अंगाई गीत

अंगाई गीत
मी अंगाई गीत गाते
ये बबडे, झोप गडे
एकटक निरखता
तव गोजिरे रुपडे

न उमजे मुका घेता
दचकून तू कां रडे?
आ sआ गुणगुणता
चूप झालीस लबाडे

पाळण्यात झुलाविता
अर्ध नयन उघडे
हातपाय हालविता
डुले अंगडे टोपडे

खुळखूळ्याने बोलावे
पहा पहा माझ्याकडे
खुदकन् तू हसावे
पटकन व्हावे उपडे

तुजसवे ग रमावे
नि कामाचा विसर पडे
जरी रडे न थांबे
ऊरी मग धडधडे

देवा ऐक हे साकडे
सुखी चेडीस ठेवावे
मी अंगाई गीत गाते
ये बबडे झोप गडे

विजया केळकर ______

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle