थोडे दिवस

इवलेसे हात तुझे सामावू दे माझ्या हातातच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

निरर्थक बडबडणे तुझे ऐकू येऊ दे सततच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

घरभर फिर माझ्यामागे तू अजून रांगतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हट्ट तुझा पुरवत राहू देत मला कायमच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हास्य निरागस तुझे घरात राहू दे फुलतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

अनुभवू दे मला लहानपण तुझे अजूनच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

कविता: 

वर
0 users have voted.