प्लास्टिक चा पैसा-धडा १.१: ऑनलाईन शॉपिंग आणि पेमेंट गेटवेज

डिस्क्लेमरः
१. या लेखात आयसीआयसीआय बँक आणि अमाझॉन चे प्रमोशन केलेले नाही.माझा अकाऊंट या दोन्ही वर आणि स्क्रिनशॉट घेणे सोयीचे या एका कारणा खातर हे दोन ब्रँड वापरले आहेत.तुम्ही भरवश्याच्या झुमरीतलैय्या.इन वरुन शॉपिन्ग करुन भरवश्याच्या टिम्बक्टू बॅन्केने ऑनलाईन पे करु शकता.
२. हा लेख 'ऑनलाईन शॉपिन्ग' अडिक्शन ची भलामण करत नाही.

पेमेंट गेटवेजः
समजा तुम्ही एक मोठी शॉपिन्ग साईट चालवताय.दिवसाला ५००० लोक तुमच्या साईट वरुन खरेदी करतात.किंवा तुम्ही एक मोठी यंत्रणा आहात.एम एस इ बी सारखी. तर तुम्हाला प्रत्येक युजर ने तुमचा अकाऊंट अ‍ॅड पेयी करणे, त्यात त्याना हजार अडचणी येणे, त्यांनी 'जाउदे फारच चिकट प्रकार आहे, नाही घेत' म्हणणे परवडेल का?
अश्या मोठ्या साईट्स आणि त्याची तुमच्या आमच्या सारखी गिर्‍हाईके यातला पूल म्हणजे 'पेमेंट गेटवे'.
या साईट कडून काही फी घेऊन निरनिराळे पेमेंट गेटवे सुरक्षित पेमेंट सोपी करुन देतात.

म्हणजे, मी काही खरेदी केली.नेट बँकिन्ग ने पे करायचे ठरवले.तर:
१. पहिले मला माझी बँक यादीतून निवडावी लागेल.
२. मग पेमेंट गेटवे माझ्या बॅन्क ची ऑनलाईन बॅन्किन्ग ची साईट उघडून देईल.
३. त्यावर लॉगिन केल्यावर देय रक्कम(तुम्ही जी पे करणार आहात ती) तिथे आपोआप लिहून आलीय.
४. पुढच्या पायर्‍या ऑनलाईन पेमेंट सारख्याच.लक्षात घ्या, इथे फक्त तुम्ही त्या साईट चा अकाउंट नंबर पेयी म्हणून अ‍ॅड करणे, ३० मिनिट थांबणे हा किचकट भाग पेमेंट गेटवे च्या मध्यस्थी मुळे वाचला आहे.

खाली स्टेप बाय स्टेप एक खरेदी करुन दाखवते.नेट बॅन्किन्ग पे.
१. वस्तू निवडली, कार्ट मध्ये टाकली आणि बाय नाऊ वर क्लिक केले.
netbankingpay.png

२. बँक निवडली.
netbankingpay2.png

३. ऑर्डर काय आहे ते तपासून घेतलं.
netbankingpay3.png

४. प्लेस युवर ऑर्डर अ‍ॅन्ड पे क्लिक केल्यावर तुमच्या बॅन्क ची ऑनलाईन साईट आपोआप उघडली.
netbankingpay4.png

५. तुम्ही काय पे करणार आहे हे तुम्हाला दिसलं.
netbankingpay5.png

६. सर्वात महत्वाची पायरी: तुमच्या डेबिट(एटीएम) कार्ड च्या मागे ग्रिड वर काही अक्षरं आणि त्या अक्षराखाली आकडे आहेत. तुम्हाला ठराविक ३ अक्षरांखालचे आकडे बघून इथे टाकायचे आहेत.
netbankingpay6.png

७. बरोबर आकडे टाकून ओके केल्यावर तुमचे पेमेंट झालेले आहे.आता शांत बसा.काहीही क्लिक करु नका.आता तुम्ही बॅन्क च्या राज्यातून बाहेर पडून परत मेन साईट च्या राज्यात याल.तिथे एक मेसेज रुपी दूत तुम्हाला तुमची खरेदी यशस्वी झाली किंवा गंडली हे सांगेल.
netbankingpay7.png

सावधगिरी:
१. आपले डेबिट कार्ड आणि फोन दोन्ही एका वेळी एका चोराला चोरु द्यायचे नाही. biggrin biggrin
एक एक वेगवेगळ्या वेळी चोरले तर चालेल.
२. इथे ऑनलाईन पे फेल गेल्यास घाबरायचे नाही.पैसे एकतर पे होतील किंवा तुमच्या कडे परत येतील.मध्ये तरंगणार नाहीत.
३. कोणालाही (मोदी आले तर त्यांनाही) डेबिट कार्ड ची फोटो कॉपी/फोटो/स्कॅन घेऊ द्यायचे नाही.'तुम्ही कशाला कष्ट घेता, मी माझ्या मोबाईल वर स्कॅन करतो, कॉपी आणून देतो' याला 'नाही' म्हणायचे.एकदा वस्तूची सॉफ्ट कॉपी बनली की ती कुठेही फॉरवर्ड होऊन त्याच्या हजार फोटो कॉपी निघू शकतात.अगदी नवरा/मुलगा/मुलगी/भाऊ/बहिण याना दिली, त्यांनी मिसयुज नाही केली तरी त्यांच्या फोन वर फिशिंग सॉफ्टवेअर आले तर माहिती चोरी होऊ शकते.
४. कोणाला फोटो कॉपी दिल्यास त्यावर पेन ने 'हॅन्डेड ओव्हर टु <देणार अहे त्याचे नाव> फॉर पर्पज <अड्रेस प्रुफ वगैरे> ऑन <तारिख>' असे लिहून द्यावे.'आम्हाला हे असे लिहिलेले चालणार नाही' असे उत्तर मिळाल्यास शांतपणे 'मग १ दिवस थांब, मी घरातल्यांशी डिस्कस करुन तुला देते' सांगावे. 'अती घाई संकटात नेई'. घाई करणार्‍याला 'जा मेल्या मंगळयान सोडायला, मी थांबते' असं मनात म्हणावं.
५. ऑनलाईन व्यवहारांची दहशत घेऊ नका!!! खतरा तो बेड पर सोने मे भी है.नींद मे हार्ट अटॅक आ सकता है. घाबरु नका.यातल्या सोयी लक्षात घ्या.धोके टाळायला शिका.

होमवर्कः
१. कोणत्याही शॉपिन्ग साईट वरुन नेट बॅकिन्ग पे करुन ९९ रु ची वस्तू विकत घ्या.
२. तुमच्या पोस्टपेड मोबाईल चे एकाच महिन्याचे बिल ऑनलाईन बॅन्किन्ग ने भरायचा प्रयत्न करा.

हॅप्पी अँड सेफ ऑनलाईन पेमेण्ट्स!!

-अनुराधा कुलकर्णी

/* */ //