मदतीसाठी आवाहन.

मैत्रिणींनो,
आमच्या अतिशय जवळच्या कुटुंबातली ९ वर्षाच्या चिमुरडीच्या तातडीने करायच्या हृदय प्रत्यारोपणासाठी मदत हवी आहे.

नाव: रेवती महेंद्र देशपांडे वय: ९ वर्षे
राहणार: जुन्नर, जिल्हा पुणे
आजार: Myocarditis (कमकुवत हृदय)
उपचार: Heart Transplant (हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया)

रेवती जन्मत: हृदयरोगाने ग्रस्त आहे. ती तीन वर्षांची असताना तिच्यावर BAV surgery (हृदयातील वॉल्व्हसंदर्भात शस्त्रक्रिया) करण्यात आली. गेली पाच वर्षे तिची प्रकृती उत्तम होती. परंतु सप्टेंबर २०१७ मध्ये तिच्या हृदयाला fungal infection झाले. यामुळे तिच्या हृदयाची क्षमता केवळ १२ टक्के इतकी खालावली होती. गेले तीन महिने उपचार करूनदेखील तिच्या हृदयाची क्षमता वाढू शकलेली नाहीये. तिची प्रकृती झपाट्याने खालावते आहे.

अशा वेळी नवीन हृदय बसविणे हाच उपाय असल्याचे Ruby Hall Clinic येथील तिच्या डॉक्टरांचे(Dr. M Durai Raj) मत आहे. आणि ही शस्त्रक्रिया तातडीने, प्रत्यारोपणासाठी हृदय मिळाल्यावर लगेच करणे गरजेचे आहे.
रेवतीची medical history इथून डाऊनलोड करून बघू शकता.

कौटुंबिक पार्श्वभूमी:
रेवतीचे कुटुंब सात जणांचे आहे. आई, वडील, दोन धाकटी जुळी भावंडे आणि आज्जी-आजोबा. या कुटुंबात कमावता हात एकच म्हणजे रेवतीचे वडील महेंद्र देशपांडे. ते जुन्नर तालुक्यातील देवळे या दुर्गम गावी माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत.

आजाराची माहिती:
गेल्या तीन महिन्यात तिच्या उपचारांवर जवळपास ३ लाख आधीच खर्च झाले आहेत. आता, या कुटुंबासाठी शस्त्रक्रियेचा २५ लाख रुपये इतका खर्च केवळ आवाक्याबाहेरचा आहे. अशा वेळी तुम्ही आम्ही पुढे होऊन जमेल तितकी मदत करून तिच्या वैद्यकीय उपचारांसाठी हातभार लावू शकतो. सध्या मिळेल तिथून गोळा करूनही फक्त ५० हजार रुपये जमा झाले आहेत. इतर ठिकाणी कुठून मदत मिळू शकते, याची ते चौकशी करत आहेत. तुम्हाला माहिती असल्यास अशा संस्था किंवा व्यक्तींबद्दल इथे कळवा.

सध्या जमा झालेली मदत : 22 लाख 25 हजार रुपये.

आपण मदत थेट तिच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवू शकता.
Bank account number: 20167640758
Account holder’s name: Revati Deshpande
Bank name: Bank of Maharashtra Branch: Junnar
IFSC code: MAHB0000623
Swift code: MAHBINBBIFP
MICR code: 410014002

वडील (महेंद्र देशपांडे) यांच्याशी संपर्कासाठी माहिती:
फोन क्रमांक : 9881485854
इमेल : mahendradeshpande614@gmail.com
Whatsapp क्रमांक : 9763487849
facebook account https://www.facebook.com/mahendra.deshpande.5686
फेसबुक पेज : https://www.facebook.com/revatiHeart/
घराचा पत्ता: जगदीश भवन, शिवनेरी किल्ला रस्ता, बारव गैस गोडाऊन जवळ, जुन्नर, जिल्हा पुणे, पिनकोड 410502
Address: Jagdish bhavan, Fort Shivneri road, Near Barav gas godown, Junnar, Pune - 410502

याशिवाय, काही शंका असतील तर इथे विचारू शकता, किंवा मला संपर्क साधला तरी चालेल.

तळटीप : मैत्रीण.कॉमचा आर्थिक व्यवहारात काही संबंध नाही. ही पोस्ट केवळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम आहे.

/* */ //