जिंदगी ना मिलेगी दोबारा !!! स्टोक कांगरी ट्रेक आणि रोड ट्रिप - सुरुवात आणि तयारी

डिस्क्लेमर : भरपुर ईंग्लिश शब्द वापरले आहेत.
४/५ वर्षांपूर्वी मला जर कोणी सागीतलं असतं की मी असं काही करणारं आहे, तर मी लिटरली वेड्यात काढलं असत,.असो.

गेल्या वर्षी जुन महीन्यात आम्ही वीणा वर्ल्ड बरोबर लेह ची ट्रिप केली. त्याच वेळी, एकदा तरी इकडे कार घेऊन यायचचं, असं नवर्यानी ठरवलं ( तो ड्रायव्हींग क्रेझी आहे !). आम्ही परत आलो आणि आमच्या जे एन एम अॅयडव्हेंचर्स ( मी जे एन एम रनर्स ची मेंबर आहे ) ची एक टिम स्टोक कांगरी ला जाउन आली. मी फक्त फेसबुक वर फोटो लाईक करणे एवढच केलं. स्टोक काय आहे हे माहित करुन घेण्याचा प्रयत्नही केला नाही. (स्टोक कांगरी हे भारतातलं सगळ्यात ऊंच ट्रेकेबल समीट आहे. ऊंची २०५०० फिट.) आल्यावर त्यांनी एक प्रेझेंटेशन ठेवलं ( जे झाल्यावर मला कळलं ). त्यांच्या पुढच्या ट्रेक ची तयारी सुरु झाली होती. चंदीगढ पर्यंत फ्लाईट, तिथुन पुढे बाईक, मग ट्रेक आणि लेह हून फ्लाईट नी परत.. असा प्लॅन होता. मी सहज नवर्याला सांगीतलं तर तो जाम खूष झाला. 'आपण पण जाऊ, पण कार घेऊन..', त्याला रोड ट्रिप करायाची होती, ट्रेक बाय प्रॉडक्ट. आणि आम्ही ग्रुप मध्ये सामील झालो. पुढच्याच मिटींग मध्ये, तारखा, ट्रेक ची रुपरेखा, बाईकर्स च्या मोघम जोड्या, येऊ शकणारे साधारण प्रॉब्लेम्स, फिटनेस वगैरे चर्चा झाली.. हेवी वेट वाल्यांना वजन कमी करण्याची समज दिली गेली आणि आम्ही तयारीला लागलो.. म्हणजे डे ड्रिमींग ला.

एकीकडे रोड ट्रीप चा प्लॅन फायनल करत होतो. लेह ला जनरली व्हाया कारगील श्रीनगर जातात कारण अॅील्टीट्युड हळू हळू वाढते. व्हाया मनाली झटकन उंची गाठली जाते सो तो रस्ता एवढा पॉप्युलर नाहीये. महेशनी पूर्ण प्लॅन बनवला. आमच्या रनिंग ग्रुप मधल्या योगीनीचा नवर उमेश ह्याच्या कडून एच व्ही कुमार ह्यांच्या बद्दल कळलं. ते रोड ट्रिप प्लॅन करुन देतात. ऑन रोड असिस्टंन्स, बुकींग्ज वगैरे. त्यांच्या कडे रजिस्टर केलं.

आमचा रुट आणि प्लॅन असा होता :
४ जुन : ठाणे - चितोड्गढ ( पुढे आम्ही ३ ला दुपारी निघुन नाशिकला बहिणीकडे मुक्काम केला. ४ ला पहाटे लवकर निघालो. त्यामुळे पुढे जास्त अंतर कापता आले.) -
४ जुन- नाशिक- जयपुर अंतर १०१४ किमी
५ जुन - जयपुर -चंदिगढ अंतर ५४७ किमी
६ जुन- आराम ( माझा वाढदिवस होता ) आणि ग्रुप ला भेटणे
७ जुन - चंदिगढ - मनाली अंतर ३१५ किमी
८ जुन- मनाली - जिस्पा अंतर १४० किमी ( इथुन पासेस सुरु होतात )
९ जुन- जिस्पा - सरचु अंतर ८५ किमी ( बर्या पैकी अॅरल्टीट्युन गेन )
१० जुन - सरचु - लेह अंतर २५० किमी.
११ जुन - आराम
१२ जुन ते १७ जुन ट्रेक
१८ जुन आराम, काही लोक परत
१९ ला बाकी लोक परत आणि आमचा परतीचा प्रवास.

ईकडे नवर्याने रोड ट्रिप दरम्यान येऊ शकणार्या अडचणींबद्दल वाचन सुरु केलं. मुख्य प्रॉब्लेम मनाली ते लेह रस्त्यावर येऊ शकला असता., कारण तिथे मदत मिळण कठीण झालं असतं. गरज पडू शकणार्या वस्तूंच्या याद्या करायला सुरुवात केली, आणि फिटनेस वाढवायला पण. मी नियमीत रनिंग, व्यायाम करत होतेच, पण माझ्यापेक्षा नियमीत व्यायाम महेश करतो. त्यामुळे आम्ही फिटनेस फ्रंट वर निर्धास्त होतो. टिकु जी नी वाडीच्या ( ठाण्यातल वॉटर पार्क ) मागे असणार्या नॅशनल पार्क च्या टेकडीवर शनिवारी जायला सुरुवात केली.

नोव्हेंबर मध्ये जिवधन चा ट्रेक केला. ट्रेक सोपा होता, पण एका ठिकाणी १०/१२ फुट उंच सरळ कड्यासारखा भाग चढुन जायचा होता, तिथे चढतांना आणि उतरतांना मी घाबरुन हात पाय गाळले आणि 'भिती' ह्या फ्रंट वर काम करायला हवं हे जाणवलं ( मी तशी धीट आहे heehee... खरचं.. मी एकदा एका गाडीवर दगड पण फेकून मारलाय... heehee पण पाय जमिनीवर टेकलेले नाहीत ह्या अवस्थेची मला फार फार भिती वाटते ).. jivdhan_0.JPG

(चेक चा शर्ट घालून वर चढायचा अयशस्वी प्रयत्न करणारी मी आहे !!!)

ह्या ट्रेक नंतर पहिली खरेदी झाली.. ट्रेकिंग चे शुज.... हे घालून दगड धोंड्यांवरुन चालणं हाच एक व्यायाम आहे., आणि शु लेसेस बांधणं हे दिव्य ! सुरुवातीला चालतांना , आपण रोबो आहोत असच वाटायचं, सरळ उचलून पाय टाकायचा. मग सवयीने जमलं.
shoes_0.jpeg

आता डेकेथलॉन च्या फेर्या सुरु झाल्या. ट्रेक ला आम्हाला डाऊन जॅकेट ( बाहेरुन विंडचीटर, आतुन थोडं उबदार ), फ्लीज जॅकेट ( स्वेटर सारखं, पण जास्त ऊबदार), थर्मल वेअर ( माझ्या कडे एक थर्मल टॉप आणि लेगींग होतेच, एक अजुन घेतले ), ड्रायफीट शर्ट्स, ट्रेकींग पँट्स, थर्मल आणि लोकरी ग्लोव्ज , कान झाकणार्या टोप्या, थर्मल सॉक्स ( आम्ही सॉक्स च्या ५,५ पेअर्स घेतल्या ), २/२ पोलस्टीक्स ( २ आम्हाला मित्रांकडून मिळाल्या ), ट्रेकींग बॅग्ज (ह्या पण मित्रांकडे मिळाल्या ), स्लीपींग बॅग्ज, चालतांना लागणारे सामान ठेवायला छोट्या सॅक्स ( ह्या जे एन एम नी दिल्या ), ट्रेक दरम्यान स्नॅक्स, पाण्याच्या बाटल्या ( आम्ही ३ लीटर चे वॉटर ब्लॅडर (!!!) घेतले.) हे पातळ असतात. त्यांना नळी असते. पाण्याने भरुन ब्लॅडर बॅग मध्ये ठेवायची, ती ट्युब बाहेर काढायची म्हणजे चालतांना न थांबता पाणी पिता येते. ) अॅतन्टी ग्लेअर गॉगल्स, हेड लँप्स, बॅटर्या एवढे सामान लागणार होते.
आम्ही स्लीपींग बॅग्ज, ट्रेकींग पॅंट्स, उन्हाच्या कॅप्स, वॉटर ब्लॅडर आधी घेतले.

डिसेंबर मध्ये घनचक्कर, पाबळगड केला. घनचक्कर महाराष्ट्रातल तिसर्या क्रमांकाच शिखर आहे. हा सोपा होता करायला. पण पाबळगड.... आम्ही सगळे हातीपायी धड परत आलो एवढच सांगीन.

3_0.JPG

4.JPG

5.JPG
(सगळ्यात पुढे आहे श्रीरंग., त्याच्या मागे महेश.)

पुढे मार्च मध्ये हरीश्चंद्र गड केला पण लेकाच्या परिक्षेमुळे मी गेले नाही. दरम्यान टिकु जी चा प्रॅक्टीस ट्रेक, रनिंग व्यवस्थित सुरु होतं

जानेवारी मध्ये मुंबई मॅरेथॉन झाली, आणि मला मोठ्ठा झटका बसला. उजव्या पायात शीन जवळ अचानक दुखायला लागलं. मी १/२ आठवडे दुर्लक्ष केलं मग ऑर्थो गाठला. ब्ल्ड टेस्ट मध्ये व्हिटॅ बी आणि डी एकदम खाली गेल्याचं कळलं. डॉ ने एक महीनाभर व्यायाम, रनिंग सगळं बंद ठेवायला सांगीतलं confused मी वैतागले अर्थात. बी आणि डी वाढवायला गोळ्या सुरु झाल्या. महीना झाला तरी दुखणं कमी होईना. अध्ये मध्ये पायावर सुज येऊ लागली, मग एम आर आय केलं आणि पर्फोरेटेड व्हेन्स असं भारदास्त नाव असलेलं काहीतरी निघालं. ह्यावर स्टॉकींग्ज घालणे हा एवढा एकच उपाय आहे..मग त्याची खरेदी. आणि मी हे स्टॉकींग्ज जास्तीत जास्त ५ वेळा घातले.. सुज आपोआप थांबली.. आता ते तसेच पडून आहेत. डाव्या पायाचा तर पॅक बंद्च आहे. मार्च मध्ये कधीतरी एकदा पूर्वी घेतलेल्या कुपन वर जवळच्याच एका पंचकर्म केंद्रात बॉडी मसाज घेतला. २ केरळी मुली होत्या करायला. त्यांना 'माझा पाय अमुक अमुक ठिकाणी दुखतोय, तर जरा जपून' अस मोठ्या मुश्कीलीनी समजावलं.. आणि त्या मुलीनी काय केल देवाला माहीत पण त्या दिवसानंतर माझा पाय जादू केल्या सारखा दुखायचा कमी झाला. औषधं, आराम का हा मसाज की सगळच... पण मी दुखण्यातून मुक्त झाले ...

एव्हाना एप्रिल संपत आला होता. मध्ये एकदा येऊर हिलच्या मागे 'मामा भांजे' हा ५ तासांचा ट्रेक केला. Mama Bhanje.JPG

एप्रिल च्या शेवटी लेकाला भोसला ला घ्यायला जातांना एकटीच गाडी घेऊन नाशिकला गेले.. ड्रायव्हिंग प्रॅक्टीस.

आता फक्त मे... खरेदी, पॅकींग, प्रॅक्टीस......

टिकु जी ट्रेक ला वर टायगर हील ला जाण्यासाठी अजुन एक रस्ता होता, 'डिफीकल्ट रुट' असा त्याचा तिथे नियमीत जाणारे उल्लेख करायचे. हा रस्ता लांबचा आणि सरळ उभ्या चढाचा एक पॅच असलेला आहे. तिथे आता प्रॅक्टीस सुरु केली. शनिवार्/रविवार एकदा बॅक टु बॅक ३ राऊंड्स मारायचो. १० किमी आणि १४५ मजले एवढं चढणं व्हायचं. बर्याच वेळा पाठीवर पाण्याच्या बाटल्या आणि इतर गोष्टी घेऊन वजन घेऊन चढायची सवय केली. तिसर्या राऊंडच्या अखेरीस अशी अवस्था व्हायची..

tikuji.JPG

एकीकडे ट्रेकींग ग्रुप मध्ये लोक अॅाड डिलीट होत होते.. करता करता १७ जण झाले. मागच्या वर्षीच्या ग्रुप मधले पण ट्रेक पूर्ण न करु शकलेले उर्वशी, अमीत पण जॉईन झाले. पण ह्या १७ पैकी महेश, मी आणि श्रीरंग हेच नियमीत पणे ट्रेक ची प्रॅक्टीस करत होते. बाकी सुनील, संतोष, नचिकेत, ईश्वर, मीनल, उर्वशी, राम अधुन मधुन... बाकीचे तर कधीच नाही... अर्थात सगळे आपापल्या परीने व्यायाम करत होतेच....
we 3.JPG
(मी, महेश आणि श्रीरंग)

दरम्यान आमच्या घरा जवळच्या ट्रेक मेट मधुन मला डाऊन जॅकेट, ग्लोव्ज, कॅप वॉकींग स्टीक घेतल्या.
गाडी साठी पंक्चर कीट, जंप स्टार्ट केबल, टोईंग रोप, व्हॅक्युम क्लीनर, एअर पंप घेतले. निघायच्या आधीच्या रविवारी महेश नी संपूर्ण रविवार नवनित मोटर्स च्या सर्व्हिस स्टेशन मध्ये घालवून गाडीत कुलंट टॉप अप, ब्रेक ऑईल, एअर फिल्टर घेऊन ठेवलं.. गाडीची संपूर्ण सर्व्हिसिंग तिथे ऊभं राहून करुन घेतली.
रोड सेफ्टी साठी मी पेपर स्प्रे मागवला. शिवाय घरातला मीट नाईफ ठेवला.

आता मुख्य गोष्ट.. खाण्याचे पदार्थ. ५ दिवसांचा वॉक आणि एक दिवस समीटचा असं ६ दिवसांसाठी पॅकेट्स करुन घ्यायची असं ठरवलं ( म्हणजे मीच ठरवलं... heehee ) तर रोज अंदाजे ४ तासाच्या वॉक ला २ आणि समीटच्या दिवशी रादर रात्री साठी १० अशी प्रत्येकी २० पॅकेट्स. प्रत्येक पॅकेट मध्ये - १) बदाम अक्रोड ची एक छोटी पिशवी २) खजुर, जर्दाळू,अंजीर ह्यांची एक ३) बेसन लाडू (मी करणार होते) ४) कणीक लाडू (ऑर्डर देऊन) ५) गुळपापडीच्या वड्या (साबा) ६) चॉकलेट्स (मित्राची बायको) ७) एक चीज क्यूब ८) एक एनर्जी बार ९) आणि ड्राईड फ्रुट्स १०) स्नीकर बार हे असणार होतं
ह्या सगळ्यासाठी अजुन एक लिस्ट केली.

मे च्या दुसर्या आठवड्यात मित्राबरोबर क्रॉफर्ड मार्केट ला गेले. ड्राय फ्रुट्स, ड्राईड फ्रुट्स ( ह्यात अननस, स्ट्रॉबेरी, चेरी, संत्र, पीच असे तुकडे वाळवलेले आणि पाकवलेले असतात.. संत्र तर यम्मी लागतं), वेट टिश्यु पेपर्स ( टॉयलेट्स असणार होती पण पाणी नाही... lol ), सन्स्क्रीन आणि मॉईश्चराईजर चे बाटले अस बरच सामान घेतलं.
ड्रायफ्रुट्स वगैरे पॅकींग लेकानी केलं आणि उरलेलं मी.. मला अजुन आठवतय, निघायच्या आदल्या दिवशी रात्री मी शेवटचं पॅकींग करत होते. एक एक खजुर, गुळपापडीची वडी, लाडू फॉईल मध्ये रॅप केलं.. ते तयार पॅकेट्स बघुन मलाच इतकं छान वाटलं
Food packs.JPG

शेवटचा आठवडा.... बर्याच फ्रंट वर काम करायच होतं.. आम्ही नसतांना साबा साबु रहायला येणार होते लेका बरोबर. माझ्याकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाला मावशी आहेत, सो तो प्रॉब्लेम नव्ह्ता. सकाळी भांडी घासायला येणार्या ताई काही ठिकाणी पोळ्यांचे काम करतात , त्यांना पोळ्यांचे सांगीतले. महीनाभर पुरुन उरेल एवढा किराणा भरुन ठेवलासंध्याकाळी खायला चिवडा, शेव असे प्रकार आणुन ठेवले. आम्ही नसतांना कोणाला काही प्रॉब्लेम नको..

लेकाची शाळा जुनच्या मध्यावर सुरु होणार होती. त्याचं दप्तर, युनिफॉर्म, शुज, वह्या, इतर सामान, शाळेची फी... आठवुन आठवुन आणलं. आम्ही नसतांना Sanskrit ची ट्युशन सुरु होणार होती. त्याला रिमाईंड करायला मैत्रीणीला सांगीतलं. त्याच्या डब्याच मोघम शॅड्युल पण साबांना सांगून ठेवलं whew

मोबाईल, क्रेडीट कार्ड्स, लाईट, गॅस, सगळी बिल्स आधीच अंदाजे भरुन टाकली... २/३ चेक्स सह्या करुन साबुंना देऊन ठेवले. अजुन एक काम केलं ( जे महेश च्या मते वाढीव काम होते ). दोघांचे शुज, वॉकींग पोल्स (स्टीक्स), वॉटर ब्लॅडर, गॉगल्स, हॅड लॅम्प्स ह्या सगळ्यांवर नावांची इनिशिअल्स घातली.

आता बॅग पॅकींग. ह्यात आमची बरेच वेळा संयत चर्चा झाली.... lol अनेक पर्म्युटेशन्स, कॉम्बीनेशन्स... बेसीकली आम्ही ठरवल की एकूण ६ बॅग्ज असतील. प्रत्येकी २ ट्रेकींग च्या, ज्या पोर्टर कडे जातील, २ स्वतः कॅरी करायच्या, एक प्रवासी कपडे आणि सामान (रोड ट्रीप साठी )आणि एक प्रवासात लागणारा खाऊ ची सॅक.
आता ट्रेकींग च्या २ बॅग्ज दोघांच्या स्वतंत्र ठेवायच्या की एकात स्लीपींग बॅग्ज आणि खाऊ ठेऊन दुसर्यात कपडे अस बरच ट्रायल घेऊन माझी बॅग आणि तुझी बॅग वेगळीच ठेऊया असं ठरलं.
आम्हाला समीटच्या दिवशी कपड्यांच लेयरींग करायचं होतं. सगळ्यात आत थर्मल., वर ड्राय फीट, वर साधा टी शर्ट, त्यावर फ्लीज, सगळ्यात वर डाऊन.. आणि गरज पडली तर पॉंचो (रेनकोट)... शिवाय २ टोप्या, २ हॅड ग्लोव्ज, ३ सॉक्स एवढा ऐवज चढवुन चालायला लागणार होतं. ईतर दिवशी गरजे प्रमाणे. सो हे सगळे प्रकार नीट पिशव्यांमध्ये सेग्रीगेट करुन ठेवले. खाऊ पण दोघांचा वेगवेगळा ठेवला.
आता महत्त्वाचं.. औषधे. त्याचेही २ पॅक केले.. सॅरीडॉन, पॅरासिटेमॉल, क्रोसीन, पुदीन हरा, बी क्वीनॉल, ईज्गॅपॅरीन, कापूर आणि अती महत्तवाची डायमॉक्स.... कानात घालायला कापूस पण प्रत्येकी २० तुकडे असा नीट कापून घेतला.
कॉमन पॅक मध्ये वोलीनी, सेप्टीलीन, मेडीकेटेड टेप, खोकल्यावरच औषध, कात्री, विरळ हवेत घ्यायच्या होमिओपॅथीक गोळ्य आणि थकव्यावरचं एक होमीओपॅथी च औषध.. हे घेतलं.
माझ्या पुढे १ मोठा प्रश्न होता.. पिरीएड्स.. नेमका ट्रेक सुरु करायच्या दिवशीची तारीख होती. १२ जुन. मी ९ पर्यंत वाट पहायचं ठरवलं. मग गोळ्या.. शिवाय नेट वरुन पी बडीज मागवलं.. ते ही अजुन तसचं पडून आहे. वापरायची गरज पडली नाही.

आणि आमचं पॅकींग झालं.... रेडी टु गो नाऊ.
Bags.JPG

ह्या ट्रेक मध्ये माझ्या दॄष्टीने एकच काळजीची बाब होती, ए एम एस ( अॅ ल्टीट्युड माउंटर सिकनेस)... त्याच्या बद्दल आणि आमचे ट्रेकींग बडीज, प्रवास ह्यांबद्दल पुढच्या भागात....

/* */ //