चांदण्यात फिरताना

Location:
स्नेह पार्क च्या 1bhk flat.ची bedroom
Property:
जूनं godrejच लोखंडी कपाट... त्यावर उंच ठेवलेला National Panasonic चा टेप रेकॉर्डर... त्यात असलेली आशा भोसलची "नक्षत्रांचे देणे" casset ...
पात्र:
मी (साधारण 5व्या इयत्तेत) पियूष (3 वर्षाने लहान भाऊ) आणि बाबा
आई स्वयपाक घरात (पोळ्या लाटण्यात busy)
::::
रात्रीचे 8 वाजले असतात...
पियूष कपाटा समोर stool ठेवून उभा...
बाबा harmonium घेऊन सज्ज...
रेकॉर्ड वर गाणं सुरु करायला सांगतात....
Stool वर उभा राहुनही पियूषचा जेमतेम play button पर्यन्त हात पोचतो...
आणि गाणं सुरु होतं....
चांदण्यात फिरताना.............
बाबा पेटिवर बरोबर गाणं पकडतात...
मी समोर बसून "कसले भारी न बाबा आपले!" अशा डोळ्यांनी बघत असते...
आणि इतक्यात बाबा पियुषला casset pause करायला लावतात.....
" चांदण्यात फिरताना माझा धरलास " इथ पर्यन्त सगळं ठीक असतं .. पण तो "हात" काही केल्या पेटीतनं उमटत नसतो....
मग बाबांची आज्ञा.....
"पपे जरा म्हण बघू.... हा 'हात' काही जमत नाहीये...."
मग तेच गाणं परत माझ्या आवाजात सुरु....
कशीतरी गाडी 'धरलास' पर्यन्त येते .....
पण ते पुढचं नागमोडी वळण नी त्यात अवघड चढ़ .... झालं आमची गाडी परत बंद!.....
मग आता पुढचा उपाय सुरु होतो...
एव्हाना पियूष वर उभा राहून वैतागायला लागलेला....
पियूषला पुढची आज्ञा...
"पिल्या ... फ़क्त 'हात' इतकच प्ले कर.... गाण्यातली ती जागा आली की परत rewind परत play...."
एक दिड तास आमचं हेच सुरु....
अधून मधून आईचं "जेवायला चला" पालुपद सुरु....
मग परत तोच गोंधळ
"इथे असं नाहीये ग..."
"बाबा तसं नाहीये हो"
"झालं का तुमचं ? मी उतरु का खाली आता"
शेवटी आम्ही सगळे त्या मंगेशकर भावंडांना दंडवत ठोकतो...
एव्हाना रात्रीचे 9.30/ 10 होत आले असतात...
कस तरी जेवण आटपत... आईची आणि माझी स्वयपाकघर आवरण्या वरून बरीच घासाघीस होते...
एकदाचं सगळं निपटवून ... अंथरुण घालून आम्ही झोपायचा प्रयत्न करतो खरा पण झोप काही येत नाही.... 'चांदण्यातल्या हाताचा' चकवा आम्हा सगळ्यांनाच लागला असतो... मनात तर ती जागा अगदी perfect जमते... पण गळ्यातून काही केल्या उमटत नाही! .....
बरीच वर्ष सरतात.... कधीतरी बाबांना पेटीवर साधतेच ती जागा... पण मी त्या चकव्यात फिरत राहते गोल गोल..... आणि काही वर्षांनी मलाही काठावर पास होण्या इतकं जमतच हे गाणं... पण अजूनही हवं तसं जमत नसतच... ...
.....

मग आलाच तो दिवस...
मी आणि आई मिळून घर आवरायला घेतलय ...
मोठ्ठा box सापडतो माळ्यावर.... आत मध्ये तोच जुन्या cassetsचा खजिना... हल्ली teprecorder कोणी वापरत नाहिये काय उपयोग cassets चा? सहज मनात आलं उचकून तर बघू.... खोल तळाला आशा भोसले हातात मोत्याचं bracelet मिरवत mike धरून हसताना दिसली! मी खोल श्वास घेतला नि मोठ्ठयांना गायला लागले....
" चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...
सखयारे आवरही सावरही चांदरात....चांदरात..."
या वेळी श्री मंगेशाची कृपाच झाली तो चकवा ही चकला! "बाबा जमलं” जोरात ओरडले मी....
आई माझ्याकडे पाहून मुसमूसायला लागली...
बाबांच वर्षश्राद्ध म्हणून पाहुणे येणार होते...
मी आणि आई घर आवरत होतो!...............

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle