भेट

लग्नात खूप भेटवस्तू मिळतात... काही संसाराला उपयोगी... काही सजावटी साठी आणि बऱ्याचश्या नटण्या मुरडण्या साठी ....
पण काही भेटी इतक्या अमूल्य असतात की त्या तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात.... इतक्या अमूल्य असतात की तुमची हरवलेली ओळख समोर आणून ठेवतात....
माझ्या लग्नात बाबांनी ठरवल होत काही देणी घेणी नाही करायची. आहेर घ्यायचा नाही . फक्त एकच अपवाद ठेवला.... स्वत:हून...
"मिलींद दादा कडून त्याच सगळं शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीताच collection घ्यायच ! "
आज बाबा सोबत नाहीयेत ... बहुदा त्यांना माहीत होतं ते नसणारेत .... आता त्यांच्या आवडीचे वसंतराव देशपांडे, कुमार गन्धर्व, मालिनी राजुरकर, अभिषेकी बुवा, राशिद खान, हृदयनाथ मंगेशकर ही सारी मंडळी सोबत करतात बाबांची क्षणिक भेट घडवून आणतात!
आत्ता कुमार गंधर्वांचं "उड़ जाएगा हंस अकेला" ऐकत होते....
खरच! काही भेटी इतक्या अमूल्य असतात की काळाच्या पल्याड गेलेल्या माणसांची भेट घालून देतात!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle