पुरणपोळी

लाटताना आज पोळी
गुणगुणली कविता मनी
शौर्य रसाची भाकरी, भाववाही ती पोळी
भावनेचा पूर ती
गझलवेडी पुरणपोळी

लयीमधला दावी खुमार
भाकरीचा तत्ताकार
मध्य एक लय बांधून
बढत घेई पोळीचा परीघ
लय तीच सांभाळुनी,डौल तिचा वाढवुनी
भावगर्भीत पुरण उदरी
गझल जणू पुरणपोळी

अंजली
५/३/२०१५

वर
0 users have voted.