हैद्राबाद - भटकंती/खरेदी/खादाडी/संस्कृती /सण

मैत्रीणींनो, इथे आपण आंध्रप्रदेशातील जवळपासची फिरण्याची ठिकाण, ईथली संस्कृती, बोली भाषा, सण, इथली फेमस खादाडी ह्याबद्दल लिहू या.

कसे पोहचणार??
विमानसेवा आहेच सोबत ट्रेन्स आणि बस सेवा ही आहे. पुण्याची शताब्दी एक्सप्रेस मला खूप आवडते पण अजून त्याने जाण्याचा योग नाही आला आहे. ती सकाळी ६ ला पुण्यावरून सुटते आणि दुपारी अडीच ला सिकंदराबाद. हुसेनसागर ह्या ट्रेनच आणि माझ खूप जवळच नातं आहे. ह्या ट्रेननेच नेहमी प्रवास असतो. अजून बर्‍याच ट्रेन्स मुंबईवरून आहेत ज्यांचा पुणेला हॉल्ट असतो.

भटकंती कोणत्या महिन्यात कराल??
इथे पाऊस मुबंईसारखा धबाधबा कोसळत नाही त्यामूळे जून ते सप्टेंबर हे महीने ही भटकंतीसाठी मस्त. ऑक्टोंबर हीट इथेही जाणवते त्यामूळे हा महीना इथे फिरायला योग्य नाही तसेच मार्च ते मे इथे भयंकर उन्हाळा असतो त्यामूळे तेव्हा ही फिरायला योग्य नाही. जून महिन्यात हवामानानुसार गर्मी/ थंडावा असतो.

रमजान ईदच्या दरम्यान भटकंती सर्वात मस्त कारण तेव्हा चारमिनाराला खूप व्हरायटीज आलेल्या असतात. तसेच ज्यांना हलीम खायची ईच्छा असेल त्यांना त्याचा आस्वाद ह्या काळात घेता येतो. तेव्हाच इथलं वातावरण खूप वेगळ असत.

जानेवारी आणि फेब्रुवारी मिड पर्यंत आलात तर नुमाईश /नामपल्ली एक्सीबीशन बघायला मिळेल. त्यासाठी एक दिवस वेगळा ठेवावा लागेल. खूप मोठ प्रदर्शन असत.

थंडी ही खूप छान असते त्यामूळे तेव्हा फिरायला खूप मजा येते.

ईथली बोली भाषा
तेलगू, हैद्राबादी हिंदी आणि कन्नडा

इथले सण
मकरसंक्रांती
होळी
उगाधी
ईद
वरदलक्ष्मी व्रत
गणेश चतुर्थी
नवरात्र
दिवाळी

इथली भटकंती
रामोजी फिल्म सिटी
चारमिनारा
गोलकोंडा फोर्ट
सालारजंग म्युझियम
बिर्ला मंदिर
लुबनी पार्क
हुसेन सागर लेक
एन टी आर गार्डन
नेहरु झुऑलॉजिकल पार्क
श्री जगन्नाथ टेंपल
चिलकुर बालाजी
के बी आर नॅशनल पार्क

लहान मुलांसाठी भटकंती
plabo kids
kidiHou
zoo park
public garden
sudha car museum

खरेदीची ठीकाण (मॉल्स इथेही भरपूर आहेत पण इथे लोकल बाजार देत आहे)
जनरल बाझार
एम जी रोड
कोटी
चारमिनार
सुलतान बाजार
बेगम बाजार

खादाडी
हैद्राबादी बिर्याणी
हलीम
कबाब

रोडसाईड खादाडी
पुनगुलु
मिरची भजी
चाट

वेळ मिळेल तस अजून लिहित राहू या.चिन्नू, अमा आणि मौनी तुम्ही अजून ह्यात अ‍ॅड करा. प्रत्येक सण इथे कसा साजरा केला जातो ते ही लिहीत जावू. तसेच वर लिहिलेल्या प्रत्येकाची डिटेलमध्ये माहीती लिहीत राहू.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle