रंग दे रंग दे, रंगरेजवा

नवीन सदस्य

  • छाया शिंदे
  • Manashruti
  • शानाया
  • प्रज्ञा९
  • Prerana

रंग दे रंग दे, रंगरेजवा

कुमार गंधर्व यांची मधमात सारंग मधली ही चिज https://youtu.be/CQbOpdp4Sos

रंग दे रंग दे रंगरेजवा
जैसी मोरी पिया की पगरिया

रंग दे मोरी सुरंग चुनरिया
जैसी मोरी पियाकी पगरिया

त्यावर काहीबाही सुचलं...
------------------

किती तो उकाडा.... अगदी काहिली होतेय जिवाची. त्यात तोही नाही जवळ. एकच सुखाची गोष्ट, तो येणार आहे, लवकरच... त्याच्या आगमनाची वार्ताही किती सुखावणारी... जणुकाही ग्रीष्मातल्या दुपारी वळवाची चाहूल.

आता इतक्यात हे विरहाचे दिवस संपतील अन मग त्याच्या संगतीत नवीन वसंत फुलेल.
तो येणार, कशी सजवू स्वता:ला? कोणती नवीन वसनं आणू? कोणत्या रंगात रंगवू?

ए, रंगरेजवा मला मदत कर ना... माझ्या त्याची पगडी कोणत्या रंगात असेल बरं? त्या रंगात रंगवून दे ना माझी चुनरिया. कोणता रंग विचारतोस? अं.... असं कर सगळेच रंग आण तुझे अन सगळ्याच दे बरं रंगवून.

तसंही तो आला की सारेच रंग फुलणार आहेत smile
आधी थोडा भांडणाचा मग थोडा रुसव्या फुगव्याचा, तो इतके दिवस आला नाही म्हणून थोडी तर रुसणारच ना मी?
मग थोडा त्याच्या समजूत घालण्याचा. मग आमच्या दोघांच्या प्रेमाचा, ....

सगळेच रंगव रे रंगरेजवा... हा विरक्तीची पांढरा रंग सारा सारा रंगवून टाक, वसंत फुलवून टाक.... माझ्या त्याच्या रंगात बुडवून टाक रे मला...

तू तर साऱ्या जगाचा रंगरेजवा, तुला माहितीच आहेत साऱ्या जगाचे, अगदी माझ्या त्याचेही सारे रंग. मग माझी चुनरिच काय, मलाच रंगवून टाक ना त्याच्या रंगात.

इतके रंगव इतके रंगव की मी मी न राहिन, ना तो तो राहिल. असं रंगव रे रंगरेजवा....

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 981 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com