वळण

||वळण||
हां इथेच असायला हव...
जरा पुढे जावून बघुया...
अरे हेच की ते वळण...
ओलांडल की सापडेलच!
दिसेल तुला तुझं नी माझं
अरे काय म्हणून काय विचारतोएस?
काहिही सापडेल...
काहिही दिसेल...
काहिही असेल...
पण जे असेल ते फक्त
तुझं नी माझं असेल
चित्र दिसेल कदाचित्
तुझ्या माझ्या मिठिच्या
गहिऱ्या रंगात रंगलेलं !
किंवा गाण ऐकू येइल
तुझ्या माझ्या विरहाच्या
आर्त सुरात भिजलेलं!
आपल घरही असेल तिथेच
आठवणिंची एक एक वीट
ठेवून रचलेलं!
पाऊस भेटेल तिथेच
धो धो कोसळणारा
तुला मला अज्जीब्बात न भिजवणारा
पण आडोशाला एकमेकांजवळ ढकलणारा
तू ये तर खरं
शोध ना जरा
मी फिरतीये तिथेच गोल गोल
आपली भांडण...
आपली स्वप्न...
आपल्या गप्पा...
तुझं माझ हातात हात घेउन बसून राहणं
तुझ्या कविता
माझं गाण
अरे हेच की ते वळण
याच्या पुढे सगळ फक्त तुझं नी माझं!

/* */ //