अळीव लाडू

अळीवाचे नारळाच्या पाण्यात भिजवुन , खव लेल्या नारळात शिजवून करतात . हे ला डु टिकण्यासाठि फ्रिज मधे ठेवावे लगतात.हा एक वेगळा प्रकार करुन पहा. खरं तर आरोग्यासा ठी बारमाही करायला हरकत नाही. वाढत्या वयाच्या मुलांना ,व्रुद्धांना आणि आपल्यासाठी हि गुणकारक आहेन्त. रुतुमाना प्रमाणे काही जिन्नसात फेर- फार केला तर वर्षभर ही करता येतील.
साहित्य : अळीव २०० ग्राम
खारीक पूड २०० ग्राम
डिन्क पाव वाटी
कणिक २ वाटी
बेसन १ वाटी
नाचणी १ वाटी
वेलची पूड
तूप २५० ग्राम
गूळ पावडर / किसलेला गूळ ३०० ग्राम
कृती : १)अळीव बोटशेके , तळहाताला गरम लागतील इतपत भाजुन त्याची मिक्सर मधे पूड करून घ्या.
२) चार चमचे तूपात डिन्क तळून घ्या . त्याची मिक्सर मधे थोड्या भाजलेल्या पिठाबरोबर ( १-१ चमचा ) पूड करुन घ्या
३) कणिक ,बेसन ,नाचणी पिठ तूपावर खरपुस भाजुन घ्या.
४) अळीव, डिन्क, खारीक , कणिक- बेसन - नाचणी पिठड, वेलची पूड, गूळ एकत्र करा .
मिश्रण कोरडे वाटले तर अगदी थोडे गरम दूध घाला.( पाव किंवा अर्धी वाटी ) गूळ विरघळेल आणि लाडु वळता येईल.
आता ह्यात बदल करता येतील .. कणिक खपली गव्हाची घेता येइल, ज्वारी चे पिठ, सोयाबिन पिठ, किनवा भाजुन , राजगिरा भाजुन त्याचे पिठ .
थंडी नन्तर डिंक मेथी पू ड वगळ ले तरी चालेल. मुलांना नको असते. खारीक पूड मात्र हवीच.
खजूर , खोबरे ही चालेल.
ड्राय फ्रुट —- बदाम - काजू— चारोळी असले- नसले तरी चालतील.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle