भरलेली कोंबडी

भरलेली कोंबडी

साहित्य:

१ कोंबडी
१ मोठा चमचा आले - लसूण पेस्ट
अर्धा कप दही
१ वाटी ओले खोबरे
२ चमचे तीळ + १ मोठा चमचा खसखस (भाजून पूड करावी)

(२ कांदे,
५ - ६ मिरच्या,
१ इन्च आल्याचा तुकडा,
१० - १२ लसूण पाकळ्या,
१ जुडी कोथिंबीर) हे सर्व बारीक चिरून घ्यावे.

अर्धा कप काजूचे तुकडे
पाव कप बेदाणे,
२ मोठे चमचे तिखट
अर्धा चमचा हळद
१ चमचा गरम मसाला पावडर
अर्धा वाटी सुके खोबरे
१ कप तेल / तूप
२ लिंबांचा रस
मीठ.


क्रमवार पाककृती:

कोंबडीची स्किन काढून कोंबडी स्वच्छ धुवावी. नंतर आले लसूण पेस्ट, मीठ आणि दही लावून अर्धा तास तरी ठेवावे.

सुके खोबरे भाजून घेऊन गरम मसाला घालून बारीक वाटावे. हे वाटण कोंबडीच्या आतल्या भागाला लावावे.

पातेल्यात तूप / तेल गरम करून त्यात ओले खोबरे, खसखस + तीळ पूड, बारीक चिरलेला कांदा, लिंबूरस, काजू, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, बेदाणे, हळद, मीठ घालून चांगले परतावे. हा मसाला थंड झाल्यावर कोंबडीत भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोरा बांधावा.

शेवटी तूप / तेल गरम करून बाहेरच्या बाजूने कोंबडीला लावावे. ओव्हनमध्ये ठेवून ४०० डिग्री वर ४५ मिनिटे ते १ तास बेक करावी. जाड बुडाच्या पातेल्यात गॅस वर सुद्धा भाजता येईल.

बेक करताना रॅकवर लावून मग ट्रेमध्ये ठेवावी आणि सुरुवातीला वरुन फॉइल लावावी. ट्रेमध्ये पडलेलं पाणी नंतर वरुन चिकनवर घालावं. वरुन बटरही घालू शकता.
शेवटी फॉइल काढून थोडावेळ ब्रॉइल करावी.

वाढताना सुरीने चकत्या करून कांदा, टोमॅटो चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर द्यावी.

एक मध्यम कोंबडी चार लोकांना पुरेल.


अधिक टिपा:

कोंबडी शक्यतो फ्रीझ केलेली नसावी. असेलच तर भरण्यापूर्वी कोंबडी पूर्ण thaw केली पाहिजे. फ्रीजर मधे असेल तर बाहेर काढून साधारण रुम temperature ला आल्यावर फ्रीजमध्ये ( फ्रीजर नाही) ठेवावी. मग भरण्यापूर्वी पुन्हा बाहेर काढावी. खूप थंड असेल तर स्किन काढायलाही त्रास पडतो. कोंबडीच्या आकारावर पण वेळ कमीजास्त होऊ शकतो. roasting chicken मोठी असते. fry करायची मिळते ती जरा लहान असते. हवे असल्यास ब्राईन (मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवणे, कोंबडी पाणी शोषून घेते आणि ज्यूसी होते.) करावी.

जेवायच्या २ तास आधी oven मधे ठेवली तर वेळेवर व्हायला हरकत नाही. फार आधीही ठेवू नये नाहीतर थंड होते.

या पदार्थाबरोबर पांढरा रस्सा(मटण किंवा चिकन) आणि जीरा पुलाव हा मेनू लोकांना आवडतो.

thxgchick1.JPG

Thanksgiving साठी स्ट्फिन्ग वेगळे करु शकता. ट्रॅडिशनल टर्कीचे फिलिन्ग किंवा मग इतर हवा तो मालमसाला, द्राक्षं इ. फळं वगैरे घालू शकता.

Thanksgiving तोंडावर आलाच आहे, त्यानिमित्तानं ही रेसिपी इथं आणली.
गुरुवारी हाच नेहमीचा मेनू आहे, जमल्यास प्रोसेसचे फोटो काढीन.

हा कालचा फोटो- टर्कीपण दिसतेय.
DSC_1600.JPG

हॅप्पी Thanksgiving!

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle