर तिच्या पापण्या जडावल्या होत्या. ओके, सम अदर टाईम.. म्हणत तो गप्प राहिला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३९

पहाटे जाग आली तीच इमर्जन्सी कॉलने! पटापट आवरून निघताना, तो नको म्हणत असतानाही सायराने तिची सुट्टी आवरती घेतली आणि दोघांनी हॉस्पिटल गाठलं. जाता जाता कारमध्ये अनिशने सर्जरीबद्दल बोलताना 'इन यूटरो' म्हणताच तिचे डोळे विस्फारले.

पेशंट होती रेशम सिंघल, नवउद्योगपती आणि शार्क टॅंकचा जज गौतम सिंघलची बायको. सायराच्या भुवया उंचावल्या. दहा दिवसापूर्वीच इंस्टावर रेशमच्या बेबी बम्प शूटचे फुलांचा मुकुट घालून, गाऊन लहरणारे फोटो नेहाने तिला दाखवले होते. ही तिची दुसरी प्रेग्नसी होती. मोठी मुलगी चार वर्षांची होती. रेशमचे सव्वीस आठवडे उलटून गेले आणि अचानक लेटेस्ट स्कॅनमध्ये गर्भाच्या हृदयावर लहानसा ट्यूमर वाढताना दिसला होता. ही लाखात एक केस होती. पुढच्या एखाद दोन आठवड्यात पोटातच गर्भाचे हृदय बंद पडू शकत होते.

तिचे ओबी सर्जन आणि फीटल ऍनेस्थिओलॉजिस्ट ओटीमध्ये अनिशची वाट बघत थांबले होते. अनिशबरोबर अजून एक जनरल सर्जन, रेसिडेंट डॉक्टर्स, असिस्टंटस्, नर्सेस अशी भलीमोठी टीम काम करणार होती. गौतम सिंघल बाहेर फोनवर कुणाशी तरी जोरजोरात वाद घालत होता. अनिश पॅसेजमध्ये येताना दिसताच तो जवळ जाऊन, "डॉक्टर, मेरे बेबीको बचाईये. उसे कुछ नही होना चाहीये. पहले ही हमारे बहोत सारे ivf फेल हुए है. ये वाला बचना चाहीये. मैं पानी की तरह पैसा बहा दूंगा. मुझे तो उसको सर्जरी के लिये यूएस ले जाना था, लेकीन टाइम नही है!" अनिशने वैताग चेहऱ्यावर न दाखवता फक्त मान हलवली आणि आत गेला.

टीम तयार होती. रेशमला टेबलवर ठेऊन वर चार भलेमोठे लाईट्स सोडले होते. सगळे रिपोर्ट्स बघून झाल्यावर ऍनेस्थेशीया दिला गेला. गर्भातल्या बाळाला झेपेल इतकीच भूल दिली होती. रेशम आणि गर्भातील बाळ दोघेही आता पूर्णपणे भुलीच्या अमलाखाली होते. रेशमच्या ओटीपोटावर कट देऊन ओबी सर्जनने गर्भाशय उघडला. बाळाचं वजन जास्त होतं. घडी घातलेल्या हातातून छाती दिसत नव्हती.

दुसऱ्या सर्जनने अलगद बाळाचे डोके आतच ठेवून खांदे धरले आणि दोन्ही हात आईच्या पोटातून बाहेर काढले. आता हृदयाचा ऍक्सेस मिळाला. अनिशने सफाईदारपणे बारीक कट घेत, हृदयावरची ट्युमरची ग्रोथ पूर्ण कापून काढली आणि जखम बंद केली. ओबी सर्जनने गर्भाशय पुन्हा शिवून बंद केला. या सगळ्यात काही तास निघून गेले. आता अजून दहा-अकरा आठवडे तरी बाळ पोटात राहून नैसर्गिकरित्या त्याची वाढ होणे गरजेचे होते. तोपर्यंत रेशमला हॉस्पिटलमध्येच अंडर ऑब्झर्वेशन रहावे लागणार होते. 

सगळे पॅरामीटर्स ओके करून ओटीचं दार उघडताच बाहेरून गौतमच्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेर नर्सेस, रिसेप्शनिस्ट वगैरे वैतागून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. अनिश त्याच्याशी एक अक्षरही न बोलता स्क्रब करायला निघून गेला. ओबी सर्जनने थांबून बाळ व्यवस्थित असल्याचं सांगितल्यावरही तो आक्रस्ताळा माणूस शांत बसत नव्हता, त्याची प्रतिक्रिया होती "मेरा बेबी लाखोंमे एक है, उसका डिसीज भी लाखोंमे एक ही होगा ना!"

---

"वॉव! दॅट वॉज अमेझिंग! आपल्या हॉस्पिटलमधली ही अशी पहिलीच केस आहे ना?" काही वेळाने हातात दोन मग घेऊन त्याच्या केबिनमध्ये येत सायरा उद्गारली.

त्याने फाईलमधून डोकं वर केलं. तो हसला तरी कपाळाची आठी कायम होती. "हम्म, पहिलीच." त्याने पटकन कॉफीचा एक घोट घेतला. "ह्याला म्हणतात एनटायटल्ड! इथे ह्या मुलाला जगात येण्यापूर्वीच सगळ्या सेवा मिळत आहेत, आय मीन ठीक आहे त्यात त्या बाळाची काही चूक नाही पण त्याचवेळी आपल्या देशात अशी कित्येक बाळं मरतायत ज्यांना जन्म झाल्यावरसुद्धा पैशाअभावी, फॅसिलिटीजअभावी मदत मिळत नाही. मला हेच बदलायचं आहे."

तिने ऐकताना मान हलवली. तो अजून काही बोलणार इतक्यात पोस्ट ऑप व्हिजीटसाठी डॉ. निलेश त्याला बोलवायला आला. नंतर शिफ्ट संपेपर्यंत तिला तो दिसलाच नाही. शिफ्ट संपून घरी गेल्यावर तिला एकटेपणा खायला उठला. अनिश आज हॉस्पिटलमध्येच थांबणार होता. सोनलच्या केसमुळे पुढे ढकललेलं शेड्यूल आता संपवायचं होतं. पुढचे तीन चार दिवस असेच कामाच्या रेट्यात गेले.

अनिशबरोबर धड बोलायलाही वेळ नव्हता. दोन दिवस अनिशही थोडा अलिप्त, कसल्यातरी विचारात दिसत होता. शनिवारी सकाळी हॉस्पिटलकडे निघतानाच तिच्या डोक्यात विचार सुरू होते. हुश्श, उद्या रविवार आणि तिने जुळवून आणलेला दोघांचा ऑफ. दोन दिवसांनी नेहा येण्यापूर्वी हा एकच दिवस सुट्टीचा होता. लेट्स मेक इट इव्हेंटफुल! तिने जीभ चावली.

ती पार्किंगमधून लिफ्टकडे वळली. आज तिने स्किनी फिट ब्लॅक ट्रेगिंग्ज आणि सुळसुळीत बटन डाऊन फ्लोरल टॉप घातला होता. लिफ्ट खाली आली आणि तिच्यासमोरच अनिश आत शिरला. एकटाच दिसतोय म्हणून हसत त्याच्यामागोमाग ती आत गेली. त्याने तिच्याकडे बघून भुवया उंचावल्या, तो पुढे काही बोलणार इतक्यात लोकांचा लोंढा आत घुसला. तो मागे भिंतीला टेकला आणि दार बंद होताना लोकांच्या गर्दीमुळे ती त्याच्यावर ढकलली गेली. तिला पाठीमागे त्याची जाणीव होत होती, त्याच्यामधून येणारी उष्णता तिचं डोकं हलकं करायला पुरेशी होती. तिचा त्याला किंचित स्पर्श झाला, लिफ्टमध्ये हलायलाही जागा नव्हती. तिच्या मानेवर त्याचा उबदार श्वास फुंकर मारल्यासारखा जाणवला.

तिसऱ्या मजल्यावर अजून कोणीतरी लिफ्टमध्ये शिरलं आणि मागे सरकताना ती पूर्णच त्याला टेकली. तिच्या नसानसांमधून उष्णतेची लहर झुपकन वहात गेली. तिला आता त्याच्या अंगाचे सगळे चढ उतार जाणवत होते आणि प्रत्येक श्वासाबरोबर खालीवर होणारी त्याची छाती. तिचा श्वास रोखला गेला, इतक्या जवळून त्याचा हलका मस्की सुगंध तिच्या नाकातून डोक्यात शिरत होता. तिच्या मणक्यातून ठिणग्यांची ओळ सरकत होती आणि त्वचेच्या प्रत्येक जराश्या स्पर्शाने चटका बसत होता.

शिट! त्याचे जुने स्पर्श आठवून तिच्या अंगाचा कण न कण पेटण्याच्या बेतात होता. समोर दारावरच्या डिजिटल डिस्प्लेवर मजल्यांचे नंबर्स काकवी ओघळल्यासारखे हळूss सरकत होते. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबताच ती ताडकन गर्दीतून बाहेर पडली. तो तिच्या शेजारून शुभदाला गुड मॉर्निंग म्हणून केबिनकडे निघून गेला. शुभदा भुवया उंचावून तिच्याकडे बघत होती. ती शांतपणे त्याच्या मागोमाग चालत दार ढकलून आत गेली आणि दार आतून लॉक केलं. त्याने खिडकीचे ब्लाइंडस् खाली करेपर्यंत ती त्याच्याजवळ पोचली होती. इट्स गोइंग टू बी अ गुड मॉर्निंग!

---

लंच ब्रेकनंतर ती सोनलला बघायला निघाली होती. आज पहिल्यांदा सोनल स्वतःच्या पायावर उभी राहून चालली होती. ती पॅसेजमध्ये गेली तर थोडी गर्दी, डॉ. पैंच्या नावाची कुजबुज आणि कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्सची आरडाओरड ऐकू आली. तिला वाटलं सोनलमुळेच हे सुरू आहे. शुभदाच्या डेस्कवर दोन तीन मोठे बुके ठेवले होते. त्याच्या केबिनच्या दारासमोर गर्दीमागून पूर्वा टाचा उंचावून बघत होती. सायरा तिच्याशेजारी जाऊन उभी राहिली. "ओह माय गॉड! ही गॉट इट!!" पूर्वा तिचे खांदे घट्ट धरून ओरडली.

"व्हॉट?" तिने अजाणतेपणी विचारलं.

"गेट्स फाउंडेशनची फुल ग्रँट!"

ओह माय गॉड! तिने तोंडावर हात ठेवला. तिचा विश्वासच बसत नव्हता. ह्या रिझल्टच्याच तो तणावात असणार. ही मस्ट बी फ्रीकिंग आउट! केवढे लोक जमलेत सेलिब्रेट करायला. वॉव!

"दॅट्स अमेझिंग!!" तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं.

"आय नोss रूरल मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी फुल फंडिंग आणि गव्हर्नमेन्ट सबसिडी! चिखलदरा की कायतरी जागा आहे ना, तिथे होणार आहे हे हॉस्पिटल. अरर, मी तुला कश्याला सांगतेय, तुला माहितीच असेल!" पूर्वा उत्साहात बोलत होती.

एक मिनिट, काय?!

रूरल हॉस्पिटल?

चिखलदरा?

तिने डोळे मिटून सगळ्याची संगती लावायचा प्रयत्न केला. चिखलदरा? म्हणजे ते विदर्भातलं गाव? मुंबईपासून पाचशे सहाशे किमी, की वेगळं काही?

"ओह, हे तुझ्यापासून पण सिक्रेट ठेवलं होतं का? लंचपर्यंत कुणालाच काही कळलं नव्हतं. बहुतेक डॉ. पैनाही माहीत नव्हतं. लंचनंतर इमेल आली आणि सगळ्यांना कळलं. डॉ. पै कसले सुपर नर्व्हस असतील.. त्यांनी ग्रँट मिळाल्याचं सांगितलं का तुला?" पूर्वाने मान वाकडी करून विचारले.

"हम्म, नाही. म्हणजे लंचपासून आम्ही भेटलोच नाही." ती जरा पडलेल्या चेहऱ्याने म्हणाली.

त्याने तिला जिंकल्याचं सांगितलं नव्हतं. त्याचा प्रोजेक्ट म्हणजे एक अख्खं हॉस्पिटल असेल आणि ते चिखलदऱ्याला असेल वगैरे तिला काहीच सांगितलं नव्हतं. तो ग्रँट मिळण्याची वाट बघतोय एवढंच तिला माहिती होतं पण ग्रँट म्हणजे काहीतरी पैशांची मदत किंवा सध्याच्या हॉस्पिटलच्या ट्रस्टला मदत एवढंच वाटत होतं. आता कळल्यावर तिच्या पायाखालची जमीन निसटून चालली होती.

हे स्वप्न आहे की सत्य? मी लंच टाईममध्ये एवढी चॉकलेट्स उगाच खाल्ली, हे नक्की शुगर इंड्यूस्ड नाइटमेर आहे. तिने पोटावर हात ठेवून सुस्कारा सोडला. पूर्वाने काळजीने तिच्याकडे पाहिलं. "सायरा, आरन्ट यू टू टूगेदर? म्हणजे दिवाळी पार्टीनंतर आम्हाला असंच वाटत होतं."

तिने हो नाहीच्या उंबरठ्यावर अर्धवट मान हलवली. हम्म, मलाही असंच वाटत होतं. पार्टीत, येऊरच्या घरी, सकाळी त्याच्या केबिनमध्ये.. तिने नकळत गळ्यापाशी त्याच्या लव्ह बाईटला स्पर्श केला. आत्तापर्यंत मला वाटत होतं आमचं एक छान भविष्य आहे. पण हे वेगळंच काहीतरी सुरू झालंय. हे समोर एवढे लोक का आहेत, मला प्रयत्न करूनही त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही.

"हेय सॉरी, तुला अपसेट करायचं नव्हतं." पूर्वा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

ती किंचित हसली. तुझी काही चूक नाही ग पूर्वा.

चूक असलीच तर अनिशची आहे.

आणि त्याच्या मोठ्या स्वप्नांची.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४०

"सगळं ठीक आहे ग. मला अर्ध्या तासात सर्जरी आहे म्हणून थोडी टेन्स झालेय. बाय, मी पळते." म्हणून ती निघाली. लिफ्टबाहेर पाऊल ठेवताच सर्जिकल फ्लोर रिकामा दिसला. बरोबर, सगळे अनिशच्या केबिनबाहेर आहेत. तिने सर्जरी बोर्डवर त्यांना असाईन केलेली रूम बघितली आणि स्क्रब झाल्यावर आत जाऊन कामाला सुरुवात केली. मान खाली करून तिने कामावर लक्ष एकवटले. एकामागोमाग एक मेथॉडीकली तिचे हात एका लयीत चालू लागले. तिला हेच जमत होतं आणि हे करण्यावरच तिचं प्रेम होतं.

अनिशने तिच्या हृदयाच्या अपेक्षा दहापट वाढवण्यापूर्वी तिच्यासाठी एवढंच पुरेसं होतं. तिची तयारी संपताना बाकी लोक हळूहळू आत येऊ लागले. प्रत्येकाकडून अनिशच्या प्रोजेक्टबद्दल आणि लहान मुलांना त्याचा किती उपयोग होईल ते ऐकताना ती फक्त मान हलवून हसत होती. आज ओटीच्या हवेत एक उत्साह पसरला होता. प्रत्येकाला आज अनिशबरोबर काम करण्याची उत्सुकता होती. ती सोडून.

सगळ्यांना तिच्यापेक्षा जास्त माहिती आहे या गोष्टीचा तिला राग येत होता. आणि तिला राग येतोय ह्या गोष्टीचा अजून राग येत होता. कारण हे हॉस्पिटल खूप मुलांना जीवदान देणार होतं, चांगलं आयुष्य जगण्याची एक संधी देणार होतं. अनिश त्यांच्यासाठी खराखुरा सुपरहिरो ठरणार होता. त्यासाठी त्याच्यावर रागावणं योग्य नाही हे कळत होतं पण तरीही खूप आतून ती चिडली होती.

तो आत आला तेव्हा ती इन्स्ट्रुमेंट ट्रे तयार ठेऊन टेबलाशेजारी उभी होती. त्याचं लक्ष फक्त तिच्यावर होतं. तो सरळ तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. पलीकडून काँग्रॅटस म्हणणाऱ्या ऍनेस्थिओलॉजिस्टकडे त्याने फक्त एक नजर टाकून मान हलवली. "सायरा, मी तुला दुपारपासून कॉल करायला बघत होतो."

"नाही."

"काय?"

"माझ्या फोनवर एकही मिस्ड कॉल नाहीये." आता ओटीमधले बाकी लोक तिच्याकडे पाहू लागले.

"सगळं रेडी आहे, लेट मी टाय युअर एप्रन!" म्हणत ती पुढे झाली. ती तिच्या पद्धतीने सांगू पहात होती की स्टॉप. आत्ता नको. सगळ्यांसमोर नको. तो चिखलदऱ्याला कायमचा जाणार हे ऐकून मुसमुसत तिला सगळ्यांसमोर हसं करून घ्यायचं नव्हतं. माझी थोडी तरी डिग्निटी राहू दे. TYSM.

सर्जिकल गॉगलमधून त्याचे डोळे अजूनही तिला सोडत नव्हते. तो तिला काहीतरी सांगू पहात होता.
काय? मी काय करू अनिश?

तिने वळून त्याचा एप्रन उचलला आणि बांधायला सुरुवात केली. दोघांनीही पुढे एक शब्द बोलला नाही. ती स्क्रब होऊन टेबलापलीकडे जाऊन आपल्या जागेवर उभी राहिली आणि रोल कॉल सुरू झाला.

"सायरा, यू आर अप." त्याचा थंड आवाज आला. सर्जनचा आवाज. तिने स्वतःला शांत करत सांगितलं. "सायरा देशमुख, सर्जिकल असिस्टंट." सवयीने शब्द बाहेर पडले. तिची त्याच्याशी नजरानजर झाली तेव्हा त्याच्या नजरेत कुठलेच भाव नव्हते.

मी सकाळचीच सायरा आहे, अनिश.

तू बदलला आहेस.

आजची साधी स्टेंट बसवण्याची प्रोसिजर लवकर संपली. ती स्क्रब आउट होऊन बाहेर आली तेव्हा तो पोस्ट ऑप रूममधून बाहेर तिच्या दिशेने येत होता. त्याचा प्रेझेंस त्या पॅसेजमध्ये सगळीकडे जाणवत होता. तो लोकांपेक्षा अर्धा फूट उंच होता आणि त्याच्या डोक्यावरचे चमकणारे दाट केस दहा शेड जास्त गडद होते. त्याने काहीही प्रयत्न न करता लोक वळून त्याच्याकडे बघत होते.

तिला त्याच्या शेजारून जायचं नव्हतं, बरीच कामं बाकी आहेत. पण तो तिचा रस्ता अडवून पुढ्यात उभा राहिला आणि खाली तिच्या डोळ्यात पाहिलं.

"तुझ्याशी एक मिनिट बोलू शकतो का?"

त्याला नक्की मी त्याच्याशी भांडेन असं वाटतंय पण मी इतकी बालिश नाहीये. ओठ दाबत हसून तिने मान हलवली.

"ऑफ कोर्स. कुठे जाऊन बोलायचंय?"

त्याने तिचं कोपर घट्ट धरलं आणि शेजारच्या ऑन कॉल रूममध्ये घेऊन गेला. भिंतीलगत स्टीलचे सिंगल बेड्स एकावर एक रचून ठेवले होते. उरलेली जागा एका लाकडी डेस्कने व्यापली होती. आतले दिवे बंद असल्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. "काँग्रॅट्स ऑन द ग्रँट, अनिश! आय एम रिअली हॅपी फॉर यू." तीच आधी बोलली. कारण ते खरंच होतं. ती हर्ट झाली असली तरी त्याच्यासाठी खरंच खुश होती. त्याच्याइतका डिझर्विंग अजून कोणी डॉक्टर तिला माहीत नव्हता.

"मी तुला ग्रँटबद्दल सगळं सांगणार होतो." तो तिच्याजवळ येत म्हणाला. त्याने तिचे दोन्ही दंड धरून ठेवले आणि घडाघडा बोलत सुटला. "फक्त हा डिसीजन कळेपर्यंत मला उगीच राळ उडवायची नव्हती. तो दुसरा डॉक्टर जिंकण्याची पूर्ण शक्यता होती."

तिने मान हलवली. हम्म, बेनिफिट ऑफ डाउट.

"आणि ते कसं सांगायचं तेही कळत नव्हतं, की ओह बाय द वे, मी चिखलदऱ्याला शिफ्ट होणार आहे!"

"हम्म, म्हणून त्याऐवजी मला अंधारात ठेवणं उत्तम!" ती तिरकस हसली.

तिच्या शब्दांचा डंख लागल्यासारखा तो मागे झाला. "नो सायरा. नो. मला आपल्यात जे काही सुरू होतं ते टिकवायचं होतं, कशात काही नसताना हे सांगून गोष्टी कॉम्प्लिकेट करायच्या नव्हत्या."

तिने मान हलवून सुस्कारा सोडला. तिला दोघांसाठी वाईट वाटत होतं. "सॉरी, माझा तो अर्थ नव्हता. मला एवढंच म्हणायचंय की मला हे सगळं आधीच माहीत असतं तर बरं झालं असतं."

"आय एम सॉरी. आय रिअली ऍम. मी स्वार्थीपणा केला..."

तो एकूण एक बरोबर गोष्टी बोलतोय पण माझे म्हणणेही बरोबर आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत पण तो इथून निघून जाणार हेही तेवढंच खरं आहे.

"तुला कधी जायचंय?" तिने आवाजात कुठल्याही भावना न येऊ देता विचारले.

"अजून साधारण सहा महिने." त्याचा आवाज गंभीर होता.

हम्म. हीच आमची टाइमलाईन आहे. साधारण सहा महिने. मेबी वी कॅन मेक देम काऊंट. कदाचित तो जाण्यापूर्वी मी त्याच्याबरोबर आयुष्यभराच्या आठवणी गोळा करून ठेवीन.

"सायरा, चिडू नकोस. एवढं दुःखी व्हायचीही गरज नाहीये. इन फॅक्ट, मी विचार करत होतो, तू माझ्याबरोबर येशील का?" त्याने वाकून तिच्या चेहऱ्यासमोर येत विचारले.

"तुझ्याबरोबर?" ती गोंधळून गेली.

"सिरियसली. मी गेले कित्येक दिवस हा विचार करतोय. मला सर्जरीमध्ये, हॉस्पिटल चालवण्यात, टीम तयार करण्यात तुझी मदत लागेल. मला तू माझ्या शेजारी हवी आहेस."

ती त्याचं म्हणणं समजून घ्यायचा खूप प्रयत्न करत होती. पण अजूनही सगळं तिच्या पचनी पडत नव्हतं. "माझं सगळं आयुष्य इथे आहे. मुंबई सोडून मी कधीही कुठे गेले नाहीये. आणि नेहा आहे. असं अचानक सामान बांधून मी कुठे निघून नाही जाऊ शकत."

"नेहासाठी आपण करू काहीतरी.."

"प्लीज स्टॉप. जस्ट स्टॉप. एवढे सगळे प्लॅन्स करताना मला त्यात इंक्लूड करावंसं का वाटलं नाही? मी तिला एकटं सोडून इतक्या लांब राहू शकणार नाही. ना ती आपल्याबरोबर येऊ शकणार." ती मोठ्याने म्हणाली. "आपण फक्त गेले काही आठवडेच एकत्र आहोत अनिश! स्वतःला माझ्या शूजमध्ये ठेवून बघ. विचार करून पहा!"

तेवढ्यात एक रेसिडन्ट दार उघडून डोळे चोळत आत आली. काळोखात त्यांच्याकडे लक्ष जाताच ती स्तब्ध झाली आणि ओह क्रॅप! सॉरी सॉरी...  म्हणत बाहेर पळाली. सायराला तिच्या मागोमाग बाहेर पडावंसं वाटलं पण तिने खोल श्वास घेतला आणि शब्दांची जुळवाजुळव केली. "तुला ग्रँट मिळाली म्हणून मला खूप, खरंच खूप आनंद झालाय. तुझ्याहून जास्त हे कोणीच डिझर्व करत नाही. आय विश, तू हे सगळं मला आधी सांगायला हवं होतं, पण का नाही सांगितलं तेही पटतंय. आपलं नातं अजून नवंनवं आहे तोच गढूळ करायला नको असं वाटणं साहजिक आहे. आय गेट दॅट. माझ्या मनात आता राग नाहीये. मला फक्त... हे सगळं पचवायला, विचार करायला थोडा वेळ हवाय. बस!"

त्याने मान हलवली आणि तिला अलगद मिठीत घेतली. त्याची मिठी पहिल्यांदाच तिला नको वाटत होती. याआधी इतकं ऑकवर्ड आणि टेन्स कधी वाटलं नव्हतं. अव्यक्त विरोध म्हणून तिने हात खालीच ठेवले आणि त्याच्यामागच्या पांढऱ्या भिंतीकडे बघत राहिली. तिचं एक मन त्याच्यापासून लांब व्हायला सांगत होतं तेवढ्यात त्याने मिठी थोडी घट्ट केली आणि तिने मेंदूचं न ऐकता कपाळ त्याच्या छातीवर टेकलं. श्वास मंदावला आणि राग हळूहळू वितळला. हा लहानसा कम्फर्ट हवाहवासा वाटत होता.

त्याने वाकून हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. एकमेकांच्या इतक्या जवळ असण्याचा खूप थोडा वेळ आता शिल्लक असल्याची जाणीव झाली आणि तिच्या हृदयाचे पुन्हा थोडे तुकडे झाले.

"इट डझन्ट हॅव टू एन्ड." तो तिच्या कानाजवळ पुटपुटला. "ही ग्रँट आपल्या दोघांच्या गोष्टीची चांगली सुरुवात ठरू शकते. प्लीज थिंक अबाउट इट."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४१

"फोन कंटीन्यूअसली बज रहा है!" शुभदाच्या डेस्कसमोरून जाताना त्याला थांबवून शुभदा म्हणाली. तिच्या हातातल्या नोटपॅडवर पन्नासेक मेसेज होते. "दुनियाभरके लोग कॉल कर रहे है. लेकीन मैने कह दिया, आप बिझी है. फिर भी डॉ. आनंद लाईनपर है.."

त्याने केसांतून हात फिरवला. "हम्म, करो ट्रान्सफर." तो दार उघडून केबिनमध्ये शिरला. सायरासाठी वडीलधारी व्यक्ती फक्त डॉ. आनंद आहेत, म्हणूनच आत्ता त्यांच्याशी बोलायला तो उत्सुक नव्हता पण त्यांच्याकडे दुर्लक्षही करू शकत नव्हता. ते इतके नम्र आहेत की दुपारभरसुद्धा कॉल होल्ड करतील. त्याने फोन उचलून हॅलो म्हटलं. "डॉ. पै! द मॅन ऑफ द अवर!!" त्यांच्या आवाजातून उत्साह निथळत होता.

"गुड टू हिअर फ्रॉम यू डॉ. आनंद. हाऊ'ज रिटायरमेंट ट्रीटींग यू?"

"ओह, इट्स फाईन. थोडा बोर हो रहा हूं, मिसेस कहती है, अभी स्लो लाईफ की आदत नहीं हुई. सच कहू तो मैने दस हॉबीज ट्राय किये, गार्डनिंग, कुकिंग, ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग लेकिन लाईफ मे मजा नहीं है."

ऐकून तो थोडा हसला.

"सुनो अनिश.. " ते पुढे बोलत होते. "मैने ग्रँट के बारे मे सुना. व्हॉट ऍन अकम्प्लिशमेन्ट! यू मस्ट बी ऑन द मून!"

ऑन द मून? से डिप्रेस्ड लाईक हेल!
"हम्म, इट्स ग्रेट." मी थोडा जास्त उत्साह दाखवला पाहिजे.

"सुबह से मुझे बहोत लोगोंके कॉल्स आए, आय एम रिअली प्राउड ऑफ यू."

"थँक यू फॉर कॉलिंग, इट मीन्स अ लॉट!"

"अब कॉल किया है तो पूछ लेता हूं, सायरा का काम कैसे चल रहा है?

आला, भीती होती तोच प्रश्न आला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याचं उत्तर येत नाही बघून डॉ. आनंद हसले. "डोन्ट टेल मी की तुमने उसे भगा दिया. अभी सिर्फ कुछ महिनेही हुए है."

"नो." तो पटकन म्हणाला."शी इज स्टिल वर्किंग विथ मी."

पलीकडे त्यांचा आवाज हसरा झाला. "गुड! सुनकर अच्छा लगा. आय होप जानेसे पहले तुम उसके लिए कोई पोझिशन ढुंढ लोगे. तुम्हारी जगह कोई नया सर्जन आने की बात हो रही है, अगर उसके टीम मे प्लेस नहीं होगी तो सायरासे कहो, मुझे कॉल करें. मैं कहीं रेफर करता हूं. मुझे उसकी चिंता लगी रहती है." त्यांनी सुस्कारा सोडला. "तुम उसको ज्यादा परेशान तो नहीं कर रहे?"

परेशान? मी तिला मुंबईबाहेर लांब एका गावाला शिफ्ट व्हायला सांगतोय. हाऊ'ज दॅट फॉर परेशान!

"नो. आय एम गोइंग इझी ऑन हर." तो खोटं बोलला.

"समहाऊ, आय डाऊट दॅट!" ते जोरात हसत म्हणाले. "ओके, तुम्हारा और टाइम नहीं लूनगा. सायराको मेरा मेसेज दे देना. मिसेस और मैं दोनो उसे याद करते है. अँड काँग्रॅटस अगेन! द वर्क यू आर गोइंग टू डू विल इम्पॅक्ट अ लॉट ऑफ लाईव्हस. यू शुड बी प्राउड!"

त्यांच्या शब्दांनी त्याचं गिल्ट अजून वाढलं.

फोन ठेवल्यावर खुर्चीत बसून त्याने खिडकीबाहेर पाहिले. हाऊ डिड आय स्क्रूड अप एव्हरीथींग सो बॅडली.. सकाळीच या खिडकीपाशी तो तिला घट्ट मिठीत घेऊन उभा होता आणि आता ती त्याच्या कॉलचं उत्तर तरी देईल का, शंका आहे.

तेवढ्यात इंटरकॉमवर त्याला कंसल्टेशन ला उशीर होतोय म्हणून शुभदाचा कॉल आला. तो सुस्कारा सोडून खुर्ची ढकलत उभा राहिला. कदाचित, डॉ. आनंदना ही सगळी परिस्थिती सांगून सल्ला विचारायला हवा होता. ते सायराला व्यवस्थित ओळखतात. विचारानेच त्याला हसू आलं, हो म्हणजे त्यांनी आधी धरून त्याचे कान पिळले असते.

तो कन्सल्टिंग रूमकडे चालतानाही विचार करत होता. आय नो, आय सक ऍट रिलेशनशीप्स. माझ्यासाठी पुस्तकातल्या सगळ्या कार्डिअ‍ॅक प्रोसिजर्स हातचा मळ आहेत पण हृदयाच्या आत घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती झीरो. आय एम अ कम्प्लिट इडियट!

त्याने कशीबशी ती शिफ्ट संपवली. घरी जाऊन काय करावं हा प्रश्नच होता. तो पोचला तेव्हा त्याचा कुक स्वयंपाक करून निघून गेला होता. त्याने भाजी गरम करायला गॅसवर ठेवली. घरात पसरलेला थंड सन्नाटा त्याच्या मनाला मॅच करत होता. बॅकग्राउंडला काहीतरी आवाज हवा म्हणून त्याने टीव्ही लावला. डिस्कव्हरीवर जंगलाचे आवाज सुरू झाले.

मांडीवर प्लेट ठेवून जेवता जेवता त्याने फोन हातात घेतला. अपेक्षेप्रमाणे तिचा मिस्ड कॉल नव्हताच. त्यानेही कॉल केला नाही. तिला विचार करायला वेळ हवा होता, ते त्याला अगदी मान्य होतं. ईमेल उघडताच खंडीभर शुभेच्छांचे मेल्स त्याने स्क्रोल केले. तन्वीचा एक मेल होता, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. तिला जे काही सांगायचंय ते नंतर बघेन आत्ता वेळ नाही. त्याने जेवण संपवून भांडी डिशवॉशरला लावली आणि स्टडीत गेला.

प्रचंड काम होतं. हॉस्पिटलच्या ब्लू प्रिंट्स बघून बांधकामाची कामं असाईन करायची होती. आर्किटेक्ट, काँट्रॅक्टर्स अश्या बऱ्याच लोकांना कॉल, मेल्स पेंडिंग होत्या. त्याने प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये खर्चाची जी प्रोजेक्शन्स दिली होती त्यात थोडेफार बदल हवे होते. सीएला कंसल्ट करायचं होतं. त्याने लॅपटॉप उघडला आणि कामाला लागला. उद्या दिवसभर ह्या जागेवरून तो हलणार नव्हता.

---

सायराने घरातली कामं संपवून उरलेला रविवार फक्त लोळत संपवला. तिला बेडमधून बाहेर यावसं वाटत नव्हतं. विचार करून करून डोकं दुखत होतं. अनिशला फोन करून बोलवावंसं वाटत होतं पण तो जवळ असला की विचार अजूनच बिघडतील. तिने फोन खाली ठेवला.

काहीही निवडलं तरी बदल हा होणारच होता. काही महिन्यात तो चिखलदऱ्याला जाणार. तिच्याकडे दोनच ऑप्शन होते, त्याच्याबरोबर जायचं किंवा इथे थांबायचं. त्याच्याबरोबर कसं जाणार, नेहाला सांगणार की मी तुला टाकून मुंबई सोडून जातेय.. निदान नेहाच्या ग्रॅज्युएशनपर्यंत लग्न करायचं नाही असं कुणी ठरवलं होतं!

पण दुसरा ऑप्शन त्याला सोडून इथेच राहण्याचा, त्याची कल्पनाही करवत नाहीये. तिला काहीच ठरवता येत नव्हतं, ती मधेच अडकली होती. काहीही खावंस वाटत नव्हतं. नेहाचा फोन आल्यावर ती खोट्या उत्साहात थोडंसं बोलली तेवढंच. रात्रभर तिने चिखलदऱ्याबद्दल सर्च करून माहिती गोळा केली. त्याने पाठवलेली प्रोजेक्ट रिपोर्टची फाईल वाचली. ह्या हॉस्पिटलमुळे मेळघाटातल्या आणि छत्तीसगड ते तेलंगणापर्यंत पसरलेल्या आदिवासी आणि सीमेवरच्या नक्षली भागातील गरीब लोकांना उपचार मिळणार होते. जे पुण्यामुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत कधी पोचू शकत नव्हते. तिथले कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण वाचून, फोटो बघून तिच्या डोळ्यातून पाणीच आले.

हॉस्पिटलच्या ट्रस्टकडून केलेले अनिशचे मेळघाटातले काही कॅम्प उघडून तिने डीटेल्स वाचले. फोटोज पाहिले. स्पेशली एका फोटोने तिचा घसा दाटून आला. शरीराला भरपूर मशिन्स जोडलेल्या एका पाचेक वर्षाच्या बारीक मुलीला अनिश टेडी बेअर देत होता. ती इतक्या मशिन्सना जोडलेली होती पण तिच्या चेहऱ्यावरचं हजार मेगावॅटचं हसू फिकं झालं नव्हतं. तिने खालची कॅप्शन वाचली, Kiran has undergone a life-changing procedure thanks to Dr. Anish Pai and his team. She’ll now get to live a fuller, pain-free life.

त्या फोटोने तिला आधीच माहिती असलेली गोष्ट सिद्ध झाली. त्याला तिथे जायलाच हवं.

दोन दिवसांनी नेहा परत आल्यावर रात्री जेवताना तिच्या ट्रेकचं यथास्थित वर्णन ऐकून, तिथे काढलेले खंडीभर फोटो बघून झाल्यावर तिने हळूच विषय काढला. नेहा गेल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी (अर्थात काही भाग वगळून) सांगून झाल्यावर तिने नेहाकडे पाहिले. "हम्म, हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. लेट मी थिंक, मैं हूं ना!" म्हणत नेहाने तिच्याजवळ जाऊन खांद्यावर हात टाकला. तिने नेहाच्या खांद्यावर डोकं टेकलं. "नेहू, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. डोन्ट वरी." नेहाने तिच्या डोक्यावर थोपटलं.

पुढचे दोन तीन दिवस ते एकमेकांना फक्त ओटी मध्ये दिसत होते. ती पॅसेजमध्ये तो भेटण्याची शक्यता टाळत होती. एकमेकांशी संबंध फक्त स्क्रब होऊन, डझनभर लोकांमध्ये, ऑपरेट करतानाच येत होता. ती स्क्रब्ज आणि एप्रनच्या लेयरखाली लपत होती. सर्जिकल कॅप, मास्क आणि गॉगलसाठी थॅंक्यूच! काही बोलावं लागलंच तर ते समोरच्या केसबद्दल असायचं. तरीही त्याच्या वागण्यात तिला सटल हिंट्स दिसत होत्या की दोघांमधलं हे अंतर तिच्याइतकंच त्यालाही त्रास देतंय. प्रत्येकवेळी नजरानजर झाली की त्याच्या डोळ्यात सगळं दिसत होतं. वादळ, हुरहूर आणि सगळ्या उत्कट इच्छा. त्याच्या ओठांवर येऊन तिथेच विरून जाणारे शब्द.

तो सर्जरीनंतर तिथे थांबत नव्हता. पॅसेजमध्ये तिला थांबवायचा प्रयत्न करत नव्हता. तिने विचार केला का हेही विचारत नव्हता. पण आता त्याने विचारावं असं तिला वाटू लागलं होतं. त्याने थोडं पुश करायला हवं होतं. रविवारी तिला स्पेस हवी होती. सोमवार, मंगळवारपासून आतापर्यंत तिचं डोकं शांत झालं होतं आणि आता ती त्याला प्रचंड मिस करत होती. त्याच्या केबिनमधल्या खिडकीपाशी मारलेली मिठी आणि शेवटचा त्याच्या हातांचा स्पर्श होऊनही आता आठवडा होत आला होता. झोपता, उठता, बसता सगळीकडे त्याची आठवण येत होती. तिला ह्या सगळ्या डिसीजन मेकिंगच्या फुग्याला टाचणी टोचून काही क्षण तरी पुन्हा पहिल्यासारखे त्याच्या मिठीत घालवायचे होते.

रात्री नेहाने तिला सोफ्यावर बसवून हातात गरम कॉफी आणून दिली आणि तिने आश्चर्याने पाहताच डोळा मारला. "सो दीद, मला वाटतं एकच सल्युशन आहे, तू मॅकड्रीमीशिवाय राहू शकत नाहीस."

"नेहा, काहीही!" तिने नेहाकडे एक कुशन फेकलं.

"सिरीयसली! बघ दी, तुला माझी खूप काळजी वाटते मान्य. पण मी आता मोठी झालेय, आता चार महिन्यात माझं फर्स्ट यर संपेल मग मी उरलेली दोन वर्ष कॉलेजच्या हॉस्टेलवर राहू शकते. हॉस्टेलमध्ये माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, मी ऑफिसमध्ये चौकशी करून ब्रोशर पण आणलाय. फीजचा प्रॉब्लेम असेल तर आपण आपलं घर रेंट आउट करू. मी नो ब्रोकरवर चेक केलं आपल्या आजूबाजूला साधारण तीस हजार रेंट आहे. तेवढ्यात सगळे खर्च सहज मॅनेज होतील. तसंही दोन वर्षांनी एमबीएसाठी जिथे नंबर लागेल तिथे मला जावंच लागेल."

सायराने तिच्याकडे बघून डोळे मोठे केले. "नेहा, मी तुझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. ह्या सगळ्याचा  विचार मी केला नसेल का? पण मला गिल्टी वाटतं यार तुला असं एकटं सोडून जायला. ह्या जगात आपण दोघीच आहोत एकमेकींना आणि तू अजूनही माझी क्यूट बेबी सिस आहेस."

"ऑss दीss" नेहाने येऊन तिला मिठी मारली. "पण खरंच हे वर्कआऊट होईल ग. माझ्यासाठी तू तुझ्या फीलिंग्जचा बळी देऊ नको. ही इज द परफेक्ट गाय फॉर यू. डोन्ट लीव्ह हिम, सिरियसली! जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!"

"उगाच अमरीश पुरी बनायला जाऊ नकोस!" तिने नेहाला टपली मारली.

---

ओटीचं दार उघडून तो आत आला आणि तिचा श्वास अडकला. अंगातून एक लहर सळसळत गेली. आपल्या भावना काबूत ठेऊन त्याच्या इतक्या जवळ रोज काम करणं.. इट्स पेनफुल. सगळ्यांना हॅलो म्हणून त्याने पेशंट चेक केला. ती टेबलाशेजारी उभी राहून त्याच्याकडे बघत होती. त्याला तिच्याजवळ येऊन तिने धरलेल्या एप्रनमध्ये हात घालायला पाच सहा वर्षे लागली! फायनली त्याने तिच्याकडे बघितल्यावर पोटात पडायचा तो खड्डा पडलाच.

"मॉर्निंग सायरा." तो तिच्याकडे बघत म्हणाला. "ऑल सेट?"

"आता विचार करणं बास, मला वाटतं तू चिखलदऱ्याला गेलंच पाहिजे, मी इथेच थांबेन. नेहाला माझी गरज आहे आणि आत्ताच तर आपण एकत्र आलोय आणि त्या नेव्ही स्कल कॅपमुळे तुझे डोळे खूप इंटेन्स दिसतात आणि मी तुझ्या अजून अजून खोल प्रेमात पडत चाललेय, आपण खूप दिवस बोललो नाही तरीही. तू मला बरोबर येण्याबद्दल सिरियसली विचारलं होतंस का? कारण मी वेडेपणा करून आता हो म्हणण्याच्या तयारीत आहे."

हे सगळे शब्द तिने घसा खाकरून पुसून टाकले आणि खाली तिने तयार ठेवलेल्या ट्रे कडे बघितले.

"येस. रेडी टू गो."

"ओके देन, लेट्स गेट स्टार्टेड."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४२

"एक्स्क्यूज मी, डॉ. पैंना OR मध्ये आता तूच असिस्ट करत होतीस का?"

सायराने हातातलं सँडविच खाली डब्यात ठेवलं. अरे यार! आता इथेही एकटं जेवू देऊ नका मला. चंदा आणि पूर्वाचे प्रश्न टाळायला ती आज स्टाफ लाऊंजऐवजी लॉबीच्या एका टोकाला रिकाम्या खुर्च्यांपैकी एक घेऊन बसली होती. तिला वाटलं होतं ती इथे कुणाच्या नजरेस पडणार नाही. पण नाहीच.

तिने तोंडावर टिश्यू धरून समोर एक बोट दाखवलं. एक मिनिट, माझं खाऊन होऊ दे.

समोरची बाई थोडी हसली. "नो वरीज, मीच लंच ब्रेकमध्ये आलेय."

तिने घास गिळला आणि हसली. "इट्स ओके. हो, मीच डॉ. पैना असिस्ट करत होते."

उत्तराने समोरच्या बाईला आनंद झालेला दिसला, खुर्ची ओढून ती समोर बसली.

ऑल राईट, हेल्प युअरसेल्फ. आता काय? तिने उरलेल्या सँडवीचकडे बघून पुन्हा त्या बाईकडे पाहिले.

ती नेहमीच्या हॉस्पिटल क्राऊडमधली वाटत नव्हती. तिने लांब फ्लोरल मॅक्सी ड्रेस घातला होता. केस लेयर्समध्ये मोकळे सोडले होते. सरळ, लांब नाक, तिची हलकी ऑरेंज लिपस्टिक गोऱ्या रंगावर छान दिसत होती आणि चेहऱ्यावरचा ग्लो ऑब्वीअस होता कारण त्या घेरदार मॅक्सीमधूनसुद्धा तिचं ड्यू डेट जवळ आलेलं भलंमोठं पोट लपत नव्हतं.

"बरं झालं तू दिसलीस. मी डॉ. पैना कित्येक आठवडे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतेय पण मला ते सापडत नव्हते." तिने पर्स उघडून एक मोठी कॅडबरी सिल्क बाहेर काढली. "डू यू माईंड?" सायराने मान हलवताच तिने चॉकलेटचा तुकडा तोडून तोंडात टाकला. "सॉरी, ह्या बेबीला चॉकलेटशिवाय रहावत नाही. मला खरंतर चॉकलेट आवडत नाही पण हल्ली मी तेवढंच खातेय." ती पोटावर हात फिरवत म्हणाली.

"अम्म.." सायराने लॉबीत इकडेतिकडे बघितलं. लोकांना ही बाई दिसतेय का मला भास होतोय. कोण आहे ही?

सायराच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव लक्षात येऊन ती हसली. "ऑफ कोर्स, माझे मॅनर्स कुठे गेले!" स्वतःच्या कपाळाला हात लावून ती म्हणाली. "मी तन्वी. डॉ. पैंची एक्स वाईफ."

सायराचं तोंड उघडंच राहिलं. "नो वे!" तिच्या तोंडून निघून गेलं.

"गिल्टी ऍज चार्ज्ड!" तन्वी खांदे उडवत म्हणाली आणि मग तिने जीभ चावली. "प्लीज, मी असं म्हणाले हे त्याला सांगू नको. मी जोक करत होते पण असं ऐकल्यावर ते वाईट वाटतंय. ही'ज नॉट अ बॅड गाय. जस्ट नॉट सो गुड ऍट रिटर्निंग कॉल्स अँड मेल्स. अदरवाईज तो चांगला आहे." ती पुन्हा हसली. "मी हे तुला का सांगतेय, तुला माहितीच असेल. तू त्याच्याबरोबर काम करतेस म्हणजे तुला माझ्यापेक्षा रिसेन्ट आणि जास्त माहिती असेल."

हो, मागचे काही दिवस आठवता मला बाकीपण बरंच नॉलेज आहे! तिने आवंढा गिळला आणि हम्म केलं.

असं कसं असू शकतं? माझ्या कल्पनेतली तन्वी कडवट, स्वार्थी, जराशी इगोइस्ट अशी होती. पण समोर बसलेली फक्त एक हसरी, ग्लोइंग, प्रेग्नन्ट, चॉकलेट खाणारी बाई आहे.

"आमचं लग्न खूप वर्षांपूर्वी झालं होतं. ऑब्वीअसली!" तन्वी पोटाकडे बोट दाखवत म्हणाली.

"काँग्रॅट्स!" मी अजून काय बोलू शकते? "आय मीन ऑन युअर प्रेग्नन्सी. नॉट अबाउट लॉंग टाइम अगो."

"थँक्स. हवंय?" तन्वीने चॉकलेटचा एक तुकडा पुढे केला.

तिचा सकाळपासून मूड वाईट होता त्यामुळे चॉकलेटला ती नाही म्हणूच शकत नव्हती. तिने तुकडा घेऊन तोंडात टाकला.

तन्वी पुढे बोलत होती, "अनिश अं.. डॉ. पै, माझ्या कॉल आणि ईमेल्स ना उत्तर देत नाहीये आणि मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. मी लवकरच नवऱ्याबरोबर फ्रान्सला शिफ्ट होतेय. अनिश आणि मी लग्न झाल्यावर इन्व्हेस्टमेंट म्हणून जॉईंट नावावर एक जागा घेतली होती, जायच्या आधी ती मी विकतेय आणि त्याच्या सह्या.." अचानक त्यांची नजरानजर झाली आणि आपण जास्तच बोलतोय हे तन्वीला जाणवलं. "सॉरी, मला जरा जास्तच शेअर करायची सवय आहे. कधी फ्लाईटमध्ये माझ्या शेजारी बसू नको, कानात बोळे घालावे लागतील." ती हसत म्हणाली.

सायराने मान हलवली.

"तुझा लंच अर्धवट राहिला. मला फक्त विचारायचं होतं की त्याला शोधायला मला मदत करशील का? सर्जरी तर कधीच संपलीय, मी काचेतून बघत होते. तरीही ती रिसेप्शनिस्ट तो बिझी आहे सांगून उडवून लावतेय."

सायराला हसायला आलं. नक्की अनिश आत काम करत बसला असेल आणि शुभदा सगळ्यांना बाहेरूनच घाबरवून पिटाळून लावत असेल.
"हम्म, शुभदा जरा जास्तच लॉयल आहे. डॉ. पै इथे जॉईन झाल्यापासून ती त्यांच्यासाठी काम करतेय."

"आणि तू? तुम्ही एकत्र बरीच वर्ष काम करताय?"

नको तिकडेच हे बोलणं सरकलं. ती फक्त हो म्हणू शकते किंवा जे खरं आहे ते सांगून टाकू शकते. पण खोटं तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं.

तिने खोल श्वास घेतला. "वी आर नॉट जस्ट कलीग्ज, वी आर टुगेदर."

तन्वीचे डोळे विस्फारले. भुवया उंचावल्या आणि तिने पापण्यांची फडफड केली. "मला माहिती नव्हतं की अनिशची कोणी गर्लफ्रेंड आहे."

"इट्स न्यू." ती किंचित लाजली.

तन्वीने घाईघाईत समोर हात हलवला. "सॉरी, मी काहीही बोलतेय. मला म्हणायचं होतं की तो कुणाच्यात इंटरेस्टेड असेल असंही वाटलं नव्हतं. तुझं नाव काय आहे?" तन्वीने सहज विचारलं. तिच्या डोळ्यात उत्सुकता सोडून कुठलेही भाव नव्हते.

"सायरा."

"ऑनेस्टली, तुला एक गोष्ट सांगू?" तन्वी हसून म्हणाली.

काहीतरी वाईट हृदयभंग करणारं गॉसिप ऐकायची तिने तयारी केली.

"यू सीम टू बी टू स्वीट फॉर हिम!"

फनी! बहुतेकसे दिवस ह्याच्या उलट असतात. हॉस्पिटलमध्ये कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, पण तो माझ्याबरोबर असताना खूप गोड, खूप मऊ असतो. इथे सगळे त्याला बीस्ट समजतात पण माणूस म्हणून तो कसाय ते फक्त मला माहित आहे.

"अनिशने मला तुमच्या नात्याबद्दल थोडं सांगितलंय." तिला तन्वीची प्रतिक्रिया बघायची होती.

"ओह गॉड, आय वॉज द रिअल बिच इन द एन्ड! आय होप अनिशने तुला माझ्याबद्दल खूप वाईट सांगितलं नसेल."

ती हसली. "अजिबात नाही. उलट तो सगळा दोष त्याचा होता म्हणतो."

"हम्म, डझन्ट सरप्राईज मी. आम्ही दोघेही खूप लहान होतो आणि आमच्या आयुष्याकडून अपेक्षा वेगवेगळ्या होत्या." तन्वी खुर्चीत रेलून बसत म्हणाली. तिने श्वास सोडून सायराकडे बघितलं."अनिश कधीही बदलणार नाही. काम हाच त्याचा नेहमी फर्स्ट प्रेफरन्स राहील. तुला कायम स्वतःला बिझी ठेवावं लागेल. आमचं लग्न नवं होतं तेव्हा मी स्वतःला बिझी ठेवायचा खूप प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी त्यांच्या फॅब्रिक बिझनेसमध्ये मला माझ्या मालकीचा एक ब्रँड दिला होता, म्हणजे अजूनही आहे. 'ग्लोब ट्रॉटर्स', कदाचित तुला माहीत असेल."

ओह, तो वेस्टर्न कट्स असलेल्या कॉटन कपड्यांचा महागडा ब्रँड! तिने मान हलवली.

"अनिश जेवायला घरी आला नाही किंवा रात्री हॉस्पिटलमध्ये थांबला तर मी कधी कटकट केली नाही. मी खूप टफ बनायचा प्रयत्न केला पण त्याला डॉक्टर असण्यात आणि सारखं ऑपरेट करण्यात काय मजा येते, मला कधी कळलं नाही. माझ्यापेक्षा त्याला हॉस्पिटल महत्त्वाचं वाटतं हे मला पटतच नव्हतं." तिने खांदे उडवले. "पण त्याने तेव्हा स्वतःला कामात अगदी गाडून घेतलं होतं. कदाचित आता बदलला असेल." तन्वी लांब कुठेतरी बघत म्हणाली.

सायराला त्याच्या केबिनमधलं ब्लॅंकेट, उशी आणि एक्स्ट्रा कपडे आठवले आणि ती हसली. "नाही, काहीच बदललं नाहीये."

तन्वीने च्यक केलं. "मी तुला वॉर्न करत नाहीये, फक्त सांगतेय की आम्ही बरोबर असताना मला तो कायम आउट ऑफ रीच वाटायचा. म्हणजे त्याचं माझ्यावर असलेल्यापेक्षा मीच जास्त प्रेम करते असं काहीतरी. तो खूप अलूफ असायचा, मला वेड लागायची वेळ आली होती. सो, तू कशात पडते आहेस तो विचार करून पाऊल टाक."

तिने खाली मान घालून आपल्या हातांकडे पाहिलं. तन्वी तिला माहीत नसलेलं काहीच सांगत नव्हती.
तो त्याच्या कामात किती डिवोटेड आहे ही वॉर्निंग नाहीये, हीच गोष्ट तर पहिल्यांदा तिला त्याच्याकडे खेचून घेऊन गेली होती.

"हेय, मला अजून हे जाणवलं नव्हतं पण तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात. इट मेक्स परफेक्ट सेन्स फॉर हिम टू फॉल फॉर समवन लाईक यू." तन्वी अचानक तिच्याकडे निरखून बघत म्हणाली.

सायराने मान वर करून तिच्याकडे पाहिले.

"तू सुंदर आहेस, ऑब्वीअसली, पण अजून काही गोष्टी आहेत. तू मघाशी OR मध्ये खूप कंपीटंट होतीस. तुम्ही दोघे मिळून काम करताना मी बाहेरून बघत होते. ऑलमोस्ट ऍज इफ यू वर वन पर्सन इनस्टीड ऑफ टू." ती काहीतरी विचार करून हसली. "आणि तुला त्याच्यापासून लांब रहावं लागणार नाही कारण तुम्ही एकत्रच काम करता. ती सर्जरी कितीss वेळ सुरू होती, मी तर बघूनच दमले."

ती हसली आणि तेवढ्यात लॉबीच्या दुसऱ्या टोकाकडून बोलण्याचा आवाज आला. अं ओ, लिफ्टच्या पलीकडून अनिश त्यांच्या दिशेने येत होता. तिचे डोळे विस्फारले आणि छातीत धडधडायला लागलं. काय करू? खुर्चीमागे लपू की पळून जाऊ?

तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याचे डोळे गढूळले, आता तो अजूनच पटापट चालायला लागला. आठवडाभर तिच्या पोटात फिरणारा टेन्शनचा गोळा अजून मोठा झाला. तो तिच्या खुर्चीमागे येऊन खुर्चीच्या पाठीवर हात ठेवून उभा राहिला. तिने हळूच वर पाहिलं, ह्या अँगलने त्याची जॉ लाईन अजूनच कातीव दिसत होती.

तन्वी हसत मिश्कीलपणे आधी बोलली. "मी तुझ्या असिस्टंटशी गप्पा मारत होते."

त्याने खाली तिच्याकडे हृदयात खोलवर कळ आणणारा कटाक्ष टाकला. जवळ आलेल्या भुवया, दुःखी डोळे.

"आय ऑल्सो टोल्ड हर, दॅट वी आर टूगेदर."

त्याचे डोळे एकदम निवळून हसले. मग त्याने तन्वीकडे बघितलं. ती हसत होती.

"मॅचिंग स्क्रब्जमध्ये तुम्ही एकदम स्ट्रायकींग पेअर दिसताय!" तन्वी हात वरखाली हलवत म्हणाली. "बट ऑनेस्टली, सायरा इज टू गुड फॉर यू!"

त्याने किंचित हसून मान हलवली. "आय होप सायरा तुझं ऐकणार नाही. आय हिअर प्रेग्नन्सी ब्रेन इज अ रिअल थिंग!"

तन्वी डोकं मागे टाकून हसली. सायरा स्तब्ध बसली होती. मेबी त्यांना थोडी प्रायव्हसी दिली पाहिजे. ती पटकन उठली. अनिशने तिचे खांदे धरून ठेवले, जरा जास्तच घट्ट. त्याला तिने थांबायला हवं होतं. पण तिला त्याच्याशी बोलण्यापूर्वी थोडं स्वतःला तयार करायचं होतं. ती मान हलवून त्याच्यापासून लांब झाली.

"तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. तुमचं बोलणं होऊ दे, मी केबिनमध्ये वाट बघते." तिच्या शेवटच्या वाक्याने त्याच्या भुवया उंचावल्या. तिने हसून तन्वीकडे बघितलं. "इट वॉज नाईस मीटिंग यू."

तन्वीने हसून उरलेली अर्धी कॅडबरी तिच्यासमोर धरली. "फॉर द रोड?"

ऑफ कोर्स. ती चॉकलेट खात त्याच्या केबिनपाशी पोचली तेव्हा तिने हळूच शुभदाकडे आता ही हाकलते की काय अश्या नजरेने पाहिलं. पण ती मॅगझिनची पानं उलटत होती. मग ती सरळ केबिनकडे गेली.

"मैं सोच रही थी, तुम वापस इदर दिकोगी की नहीं!" तिने दार लावता लावता मागून आवाज आला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४३

तिने दारात उभी राहून सोफा ते डेस्क ते त्याची खुर्ची आणि मोठया खिडकीपर्यंत पूर्ण केबीनभर नजर फिरवली. इथल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या आठवणी होत्या. तिला तन्वीचे शब्द आठवले.

तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात.

इट मेक्स परफेक्ट सेन्स फॉर हिम टू फॉल फॉर समवन लाईक यू.

ऑलमोस्ट ऍज इफ यू वर वन पर्सन इनस्टीड ऑफ टू.

अनिश कधीही बदलणार नाही. काम हाच नेहमी त्याचा फर्स्ट प्रेफरन्स राहील.

हो, त्याचं करियर ही त्याची पॅशन आहे आणि त्यात शंभर गोष्टी त्याला एकदम कराव्या लागतात. तो माझ्या प्रत्येक कॉलला उत्तर देणार नाही किंवा रोज रात्री घरी जेवायला येऊ शकणार नाही. मला कधीच त्याचं अनडिव्हायडेड अटेन्शन मिळणार नाही. काहींना हे वाईट वाटू शकतं पण माझं त्याच्यावरचं प्रेम याच गोष्टींनी अजून घट्ट होतं.

मी त्याला लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारे समजून घेते. मी त्याला कधीच त्याच्या करियरपेक्षा मला महत्त्व द्यायला सांगणार नाही, ते त्याच्या हृदयाचे दोन तुकडे करण्यासारखं होईल. मेडिसिन हा त्याचा श्वास आहे आणि मला ते बदलायचं नाहीये. इन फॅक्ट मला फक्त त्याच्या आयुष्याचा एक भाग होऊन रहायला आवडेल. त्याला लोकांची आयुष्य वाचवताना बघणं, तो आजूबाजूच्या जगात बदल घडवताना त्याच्याबरोबर त्याची साथ देणं हेच मला हवंय. मला त्याचं थोडं ओझं शेअर करायचं आहे. आम्ही हे हॉस्पिटल एकत्र उभं करू शकतो. ओटीमधल्यासारखीच मी खऱ्या आयुष्यातही त्याची राईट हँड बनू शकते.

आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत हे कळणारी मी बहुतेक शेवटची व्यक्ती असेन.

कदाचित हीच वेळ आहे, त्याला हे सगळं सांगण्याची.

काही वेळाने तो जोरात दार ढकलून आत आला, तिला शोधणारी त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. त्याला बघून ती सोफ्यावरून उठून उभी राहिली. तिने वाट बघण्याचं प्रॉमिस पाळल्यामुळे त्याने श्वास सोडला. त्याने दार बंद केलं आणि त्या जड लाकडाबरोबर तिच्या मेंदूतला सगळा सेन्स, सगळा कंट्रोल खोलीबाहेर निघून गेला. शिल्लक होतं ते फक्त जोरजोरात धडधडणारं हृदय. ती पटापट पावलं उचलत त्याच्याजवळ पोचली आणि त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिले.

तिने चेहरा त्याच्या छातीवर स्क्रब्जमध्ये लपवला होता. तिच्या केसांमधून त्याची बोटं फिरत असताना ती त्याच्या कलोनचा हलका मस्की सुगंध नाकात भरून घेत होती. त्याचे हात तिच्या कंबरेभोवती होते आणि ते फक्त एकमेकांबरोबर श्वास घेत होते. त्याने तिला जमिनीपासून काही इंच वर उचलले. तो बहुतेक घाईत जिना चढून आला असावा कारण तो जोरजोरात श्वास घेत होता आणि तिच्या हाताखाली त्याचं हृदय धडधडत होतं. ती हवेत होती आणि तो पुनःपुन्हा प्रोजेक्ट सिक्रेट ठेवल्याबद्दल सॉरी म्हणत होता.

तिने डोळे मिटून हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला घट्ट धरून उभी राहिली जोपर्यंत डोक्यात निर्णय पक्का होत नाही. केबिनबाहेर नेहमीसारखी येजा सुरू होती पण आत त्यांच्या घट्ट मिठीत काळ थांबून राहिला होता. दोघांनाही धड श्वास घ्यायला अडचण झाली तेव्हा त्याने अलगद तिला खाली ठेवले आणि तिचा चेहरा तळहातांवर धरला. त्याने तिचा चेहरा वर करताच तिने आपोआप खालच्या ओठावरून जीभ फिरवली.

"सायरा.." त्याचा आवाज किंचित घोगरा झाला होता आणि दोन्ही भुवयांमध्ये एक खोल आठी होती.

ती मुठीत त्याचा शर्ट पकडून चवड्यांवर उभी राहिली आणि त्याचे ओठ येऊन तिला भिडताना तिच्या पापण्या बंद झाल्या. आधी तो गोष्टी हळुवार आणि नाजूक ठेवायचा प्रयत्न करत होता पण तिने टेम्पो वाढवला. "आय नीड धिस.." ती त्याच्या ओठांत कुजबुजल्यावर तो थांबला नाही. बऱ्याच वेळानंतर आपण कुठे आहोत ते लक्षात येऊन तो थांबला आणि तिला उचलून सोफ्याकडे घेऊन गेला. शेजारी बसून तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. "मला तुझ्याबरोबर यायचं आहे."

त्याला धक्काच बसला, बसणारच होता. म्हणून त्याने पुन्हा विचारले.

तिने हसून पुन्हा सांगितले. "मी चिखलदऱ्याला येणार आहे. मी हे सांगतेय हे मला अजूनही पटत नाहीये, पण मी येतेय. नेहा हॉस्टेलला रहायला तयार आहे, पण माझाच तिला सोडून पाय निघत नाही. सो कदाचित मी एखादं वर्ष इथे थांबूही शकते."

"तू थांबलीस, तर मीही थांबेन. ग्रँट नंतरही घेता येईल." तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"अनिश!" ती त्याला दटावत ओरडली.

"सायरा!" त्याने तिची नक्कल केली.

"यू हॅव टू गो!" ती गंभीर होत म्हणाली. "हे सगळं अजून खूप नवीन आहे. कदाचित आपण काही वेळाने एकमेकांना कंटाळून जाऊ." त्याचं बोट तिच्या गालावरून फिरताना ती म्हणाली.

त्याच्या ओठाचा एक कोपरा वर उचलला गेला. "मेबी. मी ऐकलंय की मला टॉलरेट करणं खूप कठीण आहे. तूच माझ्यामुळे बोर होण्याचे चान्सेस जास्त आहेत."

"अ.. अनिश!" तिने त्याला ओरडायला उघडलेलं तोंड तिच्या गळ्यापाशी आलेल्या त्याच्या ओठांमुळे बंद झालं.

"काय?" तो भुवई उचलून तिला बोलत रहायचं आव्हान देत होता. व्यवस्थित नाम, सर्वनाम, क्रियापद वापरून वाक्य तयार करायचं आव्हान. पण ती फक्त डोळे मिटून त्याच्या पिळदार खांद्यात बोटं रुतवायचं कामच करू शकली. शेवटी त्याने तिच्या खांद्यावर डोकं टेकलं, त्याच्या पापण्या मिटलेल्या होत्या.

त्याला जगात परत यायचं नव्हतं. तिने त्याच्या छातीत बोट खुपसलं. "मला श्वास घेता येत नाहीये."
तो किंचित बाजूला झाल्यावर ती हसली. आम्ही दोघेही वेडे झालोय. कोणी काही आठवड्यात प्रेमात पडू शकतं का? की काही दिवस? काही मिनिटं? तिला हे कोडं सुटत नव्हतं म्हणून तिने सरळ त्यालाच विचारलं.

"मला प्लीज तुझ्या सगळ्या खऱ्या खऱ्या फिलिंग्ज पटापट सांगून टाक."

"आत्ता?" त्याने तिच्या खांद्यावरून चेहरा उचलत विचारले.

"हम्म.. आयडियल टायमिंग नाहीये पण मी निदान विषय तरी काढलाय." ती मागे होऊन त्याचे हात हातात घेत म्हणाली.

त्याने तिच्या स्क्रब्जमुळे निळसर दिसणाऱ्या डोळ्यात खोलवर पाहिले. "आय सी अ फ्यूचर विथ यू. म्हणजे अगदी चल उद्याच लग्न करू टाईप नाही पण एक व्यक्ती म्हणून तू मला खूप आवडतेस आणि मी तुझ्या प्रेमात पडलोय. यू आर ब्यूटीफुल, इनसाईड अँड आऊट. तू म्हणजे माझं ह्या सगळ्या धावपळीतून विसाव्याचं ठिकाण आहेस. यू मेक मी स्माईल!"

तिने हसून त्याच्या गालावर ओठ टेकले. पुन्हा त्याचे हात हातात घेऊन ती बोलू लागली. "मला खूप दिवस प्रेमात पडायची भीती वाटत होती, भविष्य कसं असेल याची भीती वाटत होती. तुझ्याबरोबर असतानाही मी खूपदा पळ काढायला बघत होते कारण माझी फॅमिली हिस्ट्रीच तशी आहे, प्रेमात वाहून जाण्याची. आता सांगायला हरकत नाही."

त्याने उत्सुकतेने भुवया वर केल्या.

"माझे पपा कस्टम्समध्ये ऑफिसर होते. नोकरीच्या सुरुवातीला त्यांची बदली काही काळ रत्नागिरीला झाली होती. तेव्हा माझी मम्मी कॉलेजला होती आणि तिच्या जाण्या येण्याच्या रस्त्यातच पपांचे ऑफिस होते. त्यांची कुठेतरी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या हेड ओव्हर हील्स प्रेमात पडले. माझ्या मम्मीचं नाव आयशा सुर्वे, रत्नागिरीची कोंकणी मुस्लिम."

ओह! तो आश्चर्याने उद्गारला.

"हम्म, आमची नावं मम्मीने तिच्या आवडीची ठेवली आहेत. सायरा आणि नेहा!" ती जराशी हसली. "इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण नंतर मम्मीच्या घरी हे प्रकरण कळलं, तिचं कॉलेजला जाणं बंद झालं. मग एक दिवस पपा तिला पळवून मुंबईला घेऊन आले आणि लग्न झालं. त्यांच्या घरीही पूर्ण विरोध होता. लग्नाला कोणीच आलं नाही. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना तुम्ही आम्हाला मेलात म्हणून सांगितलं होतं. पण तरीही अधूनमधून दोन्हीकडचे लोक येऊन धमक्या देऊन जात होते. पण पपा ठाम होते, त्यांनी मम्मीची खूप काळजी घेतली.

घर तर सुटलंच होतं, ते चाळीत भाड्याने जागा घेऊन रहात होते. पपांचा म्हातारा पारशी बॉस होता ज्याच्याशी त्यांची एकदम जानी दोस्ती होती. पपांनी त्याच्या आजारपणात वगैरे त्याची बरीच काळजी घेतली होती. तो रिटायर झाल्यावर एक दिवस चमत्कार झाल्यासारखं त्याने त्याचं घर पपांना गिफ्ट डीड करून दिलं आणि स्वतः नवसारीला एका आश्रमात रहायला गेला. तोपर्यंत नेहाचा जन्म झाला होता. काही वर्ष छान गेली पण एकदा पपाना स्मगलिंगची टीप मिळून त्यांनी मोठा छापा मारला. त्यानंतर धमक्यांचे फोन येऊ लागले आणि एकदा ऑफिसला जाताना रस्त्यात त्यांना ट्रकने धडक दिली. ते बराच वेळ रस्त्यात पडून होते, नंतर लोकांनी एका हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे मदत मिळेपर्यंत ते गेलेच. तो खूनच होता पण वरून ते प्रकरण अपघात म्हणून दडपलं गेलं. नेहा तेव्हा फक्त दहा वर्षांची होती आणि मी एकोणीस." त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतली.

"ते गेल्यापासून मम्मी खचून गेली. तिच्या दोन्ही किडन्या हळूहळू फेल होत गेल्या. तीन वर्षे ती डायलिसिसवर होती. तेव्हा पपांची थोडी पेन्शन, पीएफ, इन्शुरन्सचे पैसे होते पण तिचं आजारपण आणि आमच्या शाळा कॉलेजच्या खर्चात ते कुठेच संपून गेले. त्यात पपांनी आम्हाला हौसेने कॉन्व्हेंटला घातलं होतं, त्यामुळे जास्तच खर्च. पपा गेले तेव्हाच मी मेडिकलला जायचं ठरवलं होतं पण मम्मी आजारी पडली आणि ते शक्य झालं नाही.  नंतर खूप वाईट दिवस बघितले, कॉलेज संपताच जॉब करायला लागले. नेहाला नीट मोठं करायचं होतं. पण मी कसंतरी नेलं निभावून. ह्या सगळ्या पडत्या काळात धर्माचा डांगोरा पिटणारे दोन्ही बाजूचे नातेवाईक आमच्या कधीच उपयोगी पडले नाहीत, मदत झाली ती फक्त माणूसकी समजणाऱ्या मित्रमंडळींची. त्यामुळे आम्ही दोघीही कुठलाच धर्म फॉलो करत नाही."

"मला नमाज पढता येतो आणि रामरक्षा, अथर्वशीर्षसुद्धा पाठ आहे कारण लहानपणी आम्हाला दोन्ही शिकवलं होतं, तरीही आय बिलीव्ह इन सायन्स! पण सगळे सण मात्र आम्ही खाऊन पिऊन सेलिब्रेट करतो, ईदला बिर्यानी आणि गणपतीला उकडीचे मोदक! पपा वॉज अ बिग फूडी! बहूतेक मम्मीच्या हातची बिर्यानी खाऊनच ते तिच्या प्रेमात पडले असतील. मी त्यांच्यावरच गेलेय!" ती थोडी हसली. "आईवडिलांच्या प्रेमामुळे पुढे जे सगळं झालं त्यामुळेच कुठलाही विचार न करता फक्त मनाचं ऐकून प्रेमात पडायला मी घाबरत होते. हे सगळं ऐकून, म्हणजे मी हाफ मुस्लिम आहे म्हणून तुला काही प्रॉब्लेम आहे का? "

"प्लीज.. मी असा विचार करेन असं वाटू कसं शकतं तुला? आय डोन्ट केअर!!" त्याने तिला स्वतःकडे ओढून तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि हसत खाली तिच्या चमकत्या डोळ्यांत पाहिले, "आय बिलीव्ह इन सायन्स टू!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४४ - समाप्त

सात महिन्यांनंतर.

"अगंss एवढी वरपर्यंत नको!" मेहंदीवालीने गुढघ्याखाली रेष ओढताच सायरा ओरडली. "फक्त पोटरीपर्यंत बास झाली." चंदा तिच्या ओळखीच्या पार्लरवालीला भलंमोठं ब्रायडल पॅकेज सिलेक्ट करून दिवसभर घेऊन आली होती. आतापर्यंत वॅक्सिंग, फेशियल, मसाज सगळं उरकलं होतं.

"क्या यार! वैसे कही सीक्रेट जगह मेहंदी टॅटू भी कर सकते हैं! डॉ. पै के लिए सरप्राईज!!" शेजारी स्वतःच्या हातावर मेहंदी काढणारी चंदा डोळा मारत म्हणाली.

सायराने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं.

ऑर्डर केलेल्या तवा पुलाव आणि सोलकढीचं पार्सल सोना किचनमध्ये उघडत होती. लॅपटॉपला जोडलेल्या स्पीकर्सवर संध्याकाळपासून फाल्गुनी पाठकची प्लेलिस्ट सुरू होती. पूर्वा आणि नेहा डोक्यावर ओढण्या घेऊन 'याद पिया की आने लगी'वर खिदळत नाचत होत्या. मेहंदीसाठी हातपाय सरळ एकाच पोझमध्ये ठेवून ती कंटाळून गेली होती. तेवढ्यात फोन वाजला. चंदाने फोन हातात घेऊन दाखवला. अनिशचा व्हिडीओ कॉल.

"रिसीव्ह कर ना पागल.." ती अधीर होत म्हणाली.

"मुझे एक कॅडबरी चाहीए!"

"डन! अब रिसीव्ह कर."

चंदाने कॉल रिसीव्ह करून फोन तिच्यासमोर धरला. "हे शुगर! काय चाललंय?" ती ओठ दाबून हसली आणि कोपरापर्यंत मेहंदीचे हात उचलून दाखवले. त्याने मान हलवली. त्याच्यामागे लो लाईट्स आणि बीट्सचा आवाज येत होता. "तू कुठे आहेस?"

"बाऊन्स! शर्विल आणि दोन तीन मित्र आहेत. मला हॉस्पिटलमधून लिटरली उचलून घेऊन आलेत. बॅचलर पार्टी, इट सीम्स! फ्री ड्रिंक्स हवीत त्यांना, बाकी काही नाही" तो हसून मान हलवत म्हणाला आणि फोन फिरवून डान्स फ्लोरवर एक दोन माणसांबरोबर ग्रुपमध्ये 'हू लेट द डॉग्ज आऊट'वर नाचणारा शर्विल दाखवला.

ती खळखळून हसली. "आय एम मिसिंग यू.." ती स्क्रीनजवळ जात म्हणाली.

"मी येऊ का तिकडे?" त्याने डोळा मारत विचारले.

"उहू उहू. मैं हूँ इधर!" चंदा खोटं खोकली.

सायराने श्वास सोडला. "नको. इथे सगळे वेडे लोक गोळा झालेत." तिने चंदाला फोन फिरवून दाखवायला लावलं. "आय कान्ट वेट टू सी यू." तो चेहरा स्क्रीनजवळ आणत कुजबुजला. "मी टू." ती किंचित लाजली. तेवढ्यात शर्विल त्याच्याजवळ आला, तो बोलतोय बघून त्याने मधेच डोकं घातलं. "हे सायरा, उद्यापासून तुम्हालाच बोलायचंय. आज त्याला एन्जॉय करू दे."

"हेयss मी कधी अडवलं त्याला? त्यानेच कॉल केलाय." ती रागावून म्हणाली.

"भाऊss ये मैं क्या सून रहा हूं भाऊ?!" डोक्याला हात लावून शर्विलचा ड्रामा सुरू झाला.

अनिशने हसत त्याच्याकडून फोन ओढून घेतला. "बाय, मी जरा ह्या सगळ्यांकडे बघतो!" तो हात हलवत म्हणाला.

"बायss सी यू ऍट फोर!" तिने हात हलवला.

तिला गेल्या महिन्यातली सकाळ आठवली.

---

ती दारावर नॉक करून आत शिरली तेव्हा अनिश रोजच्याप्रमाणे लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलच्या मशिनरीची ऑर्डर फायनल करायचं काम सुरू होतं. गेले पाच महिने ती केबिन म्हणजे त्यांची सँक्चुअरी बनली होती, जेव्हाही दोघांच्या बिझी शेड्यूलमधून जरासा वेळ चोरता येईल तेव्हा. तिने कॉफीचा मग त्याच्यासमोर ठेऊन आपल्या मगमधून एक घोट घेतला. त्याने डोकं वर करून मॉर्निंग! म्हणत तिच्याकडे बघितलं आणि कॉफी मग उचलला. "हे तुझ्यासाठी ठेवलं होतं." म्हणत त्याने फरेरो रोशेचा बॉक्स तिच्याकडे सरकवला. तिने डोळे बारीक करून बॉक्सकडे बघितलं.

अनिश आणि चॉकलेट? वीअर्ड!! तिने बॉक्समधून पटकन एक चॉकलेट काढून तोंडात कोंबलं. त्याने स्क्रीनकडे पहात गालात हसत मान हलवली. तिने शंका येऊन पुन्हा बॉक्स उघडून पाहिला तर एका चॉकलेटचा सोनेरी रॅपर जास्त चुरगळलेला वाटला. तिने पटकन ते उचलून रॅपर उघडला. आत एक हिरा चमकला आणि त्याखाली रिंग! ओ माय गॉड! किंचाळून ती त्याच्याकडे वळेपर्यंत तो उठून जवळ आला होता. तिने त्याच्या गळ्यात हात टाकत चॉकलेट लागलेल्या ओठांनी त्याला खोलवर किस केलं.

"माय हार्ट डझन्ट वर्क राईट विदाऊट यू! प्लीज, लेट मी लव्ह यू फॉरेव्हर..." ती थांबल्यावर तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला.

तिने डोळ्यात जमलेलं पाणी ओघळू देत मान हलवली आणि मिठी अजून घट्ट केली.

"अनिश, दॅट वॉज चीजी ओके?" थोड्या वेळाने सोफ्यावर त्याच्या मांडीवर बसून बोटातली रिंग न्याहाळत ती म्हणाली.

त्याने ओठ बाहेर काढला. "आय थॉट गर्ल्स लाईक चीज. व्हॉट? नो?"

तिने जीभ दाखवली.

"आपल्याला वेळच मिळत नाहीये. दिवसभर आपण इथेच असून दूर असतो. मला रोज झोपताना आणि झोपून उठताना तरी तू माझ्याशेजारी हवी आहेस.. तशीही पुढच्या महिन्यात नेहा हॉस्टेलला जातेय."

हुंह! जबरदस्तीने रोज मला मस्का मारून मारून जातेय, आगाऊ. तिच्या मनात विचार आला.

"तू रोजच्या रोज किती कष्ट करतेस ते बघूनच मी दमलोय. लेट मी पॅम्पर यू, सायरा. लेट्स गेट मॅरीड." तो तिचा चेहरा वळवून नाकावर ओठ टेकत म्हणाला.

ती मान हलवून त्याच्या मिठीत विरघळून गेली.

---

कोर्टाची तारीख मिळाल्यानंतर आठवड्याभरात चिखलदऱ्याला निघायचं होतं. सायराने जपून ठेवलेली मम्मीची टॉनी ब्राऊन कांजीवरम मॅचिंग स्लीवलेस ब्लाउजबरोबर नेसली होती. कानात आणि गळ्यात अनिशने दिलेला त्याच्या अम्माचा सोन्याचे झुमके आणि चोकरचा सेट होता. तिने झुमक्यांमध्ये अडकवून नाजूक मोत्यांचे वेल केसात सोडले होते. केसांचा मेसी बन पार्लरवालीनेच घालून दिला होता. कोपरापर्यंत रंगलेली मेहंदी होती आणि चेहरा मेकअपपेक्षा आनंदानेच जास्त चमकत होता. नेहापण आकाशी अनारकली घालून सज्ज होती, आज पहिल्यांदाच ती लग्नाची साक्षीदार म्हणून सही करणार होती. अनिशची लाल जॅझ येऊन दारासमोर थांबली आणि शर्विल खिडकीतून डोकं काढून ओरडला "आज ड्रायव्हर, शोफर सगळं मीच आहे!" सायरा त्याच्याकडे बघून हसली.

शेजारच्या दारातून अनिश खाली उतरला. चक्क सूट सोडून तो क्रीम कुर्ता पायजमा आणि बारीक तपकिरी मोटीफ्स असलेल्या थोड्या गडद सिल्की क्रिम जॅकेटमध्ये होता आणि पायात चक्क कोल्हापुरी चपला. उन्हाची तिरीप त्याच्या डोळ्यांवर येऊन ते जास्तच मधाळ दिसत होते आणि स्टाईल केलेले केस. उफ! सायरा स्वतःला कंट्रोल करत ओठ चावून हसली. तो तिला डोळ्यात साठवून घेताना ती काय विचार करतेय ते समजून हसला आणि तिला हात धरून कारपाशी घेऊन आला. चार वाजता रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये एकमेकांना हार घालून, त्यांच्या सह्या झाल्या आणि सगळे लगबगीने घरी आले कारण संध्याकाळी त्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमध्ये लहानसं रिसेप्शन कम डिनर ठेवला होता.

सगळे परत जरा टचअप होऊन व्हेन्यूवर आले तेव्हा लिली, कार्नेशन आणि जरबेरा वगैरे फुलांनी सजवलेलं क्लब हाऊस तयार होतं. अनिशची पूर्ण टीम सगळ्यात आधी येऊन हसतखेळत चिडवाचिडवी सुरू होती. मग हळूहळू त्याचे जवळचे नातेवाईक, दोघांची मित्रमंडळी आणि हॉस्पिटलमधले डॉक्टर्स एकेक करून येऊ लागले. डॉ. आनंद आणि त्यांच्या मिसेस येताच त्यांनी भलामोठा लाल गुलाबांचा बुके पुढे केला. इन्व्हाईटमध्ये गिफ्ट्स, बुके वगैरे नको लिहिलं असलं तरीही. "मुझे ये अब पता चल रहा है!" त्यांनी वरवर रागावून सायराकडे पाहिलं. "अनिश तो छूपा रुस्तम है, पता है. लेकीन तुम तो बता सकती थी."

"सॉरी डॉक्टर!" तिने जीभ चावून कान पकडले. "अरे तुम ध्यान मत दो! काँग्रॅच्यूलेशन्स!!" मिसेस आनंद तिच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या. हसत कॉंग्रॅट्स म्हणत डॉ. आनंदनी दोघांशी हँडशेक केले. "जानेसे पहले एक दिन हमारे यहां डिनर के लिए आना पडेगा. कुछ भी करके टाइम निकालो" ते अनिशकडे बघत म्हणाले. "मेबी तुम्हे मेरे हाथ का कुछ खाने को मिले! आजकल मैं कूकिंग ट्राय कर रहा हू."

"फिर तो हमे दो बार सोचना पडेगा, शायद कॅन्सल भी हो सकता है!" सायराने गालात हसून म्हटल्यावर सगळेच खळखळून हसले.

"कुछ नही, हमारे यहां महाराज हैं, बेफिकर होके खा सकते हो." डॉ. आनंद हळूच म्हणाले.

थोड्या वेळाने ते बुफेकडे सरकल्यावर शुभदा पुढे आली. आज चापूनचोपून सिल्कची साडी आणि जाड सॉल्ट पेपर वेणीवर मोगऱ्याच्या मजबूत गजरा माळला होता. जाड फ्रेमचा चष्मा नेहमीप्रमाणेच होता. जरा लाजत 'कंग्रॅच्युलेशन्स' म्हणत ती हसली. "थँक्स! शुभदा, ये मैं क्या देख रहा हूँ? यू आर स्मायलिंग टुडे!" अनिश मिश्किल हसत म्हणाला. ती काही न बोलता हसत राहिली पण तिचा चेहरा जरासा पडला. "आय विल मिस वर्किंग फॉर यू अँड आय विल मिस सायरा टू. मेरा इदर घर, फॅमिली नही होता तो मैं पक्का शिफ्ट करती."

"इट्स ओके शुभदा, आय विल कॉल यू." सायरा तिचा हात हातात घेऊन म्हणाली. "अरे हां, भूल गयी.." म्हणत शुभदाने तिच्या पर्समध्ये हात घालून दोन सरी मोगऱ्याचा गजरा काढला आणि पिन लावून सायराच्या अंबाड्यावर माळला. "नौ यू आर अ परफेक्ट ब्राईड!" अंगठा आणि तर्जनी जुळवून छानची खूण दाखवत ती म्हणाली.

सगळ्यांच्या भेटीगाठी, जेवणं वगैरे होऊन ते वर त्याच्या फ्लॅटमध्ये आले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. थोडा वेळ गप्पा मारत बसू म्हणून पाच्छीचा आग्रह होता. तेवढ्यात त्याच्या वडिलांचा व्हिडीओ कॉल आला. त्याने तोंडदेखलं इन्व्हाईट पाठवलं होतं आणि ते येणार नाहीत याची खात्री होती. पण तरीही चक्क कॉल करून त्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आणि वेळ काढून एकदा नवं हॉस्पिटल बघायला येणार असल्याचंही सांगितलं. अनिशचा चेहरा खुलला. थोडा वेळ गप्पा झाल्यावर सायरा कॉफी करायला आत गेली. शर्विल सोफ्यावर बसून नेहा, पाच्छी आणि बप्पाना रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ दाखवत होता.

अनिश आत गेला तेव्हा ती ओट्याजवळ उभी राहून पातेल्यात वाकून बघत होती. त्याने मागून जाऊन तिच्या कंबरेला मिठी मारली. "व्हॉटस अप, वाईफ?" त्याने तिच्या खांद्यावर हनुवटी टेकत विचारले. "उम्म.. तिने त्याच्या गालावर गाल घासला. "जुन्या काळातली कॉफी! जायफळ घातलेली."

"नोप, मला नको."

"का??" तिने जरा रागावून विचारले.

"जायफळाने झोप येते आणि मी आज अजिबात झोपणार नाहीये. आय नीड ब्लॅक कॉफी." त्याने ओट्याला टेकून तिला डोळा मारला.

"अनिश!" तिने लगेच ओठ चावत त्याच्या दंडाला चिमटा काढला.

"झाली का कॉफी?" बाहेरून पाच्छीचा मिश्किल आवाज आला.

डन! म्हणत तो ट्रे उचलून बाहेर घेऊन गेला. कॉफी पिता पिता सोफ्याच्या एका बाजूला पाच्छी दोघांना काहीतरी संसारोपयोगी सल्ले देत होती. "शर्विलदादा, माझ्या ट्रेकच्या आयडियाने काम झालं बहुतेक, है ना?!" नेहाने शेजारच्या बीन बॅगवर बसलेल्या शर्विलकडे बघून विचारलं.

"नक्कीच, बेस्ट आयडिया होती" तो हसत समोरच्या जोडीकडे बघत म्हणाला. त्याने उहू उहू खोकत सगळ्यांचं स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं. "किती बोर करताय यार, काहीतरी म्युझिक पाहिजे." त्याने उठून कोपऱ्यातली गिटार घेतली. "च्यक! किती धूळ अनिश! आय नो तू हल्ली वाजवतच नाहीस पण धूळ तरी पूस यार. सायरा तूच बघ, उद्या मेड आली की तू सगळं साफ करून घे."

बाप्पानी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. "घरी तू किती साफ असतोस मला माहिती आहे."

"ओके, फर्गेट इट. तर हे गाणं सुरुवातीपासून दीवाना झालेल्या आमच्या माणसाकडून सायरासाठी मी डेडीकेट करतोय. मीच त्याची चोरी पकडली होती, है ना?!"

"आणि तू पुन्हापुन्हा दीवाना होणं कधी बंद करणार आहेस?" पाच्छी म्हणाली.

अनिश पाच्छीकडे बघून मोठ्याने हसला. "देव तुजे बरें करों!"

शर्विलने मान झटकली आणि गिटारची तार छेडली.

"दीवाना हुआ बादल,
सावन की घटा छाई.."

सायराला एकदम पावसात भिजून तिला घरी सोडणारा पहिल्या वेळचा अनिश आठवला आणि ती हसून त्याच्याकडे बघत राहिली.

बरसों से खिज़ां का मौसम था
वीराssन बड़ी दुनिया थी मेरी... म्हणताना त्याने अनिशकडे वाकून मान हलवली. अनिशने खोटा राग दाखवत हात झटकला आणि नंतर हसला.

शर्विलचं गाणं संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

"दीद, तूपण ट्राय कर ना.." नेहा तिच्या खुर्चीतून म्हणाली.

"काय? गिटार?" अनिश आणि शर्विल एकदम उद्गारले.

सायराने ओठ दाबून हसत खांदे उडवले आणि शर्विलकडून गिटार घेतली. अनिशच्या हसऱ्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. मांडीवर गिटार व्यवस्थित धरून तिने पिक वापरून पहिल्या कॉर्ड्स छेडल्या आणि तृप्त मनाने गायला सुरुवात केली.

"आय सी ट्रीज ऑफ ग्रीन
रेड रोझेस टू
आय सी देम ब्लूम
फॉर मी अँड फॉर यू
अँड आय थिंक टू मायसेल्फ..
व्हॉट अ वंडरफूल वर्ल्ड..."

समाप्त.

सायराचं गाणं

Keywords: 

लेख: