लाल बत्ती एक्स्प्रेस गोज टू एडिंबरा

कवीता होस्मानीला लहानपणा पासून सूफी गायिका व्हायचं होतं पण आजपर्यंत तिला नशिबाने तशी संधी दिली नाही. चार वर्शाची असताना तिचे वडील वारले. आई कामाठीपुर्‍यात वेश्या व्यवसाय करत असे. कविताने अगदी लहानपणापासून जीवनाची कृर बाजू अनुभवली आहे. आणि आता ती व तिच्या १४ मैत्रीणी आपले अनुभव एडिंबरा फ्रिंज फेस्टिवल मध्ये जगाला सांगत आहेत. कोणताही अभिनिवेश नाही. ना लोकांकडून दयेची अपेक्षा. त्यांच्या जीवनकथा आहेत व त्यात त्यांची काहीच चूक नाही जसे आहे तसे ऐकवत आहेत.

क्रांती ही समाजसेवी संस्था कामाठी पुर्‍यातील वेश्यांच्या मुलींचे जीवन मार्गी लावण्याचे काम करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पंधरा ते बावीस ह्या वयोगटातील पंधरा मुली एडिंबरा मधील चर्च मध्ये फ्रिम्ज फेस्टिवल मध्ये आपला लाल बत्ती एक्स्प्रेस हा शो करत आहेत. त्याच बरोबर ही लाल बत्ती एक्स्प्रेस पूर्ण ब्रिटन मध्ये फिरणार आहे. कम्युनिटीजसाठी शोज करणार आहे. काही शोज तेथील वेश्यांसाठी ही आयोजिले आहेत.

काही मुली स्वतः मानवी शरीर व्यापाराच्या बळी आहेत. त्यांची जीवन कथा एका ट्रेनच्या फॉर्मेट मध्ये सांगितली जाते लाल बत्ती एक्स्प्रेस कार्यक्रमात. जीवनातले वेगवेगळे प्रसंग व फेझेस ही स्टेशने घेत लालबत्ती एक्स्प्रेसने प्रथम लंडन मध्ये प्रयोग केला व मग फ्रिंज मध्ये. कविता म्हणते," यूके मधल्या वेश्याना भेटून एकदम वेगळे वाटले. अमेझिंग एक्स्पीरीअन्स!! काहींना शरीर सूख घ्यायला आवड्ते तर काही ह्या धंद्यात दबावाखाली आलेल्या आहेत. आमचे स्ट्रगल सारखेच आहे."

सोळा वर्शाची राणी इतकी गोड हसते. पण ती आत्ता आत्ताच हसायला शिकली आहे. ती अकरा वर्शाची असताना राणीचे वडील वारले. काही तासांतच तिच्या वेश्या व्यवसाय करणार्‍या आईने दुसरा पुरू,ष घरी आणला व हा आता तुझा बाप असे तिला सांगितले. हा त्या दोघींना कायम मारहाण करत असे. राणी पळून क्रांतीने चालवलेल्या हॉस्टेल कम शेल्टर मध्ये राहायला आली.

"मला आता आई व सावत्र बाबांबद्दल राग येत नाही. पूर्वी येत असे. पण ती देखील माणसेच आहेत.जगायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना क्षमा केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही हे मला समजले आहे." राणी म्हणते.

लालबत्ती एक्स्प्रेस वेश्यांचे, त्यांच्या मुलांचे नुसते अनुभव जगासमोर आणत नाहीये तर समाजात वेश्यांबद्दलचे जे स्टीरीओ टाईप्स आहेत ते बदलायचाही प्रयत्न करत आहे. थिएटर मध्ये काम करून
मुलींना आत्मविश्वास मिळतो व वाढतो. त्यांचा जो छळ झाला आहे त्यातून बाहेर पडायची शक्ती त्यांना ह्यातून मिळते. एका ९ वर्शाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. थिएटर थेरपीच्या एका सेशन मध्ये तिला समजा तू नाही नको म्हणू शकली असतीस तर काय झाले असते असा विचार करायचे क्लासवर्क दिले गेले. ह्या व अश्या थेरपीतून त्यांची बॉडी इमेज व सेल्फ इमेज रीस्ट्रक्चर करायचा प्रयत्न आम्ही करतो असे रॉबि न चौरासिया ( ३२) ह्या क्रांतीच्या फाउंडर ह्यांनी विदीत केले. थिएटर मुळे त्यांना आपल्या भावना तपासून बघायची एक आगळी संधी मिळाली आहे.

आठ वर्शाच्या अश्विनी मानेला तिच्या वेश्या व्यवसाय करणार्‍या आईने ख्रिश्चन हॉस्टेल मध्ये पाठवले.
पण तिला तिथे राहायला अवघड जात होते. फारच कडक कारभार!! ती ही तिथून पळून क्रांतीमध्ये राहायला आली. यूके मध्ये तिला अने क थिएटर पर्फॉर्मन्सेस बघायला मिळाले. मुलींची क्षितीजे विस्तारली आहेत. मुली पुढचे शिक्षण घ्यायला इंग्लंड युरोप अमेरिकेत जाणार आहेत.

लालबत्ती एक्स्प्रेस ग्लासगो व एलजिन मध्ये पण प्रयोग करणार आहेत. सर्व ट्रिप क्राउड फंडेड आहे. व त्या एअर बीएन बी मध्ये राहात आहेत. एडिम्बरात त्यांना १२ पाउंड मध्ये २० दिवस राहाय्चे एअर बीएन बी डील मिळाले. रॉबिन मॅडम हसून म्हणाल्या.
========================================================

हा लेख २७ ऑग स्टच्या इंग्रजी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झाला आहे. मी अनुवाद केला आहे.

माझ्या मुलीने कॉलेजच्या प्रॉजेक्ट चा भाग म्हणून मुलींच्या ट्रिपची तयारी करणे व त्यांची सर्व बुकींग्ज करणे परदेशातले इवेंट्स त्यांना बघाण्या योग्य असे शोधून बुकींग करून देणे इत्यादी कामे केली आहेत. मे महिन्यात ट्रिपची पूर्व तयारी झाली. तिला ही एक वेगळा अनुभव मिळाला. मलाही माझ्या धावपळीला काही अर्थ आहे असे वाटले.

विशिन्ग ऑल द बेस्ट टू क्रांती अँड द लालबत्ती एक्स्प्रेस.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle