सृजनाच्या वाटा: तमसो मा ज्योतिर्गमय

नमस्कार,

Party मैत्रीणच्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!! Party

छोट्याश्या ब्रेकनंतर सृजनाच्या वाटा उपक्रम पुन्हा येत आहे - दिवाळीची रोषणाई घेऊन!
ह्या महिन्याचा आपला विषय आहे 'तमसो मा ज्योतिर्गमय'... अंधकाराला दूर सारणा-या प्रकाशस्रोताबद्दल ह्या महिन्यातल्या सृवामध्ये लिहूया.

दिवाळीतल्या आकाशकंदील आणि पणत्या , वीज गेल्यावर कॅन्डललाईटमध्ये केलेलं डीनर, मार्केट पालथं घालून घेतलेला विंटेज दिवा ते एखाद्याच्या अंधाऱ्या आयुष्यात आलेला आशेचा किरण... अश्या अनेक प्रकारच्या दिवे, लाईट्स आणि आनंदी स्माईल्सनी ह्या महिन्यात मैत्रीण उजळून टाकूया. Diwali_Oil_lamps_Darjeeling.jpg
चित्रस्त्रोत: विकिपीडिया

वर
0 users have voted.