:Draft Incomplete :::: Rajsthan!!!

राजस्थान
आमच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करावा, हा विषय आम्ही जवळ जवळ १ महीना भर चघळला पण आम्हा दोघानांही ऑफिस् नावाच्या चक्रातुन वेळ काढ्ता येत नव्हता. रोजची धावपळ् ,वेळेवर ट्रेन पकडायची,घर- ऑफिस कामं,, माझी तर खुपच करसत व्ह्यायला लागली होती.त्यातुन बरेच दिवस आम्ही कुठेच एकत्र फिरणं ,खरेदी नाही अगदी नाहीच्!!
शेवटी ठरवलंच. उशीरा का होईना पण त्याच महीन्यात जायचंच.मग कामातुन वेळ काढुन वेळा ठरवल्या आणि आख्खा आठवडा सुट्टी टाकाली!!! :) कुठे/ काय/ कसं फिरता येईल अश्या ठिकाणाची उजळणी केली. गुगल ने मदत खुप केली. अगोदरचा १ आठवडा चांगला अभ्यास केला; राहाण्याची हॉटेल्स्/खरेदीसाठी प्रसिध्द दुकानाची नावे/नकाशे जमवली ,तशी फाईल-फोल्डर बनवले. थोडकेच सामान आणी बजेट फिट्ट बसवलं आणि निघालो राजस्थान ला!!!
राजस्थान मधील ३ महत्वाची पर्यटन ठिकांण १ आठ्वड्यात पाहायची ठरली.. जयपुर ,जैसलमेर आणी जोधपुर.
मुबंई ते जयपुर ११५५ किमी चे अंतर अडीच तासात पार पाडल्यावर साधारणं २७ नोव्हेंबर च्या संध्याकाळी ६ वाजता आम्ही बुक केलेल्या मानसरोवर येथील हॉलीडे होम/कॉटेज ला पोचलो.ते प्रमुख शहरापासुन १० किमी आहे. ७:३० ला बाहेर पड्लो तेव्हा जरा जास्तच थंड वातावरण अनुभवलं. हिवाळ्यात ईथे कमीत कमी २ से. तापमान असते. अगोदरचे २ दिवस पावसाने हजेरी लावल्याची ग्वाही रस्ते देतच होते. जवळच एका ठिकाणी गरम-गरम 'मुंग हलवा' टेस्ट केला. कोल्ड क्रीम,फेसवॉश्,हॅन्ड वॉश,एक्ट्रा सॉक्स,आणी थोडे खाण्याचे पदार्थ [वापरुन संपवायच्या हिशेबाने] विकत घेउन कॉटेज ची वाट धरली. ३रोटी,दाल बाटी ,मिक्स वेज सब्जी, राईस -असे रात्री जेवल्यावर ८ तास झोप काढ्ली.
दुसरा दिवस फक्त अजमेर आणी पुष्कर साठी ठेवला.ईंडीका करुन सकाळी ८:३० ला निघालो. जयपुर हुन दर १० ते १५ मी. ला आरामदायी लग्जरी/डीलक्स (?) बसेस पण उपलब्ध आहेत.१३२ किमी अंतरावरील अजमेर ब्रॉड गेज वर असल्याकारणाने भारतच्या सगळ्याच प्रमुख शहरांना जोड्लेले आहे. भारतातील हा ४/६ लेन चा राजमार्ग म्हणुन ओळखला जातो.रस्ते खुपच छान आहे! राजस्थान संगमरवराचे प्रमुख निक्षेपस्थान आहे.रस्त्यात खुप् संगमरवर फॅक्टरीज दिसल्या.शेवटचे २ किमी चा एकेरी रस्ता आहे,कारण ४ लेन किशनगड हुन पुढे जातो.
आम्ही दोन-अडीच तासात दरगाह शरीफ ला पोहचलो.दरगाह प्रवेश केल्याकेल्या २ मोठे तांदळाचे दान टाकण्यासाठी कढया आहेत. मोठी कढई ४४८० किलो तर छोटी २२४० किलो तांदुळ मावणारी आहे. चांदी ने मढवलेल् आतले दार भाविकांच्या गर्दी ने एक्दम पॅक होतं. आम्ही कसे बसे आत शिरलो. शरीफ कब्र संगमरमरची असुन त्याला सोन्या ने सजवलेल आहे.बहुतेक आत उभे राहीलेले लोक्,भाविकांच्या हातातले गुलाब-पाट्या घेउन पटापत पुढे ढ्कलत होते. अजमेर ला दरगाह शरीफ शिवाय दुसरे काही बघण्यासारेख नाही असे मला वाट्ले. रस्त्याच्या दोन्ही बाजुला भरगच्च दुकानांच्या रांगा आणी अल्ला च्या नावाने लोळणारे/चीड येई पर्यंत मागे लागणारे असंख्य भिखारी !!!!आम्ही लगेच पुष्कर ला जायला निघालो.२० मिनीटांच्या अंतरावर असलेलं पुष्कर हे तीर्थ स्थान आहे. नाग पर्वताने घातलेल्या सिमेमुळे पुष्कर हे अजमेर पासुन वेगळे आहे. भव्य तलाव, ब्रम्हदेवाचे मंदिर आणी रंगीबेरंगी दुकानं लक्ष वेधुन घेत होते. अजमेर आणी पुष्कर ला फोटो काढुच वाटले नाही Sad
येताना दिसलेला कंटेनर
प्रती १
IMG_0746

वाटेत जेवण केले त्या ठिकाणी भिंतीवरचे चित्र
IMAG0068, IMAG0070

तिसर्या दिवशी जयपुर ला हवामहल पर्यत रिक्षा केली. मी १९९६ मध्ये ही जयपुर पाहीलं होत.tyaveleachje aani aatache aijpur farase badalele vatale nahii...... रंगीत आणि सुंदर जयपुर हे राजस्थान ची राजधानी असलेलं आधुनिक शहर आहे.तसेच हे व्यापार आणी पर्यटन केन्द्र म्हणुन प्रसिद्ध आहे. हे भारतातलं सगळ्यात पहिल सुनियोजीत शहर आहे.
हवामहल महाराजा सवाई प्रताप सिंह ने १७९९ मध्ये बांधलेली एक राजपुताना वास्तु आहे."Palace of Winds" म्हणुन ही ओळखला जाणारा हवामहल ५ मजली असुन पिरामीड च्या आकारा सारखा आहे. छोट्या -छोट्या ९५३ जाळीदार खिडक्या तर मधाच्या पोळ्याप्रमाणे भासवतात.त्या काळी शाही परिवारातल्या महिलांना पडद्यात राहण्याची प्रथा असे. रस्त्यावरील मिरवणुक् ई.मनोरंजन मिळण्याच्या हेतुने या खिडक्या खास महिलांसाठी बनवल्या आहेत.
IMG_0766
IMG_0769
IMG_0775
IMG_0777
IMG_0780
IMG_0801
Sm-0006

पुढे १५ ते २० मी चालत सिटी पॅलेस ला गेलो. वीरेन्द्र पाल, उदय पोल Jaleb चौक आणी त्रिपोलिया गेट (ट्रिपल ) प्रवेश द्वार असलेलं सिटी पैलेस बनवायला ३ वर्षाचा कालावधी लागला.[१७२९ ते १७३२]
मुबारक महल-स्वागता साठी प्रसीध्द! ,चन्द्र महल ,पितम चौक निवास- ईथे चार दरवाजे ऋतुं चे प्रतिनिधित्व करतात;मयुर[मोराचे चित्र असलेलं] गेटः शरद ऋतु ,कमळ गेटःग्रीष्म ऋतु ,गुलाब गेट: शिशिर ऋतु ,हिरवं गेटः वसंत ऋतु
दीवान-i-खास,दीवान-I आम, महारानी महल ,बग्गी -Bhaggi खाना,गोविंद देव जी मंदिर
हे सर्व संग्रहालय म्हणुन सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाली ५ पर्यंत खुले आहेत.
IMG_0818
IMG_0835
IMG_0843
IMG_0846
IMG_0848
ईथुन बाहेर पड्ल्यावर भरपुर हॅन्डीक्राफ्ट ची दुकाने फिरुन आलो. सकाळी ११ ला सुरु केलेला हवामहल-सिटी पॅलेस-आजुबाजुचा परीसर बघण्याचा कार्यक्रम दुपारी ४.३० ला संपला. कोटेज वर नाश्ता-जेवणाची खुपच चांगली सोय झाली :) अगदी थंडीची दिवसात तव्या वरची पोळी /पराठा ताटात !!! नंतर टिव्ही वर दबंग चित्रपट पाहीला :)

नंतरचा म्हणजे ४था दिवस खरेदीचा असल्यामुळे मी खुप खुश होते.सकाळी जेव्हा रिक्षात बसलो तेव्हा आमच्या कोटेज च्या बाहेरुन एक सिटी बस जाताना दिसली होती.
pic-saaree,
earings,
rajasthani shoes,
hand-bag
,meena
बापु बाझार्,नेहरु बाझार्,झवेरी बाझार अक्षरशः चालत फिरलो :)
तीथे वडा-समोसा फोडुन त्यात भाजी टाकुन देतात ,बरोबर पाव मिळत नाही.
संध्याकाळी आम्ही राजमंदीर चित्रपट गृहात गुजारीश पाहीण्यासाठी गेलो होतो पण ते आतुन खुप छान असल्यामुळे तो चित्रपट जास्त काही लक्षात राहीला नाही.
Sm-0027
थोडे चालत गेल्यावर सकाळची बस दिसली,,फक्त १४ रु.मध्ये आम्ही कोटेज ला पोहचलो Sad २ दिवस रिक्षा ला १८०रु.दिल्यामुळे ईथले लोक जरा जास्तच लुबाडतात याचा अनुभव आला.ही ९ नं ची बस,मानसरोवर वरुन अग्रवाल फार्म कडे आणी नंतर टोंक फाटक हुन पिन्क सिटी कडे जाते.

पाचवा दिवशी जरा उशिराच बाहेर पड्लो. अल्बर्ट हॉल् जे राम निवास बागेच्या जवळ आहे,पाहुन ,५ मि अंतरावरच प्राणी संग्रहालयाकडे वळलया तिथुनच ४ किमीवर मुक्-बधीर मुलांच्या शाळेत असलेल्या [Dolls Museum]बाहुली संग्रहालयामध्ये गुजरात, बंगाल, आसाम, कश्मीर,राजस्थान, महाराष्ट्र, तमिलनाडु, पंजाब राज्यात आढळणार्या विभेन्न पोशाखातल्या बाहुल्या आहेत. यात मैसूर, केरल, गुजरात, बंगाल और पंजाब च्या लग्नातले कपड़े आणी भरतनाट्यम करणार्या, तसेच ओडिसी ,कथकली, कुचिपुड़ी अश्या शास्त्रीय नृत्य रूपांतले पेहराव केलेल्या बाहुल्या पण अप्रतिम होत्या! अजुन संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, मैक्सिको, स्पेन, स्वीडन, जर्मनी, घाना, युगांडा, लेबनान आणी अफगानिस्तान देशातल्या तसेच जापान, मलेशिया, बर्मा, चीन आणी न्यूजीलैंड मधील वधु च्या वेशा तील बाहुल्यापण सुन्दर होत्या.
imgs

रात्री जैसलमेर साठी रेल्वे असल्यामुळे आम्ही जेवण उरकुन निवांत बसनेच स्टेशन ला पोहचलो. ८ तास प्रवास होउन ही सकाळी रेल्वे तुन उतरल्यावर ताजे वाटत होतं. गोल्डन सिटी म्हणुन ओळखल्या जाणारा जैसलमेर जिल्हा हा आंतरराष्ट्रीय सिमेपासुन ४७१ किमी वर वसलेला असुन राजस्थानातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे.ईथले संस्थापक राव भाटी राजा जैसल यांच्या नावावरुन जैसलमेर हे नाव ठेवण्यात आले आहे.

जैसलमेर ला बुक केलेल्या हॉटेल च्या गाडी ने व्यवस्थीत हॉटेलवर पोहचल्यावर,रुफ[गच्ची वर असलेल :)] वर नाश्ता-जेवण केले. ३ नंतर जैसलमेर हुन सम च्या दिशेने निघालो. जयपुर सारखेच ईथलेही रस्ते खुपच छान होते!

जैसलमेर चे तत्कालीन प्रधानमंत्री दीवान नथमल यांच्याकरता निवासस्थान म्हणुन बनवलेली नथमल जी की हवेली ,जैसलमेर च्या दुसर्या हवेली पेक्षा अधिक लोकप्रिय आहे.
गडीसर तलाव - रावल गड्सी सिंह नी १३६७ साली में खोदकाम करुन बनवलेला , हा एक प्राकृतिक पावसाळ्याच्या पाण्याने ,धार्मिक स्थान आणी छोटया मंदिरांनी घेरलेला शांत तलाव आहे.

http://www.unseenrajasthan.com/unseenjourney/?p=188

जोधपुर
pic-rajaee
क्रमशः

[हे मी Fri, Nov 2, 2011 ला लिहले आहे,२०१० मध्ये गेलो होतो] :)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle