मी नदी

पर्वतकड्यांवरून स्त्रवले -गिरीकंदरातून झेपावले
तीर्थक्षेत्रांना उजळविले-रानावनात खळाळले
शेतांना भिजवले -गावागावात खेळले …
मी जीवनदायिनी होते. …पण आता ,…

वाहत्या ओघाची कोमेजलीय काया
उघड्या कातळाची हरपलीय माया

बिचारे किनारे कसनुसे तगताहेत
वाळूच्या उपशाची चाके झेलताहेत

डौलाची चाल माझी दुडकी केली
मैलोगणती गावे बोडकी केली

काय फुलवलंय माघारी मी कसं बघू ?
अन उजाडलेल्या गावांचे शाप भोगू ?

माझी कुलीनता माझी शान होती
आता मलीनतेने मी म्लान झालेय.

माझं अंत;करण आटलंय
धरणाच्या विळख्यानं फाटलंय

तरी मी सागराला भेटायला जाणार आहे.
घेतला वसा राखून परत भूमीवर येणार आहे.

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle