ऑनलाईन विणकाम शिकण्याबाबत

विणकाम, क्रोशा आणि दोन सुयांचे ( क्रोशा आणि निटिंग) मी गेली पाच वर्ष ऑनलाईन शिकवते. बऱ्याचदा याबाबत विचारणा केली जाते, कसे शिकवता, कसे जॉईन करता येईल वगैरे. तर त्यासाठी हा लेख. ( मै टिम हे आपल्या नियमात बसत नसेल तर कृपया धागा उडवावा ___/\___)

"शिकाशिकावा"  हा ब्लॉग कोणासाठी आहे ? 
हा ब्लॉग रिस्ट्रीक्टेड  आहे. म्हणजे तो फक्त सदस्यांसाठीच खुला आहे; सार्वजनिक नाही.

या ब्लॉगचे सदस्यत्व कसे घेता येईल ? 
सदस्यत्वासाठी तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल; तसेच या ब्लॉगची फि ( त्याचे तपशील आपण इमेल पाठवलेत की कळतील ) भरावी लागेल त्यासाठी आधी मला संपर्कातून एक इ मेल पाठवावी लागेल.

या ब्लॉगचे सदस्यत्व कोणाला घेता येईल ?
ज्यांना विणकाम शिकण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे नेट अॅक्सेस आहे, ज्यांना आठवड्यातून किमान २ तास विणकामासाठी काढता येणार आहेत आणि सर्वात महत्वाचे ज्यांच्याकडे थोडा पेशन्स आहे त्या कोणालाही या ब्लॉगचे सदस्यत्व घेता येईल.

या ब्लॉग द्वारे कोणाला विणकाम शिकणे जमू शकेल ?
वरील तीन गोष्टी असलेल्या कोणालाही विणकाम जमू शकेल. अगदी या पूर्वी तुम्ही कोणतीही सुई हातात घेतली नसलीत तरीही तुम्हाला विणकाम शिकवण्याची जबाबदारी माझी :)

वाटल्यैस मैत्रीण युनिव्हर्सिटीतील मी घेतलेले वर्कशॉप पहा. त्यावरून तुम्हाला अंदाज यावा.

या ब्लॉगचे कामकाज कसे चालते? 
आपण एकदा या ब्लॉगचे सदस्यत्व घ्यायचे ठरवलेत आणि मला इ मेल पाठवलीत की मी बाकीचे तपशील आपणास कळावे. त्यानुसार तुमची माहिती तुम्ही मला पाठवली आणि फि माझ्या खात्यात जमा केलीत की लगेचच मी आपल्याला सदस्य करून घेते. आणि आपल्याला या ब्लॉगमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट पाठवते. ही रिक्वेस्ट तुम्ही मान्य केलीत की तुम्हाला या ब्लॉगचा अॅक्सेस मिळतो. आणि मग तो महिनाभर तुम्हाला हवे तेव्हा, हव्या तितक्यांदा, हवा तितका वेळ हा ब्लॉग तुम्ही अभ्यासू, पाहू शकता.

महिना संपला आणि तुमची  पुढची फि जमा झाली नाही की आपोआपच तुमचे सदस्यत्व संपते आणि तुमचा अॅक्सेस बंद होतो. जर तुम्ही पुढील महिन्याची फि जमा केलीत तर हा अॅक्सेस चालू राहतो. त्यामुळे तुम्हाला हवा तेव्हढा वेळ तुम्ही सदस्य राहू शकता.

या शिवाय आठवड्यातील कोणत्याही चार दिवशी प्रत्येकी अर्धा तास ( एकूण दोन तास ) खास तुमच्यासाठी मी ऑन लाईन उपलब्ध असते. त्याचे दिवस आणि वेळा निश्चित केल्या जातात. तसेच काही इमर्जन्सी आली तरीही मी ऑन लाईन असते. याहू चाट, जी टॉक, स्काईप, व्होतास अप, इ मेल वा फोन या द्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.

विणकाम ऑनलाईन कसे शिकणार ? 
हे सुरुवातीला खूप अवघड वाटते. पण गेल्या वर्षभराच्या अनुभवावरून सांगते, हो हे विणकाम ऑन लाईन शिकता येते. माझ्या अनेक विद्यार्थिनीनी हे सिद्ध केलंय  :)

या ब्लॉगवर मी अगदी बेसिक गोष्टींपासून शिकवले आहे. अतिशय सोपी, भाषा, अनेक चित्र, आकृत्या, व्हिदिओ यांच्या मार्फत मी जास्तीत जास्त सोपे करून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

डीस्टन्स  लर्निंग मध्ये कसे शिकवतात याचा माझा १५ वर्षांचा अनुभव इथे कारणी लागला आहे. तसेच चित्रकलेची , फोटोग्राफी, व्हीडीओ, एडिटिंग, एनिमेशन या सर्व गोष्टींचा मला हे सर्व शिकवताना उपयोग होतो.
आज पर्यंत एकाही विद्यार्थिनीने समजत नाहीये अशी अडचण मांडली नाही , हे आवर्जून सांगावे वाटते.

या साठी पूर्वतयारी काय लागेल ?
पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी तुमच्या हाताशी असाव्या लागतील.
क्रोशा शिकावयाचे असेल तर क्रोशाची सुई : ३.५० मि.मी. वा घरी जी असेल ती. आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर.
जर दोन सुयांवरचे विणकाम शिकायचे असेल तर दहा नंबरच्या दोन सुया आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर. हे सर्व सामान तुम्हाला कोणत्याही  एम्ब्रॉयडरी च्या दुकानात मिळते. सुरुवातीला बस इतकेच लागेल. नंतर लागणा-या सुया, लोकर तुम्हाला ब्लोगवर आल्यावर ठरवता येतील.

हे शिकल्या नंतर  पुढे काय ? 
या ब्लोगावारती प्राथमिक पासून प्रगत पर्यंतचे विणकाम शिकवले आहे. ह्या ब्लॉगवरील सर्व गोष्टी आत्मसात केल्यानंतर खरे तर तुम्ही कोणतेही विणकाम आपले आपण करू शकाल; या पदापर्यंत पोहोचाल. तरीही कधी कधी काही डिझाइन्स, पॅटर्न तुम्हाला येत नाही असे वाटले. तर त्यासाठी  www.artarati.blogspot.com हा ब्लॉग आहे. तिथे मी नव नवीन  डिझाइन्स, पॅटर्न  देत राहीन. आपल्याला नवे काही हवे असेल तर तेही तिथे टाकेन. त्यासाठी माझ्याशी संपर्क साधा.

थोडे फार आधीच येत असल्यास ? 
www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल.
परंतु विणकाम थोडे फार आधी येत असले तरी माझा सल्ला असा राहील की किमान एक महिनातरी "शिकाशिकावा" या ब्लॉगचे सदस्य व्हा. त्यामुळे माझी शिकवण्याची पद्धत आणि किमान काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समाजातील, आपली वेव्ह लेग्थ जुळेल. त्या नंतर  www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल. हे दोन्ही तुम्ही एकाच वेळीही करू शकाल.

सर्वात महत्वाचे : 
या ब्लॉग वरती विणकामाचे सर्वसाधारण तंत्र शिकवण्याचा प्रयत्न मी करते आहे . परंतु हे लक्षात ठेवा की ही शेवटी एक कला आहे, त्या मुळे एखादी कलाकृती एकाने केली आहे तशीच अगदी दुस-याला जमेल असे नाही. तसेच एखादा पेटर्ण , एखादे डिझाईन शिकवता येईल परंतु प्रत्येक पेटर्ण वा प्रत्येक डिझाईन हे शिकवता येण्यासारखे असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमते नुसार, कौशल्यानुसार, कलात्मकते नुसार प्रत्येकाची कलाकृती तयार होत असते.

धन्यवाद ___/\___

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle