सांग ना...

( प्राची रेगेची ही कविता वाचून झब्बू द्यावासा वाटला. म्हणून ही कविता, १९८८मधे झालेली, त्या वयानुरुप बाळबोधच आहे Heehee पण घ्या चालवून)

तुझ्या डोळ्यातली स्वप्नं
मलाही दिसावीत...
चांदण्यांनी तुझाही हात
पोळला जावा
असं का व्हावं
आपल्या भेटीत?

तुझ्या गाडीचा ते
धुंद वेग
माझ्या केसातला तो
गंधीत मरवा
नागमोडी रस्त्याची
मायावी वळणे
घनदाड झाडांची
वेडी माया... सांग ना...

तनमनातून आलेले
तुझे शब्द
भावनांनी ओथंबलेले
माझे सूर
अस्वस्थ करणारी
तुझी नजर
"आवर ना" म्हणणारी
माझी वीज...सांग ना...

वाळूवर उमटणारी
भरीव गाज
हेलावून टाकणारी
शिवरंजनी
हवीहवीशी वाटणारी
बोलकी शांतता
भरभरून कोसळणारी
थरथरती तृप्तता...
सांग ना
असं का व्हावं
आपल्या भेटीत...

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle