ग्रीष्म

ग्रीष्म
सरले नवपल्लवांचे कोवळेपण,वृक्ष झाले घनदाट
गळले पुष्पदल, आला फळांचा बहर
उठले सूर्यदेव घाई-घाई, लवकर झाली पहाट
पडले ग्रीष्म पाऊल, झाला उष्म्याचा कहर ---
स्वतापे तापला, चाल मंदावली
ढग सरसावला करण्या सावली
तापे विरला, सरला मागे आल्या पावली
वाट पहाता संध्या खंतावली ---
तप्त वारा.. द्या द्या त्यास थंडावा
पाजा पाणी वा पेय थंडगार
अडोशाला आला रानपाखरांचा थवा
बालकांच्या आनंदा न पारावार---
पिवळी खिरणी,लांब काकडी
बदामी खरबूज, लाल टरबूज
विविध आंब्यांची हात गाडी
पण सारे करती कुजबूज ---
जांभळे हिरवीच आहेत अजून
मोगरा गंध मुठीत आहे धरून
धरा आकाशाकडे डोळे लावून
कधी मृगसर येईल धावून ------

विजया केळकर ______

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle