टुमदार बंगली

टुमदार बंगली
टुमदार बंगलीच्या - प्रवेशदारी कमान
बोगनवेल झुकली - मग उंचावते मान
मधुमालती चढली - नक्षीदार जाळीतून
निळी-पांढरी गोकर्ण - टवकारती कान
कुंपणावरील कोरांटी - कां करते तणतण
गुलाबकळी हसली - तेवढ्यात खुदकन्
आत टाकलं पाऊल - लाजवंतीस चाहूल
लाल पिवळी कर्दळी - न् लाललाल जास्वंदी
बोलेल कशी तगर - खुणावेल ती अबोली
चमेलीच्या अंबराला - पानाफुटीची झुंबर
गारवेलीचा गार वारा - खाली चिमणा पसारा
चाफा कां झाला अस्वस्थ - उभा प्राजक्त तटस्थ
गाणे गाई कुंदकळी - गोफ गुंफी गुलबाक्षी
मुरडता चाफेकळी - पारिजात होई साक्षी
जाई-जुई बहिणींनी - गणेश वेल धरली
विजयात रातराणी - निशिगंधी विसावेल

विजया केळकर _______
bandeejaidevee blogspot.com

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle