मुर्ख फाॅरवर्ड्स आणि मुर्ख लोक

आज सकाळीच एक मॅसेज आला. मागे १० महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात मारहाण झाली.. . मग ती आई टिव्ही वर रडुन रडुन सहानुभूती मिळवत होती.. मग लोक पैश्याच्या मागे ईतके लागलेत की मुलांना असं लोकांकडे टाकुन जातात... मग सासु सासर्यांचं लचांड सुनांना नको असतं...

अर्थात हा मॅसेज बनवणारा माणुस बिंडोक आहे... पण तरी असे मॅसेज येतात आणि लोक ते फाॅरवर्ड करतात.

१. १०० पैकी ९५% बायका नोकरी करतात.
२. सर्वांचीच आर्थिक परिस्थीती चांगली असते असं नाही.
३. कोणाचे सासु सासरे नसतात, कोणाचे फार वयस्कर असल्यामुळे सांभाळु शकणार नसतात, कोणाला नातवंडांना सांभाळायची ईच्छाच नसते, कोणी आजारी असतात ... एक ना एक खुप कारणं असु शकतात .. पण सरसकट मुलगा सुनेला सासु सासर्यांचं लचांड नको म्हणुन बाळांना पाळणाघरात ठेवतात असं विधान करणं म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.
4. त्या फाॅरवर्डेड मॅसेज चा ब्लेमिंग फोकस फक्त आईवरच आहे. असं का?
बाळासाठी फक्त वडिलांनीच कमवायचं आणि आई ने नाही असं का ? आणि आईनेच सांभाळायचं बाबांनी नाही असं का????
सध्यातरी ईतकंच सुचतंय.
आणि मी या बाबतीत सुदैवी आहे की माझा नवरा ईतक्या मागासलेल्या आणि चीप विचारसरणीचा नाही. बाकिच्यांचं काय??

-- अनिश्का सावंत

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle