वारा

वारा
आला आला आला
कोणी पहिला ?
कसा दिसला ?
नाही कळला ,आला आला आला

अलगद पडदा हलला,
घरभर फिरला
प्रत्येक जण हसला
आला आला आला

आला म्हणता पसार झाला
कोणी नव्हते खेळायला
रागावला, गरम झाला
स्तब्ध व लाही लाही झाला

अंगात आले,गरगर फिरला
धुळीने माखला
धक्का दिला झाडाला
गेला गेला गेला

ढगांना गराडा घातला
गडगडाटात कडकडून भेटला
अश्रूत न्हाला
आला आला आला

थरथर कापत आला
दार कोणी उघडीना त्याला
दुलई शोधू लागला
गारव्यातच उभा राहिला

फुंकर मारली शेकोटीला
पर्णेच पांघरला
ऊब मिळाली शरीराला
सुगंध उधळीत आला

लू sलूsलू sलूs करत बहुरुपी अनिल बनला
संतापी समीर, पावसाळी पवन,
लहरी हवा, शीत वायू, वादळी वारा
सांज होता वात नमला
वदला -शुभंकरोती कल्याणम्

विजया केळकर ____

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle