नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती हवी आहे.

मातोश्रींच्या डोक्यात अचानक नर्मदा परिक्रमा करायचे आले आहे. तिला मनापासून फिरायला आवडते. एकटीच असल्याने कोणी चांगली कंपनी मिळाली की तिचे बेत आखणे सुरू होते. अजून छान चालते फिरते आहोत तो पर्यंत भारत फिरणे ही इच्छा! परवा एका नर्मदा परिक्रमेचे पत्रक मला पाठवून याला मी जाऊ का अशी विचारणा झाली आहे. मी ते पत्रक बघितले तर मला काही गोष्टी खटकल्या म्हणून तिला मी थोडी माहिती काढते असे सांगून थोपवले आहे. तर मला थोडी माहिती हवी आहे.
१) साधारण खर्च(पुणे ते पुणे) किती येतो. त्या पत्रकाप्रमाणे १६,००० सांगितला आहे जो मला फारच कमी वाटत आहे. म्हणजे १५ दिवसांची ऑल इन्क्लुसिव्ह ट्रीप सध्या १६,००० रु. मधे शक्य नसावी असे मला वाटते. किंवा मग क्वालिटी बाबतीत म्हणजे रहाण्या-खाण्याची व्यवस्था वगैरे मधे तडजोड असावी.
२) पुण्यातले एक यशोधन ट्रॅव्हल्स या टूर्स अ‍ॅरेंज करतात हे माहित आहे. बाकी कोणी खात्रीशीर आयोजक माहिती आहेत का कोणाला? तुमच्या ओळखी-नात्यामधील कोणी ही परिक्रमा केली असेल तर ते कसे गेले होते? त्यांचा अनुभव कसा होता? काही सूचना वगैरे असतील तर त्या. बस ने जरी प्रवास असला तरी नदी, समुद्रातला प्रवास वगैरे असेल तर त्याची व्यवस्था कशी असते?
३) बाकी पण काहीही माहिती असेल तर प्लीज द्या.

धन्यवाद!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle