घरगुती प्ले डो/ क्ले

लागणारे जिन्नसः

मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.

कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण जरा पातळ वाटू शकते. अज्जाबात घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.

रंगीत उकड स्वतंत्रपणे छानपैकी मळून घ्यायची.

home made play dough

अशाप्रकारे घरच्याघरी हव्या त्या रंगाचा स्वस्तात मस्त आणि रसायन, पॉलिमर मुक्त प्ले डो १५ मिनिटात तयार.

हा प्ले डो प्लास्टीक पिशवीत घालून ठेवला तर बरेच दिवस वापरता येतो. ह्यातून साकारलेल्या कलाकृती सुकल्यानंतर उलत नाहीत.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle