नवजागर २०१७ : स्त्री शिक्षण आणि संघर्ष

१५ सप्टेंबरला माझ्या भाचीचा आम्हा सगळ्यांना मेसेज होता - You all shall be wishing me on this day after 4 years. Thank you all in advance

यंदा ती उत्तम मार्कांनी बारावी पास झाली. इंजिनियरींगला जाण्याची तिची प्रबळ इच्छा होती, एन्ट्रन्सला मार्कही चोख होते पण तरीही तिथे प्रवेश घेण्यासाठी पालकांची मान्यता मिळवायला तिला संघर्ष करावा लागला.

तिच्या पालकांच्या मते इंजिनियरींग करणं आणि त्यात करीअर करणं तिला शारीरिकदृष्ट्या झेपणार नाही. शॉपफ्लोअरवर मुलींना उभं राहणं कठीण असतं. पुरुषी वर्चस्वाशी खूप कठीण सामना करावा लागतो आणि मुलगी म्हणून एक पाऊल नेहमीच मागे घ्यावं लागतं.
भाचीने मात्र पालकांचे सगळे मुद्दे वाद न घालता, हट्टीपणा न करता नीट शांतपणे खोडून काढले. इंजिनियरींग म्हणजे फक्त शॉपफ्लोअर असं नाहीये, पुरुषी वर्चस्वाशी सामना तर कुठल्याही क्षेत्रामधे मला करावा लागणारच आहे आणि मी मुलगी आहे म्हणून माझं पाऊल कधीच मागे घेणार नाही.
तिचा आत्मविश्वास जबरदस्त आहे, त्याबद्दल तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
पालकांच्या विरोधामागे लेकीप्रती वाटणारी काळजीच होती हेही कबूल आहे पण इतकी वर्ष झाली तरी अश्या मानसिकतेतून आपण पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही आहोत ह्याची खंत वाटते. मुलींना करीअरच्या वाटा निवडताना त्यांची इच्छा असली नसली तरी अजूनही लग्न, संसार, मूल ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
पुर्वीच्या काळी स्त्रियांसाठी नर्सिंग, डॉक्टरकी, शिक्षकी पेशा इथवर मर्यादित असलेली क्षेत्र पुढे पुढे स्टेनो, टायपिस्ट, चटपटीत रिसेप्शनिस्ट, प्रोफेसरपर्यंत पोचली तरी त्याचा आवाका ऑफिस मॅनेजमेंट, संशोधक इथपर्यंतच राहिला. एम आर, इलेक्ट्रिकल चीफ इंजिनियर, रेल्वे मोटरमन, पायलट, सिग्नलिंग हेड अश्या पदांवर स्त्रिया खूप अभावाने पाहायला मिळतात. आर्मी नेव्हीमधे प्रवेश मिळाला तरी तिचं स्थान अजूनही दुय्यमच आहे.

१५ सप्टेंबर या 'इंजिनियरींग डे' च्या निमित्ताने लोकसत्तामधे दोन खूप सुंदर लेख प्रकाशित झाले होते, त्याची लिंक इथे देत आहे.

अभियांत्रिकीच्या वाटेवर..

मेळ बुद्धी आणि कर्तृत्वाचा!

इंजिनियरींग डेच्या निमित्ताने आपल्यातल्या सगळ्याच इंजिनिअर्सना अनेक उत्तम शुभेच्छा!
आपल्यातल्या मैत्रिणींना; फक्त इंजिनियरींगच नाही, तर तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडण्यासाठी किंवा ह्या क्षेत्रामधे स्थिरावण्यासाठी काही संघर्ष करावा लागला असेल तर तो वाचायला नक्कीच आवडेल.

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle