कुंचला

कुंचल्यातून रेखाटलेस तू मला जेव्हा
रंगही सजीव झाले खरे तेव्हा

कुंचल्यातून झरता ते ओघळते रंग
आकारलेस प्रत्यही तू अंग-अंग

आनंदालास पाहून तू , रेखिलेली कलाकृती
अभिमानी तुझ्या मनाला , शिवलीच नाही माझी प्रकृती

चित्र जाहले अनुपम मात्र छटा एक राहिली
अंतरंगी भेदून माझ्या जी अभंग वाहिली

अज्ञातच राहिलास तू कोरडा चित्रकार
तुला कसले कळणार अंतरंग नि कसला आकार

चित्र जमले खरे तुला , वेदना अस्पर्श राहिली
अंतरंगी उमळती ज्वाला , दिठीपार ना तू पाहिली

कसला धरतोस अभिमान निर्जीव कलाकृतीचा
कुंचल्यात नाहीच सामावणार हा पदर शतवृत्तींचा

धजू दिलास कुंचला अन रेखिले अवचित मला जरी
राहू देत नयन मात्र , जे न कळले तुला कधी

शतआकाशांचे तेज, दु:ख , आकळ त्या नजरेत
इवल्याश्या कुंचल्यातून तुझ्या नाहीच ते अभिप्रेत

असुदे आठव तुला सदोदित त्या धगीचा
शोधल्यास आकळेलही अर्थ ज्वालाग्रहीचा

देवयानी गोडसे

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle