संडे हो या मंडे, रोज खाये अंडे!

मी अंडी आॅलमोस्ट रोज खाते. माझे तीन चार प्रकार आहेत.

१) नेहेमीचे देसी आॅमलेट: कांदा, मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचा. त्यात अंडी फोडून घालायची. मीठ घालयचे. सगळं नीऽट फेटायचे. मग त्यात एक चमचा दुध घालायचं. आणि तेल लावलेल्या तव्यावर घालायचे आॅमलेट. चालत असेल तर वरून चीज. दोन्ही साईडने भाजायचे. (जो काही बरोबर शब्द असेल. भाजणं नाही बरोबर वाटते.) एनीवे हे झालं की दोन ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या. त्यातल्या एकाला मॅगी हाॅट न् स्वीट साॅस लावायची. आॅमलेटचे चार भाग करायचे. ९०डीग्री कोन असलेला भाग ब्रेडच्या बाहेरचा काटकोनात ठेवायचा. असे चारी भाग चार साईडने ठेवायचे. मग दुसरी स्लाईस ठेवून चौकोनी ब्रेडचे मधे कापून त्रिकोण करायचे. (I like my omelette bread aesthetically pleasing! :) )

2) कांदा व सिमला मिरची बारीक चिरायची. त्यात अंडी फोडून मिक्स करायची. मीठ व मिरपूड घालून वरच्यासारखी इतर कृती.

३) पहील्या मुद्द्यातले कांदा कोथिंबीर तसेच घ्यायचे. मिरची ऐवजी पावभाजी मसाला. बाकी सेम.

४) रीपीट रेसीपी क्र २. फक्त कांदा सिम च्या ऐवजी गाजर मका मटार बीन्स घेवडा ह्या भाज्या घ्यायच्या. बाकी सेम. (घरात असले तर मश्रुमही ॲड करते)

५) रेसिपी ४ घेऊन त्याचे आॅमलेट करण्याऐवजी मफीन पॅनमध्ये घालून ब्रेकफास्ट मफीन्स करते.

६) हाफ फ्राय: तेल लावलेल्या गरम तेलावर डायरेक्ट अंडी फोडून घालते. वरून मिर्पूड व मीठ शिंपडते. चीज शिवरते. खऱ्या हाफ फ्राय मध्ये एकच साईड तळायची असते. पण मला तसे कधीच आवडले नाही. सो मी दुसरी साईड पण तळते. आणि मी बलक सुरीने फोडून त्यात चीज घालते. मला असंच आवडतं. बलक गोल राहीला की शिजायला वेळ घेतो, तेव्हढ्यावेळात पांढरा भाग जास्त तळला जातो.

७) फ्रीटाटा: बटाट्याची काचऱ्या भाजी करून वर अंडी फोडून शिजवते. फार पोटभरीचे होते.

अंडा करी व भूर्जी हे प्रकार पण आहेत. पण मला फारसे ते आवडत नाहीत. मी हे वर दिलेलेच करत असते.

** अंडी शिजवण्याकरता तवा कडकडीत तापलेला हवा. कुठेतरी वाचलेले उगीच डोक्यात राहीले आहे. की अंडी सात मिनिटं तरी शिजवावीत.

तुम्ही पण लिहा तुमच्या अंड्याच्या रेसिप्या. (रेसिप्या तुमच्या. अंडी कोंबडी, शहामृग, डायनासॉर इत्यादीची)

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle