||अथः योगानुशासनम||- परिचय

||अथः योगानुशासनम||

खुप दिवसांपासुन मनात असलेली लेखमालिका फायनली आज सुरु करतेय... योगासनं शिकायला लागल्यापासुन किंवा योगाभ्यासाच्या वाटेवर चालु लागल्यापासुन योगशास्त्राबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर झाले... या लेखात "योग" (की योगा??) याबद्दल थोडसं.

योगशास्त्राची निर्मिती पतंजली मुनींनी केली, हे तर आपण जाणतोच. पण योगशास्त्राबरोबरच पतंजली मुनींनी व्याकरणशास्त्र, वैद्यकशास्त्र याही महत्वाच्या ग्रंथांची निर्मीती केली. याची महती श्लोकात वर्णिली आहे :
|| योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन|
योsपाकरोत्त्म प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोस्मि||
अर्थः योगशास्त्राने चित्तचा, व्याकरणशास्त्राने पदाचा (भाषेचे) आणि वैद्यकशास्त्राने शरीराचा मळ शुद्ध करणार्‍या पतंजली मुनींना आम्ही नमन करतो.

योगशास्त्र सामान्य माणसाला सुकर करुन देण्यासाठी पतंजली मुनींनी 'पातंजल योगसुत्रांची' निर्मिती केली. याचे समाधिपाद, साधनपाद, विभुतीपाद आणि कैवल्यपाद असे चार भाग आहेत. नराचा नारायण होण्याचा मार्ग यात सापडतो.

||योगश्चित्त्वृत्तिनिरोधः||
योग म्हणजे मनस्तत्त्वाला (चित्ताला) निरनिराळी रुपे (वृत्ती) धारण न करु देणे (राजयोग-स्वामी विवेकानंद)

योगशास्त्र म्हणजे काय??? 'योग' हा शब्द 'युज' (हलंत कसं करावं?) या धातुपासुन तयार होतो. याचा अर्थ 'जोडणे'. तर योग म्हणजे जोडणे आणि, शरीराला मनाशी आणि मनाला अनंताशी जोडणारे शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योगाचे आठ सोपान- आठ अंग = अष्टांग
||यमनियमासनप्रणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयो अष्टावंगानि|| (अष्टांग योग व्याख्या: साधनपाद)

१.यम २.नियम -नीतियोग
३. आसन ४. प्राणायाम - हठयोग
५.प्रत्याहार
६. धारणा ७.ध्यान ८.समाधी -राजयोग

यापैकी पहिली पाच अंग बहिरंग साधना तर उर्वरित अंतरंग साधना आहेत. अष्टांग योगाच्या अभ्यासाने सगळे दोष नष्ट होउन ज्ञानप्रदीप्त होते. विवेकख्याती हे अंतीम ध्येय!

योग + अभ्यास याने 'योगाभ्यास', योग +आसनं यातुन योगासनं शब्द तयार झाले... आणि त्याचा अपभ्रंश होऊन योगा. 'योगा' या शदाला खरंतर काहीच अर्थ नाही. पाश्चात्यांनी उच्चारपद्धतीतील फरकाने प्राण'चं 'प्राणा' तसं योगचं योगा केलं. बट योगा इज नॉट योग्य.
तर हे सर्व योगशास्त्राचे मूळ!!
पुढील लेखात आपण नीतीयोग म्हणजेच यम-नियम विषयी बोलु.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle