ती राधा होती, हरीच्या अधरी...

मोरपिसातुनि हळूच आली
मऊ, गार झुळूक जराशी
उधळीत स्वप्ने सप्त रंगी
राधेची अलवार ओढणी

कुरळ्या कुंतला मधुनि सुटुनि
घुंगुर माळा होऊनि बसली
चाल जराशी घुंगुरवाळी
राधेच्या सुकुमार पाउली

पितांबरीचा रंग सोनसळी
उन कवडसे लख्ख चमकति
झरझर झर झर येती खालति
बरस बरसले राधेच्या कांती

मधाळ भाव श्रीहरीच्या वदनी
निल गडद मेघांच्या मधुनि
भोर काळ्या मिटलेल्या डोही
काजळ काळे राधेच्या नयनी

अन मुरली मधून पाझरली ती
नव्हती दुसरी तिसरी कोणी
तीच हळूवार उतरली होती
ती राधा होती, हरीच्या अधरी...

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle